पुणे : ” संविधानात राम, श्री राम जय राम जय जय राम हे आधुनिक युगात रामचा खरा अर्थ सांगणारे वाक्य आहे. प्रत्येकाच्या जीवनात आरंभा पासून ते अंतापर्यंत श्री राम रूजलेला आहे. राम हेच जीवनाचे विश्व आहे. या नावातच मोठी महिमा आणि गोडवा आहे.” असे विचार ज्येष्ठ पत्रकार व दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या विद्यमाने ख्यातनाम लेखक, गांधी जीवन साहित्य व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘भारतीय भाषेतील रामकथा’ आणि ‘ तुलसी रामायणाची भूमिका’ या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे हे सन्माननीय विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच लेखक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
विजय बाविस्कर म्हणाले,”आधुनिक काळात लहान मुलांच्या जीवनावर होणार्या दुष्पपरिणामाकडे पाहता यावर भाष्य करणार्या रामाचे नवे स्वरूप पुढे आहे. नुकतेच रामनवमीच्या निमित्ताने लहान मुलांच्या चुमने रामाचा अर्थ सांगतांना असे मांडले की अभ्यासात जो रमतो राम, ग्राउंडवर जो गाळतो घाम श्रीराम जय राम जय जय राम… पत्रकार हा समाजाचा घटक असल्याने त्यांनी आधुनिक युगात सकारात्मक पत्रकारिता करावी.”
“संपादक, पत्रकार यांना धावपळिच्या युगात बोलावून मनःशांतीचे धडे दिल्यास निश्चितच समाजात खूप मोठे बदल घडतील. ९० पुस्तकांची निर्मिती करणारे लेखक विश्वास पाटील यांनी आता महात्मा गांधी आणि राम यावर नव्या पुस्तकाचे लेखन करावे असे ही विजय बाविस्कर यांनी सांगितले. ”
डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,” भारतीय संस्कृतीचे खरे तत्वज्ञान आणि परंपरेचे मूर्तीमंत प्रतिक श्री राम आहे. राम हा मार्यादा पुरूषोत्तम व एक वचनी आहे. मानव कल्याणासाठी रामाच्या जीवनाने जी चौकट आखली आहे ते सर्वोत्तम आहे. येणार्या काळात भारतीय तत्वज्ञान जगला दिशा देण्याचे कार्य करेल. यातूनच विश्वशांती निर्माण होईल.”
अरूण खोरे म्हणाले,” वर्तमान काळात आजच्या राजकर्त्यांंच्या अंतःकरणात खरा राम जागृत होने गरजेचे आहे. परंपरेतील सत्व तसेच ठेऊन नवे विचार काढले पाहिजे. पुस्तकाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचा चांगला विचार समोर आला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने राम, गांधीजी आणि विनोबा हे एक सूत्र आहे हे समझले. प्रत्येकाच्या आयुष्यात रामाचे सत्व सापडायला हवे. भारतीय भाषेतील रामकथा, तुलसी रामायणाची भूमिका लेखकानी वेगळ्या प्रकारे मांडली आहे.”
प्राचार्य डॉ. विश्वास पाटील म्हणाले,” राम हे वैश्विक संस्कृतीचे रूप आहे. वाल्मिकी, कालिदास आणि तुलशीदास यांनी रामायण सांगितले. तसेच राम आणि कृष्ण हे जगाच्या संदर्भात पुजनीय आहेत. अहिल्याचा उद्धार झाल्यावर रामराज्याची स्थापना गंगेच्या काठेवर झाली. तसेच राम कथेची पहिली श्रोता ही जगदंबा आहे.”
कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागतपर भाषण डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले.
डॉ. सचिन गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. निलवर्ण यांनी आभार मानले.
‘भारतीय भाषेतील रामकथा’ व ‘ तुलसी रामायणाची भूमिका’ या ग्रंथाचे प्रकाशन
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने ‘पुणे स्टार्ट अप एक्स्पो’चे मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. १० : आधुनिक काळात अनेक क्षेत्रांतील आव्हानांना नवकल्पना हेच उत्तर आहे. मात्र, त्यासाठी नवकल्पनांसाठी सातत्याने व्यासपीठे उपलब्ध झाली पाहिजेत. या व्यासपीठांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. ज्यामुळे समाजाच्या तळागाळापासूनच्या नवकल्पना पुढे येऊ शकतील. पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५ हा उपक्रम अशा सर्वसमावेशक नवकल्पनांना पुढे नेणारा असल्याने तो महत्त्वाचा आणि औचित्याचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करीत असताना उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आज कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या प्रांगणात ‘पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ॲड. शेलार बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डेस्टिनेशन को वर्किंग, पुणे बिझनेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप, टीडीटीएल, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांचे सहकार्य या प्रदर्शनाला लाभले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, अधिष्ठाता प्रा. डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, एक्स्पोच्या आयोजक अमृता देवगांवकर व मंदार देवगांवकर, डेटा टेकचे संचालक अमित आंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. याप्रसंगी सर्वोत्तम २४ स्टार्टअप्सना ॲड. आशिष शेलार तसेच डॉ. राहुल कराड यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रदर्शनातील सहभागींना गुंतवणूकदारांशी स्टार्टअपसंबंधी थेट चर्चा व सादरीकरणाची संधीही मिळाली.

ॲड. आशिष शेलार म्हणाले, “देशाच्या प्रत्येक नागरिकाला भारतीय राज्यघटनेने समान संधी आणि समान संरक्षणाची हमी प्रदान केली आहे. त्याला अनुसरुन शहरी तसेच ग्रामीण भागांतील नवकल्पनांना व्यासपीठ देणारा पुणे स्टार्टअप एक्स्पो हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समान संधी आणि संरक्षण, प्रत्येकाला द्यायचे असेल, तर नवकल्पनांचेही विकेंद्रीकरण झाले पाहिजे. नागरी तसेच ग्रामीण भागांतील युवांच्या नवकल्पनांना व्यासपीठ आणि गुंतवणूकदार मिळायला हवेत. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून तळागाळातील नवकल्पनांना पाठिंबा मिळेल, व्यापक अवकाश मिळेल, नवकल्पनांची वास्तवातील व्यावहारिकता पुढे येईल आणि अंतिमतः विकसित, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचे योगदान राहील.” पुण्यासारख्या विकसित, शैक्षणिक, उद्योजकीय आणि व्यावसायिकदृष्ट्या पुढारलेल्या शहरांत या प्रदर्शनाचे आयोजन अधिक औचित्यपूर्ण आहे, असेही ॲड. शेलार यांनी नमूद केले.
