Home Blog Page 468

राज्यातील हॉटेल उद्योग शासनाच्या करवाढीमुळे धोक्याच्या उंबरठ्यावर

मुंबई- महाराष्ट्रातील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर आज भीषण आर्थिक संकट ओढावलं असून, दिवसेंदिवस वाढणारे कर आणि शासनाचे कठोर निर्णय, यामुळे हा उद्योग अक्षरशः कोलमडण्याच्या मार्गावर आहे, अशी गंभीर चिंता भारतीय हॉटेल व रेस्टॉरंट संघटना (आहार AHAR) ने व्यक्त केली आहे.

अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत उद्योगाला सलग आर्थिक हादरे सहन करावे लागले आहेत. मद्यावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) ५% वरून १०% इतका वाढविण्यात आला. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२५ – २६ साठी परवाना शुल्कात १५% इतकी वाढ करण्यात आली. आता राज्य सरकारने मद्यावरील उत्पादन शुल्कात थेट ६०% इतकी प्रचंड वाढ केली आहे. हे तिन्ही निर्णय एकत्रितपणे पाहता, कोरोनानंतर सावरत असलेला हा व्यवसाय परत कोसळण्याच्या मार्गावर आहे. या निर्णयांना “अन्यायकारक कर वाढीला त्सुनामी” असे संबोधत आहारने इशारा दिला आहे की अशा पद्धतीचे धोरण होटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाचे अस्तित्वच धोक्यात आणत आहे. या सर्व वाढीचा भार ग्राहकांवर टाकला जात असल्यामुळे सेवा महाग झाल्या आहेत, परिणामी ग्राहक मागणी कमी होत असून ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

आहारचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी म्हणाले, “हे केवळ आर्थिक आघात नाही, तर संपूर्ण उद्योगासाठी धोक्याची घंटा आहे. रोजगार निर्माण करणाऱ्या आणि शासनाला मोठ्या प्रमाणात कर भरणाऱ्या या उद्योगासाठी हे निर्णय ‘अंत्यघटिका’ ठरत आहेत. आमच्या संघटनेचे सदस्य साशंक आहेत आणि उद्याचा दिवस कसा उजाडेल, याबाबतही खात्री नाही. उत्पादन शुल्क नूतनीकरणाच्या दरात वाढ, व्हॅट आणि उत्पादन शुल्कातही अनियंत्रित वाढ यामुळे आमच्या अस्तित्वालाच प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही सरकारला विनंती करतो की, अशा एकतर्फी निर्णयांऐवजी उद्योगाशी संवाद साधून त्वरित हे निर्णय मागे घ्यावेत.”

आहार संघटनेने स्पष्ट केले की या अन्यायकारक करवाढीचे दूरगामी परिणाम होणार आहेत. महाराष्ट्रातील होटेल आणि रेस्टॉरंट उद्योगात सध्या १९,००० पेक्षा जास्त परवानाधारक बार व लाउंज आहेत आणि हा आकडा दरवर्षी ८% च्या दराने वाढतो आहे. या क्षेत्रात थेट ४ लाखांहून अधिक लोक रोजगारात आहेत, तसेच सुमारे ४८,००० पुरवठादार या उद्योगावर अवलंबून आहेत. याशिवाय, अंदाजे १८ लाख लोक अप्रत्यक्षरीत्या या उद्योगाशी जोडले गेलेले आहेत.

शासनाच्या या करवाढीमुळे सीमावर्ती राज्यांतून मद्याची अवैध वाहतूक वाढण्याची भीती आहे. परिणामी करचोरी व भ्रष्टाचारासह गुन्हेगारी वाढण्याचा धोका आहे. एवढ्या मोठ्या उद्योगसमूहावर असे आर्थिक ओझे टाकल्यास व्यवसाय, रोजगार, पुरवठा साखळी आणि ग्राहक विश्वास या साऱ्यावरच परिणाम होणार आहे. जेव्हा पंतप्रधान कार्यालय आणि जागतिक बँक मिळून मुंबईला भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दिशेने काम करत असतानाचा ही करवाढ अशी वेळ निवडून करण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे याच उद्दिष्टांना मोठा धक्का बसणार आहे. याच पद्धतीने धोरण अवलंबल्यास देशांतर्गत असोत वा आंतरराष्ट्रीय पर्यटक हे महाराष्ट्राऐवजी अधिक स्वस्त राज्यांकडे वळतील आणि परिणामी महाराष्ट्रात पर्यटकांची संख्या, व्यावसायिक घडामोडी, आणि राज्याच्या महसुलात घट होणार आहे.

तसेच यावेळी आहारने नमूद केले की, त्यांच्या सर्व सदस्यांमध्ये शासनाच्या या निर्णयांविषयी तीव्र नाराजी आहे. अनेक सदस्यांनी ही वाढ सहन करून व्यवसाय चालवणे अशक्य असल्याचे सांगितले आहे. सरकारने उद्योजकांच्या मतांचा विचार न करता हे धोरण लागू केल्यामुळे संताप पसरला आहे. शासनाने हे निर्णय त्वरित मागे घ्यावेत आणि कोणताही पुढील बदल करण्याआधी या क्षेत्राशी चर्चा करावी, अशी संघटनेची मागणी आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. शहरी जीवनात गतिमानता, सांस्कृतिक ओळख आणि पर्यटनवृद्धी यामध्येही या क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. आहार संघटना आपल्या सर्व सदस्यांचे हित जोपासण्यासाठी आणि या क्षेत्राला योग्य सन्मान व पाठबळ मिळावे यासाठी दृढपणे वचनबद्ध असल्याचेही यावेळी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.

वंचितांचे अश्रू पुसण्यासाठी गणेश मंडळांचा पुढाकार स्तुत्य-ना.चंद्रकांतदादा पाटील


श्री तुळशीबाग मंडळाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम…..
पुणे-गणेश उत्सव कार्यकर्त्यांवर होणारी टीका चुकीची असून त्यांच्यामधील विधायक आणि रचनात्मक कार्याच्या पाठीमागे समाजाने उभे उभारण्याची गरज आहे. या कार्यकर्त्यांच्या सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन इतरांनी सुद्धा त्यांच्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. समाजाच्या वंचित आणि दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ यांनी इतरांसमोर स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमांच्या पाठीशी शासन नेहमी खंबीरपणे उभे राहील असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पांतर्गत नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या शुल्काचा धनादेश मा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ,त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार , उपाध्यक्ष विनायक कदम,कोषाध्यक्षनितीन पंडित, गीतांजली देगावकर, पल्लवी वाघ दिनेश शहा
आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या बळीराजावर आत्महत्येची वेळ येते ही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट असून या मुलांच्या शिक्षणासाठी महागणपतीचा सदैव आशीर्वाद राहील असे मत मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी व्यक्त केले.
ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमा च्या आयोजनात मंडळाचे विश्वस्त साईनाथ डोंगरे, चकोर सुबंध
प्रतीक इप्ते, गणेश रामलिंग ,अभिजीत वाळके, सौरभ कदम यांनी पुढाकार घेतला

लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे योग्य नाही:जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे, एकनाथ शिंदेंची संजय गायकवाड यांना समज

मुंबई-शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. विधानपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय गायकवाड यांचे कान टोचले. तसेच अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा असेही त्यांनी सभागृहात म्हटले. आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपण त्यांना समज दिल्याचे म्हटले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, जे खराब झालेले जेवण त्यामुळे लोकांनाही त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे जेव्हा संजय गायकवाड जेवणासाठी गेले तेव्हा त्यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण करून त्यांना उलटी झाली आणि रागाच्या भरात त्यांनी ते कृत्य केले. परंतु, आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी कायदेशीर कार्यवाही करण्याचा आपल्याकडे अधिकार आहे. त्यामुळे असे मारहाण करणे योग्य नाही आणि हे बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिली आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधक तर रोज विविध मुद्द्यावर बोलतच असतात. सरकार देखील त्यांना बोलण्याची संधी देत असते आणि आम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार असतो. पण त्यांना सभागृहात बोलण्यापेक्षा त्याच्या बाहेरच बोलण्यात इंटरेस्ट असतो. हे काही असेल तरी लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो, त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचे भान ठेऊन वागले पाहिजे.

मला कोणताही पश्चाताप नाही-संजय गायकवाड दरम्यान, कॅन्टीन कर्मचाऱ्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा मला निकृष्ट दर्जाचे जेवण देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी कॅन्टीन मालकाला समज दिली होती. महाराष्ट्रातील पाच ते दहा हजार लोक रोज या कॅन्टीन मध्ये जेवण करतात. या सर्वांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.तसेच कॅन्टीन मालकाकडून अनेकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तिथे मिळणाऱ्या निकृष्ट जेवणासंबंधी मी यापूर्वीही तक्रार केली होती. दिवसभरात 10 हजार जण या कॅन्टीनमध्ये जेवतात. रात्री समितीच्या चेअरमनलाही हे सांगितले होते. मी जे केले ते मला मान्य आहे. मला त्याचा कोणताही पश्चाताप नाही, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

“शेतकरी हा समाजाचा आत्मा असून जीवन साखळीतील महत्वाचा घटक” – संदीप खर्डेकर.

“मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने शेतकरी बांधवांना रेनकोट वाटप” – सचिन कुलकर्णी.

“उपक्रमातील सातत्या मुळेच यश – सौ. मंजुश्री खर्डेकर.

