Home Blog Page 586

मंगलजींचा ६ टर्म विजय, हे जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे आणि विश्वासाचे प्रतीक – जे. पी. नड्डा

मुंबई : मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि या मतदारसंघाचे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे आज ‘प्रोफेशनल मीट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला.
व्यावसायिक, वकील, डॉक्टर, एमबीए, इंजिनीयर, सीए अश्या विविध पेशातील तसेच निरनिराळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या नागरिकांची भेट घेणे, त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.

या कार्यक्रमात बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे आणि महाराष्ट्रात भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “आज देशाच्या प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे, आणि या योजनांचा प्रत्यक्ष फायदा लाखो कुटुंबांना होत आहे. पूर्वी विभाजनाचे, जातीपातीचे राजकारण होते. आज विकासाचे राजकारण आहे. संपूर्ण जगातील बलाढ्य देशांच्या अर्थव्यवस्था डळमळीत झालेल्या असताना आज भारताची अर्थव्यवस्था स्थिर आणि सक्षम आहे व याची दाखल जगाने घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे दारिद्र्यरेषेखाली असलेल्या लोकांचा टक्का १% पेक्षा कमी झाला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या महत्त्वाच्या योजनांमुळे २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेखालील जीवनातून बाहेर काढण्यात यश आले आहे. ६ कोटी ५३ लाख लोकांना अन्नसहाय्य मिळालं असून, ५५ कोटी लोकांना आयुष्मान भारत योजनेतून आरोग्य विम्याचा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आज ४ कोटी घरांचे निर्माण कार्य झाले आहे. यात महाराष्ट्रात २८ लाख घरे तयार झाली आहेत. आज देशभरात ११ कोटी शौचालयांची निर्मिती झाली, घरामध्ये गॅस आले, गावागावात इंटरनेट मिळाले आणि देश प्रगतीच्या वाटेवर धावू लागला. आज आपल्या देशाच्या प्रगतीला अधिक वेग द्यायचा असेल, आपल्या महाराष्ट्राला अधिक सक्षम करायचे असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आणि भाजपाला मतदान करणं अनिवार्य आहे!”

मलबार हिल मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार लोढा यांच्याबद्दल बोलताना जे पी नड्डा म्हणाले, “आज कोणत्याही मतदारसंघातून ६ वेळा निवडून येणे हे काही सोपे काम नाही. मंगलजींचा विजय हे त्यांना जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे. कौशल्य विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी, मलबार हिलच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकद आपण त्यांच्यावर विश्वास दाखवावा ही विनंती करतो!” यावेळी लोढा यांनी जे पी नड्डा यांचे आभार व्यक्त केले, तसेच उपस्थित नागरिकांचे देखील आभार व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी थेट संवाद साधणार..नमस्कार महाराष्ट्र ..म्हणणार

१६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता बुथ प्रमुखांशी संवाद साधणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणार

पुणे-भारतीय जनता पार्टीनं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. हा विशेष संवाद नमो ॲपच्या माध्यमातून वऑनलाइन पद्धतीनं साधला जाईल. येत्या १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे.

भाजपने आपल्या गोटातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशानं या महत्त्वपूर्ण उपक्रमाची आखणी केली आहे. या संवादाद्वारे पंतप्रधान मोदी भाजपच्या निवडणूक रणनितीला बळकटी देतील आणि बुथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशा-निर्देश देतील.

हा संवाद कार्यक्रम भाजपच्या निवडणूक तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. बुथ प्रमुख हा निवडणुकीच्या व्यवस्थापनात कणा मानला जातो आणि त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेतील त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट होतील. तसंच, पंतप्रधान मोदी यांचा थेट संवाद कार्यकर्त्यांना नवा जोम आणि आत्मविश्वास प्रदान करेल.

भाजपनं महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ हा उपक्रम कार्यकर्त्यांना एकजूट करणं आणि बुथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे.

श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका:डॉ.विश्वंभर चौधरी

.घटनेबद्दल प्रेम असेल तर संघपरिवार मनुस्मृती चे दहन का करीत नाही?

