Home Blog Page 587

120 कोटी मोबाईल वापरकर्त्यांना स्वतःच्या मोबाईल ओळखीवर मिळणार नियंत्रण आणि सुरक्षा

नागरिकांच्या तक्रारीनंतर जवळपास 30 लाख मोबाईल उपकरणे वापरासाठी प्रतिबंधित अर्थात ब्लॉक

संचारसाथीच्या माध्यमातून दूरसंचार ग्राहकांना फसवणुकीपासून अधिक सुरक्षा मिळणार, हरवलेल्या मोबाईल उपकरणाची तक्रार आणि शोध घेणेही झाले सोपे

सुमारे 18 लाख हरवलेली / चोरीला गेलली मोबाईल उपकरणे यशस्वीरित्या शोधून वापरकर्तांना परत दिली

बनावट फोन कॉल्सना प्रतिबंध, संचारसाथीच्या माध्यमातून करता येणार तक्रार, विभागही तातडीने कारवाई करणार

नवी दिल्‍ली, 9 एप्रिल 2025

केंद्रीय दूरसंचार विभागाच्या  (Department of Telecommunications – DoT) संचारसाथी या अद्ययावत नागरिक – केंद्रित उपक्रम आहे. यामुळे देशातील 120 कोटीं पेक्षा जास्त दूरसंचार ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल ठरले आहे. या डिजीटल मंचाच्या माध्यमातून देशभरातील मोबाईल सेवा वापरकर्त्यांना त्यांच्या दूरसंचार जोडण्यांवर स्वतःचे अधिक नियंत्रण ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे, तसेच या ग्राहकांना फसवणूक आणि सुरक्षा धोक्यांविषयी सुलभतेने तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.  या माध्यमातून नागरिकांसाठी डिजिटल सुरक्षा अधिक बळकट झाली , पारदर्शकता वाढली आणि मोबाईल सेवा वापरकर्त्यांचे सक्षमीकरण होत आहे  असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.

प्राथमिक पातळीवर मे 2023 मध्ये संचारसाथी या उपक्रमाचा प्रारंभ केला गेला होता. या उपक्रमाअंतर्गत वापरकर्त्यांना त्यांना स्वतःच्या मोबाईल उपकरणाच्या ओळखीचे व्यवस्थापन करण्याची आणि या ओळखीच्या सुरक्षितेत उपयुक्त ठरणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिला गेला. यात तुमची मोबाईल जोडणी अर्थात कनेक्शन जाणून घ्या, आपले हरवले गेलेले अथवा चोरीला गेलेले मोबाईल उपकरण ब्लॉक अर्थात वापरासाठी प्रतिबंधित करा, आणि आपल्या मोबाईल उपकरणाचा IMEI क्रमांक सत्यापित करा या प्रमुख सुविधांचा समावेश आहे.

याअंतर्गतच्या तुमची मोबाईल जोडणी अर्थात कनेक्शन जाणून घ्या या सेवेच्या माध्यमातून मोबाईल  वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल उपकरणाशी जोडलेल्या ओळख क्रमांकावर नोंदणीकृत सर्व मोबाईल क्रमांक तपासण्याची सुविधा मिळते. आपले हरवले गेलेले अथवा चोरीला गेलेले मोबाईल उपकरण ब्लॉक अर्थात वापरासाठी प्रतिबंधित करा या सेवेअंतर्गत वापरकर्त्यांना विशिष्ट परिस्थितीत त्यांचे मोबाईल उपकरण तातडीने वापरासाठी प्रतिबंधित म्हणजेच ब्लॉक करता येते, त्याविषयी तक्रार दाखल करता येते आणि त्याचा माग काढून तो परत मिळवण्याच्या शक्यतेची संधीही उपलब्ध होते. यासोबतच आपल्या मोबाईल उपकरणाचा IMEI क्रमांक सत्यापित करा या सेवे अंतर्गत वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल उपकरणाच्या ओळखीशी संबंधित असलेला IMEI (International Mobile Equipment Identity) क्रमांक अर्थात आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख क्रमांकांची सत्यता पडताळता पाहता येते.

या सुविधांच्या सोबतीनेच, संचारसाथी अंतर्गत वापरकर्त्यांसाठी चक्षु ही एक सहभागात्मक सुविधा देखील उपलब्ध करून दिली गेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना संशयास्पद कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेश विषयी तसेच फसवणुकीच्या उद्देशाने अनपेक्षितपणे केला जाणारा व्यावसायिक संवाद (Unsolicited Commercial Communications – UCC) अथवा फसवणूक वा इतर कोणत्याही गुन्हेगारी उद्देशाने होत असलेली संवादाची प्रक्रिया आढळली तर ते त्याबाबतची तक्रार दाखल करू शकतात.

दूरसंचार विभागाला संचारसाथीच्या पोर्टलवर असंख्य तक्रारी प्राप्त होत असतात. यांपैकी एक महत्वाची तक्रार म्हणजे प्रत्यक्षात +91 हा भारताचा आंतरराष्ट्रीय दूरसंचार कोड असलेल्या परदेशातील क्रमांकावरून येत असलेले कॉल. अशा तऱ्हेने प्रत्यक्ष पदरदेशातून आलेले फोन कॉल हे भारतातील स्थानिक कॉल असल्याचे भासवून फसवणूक केली जात आहे. या फसव्या फोन कॉलसाठी वापरले जाणारे दूरध्वनी वा मोबाईल क्रमांक हे फिशिंग म्हणजेच आर्थिक फसवणूक वा इतर गुन्हेगारी स्वरुपाच्या उद्देशानेच केले गेलेले असतात. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होत असतो. त्यामुळेच दूरसंचार विभागाने या समस्येला आपल्या प्राधान्यक्रमावर ठेवले आहे. त्यादृष्टीनेच आता नागरिकांना अशा फोन कॉल्सची तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर संबंधित पोलीस प्रशासनाच्या मदतीने दूरसंचार विभाग या प्रकरणांची कसून सखोल चौकशी करते आणि त्यानंतर हे फसवे कॉल करण्यासाठी स्थापन केलेली यंत्रणा आणि व्यवस्था तातडीने पूर्णतः बंद केली जाते.