पुणे: “शेतकरी हा समाजाचा आत्मा असून जीवन साखळीतील महत्वाचा घटक आहे असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी जर पीक काढणे बंद केले तर काय अवस्था होईल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही कारण मांसाहार करणाऱ्यांना देखील गहू, तांदूळ, कांदा, मिर्ची, लिंबू,मसाला लागतोच ना असेही संदीप खर्डेकर म्हणाले. म्हणूनच ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विंग्रो शेतकरी आठवडी बाजारातील 40 शेतकरी बांधवांना रेनकोट भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.
यावेळी मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी,आठवडे बाजाराच्या प्रवर्तक व मा.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,किरण देखणे,सुमित दिकोंडा,जगदीश डिंगरे,विंग्रो मार्केट चे सुजाता संदीप घगे,विकास पवार,संदीप भोसले,गणेश भाले,आतिश टेमकर,ओमकार फरगडे,शाम वाघमारे
इ मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांविना आपण जगण्याची कल्पना करू शकत नाही म्हणून आज त्यांना वंदन करून आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत असे मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी म्हणाले.आम्ही समाजात वेगळं कार्य करणाऱ्या व आपला ठसा उमटविणाऱ्यांच्या पाठीशी कायम उभं राहतो आणि त्यालाच अनुसरून गरजुंना मदत करून कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभते असेही ते म्हणाले.
मला मिळालेले यश हे उपक्रमातील सातत्यामुळे असून आठ वर्षांपूर्वी नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर जे उपक्रम सुरु केले ते आजही तसेच सुरु आहेत आणि नागरिकांच्या पसंतीस उतरले आहेत असेही सौ. खर्डेकर म्हणाल्या. शेतकरी आठवडे बाजाराच्या माध्यमातून शेतातून थेट सर्व प्रकारच्या ताज्या भाज्या, पालेभाज्या, फळं इ रास्त दरात उपलब्ध होतं म्हणून प्रभागातील नागरिक बाजाराची वाट बघतात असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. वटपौर्णिमेनिमत्त बाजारातील महिलांना साडया भेट दिल्या आता रेनकोट भेट देऊन शेतकऱ्यांना सन्मानित करत आहोत याचा आनंद वाटतो असेही त्या म्हणाल्या.
यापुढे देखील शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी व इतर उपक्रम राबविण्यात येतील असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर व मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

८ मीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण होऊन झाला १२ मीटर:ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा

कोथरुडमधील रजपूत वीटभट्टी परिसरातील मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी

पुणे:कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत असून, कोथरुडमधील एरंडवणे येथून नदीपात्रातील रस्त्या मार्गे शहरात जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील रजपूत वीटभट्टी परसरातील रस्ता प्रशस्त झाला आहे. त्यामुळे सदर भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आग्रहाची भूमिका घेतली होती. मतदारसंघतील मिसिंग लिंकचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत सातत्याने बैठका घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यामुळे गतीमान झालेल्या महापालिकेने मिसिंग लिंकमधील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात रजपूत वीटभट्टी परिसरातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भागातील ८ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन हस्तांतरण होऊन रस्याचे रुंदीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे.

त्यामुळे ८ मीटरच्या रस्ता १२ मीटर झाला असून, सदर रस्ता वाहतुकीसाठी अतिशय प्रशस्त झाला आहे. त्यामुळे कोथरुडकरांची मोठी सोय झाली आहे.

हा प्रलंबित प्रश्न सोडविण्यामध्ये महापालिका प्रशासन, स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक यांची मोलाची साथ मिळाल्याबद्दल नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच, उर्वरित टप्प्यातील रस्त्याचे रूंदीकरण लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

तुकडेबंदी कायदा रद्द,१ गुंठा जागेचे होईल स्वतंत्र खरेदीखत:महसूल मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा, महाविकास आघाडीकडून स्वागत

मुंबई-राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा केली असून, यामुळे सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेले जमिनीचे तुकडे, आता कायदेशीर व्यवहारात आणता येणार आहेत.या निर्णयासाठी महसूल, नगरविकास आणि जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली जाणार आहे. ही समिती पुढील 15 दिवसांत एक एसओपी (Standard Operating Procedure) तयार करणार आहे. तसेच नागरिकांनी या काळात आपल्या सूचनाही देण्याचं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झाले आहे, त्या ठिकाणी आपण तुकडेबंदी कायदा एक गुंठा परंत निरस्त करत आहे. ज्या लोकांनी 20 गुंठ्यामध्ये 10 लोक प्लॉटिंग केले आहे, त्यांची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्यांची पुन्हा रजिस्ट्री करण्याची मागणी आहे. हा कायदा झाला आणि एसओपी झाली की लगेच री रजिस्ट्री सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. त्या संकल्पानूसार सर्व काम सर्व विचार एसओपीमध्ये करण्यात येईल, असे महसूलमंत्री यांनी म्हटले आहे.

निर्णय अत्यंत सकारात्मक- मविआ

महाविकास आघाडीकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा अत्यंत महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा निर्णय आहे. तुकडेबंदीमुळे अनेकांना फसवणुकीला सामोरे जावे लागले, काहींनी आत्महत्या देखील केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत करत, आजवर अनेक महसूल मंत्री झाले, पण हा निर्णय अत्यंत सकारात्मक आहे, असे मत व्यक्त केले.

मागील सरकारने 12 जुलै 2021 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, शेतजमिनीचे व्यवहार करताना जिरायतसाठी किमान 20 गुंठे आणि बागायतीसाठी 10 गुंठे इतके प्रमाणभूत क्षेत्र बंधनकारक ठरवले होते. यामुळे 1-2-3 गुंठ्यांमध्ये जमिनी विकत घेणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता या तुकडेबंदी कायद्याच्या रद्दबातल निर्णयामुळे शेतजमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराला नवीन दिशा मिळणार असून, अनेक छोटे शेतकरी आणि नागरिक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


आमदाराने मारहाण करणे चुकीचे, अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा म्हणाले देवेंद्र फडणवीस ..

