Home Blog Page 487

“महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची गरज”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची केंद्र व राज्य शासनाला मागणी

कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्षात यावी, असे मत

मुंबई – मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) या खेळातील एका महिला खेळाडूने क्रीडा महासंघाच्या अध्यक्षावर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपानंतर निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस, रचनात्मक व परिणामकारक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात उच्च न्यायालय, मुंबई यांनी १८ जून २०२५ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात पीडित खेळाडूचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले असून, पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाने संबंधित क्रीडा संस्थांच्या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांच्या भूमिका अत्यंत निष्क्रिय असल्याचे नमूद केले आहे.

या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय क्रीडामंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ना राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी, ना भारतीय ऑलिंपिक संघटनेने पीडित महिला खेळाडूला कोणतीही मानसिक, कायदेशीर अथवा संस्थात्मक मदत दिली आहे.” अशा घटनांमुळे देशातील महिला खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्यांच्या सन्मान व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या व यापूर्वीच्या मेरठ मुरादाबाद, दिल्ली, आसाम, हरियाणा, तामिळनाडू येथील महिला खेळाडूंवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत न्यायालयाने वेळोवेळी दखल घेऊन आदेश दिले आहेत. यावरून सदर विषयाचे गांभीर्य लक्षात येते.

डॉ. गोऱ्हे यांनी या निवेदनाद्वारे काही ठळक मागण्या मांडल्या आहेत. सर्वप्रथम, महाराष्ट्र व देशभरातील सर्व क्रीडा महासंघांचे स्वतंत्र ICC लेखापरीक्षण तातडीने करावे. महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करून त्याचे केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे नियंत्रण करावे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पदाधिकाऱ्यांना निलंबित करून, पीडितेच्या सुरक्षेची सर्व माहिती जाहीर करावी.

तसेच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या Safe Sport धोरणाच्या धर्तीवर भारतात संरक्षण निती लागू केली जावी. POSH (Workplace Sexual Harassment) कायद्यानुसार सर्व राज्यात विशेष प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम राबवले जावेत. खेळाडूंना तातडीने मदत मिळावी यासाठी २४x७ टोल-फ्री हेल्पलाइन कार्यान्वित करून कायदेशीर सल्ला व समुपदेशन सेवा उपलब्ध करून द्यावी.

त्याचप्रमाणे, राष्ट्रीय क्रीडा संचालन विधेयक २०२४ मध्ये महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसंदर्भात स्वतंत्र आणि बंधनकारक तरतुदी समाविष्ट कराव्यात. तसेच, मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशांच्या आधारे संबंधित राज्यातील धोरणांचे अभ्यास करून त्यातील प्रभावी बाबी महाराष्ट्रात लागू कराव्यात. राज्यात स्वतंत्र क्रीडा संचालन विधेयक तयार करून अभ्यास समितीच्या मदतीने व्यापक धोरण निश्चित करावे, अशीही डॉ. गोऱ्हे यांची भूमिका आहे.

“महिला खेळाडूंच्या प्रतिष्ठेचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. कायद्यातील तरतुदी केवळ कागदापुरत्याच राहू नयेत, तर त्यांच्या अंमलबजावणीस कठोरतेने हाताळले जावे,” असे ठाम मत डॉ. गोऱ्हे यांनी मांडले.

“लोकशाहीला मजबुती देणाऱ्या समित्यांचे कार्य अत्यंत मोलाचे!” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

संसद व राज्य विधिमंडळांच्या अंदाज समित्यांचे राष्ट्रीय संमेलन महाराष्ट्र विधान भवनात उत्साहात सुरू

मुंबई, दि. २३ जून २०२५ :
संसद तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळातील अंदाज समित्यांचे राष्ट्रीय संमेलन महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे उत्साहात सुरू आहे. देशभरातून आलेल्या समितीप्रमुख, सदस्य, तसेच मान्यवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा यात सहभाग आहे.

या संमेलनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल आणि महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी मार्गदर्शन केले.

समारोपप्रसंगी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून अंदाज समित्यांचे मूल्यांकनात्मक योगदान अधोरेखित केले. “समित्या म्हणजेच ‘मिनी लेजिस्लेटर्स’ असून, त्या सरकारच्या कामकाजावर काटेकोर देखरेख करत लोकहिताचे रक्षण करतात,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. त्यांनी समित्यांमधील पारदर्शकता, शिस्त व निष्पक्षतेचा आग्रह धरत, नवोदित लोकप्रतिनिधींसाठी या समित्यांचे प्रशिक्षणात्मक महत्त्वही अधोरेखित केले.

तसेच, डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या अनुभवावर आधारित निरीक्षणही मांडले. त्यांनी सांगितले की, “मी जेव्हा अंदाज समितीत काम केलं, तेव्हा अर्जुन खोतकर हेच अध्यक्ष होते. त्या काळात जलसिंचन योजनांवरील साक्ष घेत असताना जाणवलं की, कमी अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे मोठे प्रश्न निर्माण झाले होते. जबाबदार अधिकाऱ्यांना अनेकदा बोलावूनही, ते स्वतः येत नसत, दुसऱ्यांना पाठवत. तीन-चार वेळा तारीख बदलूनही जे अधिकारी प्रत्यक्ष दोषी होते, ते फक्त सेवानिवृत्तीनंतरच समितीसमोर आले. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की आपण आमदार-खासदार म्हणून कितीही सजग असलो, तरी काही अधिकारी हे आपल्याहूनही जास्त ‘हुशार’ असतात!”

कार्यक्रमाच्या समारोपात लोकशाहीच्या मजबुतीसाठी अंदाज समित्यांनी अधिक सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

याच अनुषंगाने, समित्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करणारी डॉ. गोऱ्हे यांची कविता उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून गेली:

समितियां…
सत्ता के गलियारों में मिलती हैं आवाज़
जहाँ बनती हैं योजनाएँ, बनते हैं राज़।
समितियाँ जुटतीं, बुद्धि से भरी,
सही राह दिखाए यही उनकी जिम्मेदारी।

एक सोच से नहीं सुलझती हर बात,
छोटी से छोटी भूल भी रह जाती है साथ।
पर कई मन मिलकर जब सोचते हैं,
जन-इच्छा का सम्मान वे सच्चे दिल से करते हैं।

हर पहलू को वे ध्यान से परखते हैं,
खुले दिल-दिमाग से हर बात समझते हैं।
सामूहिक बुद्धि से आगे बढ़ते हैं,
न्याय की किरण में समाज को सजाते हैं।

आओ करें इन समितीयों का सम्मान,
सोच को रखते हैं वे निष्पक्ष और महान।
हर सदन में इनका हो विवेकी स्थान,
लोकतंत्र की आत्मा हैं ये, और यही पहचान।
**

‘डिव्हाईन कॉन्फ्लुएन्स २०२५’ भारतीय,आशियाई कलांचा भव्य संगम !