संचारसाथीच्या छत्राअंतर्गतच वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिलेली एक उपयुक्त सेवा म्हणजे वायरलाइन इंटरनेट सेवा प्रदाते (ISPs) शोधा ही सेवा. या सेवेच्या माध्यमातून नागरिक आपल्या परिसरातील परवानाधारक इंटरनेट सेवा प्रदात्यांची माहिती एका क्लिकवर मिळवू शकतात. या सेवेमुळे नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य इंटरनेट सेवा सुलभतेने मिळवणे शक्य झाले आहे.

संचारसाथी या उपक्रमाला सुरुवातीपासूनच नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, आणि दूरसंचार विभागानेही नागरिकांद्वारे प्राप्त झालेल्या विविध स्वरुपाच्या तक्रारींवर तितकीच प्रभावी कार्यवाही केली आहे. यातलेच काही उल्लेखनीय यश खाली मांडले आहे.

  • आत्तापर्यंत मोबाईल सिम कार्डांशी संबंधित 1.35 कोटीपेक्षा समस्या सोडवल्या गेल्या आहेत.
  • नागरिकांच्या तक्रारीनंतर जवळपास 30 लाख मोबाईल उपकरणे वापरासाठी प्रतिबंधित अर्थात  ब्लॉक करण्यात आले आहेत. यांपैकी सुमारे 18 लाख हरवलेली / चोरीला गेलली मोबाईल उपकरणे यशस्वीरित्या शोधून वापरकर्तांना परत दिली गेली आहेत.
  • फसवणूक, फसवणूकीच्या उद्देशाने केलेले व्यावसायिक फोन कॉल (UCC), तसेच गुन्हेगारी स्वरुपाच्या संशयास्पद कृतींशी संबंधित असलेले सुमारे 5.5 लाखांपेक्षा जास्त मोबाईल क्रमांकांवर  कारवाई केली गेली आहे.

देशातील मोबाईल सेवा वापरकर्त्यांच्या हिताच्या दृष्टीने संचारसाथीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दूरसंचार विभागाने वेळोवेळी व्यापक जागरूकता मोहीमाही राबवल्या आहेत. परिणामी संचारसाथीच्या वापरकर्त्यांची संख्या आणि या उपक्रमाला मिळणारा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वापरकर्त्याच्या सोयीसाठी दूरसंचार विभागाने ही सेवा वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसारच अँड्रॉईड वापरकर्ते Google PlayStore वरून तर आयफोनचे वापरकर्ते iOS Store वरून या सेवेचे मोबाईल अॅप डाऊनलोड करून घेऊ शकतात, अथवा www.sancharsaathi.gov.in या अधिकृत पोर्टललाही भेट देऊ शकतात.

‘संचारसाथी’ च्या माध्यमातून भारत सरकार देशाच्या दूरसंचार परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी आणि नागरिकांच्या सहभागातून डिजिटल सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.

पोलीस हे वाहतूक नियमनासाठी की फक्त दंड वसुलीसाठी -भाजपा प्रवक्ते खर्डेकर यांनी व्यक्त केला संताप

पुणे- बेशिस्त वाहन चालक , बेशिस्त पार्किंग या समस्या आहेतच पण पोलिसांनी लपून छपून .. पकडला तो चोर …या भावनेने निव्वळ दंडवसुली करण्याच्या वागणुकीने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे असा आरोप करत त्या पेक्षा पोलिसांनी वाहतूक नियमांच्या कामाकडेच प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.अशी जोरदार मागणी भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पोलीस उपायुक्तांच्या नावे काढलेल्या पत्रकातून केली आहे. पोलीस समोर असल्यावर कोणीही नियम मोडण्याचे साहस करणार नाही आणि पोलिसांच्या समोर नियम मोडून जाणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी असेही खर्डेकर यांनी म्हटले आहे.

त्यांनी असे म्हटले आहे कि,’शहरात विविध ठिकाणी दुचाकीं वर कारवाई करण्यात येते व ती योग्य देखील आहे. बेशिस्त वाहन चालक, बेशिस्त पार्किंग ही समस्या आहेच. मात्र नो पार्किंग मधील दुचाकी उचलताना अनेक ठिकाणी वादावादी च्या घटना घडतात. त्याचे व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होत असतात.मी रहात असलेल्या कर्वेनगर भागात रोजच कारवाई होत असते.कर्वे स्त्री शिक्षण संस्था ते दुधाने लॉन्स च्या अरुंद रस्त्यावर आपली गाडी दुचाकी उचलायला लागली की तेथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे .सध्या वाहतूक पोलीस आणि सामान्य नागरिकांमध्ये अनावश्यक दुरावा निर्माण झालाय. यासाठी मी खालील मागण्या आग्रहपूर्वक मांडत आहे….
1) अलका चौक ते शहरभर कुठे ही बघा वाहतूक पोलीस घोळका करून, सिग्नल पासून लांब लपून छपून उभे असतात. नो एंट्रीत देखील कुठे तरी मध्ये उभे असतात. यातून नागरिकांना प्रश्न पडतो की शहर वाहतूक कोंडीत अडकलं असताना वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमनासाठी आहेत की फक्त पावत्या फाडायला. तरी याबाबत पोलिसांना योग्य सूचना देऊन हे प्रकार बंद करावेत ही मागणी करत आहे.
2) दुचाकी उचलणारी गाडी आल्यावर जर नियम मोडणारी एखादी व्यक्ती जागेवर दंड भरायला तयार असेल तर तो भरून घ्यावा, केवळ निधी वाढीसाठी दुचाकी लांब पोलीस चौकीवर नेऊ नये ह्याबाबत निर्देश द्यावेत.
3) दुचाकी वर कारवाई करताना शेजारी उभ्या असलेल्या चार चाकी किंवा तीन चाकी टेम्पो वर कारवाई करत नाहीत आणि याचे तीव्र पडसाद उमटतात. तरी दुचाकी उचलताना जर नो पार्किंग मध्ये चार चाकी असेल तर त्याला जॅमर लावावा अथवा मोबाईल वरून दंड लावल्यास सामान्य नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार नाही.तरी तसे आदेश निर्गमित करावे ही विनंती.
4) रोजच वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात वाहतूक पोलीस अथवा वॉर्डन दिसत नाहीत, तरी आपणच दिलेल्या आश्वासनानुसार ते दिसावेत ही माफक अपेक्षा.
5) शहरात अनेक ठिकाणी पी 1,पी 2,नो पार्किंग, नो एंट्री इ वाहतूक नियमनाच्या फलकांची दुरावस्था दिसून येते. तरी हे फलक सुस्थितीत करण्याबाबत पावले उचलावीत ही विनंती.
6) शहरातील जड वाहनांची वाहतूक सर्रासपणे सुरु असल्याचे दिसत आहे. सोबत जोडलेल्या फोटोत एकीकडे पोलीस दुचाकी वर कारवाई करत आहेत तर दुसरीकडे मोठा मिक्सर जाताना दिसत आहे. ह्या विरोधाभासामुळे नागरिक पोलीसांबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसतात. तरी ह्या परिस्थितीत बदल व्हावा.

