पुणे :वडगाव शेरीतील माजी नगरसेविका रेखा टिंगरे व चंद्रकात टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे तसेच ज्येष्ठ नेते प्रकाश(आप्पा )म्हस्के हेही उपस्थित होते.
‘मतदारसंघाच्या विकासासाठी आपण घेतलेल्या प्रवेशाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रवेशाने नक्कीच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला तसेच एकूणच महाविकास आघाडीला बळकटी येईल. तसेच, आगामी विजयाच्या या प्रवासात आपले योगदान मोलाचे ठरेल’, असे उदगार बापूसाहेब पठारे यांनी काढले.
‘एकमताने एकजुटीने विकासाचे ध्येय पूर्ण करूयात’, असे उदगार रेखा टिंगरे यांनी काढले.
माजी नगरसेविका सुनीता साळुंखे,त्यांचे पती अनिल साळुंखे, येरवडा येथील माजी नगरसेवक हनीफ शेख, फरझना शेख, आयुब शेख यांनीही यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे.
येरवडा येथील माजी नगरसेवक हनीफ शेख, फरझाना शेख, आयुब शेख यांनीही पाठींबा दिल्याने दिवसेंदिवस बापूसाहेब पठारे यांची बाजू मजबूत होत चालली आहे.
‘आमदार असतानाच्या काळात बापूसाहेब पठारे यांनी आमच्या परिसरातील विकासकामे केली होती.सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून लक्ष घातले होते.एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर विश्वास असल्यानेच आम्ही पाठिंबा देत आहोत’,असे पाठिंबा देणारे आवर्जून सांगत आहेत.या पाठिंब्याबरोबरच इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारीही बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाला समर्थन देण्यासाठी इच्छुक आहेत. विविध पक्षांतील प्रमुख कार्यकर्ते, समाजसेवक, आणि स्थानिक प्रतिनिधी हे बापूसाहेब पठारे यांच्या उमेदवारीला पाठीशी उभे राहण्यास तयार आहेत. यामुळे महाविकास आघाडीची स्थिती अधिक बळकट होणार असून आगामी निवडणुकीत विजय निश्चित करण्यासाठी एकात्मतेने काम केले जाईल, असे पाठिंबा देणारे आवर्जून सांगत आहेत.
बापूसाहेब पठारे यांनी या सर्व पाठिंब्याबद्दल आभार मानले असून सांगितले की, “विकासकामांच्या खात्री मुळे मला मतदार संघात पाठिंबा वाढत आहे.वाढत्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित आहे, आणि मी माझ्या कार्यक्षेत्राच्या प्रगतीसाठी अथक कार्य करेन.”
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या समर्थनामुळे अधिक सक्रिय झाले असून, विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांना विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
………………………………………………