Home Blog Page 608

सिंहगड किल्ला विकास आराखडा बैठक पंधरा दिवसात होणार

विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांची लक्षवेधीवर मंत्र्यांचे उत्तर

पुणे : सिंहगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड बैठक येत्या पंधरा दिवसात घेण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधीमंडळात दिली.

सिंहगड किल्ल्याची सध्या दूरवस्था आहे, तेथे हजारो पर्यटक दररोज येतात मात्र त्यांच्यासाठी चालण्यासाठी रस्ता सुध्दा नाही. त्यामुळे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी विकास आराखडा कधी होणार आहे?

किल्ल्यावर एकत्रित मालकी असलेल्या पुरातत्व विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हाधिकारी यांची एकत्रित बैठक कधी होईल असा प्रश्न खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी लक्षवेधीमध्ये मांडला.

आमदार तापकीर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणाले की, तापकीर यांनी मांडलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहेच. सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड्यासंदर्भात पुरातत्व, वन, सा‌र्वजनिक बांधकाम आणि जिल्हाधिकारी या चार विभागाची एकत्रती मालकी आहे आणि त्यांच्यी त्या चारही विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली होणे गरजेचे आहे. त्याबाबत येत्या पंधरा दिवसांमध्ये ही बैठीक होईल असे नियोजन केले जाईल.


आमदार तापकीर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री शेलार यांनी सहा कोटींची वर्क ऑर्डर निघाली असल्याची माहिती दिली. या सहा कोटींमधून राजाराम महाराज समाधी परिसर, वाडा संवर्धन, कंत्राटीपध्दतीवर स्वच्छतागृह बांधकाम व देखरेख, कल्याण दरवाजा दुरुस्ती या सर्व कामांचा समावेश आहे.यातील काही कामे सुरु झाली आहे तर काही लवकरच सुरु होतील असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.

राजसंन्यास’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’वर बंदी घाला:अमोल मिटकरी यांची मागणी; थोरातांची कमळा, प्रणयी युवराजचेही घेतले नाव


मुंबई:’राजसंन्यास’ ही राम गणेश गडकरी यांची कादंबरी, तसेच ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘थोरातांची कमळा’, ‘बेबंदशाही’, ‘प्रणयी युवराज’, ‘स्वप्न भंगले रायगडाचे’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ यासारख्या नाटक अन् चित्रपटांवर बंदी घाला, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी सभागृहात केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, राज्यात आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे आपण नेहमी नाव घेतो. एवढी मोठी संत परंपरा, महापुरुष लाभले असताना करही समाजद्रोही लोकांकडून जाणीवपूर्वक महापुरुषांचा अपमान केला जातो. अलीकडेच नागपूरचं उदा. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करत ज्या प्रकारे धमकी दिली, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्याला एका महिन्यानंतर अटक झाली. तर दुसरीकडे राहुल सोलापूरकर नावाच्या व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्यावर एफआयआरदेखील झाला नाही. यावर आपण काही कडक कायदा करणार का नाही.

अमोल मिटकरी पुढे बोलताना म्हणाले की, एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तर आपण तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करतो. नेत्यावर कुणी बोलले तर आक्रमक रित्या पुढाकार घेत कारवाई करा म्हणतो. पण महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा एखादा चिल्लर माणूस अवमान करत असेल आणि त्याला अटक होण्यासाठी महिनाभर लागत असेल तर हे महाराष्ट्राच्या दृष्ठीने चांगले नाही.