निर्भय बनो आंदोलनाच्या सभेला येरवड्यात चांगला प्रतिसाद 

पुणे :’योजनांद्वारे पैसे वाटून मत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत,पण पैशासाठी मत द्यायचे की सुरक्षिततेसाठी द्यायचे हा निर्णय घ्यायची वेळ आली आहे’,असे प्रतिपादन निर्भय बनो आंदोलनाचे प्रणेते एड. असीम सरोदे यांनी केले.तर ‘गरिबांसाठी वडापाव घेऊन जाणारा आमदार निवडा .श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका,असे आवाहन डॉ.विश्वम्भर चौधरी यांनी केले.  

निर्भय बनो आंदोलनाच्या वतीने,संविधान प्रचारक चळवळ यांच्या   जेसीडी पार्क,मोझे नगर,येरवडा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.एड.असीम शेख,डॉ.विश्वम्भर चौधरी,इब्राहिम खान  ,निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड,स्मिता ताई,बाळकृष्ण निढाळकर   यांच्यासह अनेक मान्यवरांनी मते व्यक्त केली.’अन्यायाविरुद्ध न्यायाच्या लढाईत निर्भय बनो,भारत जोडो’ असा संदेश या सभेने दिला. सभेला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. 

एड.सरोदे म्हणाले,’ माणुसकी हवी असेल तर महाविकास आघाडीला मतदान केले पाहिजे.महिलांचा आदर असेल तर महिलांच्या प्रकरणात राजकीय फायदा घेण्याचे काम भाजप नेते का करतात ? ते सतत असे  करीत आले आहेत.बदलापूर प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात चालढकल का केली गेली.तेथील संस्था संघ ,भाजपशी संबंधित असल्याने त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न झाले. राहुल गांधी यांच्या संविधान संबंधी भूमिकेचे जगभर स्वागत झाले आहे. संविधान द्वेष शिकवत नाही,प्रेम शिकवत आहे .संविधान पुस्तकावरून राजकारण करणे हे फडणवीस यांना शोभते का ? त्यांना संविधान कळते का ? हे मनुस्मृती मानणारे लोक आहेत.त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की ते संविधान मानतात का ?
आपण आज सर्व भाजपचे नेते असभ्य बोलताना,वागताना पाहत आहोत.लाथा मारताना पाहत आहोत.आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे ,कारण ते असंवेदशील झाले आहेत.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संघर्ष करण्याचे शिकवले आहे. सभ्य माणसांची लढाई असभ्य माणसांची आहे.अजित पवार यांनी जे केले त्यातून त्यांना यश मिळणार नाही. व्होट जिहाद हा चुकीचा प्रचार आहे . भाजप जर मुस्लिमांशी वाईट वागत असतील तर ते भाजपला का मतदान करतील,हा साधा प्रश्न आहे,असेही एड सरोदे यांनी विचारले.  

 डॉ.विश्वम्भर चौधरी म्हणाले ,’गरिबांसाठी वडापाव घेऊन जाणारा आमदार निवडा .श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका. पुण्याची इज्जत कोणी घालवली ? माणुसकीला काळे फासणारी ही घटना आहे.आम्ही पुण्यात यासाठीच सभा घेतली, कारण यांना धडा शिकवला पाहिजे. आपण बिल्डरांचा प्रतिनिधी निवडता कामा नये, सामान्य माणसांचा प्रतिनिधी निवडला पाहिजे.वोट जिहाद म्हणून भाजपचे लोक संविधानाचा अपमान करीत आहेत.शिंदे -फडणवीस यांच्याकडे दाखविण्यासारखे काही नाही.खोके सरकारने महाराष्ट्राचा अपमान केला ,शिवाजी महाराजांची शान घालवली.मानवता धर्म नष्ट केला. पुण्यावर गुंडांच्या टोळ्या राज्य करणार नाहीत याची काळजी आपण केली पाहिजे. 

हा देश नथुराम चा असेल कि गांधींचा असेल हा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान राहणार कि नाही,हा प्रश्न आहे.घटनेबद्दल प्रेम असेल तर संघपरिवार मनुस्मृती चे दहन का करीत नाही,हा प्रश्न आहे. भ्रष्टाचार उखडून सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हाकलले पाहिजे,असे आवाहनही डॉ.चौधरी यांनी केले. 

विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसर येथे मतदान केंद्र बदलाबाबत जनजागृती

पुणे: हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुक २०२४ करिता एकूण ५३२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार केंद्र सुसुत्रीकरणांतर्गत हडपसर विधानसभा मतदार संघातील खुल्या जागेत तात्पुरत्या पत्राशेड मधील १४७ मतदान केंद्रांचे पक्क्या इमारतीतील खोल्यामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या केंद्र बदलाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी कळविली आहे.

हडपसर स्वीप पथकातर्फे स्टिकर, बॅनर तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. मतदारापर्यंत ही माहिती मतदानपूर्वी पोहोचवण्यासाठी बदल झालेल्या केंद्राचा तपशील voter helpline App व https://electroalsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच स्टिकर व बॅनर वर दिलेला क्यूआर कोड, मोबाईल द्वारे स्कॅन करून ठिकाणात बदल झालेल्या मतदान केंद्राचा तपशील उपलब्ध करून घेता येईल, अशी माहिती डॉ. मोरे यांनी दिली.

यावेळी जिल्हा समन्व्यक अधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार नागनाथ भोसले, तहसीलदार शैलजा पाटील, नायब तहसीलदार जाई कोंडे, हनुमंत खलाटे, हेमंत घोलप,सचिन खडके, विजय घुमटकर, नितीन तुपे,संग्राम पवार, शैलेश शिंदे, संतोष गायकवाड, गणेश देशमुख, रवी ऐवळे, पद्माजी डोलारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन हडपसर स्वीप समन्वयक अमरदीप मगदूम यांनी केले.

सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी २१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी

पुणे : पुणे शहरात १८ ते २२ डिसेंबर या कालावधीत आयोजित ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचे १५ दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी १३ दिवस यापूर्वीच सवलत देण्यात आली असून शिल्लक राहिलेल्या २ दिवसातून १ दिवस आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विनंतीवरून २१ डिसेंबर रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

ध्वनी प्रदुषण नियम २००० आणि ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ मधील तरतुदींचे पालन करण्यात यावे. ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा. ध्वनीचे शोषण करणारे विशिष्ट लाकडी सामुग्री आवश्यक त्या ठिकाणी लावावी. क्षेत्राप्रमाणे (झोनींग) ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेऊ नये तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कॅन्टोन्मेंट परिसरात एलईडी व्हॅनद्वारे मतदान जनजागृती

पुणे: मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रम कक्षामार्फत एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येत असून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील कमी मतदान झालेल्या भागात एलईडी द्वारे जनजागृती करण्यात आली.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले, एक खिडकी कक्षाच्या समन्वयक कविता कुलकर्णी, दिव्यांग कक्षाचे समन्वयक नवनाथ चिकणे, माध्यम कक्षाच्या समन्वयक प्रज्ञाराणी भालेराव, स्वीप कक्षांचे समन्वयक भगवान कुरळे, निवडणूक कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

या व्हॅनद्वारे नाना पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट गुलटेकडी, वानवडी व ताडीवाला रोड या भागातील राजगोपाल चौक, सेव्हन लव्हज चौक, मार्केट यार्ड, पुणे कॅन्टोन्मेंट रेस कोर्स, चंद्रभागा कचरे चौक, जगताप चौक, दोन्ही वानवडी, फातिमानगर, लिंबानी नगरपत्राचा व ताडीवाला रोड निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मुख्यालय असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अर्सेनल प्लॉट या परिसरातील एस.जी.एस मॉल, काकडे मॉल, जिल्हा परिषद, क्रिम क्रेव्हर, इरानी कॅफ़े हॉटेल्सच्या परिसरात व्हॅन नेऊन तेथील नागरिकांना मतदान करणेसाठी प्रोत्साहित करण्यात आले. या एलईडी व्हॅनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग केला मोकळा हेमंत रासने

पुणे:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पाठपुरावा केल्याने दाट वस्ती आणि गावठाण भागात बांधकाम करताना 18 मीटरपेक्षा जास्त खोली असलेल्या भूखंडावर साइड मार्जिन सोडण्याची सक्ती शिथिल करण्यात आली, त्यामुळे जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केल्याचा दावा कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी केला.

