२०५० चे व्हिजन ठेवून काम केल्याने यशस्वी झालो- राजेंद्र पवार

Date:

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचा सन्मान सोहळा

पुणे, दि. २३ जून, २०२५ : कंपनीहित व ग्राहकहिताचा विचार व ‘व्हिजन @२०५०’ डोळ्यासमोर ठेवून पायाभूत विकासकामे केल्याने मला पुणे परिमंडलात यशस्वीपणे काम करता आले. अर्थातच याकामी वरिष्ठांचे सहकार्य व माझ्या सर्व अभियंते, वीज कर्मचाऱ्यांची साथ मिळाली म्हणूनच मला ग्राहकांची सेवा करणे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन पुणे परिमंडलाचे तत्कालिन मुख्य अभियंता व महावितरणचे नूतन संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले. महावितरण पुणे परिमंडलातर्फे शनिवारी (दि. २१) भोसरी येथे आयोजित सन्मान सोहळ्यास उत्तर देताना ते बोलत होते.

व्यासपीठावर महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भूजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे, हभप पंकज महाराज गावडे, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी, विजयानंद काळे, संजीव नेहते व अनिल घोगरे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, ‘शंभर टक्के वीजबिल वसुलीसह, वीज कनेक्शन वाढविण्यावर मी भर दिला. दोन वर्षांत ४.५ लाखांहून अधिक वीज कनेक्शन दिले. त्यामुळे महसूल वाढला. १ टक्का वितरण हानी कमी झाली. सोलारचे ६० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण केले. भविष्यातील पुणे शहराची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी २१ अतिउच्चदाब उपकेंद्राचा प्रस्ताव तयार केला. त्यातील ८ मंजूर झाली असून, इतरही होतील. औद्योगिक ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी योजना तयार केली. १८ ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन चालू केली. यावरच मी थांबलो नाही. तर प्रत्येक वीज कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. त्यातूनच प्रतिक वाईकर सारखा प्रतिभावान खेळाडू देशाला मिळाला. त्याच्या नेतृत्वाखाली पहिलाच खो-खो वर्ल्डकप भारताने जिंकला. याचा मला अभिमान आहे. कंपनीची प्रतिमा उंचावण्यासाठी मी जे-जे काही करता येईल ते केले. ग्राहकाला वीज अभियंता किंवा कर्मचाऱ्यांकडून फार मोठी अपेक्षा नसते. त्यासाठी फार छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात. त्या मी केल्या. त्यामुळे ग्राहक-महावितरण व माझे एक घट्ट नाते तयार झाले.’

हभप पंकज महाराज गावडे म्हणाले, ‘समर्पण व निरपेक्ष प्रेमातून आत्मिक आनंद मिळत असतो. पवार यांनी याच भावनेतून नाविन्यपूर्ण योजना राबवून बदल घडविण्याचे धाडस दाखविले. त्यांच्यामुळे इतरांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडले असून, महावितरणचा इतिहास जेंव्हा लिहला जाईल तेंव्हा राजेंद्र पवार यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

मुख्य अभियंता सुनिल काकडे म्हणाले, ‘राजेंद्र पवार साहेबांचे व्यक्तिमत्व फार संघर्षातून तयार झाले आहे. त्यांच्या अनुभवाचा पुणे परिमंडलास फायदा झाला आहे. तर अध्यक्षीय भाषणात प्रादेशिक संचालक भूजंग खंदारे यांनी सांगितले की,, ‘राजेंद्र पवारांनी माणसं वाचली, समजून घेतली. तसेच इथपर्यंतच्या प्रवासात त्यांनी नितिमूल्य ढळू दिले नाही. हे त्यांचे वैशिष्ट्य असून, ते एक प्रयत्नवादी व मेहनती व्यक्तिमत्व आहेत.’

याप्रसंगी राजेंद्र पवार यांच्या महावितरणमधील आजवरच्या प्रवासावर तयार करण्यात आलेली चित्रफित दाखविण्यात आली. यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उपस्थितांसमोर आले. सूत्रसंचालन दिपश्री सरोदे व ऐश्वर्या वस्त्रद यांनी केले तर कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

राजेंद्र पवार यांची पुस्तक तुला

संचालक राजेंद्र पवार हे सर्वव्यापी व्यक्तिमत्व आहे. त्यांना पुस्तकांचाही छंद आहे. लेखक, साहित्यिक यांच्याशाही त्यांचे तितकेच चांगले संबंध आहेत. त्यामुळे पुणे परिमंडलाने वाढदिवसाच्या निमित्ताने राजेंद्र पवार यांची ‘पुस्तक तुला’ केली. यातील सर्व पुस्तके वाचनालयास भेट स्वरुपात दिली जाणार आहेत.

