Home Blog Page 585

ख्रिस्ती समाजाच्या विविध समस्या विधानसभेत मांडू व सोडवू; बापूसाहेब पठारे यांचा निश्चय

मार्कस पंडित यांच्या माध्यमातून चर्चासत्रात वडगावशेरी मतदारसंघातील सर्व कॅथोलिक चर्चचा सहभाग

पुणे: खराडी येथे ख्रिस्ती समाजाचे नेते मार्कस पंडीत यांच्या नेतृत्वाखाली ख्रिस्ती समाजाच्या विविध समस्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रमुख उपस्थित हे चर्चासत्र पार पडले.

यावेळी संत फ्रान्सिस डी सेल्स चर्च, डीव्हाईन मर्सी चर्च, क्राईस्ट द किंग चर्च, कार्मिल चर्च, होली फॅमिली चर्च लोहगाव त्याचप्रमाणे कॅथलिक असोसिएशन ऑफ पुणे, वडगावशेरी मायनॉरीटी काँग्रेस आय पार्टी, ख्रिश्चन कोकणी संघटना, तमिळ ख्रिचन संघटना, एस एफ मराठी कॅथलिक संघटना, मिलाग्रास फाउंडेशन वडगावशेरी, पुणे कोकणी ख्रिस्त सभा, ख्रिस्त जागृती मंच या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तरपणे विविध विषयांवर चर्चा केली.

आगामी निवडणुकीसाठी या सर्व संघटनांनी व ख्रिस्ती समाजाने बापूसाहेब पठारे यांना पाठींबा जाहीर केला. तसेच, ख्रिस्ती समाजाच्या समस्या विधानसभेत मांडण्याची विनंती पठारे यांना केली. “ख्रिस्ती समाजाने दिलेला पाठिंबा फार महत्त्वाचे योगदान देणारा ठरेल. येणाऱ्या काळात विविध माध्यमातून ख्रिस्ती समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडू व त्यावर नक्कीच तोडगा काढू”, असे आश्वासन बापूसाहेब पठारे यांनी दिले.

यावेळी जयप्रकाश पारखे (सचिव, महाराष्ट्र राज्य प्रोग्रेसिव्ह पीपल काँग्रेस पक्ष), जॉन फर्नाडिस (अध्यक्ष, मिलाग्रास फाउंडेशन), जो रोड्रिग्ज (अध्यक्ष, कोकणी सभा), एडविन अलेक्स (अध्यक्ष, तामिळ सभा), रविभाऊ कांबळे (अध्यक्ष, मराठी सभा व सरचिटणीस, काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती जमाती), जो कसबे (पुणे धर्मप्रांत अध्यक्ष कॅथलिक असोसिएशन), ए वी थॉमस (धानोरी चर्च), स्वप्नील साळवे सर ( क्राईस्ट द किंग चर्च), मॅथ्यू थॉमस (कार्मेल चर्च), पासकल लोपोझ, बेंजामिन डिकोस्टा, अँथॉनी फर्नांडिस, मधुकर सदाफुले, अमर पंडीत इ. विविध संघटनांचे मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वडगाव शेरीत रेखा टिंगरे यांचा बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा

पुणे :वडगाव शेरीतील माजी नगरसेविका रेखा टिंगरे व चंद्रकात टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे तसेच ज्येष्ठ नेते प्रकाश(आप्पा )म्हस्के हेही उपस्थित होते.

‘मतदारसंघाच्या विकासासाठी आपण घेतलेल्या प्रवेशाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रवेशाने नक्कीच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला तसेच एकूणच महाविकास आघाडीला बळकटी येईल. तसेच, आगामी विजयाच्या या प्रवासात आपले योगदान मोलाचे ठरेल’, असे उदगार बापूसाहेब पठारे यांनी काढले.

‘एकमताने एकजुटीने विकासाचे ध्येय पूर्ण करूयात’, असे उदगार रेखा टिंगरे यांनी काढले.

माजी नगरसेविका सुनीता साळुंखे,त्यांचे पती अनिल साळुंखे, येरवडा येथील माजी नगरसेवक हनीफ शेख, फरझना शेख, आयुब शेख यांनीही यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे.

येरवडा येथील माजी नगरसेवक हनीफ शेख, फरझाना शेख, आयुब शेख यांनी​ही पाठींबा ​दिल्याने दिवसेंदिवस बापूसाहेब पठारे यांची बाजू मजबूत होत चालली आहे.

‘आमदार असतानाच्या काळात बापूसाहेब पठारे यांनी आमच्या परिसरातील विकासकामे केली होती.सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून लक्ष घातले होते.एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर विश्वास असल्यानेच आम्ही पाठिंबा देत आहोत’,असे पाठिंबा देणारे आवर्जून सांगत आहेत.या पाठिंब्याबरोबरच इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारीही बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाला समर्थन देण्यासाठी इच्छुक आहेत. विविध पक्षांतील प्रमुख कार्यकर्ते, समाजसेवक, आणि स्थानिक प्रतिनिधी हे बापूसाहेब पठारे यांच्या उमेदवारीला पाठीशी उभे राहण्यास तयार आहेत. यामुळे महाविकास आघाडीची स्थिती अधिक बळकट होणार असून आगामी निवडणुकीत विजय निश्चित करण्यासाठी एकात्मतेने काम केले जाईल, असे पाठिंबा देणारे आवर्जून सांगत आहेत.

बापूसाहेब पठारे यांनी या सर्व पाठिंब्याबद्दल आभार मानले असून सांगितले की, “विकासकामांच्या खात्री मुळे मला मतदार संघात पाठिंबा वाढत आहे.वाढत्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित आहे, आणि मी माझ्या कार्यक्षेत्राच्या प्रगतीसाठी अथक कार्य करेन.”

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या समर्थनामुळे अधिक सक्रिय झाले असून, विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांना विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
………………………………………………

धनकवडीतील जुगाअड्ड्यावर छापा 10 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:धनकवडी भागातील नसरवान पेट्रोल पंपाजवळ मटका अड्डा सुरू असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकत आरोपींकडून २२ हजार रुपयांची रोकड, मोबाइल संच, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस शिपाई श्रीकांत दगडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर दहा जणांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अजय शिरसाठ (वय ४८, रा. धनकवडी ), किरण किसन कानकर (वय ३२, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी ), गणेश कदम ( वय ३५, रा. पद्मावती), दीपक दोडे ( वय ५५, रा. बिबवेवाडी ), दादासाहेब जोगदंड (वय ३५,रा. पद्मावती ), बसू सिगली (रा. मार्केट यार्ड ), अर्जुन थोरात ( वय ४९, रा.धनकवडी), बबन कांबळे (वय ५२, रा. बिबवेवाडी ), उत्तरेश्वर साठे (वय ५५, रा. आंबेगाव ), चंद्रकांत बाड (वय ३५, रा. धनकवडी ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नवीन मराठी शाळेत मतदान जागृती संदर्भात मानवी साखळीचे आयोजन

पुणे;गुरूवार दि. १४/११/२०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत शाळेतील ११०० हून अधिक पालकांनी शाळेत उपस्थित राहून मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.मुख्याध्यापिका मा.कल्पना वाघ व शिक्षिका प्रिया इंदुलकर यांनी पालकांशी संवाद साधला. तसेच शाळेच्या परिसरात विद्यार्थी व पालकांनी मानवी साखळी करून परिसरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पूर्ण करण्याविषयी जागृती केली. यापूर्वीही सोम.दि. १४ ऑक्टोबर २०२४ ते गुरूवार दि. २४ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शाळेत मतदान जागृती अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
१) शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांकडून मतदान करण्याबाबतचे संकल्प पत्र लिहून घेण्यात आले.
२) शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेच्या परिसरात घोष फलकांसह मतदान जागृती प्रभात फेरी काढण्यात आली.
३) शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जागृती संदर्भात घोषवाक्यांचे लेखन केले.
४) शाळेच्या माध्यमातून पालकांचे मतदान जागृती विषयी प्रबोधन व्हावे म्हणून पालकांसाठी निबंध लेखन व चित्रकला उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
५) विद्यार्थ्यांनी शाळेतून आपल्या आई- वडिलांना पत्र लिहून मतदान जागृती केली.
शिलासमिती अध्यक्ष मा. राजेंद्र जोग व मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने, धनंजय तळपे , योगिता भावकर, पुष्पा देशमाने, तसेच समग्र शिक्षा अभियान विभागाच्या शिक्षकांनी या अभियानातील उपक्रमांचे नियोजन केले.

हिमाचल मध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली पण आश्वासन पूर्तता ने केल्याने सरकार चालवणे अवघड – हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर

पुणे –
काँग्रेस सरकारने त्याठिकाणी जनतेला आश्वासन देऊन ते सत्ते मध्ये आले पण मागील दोन वर्षात कोणत्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही.काँग्रेसने ज्या दहा आश्वासनांचा जाहीरनामा दिला ते खोटे निघाल्याने जनतेला धोका निर्माण झाला आहे. सरकारी कर्मचारी यांना पगार मिळत नाही, पेन्शन दिली जात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने प्रशासन मध्ये नाराजी आहे. सत्ता काँग्रेसने मिळवली पण सत्ता चालवणे त्यांना अवघड झाले आहे असे मत हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण , कर्नाटकचे माजी मंत्री नारायण गौडा, भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि तेलंगणा राज्यातील खासदार डी. के. अरुणा , भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, कुणाल टिळक, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर , पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले, हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणतात, काँग्रेस नेत्यांनी प्रत्येक महिलेस दर महिना १५०० रुपये देण्याची घोषणा केली, पाच लाख युवकांना रोजगार दिला जाईल, एक लाख सरकारी पदे भरली जातील ,प्रत्येक महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल पण कोणत्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात न आल्याने जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे. ही परिस्थिती महाराष्ट्र मध्ये येऊ नये अशी आमची इच्छा आहे जनतेने काँग्रेसचा खरा चेहरा ओळखावा.

कर्नाटक मध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण म्हणाले, महाराष्ट्र मध्ये निवडणूक होत असून काँग्रेसने वेगवेगळी आश्वासने जनतेला दिली आहे. पण मागील १८ महिन्यापासून काँग्रेस सरकार कर्नाटक मध्ये असून त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती बिघडवली आहे. अनेक भ्रष्टाचार घोटाळे देखील होताना दिसत आहे. अवैधरित्या भूखंड बळकावणे आणि त्यानंतर गवगवा झाल्यावर परत केले जातात यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील सहभागी आहे. त्यांच्यावर न्यायालयाकडून याबाबत गंभीर गुन्हे दाखल आहे. तेलंगणा निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारने ८७ कोटी रुपये बेकायदेशीर हस्तांतरित केल्याचे देखील घटना उघडकीस आली आहे. काँग्रेस भ्रष्टाचार मध्ये बुडलेले असून महाराष्ट्र मधील निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारचे पैसे वापरले जात आहे. राज्यात विकास ठप्प झाला असून काँग्रेस सरकार मधील आमदार देखील अस्वस्थ झाले आहे.

तेलंगणात महालक्ष्मी योजनेस काँग्रेसकडून हरताळ

खासदार डी. के. अरुणा यांनी सांगितले की, तेलंगणा मध्ये काँग्रेसने निवडणूकवेळी सहा गॅरंटी जनतेस दिल्या. शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्ज माफी घोषणा केली, शेतकरी आणि कामगार यांना. आर्थिक साह्य करू सांगितले. महिलांना दर महिना २५०० रुपये देऊ अशी महालक्ष्मी योजना सांगितली, प्रत्येक महाविद्यालयनी तरूणीस इलेक्ट्रिक दुचाकी देऊ म्हणाले, बेरोजगार भत्ता देऊ पण कोणत्याही आश्वासनाची पूर्तता सत्तेत आल्यापासून ११ महिन्यात केली नाही. तरी मुख्यमंत्री देशात दुसऱ्या राज्यात जाऊन आश्वासने पूर्ण केल्याचा खोटा प्रचार करत आहे.

राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आल्यावर एक वर्षात महाराष्ट्र – गोवा महामार्ग तयार होईल – गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पुणे –
महाराष्ट्र ते गोवा दरम्यानचा महामार्ग रस्ता मध्ये काही कंत्राटदार चांगले मिळाले नाही तसेच महाराष्ट्र मध्ये मध्यंतरी सरकार बदलले गेल्याने हा रस्ता निर्माण करण्यात अडचणी निर्माण झाल्या. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आता याबाबत पुढाकार घेतला असून राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आल्यावर एक वर्षात हा मार्ग पूर्ण होईल असे मत गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, बाळासाहेब हरपळे, राहुल कुलकर्णी उपस्थित होते.
सावंत म्हणाले,महाराष्ट्र मध्ये पुन्हा महायुती सरकार सत्तेत आले पाहिजे. गोवा मध्ये रस्ते,रेल्वे आणि विमानतळ याचा मागील दहा वर्षात कायापालट झाला आहे. महाराष्ट्र हा विकसित महाराष्ट्र करण्यासाठी महायुती सरकार राज्यात पुन्हा आले पाहिजे. सन २०१४ मध्ये राज्यातील जनतेने भाजपला बहुमत दिले. २०१९ मध्ये देखील जनतेने युतीला साथ दिली . पण उध्दव ठाकरे यांच्या स्वार्थमुळे वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सोबत भाजप राज्यात चांगल्या प्रकारे काम करत आहे. मराठी भाषा मध्ये माझे शिक्षण झाले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काँग्रेसकडून कधी दिला गेला नाही पण भाजपच्या केंद्र सरकारने आता त्याला दर्जा दिला आहे ही महाराष्ट्रसाठी गौरवाची बाब आहे. युवा शक्ती, महिला शक्ति, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार मुद्द्यावर सरकारच्या सर्व योजना राबवल्या जात आहे. गृह आधार योजना अंतर्गत आम्ही ११ वर्ष महिलांना दर महिना १५०० रुपये मदत दिली आहे. पण कर्नाटकने अशी घोषणा निवडणूकवेळी केली पण काँग्रेसने त्याची अंमलबजावणी केली नाही. शेतकरी आत्महत्या होत असताना त्यांना आधार देण्यासाठी शेतकरी सन्मान योजना, कृषी पंप वीज माफी , पीक विमा दिली गेला आहे. काँग्रेसने देशात गरीबी हटाव योजना आणली पण गरीबी ते कधीच दूर करू शकले नाही. काँग्रेसने महाराष्ट्र मध्ये ६० वर्ष राज्य केले त्यांनी त्यांच्या किती पायाभूत सुविधा निर्माण झाल्या सांगाव्यात पण मागील दहा वर्षात मोदी सरकारने महाराष्ट्र मध्ये अनेक विकासकामे राबवली आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतसाठी जनतेने महायुतीला साथ द्यावी. काँगेस नेते राहुल गांधी कोणतेही बिनबुडाचे आरोप सातत्याने आदिवासी समाजाबद्दल करत असतात. आदिवासी यांचा सन्मान करण्याचे काम भाजपने प्रथम केले. काँग्रेसला ६० वर्षात बिरसा मुंडा कधी आठवले नाही पण भाजपने त्यांची राष्ट्रीय स्तरावर जयंती सुरू केली. समान नागरी कायदा हा सन १९६४ पासून गोवा राज्यात राबवला जात आहे आणि सर्व समाज योग्यप्रकारे राहत आहे. मालमत्ता ही लग्ना नंतर पुरुष आणि महिला यांच्यात समान वाटप होते.

