Home Blog Page 486

महाकुंभमेळ्यातील आरोग्य शिबीराचा जागतिक स्तरावर सन्मान – नागा साधूंच्या मदतीने पार पडलेल्या उपक्रमाला फ्रान्समध्ये पुरस्कार

पुणे-

परमपूज्य नागासाधूंनी नुकतीच नेत्र तपासणीच्या एका विशेष मोहिमेतून लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण केली होती. या मोहिमेसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. परमपूज्य नागा साधूंनी नागा सेंट आय टेस्ट या प्रभावी सार्वजनिक आरोग्य उपक्रमाचा प्रचार केला. या उपक्रमाला कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटीव्हिटी २०२५ या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले. कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी या पुरस्काराच्या आरोग्य आणि कल्याण या श्रेणीत या उपक्रमाला रौप्य सिंह (सिल्व्हर लायन) पुरस्कार मिळाला. हा उपक्रम गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लि.ने आयबेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने राबवला होता. आयबेट्स फाऊंडेशन ही मधुमेह आणि अंधत्वाबाबत जागरुकता निर्माण करणारी नावाजलेली संस्था आहे.
 एका अभ्यासानुसार, सुमारे १० कोटी भारतीयांना मधुमेहाचा आजार जडला आहे. दुर्दैवाने त्यापैकी ६० टक्के लोकांना आपल्याला मधुमेह झाल्याचे ज्ञात नाही. मधुमेहाचे वेळीच निदान झाल्यास लोकांमध्ये अंधत्व टाळता येते. ही बाब लक्षात घेत गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या अंतर्गत काम करणा-या गोदरेज क्रिएटीव्ह लॅब या क्रिएटिव्ह स्टुडिओने नागा सेंट आय टेस्ट ही संकल्पना तयार केली. या मोहिमेच्या माध्यमातून मधुमेहामुळे होणा-या अंधत्वावार मात करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी असा संकल्पना वापरण्यात आला आहेत. ही मोहिम भारतीय संस्कृतीतील संदर्भ अधोरेखित करते.
 या नेत्रतपासणीसाठी नामी युक्तीचा वापर करण्यात आला. नागा साधूंच्या पाठीवर काही अक्षरे लिहिली गेली. त्यांच्या उघड्या पाठीवर देवनागरी लिपीत ठळक हिंदी अक्षरे लिहिली गेली. ही अक्षरे चालते फिरते दृष्टी तपासणी फलक ठरु लागले. आरोग्य अधिका-यांनी नागा साधूंच्या पाठीवरील अक्षरे वाचता न आलेल्या साधूंना मोफत डोळे तपासणी शिबीरात पाठवण्यात आले. ही आरोग्य मोहिम यंदाच्या २०२५ च्या महाकुंभ मेळाव्यात पार पडली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ही नेत्र तपासणी मोहिम आयोजित करण्यात आली होती.
 या उपक्रमाबाबत गोदरेज क्रिएटिव्ह लॅबच्या इनहाऊस क्रिएटीव्ह स्टुडिओच्य ग्लोबल हेड स्वाती भट्टाचार्य यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘गुंतागुंतीच्या मानवी समस्यांवर सोप्पे उपाय अंमलात आणता येतात. ज्यावेळी नागा साधू समाजाने या उपक्रमाला हो म्हटलं त्यावेळीच आमचा विजय झाला. आता या पुरस्कारामुळे आयबेट्स फाऊंडेशनला संपूर्ण जगात ओळख मिळेल. आमच्या कल्पनेने जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक महोत्सवातून जगातील सर्वात मोठ्या क्रिएटिव्ह फेस्टिव्हलपर्यंत प्रवास केला आहे.’’
 आयबेट्स फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. निशांत कुमार यांनीही या आरोग्य मोहिमेबद्दल माहिची दिली. ते म्हणाले, ‘‘ मधुमेहामुळे होणारे अंधत्व टाळता येते. मुळात हा विषय माझ्या हृदयाच्या जवळचा आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि गोदरेज क्रिएटिव्ह लॅबच्या सहयोगातून आम्ही महाकुंभमध्ये जनजागृतीला सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत आणि भावनितदृषट्या प्रभावी पद्धतीने रुपांतरित केले आहे. नागा साधूंनाच नेत्रतपासणी फलक म्हणून वापरल्याने लोकांची कल्पनाशक्ती जागृत झाली. हजारो भाविकांनी संबंधित ठिकाणीच नेत्रतपासणी केली. कान्स फेस्टिव्हलमध्ये सिल्व्हर लायन पुरस्कार मिळणे ही या उपक्रमामागील सर्जनशीलता आणि उद्देशाला मिळालेली मान्यता आहे. ’’ लोकांचे डोळे आणि जीव दोन्ही वाचवणा-या भारतीय कल्पकतेला जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आणले गेल्याबद्दलही डॉ. कुमार यांनी समाधान व्यक्त केले.
महाकुंभ २०२५ मध्ये नागा सेंट आय टेस्ट ही नेत्रतपासणी मोठ्या स्तरावर राबवली गेली. या उपक्रमाद्वारे आयोजकांना ६० कोटी लोकापर्यंत पोहोचता आले. तब्बल ४ लाख लोकांनी डोळ्यांची तपासणी केली. हा उपक्रम कुंभमेळ्यातील आरोग्य सेवा देणारा सर्वात मोठा उपक्रम ठरला.  

महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यांमध्ये महत्त्वाचा मानला जातो. या जागतिक स्तरावरच्या मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यात जीसीपीएल आणि आयबेट्स फाऊंडेशनने अत्यंत महत्त्वाच्या आरोग्यविषयक समस्येला सर्वांसमोर मांडले. परंपरा आणि श्रध्देचा आधार घेत लोकापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलेला हा उपक्रम अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर.

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (MASMA) ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार

पुणे, प्रतिनिधी – द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची ( MASMA )वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले १०० हून अधिक उद्योजक उपस्थित होते. तत्कालीन अध्यक्ष शशिकांत वाकडे यांनी मागील वर्षाच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांचा आढावा सभेसमोर मांडला. कोषाध्यक्ष समीर गांधी यांनी मागील वर्षाचा आर्थिक अहवाल सादर केला, जो सर्व सदस्यांनी एकमताने संमतीने स्वीकारला. अध्यक्ष शशिकांत वाकडे यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. नवीन कार्यकारिणीनुसार यंदा नाशिकचे अमित कुलकर्णी हे अध्यक्षपदी नियुक्त झाले तर कोल्हापूरचे प्रदीप खाडे उपाध्यक्ष, पुण्याचे सहज मुथा सचिव तर कोषाध्यक्ष म्हणून चिन्मय कुलकर्णी यांची नियुक्ती झाली.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अहिल्यनगर, नागपूर इत्यादी भागांतील सदस्यांनी या सभेमध्ये उपस्थित राहून सहभाग नोंदवला. ही वार्षिक सभा अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली, जिथे सर्व सदस्यांनी सहभाग घेत आपला आनंद व्यक्त केला.

मास्माचे संचालक मंडळ समीर गांधी, भर्तेश धूली, राजेंद्र पांचाल, नितीन कुलकर्णी, अक्षय पांचाल, स्वप्नील बाठे, मनीषा बारबिंद, संजय देशमुख, संजय कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी, राजेश मुथा व रोहन उपसनी इत्यादींचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

नविन अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी मास्माच्या भविष्यातील विकासदृष्टीकोणावर भाष्य केले व विविध नवकल्पनांची मांडणी केली. ज्यात या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या महिला उद्योजकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पांडे व अतुल होनोलें यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. या यशस्वी आयोजनामध्ये अतुल होनोलें, नितीन कुलकर्णी, प्रदीप खाडे, धनाजी एकल, अभिजीत विचारे व कोल्हापूर टीममधील सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.

मुस्लिम समाजाकडून राहुल डंबाळे यांना मौलाना आझाद समाज भूषण पुरस्कार प्रदान

पुणे : देशभरातील अल्पसंख्यांक विशेषता मुस्लिमांच्या प्रश्नावर अत्यंत प्रभावी काम करत असल्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांचा पुणे शहर जिल्हा मुस्लिम समाज च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख व माजी नगरसेवक आयुब शेख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक गफूर पाटण, माजी नगरसेवक रईस आबीद शेख, सुंडके, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष हाजी फिरोज शेख, माजी नगरसेविका हिमाली कांबळे, माजी नगरसेवक अविनाश साळवे, बाळासाहेब जानराव, बापूसाहेब भोसले, ज्येष्ठ उद्योजक नजीर तांबोळी, अॅड. अय्युब शेख , माजी नगरसेवक अनिस अनिस सुंडके,  शैंलेद्र चव्हाण , महेंद्र कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, दलित पॅंथरचे यशवंत नडगम, मौलाना हाशमी, सिध्दीक शेख , शहाबुद्दीन शेख ॲड. भाई विवेक चव्हाण ,  मिलिंद आहिरे ,अतुल साळवे , डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, शहाबुद्दीन शेख , सलिम पटेल ,असिफ खान , सिकंदर मुलाणी   आदि  मान्यवर उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमाचे आयोजन जावेद भाई शेख, सलीम पटेल, आसिफ शेख, मुज्जमिल शेख व मिनाज मेमन यांनी केले होते. ढोले पाटील रोड येथील आहार बँक्वेट  हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राहुल डंबाळे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच देशातील धर्मनिरपेक्षता अद्याप टिकून आहे आणि हिंदू मुस्लिम सलोखा कायम आहे असे स्पष्ट मत रशीद शेख यांनी मांडले.  तर धार्मिक ध्रुवीकरणाला कोणत्याही प्रकारे थारा न देता मुस्लिम व अल्पसंख्यांकांची प्रश्न अत्यंत ताकतीन प्रशासनासमोर मांडून त्यांची सोडवणूक करण्याचा यशस्वी प्रयत्न राहुल डंबाळे हे देशभर करत असल्याची बाब वाखण्याजोगी आहे असे मत आयुब यांनी मांडले. 

शहरातील सामाजिक सोलोखा टिकवण्यामध्ये राहुल डंबाळे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मांडले आंबेडकरी विचारांच्या संस्कारामुळेच संविधानातील अल्पसंख्याकांच्या व धर्मनिरपेक्ष तरतुदींची अंमलबजावणी करण्यात कायम आग्रही भूमिका राहुल डांबाळे  यांनी घेतली असून आज मुस्लिम समाजाकडून त्यांना देण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची मोठी पावती असल्याचे मत परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केले. 