‘नाते प्रकाशाचे’ पुस्तकाचे प्रकाशन

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या पुणे येथील मुख्य अभियंता पदाच्या कार्यकाळातील कामगिरीवर आधारित व उपमुख्य जनसंपर्क अधिकारी निशीकांत राऊत लिखित ‘नाते प्रकाशाचे !’ या पुस्तकाचे प्रकाशनही या सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१८२२ वीजचोरांना महावितरणचा दणका; ६.१५ कोटींचा दंड,२५लाख८९हजारयुनिटवीजचोरीउघड

पुणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने धडक मोहीम सुरू ठेवली असून, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांत पुणे परिमंडलातील पुणे ग्रामीण, गणेशखिंड शहर आणि रास्तापेठ शहर मंडलात १८२२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, त्यांनी २५ लाख ८९ हजार ९५० युनिट वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. या सर्व वीजचोरांना ६ कोटी १५ लाखांचा दंड महावितरणने ठोठावल्याने वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार करून अथवा वीज यंत्रणेद्वारे थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणकडून कारवाई करण्यात येते. मोठ्या वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये चाकण एमआयडीसी उपविभागातील ‘व्यंकटेश इंडस्ट्रीजने (न्यू मल्हार इंडस्ट्रीज)’ ७४९२२ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. त्यास १६ लाख १६ हजार रुपये तर चाकणमधीलच ‘संत कृपा एंटरप्रायझेसला’ ३८६६८ युनिटसाठी १५ लाख २२ हजारांचा दंड आकारण्यात आला. हडपसर औद्योगिक उपविभागातील ‘द चेअरमन पार्क इन्फिनिया’ येथे ४७८६७ युनिट वीजचोरीसाठी १६ लाख २९ हजार रुपये, गणेशखिंड उपविभागातील ‘मिहिर एंटरप्रायझेस’ला  ४७२९० युनिटसाठी १३ लाख ५२ हजार रुपये दंडाची आकारणी झाली. मंचर उपविभागातील ‘नवनाथ रंगनाथ बांगर’ या ग्राहकाने ३८४६८ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ग्राहकाला ४ लाख १९ हजार रुपयांचा दंड लावला आहे. राजगुरुनगर उपविभागातील ‘भाग्यश्री राजेंद्र भालेराव’ या ग्राहकाला ३३३२१ युनिटसाठी ८ लाख ३ हजार रुपये, हडपसर उपविभागातील ‘माधुरी दिनेश शिवरकर’ ला ३२७१० युनिटसाठी ३ लाख ७३ हजार रुपये आणि ‘दिनेश मारुती शिवरकर’ ग्राहकाकडे १८४४० युनिट वीजचोरी आढळून आल्याने त्यास ४ लाख ३२ हजार रुपये, ‘मिनिनाथ मारुती सावंत’ यास २४७९१ युनिटसाठी २ लाख ६८ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. याशिवाय औंध उपविभागातील ‘अक्षय विश्वनाथ निकाळजे’ ग्राहकाची २१५८३ युनिट वीजचोरी सापडली त्यांना २ लाख ४९ हजार रुपये दंडाचा फटका बसला. महावितरणचे आवाहन वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून तिची चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वीजचोरीच्या प्रकरणात दंडासोबतच कारावासाचीही तरतूद वीज कायद्यात आहे. तसेच, वीजचोरी करताना जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमानुसार अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

विद्यानंद बापट मारहाण प्रकरणाचे राजकीय पडसाद; सत्ताधारी-विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया

संतोष चव्हाणला अटक; एकनाथ शिंदेंचे संयमाचे आवाहन, सुप्रिया सुळे-यशोमती...

‘या झुंडशाहीची दहशत वेळीच मोडून काढा’; विद्यानंद बापट मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले

हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल; मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मतभेद असू...

स्पीकरला विरोध केल्याने आता बापटांना फटके लगावले- महापालिकेतील सभागृहानंतर आता रस्त्यावर दादागिरी

पुण्यातील टिळक रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना...