पहाट रंग कार्यक्रमात रसिक दंग
पुणे-तळजाई भ्रमण मंडळी यांनी तळजाई पठार येथे तळजाई माता मंदिरा शेजारील प्रांगणात दिवाळीची औचित्य साधून गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. सकाळच्या सुंदर अशा वातावरणामध्ये भावगीते भक्ती गीते मराठी व हिंदी चित्रपट गीते यांचा समावेश असणारा पहाटरंग राजेश दातार यांचा कार्यक्रम रसिकांकरता एक वेगळी च परवणी ठरला .जीवा शिवाची बैल जोड, कानडा राजा पंढरीचा, या जन्मावर , माझे माहेर पंढरी, मैने तेरे लिये ही, लागा चुनरी मे दाग, खैके पान बनारस वाला अशी सदाबहार गीते सादर करण्यात आली.
कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर,उल्हास दादा पवार, ,आबा बागुल ,तसेच तळजाई भ्रमण मंडळाचे सदस्य तसेच रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित होते. ढेरे काकांची नात व समूहाने सुंदर नृत्य सादर केले. थोपटे यांनी दूधवाटप , तसेच तळजाई भ्रमण मंडळाकडून लाडू पेढे व मिठाई वाटप यावेळी करण्यात आले होते.
गायिका प्रज्ञा देशपांडे आणि गायक राजेश दातार यांच्या गायनाने कार्यक्रम रंगत गेला. यावेळी तबला अभिजीत जयदे, रिदम मशीन विनोद सोनवणे, हार्मोनियम जयंत साने, कीबोर्ड मिहीर भडकमकर यांनी उत्तम साथ केली. शिल्पा देशपांडे यांचे निवेदन केले.