जात धर्म भाषा पंथ या सर्वांच्या वर भारताची संस्कृती व भारताचे संविधान आहे त्यामुळे संविधानातील भारत निर्मिती करण्यासाठी आपण सर्वांनीच एकमेकांना साहाय्य करण्याची आवश्यकता असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.

भरतनाट्यम्‌ नृत्यकलेतून साकारलेल्या गीतरामायणाने रसिक मंत्रमुग्ध…

पुणे : गीत-संगीतासह भरतनाट्यम्‌ नृत्याद्वारे साकारलेले रामायणातील विविध रोमांचक प्रसंग रसिकांना खिळवून ठेवणारे ठरले.
निमित्त होते स्वरांगण आणि कलांगण अकादमीतर्फे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने आयोजित आणि नृत्यमनाट्यम आणि त्रिवेणी संगीत विद्यालय, सातारा प्रस्तुत ‘गीत रामायण’ या सुमधुर, सांगीतिक व नृत्यमय प्रस्तुतीचे! टिळक स्मारक मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुस्वर, भावपूर्ण गायन-वादन, नृत्याविष्कार आणि अभ्यासपूर्ण निवेदनाच्या माध्यमातून, भाषाप्रभू ग. दि. माडगूळकर रचित आणि स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले ‘गीतरामायण’ या लोकप्रिय रामकथेच्या दीव्य पद्द्यांचे सादरीकरण करण्यात आले. ग. दि. माडगुळकर यांचे सुपुत्र आनंद माडगुळकर तसेच डॉ. अतुल जोशी, प्रसिद्ध सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, यशवंतराव कुलकर्णी, उदय कुलकर्णी आणि संजय गोसावी यांची विशेष उपस्थित होती.
दशरथ राजाचा परिवार, श्रीराम आणि त्यांच्या बांधवांचा जन्मसोहळा, सीतास्वयंवर, श्रीरामांचे वनवासगमन, सीताहरण, सीतेचा शोध घेण्यासाठी श्रीरामांनी वानरसेनेसह केलेले अथक प्रयत्न, रामसेतूची उभारणी, राम-रावण युद्ध आणि अखेर रावण वध अशा रामायणातील अनेक प्रसंग कलाकारांनी अवघ्या अडीच तासात सादर करून रसिकांसमोर संपूर्ण रामकथा चितारली. यावेळी ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’, ‘दशरथा हे घे पायसदान’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘नकोस नौके परत फिरू’, ‘पराधीन आहे जगती’ यांसारख्या अजरामर गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचेच भान हरपून गेले. शब्द, स्वर आणि नृत्याविष्कार यांचा अनोखा त्रिवेणीसंगम रसिकांनी या कार्यक्रमातून अनुभवला.
कार्यक्रमात एकूण १८ युवा कलाकारांचा सहभाग होता. १० कलाकारांनी नाट्य आणि नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमाची संकल्पना आणि नृत्य दिग्दर्शन तेजस माने यांनी केले होते. चंद्रकांत शिंदे, संतोष वाघ, मिताली लोहार यांनी सुरेल आवाजात गीते सादर केली. राजेंद्र आफळे यांनी सुमधुर वाणीत सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. सुधीर पाध्ये, चैतन्य पटवर्धन (तबला), अथर्व इंगवले (तालवाद्य) तर स्वरा किरपेकर (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. संगीत संयोजन स्वरा किरपेकर यांचे होते.
गीतरामायण हे केवळ काव्य नाही तर ती चळवळ आहे. ही अजरामर कलाकृती असल्यामुळे कवी, निवेदक, संगीतकार यांना आजही गीतरामायणावर आधारित कलाकृती सादर करण्याचा मोह होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. येत्या काळात विविध नृत्यशैलींमध्ये गीतरामायणावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा आनंद माडगूळकर यांनी व्यक्त केली. गीतरामायण हा एकप्रकारचा सागर आहे. त्यात आपण जितके खोल जाऊ तितकी अनमोल रत्ने आपल्याला सापडत जातील, असेही ते म्हणाले.
रसिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन उदय कुलकर्णी, संजय गोसावी, हृषीकेश सबनीस, रमा सबनीस, अश्विन आपटे, रवी नल्ले यांनी केले होते.

मतचोरी लपवण्यासाठीच ४५ दिवसात सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय.

मुख्यमंत्री फडणविसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ, ही मतचोरीच आहे: हर्षवर्धन सपकाळ.

मतचोरीची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा.

मुंबई, दि. २४ जून २५
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुलजी गांधी यांनी सातत्याने या मतचोरीचे प्रकरण लावून धरले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघातील मतांचा घोळ उघड केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढल्याचे उघड झाले आहे. भाजपाची मतचोरी पकडली गेल्याने देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मतदारयादीत अवघ्या ५ महिन्यांत ८% वाढ झाली आहे, काही बूथवर ही वाढ २०-५०% झालेली दिसत आहे. अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे बीएलओंनी नोंदवले आहे पण निवडणूक आयोग मात्र गप्प असून ही मतचोरीच आहे म्हणूनच काँग्रेस पक्षाने मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी केलेली आहे.