मुंबई-

विधानपरिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार निवासात काही घाण असेल किंवा चुकीच्या काही गोष्टी असतील तर स्वतंत्रपणे त्यावर कारवाई करावी. पण लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे हे चुकीचे आहे. त्यांनी जे केले ते चुकीचेच आहे. यामुळे आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो, अशा प्रकारची भावना लोकांमध्ये जाते. निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि यावर जी काही कारवाई करायची असेल ती करण्यात यावी.आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण मिळत असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या कृतीवर विधानपरिषदेत विरोधकांनी आक्षेप घेतला.

कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांचे निलंबन करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आमदाराने कसं रहावं? बनियन, टॉवेल, लुंगीवर आमदार येतो. तुम्ही रस्त्यावर राहताय का, असा सवाल त्यांनी केली. कर्मचाऱ्यांना मारता. तुमच्या हिंमत असेल, तर मंत्र्‍यांना मारा, अशा लोकांचा तुम्ही पाठिंबा घेणार का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. तेव्हा फडणवीस म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे योग्य नाही. त्यामुळे लोकांत चुकीचा संदेश जातो. या प्रकरणी सभापतींनी काय कारवाई करता येईल, याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांनी सांगितले की, रात्री दहा वाजता माझी जेवणाची वेळ असते. त्यामुळे काल रात्री मी नऊ-साडेनऊ वाजता वरण भात आणि पोळी याची ऑर्डर दिली होती. त्यात भातासोबत वरण मिक्स करुन मी पहिला घास घेताच मला खराब वाटला. मला वाटले वरणामध्ये चिंच असेल, म्हणून मी पोळी सोबत दुसरा घास घेतला असता मला वोमिटिंग झाली. त्यामुळे मी वरण चेक केले असता ते पूर्णपणे सडलेले होते.

पुढे बोलताना संजय गायकवाड म्हणाले, आमदारांच्या जिवाशी खेळू नका. कॅन्टिन मालकाकडून अनेकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तिथे मिळणाऱ्या निकृष्ट जेवणासंबंधी मी यापूर्वीही तक्रार केली होती. दिवसभरात 10 हजार जण या कॅन्टिनमध्ये जेवतात. रात्री समितीच्या चेअरमनलाही हे सांगितले होते. मी जे केले ते मला मान्य आहे. मला त्याचा कोणताही पश्चाताप नाही.

हिंजवडीसह परिसराचा वीजपुरवठा पूर्वपदावर

महावितरण व महापारेषण कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाला यश

पुणे, दि. ९ जुलै, २०२५ – महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही इन्फोसिस ते पेगासस अतिउच्चदाब वाहिनीत रविवारी (दि. ६) झालेला बिघाड बुधवारी (दि.९) दुपारी १२.४० वाजता दुरुस्त करण्यात यश आले असून, हिंजवडीसह परिसरातील सर्व उद्योगांचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे. दरम्यान महापारेषणचा बिघाड दुरुस्त होईपर्यंत महावितरणने युद्धपातळीवर अहोरात्र मेहनत घेत सर्व नागरीभागांचा व बहुतांश उद्योगांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरु केल्याने दिलासा मिळाला होता. आता एकुणच सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्याने उद्योगांसह पुणेकरांचा व महावितरणचाही ताण कमी होण्यास मदत मिळाली आहे.

हिंजवडी व पेगासस २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी महापारेषण कंपनीने रविवारी सकाळी ११ वाजता संबंधित उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा बंद केला होता. दुरुस्तीचे काम आटोपल्यानंतर रविवारी दुपारी २.१० वाजता इन्फोसिस ते पेगासस उपकेंद्राला येणाऱ्या अतिउच्च्दाब वाहिनीत हिंजवडी मेट्रो स्थानकाजवळ बिघाड झाला आणि विजेची आपत्कालिन परिस्थिती उद्भवली. या दोन मोठ्या उपकेंद्रांमुळे येथून निघणाऱ्या २५ उच्चदाब वाहिन्यांवरील ५२ हजार लघुदाब ग्राहक, इन्फोसिस व नेक्सट्रा हे दोन अतिउच्चदाब ग्राहकांसह ९१ उच्चदाब ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

महापारेषणच्या बिघाड दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी मोठा असल्याने महावितरणने पर्यायी मार्गाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यावर भर दिला. सोमवारी पहाटे ४ पर्यंत सर्व ५२ हजार लघुदाब ग्राहक सुरु केले. सोमवारी सायंकाळपर्यंत केवळ ३५ उच्चदाब ग्राहक शिल्लक होते. मंगळवारी त्यातील २६ सुरु केले. तर १० मोठ्या उद्योगांना चक्राकार पद्धतीने ५ तास वीजपुरवठा केला. जवळपास ६३ मेगावॅटचा भार इतरत्र वळविण्यात यश आले. अपवाद फक्त नेक्सट्रा कंपनीचे दोन ग्राहक राहिले. या दोन ग्राहकांना जवळपास २५ मेगावॅटची गरज होती. सरते शेवटी बुधवारी दुपारी १२.४० वाजता नेक्ट्रासह सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळित झाला आहे.

महापारेषणचे संचालक (संचालन) सतीश चव्हाण यांनी देखील मुंबईहून पुण्यात तळ ठोकला होता. तर महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप, महावितरणचे अधीक्षक अभियंते सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, महापारेषणचे विठ्ठल भुजबळ यांचेसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणा, एजन्सीस, अतिरिक्त मनुष्यबळ कामी लावून वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरु करणे सोबतच बिघाड दुरुस्त करण्यावर भर दिला. परिणामी मोठ्या संकटावर मात करणे वीज यंत्रणेला शक्य झाले.

वीज कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे वीज संकटावर मात

महापारेषणचा बिघाड मोठ्या स्वरुपाचा होता. बाधित उपकेंद्रातील विजेची मागणी पाहता इतर उपकेंद्रातून वीजपुरवठा पर्यायी मार्गाने वळविणे हे मोठे अवघड काम होते. परंतु, महावितरणच्या व एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाच्या जोरावर आम्ही संकटावर मात केली. दरम्यानच्या काळात सर्व वीजग्राहकांनी संयम दाखवत महावितरणला सहकार्य केले.

सुनील काकडे, 

मुख्य अभियंता, महावितरण, पुणे परिमंडल

घटनाक्रम

·         रविवार दि. ६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ – महापारेषणने नियोजित देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद केला.

·         रविवारी दुपारी २.१० वाजता – महापारेषणच्या २२० केव्ही इन्फोसिस ते पेगासस अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड

·         रविवारी संध्याकाळी १० ते सोमवारी पहाटे ४ पर्यंत – ५२ हजार लघुदाब ग्राहकांचा व काही उद्योगांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरु करण्यात यश

·         सोमवारी दुपारीपर्यंत- ९१ बंद ग्राहकांपैकी ७६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु

·         सोमवारपासून – १० मोठ्या उच्चदाब ग्राहकांना ५ तास चक्राकार वीजपुरवठ्याचे नियोजन

·         मंगळवार दिवसभर – ९ उच्चदाब व २ अतिउच्चदाब (नेक्सट्रा१ व २) वगळता उर्वरित सर्व सुरु

·         बुधवारी दु. १२.४० – मूळ बिघाड दुरुस्त करण्यात यश, सर्व वीजपुरवठा सुरळीत.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आनंदाश्रमात शिवसेनेचा मेगा पक्षप्रवेश

  • ‘प्रॉमिसिंग पुणे’चा संकल्प करत चळवळीतील कार्यक्षम कार्यकर्त्यांचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार

पुणे: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यानंतर होणाऱ्या राजकीय परिणामाची राज्यभर उत्सुकता असतानाच पुण्यातील विविध संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळांत कार्यरत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील आनंदाश्रमात हा मेगा पक्षप्रवेश सोहळा रंगणार आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. सकारात्मक आणि रचनात्मक काम करत आपली रेष मोठी करण्यात माहीर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ही अनोखी रणनीती अंमलात आणली आहे.

‘प्रॉमिसिंग पुणे’चा संकल्प करीत वंदेमातरम संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे कार्यकारी अध्यक्ष, ‘#व्हायरल_माणुसकी’ पुस्तकाचे लेखक, वक्ते आणि निवडणुक व्युहरचनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले वैभव वाघ यांच्यासह पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्निल नाईक, गेली ३० वर्षे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारे अनुभवी क्रिडासंघटक उमेश गालिंदे, आरोग्य क्षेत्रातील कामासाठी वस्ती भागांमध्ये ‘हक्काचा कार्यकर्ता’ अशी प्रतिमा असलेले अभिमन्यू मैद आणि सुधीर ढमाले, हॉटेल कामगारांच्या न्याय हक्कसाठी कार्यरत असलेले संदेश पावसकर, विद्यार्थी चळवळीतील युवा कार्यकर्ते अथर्व पिसाळ, ७५००० किलो गोमांसाची तस्करी रोखल्यामुळे महाराष्ट्रात गाजलेले निलेश जाधव, स्वत: कॅन्सरशी यशस्वी दोन हात केल्यानंतर आता पूर्णवेळ कॅन्सर रुग्णांसाठी मोफत समुपदेशन करणारे कॅन्सरयोध्दा युनुस सय्यद, सतिश शिंदे, मातंग समाजाच्या युवक चळवळीत प्रसिध्द असलेले विजय गालफाडे, युवा उद्योजक दत्ता मानकर, माजी नगरसेवक अनिल बटाणे, देवेंद्र शेळके, गोरख बांदल, गौरव नवले, अनिकेत उतेकर, ओंकार मालुसरे, महेश चव्हाण, योगेश राजपुत, महेश सुर्यवंशी यांचा समावेश आहे.

विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातून या अष्टपैलू टीमच्या प्रवेशाचे ‘ऑपरेशन टायगर’ घडवून आणण्यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

वैभव वाघ म्हणाले, “चिपळूण पूर, इर्शाळवाडी, पहलगाम अतिरेकी हल्ला अशा नैसर्गिक आणि राष्ट्रीय आपत्तींवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम खूप जवळून पाहिले होते. त्यामुळे राज्यात, पुणे शहरात काही रचनात्मक काम करायचे, तर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात करावे, हा विचार माझ्यासह सहकाऱ्यांच्या मनात आला. गेली २० वर्षे ज्यांना गुरु मानून काम करत आहे, त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमात शिवसेनेत प्रवेश करण्याची संधी मिळतेय, ही गोष्ट भारावणारी आहे. शिवसेनेचा भगवा हाती घेत एक सकारात्मक आणि रचनात्मक राजकीय चळवळ पुणे शहरात, राज्यात सुरु करण्याचा आमचा मानस आहे.”