भविष्यातील अडचणी आणि आर्थिक गरजा ओळखून गुंतवणूक करा – नंदकुमार काकिर्डे

इन्फनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे दिमाखदार उद्घाटन

पुणे – बचतीबरोबरच सर्वांनी शेअर मार्केट मधील गुंतवणूक व व्यावहारिक कौशल्य समजून घ्यावे. यातूनच आर्थिक साक्षरता येते. शेअर बाजारात धोका आहे, परंतु देशात शंभर वर्षांपासून जास्त काळ झाला शेअर मार्केटमध्ये व्यवहार सुरू आहेत. वाढत्या महागाईशी आपल्या बचतीचे सूत्र जुळले पाहिजे. यासाठी भविष्यातील आपल्या अडचणी आणि आर्थिक गरजा ओळखून गुंतवणूक करावी असा सल्ला जेष्ठ अर्थ सल्लागार नंदकुमार काकिर्डे यांनी दिला.
इन्फनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या खराडी, पुणे येथील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी काकिर्डे बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन नवनाथ आवताडे, आत्मनिर्भर भारतचे दूत मनीष जाधव, येस बँकेचे उपाध्यक्ष समीर मुळे, सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख, संचालक विनायक मराठे, गौरव सुखदेवे, निलेश ढेरे, संस्थेचे पदाधिकारी, ठेवीदार बहुसंख्येने उपस्थित होते.
इन्फनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काकिर्डे यांनी सांगितले की, महिलांना सोन्यात गुंतवणूक करणे आवडते. परंतु भाववाढ झाल्यानंतर सोने विकण्यास महिलांचा विरोध असतो. एकूण बचतीतील दहा ते पंधरा टक्के सोन्यामध्ये गुंतवणूक करावी व इतर गुंतवणूक म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये करावी. पोस्टात, बँकेत, मुदत ठेवीत तीन ते सात टक्के वार्षिक व्याज मिळते. वाढत्या महागाईने पैशाचे मूल्य कमी होते. आता इन्फनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून राज्यात आर्थिक साक्षरतेची चळवळ सुरू होईल असा विश्वास वाटतो. महिलांमध्ये आर्थिक गुंतवणुकीबाबत निर्णय क्षमता निर्माण करण्यासाठी या संस्थेने पुढाकार घ्यावा असे आवाहन नंदकुमार काकिर्डे यांनी केले.
मनीष जाधव यांनी सांगितले की, समाजामध्ये आर्थिक साक्षरतेची उणीव आहे, ती भरून काढण्याचे काम ही संस्था नक्कीच करेल आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास चालना मिळेल.
स्वागत, प्रास्ताविक करताना संस्थेचे चेअरमन नवनाथ आवताडे यांनी सांगितले की, सामान्य माणसाला बचत आणि गुंतवणुकी बाबत ग्राहकाच्या दारात जाऊन सेवा आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ही संस्था सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा व श्रीगोंदा येथे शाखा सुरू करण्यात आल्या असून आगामी काळात एकूण ११ शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे. आर्थिक साक्षरतेमुळे आणि आर्थिक समृद्धीमुळे सामाजिक प्रतिष्ठा व सुरक्षितता प्राप्त होते. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवली तर गुंतवणूकदार विश्वास ठेवतात याचा अनुभव आहे. सामान्य व्यक्तीने आपल्या मासिक उत्पन्नाच्या दहा टक्के योग्य बचत व योग्य गुंतवणूक केली, तर सामान्य व्यक्ती देखील करोडपती बनू शकतो. आतापर्यंत मिळालेल्या अनुभवातून सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षर आणि सक्षम करण्यासाठी आपण नेत्रदीपक कामगिरी करू असेही यावेळी आवताडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन संदीप दरेकर, पांडुरंग खामकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले.
सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे, आभार संचालक प्रसाद देशमुख यांनी मानले.

जैन सकल (एबीपीपीपी) संघातर्फे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

पुणे – रामनवमी, जागतिक आरोग्य दिन आणि भगवान महावीर जन्मकल्याणक या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, पिंपळे निलख जैन सकल संघ (ABBPP ) यांच्यातर्फे रविवार, ६ एप्रिल २५, रोजी बाणेर येथील माऊली गार्डन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सर्व धर्माच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत 811 रक्तदात्यांनी रक्तदान करुन एक लक्षणीय प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे आयोजनास रक्त दात्यांनी मोठा प्रतिसाद दिला. याबद्दल रक्तदान शिबाराचे मुख्य संयोजक सचिन नहार यांनी आनंद व समाधान व्यक्त केल .

या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी जैन सकल संघाचे सुनील नहार, सचिन नहार, रविंद्र लुंकड, नितीन बांठिया, दीपक बांठिया, अमित संचेती, संतोष शिंगवी, कुणाल चोरडिया, आदित्य गादिया, धीरज कोठारी, आनंद कांकरीया, भारत बोरा, नितीन जैन, पारस कटारिया आणि सर्व औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, पिंपळे निलख जैन सकल संघ ( ABBPP ) यांनी व इतर सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

तसेच या रक्तदान शिबिराला पुणे जैन सकल संघाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, विलास राठोड, अनिल नहार, मनोज छाजेड, ललित जैन, श्री. सुभाष ललवानी, सागर सांकला, रवी जैन, व क्रस्ना डायग्नोस्टिकचे चेअरमन राजेंद्र मुथा, इंदर छाजेड, लक्ष्मीकांत खाबिया आणि गौतम निधी फाऊंडेशन तर्फे महावीर नहार, गौतम नाबरिया, नितीन संकलेचा, महावीर चोरडिया, सिद्धार्थ भटेवरा यांनी आपली उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

उपाध्याय प्रवर, अर्हम विज्जा प्रणेता प.पू. प्रविणऋषीजी म. सा. हे नहार कुटुंबियांचे प्रेरणास्थान असल्यामुळे संयोजकांना प्रेरित करुन आवश्यक पाठबळ देण्याचे काम प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्री सुनील व श्री सचिन नहार यांनी केले.