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या भाजपा युतीला अवघ्या पाच महिन्यात विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय कसा मिळू शकतो, हाच कळीचा प्रश्न आहे. या पाच महिन्यात भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदारयाद्यात घोळ केला, मतदानाची संख्या वाढवली. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर झालेले मतदान व दुसऱ्या दिवशी जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी यात तब्बल ८ टक्क्यांची तफावत आहे. हे मतदान कसे वाढले, याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत निवडणूक आयोग देऊ शकलेले नाही. उलट आता माहितीच देता येणार नाही असा नियम बनवला तसेच ४५ दिवसानंतर सर्व सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निर्णयही घेतला आहे. हे सर्व मतचोरी लपवण्याचा प्रकार आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे.

बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिला अत्याचार कमी व्होवो”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पांडुरंगाकडे प्रार्थना.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सहकाऱ्यांसह पालखी सोहळ्यात सहभाग.

पुणे/मुंबई, दि. २४ जून २०२५

राज्यातील बळीराजा आज हवालदिल झालेला आहे, अवकाळी पावसाने शेतातील उभं पिक वाया गेलं, शेतमालाला भाव मिळत नाही, त्याचे जगणेच कठीण झाले आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो, महिलांवरील अत्याचार कमी होवो आणि आता विश्वात्मके देवे, ही संकल्पना साकार करण्याच्या अनुषंगाने दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात, अशी प्रार्थना पांडुरंग चरणी करतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज सहभाग घेत सावळ्या विठ्ठलाचे नामस्मरण केले. पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावातून दिंडी क्रमांक २८२ मध्ये सहभागी होत वरवंड गावापर्यंत ते सहकाऱ्यांसह पायी चालले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवादही साधला.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, वारकरी संप्रदायाने समता, बंधुता, सामाजिक न्याय आदी मुल्यांची पेरणी करत समतेचा मोठा संदेश समाजाला देऊन अध्यात्मिक क्रांती घडवली आहे. भारताचा स्वातंत्र्य संग्रामही याच विचाराने प्रभावित होता आणि स्वांतत्र्यानंतर देशाच्या संविधानामध्येही हाच विचार संमिलीत झालेला आहे. पुढे याच विचारावर महाराष्ट्र धर्म स्थापन झाला. आज महाराष्ट्र धर्म वाचवायचा असेल तर वारीत सहभागी होणे, संतसाहित्य, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, हे अनुभवावे यासाठी काँग्रेसजण या पालखीत सहभागी झाले आहेत. देशात समाजवाद व बंधुत्व यांचे संवर्धन व संरक्षण झाले पाहिजे ही आमची अभिलाषा आहे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
या पालखी सोहळ्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, संजय बालगुडे, अजय छाजेड, प्रवक्ते गोपाल तिवारी, प्रकाश सोनावणे, अमर खानापुरे, श्रीरंग बर्गे, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.

वारीच्या सोहळ्यात चोरट्यांच्या टोळ्या पकडून ४३ लाखाचा ऐवज हस्तगत

पुणे- श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळयामध्ये नागरिकांचे मोबाईल व महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने हिसकावुन चोरी करणा-या आंतरराज्यीय व परजिल्हयातील टोळीला पुणे पोलिसांनी पकडून सुमारे ४३ लाखाचा ऐवज हस्तगत केला .

पुणे पोलिसांनी सांगितले कि,’
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सन २०२५ मध्ये वारकरी व नागरिकांची दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दर्शनाचे दरम्यान नागरिकांचे मोबाईल चोरीचे व चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असतात. सदर गुन्हयांना प्रतिबंध होणेकरीता मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर यांनी गुन्हे शाखा युनिट ०५ व युनिट ०६ पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नेमणुक केलेली होती. त्याबाबत वरिष्ठांनी योग्य त्या सुचना दिलेल्या होत्या.
सुचनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ०५ व युनिट ०६ या पथकाने पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण हे त्यांचे स्टाफ सह गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले यांना मिळालेल्या बातमीवरुन अभिलेखावरील महिला आरोपी नामे १) चांदणी शक्ती कांबळे, वय ३२ वर्षे, रा. मौलानी शाळेजवळ, गांधीनगर, उदगीर ता. उदगीर जि. लातुर २) रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे, वय. ३५ वर्षे, रा. अंबिका कॉलनी, चंद्रमा देवी नगर उदगीर, ता. उदगीर, जि. लातुर ३) बबीता सुरज उपाध्ये, वय. ५७ वर्षे, रा. चंद्रमा देवी नगर, उदगीर, ता. उदगीर जि. लातुर ४) पुजा धिरज कांबळे, वय. ३५ वर्षे, रा. भदाडे चौक, गांधीनगर उदगीर, ता. उदगीर जि. लातुर ५) गणेश विलास जाधव, वय. ३० वर्षे, रा. बुशननगर झोपडपट्टी, आण्णासाहेब पाटील शाळेजवळ, सोलापुर मुळ रा.मु.पो. व्यागळी, ता. अक्कलकोट जि. सोलापुर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांचे ताब्यातुन सोन्याचे मिनी गंठण व सोन्याचे मंगळसुत्र असे एकुण १९,४१,३१०/- रु.किं. चे २२.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करणेत आलेले असुन त्यांचेकडुन १) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५९७/२०२५ भा.न्या.सं.क. ३०४ (२) व २) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. २८५/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३ (२) हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
तसेच पालखी सोहळा दरम्यान आरोपी नामे अरबाज नौशाद शेख, वय. १९ वर्षे, रा. महाराजपुर, थाना तलझारी जि. साहेबगंज, झारखंड व एका विधी संघर्षीत बालकास वय १७ वर्षे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास करुन त्यांचे ताब्यातुन ४,५०,०००/- रु. किं.चे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण १४ मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेले असुन त्यांचेकडुन १) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५९५/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३ (२), २) हडपसर गु.र.नं. ५९६/२०५ भा.न्या.सं.क. ३०३ (२), ३) वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २७४/२०२५ भा.न्या.सं.क.३०३(२) असे एकुण तीन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत. उर्वरीत मोबाईलच्या मुळ मालकांचा व सोन्याचे दागिन्यांच्या मुळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. अशा प्रकारे गुन्हे शाखा पथकाकडुन सोन्याचे दागिने व मोबाईल हॅण्डसेट असा एकुण २३,९१,१३०/-रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
पालखी सोहळा दरम्यान ज्या नागरीकांचे मोबाईल हॅण्डसेट किंवा ज्या महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरीस गेलेले आहेत त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन व वानवडी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधणेबाबत पोलीसांकडुन आवाहन करणेत आलेले आहे.
तसेच दि २०/०६/२०२५ रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे शाखेने एकुण २५ संशयितांना ताब्यात घेवुन त्यापैकी १८ संशयितांवर भा.न्या.सं.क. १२८ प्रमाणे कारवाई केली असुन उर्वरित ०७ विधीसंर्षित बालक असल्याने त्यांना संबंधित पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार ,पोलीस सह आयुक्त,, रंजनकुमार शर्मा, ,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, , पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे,, निखिल पिंगळे, ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२ , राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ व युनिट ०६ गुन्हे शाखा, ,कडील पोलीस निरीक्षक , वाहिद पठाण, पोलीस निरीक्षक ,संजय पतंगे, सपोनि मदन कांबळे तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, बाळासाहेब सकटे, अकबर शेख, शेखर काटे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे, निलेश साळवे, सुहास डोगरे, वैशाली इंगळे, ज्योती मुल्का, वैशाली खेडेकर, सारंग दळे, निर्णय लांडे व जावेद शेख यांचे पथकाने केली आहे.