Bjp कडून प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजारांची लूट: पवन खेरा

भाजपा सरकारमुळे महागाईचा आगडोंब;

बटेंगे तो पॉकेट कटेंगे’ और ‘भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे’!

ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचे कटेंगे बटेंगें, व्होट जिहादचे नारे..

मुंबई, दि. १४ नोव्हेंबर २०२४
भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसून ५०० रुपये किलो तर कांदा १०० रुपया किलो झाला आहे. जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे किचनचे बजेट कोलमडले आहे. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटत आहे आणि जनतेच्या या मुळ मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बटेंगे, कटेंगे, व्होट जिहाद सारखी नारेबाजी केली जात असल्याचा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी केला आहे.
टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना पवन खेरा यांनी भाजपा सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला, ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपाचा गल्लीतील नेतेही जगातील सर्व मुद्द्यांवर प्रवचन देतात पण जनतेला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवर एक शब्दही बोलत नाहीत, हीच भाजपाच्या प्रचाराची दिशा आहे. झारखंडमधील प्रचारात पंतप्रधान मोदींनी घुसखोरी झाल्याचे सांगितले पण देशात तर ११ वर्षांपासून मोदींचेच सरकार आहे मग ही घुसखोरी झालीच कशी? महाराष्ट्राच्या प्रचारातही तेच होत आहे. बटेंगे कटेंगे, एक हें तो सेफ हैं, व्होट जिहाद हेच सुरु आहे. भाजपा जनतेला मुर्ख समजत असेल पण जनतेला भाजपाचा हा डाव चांगलाच माहित आहे. प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटून महिलांना १५०० रुपये दिल्याच्या फुशारक्या मारत आहेत. मोदी व भाजपाने ९० हजार रुपयांच्या लुटीचा हिशाब द्यावा, असे पवन खेरा म्हणाले.
महाविकास आघाडीची पंचसुत्री लागू करण्यासाठी वर्षाला ५ लाख कोटी रुपये लागतील, एवढे पैसे कुठून आणणार या प्रश्नाला उत्तर देताना पवन खेरा म्हणाले की, जनकल्याणकारी योजनांसाठी पैसे कुठून आणणार या प्रश्नाचे उत्तर दोन दिवसापूर्वीच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी दिले आहे. युपीए सरकारने मनरेगा योजना सुरु केली त्यावेळीही भाजपा नेते अरुण जेटली, व सुषमा स्वराज यांनी हाच प्रश्न विचारला होता पण युपीए सरकारने मनरेगा योजना व्यवस्थित राबविली. महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडण्यास आमदाराला ५० खोके देण्यासाठी पैसे असतील तर जनतेला देण्यासाठी पैसे देण्यात काय अडचण आहे? असे पवन खेरा म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विधानसभा निवडणुकासाठी महाराष्ट्राचे मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत उपस्थित होते.

‘पर्वती फर्स्ट’ मुळे मतदारसंघाचा होणार कायापालट! एकत्र येऊ,आपले प्रश्न आपणच सोडवू: आबा बागुल

पुणे . पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी इंजिनिअर,वास्तुविशारद,पर्यावरणतज्ज्ञ,डॉक्टर्स,वकील,शिक्षणतज्ञ,टाउनप्लँनेर,नगरनियोजक,समाजसेवक, उद्योजक आदींसह विविध तज्ज्ञांचा समावेश असलेल्या ‘पर्वती फर्स्ट’च्या माध्यमातून विकासाची ब्लू प्रिंट तयार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेसह आर्थिक स्वावलंबन, सुविधांनाही अग्रक्रमाने प्राधान्य असणार आहे. पहिल्या वर्षांपासून ती अंमलात येणार आहे.त्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. त्यासाठी हिरा निशाणीसमोरील बटन दाबून ‘पर्वती’च्या रखडलेल्या विकासाला गती द्यायची आहे. असे आवाहन अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी केले आहे.
आबा बागुल यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा, मतदारांच्या गाठीभेटीतून पर्वती मतदार संघाच्या विकासासाठी मांडल्या जाणाऱ्या आश्वासक व्हिजनला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या व्हिजनबाबत माहिती देताना आबा बागुल म्हणाले की, पर्वती मतदारसंघाच्या सुनियोजित विकासाला चालना देण्यासाठी ‘पर्वती फर्स्ट’च्या माध्यमातून एक रोडमॅप तयार आहे. त्यानुसार पुणे महापालिका व राज्यसरकारच्या जागा उपलब्ध करून घेतल्या जाईल. या जागांवर लोकोपयोगी प्रकल्पांची उभारणी होणार आहे. त्यासाठी निधी उभारणीबाबतही नियोजन झालेले आहे. शाळा, रुग्णालये, युथ सेंटर आदी विविध प्रकल्पातून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