चंद्रकांत पाटील यांनी स्टार्टअपची संकल्पना कोविड संकटकाळात खऱ्या अर्थाने पुढे आली, याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे कार्पोरेट क्षेत्र आणि वर्क फ्रॉम होम, यांच्यामधील दुवा म्हणून डेस्टिनेशन को वर्किंग काम करत असल्याचे सांगितले. डेस्टिनेशन को वर्किंगमध्ये कार्यरत सुमारे दीडशे व्यावसायिकांच्या वैचारिक आदानप्रदानातूनच स्टार्टअप एक्स्पोची संकल्पना पुढे आली आणि आज ती प्रत्यक्षात आली, असेही त्यांनी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले, सामान्य नागरिक आज आपल्या नोकरीपलीकडे फारसा विचार करताना दिसत नसल्याने २०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर देशाला श्रीमंत बनवायचे असेल तर देशातील नागरिक श्रीमंत व्हायला हवेत हे नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आले. हे ध्येय साकारताना इनोव्हेशन्स अर्थात नवकल्पना यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलू शकत असल्याने त्यांना अनुरुप असे नवे शैक्षणिक धोरण, उद्योग क्षेत्राशी संलग्न प्रात्यक्षिक शिक्षण पद्धती त्यांनी आणली. यामध्ये मातृभाषेतील शिक्षणाचा प्राधान्यक्रमही वाढविला. या सर्वांमुळे आज २०२५ साली स्टार्ट अप आणि संशोधक या दोघांनाही चालना मिळत आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर मागील काही वर्षात भारतातील महिला स्टार्ट अप्स हे जगात पहिल्या क्रमांकावर असून पुरुषांनी बनविलेले स्टार्ट अप्स हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यातून रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन, बचतीचे महत्त्व आणि उद्योजकीय मानसिकता घडवण्याचे कार्य होत आहे.”
डॉ. राहुल कराड यांनी एमआयटी सदैव नव्या शैक्षणिक संकल्पना उचलून धरत असल्याचे सांगितले. स्टार्टअप एक्स्पोला पाठिंबा देणे आणि सर्वतोपरी साह्य करणे, हे त्याचाच एक भाग आहे. एमआयटी नेहमीच विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, ऊर्जा हे व्यक्त होण्यासाठी पूरक असे उपक्रम आयोजित करते. भारतीय छात्र संसद हा उपक्रम यापैकीच एक असल्याचे कराड यांनी नमूद केले.
अमृता देवगांवकर म्हणाल्या, “या उपक्रमामुळे राज्याच्या विविध भागातील नवोदितांच्या स्टार्टअप्सना एक व्यासपीठ तर विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये दाखविण्याची संधी मिळणार आहे. या एक्स्पोच्या निमित्ताने काही स्टार्टअप्स उद्योजकांना आपल्या नवकल्पना सादर करण्याची, बाजारात आपली ओळख वाढवण्याची व आपल्या स्टार्टअपला गती देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देखील मिळेल.” मंदार देवगावकर, अमित आंद्रे यांनीही मनोगत मांडले. डॉ. गार्गी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
डीआरआय मुंबईने लातूरमधील छुप्या मेफेड्रोन कारखान्यावर छापा टाकून 11.36 किलो मेफेड्रोन केले जप्त, सात जणांना अटक
मुंबई-
मुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) त्यांच्या प्रादेशिक युनिट्सच्या समन्वयाने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या एका छुप्या मेफेड्रोन उत्पादन कारखान्यावर छापा टाकला.

1985 च्या अंमली पदार्थ आणि मनस्थितीवर परिणाम करणारे घटक (एनडीपीएस) कायदा अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या मेफेड्रोन या सायकोट्रॉपिक पदार्थाच्या बेकायदेशीर उत्पादनात सहभागी असलेल्या एका सिंडिकेटबद्दलच्या विशिष्ट गुप्त माहितीवरून कारवाई करताना, डीआरआय अधिकाऱ्यांनी परिसरात सतत देखरेख ठेवली. 8 एप्रिल 2025 च्या पहाटे, संशयित ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. या शोध मोहिमेत 11.36 किलो मेफेड्रोन (8.44 किलो कोरड्या स्वरूपात आणि 2.92 किलो द्रव स्वरूपात), तसेच मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि या पदार्थाच्या निर्मितीत वापरली जाणारी मोठ्या-प्रमाणात प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त करण्यात आली.
OJ2B.jpeg)

06A8.jpeg)
छुप्या पद्धतीने मेफेड्रोनच्या उत्पादनात थेट सहभागी असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलसह पाच जणांना अटक करण्यात आली. जलद आणि समन्वित पाठपुरावा करताना, वित्तपुरवठादार आणि वितरक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणखी दोघांना मुंबईत अटक करण्यात आली.
या सातही जणांनी मेफेड्रोनच्या वित्तपुरवठा, उत्पादन आणि तस्करीमध्ये आपली भूमिका कबूल केली आहे. अवैध बाजारात सुमारे 17 कोटी रुपये किंमत असलेले 11.36 किलो मेफेड्रोन, कच्चा माल आणि उपकरणे यांचा समावेश असलेली एकूण जप्ती एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार करण्यात आली.
“महिला आयोग आपल्या दारी” तीन दिवस पुणे जिल्ह्यात महिलांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्या- रुपाली चाकणकर यांचे आवाहन
पुणे, दि. १० : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी दि. १५ ते १७ एप्रिल, २०२५ या कालावधीत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर तीन दिवस पुणे जिल्हा दौरा करणार आहेत. यावेळी पुणे शहरातील तक्रारींची सुनावणी मंगळवार, १५ एप्रिल रोजी, तर पुणे ग्रामीणसाठी जनसुनावणी बुधवार, १६ एप्रिल रोजी होणार आहे. या दोन्ही जनसुनावण्या नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे सकाळी ११ वाजता होणार आहेत. तर गुरुवार, १७ एप्रिल रोजी दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे येथे सकाळी ११ वाजता पिंपरी-चिंचवडकरिता जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील होणा-या या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जनसुनावणीला जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबईत येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.’
०००००
अवघ्या चार तासांमध्ये नादुरुस्त रोहित बदलले ; मांजरीतील वीजग्राहकांना दिलासा
पुणे, दि. १० एप्रिल २०२५ : उका मूळ त्रस्त वीजग्राहकांची गैरसोय दिव्य दिव्यांगाय महावितरता व दक्षिणेच्या अधिकाऱ्यांची (९) ज्याजल्या १० अंशी नादुरुस्त ध्वनिध्ये वीज पेट पूर्ववत केला. स्वत: मांजरी लढाई मोठा दिलासा.
चालू माहिती अशी की, बंडगार्डन मांजरी झेड कॉरच्या शेजारी चिंतामणी विभाग कॉलनी, मांजरी-मुंढवा कृष्णा मुख्य ३० या कृष्णा कृष्णा विरुद्ध केव्हीए प्रकाशन रोहित्र (दि. ९) ज्याजनाच्या १० सीमा बंद. सुमारे १४०० आणि व्यावसायिक ग्राहक वीज खंडित झाली. महाअभियंता व जनमित्रांनी रोहित्राची पाहणी केली ते पूर्णतः नादुरुस्त व बदलणे आवश्यक असल्याचे सांगितल्या गेले. दुसऱ्या दिवशी भयंकर मार्ग आणि पर्यायी वीज उपलब्ध होऊ शकतील असे नागरिक आहेत.
या पोलीस अधीक्षक अभियंता (प्र.) श्री. रवींद्र बुंदेले यांनी सूचना देत स्पष्टपणे रोहित्र बदलण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे रोहित्राची फिटिंग करण्यासाठी ट्रक व क्रेनची मध्यरात्री व्यवस्था करण्यात आली. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी नवीन ६३० केव्हीए रोहित्र उपलब्ध करून दिले. आठ दिवसांत १२ च्या नादुरस्त रोहित्र हटवून नवीन रोहित्र त्याचे काम सुरू केले व पहाटे ४ च्या घटना ते पूर्ण झाले. या नंतर ४.३० सीट सुरळीत झाली. या राज्यामध्ये नागरिकांनी देखील महावितरणला नियुक्त केले.