सूक्ष्म सिंचन घटकाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 23: राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रती थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टलवर सूक्ष्म सिंचन घटकाकरिता अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या घटकांकरीता ‘प्रथम अर्ज, प्रथम लाभ’ या तत्त्वावर लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे. सूक्ष्म सिंचन (तुषार व ठिबक सिंचन) घटकाकरीता अनुदान व पूरक अनुदान पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती-अल्प व अत्यल्प भूधारक करीता राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक 55 टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान 25 टक्के, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना पूरक अनुदान 10 टक्के असे एकूण अनुदान 90 टक्के, तर अनुसूचित जातीतील बहु भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक मधून 45 टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान 30 टक्के, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना पूरक अनुदान 15 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

अनुसूचित जमातीतील अल्प व अत्यल्प भूधारक करीता राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक 55 टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान 25 टक्के, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पूरक अनुदान 10 टक्के असे एकूण अनुदान 90 टक्के, तर बहु भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक 45 टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान 30 टक्के, बिरसा मुंडा क्रांती योजना पूरक अनुदान 10 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin वर ऑनलाईन अर्ज करावा, अर्ज करताना शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) असणे आवश्यक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले आहे.

आपले सरकार सेवा संकेतस्थळावर अचूक मोबाईल क्रमांक नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. २४: जिल्ह्यात सेतू, आपले सरकार सेवा केंद्र तसेच ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत नागरिकांना विविध आरटीएस सेवा पुरविल्या जातात, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत पुरविल्या जाणाऱ्या विविध आरटीएस सेवांचा लाभ घेण्याकरिता संकेतस्थळावर अर्ज भरताना अर्जदाराने अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

अर्जदारास त्यांच्या अर्जाची स्थिती (मंजूर, नामंजूर, अर्ज परत पाठविणे) वेळोवेळी लघुसंदेश सेवेच्या माध्यमातून समजते तसेच सेवा वितरणाची पारदर्शकता वाढते. अर्जदारास पुन्हा अर्ज करणे किंवा कार्यालयात भेट देणे टाळता येते. त्यामुळे अर्जदाराने मोबाईल क्रमांकाबाबतची माहिती अर्जाच्या ‘ॲप्लिकेशन डिटेल्स’ विभागात अचूकपणे भरावी. आपले सरकार सेवा केंद्रांनी, पर्यवेक्षीय संस्था, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे, असे आवाहन श्री. डूडी यांनी केले आहे.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाची सायकल वारी उत्साहात!


सलग चौथ्या वर्षी एकाच दिवसात पार केले लोणी-काळभोर ते पंढरपूर अंतर

पुणेः ज्ञानोबा-तुकोबाचा गजर, एकमेकांना माऊली… माऊली या नावाने मारलेली हाक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुलींचा उत्फुर्त प्रतिसाद अशा वातावरणात सलग चौथ्या वर्षी येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे तर्फे सायकल वारी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 

एमआयटी एडीटी विद्यापीठाने सायकल वारीच्या माध्यमातून भक्तिभाव, पर्यावरणाची जाणीव आणि सामाजिक संदेशाचा संगम साधताना लोणी-काळभोर येथून ३५ सायकलस्वारांच्या चमूसह पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करताना अवघ्या एका दिवसात २२० किमीचे हे अंतर पार केले. सायकल स्वारांच्या या चमूने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाने प्रवास करत विद्यापीठात राष्ट्रीय रोइंग प्रशिक्षक संदीप भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारी मोठ्या उत्साहात पूर्ण केली. 
या सायकल वारीला एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या आणि सर्व सहभागी सायकलस्वारांचे अभिनंदन केले.