‘ऑपरेशन टायगर’ घडवण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले, “या मेगा प्रवेशाला एक वेगळे महत्व आहे. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन हजारो प्रवेश शिवसेनेत रोज होत आहेत; पण यातले बहुतांशी लोक हे राजकीय पार्श्वभूमी असलेले आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ राजकीय पार्श्वभूमी नसलेले आणि केवळ समाजात मुळाशी जाऊन काम करणाऱ्या आणि समाजात विश्वासार्ह प्रतिमा असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आहे. या अष्टपैलू टीमच्या कल्पनेतून लवकरच पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पुण्यात ‘प्रॉमिसिंग पुणे’ अभियानाची सुरुवात होणार आहे.”

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने जाहीर निषेध,

पुणे-भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला .

गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजाचा तीव्र आंदोलन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले ख्रिश्चन समाजाच्या वतीने आमदार पडळकर यांच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनामध्ये ख्रिश्चन समुदायांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष जुबेर मेमन यांनी पडळकर यांच्या वक्तव्याचे जाहीर निषेध केला यावेळी जुबेर मेमन यांनी सांगितले कुठलाही समाज आणि धर्माच्या विरोधात कोणीही राजकीय नेता अशा वक्तृत्व केले तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करणार व त्यांना कठोर शासन व्हावे याकडे आम्ही पाठपुरावा करणार असे यावेळी सांगितले यावेळी या आंदोलनामध्ये पुणे शहर जिल्ह्यातून ख्रिश्चन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

धर्मांतर विरोधात पुण्यात मोर्चा

पुणे-भाजप आमदार गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून धर्मांतराच्या विषयावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने धर्मांतर विरोधात पुण्यात मोर्चा काढण्यात आला.यावेळी पडळकर यांनी उपस्थिती लावली. तसेच आगामी काळामध्ये या धर्मांतर विरोधात आपण नवीन मोहीम होती घेणार असल्याचे संकेत दिले. माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले, आज पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. सांगलीमधील ऋतुजा नावाच्या हिंदू कुटुंबातील मुलीचं फसवून धर्मांतर झालेल्या ख्रिश्चन समाजातील मुलाशी लग्न लावण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच तिच्या पोटातील मुलावर देखील ख्रिश्चन पद्धतीने गर्भसंस्कार व्हावेत असा दबाव टाकल्यानंतर तिने गर्भातील सात महिन्याच्या मुलासहित आत्महत्या केली.
त्यामुळे तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या सगळ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच आणखी असे धर्मांतराचे प्रकार घडू नये म्हणून कठोर असा धर्मांतर बंदी आणि लव जिहाद या बाबतचा कायदा महाराष्ट्र सरकारने आणावा अशी आमची मागणी आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार जर एखाद्या हिंदू कुटुंबातील व्यक्तीने आपल्या जातीच्या दाखल्याच्या आधारे नोकरी मिळवली असेल आणि त्यानंतर त्याने धर्मांतर केला असेल तर त्याला बडतर्फ करण्यात यावं असा निर्णय देण्यात आला आहे.
त्यामुळे ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. त्यांनी आपल्या दाखल्यावरील हिंदू आणि त्याच्या पुढील पोट जात फोडून टाकावी. एकीकडे आरक्षणाचा लाभ घेऊन दुसरीकडे आम्ही ख्रिश्चन आहोत हे सांगत असाल तर ते अत्यंत चुकीचा आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी माझ्या विरोधात मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये उपस्थित असलेल्यांची यादी आता तयार करायला घेतली आहे. त्यातील किती अधिकारी आहेत हे तपासणार असून किती जणांनी आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळवली आहे आणि त्यानंतर त्यांनी धर्म बदलला आहे. त्याबाबतचे पुरावे गोळा करण्याची मोहीम आता हाती घेणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितला.
तसेच जे मोर्चे ख्रिश्चन धर्मियांकडून काढण्यात आले. त्या मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा वापर करण्यात आला. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पष्ट मत होतं की मिशनरी आणि मुस्लिम भारतात धर्मांतर करू पाहत आहेत. या धर्मांतराला त्यांचा विरोध होता. त्यामुळेच त्यांनी ख्रिश्चन धर्म न स्वीकारता बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे जे बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन या मोर्चामध्ये जात आहेत त्यांना बाबासाहेब आंबेडकर समजलेच नाहीत. त्यामुळे आधी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावं, असं पडळकर म्हणाले.

१०० कोटींची मालमत्ता असलेल्या छांगूर बाबाची चौकशी आता ईडी करणार


पुणे-काही वर्षांपूर्वी रस्त्यावर अंगठ्या आणि खडे विकणाऱ्या छांगूर बाबाकडे आजच्या घडीला १०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. छांगूर बाबा आणि त्याच्याशी संबंधित संस्थांच्या बँक खात्यांमधून १०० कोटी रुपयांहून अधिकचे व्यवहार झाल्याची माहिती एटीएसच्या तपासातून समोर आली आहे.अवैध धर्मांतर प्रकरणात अटक करण्यात आलेला जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबाचे कारनामे उघड होऊ लागले आहेत. १०० कोटींची मालमत्ता असलेल्या छांगूर बाबाची चौकशी आता सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) केली जाणार आहे.छांगूर बाबाची कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आलेली आहे. पुण्याच्या लोणावळ्यात त्यानं एक मालमत्ता खरेदी केली. आपल्या निकटच्या व्यक्ती आणि बलरामपूर सीजेएम कोर्टात लिपिक असलेल्या राजेश उपाध्यायची पत्नी संगीता देवीच्या नावे ही संपत्ती नोंदवण्यात आलेली आहे. एसटीएफ आणि एटीएसच्या तपासातून ही माहिती समोर आलेली आहे.

उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये अवैध धर्मांतरणाच्या मोठ्या रॅकेटचा पदार्फाश झालेला आहे. छांगूर बाबा या संपूर्ण रॅकेटचा प्रमुख आहे. त्याला एटीएसनं अटक केली आहे. त्याची सहकारी नीत रोहरा उर्फ नसरीनला उत्तर प्रदेश एटीएसनं बेड्या ठोकल्या आहेत. तरुणींना फूस लावून छांगूर बाबा त्यांचं धर्मांतर घडवून आणायचा. या नेटवर्कसाठी परदेशांमधून १०० कोटी रुपयांची मदत मिळाल्याची माहिती उघडकीस आलेली आहे. बलरामपूरच्या उटरौलामध्ये बऱ्याच कालावधीपासून धर्मांतराचं रॅकेट चालवलं जात होतं.

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीनं हिंदू तरुणींच्या धर्मांतरासाठी ठराविक रक्कम निश्चित केली होती. ब्राह्मण, ठाकूर आणि शीख तरुणींच्या धर्मांतरासाठी १५ ते १६ लाख रुपये मिळायचे. ओबीसी तरुणींच्या धर्मांतरासाठी १० ते १२ लाख रुपये दिले जायचे. तर अन्य जातींसाठी ८ ते १० लाख रुपये मिळायचे. छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन बाबा स्वत:ची ओळख हाजी पीर जलालुद्दीन अशी सांगायचा. एजंट्सच्या माध्यमातून तो तरुण मुलींचं धर्मांतर करायचा.

राजस्थान, लखनऊ, बलरामपूर आणि पुण्यापर्यंत धर्मांतर नेटवर्कचं कनेक्शन आहे. छांगूर बाबा गेल्या अनेक वर्षांपासून सिंडिकेट चालवत होता. धर्मांतरासाठी त्याला आखाती देशांमधून कोट्यवधी रुपये मिळायचे. छांबूर बाबानं लोणावळ्यात १६ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली. ही मालमत्ता मोहम्मद अहमद खान, नवीन रोहरा उर्फ जमालुद्दीन आणि बलरामपूरच्या न्यायालयात लिपिक असलेल्या राजेश उपाध्यायची पत्नी संगीता देवीच्या नावे आहे.

मला विचारल्याशिवाय माध्यमांशी बोलू नका -राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

मुंबई- मराठीच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचे आणि कोणतीही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त न करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच प्रवक्त्यांनी पक्षाची बाजू मांडण्यापूर्वी माझी परवानगी घ्यावी, असेही राज ठाकरे यांनी आदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मीरा भाईंदर मध्ये काढण्यात आलेल्या मराठी स्वाभिमान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने या परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अखेर पोलिसांच्या विरोधाला झुगारुन मनसेने हा मोर्चा काढला आणि आंदोलन यशस्वी केले. आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना माध्यमांशी संवाद न साधण्याचे आदेश दिले.

एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.राज ठाकरे

दरम्यान, मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावणाऱ्या मनसेविरोधात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी 8 जुलै रोजी मीरारोड येथे मनसे, ठाकरे गटाची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये मराठी भाषेसाठी एकत्र आलेल्या नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला. मात्र, मोर्चादरम्यान अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते, तसेच काही मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड देखील झाली होती. या मोर्चानंतर राज ठाकरे लवकरच मीरा रोड येथे भेट देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मीरा रोड येथील मोर्च्याच्या परवानगीवरून शिंदे गटातील नेत्यांमध्येही सकाळपासून मतमतांतरे दिसून आलेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोर्च्याला परवानगी नाकारण्याचे स्पष्टीकरण दिले, तर आमदार प्रताप सरनाईक यांनी “मराठी माणसांच्या मोर्च्याला परवानगी का नाकारली गेली?” असा थेट सवाल उपस्थित केला. तर या मोर्चाला परवानगी का नाकारली? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिस महासंचालकांना जाब विचारला असून, परवानगी नाकारून पोलिसांना बदनाम करण्याचा हेतू होता का? याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

परमिटरूम चालकांचा आंदोलनाचा इशारा; दरवाढ रद्द करण्याची मागणी


सरकारी दरवाढीच्या लुटारू धोरणामुळे लोक रस्त्यावर दारू पिऊ लागलेत , परमिट रूमचा व्यवसाय धोक्यात येऊ लागलाय ,

श्रीरामपूर लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्याचा भार परमिट रूमधारकांवर सरकार टाकीत आहे.राज्य शासनाने मद्याच्या किमतीत केलेली दरवाढ व अतिरिक्त वॅट रद्द करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा श्रीरामपूर तालुका परमिट रूम व वाईनशॉप ओनर्स सोशल असोसिएशनचे अध्यक्ष नाना जोंधळे यांनी दिला आहे.
संघटनेच्या बैठकीत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. नाना जोंधळे म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्याचा भार परमिट रूमधारकांवर सरकार टाकीत आहे. यासाठी अतिरिक्त कर आकारणी लादली आहे. राज्यातील हॉटेल, परमिट रूम व वाईनशॉप व्यावसायिकांसाठी एकच कर प्रणाली असावी. तसे न करता राज्य सरकारने ती परमिट रूमवर केली आहे. ही अन्यायकारक करवाढ मागे घ्यावी, अन्यथा जिल्ह्यातील सर्व परमिट रूम चालक व मालक रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करतील.