अवघ्या चार तासांमध्ये वितरण रोहित्र बदलण्याची अतिरिक्त क्रिया अभियंता रामचंद्र लोंढे, सहायक अभियंता अभिज सांगळे, जनमित्र किरण कुंभार, लालू जगवार, पंकज टेकम, शुभम बोरवली, राजू जाधव, विशाल माने, स्वराज तायडे यांनी केली. तर अतिरिक्त कार्यक्षम अभियंता वैभव खटावकर, उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड, गणेश शेळके, ओंकार कुलकर्णी यांनी जारी केले.
अजितदादांवर काकांची पुण्याई आहे हे स्पष्ट- विजय वडेट्टीवार
तहव्वूर राणाला भारतात आणाण्यासाठी 15 वर्षे का लागली? मुंबईत राजकारण करत पुन्हा मतांची पोळी शेकण्यासाठी उपयोग करतील
मुंबई-
अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांचा दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो बीडच्या भाषणातही त्यांनी केला आहे. पुण्याई कोणाची तर आई-वडीलांची आणि चुलत्याची असे ते बोलले आहेत म्हणजे स्पष्ट आहे की, अजितदादांवर काकांची पुण्याई आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, तहव्वूर राणाला भारतात आणाण्यासाठी 15 वर्षे का लागली, याचे उत्तर कोण देणार. बरोबर मनपा निवडणुकीच्या तोंडावर त्याचा मुंबईत उपयोग करतील. राजकारण करत पुन्हा मतांची पोळी शेकली जाणार, ते करू नका राणाला फाशी द्या, अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली आहे. हिंदू-मुस्लीम करत हमने बहोत कुछ किया असे सांगितले जाईल.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, परिस्थितीनुसार सर्वच जण बदलत आहे. अनेकांना बदलावे लागते. आता भाजपसोबत असलेली मंडळी 3 वर्षांनंतर कुठे दिसतील, पुढची निवडणूक कुणासोबत लढवतील, याचा अंदाज हळूहळू यांना येऊ लागला आहे.
अजित पवार म्हणाले की, आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत, असे अजित पवार म्हणाले. आज देशाला मोदींसाहेबांसारखा नेता मिळाला आहे. देशाची मान जगात उंचावत आहे. त्यांच्या पाठीशी कुठेतरी राहायला हवे. म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला, असे म्हणत अजित पवार यांनी एकप्रकारे राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचे कारणही सांगितले.दरम्यान, यापूर्वीही अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना एका भाषणामध्ये शरद पवारांबाबत विधान केले होते. त्यावेळी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना आपल्या स्वागतासाठी कोणतीही शाल, हारतुरे किंवा स्मृतिचिन्ह न आणण्याची विनंती केली होती. आई-बापाच्या व चुलत्याच्या कृपेने आपले खूप चांगले चालले असल्याचे ते यासंबंधी बोलताना म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली होती.
मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला भारतात आणले:दिल्लीच्या पालम विमानतळावर विशेष विमान उतरवले
26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. हे हल्ले चार दिवस चालू राहिले. या हल्ल्यांमध्ये एकूण 175 लोक ठार झाले, ज्यात नऊ हल्लेखोरांचा समावेश होता आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले.
मुंबई- मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणा याला अमेरिकेतून भारतात घेऊन येणारे विशेष विमान दिल्लीत पोहोचले आहे. हे विमान दिल्लीच्या पालम टेक्निकल विमानतळावर उतरले. येथून ते तहव्वूर राणाला थेट एनआयए मुख्यालयात नेले जाईल. एनआयए मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.एनआयए आणि रॉ टीमच्या सुरक्षेत राणा आज दुपारी एका खास विमानाने दिल्ली विमानतळावर उतरला. तो भारतात पोहोचताच, एनआयए टीमने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतले. यानंतर, राणाला बुलेटप्रूफ कारमधून एनआयए मुख्यालयात नेले जाईल.यानंतर राणाला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाऊ शकते. हजर होण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल. तहव्वुर राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. तुरुंग प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, राणाच्या प्रत्यार्पणाबाबत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच विमानतळावर SWAT कमांडो देखील तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची (CAPF) सुरक्षा शाखा आणि स्थानिक पोलिस विमानतळाबाहेर उपस्थित राहतील.केंद्र सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे. त्यांना ही जबाबदारी तीन वर्षांसाठी किंवा खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत देण्यात आली आहे.तहव्वूरने भारतात येऊ नये म्हणून अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली. त्यांच्या याचिकेत त्यांनी स्वतःला पार्किन्सन आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले होते आणि म्हटले होते की जर त्याला भारतात पाठवले गेले तर त्यांच्यावर अत्याचार होऊ शकतात.
तहव्वूर राणा याला 2009 मध्ये एफबीआयने अटक केली होती. राणा यांना अमेरिकेत लष्कर-ए-तोयबाला पाठिंबा दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. आतापर्यंत त्याला लॉस एंजेलिसच्या एका डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.
दरम्यान, राणाला भारतात आणण्यासाठी गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी गृह मंत्रालयात बैठक घेतली.
मुंबई हल्ल्यात भूमिका – हेडलीला मुंबईत कार्यालय उघडण्यास मदत केली.
मुंबई हल्ल्यातील ४०५ पानांच्या आरोपपत्रात राणाचे नाव आरोपी म्हणून सूचीबद्ध आहे. त्यानुसार, राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा सदस्य आहे. राणा हा हल्ल्याचा मुख्य आरोपी आणि सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करत होता.
राणानेच हेडलीला मुंबईत फर्स्ट वर्ल्ड नावाचे कार्यालय उघडण्यास मदत केली होती. त्याने आपल्या दहशतवादी कारवाया लपविण्यासाठी हे कार्यालय उघडले.
एका इमिग्रेशन कन्सल्टन्सीद्वारे, हेडलीने भारतभर प्रवास करण्यास सुरुवात केली, लष्कर-ए-तैयबा दहशतवादी हल्ले करू शकते अशा ठिकाणांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
त्याने मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील ताज हॉटेलमध्ये रेकी केली. नंतर येथेही हल्ले झाले.
अमेरिकन सरकारने म्हटले- राणाची भूमिका सिद्ध झाली
अमेरिकन सरकारने म्हटले आहे की, ‘हेडलीने म्हटले आहे की, मुंबईत फर्स्ट वर्ल्डचे कार्यालय उघडण्याच्या खोट्या कथेचे सत्य सिद्ध करण्यासाठी राणाने एका व्यक्तीला हेडलीसाठी कागदपत्रे तयार करण्याचे आदेश दिले होते.’ भारताला भेट देण्यासाठी व्हिसा कसा मिळवायचा याबद्दल राणानेच हेडलीला सल्ला दिला होता. या सर्व गोष्टी ईमेल आणि इतर कागदपत्रांद्वारे सिद्ध झाल्या आहेत.
अमेरिकन न्यायालयाने यापूर्वी प्रत्यार्पणाची याचिका फेटाळली होती
१३ नोव्हेंबर २०२४ रोजी राणाने कनिष्ठ न्यायालयाच्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केले, जे २१ जानेवारी रोजी फेटाळण्यात आले. यापूर्वी त्याने सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात अपील केले होते, जे फेटाळण्यात आले. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवता येईल, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते.