थोरातांची कमळामधून दाखवला अत्यंत वाईट प्रसंग

अमोल मिटकरी म्हणाले की, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची एक परंपरा आता सुरू झाली आहे. म्हणजे आक्षेपार्ह वक्तव्य करा आणि पोलिस सुरक्षा घेत सुरक्षित स्थळी जा हे राज्याला न शोभणारे आहे. एका चित्रपटानंतर तरुण पिढीने संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती घेण्यास सुरूवात केली. संभाजी महाराजांवर 20 नाटकं आणि 35 ते 40 चित्रपट आहेत जी युट्युबवर उपस्थित आहेत. उदाहरण द्यायचे असेल तर थोरातांची कमळा हा चित्रपट तुम्ही पाहिला तर त्यामध्ये संभाजी महाराज ते थोरात्याच्या कमळेला थेट बोहल्यावरुन उचलून नेतानाचा अत्यंत वाईट प्रसंग दाखवलेला आहे. इतकंच नाही सरकारकडून एक पुस्तक विकले जाते, त्यामध्ये संपूर्ण गडकरी असे एक नाटक आहे. म्हणजे रामगणेश गडकरी यांचे ते पुस्तक आहे त्या नाटकाचे नाव आहे राजसंन्यास आणि त्यामध्ये असे लिहले आहे की, संभाजी महाराज आणि तुळसा यांच्या नात्यामधील ते नाटक आहे, अशी पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी.

 फहीम खानच्या घरावर बुलडोझर, हायकोर्टाचे ताशेरे,म्हणाले,’कायद्यात चौकटीतच राहा , अन्यथा ही निवडक आणि हेतुपुरस्सर कारवाई ठरू शकते.

नागपूर : नागपूर महानगरपालिकेने (NMC) नागपूर हिंसा प्रकरणातील आरोपींविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली असून, कथित मास्टरमाइंड फहीम खान आणि आणखी एका आरोपीच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला. मात्र, मनपाच्या या कारवाईवर आता बॉम्बे उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने स्थगिती दिली आहे.फहीम खान नागपूर दंगलीत आरोपी केल्यावर कळले काय कि त्याचे घर हे अनधिकृत आहे ?त्यापूर्वी कळले कसे नाही ? असे सवाल उपस्थित होत असताना न्यायालयाने नमूद केले की, कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केली पाहिजे, अन्यथा ही निवडक आणि हेतुपुरस्सर कारवाई ठरू शकते. याप्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत मनपाला कोणत्याही नव्या कारवाईस स्थगिती देण्यात आली आहे.१७ मार्चला रात्री नागपूरात हिंसाचार (Nagpur Violence) उसळला होता. त्यानंतर या घटनेचा म्होरक्या फहीम खान सहित अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्याच्यासहित सहा जणांवर देशद्रोहाचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. फहीमच्या अन्य बाबींचा तपास करताना त्याच्या संजयबाग येथील ३० वर्ष लीजवर घेण्यात आलेल्या घरात मोठ्याप्रमाणावर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने नागपूर महानगरपालिकेने ही तोडण्याची कारवाई केली होती.

हिंसेच्या घटनेनंतर मनपाने फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवला होता. यावर फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही कारवाई पक्षपाती स्वरूपाची आहे आणि निवडक पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे यावर त्वरित स्थगिती दिली जाते. तसेच, राज्याच्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सोमवारी सकाळी १० वाजता नागपूरातील यशोधरा नगर येथील यशोधरानगर येथील संजय बाग कॉलनीतील मनपाने फहीम खानच्या घरावर कारवाई सुरू केली. त्याचप्रमाणे महाल परिसरात एका अनधिकृत दोन मजली इमारतीवरही बुलडोझर चालवण्यात आला. मनपाने एक दिवस आधी नोटीस बजावली होती आणि अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. यानंतर आज सकाळी मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धडक कारवाई करत ही इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, विद्युत वितरण कंपनीनेही या घराचा वीज पुरवठा खंडित केला. मनपाच्या या कारवाईनंतर बॉम्बे उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

नोटिस न देता बुलडोझर कसा फिरवलात? फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा सवाल

नवी दिल्ली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात भंगार व्यापारी किताबुल्ला हमीदुल्ला आणि त्यांच्या पत्नीला चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या पराभवानंतर भारत विरोधी घोषणा दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यानंतर त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. या कारवाईविरोधात हमीदुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर आज सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि मालवण नगर परिषदेला नोटिस बजावली.