राज्यातील मद्य उद्योग आर्थिक संकटात आहे. हॉटेल व्यवसायाला कोणतीही सवलत किंवा मदत दिली जात नाही. त्याचा परिणाम ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिकांवर झाला आहे. हाॅटेल व परिमिटरुमवरील मद्यविक्रीवर अतिरिक्त व्हॅट लावल्याने अनधिकृत व बेकायदेशीर दारुविक्रीत वाढ झाली आहे. परवाना नसणाऱ्या हाॅटेल्स, धाब्यामधून सर्रास विक्री केली जात आहे. यामुळे व्यवसाय मोडकळीस येण्याची स्थिती उद्भवल्याचे श्री. जोंधळे यांनी सांगितले.

राज्य शासनाने मद्याच्या किमतीत केलेली दरवाढ व अतिरिक्त वॅट रद्द करावा. राज्यातील हॉटेल, परमिट रूम व वाईनशॉप व्यावसायिकांसाठी एकच कर प्रणाली असावी.अशा मागण्या करण्यात आल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्याचा भार परमिट रूमधारकांवर सरकार टाकीत आहे. यासाठी अतिरिक्त कर आकारणी लादली आहे.असा आरोप करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना विमा भरपाई नाही कारण सरकारनेच विम्याचा हप्ता भरलेला नाही …कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानपरिषदेत कबुली

मुंबई- राज्य सरकारने विमा हप्त्यापोटी एक हजार कोटींची रक्कम दिली नसल्याने, शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळालेली नाही. परिणामी २०२३ – २४ मधील खरीप व रब्बी हंगामातील विमा भरपाईपासून शेतकरी वंचित राहिल्याची कबुली कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत दिली.विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी बाकावरील अन्य सदस्यांनी मांडलेल्या २९३ च्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले, ‘२०१६ – १७ ते २०२३-२४ या काळात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत एकूण ४३ हजार २०१ कोटी इतक्या रकमेचा विमा हप्ता जमा झाला. या काळात शेतकऱ्यांना दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम ३२ हजार ६२९ कोटी ७३ लाख इतकी आहे.ही रक्कम विमा हप्त्याच्या ७६ टक्के आहे.” राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सरासरी चार हजार ८० कोटी रुपये एवढी विमा रक्कम मिळाली असून, विमा कंपन्यांना एकूण सात हजार १७३ कोटींचा नफा झाला आहे. विमा कंपन्यांनी सरकारला २३२२.६१ कोटींचा परतावा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोकाटे म्हणाले, ‘खरीप २०२३ व रब्बी २०२३ – २४ मधील एकूण २६२.७० कोटींचा विमा नुकसान भरपाई अद्याप प्रलंबित आहे. खरीप २०२४ मधील ४०० कोटी रुपयांचा पीकविमा देणे बाकी आहे. राज्य सरकारने सुमारे १०२८.९७ कोटी रुपयांचा पीकविमा हप्त्याची रक्कम भरली नसल्याने विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. राज्य सरकारकडून देय असलेली विमा हप्त्यांची रक्कम काम आठ दिवसांत दिली जाईल, त्यानंतर प्रलंबित विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही कोकाटे म्हणाले.

कृषी निविष्ठा कंपन्या स्थापन केल्याप्रकरणी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत चौकशी करण्याचा प्रस्ताव गृह विभागास पाठविल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेतील लेखी उत्तरात दिली.

मंगळवारी डॉ. परिणय फुके, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, सदाशिव खोत, वसंत खंडेलवाल, उमा खापरे आणि चित्रा वाघ यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यास कृषिमंत्री कोकाटे यांनी लेखी उत्तर दिले. ‘ॲग्रोवन’मधून कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या कंपन्यांबाबत वृत्त प्रसिद्ध करून त्याचा पाठपुरावा केला होता. या संदर्भात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.

सेंद्रिय उत्पादनाला मिळणार चालना

राज्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र परवाने देण्याचा विचार आहे, अशी माहिती कोकाटे यांनी दिली.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी आरोप करत तक्रार दाखल केली होती. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी खाते गिळंकृत केल्याचा आरोप करत या विभागातील ३० अधिकाऱ्यांनी ४३ निविष्ठा कंपन्या सुरू केल्याची तक्रार दिली होती.

विकास पाटील आणि दिलीप झेंडे या अधिकाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले होते. तसेच गुणनियंत्रण विभागातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या किरण जाधव यांनी दिलेल्या ११ कंपन्यांचे परवाने तपासण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.