तहव्वुरच्या प्रत्यार्पणासाठी भारताने उचलली ५ पावले
२०११ मध्ये, भारताच्या एनआयएने राणाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
भारताने सर्वप्रथम ४ डिसेंबर २०१९ रोजी राजनैतिक माध्यमातून राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली.
१० जून २०२० रोजी राणा यांच्या तात्पुरत्या अटकेची मागणी केली.
फेब्रुवारी २०२१ मध्ये, भारताने अधिकृतपणे अमेरिकेच्या न्याय विभागाला प्रत्यार्पणाची मागणी करणारा एक पत्र पाठवले.
२२ जून २०२१ रोजी अमेरिकेच्या संघीय न्यायालयात राणाच्या प्रत्यार्पणावरील सुनावणीदरम्यान भारताने पुरावे सादर केले.गेल्या वर्षी सरकारी वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की तहव्वूर हा हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र होता. तहव्वुरला माहित होते की हेडली लष्कर-ए-तोयबासोबत काम करत आहे. हेडलीला मदत करून आणि त्याला आर्थिक मदत देऊन, तेहव्वुर दहशतवादी संघटना आणि तिच्याशी संबंधित दहशतवाद्यांना पाठिंबा देत होता.
हेडली कोणाला भेटत होता आणि तो काय बोलत होता याची माहिती राणाकडे होती. त्याला हल्ल्याची योजना आणि काही लक्ष्यांची नावेही माहित होती. अमेरिकन सरकारने म्हटले आहे की राणा हा या संपूर्ण कटाचा भाग होता आणि दहशतवादी हल्ल्याला निधी देण्याचा गुन्हा त्याने केला असण्याची दाट शक्यता आहे.
तहव्वुर हा पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर होता, कॅनेडियन नागरिक होता.
६४ वर्षीय तहव्वुर हुसेन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. तहव्वुर हुसेन हे पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम करत होते. त्यानंतर १९९७ मध्ये ते कॅनडाला गेले आणि तिथे इमिग्रेशन सेवा देणारे व्यावसायिक म्हणून काम करू लागले.
कॅनडाहून तो अमेरिकेत गेला आणि शिकागोसह अनेक ठिकाणी फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस नावाची कन्सल्टन्सी फर्म उघडली. अमेरिकन न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, राणाने कॅनडा, पाकिस्तान, जर्मनी आणि इंग्लंडला अनेक वेळा भेट दिली. तो सुमारे ७ भाषा बोलू शकतो.
राणाला ऑक्टोबर २००९ मध्ये अटक करण्यात आली होती
ऑक्टोबर २००९ मध्ये, एफबीआयने तहव्वुर राणाला अमेरिकेतील शिकागो येथील ओ’हेअर विमानतळावरून अटक केली. मुंबई आणि कोपनहेगनमधील दहशतवादी हल्ले करण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवल्याचा आरोप त्याच्यावर होता. हेडलीच्या साक्षीच्या आधारे, तहव्वुरला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
२०११ मध्ये, राणाला डॅनिश वृत्तपत्र मॉर्गेनाव्हिसेन जिलँड्स-पोस्टेनवर हल्ला करण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. या वृत्तपत्राने २००५ मध्ये पैगंबर मुहम्मद यांच्यावरील १२ वादग्रस्त व्यंगचित्रे प्रकाशित केली होती. या हल्ल्यात एका व्यंगचित्रकाराचा शिरच्छेद करण्यात आला होता.
पुढच्याच वर्षी, ‘चार्ली हेब्दो’ नावाच्या फ्रेंच मासिकाने हे १२ व्यंगचित्र प्रकाशित केले, ज्याचा बदला म्हणून २०१५ मध्ये चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर हल्ला करून १२ लोक मारले गेले.
शून्य साइड इफेक्ट्स असलेले नैसर्गिक, क्रांतीकारी, वजन कमी करणारे उत्पादन
नैसर्गिक जीएलपी – 1 सायन्सवर आधारित, प्रती महिना २००० रुपयांच्या वाजवी किंमतीत उपलब्ध
मुंबई – भारत आरोग्याशी संबंधित एका महत्त्वाच्या समस्येच्या गंभीर दुष्परिणामांना सामोरं जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. देशात सर्व वयोगटात ओबेसिटी- स्थूलत्वाचा दर वेगाने वाढत असून त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे विकार यांच्याशी संबंधित लवकर मृत्यूचे प्रमाणही धोकादायक प्रमाणात वाढत आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार (NFHS-5) अंदाजे २४ टक्के स्त्रिया आणि २२.९ टक्के पुरुषांचा स्थूल गटात समावेश झाला आहे.
गुड बग या गट हेल्थ क्षेत्रात भारतातील पायोनियरिंग ब्रँडने क्रांतीकारी, नाविन्यपूर्ण वैज्ञानिक उत्पादन तयार केले असून ते वेटलॉस क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. गुड बगचे अडव्हान्स्ड मेटाबॉलिक सिस्टीम हे विज्ञानातील नैसर्गिक जीएलपी – 1 उत्पादन वजन कमी करण्यासाठी शाश्वत आणि वैज्ञानिक उपाय देणारे आहे. या क्रांतीकारी उत्पादनाला विज्ञानाचा आधार लाभला असून त्यासाठी करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून ९० दिवसांत वजनात १२.०१ टक्के घट होते, कमरेचा घेर ९.६४ टक्क्यांनी कमी होतो आणि बीएमआयमध्ये १२.१४ टक्के घट होते असे दिसून आले आहे.
द गुड बगचे सह- संस्थापक केशव बियाणी म्हणाले, ‘आधुनिक मायक्रोबायोम संशोधनाद्वारे विकसित करण्यात आलेल्या अडव्हान्स्ड मेटाबॉलिक सिस्टीममध्ये वैद्यकीय पातळीवर चाचणी घेण्यात आलेले प्रोबायोटिक्स आणि नैसर्गिक जीएलपी – 1 द्वारे प्रीबायोटिक्स सक्रिय करणारे योग्य मिश्रण देण्यात आले आहे. या उत्पादनामुळे एरवी वजन कमी करणाऱ्या औषधांशी संबंधित इतर चुकीचे साइड- इफेक्ट्स होत नाहीत. या उत्पादनाच्या लाँचसह वैज्ञानिक वैद्यकीय चाचण्यांद्वारे सिद्ध करण्यात आलेले, जागतिक पातळीवर अशाप्रकारे पहिले नाविन्यपूर्ण आणि ९० दिवसांत १२ टक्के वजन कमी करणारे उत्पादन सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. गट हेल्थ क्षेत्रातील पायोनियर कंपनी या नात्याने आम्ही स्थूलत्वामागे गट बायोम कंपोझिशनमधील असमतोल हे प्रमुख कारण असल्याचे ओळखून कित्येक वर्षांच्या संशोधनासह हे उत्पादन तयार केले. या उत्पादनामुळे जीएलपी – 1 आणि जीएलपी नैसर्गिकपणे वाढून वजन कमी होण्यास मदत होते. आमच्यासाठी हे मोठे वैज्ञानिक संशोधन असून ते पूर्णपणे भारतात शोधण्यात, विकसित करण्यात व बनवण्यात आले आहे. हे उत्पादन जागतिक क्षेत्रावरील वजन व्यवस्थापन क्षेत्राची समीकरणे नव्याने प्रस्थापित करेल.’