रासने यांच्या प्रचारार्थ आज गाडीखाना हॉस्पिटल, फडगेट पोलीस चौकी, पानघंटी चौक, राष्ट्रभूषण चौक, खडकमाळ आळी, पंच हौद चर्च, शितळादेवी चौक, महाराणा प्रताप चौक, काची आळी, फूलवाला चौक परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक अजय खेडेकर, रुपाली ठोंबरे पाटील, आरती कोंढरे, सम्राट थोरात, विजयालक्ष्मी हरिहर, अजय दराडे, गणेश काची, निलेश जगताप, अभिजीत राजपूत, वैशाली नाईक, निर्मल हरिहर यांची प्रमुख उपस्थिती होती.यांचा प्रमुख सहभाग होता.

रासने म्हणाले, “मध्य वस्तीत बांधकाम करताना अनेक अडचणी येतात. जुन्या नियमानुसार अनेक इमारतींना कोणतीही साइड मार्जिन न सोडता बांधकामास मंजुरी मिळत होती. परंतु यूडीसीपीआर नियमावलीतील बदलांनतर 15 मीटरपेक्षा जास्त खोलीच्या इमारतीसाठी एक मीटर साइड मार्जिन सोडणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यावर आम्ही हरकत घेतली. त्याची दखल घेत नियम शिथिल करण्याचा आदेश काढण्यात आला. परंतु महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात पुरेशा सवलत नसल्याने पुनर्विकास अवघड झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून नियम शिथिल करण्यात आले.”

रासने पुढे म्हणाले, “शहरातील गावठाणांमध्ये अनेक मिळकती 18 मीटरपेक्षा जास्त खोलीच्या आहेत. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून वाड्यांचा पुनर्विकास करताना दोन टक्के अतिरिक्त प्रिमियम हार्डशीप आकारून साइड मार्जीनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे वाड्यांचा पुनर्विकास वेगाने होईल आणि नागरिकांना अग्निशामक यंत्रणा, वाहनतळासह इतर सुविधा मिळतील.”

दक्षिण पुण्यासाठी मिळणार सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधा-आमदार माधुरी मिसाळ

पुणे-बिबवेवाडीतील ईएसआयसीच्या जागेवर सर्व सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधांनी परिपूर्ण 500 खाटांचे रुग्णालय दक्षिण पुण्यासाठी वरदान ठरेल असा विश्वास पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.

मिसाळ यांच्या प्रचारार्थ बिबवेवाडी, अप्पर सुपर इंदिरानगर, व्हीआयटी कॉलेज, 276 ओटा, अप्पर डेपो परिसर या भागात प्रचारफेरी आयोजित करण्यात आली होती. दीपक मिसाळ, वर्षा साठे, विनीत पिंगळे, अजय भोकरे, अविनाश खेडेकर, बाबुराव घाडगे, स्वप्निल माकुडे,रूपाली धाडवे,अविनाश कुलकर्णी, विक्रम फुंदे, सचिन मारणे, राहुल पाखरे, मीनानाथ पराडकर, वैभव देवकर, गणेश अर्जुने यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिसाळ म्हणाल्या, “माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयाच्या 16 एकर जागेत सात मजली इमारतीत 500 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी सुरू आहे. पर्वती बिबवेवाडी, मार्केट यार्ड, सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना दर्जेदार, अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळणार आहेत. सध्या येथे 150 खाटा असून आता शस्त्रक्रियाही केल्या जात आहेत. कामगारांसाठी 100 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.”

मिसाळ म्हणाल्या, “अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण कक्ष, बाह्य आणि सर्व प्रकारच्या आंतररुग्ण सुपरस्पेशालिटी सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष, साधारण व अतिदक्षता कक्ष या रुग्णालयात असणार आहेत. रेडिओलॉजी, बायोकेमेस्ट्री, मायक्रोबायोलॉजी अशा विविध प्रयोगशाळांची सुविधा मिळणार आहे. कोरोना काळात आमदार निधीतून या रुग्णालयातून ऑक्सिजन प्लाँट आणि व्हेंटिलेटर पुरविण्यात आले होते.”