गेल्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ आमनेसामने होते. या सामन्यात भारतानं विजय मिळवला. त्यानंतर किताबुल्ला यांच्या कुटुंबानं भारत विरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. यानंतर मालवण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तारकर्ली रोडवरील किताबुल्ला हमीदुल्ला खान यांचं दुकान अधिकृत असल्याचं सांगत ते बुलडोझरनं पाडलं.कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा न देता घर आणि दुकान जमीनदोस्त केल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. किताबुल्ला हमीदुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी झाली. ‘सर्वोच्च न्यायालयानं बुलडोझर जस्टिसविरोधात कठोर सूचना दिलेल्या आहेत. अशा कारवाया रोखल्या आहेत. त्यामुळे नगर परिषदेनं केलेली कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करुन आमचं घर आणि दुकान कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पाडण्यात आलं,’ असं हमीदुल्ला यांनी याचिकेत नमूद केलं आहे.आणि आपण कोणतीही भारत विरोधी घोषणा दिल्याचा त्यांनी इन्कार केला आहे.

10-12 सिलिंडरचे विस्फोट:सिलिंडर ठेवलेल्या ट्रकला आग

मुंबई – धारावी पोलिस ठाणे हद्दीतील सायन बांद्रा लिंक रोड, दक्षिण वाहिनीवर, निसर्ग उद्यानाच्या फुटपाथ लगत रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या व सिलिंडर ठेवलेल्या एका ट्रकला आग लागून त्यामध्ये 10-12 सिलिंडरचे विस्फोट झाले आहे.सदर घटनेमध्ये कोणीही जखमी नसून आग लागलेल्या ट्रकच्या शेजारी पार्क केलेल्या साधारण तीन ते चार वाहनांचे आगीमुळे नुकसान झाले आहे. आग लागलेल्या वाहन चालकाची ओळख निष्पन्न झाले असून सदर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची आग फायर ब्रिगेडच्या एकूण 19 गाड्यांनी आटोक्यात आणली आहे.
घटनास्थळावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच सहायक पोलिस आयुक्त तसेच पोलिस उपआयुक्त परिमंडळ पाच त्यांच्या स्टाफ सहित घटनास्थळावर हजर आहेत. परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असून यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

ईशान्य मॉल मधील प्लिंक्स पबमध्ये महिला बाऊन्सरचा विनयभंग- दोघांवर गुन्हा दाखल

पुणे-येरवडा परिसरातील नामांकित ईशान्य मॉल मध्ये असलेल्या प्लिंक्स पब मध्ये दोन तरुण डान्स फ्लाेअरवर डान्स करत असताना त्यांचा धक्का इतर महिलांना लागत हाेता. त्यामुळे सदर तरुणांना समजवण्यास गेलेल्या महिला बाऊंसरचा आरोपींनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोन आरोपींवर येरवडा पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ७९, २९६, ११५ (२) , ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश दादाभाऊ घावटे (वय- ३४,रा. अण्णापूर, ता.शिरुर,पुणे) व यश कोतवाल (रा.काेरेगाव भीमा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. सदर आरोपी विरोधात ३० वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधीत घटना ही २३ मार्च राेजी रात्री पावणेएक वाजण्याचे सुमारास ईशान्य मॉल मधील प्लिंक्स पब मध्ये घडली आहे.