मनीषा नृत्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन*
पुणे :भारतीय शास्त्रीय आणि आशियाई पारंपरिक कलांचा मोहक संगम असणाऱ्या ‘डिव्हाईन कॉन्फ्लुएन्स २०२५’ या मनीषा नृत्यालय आयोजित कार्यक्रमाला गणेश कला क्रीडा मंच  येथे चांगला प्रतिसाद मिळाला.या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नृत्यगुरु पं.मनीषा साठे यांच्या मनीषा नृत्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आले होते. कथक नृत्याच्या प्रशिक्षण व प्रसार क्षेत्रात या संस्थेने दिलेल्या पाच दशकांहून अधिक योगदानाचा गौरव या निमित्ताने करण्यात आला.

या वेळी कोरियन फॅन डान्स, ड्रॅगन डान्स, हेवन लेडी आणि चायनीज स्टिक डान्स यांसारख्या आशियाई पारंपरिक नृत्यप्रकारांनी रसिक भारावले. आशियातील विविध संस्कृतींच्या रंगांची उधळण करत कार्यक्रमाने सीमोलंघन केले. खास या  सोहळ्यासाठी जपानहून भारतात दाखल झालेल्या  ताकिमोतो यांची कन्या हागोरोमो ताकिमोतो हिने ‘ओ दायको’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जपानी ड्रमचे एकल वादन अतिशय लीलया केले. तिच्या वादनातील जोश,वेग आणि सहजता पाहून प्रेक्षक स्तिमित झाले.कार्यक्रमातील  आकर्षण ठरले ‘नृत्यधारा’ हे भावस्पर्शी कथक सादरीकरण. यामध्ये गुरु मनीषा साठे,त्यांची कन्या शांभवी दांडेकर,सून तेजस्विनी साठे आणि नात सर्वेश्वरी साठे व आलापी जोग-अशा तीन पिढ्यांतील पाच नृत्यांगनांनी एकत्र सादरीकरण करत पारंपरिकतेचा आणि कौटुंबिक वारशाचा अनोखा संगम प्रेक्षकांसमोर मांडला.

या कार्यक्रमासाठी  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,ज्येष्ठ नृत्यांगना डॉ.सुचेता भिडे-चापेकर,शमा भाटे,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश  उपाध्यक्ष  राजेश पांडे ,भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी  हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते. मंचावर त्यांचा सन्मान केला गेला.नृत्य गुरु पं. मनीषा साठे यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या,’ सर्जनशीलता , परंपरा आणि नवतेचा मेळ साधणारी प्रतिभा पुढे आली पाहिजे .  दोन  वेगळ्या देशातील कलांचा संगम साधताना त्यामागे कमालीची मेहनत आणि कलाकाराने घेतलेला उत्तमाचा ध्यास  असतो’.  यापुढील काळात हे मोठमोठे जपानी ड्रम्स सुरक्षितपणे ठेवता यावेत म्हणून जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे असे आवाहन मनीषा साठे यांनी या प्रसंगी केले. हजारो उपस्थितांपैकी दिलदार व्यक्ती नक्की अशी जागा देऊ करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सूत्रसंचालन  स्वानंद पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमासाठी पुण्यातून आणि पुण्याबाहेरून अनेक  नर्तक आवर्जून उपस्थित राहिले होते.

‘डिव्हाईन कॉन्फ्लुएन्स २०२५ :एक अभूतपूर्व कलाविष्कार !

१९९१ सालापासून गुरु मनीषा साठे या  जपानी संगीतज्ञ  यासुहितो ताकिमोतो यांच्यासह जपानी आणि भारतीय संगीतक्षेत्रात उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत, ज्याचा रसास्वाद जपानी, भारतीय आणि जगभरातील प्रेक्षकांनी वेळोवेळी अनेक दिमाखदार सोहळ्यांमधून घेतलेला आहे.

‘डिव्हाईन कॉन्फ्लुएन्स २०२५’ कार्यक्रमाची सुरुवात पं. मनीषा साठे, त्यांची कन्या शांभवी दांडेकर, स्नुषा तेजस्विनी साठे, नात सर्वेश्वरी साठे आणि आलापी जोग यांच्या त्रिदेववंदनेने झाली आणि वातावरण मंगलमय झाले.हागोरोमो ताकिमोतो हिने ‘ओ दायको’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जपानी ड्रमचे एकल वादन अतिशय लीलया केले. तिच्या वादनातील जोश, वेग आणि सहजता पाहून प्रेक्षक स्तिमित झाले. त्यानंतर आडा चौताल हा अनवट ताल गुरु मनीषा साठे आणि कलावतींनी तायको वादनाच्या साथीवर प्रस्तुत केला. आश्चर्य म्हणजे जपानी तायको ड्रमचे वादनही मनीषाताईंच्या शिष्या अदिती कुलकर्णी आणि प्राजक्ता द्रविड या करत होत्या. तालाचे बारकावे, रचनांचे सौंदर्य हे नृत्यातून आणि वादनातून तितक्याच प्रभावीपणे प्रकट होत होते त्यामुळे ही अप्रतिम प्रस्तुती संपूच नये अशीच प्रेक्षकांची भावना होती !

जपानी किमोनो परिधान केलेल्या युवती जेव्हा कोरियन फॅन्स  घेऊन मंचावर अवतरल्या तेव्हा त्यांच्या नृत्य लालित्याने रसिकांना जिंकून घेतले.त्यानंतर विविध प्रकारचे जपानी ड्रम्स एकाच वेळी मंचावर स्थानापन्न करण्यात आले आणि त्या प्रत्येकाची खासियत मनावर कोरली जाईल असे बहारदार वादन मनीषाताईंच्या शिष्यांनी केले. मिथिला भिडे हिने मनीषा ताईंच्या मार्गदर्शनाखाली ह्या संरचनेचे दिग्दर्शन केले होते. क्युबिकल  तायकोसेट मध्ये एकावेळी १२ तायकोंचे वादन करणे, त्यातील अवधान आणि डौल सांभाळणे, हे आव्हान वादकांनी उत्तम पेलले. उभ्या आणि आडव्या दिशेतील ड्रम्सचे वादन केवळ श्रवणीय नाही तर अत्यंत प्रेक्षणीयही होते.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धाची सुरुवात ‘संयुज’ या  रचनेने झाली. त्याचे वैशिष्ट्य असे की फ्रेंच संगीतकार रावेल याच्या ‘बोलेरो’ या  रचनेला भारतीय संगीत साज चढवून कथक नृत्यांगनांनी तो सादर केला.संरचना अर्थातच गुरु मनीषा साठे यांची होती. कलासंगमाची ही छटा फारच सुंदर भासली.त्यानंतरच्या रचनेत सतारीच्या संगीताला जपानी संगीताची जोड देऊन त्यावर केलेले तायको ड्रमचे वादन तर केवळ लाजवाब झाले. ही रचना,कथक नर्तिका थेट जपानला जाऊन ताकिमोतो यांच्याकडून प्रत्यक्ष शिकून आल्या होत्या.जपान देशात देवतेचे स्थान असलेला ड्रॅगन आणि मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या हिवन लेडी चे नृत्य नेत्रदीपक होते. रंगीबेरंगी लांबसडक स्कार्फ  च्या, नृत्यातून उमटणाऱ्या चित्राकृती जितक्या मोहक तितक्याच कौशल्यपूर्ण होत्या.तेजस्विनी साठे यांनी आपल्या ‘टॅन्झ अकॅडमी ‘च्या शिष्यांसमवेत सादर केलेला ‘त्रिवट’ म्हणजे दर्जेदार संगीत, रेखीव नृत्यसंरचना म्हणजे रंगमंचीय अवकाशाला जिवंत करणारी ऊर्जा यांचे प्रतीक!