मिसाळ पुढे म्हणाल्या, “प्रत्येक निवडणुकीत ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभारू अशी घोषणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून केली जात होती. पण ती कधीही प्रत्यक्षात आली नाही. परंतु केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही ती प्रत्यक्षात आणली. तसेच भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावने पुणे महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय आम्ही कार्यान्वित केले.”

तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिले पाहिजे, तुमच्या सगळ्या उमेदवारांनी शरद पवारांचे फोटो ,व्हिडीओ वापरता कामा नयेत -सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निर्देश

0

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत आज 13 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पाडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचे फोटो वापरु नका. स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असे निर्देश अजितदादाच्या गटाला दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.
अजित पवारांकडून वारंवार शरद पवारांच्या फोटोचा वापर केला जातो, अशी तक्रार शरद पवारांच्या वकिलाने केली. यावर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जरी तो व्हिडीओ जुना असेल किंवा काहीही असले तरी तुम्ही शरद पवारांचा चेहरा का वापरता? असा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला. तुमच्या सगळ्या उमेदवारांनी शरद पवारांचे फोटो , व्हिडीओ कशाला वापरले पाहिजे. जर तुमचे वैचारिक मतभेद आहेत, तर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे अजित पवार गटाला सांगितले. आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांचे फोटो व्हिडीओ वापरत नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार गटाने दिले.
यापूर्वी या प्रकरणावर बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी घड्याळ निवडणूक चिन्हाचा मुद्दा न्यायालयात असल्याचे डिस्क्लेमर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 36 तासांच्या आत वर्तमानपत्रात प्रकाशित करावे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. कोर्टात वेळ वाया घालवू नका, तर मतदारांना आकर्षित करा, असेही न्यायालयाने शरद पवार गट आणि अजित पवार गटाला सांगितले होते.

दौंड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 3 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

दौंड, दि. 13: दौंड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कर्तव्यावर कार्यरत असलेल्या 1 हजार 3 अधिकारी कर्मचाऱ्यांनी संत तुकडोजी विद्यालय, एसआरपीएफ कॅम्प येथे टपाली मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली आहे.

विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याकडून नमुना 12 भरुन घेण्यात आले होते. टपाली मतदानाकरीता संत तुकडोजी विद्यालय एकूण 3 टपाली मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली. यावेळी निवडणुक कर्तव्यावर असलेल्या 1 हजार 3 अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 408 पोलीस कर्मचारी सहभागी होते. टपाला मतदान प्रक्रियेकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत काळे, टपाली मतदान नोडल अधिकारी दिनेश अडसूळ व सहायक पोपट कुंभार यांनी नियोजन केले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मरकड यांनी दिली.

अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ आणि श्री समर्थ सेवा प्रतिष्ठानचा चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा

पुणे-कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांची गोरगरिबांप्रति कणव आहे. दुर्बल आणि असंघटित क्षेत्रासाठी जे काम करता; त्याचा प्रचंड आनंद आणि कौतुक वाटतं अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद ऊर्फ बंडूशेठ तांबे यांनी व्यक्त केली.

महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ घरोघरी संपर्काअंतर्गत आज श्री पाटील यांनी कोथरूड मधील हिंगणे होम कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद ऊर्फ बंडूशेठ तांबे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कोथरुड मतदारसंघाचे भाजप महायुतीचे समन्वयक सुशील मेंगडे, नगरसेविका वृषाली चौधरी, दत्ताभाऊ चौधरी, आदित्य बराटे, राजू मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत शितोळे, हभप बाळासाहेब मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते मनोहर माळी, भाजपा युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष गौरव खैरनार यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आनंद ऊर्फ बंडूशेठ तांबे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत चंद्रकांतदादा पाटील यांनी तळागाळातील प्रत्येक घटकांसाठी काम केले आहे. यातून त्यांची आर्थिक दुर्बल घटकांप्रतिची आत्मियताच प्रतित होते. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील रिक्षाचालकांठी केलेले काम अवर्णनीय आहे. त्यामुळे कोथरूड मधील प्रत्येक नागरिक त्यांच्यावर भरभरुन प्रेम करत आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच, निवडणूक निकालानंतर कोथरुड विधानसभा मतदारसंघातील ते भरघोस मतांनी विजयी होतील; आणि महायुतीच्या मंत्रिमंडळात पहिल्या पाच मध्ये त्यांचा समावेश असेल, अशीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ आणि श्री समर्थ सेवा प्रतिष्ठानचा चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे पत्र पाटील यांना सुपूर्द केले. याबद्दल पाटील यांनीही कृतज्ञता व्यक्त केली.

अल्पसंख्याकांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध-खा. इम्रान प्रतापगढी

पुणे : राजकारणात पक्षनिष्ठा, सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक असलेले रमेशदादांसारखे कणखर व्यक्तिमत्त्व आवश्यक आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी आणि येथील सामाजिक व धार्मिक सलोखा टिकविण्यासाठी रमेशदादांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी बुधवारी केले. तुम्ही रमेशदादांना आमदार करून विधानसभेत पाठवा आम्ही त्यांना मंत्री करू. कँटोन्मेंटच्या विकासासाठी निधी कमी पडला तर मी माझ्या खासदारनिधीतून मदत करेन, पण कँटोन्मेंटचा विकास आता थांबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक विभागाच्या प्रमुख मान्यवरांचे चर्चासत्र कॅम्पमधील टाउन प्लाझा येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कँटोन्मेंटच्या नागरिकांना केवळ आमदार नाही तर मंत्री निवडायचा आहे, असे प्रतापगढी यांनी सांगताच रमेश बागवे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी झाली. राजस्थानचे माजी मंत्री आणि अजमेर दर्ग्याचे अध्यक्ष आमीन पठाण, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, मौलाना निजामुद्दीन चिश्ती, डॉ. मौलाना काझमी, अली इनामदार, शफी इनामदार, जावेद शेख, भोलासिंग अरोरा, फादर रॉड्रिक्स, कवीराज संघेलिया, विनोद मथुरावाला, प्रसाद केदारी, नरुद्दीन अली सोमजी, सलीम शेख, चंद्रशेखर धावडे, माजी नगरसेवक अविनाश बागवे आणि उमेदवार रमेश बागवे यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध समाजातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

राज्यघटना बदलण्यासाठी ‘अब की बार चारसो पार’ हा नारा देणाऱ्या लोकांना देशातील जनतेने २४० जागांवर आणले. जग अबोल लोकांचा इतिहास वाचत नाही. आपल्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराबद्दल आवाज उठविण्याची गरज आहे. बटेंगे तो कटेंगे, हिंदू स्त्रियांचे मंगळसूत्र हिसकावले जाईल या फसव्या आणि द्वेषी प्रचाराला आपण प्रेमाच्या दुकानातून उत्तर द्यायचे आहे. द्वेषाच्या बाजारात राहुल गांधी यांचे प्रेमाचे दुकान महाराष्ट्र आणि देशाला पुढे नेऊ शकते. महाराष्ट्रची अस्मिता वाचविण्यासाठी गुजरातच्या रिमोटवर चालणारे सरकार हद्दपार करण्याची गरज आहे. लोकशाही आणि राज्यघटना वाचवली नाही तर अल्पसंख्याक समाजाचे स्थान धोक्यात येईल. लोकशाही आणि देश वाचविण्यासाठीची ही लढाई आहे. मोदींच्या काळात महागाई वाढल्याने लाडक्या बहिणींच्या डोळ्यांत अश्रू आहेत. हिंदू-मुस्लिम, कलम ३७०, घुसखोरी ही भाषा बोलून भाजप जाती-धर्मात तेढ निर्माण करीत आहे, अशी टीका प्रतापगढी यांनी केली.

पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात सर्व जाती-धर्माचे लोक राहत असल्याने हा छोटा भारत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येथून १३ हजारांचे मताधिक्य मिळाले. भाजपने लोकांमध्ये भांडणे लावली आहेत. निवडणुकीसाठी पैशांचा पाऊस पाडला जात आहे, अशी टीका बागवे यांनी केली.