या भव्य रक्तदान शिबिराला आमदार सिद्धार्थ शिरोळे, अभय छाजेड, अमोल बालवडकर, सनी निम्हण, आणि आदी मान्यवरांनी देखील भेट देवून रक्तदात्यांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.

सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांचे आवाहन

पुणे, दि. ९ : २८ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीस १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या औचित्याने अधिनियमाच्या जनजागृतीसाठी २८ एप्रिल हा दिवस जिल्हा व ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सेवा हक्क दिन साजरा करावा, असे आवाहन राज्याचे सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयोगाच्या उप सचिव अनुराधा खानविलकर, अपर आयुक्त अरुण आनंदकर, उपायुक्त विजय मुळीक, नितीन माने, दत्तात्रय लांघी, तसेच पुणे विभागातील सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आयुक्त श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक गतीमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरिता २८ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंमलात आला आहे. या अधिनियमांतर्गत ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी ५३६ सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. अधिनियमाचा प्रभावी वापर झाल्यास नागरिकांचे जीवन सुकर करण्यास मदत होईल. अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घरपोच सेवा देणारा सेवादूत उपक्रम, ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शासनाच्या सर्व विभागांच्या अधिसूचित सेवा उपलब्ध करुन देणे, सर्व शासकीय कार्यालयांत व आपले सरकार केंद्रांवर सेवा शुल्क व कालमर्यादा यांची माहिती देणारे व तक्रार नोंदविणेसाठी क्यू आर कोड उपलब्ध करुन देणे, आपले सरकार सेवा केंद्र सुरु करणे, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करणे आदी उपक्रम जिल्हाधकारी यांनी त्यांचे जिल्ह्यांमध्ये राबवावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना देऊन सर्व सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

महापारेषणाच्या घटनात बिघाड ; पिंपळे सौदागर,सांगवी, रगटणीमध्ये विजेचे चक्राकार भारनियमन तर हिवडीमध्ये ३७ मिनिट वीज अर्ज खंडित

पुणे, दि. ०९ एप्रिल २०२५ : महापारे अतिउच्चदाबषणाच्या १३२ केव्ही उपेंद्रात घाऊक भागाचे आज पिंप बिले सौदागर, सांगवी गाव, रहाटणी एक काल मध्यरात्री ते पहाटे तीन तासांत चक्राकार विजेचे अर्धा ते दीड तास भारनियमन करावे लागेल. तर महापारेषणाच्या कांदळगाव २०० केव्ही टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आतील हिंजवडी, २००टी आय उद्योग हिंजवडी, वाकड चिन्ह, आणि इतर सुमारे ६६ हजार व्यावसायिक ग्राहकांचे वाटे खासदार १२.३० च्या ३७ मिनिटे बंद होता.

स्थान माहिती अशी की, महापारेषणाच्या रहाटणी १३२/२२ केव्ही उपकेंद्रातील ५० एमव्हीए कालच्या करंट ट्रान्सफॉर्मर अनुभव मध्यरात्री धुर निघाला. अभियंता पाहणी हा ट्रान्सफॉर्मर बदलणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आणि प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र यासाठी २२ केव्हीव्हीडियोचा वीजेचा प्रवाह बंद करण्यात येणार आहे. ही तूट पर्यायी निसर्गातून भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र झकासच्या उकाड्या मूळ विजेची वीज निर्मिती भारनियमन शक्य नाही. पिंपरेने सौदागर करावे, सांगवी, काळेवाडी, विशालनगर कस्पटेवस्ती या क्षेत्रा १२.०३ ते पहाटे २.५८ वाजेपर्यंत अर्धा ते दीड तास हे नाईजलाकार चक्राने भारनियमन करू लागले.

तसेच आज १२.३३ लोक महापारेषणाच्या कांदळगाव २२०वी अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले. त्यामुळे महावितरण ३३ केवीळच्या १३ वीजेंचा वीज बंद बंदच्या. हिंजवडी २०० आय उद्योग आपली हिंजवडी, वाकड उमेदवार, व्यावसायिक आणि इतर ६६ हजार ग्राहकांचे सुमारे ३७ मिनिटे बंद होते. आठ नंबर १.१० ने विजेते सुरळीत हिला.

चीनचे अमेरिकेला प्रत्युत्तर; 84% कर लादले:उद्यापासून लागू होतील; अमेरिकेच्या 104% टॅरिफनंतर उचलले पाऊल

वॉशिंग्टन-अमेरिकेने लादलेल्या १०४% कराला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेवर ८४% कर लादला आहे. हे दर उद्यापासून लागू होतील.यापूर्वी चीनने अमेरिकन वस्तूंवर ३४% कर लादला होता, जो आज ५०% ने वाढवण्यात आला आहे.

चीनच्या वाणिज्य मंत्रालयानेही १२ अमेरिकन कंपन्यांना निर्यात नियंत्रण यादीत टाकल्याचे म्हटले आहे. यापूर्वी, ‘अविश्वासू’ कंपन्यांच्या यादीत 6 कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता.त्याच वेळी, अमेरिकेने चीनवर लावलेला १०४% कर आजपासून लागू झाला आहे. याचा अर्थ असा की, आतापासून अमेरिकेत येणारे चिनी सामान दुप्पट किमतीपेक्षा जास्त किमतीला विकले जाईल.

“टॅरिफवर टीका करणारा कोणीही एक फसवा आणि धोकेबाज आहे,” असे ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये म्हटले. अमेरिकेने ९० हजार कारखाने गमावले तेव्हा त्यांनी त्याबद्दल विचार केला नाही.ट्रम्प म्हणाले की, आम्ही टॅरिफमधून खूप पैसे कमवत आहोत. अमेरिकेला दररोज २ अब्ज डॉलर्स (१७.२ हजार कोटी रुपये) जास्त मिळत आहेत. अनेक देशांनी आपल्याला सर्व प्रकारे लुटले आहे, आता आपलीही लुट करण्याची वेळ आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२४ पर्यंत अमेरिका दरवर्षी टॅरिफमधून १०० अब्ज डॉलर्स कमवत असे.