संबंधित महिला बाऊंसर ही मागील दोन वर्षापासून प्लिंक्स पब मध्ये नाेकरी करत आहे. तिची डयुटी सायंकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत असते. २२ मार्च राेजी रात्री सदर महिला तिच्या इतर सहकाऱ्यांसह काम करत असताना, हॉटेल किंग्ज फुडस अॅण्ड ब्रेवरेजस येथे रात्री दहा वाजता पब मध्ये गर्दी वाढली हाेती. त्यावेळी व्हीआयपी टेबल क्रमांक ४ येथे चारजण जेवण व मद्यपान करत बसले हाेते. २३ मार्च राेजी मध्यरात्री पावणेएक वाजता सदर टेबलवर बसलेला एक तरुण व त्याचा मित्र हे डान्स फ्लाेअरवर डान्स करत हाेते. त्यावेळी त्यांचा डान्स करणाऱ्या इतर महिलांना धक्का लागत हाेता. त्यामुळे त्यांना तक्रारदार यांनी बाजूला डान्स करण्यास सांगितले. त्यावर चिडून त्यातील एका तरुणाने मी बाजूला जाऊन डान्स करणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणाला. त्यानंतर त्याने महिलेस अश्लील शिवीगाळ करुन तिला मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे बाेलत आक्षेपार्ह कृत्य केले. त्यामुळे महिलेने घाबरुन हॉटेलचे सुपरवायझर यांना बाेलवले.थाेड्यावेळाने तेथे मॅनेजरसह इतरही स्टाफ आला. त्यांनी संबंधित दोन आरोपींना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते दोघे ऐकूण घेण्याचे मनस्थितीत नव्हते. त्यांनी महिलेसह स्टाफला शिवीगाळ करणे सुरुच ठेवल्याने त्यांना पब बाहेर घेऊन जाण्यात आले. पोलिसांना याबाबत माहिती हाॅटेलने दिल्यावर पोलिस सदर ठिकाणी येऊन त्यांनी संबंधित दाेघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टकले करत आहे.

कामराच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या सर्वांची जामीनावर सुटका:कामरा म्हणाला ,’मला पश्चाताप नाही..

मुंबई-कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.सुपारीच्या प्रश्नावर कुणाल म्हणाला की, तुम्ही माझे बँक खाते तपासू शकतात आणि मी सुपारी का घेऊ? मला पश्चाताप नाही, जर न्यायालयाने मला विचारले तर मी माफी मागेन.”, असे कुणाल कामराने म्हटले आहे

कुणाल कामराने विंडबन गीताद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली होती. या टीकेमुळे शिंदे गटातील कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. या सर्व वादावर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टाने विचारले, तर मी माफी मागेन अशी एका वाक्यात कुणालने प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे कुणालच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. कुणालने गाण्यातून एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटले होते. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामरा याच्या स्टुडिओ आणि हॉटेल द युनिकॉन्टिनेंटलची तोडफोड केली होती. याप्रकरणी तोडफोड करणाऱ्यांवर खार पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल करण्यात आला होता.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर सुरूवातीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज करण्यात आला. कोर्टाने सर्व 11 जणांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

या सर्व घडामोडींनंतर कुणाल कामरा याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ”मला ते बोलल्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. जर न्यायालयाने मला विचारले तर मी माफी मागेन.”, असे कुणाल कामराने म्हटले आहे. मात्र, कुणाल कामराने ही प्रतिक्रिया माध्यमांना किंवा सोशल मीडियावर नाही तर पोलिसांना तक्रारीवर दिलेल्या उत्तरात दिली आहे. एनडीटीव्हीने पोलिस सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सुपारीच्या प्रश्नावर कुणाल म्हणाला की, तुम्ही माझे बँक खाते तपासू शकतात आणि मी सुपारी का घेऊ? मी मराठीत कोणताही कार्यक्रम केलेला नाही. मी हा कार्यक्रम हिंदीमध्ये केला आहे. मी सुपारी घेतली नाही, असे कुणाल म्हणाला.

कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार- शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

म्हणाले,’ पुण्यात दिसल्यास चोप देणार..!!

पुणे-कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केलं असून या वक्तव्याचा पुणे शहराच्या वतीने तीव्र निषेध करतो. तसेच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या कामराचा आबारा का डाबरा करण्याचा कडक इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला आहे.कुणाल कामरा याने आपली हीन पातळीची भाषा आणि अवमानकारक वक्तव्यांसाठी महाराष्ट्राच्या जनतेची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा या कुणाल कामराचा आबरा का डाबरा करायला आम्हाला वेळ लागणार नाही अशा कडक शब्दात पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी इशारा दिला. तसेच हा वाचाळवीर कुणाल कामरा पुणे शहरात दिसल्यास त्याला शिवसेना चोप दिल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.