कार्यक्रमाची सांगता ‘मेलांज’ या आगळ्या रचनेने झाली. कथकची देहबोली प्रतिबिंबित करणारे डौलदार तायको वादन आणि ड्रम्सच्या गगनभेदी ध्वनीला पूरक असे जोशपूर्ण नर्तन यामुळे ही मैफल रंगली.त्यातही प्रस्तुतीचा कळस गाठला तो स्वतः गुरु मनीषा साठे यांनी केलेल्या तायको वादनाने!रसिकांनी भरभरून दिलेली दाद ही त्यांना दिलेली मानवंदनाच होती.

भारतातील सुरक्षा उपायांसाठी गोदरेज हा पसंतीचा ब्रँड

पुणे , 23 जून 2025 : गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाने FY25 मध्ये चांगली कामगिरी केली, 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवलाज्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत भारतातील सर्वात विश्वासार्ह नावांपैकी एक म्हणून त्याचे स्थान अधिक भक्कम झाले. भारतातील जलद-परिवर्तनशील शहरी आणि अर्ध-शहरी मार्केटमधील वाढत्या मागणीमुळेजिथे सुरक्षेच्या गरजा अधिकाधिक अत्याधुनिक होत आहेतत्यांच्याकडून वाढत्या मागणीमुळे, FY26 मध्ये 15% व्यवसाय वाढीचे लक्ष्य ठेवत आहे. नवोपक्रमतंत्रज्ञान एकत्रीकरण आणि ग्राहक-केंद्रिततेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्यवसायाद्वारे ही वाढ केली जाईल.

आधुनिक भारतीय ग्राहक आता केवळ सुरक्षा उत्पादनांचा खरेदीदार राहिलेला नाही तर तो डिझाइनप्रति जागरूक घरमालकतंत्रज्ञान-जाणकार पालकनिर्णय घेणाऱ्या महिला आणि विश्वास तसेच पारदर्शकता शोधणारा व्यवसाय मालक आहे. बदलणाऱ्या परिस्थितीनुसार बदल करणेत्यांच्या जीवनात केवळ संरक्षणच नाही तर अखंडपणे एकत्रित करणारे सुरक्षा उपाय तयार करणे यावर गोदरेजचा दृष्टिकोन आधारित आहे.

या दृष्टिकोनावर आधारित, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाचे व्यवसाय प्रमुख श्री. पुष्कर गोखले म्हणाले, आज ग्राहकांना फक्त सुरक्षितता नकोयतर त्यांना त्यांच्या जीवनाशी जुळवून घेणारे स्मार्टअखंड आणि विश्वासार्ह सुरक्षा उपाय हवे आहेत. सुरक्षेच्या पलीकडे जाऊन विश्वाससुविधा आणि मनःशांती निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाने व्यक्ती आणि संस्थांना सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. FY25 ची कामगिरी केवळ आमच्या इनोव्हेशन इंजिनलाच नव्हे तर महत्त्वाच्या विभागांमध्ये आम्ही मिळवलेला खोल विश्वास देखील प्रतिबिंबित करतो. FY26 मध्ये प्रवेश करतानाप्रत्येक सुरक्षा टचपॉइंटमध्ये बुद्धिमत्ताअनुपालन आणि सहजता अंतर्भूत करण्याकडे आमचे लक्ष्य असेल.”

ग्राहक आणि व्यवसायांच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण करणाऱ्या प्रमुख उत्पादन नवकल्पनांनी गोदरेजचे FY25 चे यश चिन्हांकित केले. भारतातील पहिली स्वदेशी फॉगिंग सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्टफॉगच्या लाँचिंगमुळे चोरी रोखण्यासाठी रिअल टाइममध्ये सक्रिय प्रतिबंधक तंत्रज्ञान सादर करण्यात आले. डिफेंडर ऑरम प्रो रॉयल ही दागिने उद्योगासाठी तयार केलेली बीआयएस-प्रमाणित मेकॅनिकल सेफने अनुपालन-चलित ऑफरिंगमध्ये गोदरेजचे नेतृत्व बळकट केले. दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी अत्याधुनिक चाचणी मशीन अ‍ॅक्यूगोल्डने किरकोळ विक्रेत्यांना पारदर्शकता आणि गती दिली. यासोबतच त्यांनी आधुनिक भारतीय ग्राहकांच्या डिझाइन प्रणित नवोपक्रमांची मागणी लक्षात घेत त्यांच्या होम लॉकर्स पोर्टफोलिओचा विस्तार देखील केला. मोबाइल-सक्षम, रिअल-टाइम देखरेख क्षमतांसाठी ग्राहकांच्या वाढत्या पसंतीला प्रतिसाद देत, गोदरेजने क्लाउड-आधारित लक्ष ठेवण्याच्या प्रणालींमध्ये देखील विस्तार केला.

केवळ उत्पादन नवोन्मेष एवढेच ब्रँडचे धोरण नाही तर ते मानव-केंद्रित देखील आहे. उदाहरणार्थ, आता अनेक महिला घराच्या सुरक्षिततेचे निर्णय घेतात. आणि त्यांच्या सुरक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी गोदरेजने त्यांच्या ऑफरिंग्ज आवाक्यातील आणि सुंदर बनवल्या आहेत. यामुळे त्या सोयीच्या तर ठरतातच आणि त्याने मनःशांती देखील मिळते. फिंगरप्रिंटने उघडणारे स्मार्ट लॉकर्स असोत किंवा स्मार्ट होम कॅमेरे असोत, गोदरेज महत्त्वाच्या लोकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींची सुरक्षा करतो.

हुमायूनची कबर, नया रायपूरमधील सीएम हाऊस, आयआयएम जम्मू, विविध विमानतळांचे प्रकल्पांची सुरक्षा करून प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये देखील योगदान दिले आणि उच्च-मूल्याच्या पायाभूत सुविधांसाठी सुरक्षित वातावरण प्रदान करण्याची आपली क्षमता अधोरेखित केली. या यशस्वी प्रोजेक्ट्सना चॅनेल भागीदारांचे देशव्यापी नेटवर्क, ग्राहक केंद्रांचे अधिक डिजिटलायझेशन आणि विशेषतः बीएफएसआय, दागिने आणि किरकोळ क्षेत्रातील बीआयएस-प्रमाणित आणि उच्च-तंत्रज्ञान सुरक्षा ऑफरच्या महत्त्वासंबंधीच्या जनजागृती मोहिमांचा मोठा वाटा होता.