ट्रम्प म्हणाले- मला अभिमान आहे की मी कामगारांचा अध्यक्ष आहे, आउटसोर्सर्सचा नाही. मी एक असा राष्ट्रपती आहे जो वॉल स्ट्रीटसाठी नाही तर मेन स्ट्रीटसाठी (दुकाने, लहान व्यवसायांसाठी) उभा राहतो.

ट्रम्प म्हणाले की काही लोक म्हणतात की टॅरिफमुळे किंमती वाढतील. हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे एक छोटेसे औषध आहे. थोडेसे दुःख आपल्याला बराच काळ टिकवून ठेवेल. चीन, युरोप, ते सर्व आपल्याशी बोलण्यासाठी येतील. ते येथे शुल्क काढून टाकतील, आपले सामान खरेदी करतील आणि कारखाने उघडतील.

ट्रम्प यांनी टॅरिफ जाहीर केल्यापासून अमेरिकन शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अमेरिकेतील टॉप ५०० कंपन्यांचे शेअर बाजार मूल्य ५.८ ट्रिलियन डॉलर्स (५०१ लाख कोटी रुपये) कमी झाले आहे. १९५७ मध्ये बेंचमार्क निर्देशांक सुरू झाल्यानंतरची ही चार दिवसांची सर्वात मोठी घसरण आहे.

ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये चीनवर १०% कर लादले. त्यानंतर त्यांनी मार्चमध्ये पुन्हा १०% दर लागू केला. या महिन्याच्या सुरुवातीला, ट्रम्प यांनी चीनवर आणखी ३४% कर लादण्याची घोषणा केली. याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर ३४% कर लादला.

ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की जर चीनने अमेरिकेवर लादलेला ३४% कर मागे घेतला नाही, तर मार्चमध्ये लादलेल्या २०% आणि २ एप्रिल रोजी लादलेल्या ३४% करांव्यतिरिक्त बुधवारपासून ५०% अतिरिक्त कर लादला जाईल. त्यानंतर ट्रम्प यांनी चीनवर ५०% अधिक कर लादले, ज्यामुळे एकूण कर १०४% झाला.

काल, ट्रम्प यांच्या विधानाला उत्तर देताना चीनने म्हटले की अमेरिका आमच्यावर आणखी शुल्क वाढवण्याची धमकी देऊन एकामागून एक चुका करत आहे. या धमकीवरून अमेरिकेची ब्लॅकमेलिंग वृत्ती उघड होते. चीन हे कधीही स्वीकारणार नाही. जर अमेरिका स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याचा आग्रह धरत राहिली तर चीनही शेवटपर्यंत लढेल.रविवारी, चीनने जगाला एक स्पष्ट संदेश दिला – ‘जर व्यापार युद्ध झाले तर चीन पूर्णपणे तयार आहे – आणि त्यातून आणखी मजबूतपणे बाहेर पडेल.’ चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या द पीपल्स डेलीने रविवारी एका भाष्यात लिहिले: “अमेरिकेच्या शुल्काचा निश्चितच परिणाम होईल, पण आकाश कोसळणार नाही.”

चीनकडे सुमारे ६०० अब्ज पौंड (सुमारे $७६० अब्ज) अमेरिकन सरकारी रोखे आहेत. याचा अर्थ असा की चीनकडे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर प्रभाव पाडण्याची मोठी शक्ती आहे. त्याच वेळी, चीननेही तयारी सुरू केली आहे.चीनने औद्योगिक क्षेत्राला १.९ ट्रिलियन डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज दिले आहे. यामुळे येथील कारखान्यांचे बांधकाम आणि अपग्रेडेशन वेगाने झाले. हुआवेईने शांघायमध्ये ३५,००० अभियंत्यांसाठी एक संशोधन केंद्र उघडले आहे, जे गुगलच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयापेक्षा १० पट मोठे आहे. यामुळे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षमता वाढेल.
२ एप्रिल रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवर परस्पर कर लादण्याची घोषणा केली होती. यामध्ये भारतावर २६% दराने कर लादण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की, भारत खूप कडक आहे. मोदी माझे चांगले मित्र आहेत, पण ते आमच्याशी योग्य वागणूक देत नाहीत.भारताव्यतिरिक्त, युरोपियन युनियनवर २०%, दक्षिण कोरियावर २५%, जपानवर २४%, व्हिएतनामवर ४६% आणि तैवानवर ३२% शुल्क आकारले जाईल. अमेरिकेने सुमारे 60 देशांवर त्यांच्या करांच्या तुलनेत निम्मा कर लादण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी विभाग, विद्यापीठे, प्रयोगशील शेतकऱ्यांचे ज्ञान आणि परदेशातील तंत्रज्ञान लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

पुणे, दि. ९: कृषी विभागातील प्रयोगशील अधिकारी, निवृत्त अधिकारी, प्रयोगशील शेतकऱ्यांचे ज्ञान, विद्यापीठातील ज्ञान तसेच परदेशातून आलेले ज्ञान, पिकांचे वाण लोकाभिमुख कसे करता येतील या दृष्टीकोनातून आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतीमध्ये शासकीय खर्चाने भांडवली गूंतवणूक करुन शेती उत्पादनात कशी आणता येईल याबाबत विचार सुरू आहे, असेही ते म्हणाले.

शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक विनायक कोकरे, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ आदी उपस्थित होते.

समाजात गुणवत्तेला महत्त्व देणारा एक वर्ग आहे, असे सांगून कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, आरोग्याविषयी जागरुक असलेला वर्ग समाजात असून अन्न कितीही महाग असले तरी विकत घेणारा आहे. उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे स्वयंपूर्ण झालो असे नाही. उत्पादनाची गुणवत्ता राखली जाणे, व्यवस्थित त्याची जाहिरात होणे, बाजारपेठ मिळणे आणि त्याला बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी आपल्याला निर्माण करायची आहे, असेही ते म्हणाले.

हवामान बदलामुळे शेतीपुढे खूप आव्हान आहेत. एका क्षणात प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणे, आपला विचार अभ्यास, प्रत्यक्षात आणणे त्यातून शेतकऱ्याला ज्ञान देणे ही खरी काळाची गरज आहे. बदलत्या काळात शेतीला कशी सुरक्षा देऊ शकतो, खर्च कसा कमी करू शकतो. उत्पादन चांगल्या प्रतीचे कसे घेऊ शकतो. त्याला उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सुविधा राज्यशासन कुठल्या प्रकारे देऊन त्याच्या पाठिशी उभे राहू शकते या दृष्टीने या कार्यशाळेत चर्चा व्हावी.