वारीमध्ये सहभागी सायकलस्वारांनी “नशा मुक्त भारत”, “विश्वशांती” आणि “स्वस्थ जीवनशैली” यांचे संदेश देत, शिस्तबद्धतेसह हेल्मेट, हाय व्हिजिबिलिटी जॅकेट्स, मेडिकल सपोर्ट याची विशेष काळजी घेत ही सायकल वारी सलग चौथ्यांदा निर्विघ्न पार पाडली.

मुसळधार पावसाचा इशारा

पुणे-भारतीय हवामान विभागाने पुढील दाेन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, घाटमाथा, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भ विभागात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात ढगाळ वातावरण राहील. सकाळी काही ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरूशकतो. पण तो अति मुसळधार स्वरूपात पडल्यास शेती तंत्र आणि सिंचन व्यवस्थेत अडथळे येऊ शकतात. मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचे मराठवाड्यामध्ये मंगळवार व बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ राहील आणि दुपारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर बुधवारी मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

भारतीय हवामान विभागानुसार, कोकण विभागात विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पुढील ३–४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. सोमवारी संध्याकाळनंतर काही भागांत ताशी ३०–५० किमी वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.

सोमवारी रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहील. यात कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा आहे. याशिवाय राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस राहणार आहे.

पश्चिम बंगाल व परिसरात हवेची द्रोणीय स्थिती राहणार असल्याने २६ जूनपासून देशाच्या मध्य भागासह महाराष्ट्रातही पाऊस वाढणार आल्याचे हवामान तज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी बांधिलकी असलेले हॉस्पिटल

पुणे दि. २३ जून : ” देशातील सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सेवा परमोधर्म असून समाजातील शेवटच्या मानवापर्यंत ती पोहचवावी. सेवा आणि संस्काराच्या माध्यमातूनच गोरगरीब जनतेची सेवा करावी. या देशात विचार भिन्नता नाही तर विचार शुन्यतेची सर्वात मोठी समस्या आहे ”असे विचार केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
‘रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या ब्रीदाला अनुसरून माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. सरस्वती कराड यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ (एसएसकेएच)चे उद्घाटन फीता कापून केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व राज्यसभेच्या खासदार सौ. मेधा कुलकर्णी, जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड हे असतील.
तसेच, माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.पी.बी.जोशी, एमआयटी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास, सौ. उषा विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, हभप तुळशीराम कराड आणि हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले,”भविष्यातील व्हिजन अत्यंत महत्वाचे असून यामध्ये सरकारच्या भूमिकेबरोबरच समाजाने आता समाजासाठी कार्य करावे. स्वामी विवेकानंद म्हणायचे अंर्तआत्म्याच्या शोध घेतला की देव शोधायला कुठेही जावे लागत नाही. खरा धर्म हा मानवतेचा आहे. आईच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या हॉस्पिटलमुळे परिवारावर झालेले संस्कार कळतात यामुळे गरीब व सामान्य जनतेची सेवा घडेल. ”
” आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने गरीबांसाठी ५ लाख रुपयांपर्यताच्या उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सामाजिक संवेदनशीलता आणि जाणिव ठेऊन नागपूर येथे गरिबांसाठी सर्व वैद्यकीय सेवा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे त्यांचा आशिर्वाद लाभत आहे. आता १ हजार घरांचे स्मार्ट गांव बनविण्यात येत आहे. ५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध घरांमध्ये पाणी आणि विज मोफत मिळणार आहे.”
” भारतीय संस्कृती विश्वशांतीसाठी कार्य करणारी आहे. सध्या जगात ज्या पद्धतीने संघर्ष सुरू आहे. अशावेळेस विश्वशांतीचा संदेश देऊन कल्याणकारी भूमिका भारताची आहे. मानवतेच्या आधारावर विश्वशांती स्थापीत व्हावी. वर्तमानकाळात आर्थीक विकास गरजेचा आहे परंतू साधन संपत्ती बरोबरच अध्यात्म ही महत्वाचे आहे. या देशाला विश्वगुरू बनण्याची ताकत आहे. असे ही नितीन गडकरी म्हणाले. ”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” रुग्ण सेवा करण्याचा पवित्र हेतू ठेऊन हॉस्पिटल माझ्या मातोश्रीच्या नावाने सुरू करण्यात आले आहे. सेवा भाव, समर्पण आणि त्याग या तत्वांच्या आधारे हे कार्य सिद्धीस प्राप्त झाले आहे. कोणतेही कार्य करण्यास आपण केवळ निमित्तमात्र असतो. त्यामुळेच आज जगातील सर्वात मोठा घुमट, बद्रीनाथ येथे सरस्वती मंदिर, स्वर्गारोहणाची निर्मिती करण्यात आली आहे.”
चंद्रकांत पाटील म्हणाले,” रुग्णसेवा ही सर्वात महत्वाची आहे. कोविडच्या काळात संपूर्ण जनतेला आम्ही चांगल्य आरोग्य सेवा पुरविली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नागपूरला लोकसंख्येच्या दृष्टिने आरोग्य सेवा अधिक दिली आहे. त्या पद्धतीची सेवा आता पुण्याला मिळावी. यावरून पुणे शहराची ओळख सर्वदूर होईल.”
गिरीश महाजन म्हणाले,” रुग्ण सेवा व आरोग्य सेवा दिवसेनदिवस वाढतच आहे. अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ लाख रुपयांचा विमा दिला. सीएम कार्यालयातून पत्र दिल्यास २ लाख रुपयांचा चेक दिला जातो. शासन स्तरावर आरोग्य सेवेचे कार्य उत्तम सुरू आहे. अशातच सेवा भावाने सुरू करण्यात आलेले हे हॉस्पिटल सर्व गरीब जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरवतील.”
डॉ. विरेंद्र घैसास यांनी प्रत्येक रुग्णाची काळजीपूर्वक उपचार करून गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पुरविणे, वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून उपचार करणे आणि मानवतेसाठी कार्य करण्याचे सांगितले. डॉ. सुचित्र कराड नागरे यांनी स्वागतपर भाषण करून माईर्स संस्थेने आरोग्य सेवेची मोठी जबाबदारी खांद्यावर टाकली आहे आणि ती पूर्णपणे योग्य रित्या पार पाडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सूत्रसंचालन डॉ. वैशाली कोरडे व डॉ. तुषार खाचणे यांनी आभार मानले.