स्मार्ट शहरेएआय-नेतृत्वाखालील प्रणाली आणि डेटा-चालित जीवनशैली भारत स्वीकारत असतानासुरक्षेचे भविष्य घडवण्यासाठी गोदरेज महत्त्वाच्या स्थानी आहे. विश्वासाचा वारसासंशोधन आणि विकासात सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि ग्राहक-प्रथम दृष्टिकोन यामुळेहा व्यवसाय संस्था आणि व्यक्तींसाठी नवीन मूल्ये तयार करत आहे ज्यामुळे त्यांच्या केवळ मालमत्तेचेच नव्हे तर महत्त्वाकांक्षांचे संरक्षण होते आहे.

गुजरातमधील विसावदर, पंजाबमधील लुधियाना येथे ‘आप’चा,केरळमध्ये काँग्रेसचा विजय,काडी मतदारसंघातून भाजप विजयी

चार राज्यांमधील ५ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. गुजरातमधील विसावदरमधून आपचे गोपाल इटालिया विजयी झाले. भाजपच्या कीर्ती पटेल दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.पंजाबचा लुधियाना पश्चिम ‘आप’च्या खात्यात गेला, येथे संजीव अरोरा जिंकले. काँग्रेसचे भारत भूषण आसू दुसऱ्या क्रमांकावर राहिले.गुजरातमधील काडी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राजेंद्र चावडा विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे रमेश चावडा यांचा पराभव केला.

केरळमध्ये काँग्रेसचे यूडीएफ उमेदवार आर्यदान शौकत विजयी झाले. त्यांनी सीपीआयएमच्या एम. स्वराज यांचा पराभव केला.

पश्चिम बंगालमधील कालीगंज मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार अलिफा अहमद यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या आशिष घोष यांचा पराभव केला. या पाचही जागांसाठी १९ जून रोजी मतदान झाले.

दरम्यान, कालीगंज जागेसाठी सुरू असलेल्या मतमोजणीच्या वेळी कृष्णानगर पोलिस स्टेशन हद्दीतील बाराचंदनगर परिसरात स्फोट झाला. या घटनेत एका ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुलीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले – पोलिस दोषींवर कायदेशीर कारवाई करतील.

पंजाबमधील लुधियाना पश्चिम आम आदमी पक्षाकडे (आप) होते. ‘आप’ने लुधियाना पश्चिममधून राज्यसभेचे खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली आहे. जर अरोरा आमदार झाले, तर त्यांना राज्यसभेची जागा सोडावी लागेल, त्यामुळे ही जागा रिक्त होईल. पंजाबमधून ‘आप’ अरविंद केजरीवाल यांना राज्यसभेवर पाठवू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

पोटनिवडणुका असलेल्या राज्यांमध्ये सध्याची सरकारची स्थिती
गुजरात: येथे भाजप सत्तेत आहे. भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री आहेत. एकूण विधानसभेच्या जागा १८२ आहेत. भाजपकडे १६१, काँग्रेसकडे १२ आणि आपकडे चार आहेत. तर एक जागा समाजवादी पक्षाकडे आणि दोन अपक्षांकडे आहे.

पश्चिम बंगाल: राज्यात तृणमूल काँग्रेस सत्तेत आहे. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. एकूण विधानसभेच्या जागा २९४ आहेत. तृणमूल काँग्रेसकडे २१५ आमदार आहेत. भाजपकडे ७७ जागा आहेत. काँग्रेसकडे एकही आमदार नाही.

पंजाब: येथे आम आदमी पक्ष (आप) सत्तेत आहे. भगवंत मान मुख्यमंत्री आहेत. एकूण विधानसभेच्या जागा ११७ आहेत. आपकडे ९१ जागा आहेत. काँग्रेसकडे १८ जागा आहेत, शिरोमणी अकाली दलाकडे (एसएडी) ३ जागा आहेत, बसपाकडे १ आणि भाजपकडे २ जागा आहेत. एक आमदार अपक्ष आहे.

केरळ: येथे डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) सत्तेत आहे. पिनराई विजयन मुख्यमंत्री आहेत. विधानसभेच्या एकूण जागा १४० आहेत. एलडीएफकडे ९८ जागा आहेत. युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ)कडे ४१ जागा आहेत.

इस्रायलचा इराणवर पुन्हा हल्ला, शेकडो सैनिक मारल्याचा दावा

खामेनींनी पुतिनकडे मागितली मदत; सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला

सोमवारी दुपारी इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील इराणी लष्करी युनिट इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या तळांवर हल्ला केला. यामध्ये शेकडो सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात आहे.इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी एविन जेल, इस्रायल डिस्ट्रक्शन क्लॉक, आयआरजीसीचे बासीज फोर्स मुख्यालय आणि तेहरानमधील अंतर्गत सुरक्षा मुख्यालयांना लक्ष्य केले.

यापूर्वी इस्रायलने इराणच्या फोर्डो अणुस्थळावर हल्ला केला होता. इराणच्या तस्निम न्यूज एजन्सीने म्हटले आहे की हा हल्ला त्याच ठिकाणी करण्यात आला जिथे रविवारी अमेरिकेने बस्टर बॉम्ब टाकले होते.

इस्रायलने इराणच्या 6 विमानतळांवर ड्रोन हल्ले देखील केले – मशहद, तेहरान, हमादान, देझफुल, शाहिद बख्तियारी आणि तबरीझ. यामध्ये इराणची 15 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, इराणचे उपपरराष्ट्रमंत्री माजिद तख्त रवंची म्हणाले की इराण आपला अणुकार्यक्रम थांबवणार नाही. इराणच्या मिलिटरी सेंट्रल कमांडचे प्रवक्ते इब्राहिम झोल्फाघारी म्हणाले, ‘जुगारी ट्रम्प, तुम्ही युद्ध सुरू केले असेल, पण आम्ही ते संपवू.’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील सत्तापालटाच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते सोशल मीडियावर म्हणाले- जर सध्याचे इराणी सरकार ‘इराणला पुन्हा महान’ बनवू शकत नसेल, तर सत्ता परिवर्तन का होऊ नये? मेक इराण ग्रेट अगेन.

अमेरिकेने काल इराणमधील ३ अणु तळांवर हल्ला करून युद्धात प्रवेश केला. हे तळ फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान होते. या कारवाईत ७ बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सनी भाग घेतला, ज्यांनी इराणच्या फोर्डो आणि नतान्झ अणु तळांवर १३,६०८ किलो वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब टाकले.

पेट्रोल 120 रुपये लिटरपर्यंत पोहोचू शकते:कारण- इराण तेल पुरवठ्याचा सर्वात मोठा मार्ग बंद करू शकतो, कच्चे तेल $80 वर पोहोचले

0

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणच्या संसदेने अलीकडेच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा ठराव मंजूर केला आहे. जर होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली तर त्याचा भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. कारण तेल व्यापारासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

ही बातमी समोर आल्यानंतर, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे $80 पर्यंत वाढली आहे. भारत आपल्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग आयात करतो. जर कच्च्या तेलाची किंमत दीर्घकाळ वाढत राहिली तर तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवाव्या लागू शकतात.
होर्मुझची सामुद्रधुनी हा एक अरुंद सागरी मार्ग आहे जो पर्शियन आखाताला ओमानच्या आखात आणि अरबी समुद्राशी जोडतो. तो फक्त ३३ किलोमीटर रुंद आहे, परंतु जगातील २०-२५% कच्चे तेल आणि २५% नैसर्गिक वायू या मार्गाने जातो.

सौदी अरेबिया, इराक, कुवेत, कतार सारख्या देशांमधील तेल टँकर या मार्गाने जगाच्या इतर भागात जातात. हा मार्ग भारतासाठी खास आहे कारण आपल्या ४०% पेक्षा जास्त तेल या मार्गाने येते. जर हे बंद झाले तर तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो.इराण आणि इस्रायलमध्ये आधीच तणाव वाढत होता. २२ जून रोजी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर – नतान्झ, फोर्डो आणि इस्फहान – हवाई हल्ले केले. यामुळे संतप्त होऊन इराणच्या संसदेने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा ठराव मंजूर केला.

तथापि, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची मान्यता आवश्यक आहे. इराणचे म्हणणे आहे की जर त्यांना आणखी त्रास दिला गेला तर ते हा मार्ग बंद करून जागतिक तेल पुरवठा विस्कळीत करू शकतात.
जर हा मार्ग बंद झाला तर तेलाच्या पुरवठ्यात समस्या निर्माण होईल. तज्ञांचा असा विश्वास आहे की कच्च्या तेलाच्या किमती ३०-५०% वाढू शकतात. सध्या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे $८० आहे, परंतु ती $१२०-१५० पर्यंत जाऊ शकते. याचा भारतावरही परिणाम होऊ शकतो:पेट्रोल आणि डिझेल महाग: तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. पेट्रोल १२० रुपये प्रति लिटर किंवा त्याहून अधिक किंमतीपर्यंत पोहोचू शकते असे मानले जात आहे.
महागाई वाढेल: पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यामुळे वाहतूक खर्च वाढेल, ज्यामुळे अन्नपदार्थ, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू देखील महाग होतील.
भारत तेलासाठी पूर्णपणे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून नाही, अलिकडच्या काळात भारताने आपल्या तेल पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात विविधता आणली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या मते, भारत दररोज ५.५ दशलक्ष बॅरल तेल वापरतो, त्यापैकी फक्त १.५-२ दशलक्ष बॅरल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतात. उर्वरित ४ दशलक्ष बॅरल रशिया, अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि ब्राझील सारख्या देशांमधून येतात. जून २०२५ मध्ये भारताने रशियाकडून दररोज २.१६ दशलक्ष बॅरल तेल आयात केले.

२०१९ नंतर अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यामुळे भारताने इराणमधून तेल आयात करणे जवळजवळ बंद केले आहे. परंतु इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवेत सारख्या देशांमधून ४०% तेल या मार्गाने येते. जर सामुद्रधुनी बंद झाली तर केप ऑफ गुड होप सारख्या पर्यायी मार्गांनी तेल आणावे लागेल, ज्यासाठी ७-१३ दिवस जास्त लागतात आणि प्रत्येक ट्रिपसाठी अतिरिक्त $१ दशलक्ष खर्च येईल.

या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकार या मुद्द्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. हरदीप सिंग पुरी यांनी आश्वासन दिले आहे की भारतात अनेक आठवड्यांसाठी तेलाचे साठे आहेत आणि तेल कंपन्या अनेक मार्गांनी पुरवठा करत आहेत. ते म्हणाले- “आम्ही गेल्या दोन आठवड्यांपासून मध्य पूर्वेतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, तेल पुरवठ्यात विविधता आणली आहे आणि आता तेलाचा मोठा भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत नाही. आमच्या तेल कंपन्यांकडे अनेक आठवड्यांचा साठा आहे आणि नागरिकांना इंधनाचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करू.असे सरकरी सूत्रे सांगत आहेत

धोरणात्मक साठे: भारताकडे पुडूर (२.२५ दशलक्ष मेट्रिक टन), विशाखापट्टणम (१.३३ दशलक्ष मेट्रिक टन) आणि मंगळुरू (१.५ दशलक्ष मेट्रिक टन) येथे धोरणात्मक तेलाचे साठे आहेत.

होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणे इतके सोपे नाही, ते पूर्णपणे बंद करणे सोपे नाही. सामुद्रधुनीत दोन मैलांचे शिपिंग लेन आहेत आणि ते बंद करण्यासाठी इराणला मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई करावी लागेल, जसे की टँकरवर हल्ला करणे किंवा समुद्रात सुरुंग घालणे.

अमेरिका आणि सौदी अरेबियासारखे देश ते उघडे ठेवण्यासाठी ताबडतोब प्रतिकार करू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की इराण ते पूर्णपणे बंद करू शकत नाही कारण त्यामुळे चीनसारख्या त्याच्या मित्र राष्ट्रांना नुकसान होईल. तरीही, अंशतः बंद केल्याने किमती वाढू शकतात.

‘दर्शन योगेश्वराचे – आयुर्वेद भास्कर दादा वैद्य खडीवाले’ चरित्रग्रंथ प्रकाशन शुक्रवारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पद्मभूषण डॉ.शां.ब.मुजुमदार यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : आयुर्वेद, समाजसेवा, संशोधन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे आयुर्वेद भास्कर कै. वैद्य परशुराम य. वैद्य खडीवाले तथा दादा यांच्या उत्तुंग जीवनकार्याच्या आढावा घेणा-या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. ‘दर्शन योगेश्वराचे – आयुर्वेद भास्कर प.य. तथा दादा वैद्य खडीवाले’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शुक्रवार, दिनांक २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती आयोजक वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संगीता विनायक वैद्य खडीवाले, निखिल विनायक वैद्य खडीवाले आदी उपस्थित होते.

चरित्रग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार असून सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. शां.ब.मुजुमदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील आयुर्वेद, संशोधन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

वैद्य विनायक वैद्य खडीवाले म्हणाले, सर्वच क्षेत्रातील नवीन पिढीला दादांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आणि बहुआयामी कायार्चा परिचय व्हावा, याउद्देशाने हा चरित्रग्रंथ साकारण्यात आला आहे. याद्वारे त्यांच्यासमोर एक खरा आदर्श साकारावा, असा आमचा उद्देश आहे. आयुर्वेद, समाजसेवा, संशोधन यांसह जनकल्याण रक्तपेढी, जनकल्याण नेत्रपेढी, हरी परशुराम औषधालय कारखाना व दवाखाना, निराधार मुलांकरता आधार केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये औषधी वनस्पती उद्यान उभारणी, निराधार महिलांकरता वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांची उभारणी दादांनी केली आहे. त्यांनी आयुर्वेद व रा. स्व. संघाविषयी च्या १०० च्या पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. विविध क्षेत्रात दादांचे मोठे कार्य आहे. ते यामाध्यमातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