अनेक शेतकरी शिक्षित नसले तरी प्रयोगशील असल्यामुळे, तंत्रज्ञानाची ओढ असल्याने, नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता असल्यामुळे शेतामध्ये बदल करणारे आहेत. आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे नवनवे तंत्रज्ञान येत आहे. हे ज्ञान काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रत्यक्ष सुरू केले आहे. परंतु, या ज्ञानाला खात्री आणि संरक्षण देऊन शेतकऱ्यांच्या मागे आश्वासकपणे उभे राहण्याचे काम शासनाला करायचे आहे.

कृषी हॅकेथॉन आयोजित करून शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण करण्यात येणार आहे. केवळ कृषी विद्यापीठांवर अवलंबून न राहता शेतीमध्ये, उत्पादनामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले, तंत्रज्ञान विकसित केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून नवकल्पना घेणे, तंत्रज्ञान लोकाभिमुख करणे हा यामागील उद्देश आहे.

शेतकऱ्यांसाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केले पाहिजे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही. विभागाने कृषी सहायकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च तंत्रज्ञानाने ज्ञानी, हुशार आणि कार्यक्षम असा कर्मचारी वर्ग कसा राहील असा प्रयत्न आहे, असेही कृषीमंत्री म्हणाले.

मोठ्या शहरात अनेक मोठ-मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाची तात्काळ विक्री होऊ शकते. फक्त त्याची जोडणी झाली पाहिजे, त्यासाठी समन्वय साधण्याचे काम करावे लागणार आहे, असेही श्री. कोकाटे म्हणाले.

राज्यमंत्री श्री. जैस्वाल म्हणाले, आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्यासाठी, राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीची गती वाढविण्यासाठी आपण किती समर्पण भावनेने काम करतो यावर महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे भविष्य अवलंबून आहे. दिलेल्या जबाबदारीचे माणसाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर जगामध्ये भारत महाशक्ती होण्यास मागे राहणार नाही. विभागाच्या दिवसभराच्या कार्यशाळेतील मंथनातून निघणाऱ्या विचारांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करणे खूप महत्त्वाचे आहे.

अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून जे शिकायला मिळते त्या सर्व बाबींचा प्रतिसाद, माहिती वरिष्ठ पातळीवर पोहोचविल्यास महाराष्ट्राच्या हितासाठी जे अधिक आवश्यक असेल ते निश्चितपणे करण्यात येईल. शासनाने कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करायची असे ठरवले असून त्यातून शेतकरी आपल्या पायावर कसा उभा कसा राहील हे प्रयत्न राहणार आहेत. कृषी विभागाने आपले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करायचे आहेच परंतु, त्याची कालबद्ध अंमलबजावणी होणेही गरजेचे आहे. आपल्याला विकेल ते पिकेल हा दृष्टीकोन ठेऊन शेतीमध्ये काम करायचे आहे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात सूरज मांढरे म्हणाले, या कार्यशाळेत शेतकऱ्यातील शेतकरी, विक्रेता, खरेदीदार आदी पैलूंवर चर्चा करण्यायसह कृषी विभाग, शेतकऱ्यांच्या समोरील प्रश्नावर विचारमंथन करून उपाययोजना सादर करणे आणि दिशा ठरविण्यात येणार आहे. आज देशाचे कृषी उत्पादन वाढले मात्र, ग्राहक अन्नाच्या गुणवत्तेबाबत संभ्रमित आहे. व्यक्तिगत शेतकऱ्याची खरेदी क्षमता विखुरल्यामुळे खर्च वाढलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या वेगाने पुढे येत आहे. आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यशाळेला राज्यभरातून कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी ते कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संस्थापक, शेतकरी गटांचे सदस्य, प्रयोगशील शेतकरी असे सुमारे बावीसशे जण उपस्थित होते.

ट्रम्प यांच्याशी वैयक्तिक संबंध असल्यानं..”-पृथ्वीराज चव्हाण यांची आयातशुल्कावरून पंतप्रधानांवर टीका

अमेरिकेकडून लादण्यात येणाऱ्या आयातशुल्कामुळे देशातील शेअर बाजारात भूकंप झाला. त्यामुळे मोदी सरकारच्या धोरणावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

 मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर वाढीव आयातशुल्क लादल्यानंतर त्याचे थेट परिणाम भारतावर होऊ लागले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सुमारे २ हजार अंशाची पडझड झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर केंद्र सरकारकडून ठोस पावले उचलली आली नसल्यानं माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेशी असलेल्या देशाच्या द्विपक्षीय संबंधांवरून जोरदार टीका केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं, भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात झपाट्यानं घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजार सुमारे ३,००० अंशाच्या घसरणीनं उघडला. शेअर बाजारातील ही ५वी किंवा ६वी सर्वात मोठी घसरण आहे. दुर्दैवानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांवर पंतप्रधान मोदी हे अवलंबून आहेत. त्यांना वाटतं की ते वैयक्तिक संबंधावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी राजनैतिक संबंध ठेवणं शक्य आहे. मात्र, जागतिक राजनैतिक धोरण अशा प्रकारे चालत नाही. जागतिक मंदीचा आपल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनादेखील मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.

 जागतिक शेअर बाजारापाठोपाठ देशातील शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सकाळच्या सत्रात निफ्टी ५० निर्देशांक ५ टक्क्यांनी घसरला.कोविडनंतरच्या काळातील ही आजची सर्वात मोठा घसरण ठरली आहे. शेअर बाजारातील घसरणीनंतर गुंतवणुकदारांचे सुमारे २० लाख कोटीचं आर्थिक नुकसान झालं आहे.

 ट्रम्प यांच्याकडून सातत्यानं आयातशुल्क वाढविण्याच्या घोषणा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर घोषणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ होत आहे. अशा स्थितीत संकटाचा सामना करण्यासाठी सरकारनं सुधारणा पॅकेज लागू करण्याची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. बँकिंग आणि बाजार तज्ञ अजय बग्गा यांनी सांगितलं, भारताला देशांतर्गत कारणांमुळे नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेमुळे संकटाचा सामना करावा लागणार आहे. कारण, जागतिक अर्थव्यवस्था ही परस्पर पुरवठा साखळीनं जोडलेली आहे. देशांतर्गत अर्थव्यवस्थेचं संरक्षण करण्यासाठी भारताला वित्तीय, आर्थिक आणि सुधारणा पॅकेजची आवश्यकता भासणार आहे. 