तथाकथित स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करून त्याच्या खालच्या पातळीचे वैचारिक दर्शन घडवले आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीतील नेतृत्वाला, लोकप्रतिनिधींना अश्लाघ्य आणि हीन पातळीवर जाऊन हिणवण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय असल्याचे शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले आहे.

शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी अनेक संकटांना तोंड देत, राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी सतत कार्यरत राहण्याचा वसा घेतला आहे. अशा नेत्याविषयी जाहीरपणे विनोदाच्या नावावर अश्लाघ्य भाषेत केले गेलेले हीन पातळीचे विनोद हा केवळ शिंदे यांचाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे.

लोकशाहीमध्ये अभिव्यक्ति स्वातंत्र्याला मान आहे, मात्र त्याच्या मर्यादा ओलांडून अत्यंत हीन दर्जाची भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राला कधीही न शोभणारी आहे, कुणाल कामराची ही भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह्य नसून बेजबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेचा आणि समाजाच्या भावनांचा अपमान होईल.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलमधील सिंथेटीक टेनिस कोर्टचा नूतनीकरण सोहळा उत्साहात संपन्न!

पुणे– मनपाच्या वतीने कोथरूड मध्ये विकसित केलेल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन सिंथेटीक टेनिस कोर्टचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हे क्रीडांगण म्हणजे कोथरूड-कर्वेनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा…आहे या शब्दात स्वप्नील दुधाने आणि माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले कि,’ आमच्प्रया भागातील आणि पर्यायाने शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आपण २०१७ साली लोकप्रतिनिधी या नात्याने पहिल्याच टर्ममध्ये पुणे मनपाच्या वतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल विकसित केले आहे. या ठिकाणी सन २०१७ आणि सन २०२० साली विकसित केलेल्या दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस कोर्टचाही समावेश असून या टेनिस कोर्टचे नूतनीकरण आणि अद्ययावतिकारण होणे, काळाची गरज बनले होते. याचसाठी वेळोवेळी पाठपुरावा करत तब्बल २५ लक्ष रुपये निधी मंजूर करून आणत आपण या कामाचा शुभारंभ केला होता.गेल्या आठ वर्षांपासून अनेक खेळाडूंनी या ठिकाणी सराव करत आपल्या पुणे शहराचा नावलौकिक वाढवला आहे. आज खेळाडूंच्याच शुभहस्ते नूतनीकरण सोहळा संपन्न होत असताना अनेक खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गेल्या तब्बल चार दशकांपासून टेनिस खेळाडूंना प्रशिक्षण देणारे दत्तात्रय शिंदे आणि अनेक वर्षांपासून त्यांचा वारसा जपत खेळाडू या क्रिडा संकुलात घडवणारे प्रशिक्षक रोहित शिंदे उपस्थित होते. यावेळी सर्व क्रीडाप्रेमी आणि पालक वर्गाला आपल्या पाल्याला खेळातही प्राविण्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देत पुणे शहराला नवी ओळख निर्माण करून देण्यात योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

६० वर्षीय विधवा महिलेच्या संघर्षाला यश – अखेर न्यायालयाच्या आदेशाने बिल्डरविरोधात गुन्हा दाखल!

पुणे : २४ मार्च २०२५

एका वयोवृद्ध विधवा महिलेने आपल्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाला अखेर यश आलेय , करारानुसार घराचा ताबा वेळेत न दिल्याने तसेच करारात नमूद केलेल्या सुविधा न पुरवल्याने, न्यायालयाने बिल्डर अलीअसगर याच्याविरोधात FIR नोंदवण्याचा आदेश दिला आहे वयोवृद्ध महिलेच्या वतीने न्यायालयात अ‍ॅड.क्रांती सहाणे, अ‍ॅड सुरज जाधव, अ‍ॅड स्वप्नील गिरमे, अ‍ॅड आदिल दातरांगे, अ‍ॅड नेहा पिसे, अ‍ॅड नुपूर अरगडे, अ‍ॅड सागर मांढरे, यांनी बाजू मांडली.