आज मुबलक पिण्याचे पाणी पुरवता येत नाही,हे दुर्दैव आहे. त्यामुळे मतदारसंघात सर्वत्र समान आणि मुबलक पाणीपुरवठ्यासाठी ‘ऑनलाईन वॉटर डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम’ सारखी योजना निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. वाहतूक कोंडी, वाढत्या प्रदूषणामुळे आज नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. त्यातून मुक्तता करण्यासाठीही ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘एआय ‘तंत्रज्ञानावरील सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा बसवली जाणार आहे. कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहराच्या प्रवेशद्वारातून समजतो. आपल्या ‘पर्वती’ला ४ प्रवेशद्वार आहेत.ते आकर्षक व विविध रंगात साकारणार आहोत. त्यामुळे पर्वती मतदार संघाची प्रतिमा निश्चित उंचविणार आहे. आपले आणि भावी पिढीचे जीवनमान उंचावण्यासाठी आता हीच वेळ आहे, बदल घडवायची. त्यामुळे कुणावरही विसंबून न राहता,एकत्र येऊ आणि आपले प्रश्न आपणच सोडवू यासाठी हिरा निशाणी समोरील बटन दाबून पर्वती मतदार संघाच्या सर्वसमावेशक विकासाला चालना द्यायलाच हवी असेही आबा बागुल म्हणाले.

दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी विशेष मतदान सोयी


पुणे:येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघात यंदा 55 दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतून मतदार चिठ्ठ्या (स्लिप) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे दृष्टिहीन मतदारांना मतदान प्रक्रियेत सुलभता मिळेल. दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी संदीप चौगुले, समन्वयक विनोद हाके आणि सहाय्यक अधिकारी प्रदीप पारखी, प्रविण गायकवाड आणि राजेंद्र तिडके यांनी याबद्दल माहिती दिली.पुढे बोलतांना श्री. हाके म्हणाले की,या मतदारसंघात 960 दिव्यांग मतदार असून, त्यातल्या 16 दिव्यांग मतदारांना आजपासून (13 तारखेसून) घरी जाऊन मतदान घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेणार आहे दिनांक 13 आणि 14 नोव्हेंबरला पहिली भेट नियोजित केलेली आहे आणि पहिल्या भेटीत मतदार उपस्थित नसेल तर दुसरी भेट 15 नोव्हेंबरला नियोजित केलेली आहे आणि इतर दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर येण्यासाठी वाहतूक व्यवस्था केली गेली आहे.तसेच निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली टपाली मतदान कक्षाचे कामकाज नोडल अधिकारी श्रीमती दीपगौरी जोशी आणि श्रीमती किशोरी शिंदे बघत आहेत. मतदारसंघात

85 वर्षांवरील मतदारांची एकूण संख्या 5849 आहे. यापैकी 54 जण घरून मतदान करतील, जे आजपासून सुरु झालेले आहे (13, 14 नोव्हेंबरला पहिली भेट नियोजित केलेले आहे आणि पहिल्या भेटीत मतदार उपस्थित नसेल तर 15 नोव्हेबरला दुसऱ्या भेटीचे नियोजन केलेले आहे )आणि या कामाचे समन्व्यक म्हणून लौकिक दाभाडे काम बघत आहेत.तहसीलदार किरण सुरवसे, नायब तहसीलदार सचिन आखाडे, अंकुश गुरव आणि मनुष्यबळ विभागाचे साहीर सय्यद ह्यांचे सहकार्य यासाठी मिळाले आहे. या सर्व सोयींमुळे दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी मतदान प्रक्रियेत सहजता आणली आहे.

भारत निवडणूक आयोगाने (ECI) एक विशेष टपाल मतपत्रिका सेवा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 40% किंवा त्याहून अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घरबसल्या मतदान करता येते. खडकवासला विधानसभा मतदारसंघात या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

हृदयस्पर्शी उदाहरणे म्हणजे, निवडणूक अधिकाऱ्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्या जेष्ठ अनेक विकारग्रस्त नागरिकांच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांना घरीच मतदानाची संधी दिली. निवडणूक आयोगाच्या या उपक्रमामुळे शारीरिक मर्यादा असतानाही प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार बजावता येईल याची खात्री मिळते.

खडकवासला मतदारसंघात EPIC कार्डनिर्मितीची विशेष मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण

पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदार ओळखपत्र (EPIC) कार्ड निर्मितीसाठी हाती घेण्यात आलेली विशेष मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या महत्त्वपूर्ण मोहिमेत नोडल अधिकारी पराग कश्यपे यांच्यासह प्रमोद धांडे, संदीप सोनावणे, संतोष भोळे, हेमंत पाटील आणि वैभव मोटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. निवडणुकांच्या अनुषंगाने मतदारांना अधिकृत ओळखपत्र वेळेत मिळावे यासाठी या अधिकाऱ्यांनी विशेष कौशल्य व तत्परता दाखवली.
मोहिमेत फॉर्म नं. 6, 7 आणि 8 च्या माध्यमातून विविध अर्जांची प्रक्रिया करण्यात आली. फॉर्म नं. 6 हा नवीन मतदार नोंदणीसाठी वापरला जातो, ज्यामध्ये नव्याने नोंदणी करू इच्छिणारे नागरिक सहभागी होऊ शकतात. फॉर्म नं. 7 हा व्यक्तींची नावे यादीतून वगळण्यासाठी आणि फॉर्म नं. 8 हा मतदारांच्या नाव, पत्ता, किंवा इतर तपशीलात बदल करण्यासाठी वापरला गेला.
प्रत्येक अर्ज सखोल तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जात होता. पर्यवेक्षकांकडे यादी पाठविल्यानंतर त्यांनी योग्य ती छाननी करून पात्रता शेरा दिल्यानंतरच अर्जांची अंतिम मंजुरी देण्यात आली. या प्रक्रियेमुळे EPIC कार्डांचे वेळेत वितरण शक्य झाले, ज्यामुळे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अधिकृत ओळखपत्र मिळाले.
मतदारसंघातील या विशेष मोहिमेत नोडल अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी एकत्रितपणे काम करत मतदारांना उत्कृष्ट सेवा पुरवली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे EPIC कार्डनिर्मिती प्रक्रियेने यश मिळवले असून, आगामी निवडणुकीत मतदारांचा सहभाग अधिकाधिक प्रभावी होणार आहे.

राज्यात पुन्हा महायुती सत्तेत येणार – रामदास आठवले

सिद्धार्थ शिरोळे यांच्या दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि. १४ नोव्हेंबर, २०२४ : महाराष्ट्रात होत असणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. सध्या राज्यात सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारने जनहिताची कामे केली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार राज्यामध्ये सत्तेत येणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी खडकी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी उमेदवार सिद्धार्थ शिरोळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे परशुराम वाडेकर, माजी नगरसेविका सुनीता वाडेकर, माजी नगरसेवक आनंद छाजेड,  महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खडकी बाजार परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरवात झाली. खडकी परिसरात या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यामध्ये तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सध्या सत्तेमध्ये असणारे महायुतीच्या सरकारने जनहिताची कामे केली आहेत, त्यामुळे जनता त्यांच्या प्रेमात आहेत. महाविकास आघाडीवर राज्यातील जनतेचा विश्वास नाही, त्यामुळे निवडणुकीनंतर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेमध्ये येणार असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.

केंद्रात सत्तेमध्ये असणारे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत आहे. त्यामुळे राज्यामध्ये महायुतीला मोठा विजय मिळेल. देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा लौकिक मोठा आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. सिद्धार्थ शिरोळे यांनी आमदार म्हणून केलेल्या कामाचे आठवले यांनी यावेळी कौतुक केले.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण माझ्या प्रचारासाठी इथे आला होतात, तेव्हा मी आमदार म्हणून निवडून आलो होतो. यंदा देखील तुम्ही आलात त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे सांगताना रामदासजी तुम्ही माझ्यासाठी लकी असल्याचे उद्गार सिद्धार्थ शिरोळे यांनी यावेळी काढले.

खडकी छावणी भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रामदास आठवले यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी केलेल्या छोटेखानी भाषणात “पुण्यातील शिवाजीनगरचे नागरिक आहेत भोळे, इथे निवडून येणार आहेत सिद्धार्थ शिरोळे’ अशी चारोळी देखील सादर केली.

सिद्धार्थ भाऊ आहे,  मित्र आहे, सर्वसामान्याचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे तो आपला आहे, अशी भावना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आबांच्या जनसेवेच्या वारशाची शिरोळेंकडून जोपासना – सनी निम्हण

सिद्धार्थ शिरोळे यांना जाहीर पाठिंबा

पुणे, दि. १४ नोव्हेंबर, २०२४ :“माझे वडिल स्व. विनायक (आबा) निम्हण हे छत्रपती शिवाजीनगर  मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार म्हणून लोकप्रिय होते. त्यांच्या कार्यकाळातच या मतदारसंघात नियोजनबद्ध आणि तत्पर विकासाचे एक पर्व सुरु झाले. अभ्यासपूर्ण मांडणी, लोकसहभागाला प्राधान्य आणि शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा या बळावर त्यांनी एक प्रगत मतदारसंघ आकाराला आणला. आबांचा हा जनसेवेचा वारसाच सिद्धार्थ शिरोळे पुढे चालवीत आहेत म्हणून, त्यांना पाठिंबा देत आहे,” अशी भूमिका सनी निम्हण यांनी जाहीर केली. निम्हण यांच्या पाठिंब्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघात शिरोळे यांची ताकद वाढली आहे.

महायुतीच्या कार्यकाळात हा मतदारसंघ भाजपकडे गेला. काळाबरोबर वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सुयोग्य विकासाचे आव्हान उभे राहिले. परंतु गेल्या पाच वर्षांत युवा आणि अभ्यासू आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आबांचा जनसेवेचा वारसा हाती धरत मतदारसंघाचा वेगाने विकास घडवला आहे. केंद्र, राज्य आणि महानगरपालिका अशा तीन सत्ता केंद्राचा उत्तम रितीने वापर करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय साकारला आहे, अशा शब्दांत निम्हण यांनी शिरोळेंचे कौतुक केले.