ट्रम्प प्रशासनाकडून आयातशुल्क स्थगित करून किंवा काही प्रमाणात कपात करून आर्थिक परिस्थिती पूर्ववत करावी, असेही जागतिक अर्थतज्ञांनी म्हटलं आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पुढील काही आठवडे अथवा महिने हे शुल्क कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे.

चार घरफोड्या करून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या १९ आणि २० वर्षीय अशा दोन मुलांना पोलिसांनी केले गजाआड

पुणे- चार घरफोड्या करून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या १९ आणि २० वर्षीय अशा दोन मुलांना पुणे पोलिसांनी पकडून गजाआड केले आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १६/०३/२०२५ रोजी पहाटे ३/०० वा. चे सुमारास संतोषी माता मंदीर, तिरुपती कॉलनी येथे तक्रादार यांच्या राहत्या घरी चोरी झाले बाबत आंबेगाव पोलीस ठाणे गु.रजि नंबर ४५/२०२५ बी.एन.एस. ३०५ (अ), ३३१(३), (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयांत आंबेगाव पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पो. हवा. हनमंत मासाळ व चेतन गोरे यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे तपास पथाचे पो.उप.निरी कळमकर व टिमने इसम नामे १) आयुष संजय खरात वय २० वर्ष रा. सुखसागरनगर पुणे, २) आर्यन कैलास आगलावे वय १९ वर्ष रा. गोकुळनगर पुणे यांना यांना अटक करुन त्यांच्या कडुन खालील प्रमाणे गुन्हे उघकीस आले आहेत.
१. आंबेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक ४५/२०२५ बी.एन.एस.३०५ (अ),३३१ (३), (४)
२. भारतीविदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक १९७/२०२५ बी.एन.एस.३०५.३३१(३) (४)
३. भारतीविदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक १०७५/२०२५ बी.एन.एस.३०३ (२)
४. मार्केडयार्ड पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक ६९/२०२५ बी.एन.एस ३०३(२)
सदर आरोपी कडुन २२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ०४ लॅपटॉप, मोटार सायकल, रिक्षा असा एकुण ४,६६,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. यातील आरोपीत आर्यन आगलावे हा कोंढवा व मार्केटयाडे येथील घरफोडीच्या गुन्हयात WANTEDआरोपी आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पो.उप. निरी. मोहन कळमकर हे करत आहेत.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, (अतिरिक्त कार्यभार) मनोजकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, सहा. पो. निरी प्रियंका गोरे, पोलीस उप. निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शेलेद्र साठे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, यांच्या पथकाने केली आहे.

एकदा दोनदा चूक झाली तर समजून घेऊ:तिसऱ्या वेळी माफी नाही- अजितदादांचा इशारा

अजित पवार यांनी कोकाटे यांना घेतले फैलावर-या बैठकीला माणिकराव कोकाटे अर्धा तास उशिराने पोहोचले होते. तोपर्यंत राष्ट्रवादीचे इतर नेते देवगिरी बंगल्यावर दाखल होऊन बैठकीला सुरुवात देखील झाली होती. मात्र, माणिकराव कोकाटे उशिरा पोहोचल्याने अजित पवार यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. आधीच माणिकराव कोकाटे हे प्रसार माध्यमांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने पक्ष अडचणीत येताना दिसून येत आहे. त्यात अजित पवार यांच्या बैठकीला देखील माणिकराव कोकाटे उशिरा पोहोचले. पक्षाच्या वतीने आयोजित जनता दरबारात देखील ते हजर राहत नाहीत. या सर्व बेशिस्त वर्तवणुकीवरून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडे बोल सुनावल्या ची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी अंतर्गत तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपली वेगळी रणनिती ठरवली आहे. यासाठी आता अजित पवार हे सोमवार ते बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार आहेत. तर गुरुवार ते रविवार अजित पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून अजित पवार पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आता आठवड्यातून एक दिवस मुंबईत आढावा बैठक घेण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या या बैठकीत अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील चांगलेच फैलावर घेतले होते. त्यानंतर आता अजित पवार यांच्या पुढील कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यानुसार आता अजित पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध प्रश्नांबाबत तसेच प्रत्येक आमदाराच्या विधानसभा मतदारसंघातील कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. निधी अभावी कामे रखडत कामा नये, लोकांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना केल्या आहेत. त्याचप्रमाणे अधिक कार्यक्षम होण्यासाठी अजित पवार यांनी सर्वांना आग्रह केला. या बैठकी बाबत अजित पवार यांनी स्वतः एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

करुणा व धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच:त्यांनी दोन मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही; कोर्टाचे निरीक्षण

मुंबईमुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिलेत. कोर्टाने या प्रकरणी मुंडे यांनी दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशांना दिलेली आव्हान याचिका फेटाळून लावली. करुणा व धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत. या दोघांनी 2 मुलांना जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कोर्टाने यासंबंधी नोंदवले आहे.

मुंबईतील वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने गत 4 फेब्रुवारी रोजी धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मुंडे यांनी या आदेशांना सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यात त्यांनी आपण करुणा शर्मा यांच्याशी लग्न केले नसून, त्यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होतो असा दावा केला होता. पण कोर्टाने या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आत्ता कोर्टाचा विस्तृत आदेश पुढे आला आहे.

धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत. करुणा व धनंजय यांच्यातील संबंध लग्नासारखे आहेत. त्यांनी दोन मुलांना जन्मही दिला आहे. एकाच घरात राहिल्याशिवाय हे शक्य नाही. एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे. करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशांत म्हटले आहे.

कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळवण्यासाठी लग्नाचे प्रमाणपत्र आवश्यक नाही, तर संबंधांचे स्वरुप महत्त्वाचे असते, अशी पुस्तीही कोर्टाने या प्रकरणी जोडली. मुंडे यांनी करुणा यांचे वैवाहिक अधिकार फेटाळणे हे भावनात्मक हिंसाचाराच्या श्रेणीत येते. त्यामु्ळे करुणा यांना उदरनिर्वाह भत्ता व इतर दिलासा मिळाला पाहिजे, असेही कोर्ट या प्रकरणी म्हणाले आहे.

धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाच्या सुनावणीत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केले नसल्याचा दावा केला होता. मी करुणा शर्मा यांच्यासोबत केव्हाही लग्न केले नाही. माझी व त्यांची ओळख एका राजकीय पक्षाच्या बैठकीवेळी झाली. त्यानंतर आमच्यात वैयक्तिक संबंध निर्माण झाले. या नात्यातून आम्हाला दोन मुले झाली. या मुलांना मी माझे नाव व आडनाव वापरण्याची परवानगी दिली. पण मी केव्हाही करुणा यांच्याशी विवाह केला नाही. माझा केवळ राजश्री मुंडे यांच्याशी कायदेशीर विवाह झाला आहे, असे ते म्हणाले होते.

पुण्यात महिलेचे अपहरण करून विनयभंग:2आरोपींना सहकारनगर पोलिसांनी केली अटक

पुणे-सध्या पुण्यात रहाणारी एक महिला तिच्या मुळ गाव बीड येथून पुण्यातील वाघाेली परिसरात सहा एप्रिल राेजी सायंकाळी साडेपाच वाजता आली हाेती. तेथून कॅबने ती वडगाव धायरी येथील राहते साेसायटीचे गेटवर आली असताना, तिचा दाेन अनाेळखी व्यक्तींनी तिचा चारचाकी गाडीतून वाघाेली येथून पाठलाग केला. साेसायटीचे गेटवर महिलेस अडवून बळजबरीने गाडीत बसवून तिला पळवून नेत तिच्याकडे खंडणीची मागणी करुन विनयभंग केल्याचा प्रकार घडला हाेता.याप्रकरणाची तक्रार सहकारनगर पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सदर गुन्हयाचा गांभीर्याने तपास करत दाेन आराेपींना गजाआड केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गाैड यांनी दिली आहे.

महेश माेहन रासकर (वय- 27) आणि किरण भाऊसाहेब ढगे (वय- 27, दाेघे रा. तळेगाव ढमढेरे, ता.शिरुर,पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. आराेपींनी महिलेचे अपहरण करुन तिला गाडीत पळवून नेत असताना, तिच्या गालाला हात लावून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य करत तिचा विनयभंग करत तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिचा माेबाईलचा पासवर्ड विचारुन, माेबाईलमधील फाेन पे खात्यावरुन 1400 रुपये एका दुकानदाराला ट्रान्सफर केले हाेते. त्यानंतर तिच्याकडून राेख रक्कम घेऊन आराेपी पसार झाले हाेते. या गुन्ह्याचा तपास सहकारनगर पोलिस करत असून त्यांना आराेपी महेश रासकर व किरण ढगे यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा शाेध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिसांनी सखाेल तपास केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आराेपीच्या ताब्यातून राेख स्वरुपात घेतलेले 1400 रुपये, गुन्हा करण्यासाठी वापरलेली 4 लाख रुपये किंमतीची कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहे.

अध्यात्म आणि सकारात्मक विचारांची सांगड गरजेची-डॉ. सुनील साठे

सद्गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात अध्यात्म आणि औषधोपचार या विषयावर व्याख्यान

पुणे : अध्यात्म आणि विज्ञान यांचा एकमेकांशी संबंध आहे. आपल्या संस्कृतीमध्ये हा संबंध अनेक वर्षांपासून सिद्ध झाला आहे. परंतु सध्याची तरुण पिढी आपल्या संस्कृतीपासूनच दूर जात असल्यामुळे अध्यात्म आणि सकारात्मक विचारांची सांगड घालता येत नाही. समाधानी आयुष्यासाठी अध्यात्म आणि सकारात्मक विचारांची सांगड घालता येणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील साठे यांनी व्यक्त केले.

सद्गुरु श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये डॉ. सुनील साठे यांचे अध्यात्म आणि औषधोपचार या विषयावर व्याख्यान झाले. 

डॉ. सुनील साठे म्हणाले, अध्यात्म हे आपल्याला विचारांशी समतोल राहण्याचे सामर्थ्य देते. आपले विचार जर नकारात्मक असतील, तर त्याचा निश्चितच आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि आपले शरीर विविध व्याधींनी त्रस्त होते. अध्यात्माची जर सकारात्मक दृष्टीने आपल्या आयुष्यात सांगड घातली, तर निश्चितच आपले विचार सकारात्मक होऊन आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे आयुष्यात अध्यात्म आणि सकारात्मकतेची सांगड गरजेची आहे.

आजची तरुण पिढी ही भौतिक सुखाच्या मागे धावताना केवळ मॉडर्न आयुष्य जगण्याच्या शर्यतीमध्ये आपली संस्कृती आणि मूल्यांपासून दूर जात आहे. परंतु त्याचे दुष्परिणाम जे होत आहेत, त्याचे त्यांना भान राहिलेले नाही. चुकीच्या विचारांपासून त्यांना दूर नेण्यासाठी आणि त्यांना आपल्या संस्कृतीकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या संस्कृतीतील मूल्ये विविध माध्यमांद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असेही डॉ. सुनील साठे यांनी यावेळी सांगितले.

मनसे नेते संदीप देशपांडेंना घरात घुसून मारण्याची धमकी

मुंबई-मुंबईत मराठी व अमराठी वाद पेटला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर मनसे नेते व मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे की नाही यावर विचार करावा लागेल, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर संदीप देशपांडे यांनी धमकीचा कॉल आल्याचे समोर आले आहे.

संदीप देशपांडे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, रात्री सव्वा दहा वाजता मला अज्ञात नंबरवरून फोन आला. फोनवर फक्त शिव्या घालत होता. त्यानंतर पुन्हा फोन केला तेव्हा मी कॉल रेकॉर्ड केला. तुम्हाला घरी येऊन मारू वैगेरे धमकी देत होता. असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही. याबाबत मी पोलिस तक्रार केली आहे. कोणी जाणीवपूर्वक मुंबई आणि महाराष्ट्रातले वातावरण खराब करत आहे का याचा शोध घेतला पाहिजे. तसेच माझे राज ठाकरे यांच्याशी या प्रकरणावर बोलणे झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करण्याबाबत उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे हे हिंदूविरोधी आहेत, त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी सुनील शुक्ला यांनीयाचिकेतून केली होती. यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, भैय्या आमच्या पक्षाची मान्यता रद्द करणार असतील, तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असे संदीप देशपांडे म्हणाले होते.