घोरपडी येथील श्रावस्तीनगर, बालाजीनगर, गुलमोहर पार्क, श्रीनाथनगर, निगडेनगर, बी. टी. कवडे रस्ता, डोंबरवाडी आणि कवडेमळा या परिसरात बुधवारी सायंकाळी निघालेल्या रमेश बागवे यांच्या पदयात्रेचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. पदमजी पोलिस चौकीजवळ कोपरा बैठक पार पडली.

काम बोलतंय, विश्वास वाढतोय – खडकवासल्यातील प्रामाणिक नेतृत्व म्हणून भिमराव तापकीरांचा उल्लेख होतोय

पुणे-खडकवासला मतदार संघात भिमराव तापकीर यांनी प्रचारात नागरिकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटी गाठी द्वारे प्रचारात आघाडी घेतली आहे. आज वारजे येथील उद्यान, वॉकिंग ट्रॅक ला जाऊन त्यांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या यावेळी माजी नगरसेवक किरण बारटक्के, सचिन दांगट, माधव देशपांडे, पराग ढेणे त्यांच्या समवेत होते .

ना दिखावा, ना दबाव – लोकांसाठी निःस्वार्थ नेतृत्व असलेले खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मनामध्ये प्रामाणिकता, मितभाषी स्वभाव, आणि कामांमधून परिणाम साधणारे नेतृत्व म्हणून भिमराव तापकीर यांचा उल्लेख भेटणारे नागरिक करू लागले आहेत .त्यांना भेटणारे नागरिक यावेळी म्हणत आहेत कि, “गोंधळ न करता, गाजावाजा न करता, काम करत राहणे” हा त्यांचा स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतो. निस्वार्थीपणे जनतेसाठी कार्यरत असून प्रलोभनांना फाटा देत कामांवर भर: ते कधीही मतदारांना खोटी आश्वासने किंवा प्रलोभने देत नाहीत. त्यांच्या मते, कामाची प्रामाणिकता आणि लोकांचा विश्वास हाच विजयाचा खरा मार्ग आहे. लोकांसाठी सतत उपलब्ध, कोणतीही अडचण असो, अण्णा नेहमी मतदारांच्या सोबत उभे असतात. त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याशी संवाद साधणे सोपे वाटते. कामगिरीचा पाया, विश्वासाचा आधार असल्याने गेल्या अनेक वर्षांतील त्यांच्या कार्याने खडकवासल्यात विकासाचे नवे अध्याय लिहिले आहेत.रस्ते, पाणीपुरवठा, समाविष्ट गावांमधील विकासकामे, वीजपुरवठा, पर्यटन विकास, ब्रिज, समाजमंदिर, ओपन जिम, सोसायट्याना वीज बिल बचतीसाठी सोलर प्रकल्प आणि इतर मूलभूत विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणारा नेता अशी त्यांची प्रतिमा राहिली आहे. या कौतुकाने उमेदवार तापकीर स्वतः,’ आणखी याहून काय हवे तुमचे प्रेम असेच लाभो’ म्हणत पुढे प्रचाराला निघताना दिसत आहेत


आमचं काम बोलतंय” आम्ही मतदारांना गृहीत धरत नाही, आम्ही त्यांच्या विश्वासाला प्रामाणिकतेने उतराई होतो,मतदारांनी दिलेला प्रत्येक मत हा विश्वासाचा एक प्रकार असतो, जो प्रामाणिकपणे परत देणे हे आमचे कर्तव्य आहे – भिमराव तापकीर

धंगेकरांच्या पाठीशी उभे राहण्यात केवळ कसब्यातील लोकांचेच नव्हे, तर पुणेकरांचेही हित!-शांतीलाल सुरतवाला

पुणे-आमदार रवींद्र धंगेकर यांना केवळ १६ महिन्यांचीच आमदारकी मिळाली;पण या अवधीत त्यांनी ससूनमधील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणून संपूर्ण महाराष्ट्रातील मादक द्रव्यांच्या तस्करीवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडले. त्यांची ही कामगिरी महाराष्ट्राच्या आणि तरुण पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत हितकारी ठरली. त्यामुळे धंगेकर यांना आपण दिलेले मत संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्थकी लागते, असा विश्वास त्यातून निर्माण झाला आहे.त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी धंगेकरांनाच मतदान करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी महापौर यांनी केले आहे.