इतर फार्मास्युटिकल जीएलपी- 1 अगोनिस्टचे बरेच साइड इफेक्ट्स असतात व त्यावर अवलंबून राहावे लागते. गुड बगची अडव्हान्स्ड मेटॅबॉलिक सिस्टीम नैसर्गिकपणे शरीरातील जीएलपी – 1 पातळी वाढवते, दीर्घकाळापासून गटमध्ये असलेली जळजळ कमी करते. पर्यायाने भूक नियमित होते, सतत खाण्याची इच्छा कमी होते व वजन आणि आरोग्यात शाश्वत बदल होतात. हेल्थकेयर क्षेत्रातील व्यावसायिकांनी विश्वास दर्शवलेले हे उत्पादन वजन व्यवस्थापनासाठी शाश्वत आणि नैसर्गिक उपाय देणारे आहे. गुड बगने हे उत्पादन अमेरिकेसह इतर जागतिक बाजारपेठांत नेण्याचे ठरवले आहे.
मणीपाल हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार आणि ट्रायलचे प्रमुख इन्व्हेस्टिगेटर डॉ. एम. के. एन. मनोहर म्हणाले, ‘वैद्यकीय चाचणीमध्ये दिसून आलेल्या रिझल्ट्सची आकडेवारी लक्षणीय होतीच, शिवाय वैद्यकीयदृष्ट्या अर्थपूर्ण होती. त्यांची सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम औषधांशी तुलना करण्यासारखी आहे. यातील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे खाण्याच्या सतत इच्छेत – क्रेव्हिंग्जमध्ये होणारी घट आणि वाढलेले समाधान. ९० टक्के सहभागींनी त्यांच्या क्रेव्हिंग्जमध्ये घट झाल्याचे सांगितले, तर ९५ टक्के जणांनी भूक कमी लागत असल्याचे मत नोंदवलेय यावरून सिथेंटिक जीएलपी- 1 औषधांने काय होते हे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही प्रकारचे चुकीचे साइड इफेक्ट्स दिसून आले नाहीत. या चाचण्यांमध्ये भूक, समाधान व उर्जेत चांगली सुधारणा दिसून आली.’
ते पुढे म्हणाले, ‘स्थूलत्व ही निद्रिस्त महामारी बनली असून कोविडमुळे त्याला चालना मिळाली आहे. जीवनशैलीत केले जाणारे बदल आणि शस्त्रक्रिया यात मोठी दरी आहे. वैज्ञानिक पुराव्यांतून सातत्याने असे दिसून आले आहे, की गट मायक्रोबायोम हे मेटबॉलिक व शाश्वत वजन व्यवस्थापनाचा प्रमुख स्तंभ आहे. साइड इफेक्ट्स असणाऱ्या इतर सिंथेटिक उत्पादनांच्या तुलनेत द गुड बगसारखे संशोधनाअंती तयार करण्यात आलेले प्रोबायोटिक फॉर्म्युलनेशन गट बॅक्टेरिया व शरीराचे मेटाबॉलिझम पचनक्रिया यांच्यातील नैसर्गिक समतोल साधते.’
दरमहा २००० रुपये किंवा तीन महिन्यांसाठी ५००० रुपयांत उपलब्ध असलेले द गुड बगचे हे उत्पादन ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि रिटेल स्टोअर्समध्ये खरेदी करता येईल. संशोधनावर आधारित परिणामकारकता आणि पारदर्शकता यावर भर देणारे द गुड बग गट हेल्थ आणि एकंदर स्वास्थ्याची भूमिका नव्याने तयार करत आहे.
द गुड बगचे सह- संस्थापक प्रभू कार्तिकेयन म्हणाले, ‘मायक्रोबायोम सायन्सचा परिणाम केवळ पचनाच्या आरोग्यावरच होतो असे नाही, तर मेटाबोलिक आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, कॉग्निटिव्ह स्वास्थ्य यांच्यावरही त्याचा परिणाम होत असतो. मायक्रोबायोम संशोधन आणखी सखोल होईल तसा आरोग्यसेवा क्षेत्राला नवा आयाम मिळेल. आम्ही या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी बांधील आहोत. आधुनिक प्रोबायोटिकच्या मदतीने ग्राहकांसाठी सातत्याने उत्पादने तयार करण्यासाठी, विज्ञानावर आधारित उत्पादनांच्या मदतीने आपल्या आरोग्यावर नियंत्रण मिळवणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही लाँच करत असलेल्या उत्पादनाचा देशातील ओबेसिटी परिस्थितीवर कशाप्रकारे परिणाम होतो यात आम्हाला मोठी संधी दिसून येत आहे.’
स्थूलत्व ही गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अँटी- ओबिसिटी मोहीम लाँच केली. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) माहितीनुसार १८० दशलक्षांपेक्षा जास्त भारतीयांची २०२१ मद्ये जास्त वजन असेलले किंवा स्थूल म्हणून गणना करण्यात आली होती. ही आकडेवारी २०५० पर्यंत ४०० दशलक्षांपर्यंत जाईल असे अभ्यास अहवालांतून दिसून आले आहे.
२९९८.३३ कोटीचा महसूल मिळविला,५९९५ गुन्हे दाखल,५८९१ आरोपींना केली अटक: राज्य उत्पादन शुल्कची पुणे जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई
पुणे जिल्हयामध्ये अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुध्द राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाकडुन केलेली कारवाई.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसुली उत्पन्न, गुन्हा अन्वेषण व विविध अनुज्ञप्त्यांवर सन २०२३-२४ सालापेक्षा भरीव कामगिरी केली आहे.
डॉ. राजेश देशमुख (भाप्रसे), आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व श्री. जितेंद्र डूडी (भाप्रसे), जिल्हाधिकारी, पुणे तसेच सागर धोमकर, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने जमा महसुल मध्ये सन २०२४-२५ या वर्षामध्ये सन २०२३-२४ च्या तुलनेत ९.८५ % वाढ नोंदविलेली आहे. सन २०२३-२४ मध्ये पुणे जिल्हयाचा महसुल रु. २७२९.४४ कोटी इतका जमा झाला होता. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये रु. २९९८.३३ कोटी इतका महसुल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
गुन्हा अन्वेषणाच्या कामगिरीमध्ये पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुलक विभागाने सातत्य राखले आहे. माहे एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळामध्ये अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री विरुध्द एकुण ५९९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ५८९१ आरोपींना अटक करण्यात आली असून ६२१ वाहने जप्त करण्यात आली. तसेच रु. २५.८० कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गत वर्षी विभागाने एकुण ३९८८ गुन्हे दाखल केले होते. एकुण ३६०४ आरोपीना अटक करुन त्यांच्या ताब्यातुन ४२२ वाहनासह रु. १८.४७ कोटी चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. चालु वर्षी गुन्हा अन्वेषणाच्या कामगिरीमध्ये मागील वर्षेच्या तुलनेत ४०% वाढ झालेली आहे.