ही वयोवृद्ध महिला एका मोठ्या आशेने घर घेण्यासाठी पुढे आली होती. वृद्धापकाळी आधार मिळावा, सुरक्षित घर मिळावे, आयुष्यभराच्या कष्टाची काहीतरी शाश्वती असावी या आशेने घर घ्यायला निघालेल्या या महिलेच्या स्वप्नांवर बिल्डरच्या फसवणुकीमुळे पाणी फिरले. वेळीच घराचा ताबा न मिळाल्याने, तसेच करारातील सुविधा न दिल्याने तिच्यासारख्या अनेक सदनिके धारकांना अन्याय सहन करावा लागत आहे.

६० वर्षीय विधवा महिलेने बिल्डरविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून लढण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली, पण न्यायालयाच्या आदेशाने अखेर २२ मार्च २०२५ रोजी अलीअसगर आयसक्रीमवाला बिल्डरविरोधात FIR नोंदवण्यात आली.

फसवणूक करणाऱ्या बिल्डर्ससाठी धडाया महिलेच्या न्यायासाठी केलेल्या लढ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळू शकतो. फक्त योग्य मार्गाने संघर्ष करण्याची तयारी हवी!”ही कारवाई म्हणजे फसवणूक करणाऱ्या बिल्डर्ससाठी धडा आहे! सामान्य लोकांचे हक्क हिरावणाऱ्या बिल्डर्सला आता जबाबदारी स्वीकारावीच लागेल. या महिलेसारख्या असंख्य ग्राहकांची स्वप्ने चिरडली जात आहेत, आणि आम्ही ते होऊ देणार नाही!”
— अ‍ॅड. तोसिफ शेख

‘एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २४ : एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर  कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर  होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी.

यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) बसस्थानक परिसरातील समस्यांसंदर्भात आमदार सत्यजित तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारित जागा देणे, नाशिक- पुणे महामार्गावरुन जाणाऱ्या बसेसना संगमनेर बसस्थानकामध्ये थांबा देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील राखीव निकालप्रकरणी उमेदवारांची सुनावणी

पुणे, दि. २४: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या ७८६ उमेदवारांचे म्हणणे २५ मार्च ते दिनांक ४ एप्रिल २०२५ या कालावधीत ऐकून घेण्यात येणार असून उमेदवारांनी सुनावणीसाठी आपल्याला दिलेल्या तारखेला सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.

१० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील ७८६ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने सुनावणीसाठी उपस्थित रहाण्याबाबतचे नियोजन उमेदवारांच्या ई-मेल, एस.एम.एस. व परीक्षार्थींच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी या सुनावणीस स्वखर्चाने उपस्थित रहावे. दिलेल्या दिवशी समक्ष हजर न राहिल्यास सदर प्रकरणी उमेदवाराला काही सांगावयाचे नाही असे गृहीत धरून त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.

सुनावणीच्या वेळी आधारकार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ मधील उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत, परीक्षेचे प्रवेशपत्र, पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगिक सर्व कागदपत्रे, गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच चालक परवाना, बैंक पासबुक, निवडणूक ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र यासह स्वतः उपस्थित राहावे. सुनावणीच्या वेळी उमेदवाराच्यावतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

चाकण एमआयडीसी व पसिरात ४० मिनिट वीज खंडित

पुणे, दि . २४ मार्च २०२५ : महापारेच्या उर्से-चवड २२० केव्हीव्हीव्हीवाहिनीमध्ये (दि २४) ब्रेक १.३९ लोकल ट्रिपिंग आती पीजीसीआयएल तळेगाव ते चाकण ४०० केव्हीव्हीवाहिनीमध्ये वीजभार विकासला. सार्वजनिक भार व्यवस्थापन एलएस ( लोड ट्रायिंग स्कीम ) यंत्रणा कार्यान्वित शेअर्सचा समूह चाकण एमआयडीसी व मालकी ८००दाब उच्च लघुदाब ४ हजार लघुदाब तसेच ३५ हजार व्यावसायिक आणि इतर ग्राहक वीज ग्राहक २६ ते ३९ मिनिटे बंद होते.