संगीता विनायक वैद्य खडीवाले म्हणाल्या, बीड सह पुणे जिल्ह्यामध्ये विविध १२५ ठिकाणी दादांनी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून १ लाखाहून अधिक रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्याच्या पुढे देवबांध या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सर्व डोंगर हिरवे करण्यासाठी दादांनी मोहीम हाती घेतली होती. याशिवाय वैद्य ग्रंथ भांडार, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार, आयुर्वेद प्रचारक व हिंदू तनमन, विश्व वैद्य संमेलने, अन्नकोट प्रदर्शने असे अनेक उपक्रम देखील दादांनी राबवले. मनपा कोटणीस दवाखान्यात एचआयव्ही एड्स करीता ३० वर्षे त्यांनी मोफत रुग्णसेवा दिली. तब्बल ४० वर्षे त्यांनी गुरुकुल पद्धतीने विनामूल्य आयुर्वेद प्रशिक्षण वर्ग घेतले. त्यांच्या कार्याची महती सांगणारा हा चरित्रग्रंथ ३२० पानांचा आहे. हा चरित्र ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

भारतामधील ‘पीपीएस समूहा’ची १३७ वी महिंद्रा शोरूम; सासवड सोबतच कात्रज येथे नवीन केंद्र सुरू

  • पुण्यातील कात्रज आणि सासवड येथे दोन नवीन शोरूम्स सुरू
  • भारतामधील ही ‘पीपीएस समूहा’ची १३७ वी महिंद्रा शोरूम; सासवडसोबतच कात्रज येथे नवीन टचपॉइंट सुरू
  • कात्रज शोरूम ६,५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे; ‘पीपीएस मोटर्स’ची पुण्यात ‘महिंद्रा’च्या ८ आउटलेट्सपर्यंत मजल
  • ग्राहकांना अधिक चांगला अनुभव व सोयीसाठी ‘पीपीएस मोटर्स’कडून पुणे शहरात आणखी ५ नवीन सुविधा सुरू करण्याची योजना
  • पुणे, २३ जून २०२५ : भारतातील सर्वात मोठ्या वाहन वितरक समूहांपैकी एक असलेल्या पीपीएस मोटर्स या कंपनीने आज पुणे येथे ‘महिंद्रा’च्या दोन नव्या शोरूम्सचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. कात्रज, आंबेगाव येथील शोरूमचे उद्घाटन ‘महिंद्रा’चे राष्ट्रीय विक्रीप्रमुख व उपाध्यक्ष बाणेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते झाले. यावेळी दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर कंपनीने पुण्याजवळील सासवड येथेही आणखी एक नवीन शोरूम सुरू केली आहे.
  • कात्रज, आंबेगाव येथील नवीन शोरूम गजबजलेल्या एनएच-४ मार्गावर पुण्याच्या ऑटोमोबाईल हबमध्ये मध्यवर्ती ठिकाणी वसलेली आहे. ६,५०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या आधुनिक शोरूममध्ये एकावेळी ६ वाहने प्रदर्शित करता येतील. हे शोरूम ग्राहकांना सर्वसमावेशक अनुभव देण्यासाठी खास डिझाइन करण्यात आले असून, येथे ‘महिंद्रा’च्या सर्व प्रवासी वाहनांची (आयसीई व ईव्ही दोन्ही प्रकारची) संपूर्ण शृंखला उपलब्ध आहे.
  • आधुनिक रंगसंगती, नाट्यमय प्रकाशयोजना, सुबोध तंत्रज्ञान आणि सहज संवाद यांच्या सहाय्याने या शोरूममधील प्रत्येक भाग प्रगत डिझाइन, बुद्धिमान नवोन्मेष आणि परिष्कृत सौंदर्याची अनुभूती देतो. ‘इन्ग्लो इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चर’, जगातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह बौध्दिक प्रणाली (एमएआयए) आणि इतर ‘हीरो’ वैशिष्ट्ये या महिंद्राच्या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा सखोल अनुभव ग्राहक येथे घेऊ शकतात.
  • या नव्या शोरूमच्या माध्यमातून ‘पीपीएस मोटर्स’ने भारतातील आपले व्यापक अस्तित्व आणखी बळकट केले आहे. सध्या हा समूह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये एकूण १३७ महिंद्रा टचपॉइंट्स चालवतो. फक्त आर्थिक वर्ष २०२५ मध्येच समूहाने ३७,०००हून अधिक ‘महिंद्रा’ची वाहने विकली असून, भारतातील ‘महिंद्रा’चा सर्वात मोठा विक्री आणि सेवा भागीदार म्हणून आपले स्थान त्याने पुन्हा अधोरेखित केले आहे.
  • पीपीएस मोटर्स  पुण्यातील व्यावसायिक महत्त्वाकांक्षा
  • कात्रजमधील शोरूम हा ‘पीपीएस मोटर्स’चा पुण्यातील आठवा महिंद्रा टचपॉइंट आहे. यापूर्वी या कंपनीने पुण्यात ७ शोरूम्स आणि १ वर्कशॉप सुरू केलेले आहे. जुलै २०२४ मध्ये ‘पीपीएस’ने पुणे बाजारपेठेत प्रवेश केला. एका वर्षाच्या आत कंपनीने शहरात २,५०० हून अधिक ‘महिंद्रा’ची वाहने विकली. कंपनीच्या विस्ताराच्या आराखड्यानुसार, ती आणखी ३ शोरूम्स आणि २ वर्कशॉप्स सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुणे विभागात ‘महिंद्रा’चे एकूण १३ टचपॉइंट्स होतील. या विस्ताराच्या माध्यमातून पुण्यातील वार्षिक विक्रीचा आकडा ४,५०० ते ५,००० वाहनांपर्यंत वाढवण्याचा आणि त्यातून ८०० ते १,००० कोटी रुपयांपर्यंतचा महसूल मिळवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. 
  • या उद्घाटनप्रसंगी ‘पीपीएस मोटर्स’चे व्यवस्थापकीय संचालक राजीव संघवी म्हणाले,“आमच्या १३७व्या महिंद्रा सुविधेचे उद्घाटन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ‘महिंद्रा’सोबतची आमच्या दीर्घकालीन भागीदारी यामुळे अधिक बळकट होत आहे. आमचा ‘महिंद्रा’सोबतचा प्रवास सात दशकांहून अधिक असून, तो सामायिक मूल्ये, विश्वास आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांवर आधारित आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजांचे सखोल आकलन आणि महिंद्राची आधुनिक व भविष्य-केंद्री वाहने यांचा मिलाफ झाल्याने आम्ही ग्राहकांना सर्वोत्कृष्ट अनुभव देऊ शकतो.”
  • वाहन उद्योगाच्या एका अहवालानुसार, महाराष्ट्रात २०२४ मध्ये ३.९३ टक्के वाढीसह सुमारे ४,५०,००० कार्सची नोंदणी झाली. २०२३ मध्ये ४,३३,००० कार्सची नोदणी झाली होती. २०२५ च्या जानेवारी ते एप्रिल या कालावधीत इलेक्ट्रिक कार आणि एसयूव्ही खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल असल्याचे ‘वाहन’ पोर्टलवरील डेटावून दिसून येते.

श्री वेताळ बाबा मंदिर ट्रस्ट व जय भवानी मित्र मंडळ यांच्यावतीने ५०३ विद्यार्थ्यांना वह्या वाटप

पुणे : समाजात शिक्षण हा परिवर्तनाचा खरा पाया आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांना प्रगतीची संधी देणे हे अत्यंत महत्वाचे काम आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटचालीत अशी छोटी-मोठी मदत मिळणे ही काळाची गरज आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते आणि सेवा भाव वाढीस लागतो. श्री वेताळबाबा मंदिर ट्रस्ट व जय भवानी मित्र मंडळ यांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत यांनी व्यक्त केले.