आज विद्यापीठ चौकात सुरु असलेला डबल डेकर पूल, मेट्रो प्रकल्प, स्मार्टसिटी प्रकल्पातून झालेली रस्त्यांची कामे, मुबलक पाणीपुरवठा अशा योजनांतून शिरोळे केवळ शिवाजीनगरच नव्हे तर अग्रेसर शहर घडविण्यात महत्त्वाचे योगदान देत आहेत. येत्या काळात काही नवे, कल्पक प्रकल्पही ते तडीस नेणार आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देत पुढील वाटचालीसाठी निम्हण यांनी मनापासून शुभेच्छाही दिल्या.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ शिरोळे हे काम करत आहेत. त्यांची मांडणी, नियोजन आणि कार्यपद्धती यातून आबांच्या जनसेवेच्या वारशाचे प्रतिबिंब डोकावते. सक्षम, सुरक्षित आणि सशक्त महाराष्ट्रासाठी शिरोळे यांना येथील जनता बहुमताने पुन्हा विधानसभेत पाठवेल, याची मला खात्री आहे, असेही निम्हण म्हणाले.

समाजात सुसंवाद राखायचा असेल तर क्रीडासंस्कृती वाढीस लागायला हवी – सिद्धार्थ शिरोळे

शिरोळे यांच्या हस्ते चॅम्पियन्स फॉर एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण

पुणे, दि. १४ नोव्हेंबर, २०२४ : पुणे शहरात क्रीडासंस्कृती टिकून ठेवण्यात अनेकांचा मोलाचा वाटा आहे. समाजात सुसंवाद राखायचा असेल तर क्रीडासंस्कृती वाढीस लागायला हवी असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले. पीवायसी हिंदू जिमखाना येथे स्पोर्ट्स व फिटनेस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना शिरोळे यांच्या हस्ते नुकतेच चॅम्पियन्स फॉर एक्सलन्स पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

शिवछत्रपती लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार विजेते, ज्येष्ठ बॉडी बिल्डर डॉ अरुण दाते, विविध क्षेत्रातील खेळाडूंसाठी मानसिक सल्लागार (मेंटल कोच) म्हणून कार्यरत असलेले स्वरूप सवनुर, प्रसिद्ध क्रीडा फिजिओथेरपिस्ट डॉ आनंद गंगवाल, भारतीय फुटबॉल टीमचे माजी व्यवस्थापक मंदार ताम्हाणे, खेळाडू आशिष कसोदेकर, सायकलिस्ट डॉ अविनाश फडणीस, पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातू, ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले बॉक्सर व प्रशिक्षक मनोज पिंगळे, चॅम्पियन्स स्पोर्ट्सचे अमित मदान, आयोजक आनंद पांड्या आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आजही धकाधकीच्या जीवनात खेळासाठी वेळ देण्याचा प्रयत्न मी करतो असतो, असे सांगत सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, खेळाडू यांसोबत वेळ घालवला की एक वेगळीच उर्जा मिळते, म्हणून खेळाविषयी आपुलकी असणाऱ्यांच्या संपर्कात राहायला हवे. समाजातील एकोपा आणि सुसंवाद यामुळे टिकून राहील.” आज पुणे शहरात सर्वच खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेले आणि काम केलेलं, खेळाडू व प्रशिक्षक आहेत ही शहराची संपत्ती असल्याचे शिरोळे यांनी नमूद केले.

या आधी व्यासपीठावर उपस्थितांनी शहरातील खेळाच्या संस्कृतीबद्दल आणि सद्य परिस्थितीबद्दल आपली मते मांडली. शहरात स्पोर्ट्स कम्युनिटी वाढत असली तरी खेळाची संस्कृती रुजायला आणखी थोडा वेळ जावा लागेल असे आशिष कसोदेकर म्हणाले. आज मॅरेथॉनमध्ये धावणारे १० हजार खेळाडू असले तरी त्यांना प्रोत्साहन देणारे मोजकेच दिसतात असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

कोणत्याही क्रीडाप्रकारात यश मिळवायचे असेल तर मानसिक आरोग्य महत्त्वाचे असून याची जाणीव आता पालक आणि पाल्य दोहोंमध्ये वाढत आहे, असे स्वरूप सवनुर यांनी सांगितले. खेळाची संस्कृती वाढीस लागायची असेल तर खेळाडूंना पायाभूत सोयीसुविधा, प्राथमिक प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज मंदार ताम्हाणे यांनी अधोरेखित केली.