तसेच विभागाने प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ नुसार सराईत गुन्हेगारांविरुध्द एकुण ५७७ प्रस्ताव संबंधित दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. तसेच सराईत गुन्हेगाराकडून चांगल्या वर्तणूकीचे एकुण २९९ बंधपत्र घेण्यात आलेले आहे. त्यापैकी २९९ प्रकरणामध्ये रु. २ कोटी १८ लाख किंमतीच बंधपत्र घेण्यात आलेले आहेत. तसेच एम.पी.डी.ए कायदा १९८१ अंतर्गत दाखल केलेल्या एकूण ०९ प्रस्तावांपैकी ०१ प्रकरणात सराईत गुन्हेगाराविरुध्द स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध अनुज्ञप्तींचे सखोल निरीक्षण करण्यात येते, जे अनुज्ञप्तीधारक ठरवुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर विभागीय गुन्हे नोंद केले जातात. सन २०२४-२५ मध्ये अशा एकुण ५६९ अनुज्ञप्तीविरुध्द विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ०४ अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सदर विभागीय विसंगती प्रकरणामध्ये रु. १ कोटी ८६ लाखाचा दंड अनुज्ञप्तीधारकांकडून वसुल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार अवैध धाब्यांवर मद्य विक्री करणाऱ्या विरुध्द तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकान विरुध्द एकुण ४५५ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकुण १२५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. मा. न्यायालयाद्वारे आरोपींना एकुण रु. ८,१९,०००/- द्रव्य दंड ठोठविण्यात आलेला आहे. यामुळे केवळ अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुध्दच कारवाई न करता त्यासोबत सदर ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यां विरुध्द सुध्दा कारवाई करण्यात आलेली असल्यामुळे सदर अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना सुध्दा चाप बसणार आहे.
पुणे जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री तसेच परराज्यातील मद्य/अवैध ढाबे/अवैध ताडी विक्री विरुध्द कारवाई कठोर कारवाई करण्यासाठी एकुण २१ पथकांना निर्देश देण्यात आलेले असून अवैध मद्य व्यवसाया विरुध्द कारवाई करण्यात येत आहे. सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांना अवैध मद्य निर्मिती/विक्री/वाहतुक किंवा मद्य वाटप इ. संबंधी माहिती/तक्रार दयावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक. १८००२३३९९९९ व अधीक्षक कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक. ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पत्रकारितेला जनसुरक्षा कायद्याचा फटका बसणार नाही:मुख्यमंत्र्यांचा शब्द
पत्रकार संघटनांबरोबर देवेंद्र फडणवीस यांची बैठक.
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींवर विविध पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्षेपाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. महाराष्ट्रातील विविध १२ संघटनांनी एकत्रित येत “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच” स्थापन केला होता. या मंचाची आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली.
पत्रकार अभिव्यक्ती मंचच्या वतीने एस.एम.देशमुख, संदीप चव्हाण, दिलीप सपाते, यदु जोशी, विशाल सिंग, पंकज दळवी, इंद्रकुमार जैन, प्रदीप मैत्रा, दीपक भातूसे, श्रीकिशन काळे यांनी या मसुद्यातील विविध मुद्यांवरील पत्रकार संघटनांचे असणारे आक्षेप मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. हा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचे प्रथमदर्शनी मत समाजाच्या सर्वच स्तरावर बनले असल्याकडेही पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे लक्ष वेधले. या विधेयकाची ही प्रतिमा निर्माण झाली असेल तर ती दूर करण्याचे सर्वोतपरी प्रयत्न शासकीय पातळीवरून केले जातील असे सांगतानाच या विधेयकामुळे कुणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जाणार नाही, आणि पत्रकरांच्या निर्भीड पत्रकारितेला या विधेयकाचा कोणताही फटका बसणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.
मुळात शहरी नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा बनविला जात आहे. हा कायदा कुणा व्यक्तीच्या विरोधात नसुन तो नक्षली प्रवृतींना बळ देणाऱ्या संघटनांच्या विरोधात राबवविला जाणार आहे. त्यामुळे बंदी घातलेल्या संघटनांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भातच हा कायदा लागू होणार आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हा कायदा याआधी छत्तीसगड, तेलंगणा आणि ओरिसासारख्या नक्षलग्रस्त राज्यात लागू झालेला आहे. पण महाराष्ट्रात हा कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे या सगळ्या नक्षली संघटनांची मुख्य कार्यालय ही महाराष्ट्राच्या नक्षल भागात थाटली जात आहेत. या नक्षली कारवायांना पायबंद घालण्यासाठी अशा कठोर कायद्यांची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायाधिशांची समिती गठीत केली जाणार असून त्यांच्या मान्यतेनंतरच या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे या कायद्याचा दुरूपयोग होऊ शकणार नाही असेही फडणवीस यावेळी म्हणाले. त्यातही काही मुद्द्यांवर जर पत्रकार संघटनांच्या सुचना असतील तर त्या त्यांनी लेखी द्या त्याचा अंतिम मसुदा करताना नक्की विचार करू असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.
या बैठकीला मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, मुंबई प्रेस क्लब, विधीमंडळ वार्ताहर संघ, अधिस्विकृती पत्रकार समिती, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, बृहन्मुंबई यूनियन ऑफ जर्नालिस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशन, पुणे श्रमिक पत्रकार संघ, मुंबई हिंदी पत्रकार संघ, नॅशनल यूनियन जर्नालिस्ट ऑफ इंडिया आणि जर्नालिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर,घैसास ही दोषी,पन्नास पानांचा अहवाल सादर
पुणे : मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग आणि धर्मादाय सहआयुक्तांच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे.
गर्भवती महिलेच्या मृत्यूचं खापर डॉ. केळकर यांनी राहु-केतुवर फोडलं होतं. तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या आहेत.
धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता मंगेशकर रूग्णालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आता समोर आलाय. पन्नास पानांचा अहवाल सादर केला गेलाय.
तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, त्यादिवशी 7 कोटी 47 लाख रूपये रक्कम मंगेशकर रूग्णालयाकडे शिल्लक होती. जी निर्धण किंवा अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींच्या उपचारासाठी आहे. धर्मादाय आयुक्तालयाची पाचजणांची समिती होती. हा अहवाल दोन दिवस आणि एक रात्र असं सलग बसून बनवण्यात आलाय. सकाळी हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. या अहवालात डॉ. केळकर जे डीन आणि संचालक आहेत, तेही दोषी आढळून आलेत. त्यांचं स्टेटमेट देखील धर्मादाय आयुक्तालयाने रेकॉर्ड केलेलं आहे.तनिषा भिसे यांच्या पतीचं देखील स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलंय. डॉ. घैसास हे या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहेत. कारण त्यांनी हे डिपॉझिट मागितलं होतं. ते राहु-केतु वैगेरे. त्यांना काय सुचलं, अशी भूमिका डॉ. केळकर यांची होती. ती देखील धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात जशीच्या तशी मांडण्यात आली. परंतु डॉ. केळकरांच्या संमतीशिवाय हे झालेलं नाही. डॉ. केळकर आणि संपूर्ण मंगेशकर रूग्णालय व्यवस्थापन हेच याला जबाबदार आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आलाय.रूग्णालयासंदर्भात काय-काय करायला हवं, यासंदर्भात देखील धर्मादाय आयुक्तांनी शिफारशी मांडल्या आहेत. यामध्ये मंगेशकर रूग्णालयाचं जे नाव आहे. त्यात धर्मादाय शब्द असणे, आधीपासून गरजेचे होते. तो शब्द असेल. तर केवळ पुणेच नाही तर राज्यातील सर्व चॅरिटेबल रूग्णालयांच्या नावात धर्मादाय शब्द येणार आहे. डॉ. केळकर हे डॉ. घैसास इतकेच जबाबदार असल्याचं समोर आलाय.मातामृत्यू समितीचा अहवाल समोर आला नाही. तो उद्या सकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. फौजदारी समितीचा अहवाल समोर आल्यावर गुन्हा दाखल होवू शकतो. डॉ. केळकर यांनी नियमावलीनुसार ज्या गोष्टी करणं गरजेचं होतं. त्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत.
“ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला. मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केल्याने मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. आयोगाने याप्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या अध्यक्षांना यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून आयोगास केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितले आहे.”
अखेर ७ तासांनी सुप्रिया सुळेंनी उपोषण सोडलं; २ मे ला रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार
पुणे:भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि.९ एप्रिल) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणाला सुरुवात केली. जोपर्यंत रस्त्याच्या कामाची तारीख सांगत नाही. तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे सुळे यांनी सांगितले होते. अखेर त्यांनी 2 मे ला कामाला सुरुवात करण्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी पंधरा दिवसांमध्ये कामाला सुरुवात करा अशा प्रकारचं मत मांडलं होतं. त्यानंतर एक महिन्यांमध्ये कामाला सुरुवात करू अशा प्रकारचे पत्र जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी पाठवलं. परंतु आता सुवर्णमध्य काढत 22 दिवसानंतर म्हणजेच 2 मे ला कामाला सुरुवात करण्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडलं आहे.सुप्रिया सुळे आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्या. प्रशासनाचे अधिकारी सुप्रिया सुळेंना उपोषणस्थळी भेटायला आले होते. यावेळी काम कधी सुरु होणार असल्याचे सुप्रिया यांनी विचारले. या कामाला अंदाजे ५० लाख लागत आहेत. डीपीसी कडून ते बजेट मंजूर आहे. आम्ही पावसाळ्यापूर्वी काम सुरु करू असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंत्री येतात तेव्हा रस्ता रात्रीतून तयार होतो. तुम्ही तारीख सांगा. ती सांगणार नसाल तर तुम्ही चहा घेवून जा असं अधिकाऱ्यांना सुप्रिया म्हणाल्या. तसेच १४ दिवसात काम सुरु करणार असाल तर उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी सांगितले. दिनांक 9 मे पर्यंत रस्ता कामाला सुरुवात करू असं अधिकारी म्हणत होते. पण अखेर सुवर्णमध्य काढत 22 दिवसानंतर म्हणजेच 2 मे ला कामाला सुरुवात असल्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळेंनी उपोषण सोडले आहे.
त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून सहकार क्षेत्र आगामी काळात सक्षम होईल : केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुणे:सहकाराला शास्त्रशुद्ध पद्धतीने दिशा देण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.देशातील ८ लाख सहकारी संस्थात आज ४० लाख लोक काम करत आहे तर, ८० लाख सदस्य सहकार विभागाशी निगडित आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याकरिता उत्तम प्रशासन, अनियमितता टाळण्यासाठी त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र व्याप्ती वाढेल आणि उद्योग, रोजगार संधी नव्या उपलब्ध होतील. पुढील पाच वर्षात सहकार क्षेत्राला १७ लाख प्रशिक्षित मनुष्यबळ गरज आहे, त्यामुळे त्रिभुवन सहकार विद्यापीठाची गरज होती. हे विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर काम करेल आणि सहकार अधिक सक्षम होईल. संसद अधियनियम अंतर्गत हे विद्यापीठ चालणार असून यात संशोधन आणि विकास यावर देखील भर दिला जाणार आहे असे मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, सहकार विषयात काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहे. नुकतेच संसद अधिवेशनमध्ये दोन्ही सभागृहात सहकार मंत्रालया माध्यमातून देशातील पहिले सहकार विद्यापीठ स्थापन करण्याता निर्णय झाला आहे. यामागील उद्देश, विद्यापीठ गरज काय, देशभरात त्यांचे काम कसे असेल याबाबत माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे.
देश कृषी प्रधान असून ५० टक्क्यांपेक्षा अधिक जनता सहकार क्षेत्राशी जोडलेली आहे. देशातील ३० कोटी जनता वेगवेगळया मार्गाने सहकार क्षेत्राशी संबंधित आहे. साडेतीन वर्षापूर्वी सहकार मंत्रालय स्थापन झाले आणि त्याची जबाबदारी सहकारमध्ये भरीव योगदान असलेल्या अमित शाह यांना दिली गेली. त्यानंतर अनेक महत्वाचे निर्णय सहकार क्षेत्रासाठी झाले. ग्रामीण भागातील पॅक्स यांना ताकद देण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता जिल्हा बँकेकडून जी आर्थिक रक्कम येत ती शेतकऱ्यांना छोट्या कर्ज स्वरूपात पूर्वी वाटप केली जात होती पण, आता पॅक्सला २५ विविध उद्योग दिले गेले आहे. देशात मोठ्या प्रमाणात पॅक्स कार्यरत आहे. ३२ राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेश यांनी ही मॉडेल स्वीकारले आणि त्यांना मोठा आर्थिक निधी मदत देखील दिली गेली आहे. सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी अनेक गोष्टी पूर्तता करण्यात आली आहे. शहरी नागरी बँकांच्या सशक्तीकरण आणि त्यांचे आर्थिक बळकटीसाठी पुढाकार घेण्यात आला. तीन मोठ्या संस्था देखील स्थापन करून शेती समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
‘वैकुंठ मेहता’ असणार सहकार विद्यापाठीचा महत्त्वाचा भाग !
त्रिभुवन सहकार विद्यापीठासाठी पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था महत्वपूर्ण भाग राहणार आहे, कारण या संस्थेचे सहकार क्षेत्रासाठी असणारे योगदान मोठे आहे. त्यामुळे ही संस्था विद्यापीठाचा अविभाज्य घटक असणार आहे.
मोहोळ यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील १५ हजार सेवा सोसायट्यांना दिलासा…
नियमाप्रमाणे सेवा सोसायट्यांना आयकर भरावा लागत नाही. पण त्यासाठी त्यांना आयकर रिटर्न भरावा लागतो. देशात एक लाख सेवा सोसायट्या (पॅक्स) आहे. त्यापैकी अनेक पॅक्स यांना आयकर विभाग बाबत नोटीस आली होती. महाराष्ट्रामध्ये १५ हजार पॅक्स यांना आयकर रिटर्न वेळेत न भरल्याने २० टक्के आयकर लागू झाला होता. पण याबाबत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याशी समन्वय साधून याला स्थिगिती मिळवली आहे. पॅक्स यांना सक्षम अधिकारी यांच्यासमोर प्रक्रिया पूर्ण केल्यास संबंधित आयकर लागू होणार नाही, अशी माहिती यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
‘एअरबस’च्या ‘एच-१३० हेलिकॉप्टर फ्युसेलाज’ निर्मितीसाठी‘महिंद्रा एअरोस्ट्रक्चर्स’ची निवड;
एअरबस हेलिकॉप्टर्सच्या युरोपमधील कारखान्यांसाठी मार्च २०२७ पासून असेंब्लीज होणार
वितरित.