शिवकालीन श्री वेताळ मंदिराचे श्री वेताळ बाबा मंदिर ट्रस्ट आणि जय भवानी मित्र मंडळ पर्वती यांच्या वतीने गरजू ५०३ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने राबवला जात असून, दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते. पर्वती पायथा येथील शिवकालीन वेताळ बाबा मंदिराशेजारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  रमेश भागवत उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष किशोर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वह्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी हेमंत भाटी, अमोल हुबरे, निवास गाडेकर, आनंद भाटी, भरत आरगडे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा हेतू या उपक्रमामागे असून, वर्षभर विविध समाजोपयोगी कार्ये ट्रस्ट आणि मंडळाकडून राबवली जातात.

रमेश भागवत म्हणाले, पर्वती पायथा परिसरातील मुलांसाठी श्री देवदेवेश्वर संस्थान च्या वतीने मोफत मल्लखांब प्रशिक्षण वर्ग देखील सुरू करण्यात आला आहे, त्याला देखील मुलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

किशोर ठाकूर म्हणाले, शिक्षण हे प्रत्येक मुलासाठी मूलभूत गरज आहे. गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. समाजाने एकत्र येऊन अशा उपक्रमांत सहभाग घेतला, तर अधिक विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचू शकते.

महाराष्ट्रातील २५०० विद्यार्थ्यांचे ‘निरंजन’ ने घेतले शैक्षणिक पालकत्त्व 

पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेचा उपक्रम ; दुष्काळग्रस्त बीड सह अहिल्यानगर आणि पुणे जिल्हयातील विद्यार्थ्यांचा समावेश ; क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजीचे विशेष सहकार्य

पुणे : केवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणा-या महाराष्ट्रातील २५०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने घेतले आहे. दुष्काळग्रस्त बीड सह अहिल्यानगर आणि पुण्यासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करुन गरजू  व गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व घेण्याचे कार्य संस्था अनेक वर्षे करीत आहे. याअंतर्गत पुणे आणि परिसरातील १५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान कार्यक्रम शनिवार, दिनांक २८ जून रोजी सकाळी ९ वाजता स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव सीए दुर्गेश चांडक,वैभव लामतुरे, भारत वेदपाठक आदी उपस्थित होते.

सीए दुर्गेश चांडक म्हणाले, शैक्षणिक किट प्रदान कार्यक्रमाला तौरल इंडिया चे संचालक भरत गीते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब, राष्ट्रीय खो खो खेळाडू व म्हाडा अधिकारी संजय नाईक, महसूल प्राधिकरण सदस्य राजेंद्र क्षीरसागर, महाराष्ट्र बॉयलर विभागाचे संचालक संदीप चिवटे, संगम कृषी सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

शैक्षणिक किट मध्ये १६ प्रकारच्या वस्तू असून या प्रत्येक विद्याथ्यार्ला देण्यात येणार आहेत. यामध्ये सॅक, छत्री, भूमिती बॉक्स, टोपी, पॅड, पेन्सिल बॉक्स, डबा, रजिस्टर, चित्रकला वही, एकेरी वह्या – २०० पानी व ५२ पानी, दुरेघी वह्या – ५२ पानी, पाण्याची बाटली, बॉल पेन, रंगीत पेन अशा वर्षभर पुरेल अशा वस्तूंचा समावेश आहे.

चिमुकल्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पडावा आणि भविष्याच्या वाटा उज्ज्वल व्हाव्या, याकरीता संस्थेने बीडमधील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याच्या उपक्रमाला २०१२ साली सुरुवात केली. त्यानंतर पुणे, रायगडसह तोरणा, लोहगड, तुंग मधील व मुळशीतील नांदगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले. त्यापाठोपाठ जम्मू-काश्मिरमधील आणि अहिल्यानगर मधील गरजू विद्यार्थ्यांना यामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले.

सामाजिक बांधिलकी म्हणून मदत देण्यास अनेकजण इच्छुक असतात, परंतु त्यांना योग्य व्यासपीठ आणि दिशा मिळणेही तितकेच गरजेचे आहे. लहान मुलांचे शाळेत जाऊन शिकण्याचे आणि खेळण्याचे वय असूनही केवळ पैशाअभावी शिक्षण घेता येत नसल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान केले जाते. यावर्षी महाराष्ट्रातील ७५ हून अधिक शाळा व संस्थांतील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

२०५० चे व्हिजन ठेवून काम केल्याने यशस्वी झालो- राजेंद्र पवार

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचा सन्मान सोहळा

पुणे, दि. २३ जून, २०२५ : कंपनीहित व ग्राहकहिताचा विचार व ‘व्हिजन @२०५०’ डोळ्यासमोर ठेवून पायाभूत विकासकामे केल्याने मला पुणे परिमंडलात यशस्वीपणे काम करता आले. अर्थातच याकामी वरिष्ठांचे सहकार्य व माझ्या सर्व अभियंते, वीज कर्मचाऱ्यांची साथ मिळाली म्हणूनच मला ग्राहकांची सेवा करणे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन पुणे परिमंडलाचे तत्कालिन मुख्य अभियंता व महावितरणचे नूतन संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले. महावितरण पुणे परिमंडलातर्फे शनिवारी (दि. २१) भोसरी येथे आयोजित सन्मान सोहळ्यास उत्तर देताना ते बोलत होते.

व्यासपीठावर महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भूजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे, हभप पंकज महाराज गावडे, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी, विजयानंद काळे, संजीव नेहते व अनिल घोगरे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, ‘शंभर टक्के वीजबिल वसुलीसह, वीज कनेक्शन वाढविण्यावर मी भर दिला. दोन वर्षांत ४.५ लाखांहून अधिक वीज कनेक्शन दिले. त्यामुळे महसूल वाढला. १ टक्का वितरण हानी कमी झाली. सोलारचे ६० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण केले. भविष्यातील पुणे शहराची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी २१ अतिउच्चदाब उपकेंद्राचा प्रस्ताव तयार केला. त्यातील ८ मंजूर झाली असून, इतरही होतील. औद्योगिक ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी योजना तयार केली. १८ ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन चालू केली. यावरच मी थांबलो नाही. तर प्रत्येक वीज कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. त्यातूनच प्रतिक वाईकर सारखा प्रतिभावान खेळाडू देशाला मिळाला. त्याच्या नेतृत्वाखाली पहिलाच खो-खो वर्ल्डकप भारताने जिंकला. याचा मला अभिमान आहे. कंपनीची प्रतिमा उंचावण्यासाठी मी जे-जे काही करता येईल ते केले. ग्राहकाला वीज अभियंता किंवा कर्मचाऱ्यांकडून फार मोठी अपेक्षा नसते. त्यासाठी फार छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात. त्या मी केल्या. त्यामुळे ग्राहक-महावितरण व माझे एक घट्ट नाते तयार झाले.’

