जनता आ. लांडगे यांना पुन्हा संधी देईल आणि हॅट्रिक होईल
पिंपरी, पुणे (दि. ५ नोव्हेंबर २०२४) भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे म्हणजे विधायक कामाचे बादशहा आहेत. जी कामे वर्षानुवर्ष प्रलंबित होती ती कामे त्यांनी मार्गी लावली असे प्रतिपादन माजी नगरसेवक व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
सुरेश म्हेत्रे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अनधिकृत बांधकामांना शास्ती कर लावण्यात आला. शास्ती कराचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. तो आमदार महेश दादा लांडगे यांनी मार्गी लावला. मोशी येथे कचऱ्याचा डोंगर झाला होता. विद्युत प्रकल्प सारखे विविध प्रकल्प राबवून तिथल्या लोकांचे जगणे सुकर केले. दुर्गंधीही कमी झाली. तरुण पिढीमध्ये संत साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी संत पिठाची स्थापना केली. चिखली मध्ये संत तुकाराम महाराज नाट्यगृह उभारले. अनेक भागात डीपी रस्ते करून घेतले. त्यात चिखली ते देहू आळंदी रस्त्याला मिळणारा 24 मीटर रस्ता, देहू आळंदी रोड ते शुद्धीकरण प्रकल्पाकडे जाणारा 24 मीटर रस्ता, बग वस्तीकडे जाणारे दोन डीपी रोड अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
आमदार महेश लांडगे यांनी चिखली येथे गाव जत्रा मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली. तात्पुरत्या स्वरूपात बैलगाडा घाट, कुस्ती आखाडा झाला आहे. येत्या पाच वर्षात आणखी विकास होणार आहे. त्यामुळे चिखलीकर खुश आहेत असे सुरेश म्हेत्रे यांनी सांगितले.
या मतदारसंघात चिखली ते तळवडे ,मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती, ताम्हाणे वस्ती, सोनवणे वस्ती ज्योतिबा नगर, शेलार वस्ती येथे अडीच हजार ते तीन हजार लघुउद्योग आहेत. प्रत्येकाची गुंतवणूक एक कोटीची आहे. अडीच हजार कोटीची गुंतवणूक झाली आहे. ५० हजार पेक्षा जास्त रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यावरचे कुटिर उद्योग लक्षात घेता लाखभर लोकांना रोजगार मिळाला आहे. तात्पुरते शेड उभारून लघु उद्योगाची संधी मिळाल्याने गुंतवणूक वाढली आहे. रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे वाहतुकीची समस्या काही प्रमाणात आहे. त्यासाठी ही आमदार महेशदादा लांडगे यांनी पावले उचलली आहेत.
मतदार संघात काही भागात केबल जळतात विद्युत पुरवठा खंडित होतो अशा तक्रारी होत्या. सन २०१४ मध्ये आमदार महेश दादा लांडगे यांनी महापारेषण सोबत बैठक घेतली. त्या त्या भागानुसार केबल डिझाईन करून अंडरग्राउंड केले. मात्र नंतर लोकवस्ती वाढत गेली. तीन ते चार मजली घरे झाली. दोन किलो वॅटचा ताण दहा किलो वॅट वर गेला. त्यामुळे केबल टिकत नाही हे लक्षात घेऊन आमदार महेशदादा लांडगे यांनी वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन ८०० कोटीचा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून आणला. त्यातून आता केबल टाकण्यात येणार आहेत. ज्यादा क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर उभारण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर हे काम मार्गी लागेल. महापालिका एकदमच खोदाईला परवानगी देणार नाही. टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात येणार आहे. औद्योगिक कंपन्यांबाबत बोलायचे झाले तर मशीन अनेक असतात .त्यामुळे केबल वर ताण येतो फ्युज जाणे, ट्रान्सफॉर्मर जळणे असे प्रकार घडतात. कोणाचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीनेच आमदार महेशदादा लांडगे आजवर मार्ग काढत आले आहेत. विजेचा प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी अशीच पावले टाकली आहेत असे म्हेत्रे यांनी सांगितले.