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल असल्याचे आम आदमी परतीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे .आज पुण्यात छत्रपती शिवाजीनगर मेट्रो समोरील मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, ढोलावर नाचत विजयोत्सव साजरा केला. यावेळेस आप कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर,अमित म्हस्के, किरण कद्रे, अक्षय शिंदे, रविराज काळे, श्रद्धा शेट्टी, शंकर थोरात व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

किर्दत म्हणाले कि,’ आज देशभरातील पाच पोटनिवडणूका चे निकाल जाहीर झाले. त्यातील लक्षवेधी असलेल्या गुजरात मधील विसावदार या जुनागड जिल्ह्यातील मतदार संघामधून आम आदमी पार्टीचे गोपाल इटालिया तब्बल 17581 मतांनी निवडून आले आहेत. तर दुसरीकडे पंजाब मधील लुधियाना या मतदारसंघात आपचे संजीव अरोरा हे १०५४८ मताने निवडून आले आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही ठिकाणी पूर्वीच्या मतांपेक्षा जवळपास दुप्पट मताधिक्य यावेळेस आम आदमी पार्टीस मिळाले आहे. या सर्वच ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढत होती. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या गुजरातमध्ये पूर्वीचे आमदार भाजपाच्या ऑपरेशन लोटस ला बळी पडलेले होते. परंतु तिथेच पुन्हा आपचा उमेदवार निवडून येणे हे जनतेचा आपवरचा विश्वासच अधोरेखित करते. इथे काँग्रेसने आप विरोधात उमेदवार उभा केला होता. पंजाब मध्ये सुद्धा आप च्या उमेदवाराविरुद्ध भाजप आणि काँग्रेस व अकाली दल निवडणूक रिंगणात होते. परंतु तिथे सुद्धा आपने जोरदार लढत देत विजय मिळवला.गुजरातमध्ये भाजपची सत्ता असतानाही आम आदमी पार्टीचा विजय हा लक्षणीय आहे आणि पंजाब मध्ये आप च्या कामावर जनतेच्या समाधानाचे शिक्कामोर्तब झाले आहे.
किर्दत पुढे म्हणाले,’ आम आदमी पार्टी देशातील वेगाने वाढणारा पक्ष असून काँग्रेस आणि भाजपने वेळोवेळी आम आदमी संपली असा दावा केला तरीसुद्धा आम आदमी पार्टी पुन्हा नव्याने उभारी घेताना दिसते आहे.गुजरात मधून विजयी झालेले गोपाल इटालिया हे महाराष्ट्राचे सह प्रभारी आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नव्याने उत्साह संचारला आहे. त्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात निश्चितपणे होईल. स्थानिक पातळीवर काँग्रेस कार्यकर्ते अनेकदा आम आदमी पार्टीला , त्यांच्या कामाला, विचारधारेला पाठिंबा देतात हे सुद्धा या निवडणुकीमध्ये दिसून आले आहे.

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव

डॉ. श्याम गुंडावार, पंडित कैवल्यकुमार गुरव यांची रंगली मैफल

पुणे : शास्त्रीय संगीत हे बंदिस्त संगीत असून ते छोटेखानी मैफलीतून अधिक खुलत जाते. छोट्या मैफली म्हणजे रसिक आणि गायक यांना जोडून ठेवणारा धागा आहेत. छोटेखानी मैफलीतून गाण्याचा आनंद किती मिळतो हे महत्त्वाचे आहे. रसिकांची दाद ही कलाकारांना सुखावते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांनी केले.

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठान व बेडेकर गणपती मंदिर कोथरूड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित प्रभुदेव सरदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त रविवारी बेडेकर गणपती मंदिर, कोथरूड येथे हा संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. विकास कशाळकर, गोविंदराव बेडेकर, शिला देशपांडे, पतंजली मादुस्कर, विदुषी शोभा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी पंडित सुहास व्यास बोलत होते. डॉ. अविनाश जोशी, डॉ. ललित कोसे, आसावरी पद्मवार, मुकुंद दळवी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. कर्नल कल्याणी देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.