हभप पंकज महाराज गावडे म्हणाले, ‘समर्पण व निरपेक्ष प्रेमातून आत्मिक आनंद मिळत असतो. पवार यांनी याच भावनेतून नाविन्यपूर्ण योजना राबवून बदल घडविण्याचे धाडस दाखविले. त्यांच्यामुळे इतरांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडले असून, महावितरणचा इतिहास जेंव्हा लिहला जाईल तेंव्हा राजेंद्र पवार यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

मुख्य अभियंता सुनिल काकडे म्हणाले, ‘राजेंद्र पवार साहेबांचे व्यक्तिमत्व फार संघर्षातून तयार झाले आहे. त्यांच्या अनुभवाचा पुणे परिमंडलास फायदा झाला आहे. तर अध्यक्षीय भाषणात प्रादेशिक संचालक भूजंग खंदारे यांनी सांगितले की,, ‘राजेंद्र पवारांनी माणसं वाचली, समजून घेतली. तसेच इथपर्यंतच्या प्रवासात त्यांनी नितिमूल्य ढळू दिले नाही. हे त्यांचे वैशिष्ट्य असून, ते एक प्रयत्नवादी व मेहनती व्यक्तिमत्व आहेत.’

याप्रसंगी राजेंद्र पवार यांच्या महावितरणमधील आजवरच्या प्रवासावर तयार करण्यात आलेली चित्रफित दाखविण्यात आली. यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उपस्थितांसमोर आले. सूत्रसंचालन दिपश्री सरोदे व ऐश्वर्या वस्त्रद यांनी केले तर कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

राजेंद्र पवार यांची पुस्तक तुला

संचालक राजेंद्र पवार हे सर्वव्यापी व्यक्तिमत्व आहे. त्यांना पुस्तकांचाही छंद आहे. लेखक, साहित्यिक यांच्याशाही त्यांचे तितकेच चांगले संबंध आहेत. त्यामुळे पुणे परिमंडलाने वाढदिवसाच्या निमित्ताने राजेंद्र पवार यांची ‘पुस्तक तुला’ केली. यातील सर्व पुस्तके वाचनालयास भेट स्वरुपात दिली जाणार आहेत.

‘नाते प्रकाशाचे’ पुस्तकाचे प्रकाशन

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या पुणे येथील मुख्य अभियंता पदाच्या कार्यकाळातील कामगिरीवर आधारित व उपमुख्य जनसंपर्क अधिकारी निशीकांत राऊत लिखित ‘नाते प्रकाशाचे !’ या पुस्तकाचे प्रकाशनही या सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते झाले.

श्री श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव पुण्यात रविवारी

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल १ लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद

पुणे : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे रविवार, दिनांक २९ जून रोजी दुपारी १ वाजता टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथे रथयात्रा मोठया उत्साहात साजरी होते. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये रथयात्रा होणार आहे. रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते, अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, रथ यात्रेचे समन्वयक अनंतगोप प्रभू आणि जनसंपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस उपस्थित होते.

रथयात्रेचे उद्घाटन इस्कॉन संस्थेचे संन्यासी प.पू. लोकनाथ स्वामी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, खासदार  मेधा कुलकर्णी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि  तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर यांच्यासह पुणे शहरातील सर्व आमदार, नगरसेवक, पुणे महापालिकेतील पदाधिकारी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दुपारी १२ वाजता स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती झाल्यानंतर १ वाजता रथयात्रेला प्रारंभ होईल.

भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात. जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो लोक जमतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली.

स.प.महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे स.प.महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे. ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत मोठया उत्साहात होणार असून यामध्ये अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता आरती, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

रथयात्रेतील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट केली जाणार आहे. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी आणि सर्व भाविक ओढणार आहेत. समारोपानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती होईल. जवळपास २० हजार भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर होणार आहे. रथयात्रा मार्गावर १ लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात येणार आहेत.

रथयात्रेमध्ये २० हजार भक्त सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, बंगाल आणि ओरिसा प्रांतातील पारंपरिक वाद्याच्या गजरात हरे कृष्ण महामंत्राच्या घोषात जय जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा असा जयघोष करीत रथयात्रा मार्गस्थ होणार आहे. रथयात्रा ही विश्व शांती आणि भक्तीचा समन्वय आहे. जगाचे स्वामी जगन्नाथ हे मंदिरातून भक्तांना दर्शन देण्यासाठी रस्त्यावर येतात. सर्व नागरिकांनी भगवंतांच्या दिव्य रथयात्रेत सहभागी होऊन त्यांची कृपा प्राप्त करावी, असे आवाहन इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांनी केले आहे. इस्कॉन संस्थेचे पुण्यात कात्रज कोंढवा रस्ता, कँप आणि निगडी येथे मंदिरे आहेत.

ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ माळवे यांचे निधन

पुणे-पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ काशिनाथ माळवे (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने दु;खद निधन झाले. दै. विशालसह्याद्री मधून त्यांची पत्रकारितेची सुरवात झाली. त्यानंतर दीर्घकाळा दै.प्रभातचे मुख्य उपसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. ‘दै प्रभातमध्ये अनेक सदरांचे लिखाण ते करायचे. सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दै. प्रभातमधील ‘पाठीवर थाप पडलीच पाहिजे’ हे त्यांचे सदर विशेष गाजले. त्यांच्या योगदानाबद्दल पत्रकारितेतील महाराष्ट्र भूषण, पुणे रत्न अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले. नुकताच १५ मे रोजी त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कात्रज स्मशानभूमीत सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आदि विविध क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.

शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

0

प्रकल्प मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार

पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी प्रस्तावित शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ महत्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता असल्याने, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. नितीन गडकरी हे पुणे दौऱ्यावर आले असता काकासाहेब गाडगीळ पुतळा, शनिवारवाडा मुख्य प्रवेशद्वार येथे भेट देत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. रासने यांनी निवेदन देत प्रकल्प उभारणीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे शहरातील मध्यवर्ती आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे मार्ग असून, दररोज लाखो वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असते. परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी होते. हे दोन्ही रस्ते दक्षिणोत्तर मार्गाचा महत्वाचा दुवा असून भविष्यात ‘लिंक कोरिडॉर’ म्हणून उपयोग होण्याची क्षमता बाळगतात.या पार्श्वभूमीवर ‘भुयारी चौपदरी मार्ग’ हा पर्यावरण रक्षण, ऐतिहासिक वारसा जपणूक आणि वाहतूक सुलभीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास सुरुवात केली असून, निधीसाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले “शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता या शहराच्या मध्यवर्ती मार्गांवर कायम वाहतूक कोंडी जाणवत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सुमारे 2.5 किमी लांबीचा, चार पदरी भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात असून पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण सहकार्य मिळत असून केंद्र शासनाच्या सहकार्याने देखील हा प्रकल्प प्रत्यक्षात यावा, यासाठी मा. नितीन गडकरी यांना निवेदन देत निधीची विनंती केली आहे. हा भुयारी मार्ग माझं स्वप्न असून तो पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक असलेल्या शनिवार वाड्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर विशेष मदत मिळावी, अशी विनंतीही आमदार हेमंत रासने यांनी यावेळी केली.