सुरतवाला यांनी यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, धंगेकर यांनी ससूनमधील मादक द्रव्य गैरव्यवहाराचे जे रॅकेट उघडकीस आणले, त्यातून पाच पोलीस निलंबित झाले. याची पाळेमुळे राज्यभर असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. त्यावर कारवाई करून या प्रकाराला आळा घातला गेला. धंगेकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे यश लाभले आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.

पुण्यातील पोर्शे मोटार कार अपघातप्रकरणीही त्यांनी असाच आक्रमक आवाज उठवला. हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी मोठ्या पैशांची ऑफर असतानासुद्धा धंगेकर यांनी ती धुडकावून लावून सर्वसामान्य माणसाच्या हिताचे रक्षण केले.आजच्या जमान्यात ही बाब साधी नाही. बेकायदेशीर पब्ज आणि हुक्का पार्लर यांच्याविरोधात कोणीतरी लोकप्रतिनिधींनी आक्रमक होऊन आवाज उठवायला पाहिजे होता, ती जबाबदारी धंगेकर यांनी समर्थपणे पार पाडली आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहणे हे केवळ कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्याच हिताचे नव्हे तर संपूर्ण पुणेकरांच्या हिताचे आहे असेही सुरतवाला यांनी म्हटले.

कसबा मतदार संघातील ब्राह्मण समाजाने गेल्या पोटनिवडणुकीत आपले पारंपारिक पद्धतीचे मतदान बाजूला ठेवून धंगेकर यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय धंगेकर यांनी सार्थ ठरवला आहे. आपण निवडून दिलेला आमदार महाराष्ट्राच्या उपयोगी पडतो हे धंगेकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध केले आहे, त्यामुळे कसबा पेठ येथील अन्य समाजाबरोबरच ब्राह्मण समाजही धंगेकर यांच्याबरोबरच उभा राहील असा विश्वासही सुरत वाला यांनी व्यक्त केला. ज्या मतदारांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला मत देऊ नये असे आवाहन ही सुरतवाला यांनी केले.

सायंकाळी नारायण पेठेतील मुरलीधर भोजनालय येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. ओंकारेश्वर मंदिर, अहिल्यादेवी शाळा, नेने घाट, मेहुणपुरा, केसरी वाडा, गरुड गणपती, भरत नाट्यमंदिर, चिमण्या गणपती असा शनिवार, सदाशिव, नारायण पेठे येथून पदयात्रा जाऊन खजिना विहीर विठ्ठल मंदिर येथे पदयात्रा समाप्त झाली. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

मलबार हिलमधील राखीव भूखंडाचा लिलाव थांबवण्याची, आमदार लोढा यांनी केली महापालिकेला विनंती

0

मुंबई, १३ नोव्हेंबर : मलबार हिल परिसरातील उद्यानासाठी राखीव असलेली जागा व्यापारीकरणासाठी वापरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेद्वारे घेण्यात आला होता. सदर निर्णयास येथील स्थानिक नागरिक आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी या प्रकरणाची आज दखल घेतली. या मोकळ्या भूखंडाच्या लिलावाची प्रक्रिया थांबवण्याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना लोढा यांनी आज पत्राद्वारे विनंती केली.

मुंबई महानगरपालिकेसारख्या नामांकित शासकीय संस्थेकडून राखीव भूखंडाचा व्यापारीकरणासाठी लिलाव करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. ज्या मूळ कारणासाठी सदर भूखंड आरक्षित आहे, त्या कारणासाठी तो वापरला जायला हवा. सदर भूखंडाच्या व्यापारीकरणसाठी नागरिकांनी देखील विरोध केला असून, मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या मागणीचा आदर करावा असे मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

मलबार हिलमध्ये रमाबाई आंबेडकर मार्गाशेजारील बेस्टचे रिसिव्हिंग स्टेशन असलेला २४३२ स्क्वेयर मीटरचा प्लॉट खाजगी व्यापारासाठी भाड्याने देण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला होता.