निवृत्तीनंतर विदर्भातून पुण्यात आल्यानंतर डॉ. विकास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित सुहास व्यास यांच्या सहकार्याने ‘पंचामृत’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून सांगीतिक समारोह, चर्चासत्र, मैफिलींचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. श्याम गुंडावार यांनी प्रास्ताविकात सांगितली.
पंडित प्रभुदेव यांच्याविषयी आठवणी सांगताना पतंजली मादुस्कर म्हणाले, १९६९ मध्ये त्यांनी सादर केलेला कलावती राग आजही कानात घुमतो. एकदा त्यांचे भजन ऐकून त्याचे नोटेशन लिहून पोस्टकार्ड पाठवले आणि त्यांचे उत्तर आले ‘भेटून शिकवतो’. अशी श्रोता म्हणून ओळख झाली. काम आणि गाणे हे एकत्र करता येते हे त्यांच्याकडे पाहून आम्ही शिकलो.
शास्त्रीय संगीताच्या छोट्या मैफिली व्हायला हव्यात. दाद देणारे कमी झालेत. पण रसिक अजूनही आहेत. अशा मैफिलीत गाणाऱ्याचा कस लागतो, असे डॉ. विकास कशाळकर मनोगतात म्हणाले.

गाणे शांतता मिळावी यासाठी असते; पण ते सादर करताना बेचैनीच अधिक देते. गाण्यासाठी अजून काय करता येईल याचा विचार शांत बसू देत नाही. त्याचे उत्तर पंचामृत या संस्थेच्या स्वरमंचावर मिळते, असे विदुषी शोभा चौधरी कौतुकाने म्हणाल्या.

सत्कार सोहळ्यानंतर डॉ. श्याम गुंडावार आणि पंडित कैवल्यकुमार गुरव यांची मैफिल रंगली. मैफलीची सुरुवात डॉ. श्याम गुंडावार यांच्या गायनाने झाली. सुरुवातीस त्यांनी शामकल्याण रागातील आणि झपतालातील ‘जाने दे री मोहे, श्यामसुंदर’ ही बंदिश सादर केली. तीनतालातील ‘पायल मोरी बाजेरे सजना’, एकतालातील ‘बेला सांज की सुखद सुहावनो’ या बंदिशी सादर केल्या. मैफलीची सांगता माधान गावचे संत गुलाबराव यांच्या ‘हरी हरी पुंडलीक वरदा’ या अभंगाने केली.
प्रसिद्ध गायक पंडील कैवल्य कुमार गुरव यांची मैफल रंगली. त्यांनी भिन्न षड्ज रागातील ‘बलमा लागी तोरी प्रीत’, ‘उड जा रे कागा’, ‘आयोरी बसंत’ या बंदिशी सादर केल्या. त्यानंतर गौड मल्हार रागातील ‘काहे हो पिहरवा आजाहून आये’ आणि ‘फारके मोरी बनिया’ या पारंपारिक बंदिशीचे सादरीकरण केले. ‘विठ्ठल विठ्ठल नामाचीये गजरी, आली वारी पंढरीशी’ या अभंगानंतर ‘अली देखो भोर भई‘ या भैरवीने मैफलीची सांगता केली. अगदी सहज आलाप आणि ताना घेत संपूर्ण सप्तकात फिरत राहिलेले स्वर रसिकांना भावले.
आदित्य जोशी, प्रसाद कुलकर्णी (सहगायन), स्वरूप दिवाण (संवादिनी), प्रणव गुरव (तबला), अबोली सेवेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
कार्यकमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मकरंद वळे यांनी केले.

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित

पिंपरी, पुणे (दि. २३ जून २०२५) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे बाणेर, पुणे आणि अहिल्यानगर सेंटर चे ध्यानधारणा प्रशिक्षक व १८३ विश्वविक्रम करणारे आणि जगभरात १४३ देशात ८५०० पेक्षा अधिक सेंटरमध्ये प्रशिक्षण देणारे पहिले भारतीय ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांचा भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार केल्याबद्दल अमेरिकेतील बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ॲानररी डॅाक्टरेट देऊन गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
गोवा, सी ब्रिज सरोवर पोर्टिको हॅाटेल येथे आयोजित कार्यक्रमात देश, विदेशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नुकताच ॲानररी डॅाक्टरेट देऊन गौरव करण्यात आला.
यापूर्वी ही ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांना देशात व परदेशात विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये लंडन येथील विविध ८ पुरस्कार, ब्रिटिश पार्लमेंट व ऑक्सफर्ड विद्यालयात ही विशेष सन्मानित करण्यात आलेले आहे. दुबई मध्ये विविध ५, बँकॉक येथे ३, नेपाळ येथे २ पुरस्कार आणि रशिया, स्वित्झर्लंड, मलेशिया, श्रीलंकेमध्ये ही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. हरके यांच्या कार्याची दखल मार्च २०२० मध्ये विश्वविख्यात फोर्ब्स मासिकाने देखील घेतली होती.
बी. के. डॉ. दीपक हरके हे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना या संस्थेच्या संपर्कात आले. नंतर त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन या कार्यासाठी समर्पित केले आहे.