मागील २० वर्षांचा विचार केल्यास आज खेळाडूंना पालकांकडून मिळत असलेला पाठींबा हा महत्त्वाचा ठरत असून मागील पाच वर्षात खेळांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या शाळा, विद्यापीठे यांमध्ये होत असलेली वाढ हा सकारात्मक बदल आहे असे अमित मदान यांनी नमूद केले. आज खेळाचा विचार केल्यास पुणे देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये असून नजीकच्या पाच वर्षांमध्ये पहिल्या तीन शहरांमध्ये पुणे स्थान पटकावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खेळामध्ये प्रशिक्षक व फिजिओथेरपिस्टचे महत्त्व डॉ गंगवाल यांनी अधोरेखित केले. रणजीत नातू यांनी बॅडमिंटन खेळाचा प्रवास सांगत काही खेळाडूंच्या कामगिरीने कशा पद्धतीने खेळाला फायदा होऊ शकतो याची उदाहरणे दिली. डॉ फडणीस यांनी खेळातील सातत्य आणि आनंद घेण्याची प्रक्रिया आयुष्यात महत्त्वाची असते असे सांगितले. बॉक्सिंग क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत बॉक्सिंग संघटनांचा अनुभव पिंगळे यांनी विशद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य राठी यांनी केले व आभार मानले.

शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला जनताच जागा दाखवेल – बापूसाहेब पठारे यांचा हल्लाबोल

पुणे- पोर्शे प्रकरणावरून बदनामी करू नये यासाठी वडगाव शेरी चे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना नोटीस पाठवली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरीच्या सभेत याचा खुलासा केला होता. चक्क सुनील टिंगरे यांनी शरद पवारांनाच नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. ही बाब समोर आल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांच्यावर चहुबाजूने टीका होत होती. त्यानंतर आता वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला आता जनताच जागा दाखवेल असे बापू पठारे म्हणाले.

विश्रांतवाडी येथील भाजपच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बापू पठारे हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना बापू पठारे म्हणाले, पात्रता नसतानाही त्यांनी शरद पवारांना नोटीस पाठवली. आता वडगाव शेरीतील नागरिकच त्यांना त्यांची पात्रता दाखवून देतील. शरद पवार ईडीच्या नोटिसीला देखील घाबरले नाहीत. त्यामुळे एखादा चिल्लर आमदार जर त्यांना नोटीस पाठवत असेल तर जनताच त्यांना जागा दाखवेल.

दरम्यान, दरम्यान आमदार सुनील टिंगरे त्यांच्या दादागिरीला परिसरातील नागरिक घाबरले आहेत. कुणीही समोर येऊन बोलण्यास तयार नाही. त्यांच्या या दादागिरीला कंटाळल्याने संपूर्ण टिंगरे कंपनी आणि गाव माझ्यासोबत आहे. रेखा टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात केलाय आणि त्या आता त्यांच्या भागातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळवून देतील. आमदार टिंगरींच्याच भागातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याचं निकालाच्या दिवशी कळेल असेही बापूसाहेब पठारे म्हणाले.

मंगलजींचा ६ टर्म विजय, हे जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे आणि विश्वासाचे प्रतीक – जे. पी. नड्डा

मुंबई : मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि या मतदारसंघाचे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे आज ‘प्रोफेशनल मीट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला.
व्यावसायिक, वकील, डॉक्टर, एमबीए, इंजिनीयर, सीए अश्या विविध पेशातील तसेच निरनिराळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या नागरिकांची भेट घेणे, त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.

या कार्यक्रमात बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे आणि महाराष्ट्रात भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “आज देशाच्या प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे, आणि या योजनांचा प्रत्यक्ष फायदा लाखो कुटुंबांना होत आहे. पूर्वी विभाजनाचे, जातीपातीचे राजकारण होते. आज विकासाचे राजकारण आहे. संपूर्ण जगातील बलाढ्य देशांच्या अर्थव्यवस्था डळमळीत झालेल्या असताना आज भारताची अर्थव्यवस्था स्थिर आणि सक्षम आहे व याची दाखल जगाने घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे दारिद्र्यरेषेखाली असलेल्या लोकांचा टक्का १% पेक्षा कमी झाला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या महत्त्वाच्या योजनांमुळे २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेखालील जीवनातून बाहेर काढण्यात यश आले आहे. ६ कोटी ५३ लाख लोकांना अन्नसहाय्य मिळालं असून, ५५ कोटी लोकांना आयुष्मान भारत योजनेतून आरोग्य विम्याचा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आज ४ कोटी घरांचे निर्माण कार्य झाले आहे. यात महाराष्ट्रात २८ लाख घरे तयार झाली आहेत. आज देशभरात ११ कोटी शौचालयांची निर्मिती झाली, घरामध्ये गॅस आले, गावागावात इंटरनेट मिळाले आणि देश प्रगतीच्या वाटेवर धावू लागला. आज आपल्या देशाच्या प्रगतीला अधिक वेग द्यायचा असेल, आपल्या महाराष्ट्राला अधिक सक्षम करायचे असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आणि भाजपाला मतदान करणं अनिवार्य आहे!”

मलबार हिल मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार लोढा यांच्याबद्दल बोलताना जे पी नड्डा म्हणाले, “आज कोणत्याही मतदारसंघातून ६ वेळा निवडून येणे हे काही सोपे काम नाही. मंगलजींचा विजय हे त्यांना जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे. कौशल्य विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी, मलबार हिलच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकद आपण त्यांच्यावर विश्वास दाखवावा ही विनंती करतो!” यावेळी लोढा यांनी जे पी नड्डा यांचे आभार व्यक्त केले, तसेच उपस्थित नागरिकांचे देखील आभार व्यक्त केले.