नवी दिल्ली, ९ एप्रिल २०२५ – महिंद्रा समूहातील महिंद्रा एअरोस्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड
(एमएएसपीएल) या कंपनीला एअरबस हेलिकॉप्टर्सतर्फे ‘एच-१३०’ या हलक्या, सिंगल-इंजिनच्या
हेलिकॉप्टरमधील मुख्य फ्युसेलाजचे उत्पादन आणि असेंब्ली करण्याचे कंत्राट मिळाले आहे. या संदर्भात
उभय कंपन्यांमध्ये नुकताच करार करण्यात आला. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या दृष्टीने हा करार एक मोठा
टप्पा आहे. तसेच, जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळीतील विश्वासार्ह भागीदार म्हणून महिंद्राचे स्थान या
कंत्राटामुळे अधिक बळकट झाले आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, नागरी विमान वाहतूक उड्डाण खात्याचे सचिव
वुमलुनमांग वुअलनाम, एअरबस कंपनीचे भारत व दक्षिण आशिया विभागासाठीचे प्रमुख व व्यवस्थापकीय
संचालक रेमी मायार्ड, तसेच महिंद्रा समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक डॉ.
अनिश शाह यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या कराराअंतर्गत महिंद्रा ‘एच-१३० हेलिकॉप्टरच्या’ मुख्य फ्युसेलाज असेंब्लीचे उत्पादन करेल. ही असेंब्ली
त्यानंतर एअरबस हेलिकॉप्टर्सच्या युरोपमधील कारखान्यात पाठवली जाईल. या संदर्भातील
उद्योगीकरणाची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार असून पहिली कॅबिन असेंब्ली मार्च २०२७ पर्यंत वितरित
केली जाण्याचे नियोजित आहे.
महिंद्रा समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिश शाह म्हणाले,
“एअरोस्ट्रक्चर्सच्या या महत्त्वपूर्ण कराराच्या माध्यमातून ‘एअरबस’सोबतची आमची प्रदीर्घ भागीदारी
आणखी दृढ करण्यात आम्हाला आनंद होत आहे. जागतिक नेत्याच्या भूमिकेत ‘एअरबस’ने भारताच्या
एरोस्पेस पर्यावरणास सक्षम करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर त्याला स्थान मिळवून देण्यासाठी
महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘एअरबस’सोबतच्या आमच्या सिद्ध विश्वासार्हतेला पुढे नेण्याची, आमच्या
औद्योगिक प्रक्रियेतील उत्कृष्टतेचा वापर करण्याची आणि या नव्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी
मिळणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. हे सहकार्य भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला
पाठिंबा देण्याच्या आमच्या कटिबद्धतेला अधोरेखित करते.”
एअरबस कंपनीचे भारत व दक्षिण आशिया क्षेत्रासाठीचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक रेमी मायार्ड
म्हणाले, “आमच्याकडे भारतासाठी एक रणनीतिक योजना आहे आणि आम्ही ती अंमलात आणत आहोत.
यामध्ये असेंब्ली, उत्पादन, अभियांत्रिकी, नवोपक्रम, डिजिटल आणि प्रशिक्षण अशा सर्व स्तरांवर संपूर्ण
एरोस्पेस पर्यावरण विकसित करणे समाविष्ट आहे. एच-१३० फ्युसेलाजच्या उत्पादनाचा हा करार हा
भारतीय पुरवठा साखळीतील वाढत्या औद्योगिक उत्कृष्टतेवरील ‘एअरबस’च्या विश्वासाचा दाखला आहे.
भारतातील सक्षमता आणि स्पर्धात्मकतेच्या योग्य संतुलनामुळे हा उद्योग अधिकाधिक विकसित होत आहे.

आमची भागीदार असलेल्या महिंद्रा एअरोस्ट्रक्चर्स कंपनीसोबतच्या या नवीन सहकार्याद्वारे भारताशी
असलेले आमचे संबंध आणखी दृढ करण्यात आम्हाला आनंद होत आहे.”
महिंद्रा पूर्वीपासूनच ‘एअरबस’च्या व्यावसायिक विमान कार्यक्रमांसाठी विविध प्रकारचे भाग आणि उप-
असेंब्ली पुरवीत आहे. हा नवीन करार ‘महिंद्रा’साठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण केवळ भाग आणि
उप-असेंब्ली पुरवण्याच्या पुढे जाऊन मोठ्या आणि अधिक जटिल एअरोस्ट्रक्चर्सची निर्मिती करण्याचे हे
काम आहे. यातून महिंद्रा आपले कौशल्य विस्तारीत आहे.
‘एअरबस’साठी भारत ही केवळ एक मोठी बाजारपेठ नसून एक महत्त्वाचे संसाधन केंद्रदेखील आहे. आज
‘एअरबस’च्या प्रत्येक व्यावसायिक विमानात भारतात बनवलेले घटक आणि तंत्रज्ञान समाविष्ट आहेत.
सध्या एअरबस भारतातून वार्षिक १.४ अब्ज डॉलर किमतीचे घटक आणि सेवा खरेदी करते.
‘एच-१३०’ हे एक इंटरमिजिएट सिंगल-इंजिन हेलिकॉप्टर आहे. ते प्रवासी वाहतूक, पर्यटन, खासगी व
व्यावसायिक विमानसेवा तसेच वैद्यकीय हवाई वाहतूक आणि गस्त मोहिमा यांसाठी तयार करण्यात आले
आहे. पायलट आणि सात प्रवासी सहज बसू शकतील, एवढी मोठी प्रशस्त केबिन या हेलिकॉप्टरमध्ये आहे.
मोठा गोलसर विंडस्क्रीन आणि रुंद खिडक्या यामुळे यातील प्रवाशांना उत्कृष्ट दृश्यमानता मिळते.
अत्याधुनिक स्वरुपाचे तंत्रज्ञान, सामग्री, प्रणाली आणि एव्हियोनिक्स यांमुळे हे हेलिकॉप्टर शांत आणि
शक्तिशाली बनले आहे.
मने फुलवायला उपयुक्त विचार साहित्यातूनच मिळतात : प्रा. मिलिंद जोशी‘राग-रंग, तरंग-अंतरंग’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : चित्रकला, संगीत, साहित्य या सगळ्या कलांमध्ये अंतर्संवाद असतो तो समजून घेणे आवश्यक असते. जात, पंथ, धर्म न पाहता माणूस जोडण्याचे काम कलेद्वारे होते. भावना जागवायला आणि मने फुलवायला उपयोगी पडणारे विचार साहित्यातूनच मिळतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
एकदंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शब्दशिल्पी डॉ. मुकुंद कोठावदे, राग गीतकार किरण फाटक आणि डॉ. दिलीप वाणी लिखित ‘राग-रंग, तरंग-अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील निमा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ख्यातनाम अस्थिव्यंगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. शरच्चंद्र हर्डीकर, राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र भागवत, मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, प्रा. डॉ. भीम गायकवाड मंचावर होते.
पुस्तकाच्या मांडणीविषयी बोलताना डॉ. कोठावदे म्हणाले, ‘राग-रंग, तरंग-अंतरंग’द्वारे मनात आनंदाचे तरंग निर्माण व्हावेत अशी अपेक्षा आहे.
किरण फाटक म्हणाले, अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात खूप सामर्थ्य आहे. शास्त्रीय संगीताचा वैद्यक क्षेत्रात शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार होण्याची आवश्यकता आहे.
शास्त्रीय संगीताद्वारे अंतरंगात आनंद फुलतो, असे सांगून डॉ. दिलीप वाणी म्हणाले, प्रत्येकाला शास्त्रीय संगीत समजेल असे नाही. मात्र शास्त्रीय संगीताचा आनंद प्रत्येकजण घेऊ शकतो. पुस्तकाद्वारे संगीतातील विज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