खाली माहिती अशी की महापारेषणाच्या-चिंचवड २२० केव्ही वीजवाहिनीमध्ये आज उर १.३९ लोक ट्रिपिंग आले. ते १६३ मेगावॅट विजेची तू निर्माण व पीजीसीआयएल तळेगाव ते चाकण ४०० केव्ही वीजवाहिनीचा वीजभार वाढवला. पारेषणातील संभाव्य धोके राज्यातील विद्युतभार व्यवस्थापन एलटीएस ( लोड ट्रिमिंग योजना ) यासाठी यंत्रणा कार्यान्वित आणि चाकण आयोजक महापारेषण चाकण ४०० केव्ही, चाकण फेज २२० केव्ही व ब्रीजस्टोन २२० केव्हीसी अतिउच्चदाब उपकेंद्रांना वीजपुरवठा बंद. महावितरणच्या आयडीसीमधील ३४ उपकेंद्राचाही व्हिडिओ एम बंद आणि चाक आयडीसी व ट्रेडमार्कगाव, सावरदरी वराळे, वासुली, येलवाडी, खालंब्रे, संगी, एमआयडीसी फेज, भांबोरी, सारा, सिटी दोन, नाणेकरवाडी, आळंदी फांदी, भोजे, मोई आदि गाव ८०० उच्चदाब ४ हजार लघुदाब औद्योगिक ग्राहक तसेच सुमारे ३५ हजार कार्यकर्ते निघाले आणि व्यावसायिक ग्राहकांना आज पावणे पावणे दोनच्या सुमारास २६ ते ३९ मिनिटे टिकट.

खासदारांच्या पगारात 24% वाढ:प्रत्येक खासदाराला आता 1.24 लाख रुपये मिळतील; माजी खासदारांचे पेन्शन 31 हजार रुपये केले

नवी दिल्ली- सरकारने खासदारांच्या पगारात २४% वाढ केली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी याबाबतची अधिसूचना जारी केली. यानुसार, सध्याच्या खासदारांना आता दरमहा १.२४ लाख रुपये वेतन मिळेल. पूर्वी त्यांना दरमहा १ लाख रुपये मिळत होते.

ही वाढ खर्च महागाई निर्देशांकाच्या आधारे करण्यात आली आहे. वाढीव पगार १ एप्रिल २०२३ पासून लागू होईल. याआधी २०१८ मध्ये मोदी सरकारने दर पाच वर्षांनी खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांचा आढावा घेण्याचा नियम बनवला होता. हा आढावा महागाई दरावर आधारित आहे.

दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली.

दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे. दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आला आहे. माजी खासदारांचे पेन्शन दरमहा २५,००० रुपयांवरून ३१,००० रुपये करण्यात आले आहे.

पाच वर्षांहून अधिक काळ खासदार राहिलेल्या सदस्यांना मिळणारे अतिरिक्त पेन्शनही दरमहा २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आले आहे.

लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची संख्या

लोकसभा – एकूण सदस्य: ५४५ (सध्या ५४३)

निवडून आलेले सदस्य: ५४३ (लोकांनी थेट निवडून दिलेले)
नामनिर्देशित सदस्य: २ (राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले)
कार्यकाळ: ५ वर्षे
राज्यसभा – एकूण सदस्य: २५० (सध्या २४५)

निवडून आलेले सदस्य: २३३ (विधानसभा निवडून आलेले)
नामांकित सदस्य: १२ (कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून राष्ट्रपती निवडतात)
कार्यकाळ: ६ वर्षे (दर दोन वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात)
खासदारांना या सुविधाही मिळतात

पगार आणि पेन्शन व्यतिरिक्त, खासदारांना मोफत हवाई, रेल्वे आणि रस्ते प्रवासाची सुविधा मिळते. खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मर्यादित प्रवास सुविधा मिळतात.
याशिवाय, दिल्लीमध्ये मोफत सरकारी निवास व्यवस्था, टेलिफोन, वीज आणि पाण्यावर सूट आहे. सीजीएचएस रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत, मोफत उपचार उपलब्ध आहेत.
याशिवाय, खासदारांना संसदेच्या कॅन्टीनमध्ये सरकारी वाहन, संशोधन आणि कर्मचारी सहाय्यक आणि सवलतीच्या दरात जेवणाची सुविधा देखील मिळते.

नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार :- नाना पटोले

संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा.

मुंबई, दि. २४ मार्च २५
नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली? या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. या दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, त्यावेळी पोलीस तेथे होते. आंदोलन करताना पोलीस अशा वस्तू ताब्यात घेते पण नागपूर पोलिसांनी ती हिरवी चादर ताब्यात का घेतली नाही. ती चादर ताब्यात घेतली असती तर ही घटना झालीच नसती. नागपूरला पेटवण्यात राज्य सरकारच जबाबदार होते हे ठामपणे सांगतो, असे ज्येष्ठ नेते नाना पटोले म्हणाले.

अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, नागपूरची दंगल ज्या भागात झाली त्या भागात मुख्यमंत्री फडणवीस यांचे बालपण गेले आहे. नागपूर शहर हे सर्वधर्म समभाव मानणारे आहे. आजपर्यंत असा प्रकार नागपूरमध्ये झाला नाही. या दंगलीवेळी पोलिसांची बघ्याची भूमिका राहिली. हिरवी चादर पेटवली गेली नसती तर दंगल झाली नसती ही वस्तुस्थिती आहे, यावर गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे असे नाना पटोले म्हणाले.

कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कविता केल्याने उद्रेक झाला पण प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्याचे काय? त्यांना अटक का केली नाही. छत्रपतींच्या नावाने या दोघांनी अपशब्द वापरले, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, त्याचे उत्तर द्यावे लागले. प्रशांत कोरटकर कोणाचा हस्तक आहे, त्याचे आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. जेलमध्ये असलेल्या महेश मोतेवारची जप्त केलेली आलिशान कार त्याच्याकडे कशी? राहुल सोलापूरकर कोणाचा माणूस आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? असे संतप्त प्रश्न विचारत पाशवी बहुमताच्या आधारावर जो कारभार चालला आहे तो महाराष्ट्र पहात आहे असे नाना पटोले म्हणाले.

परभणीतील सोमनाथ सुर्यंवंशी यांच्या मृत्यूचा प्रश्न उपस्थित करत नाना पटोले म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या त्रासाने झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात सांगितले. आता जो अहवाल आला आहे त्यात सुर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे त्यात म्हटले आहे. परभणीत पोलीस लाठीहल्ल्याचे आदेश मंत्रालयातून की पोलीस महासंचालक कार्यालयातून दिले त्याचे उत्तर सरकारने द्यावे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणी मुख्यमंत्री यांनी खुलासा करावा.

राज्यात दर एक लाख लोकसंख्येमागे पोलिसांची संख्या १५५ इतकी आहे. राज्यात आज २१ हजार ८३१ पदे रिक्त आहेत ती किती दिवसात भरली जाणार आहेत. तसेच महिला पोलिसांची संख्याही कमी असून ती ३६ हजार ९०० असून हे प्रमाण केवळ १८.१० टक्के आहे. विलासराव देशमुख सरकार असताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिला पोलीस भरती योजना सुरु केली होती असेही नाना पटोले म्हणाले.