Home Blog Page 465

जनसुरक्षा कायद्यावरून काँग्रेसचा सरकारवर निशाणा:नक्षलवादात 72 टक्के घट असताना नवा कायदा का, गोपाळदादा तिवारींचा सवाल

पुणे-देशाचे गृह मंत्री अमित शहा हे वारंवार नक्षलवाद नियंत्रणात आल्याची वक्तव्ये करत असतांनाच, त्यांनी एका मुलाखतीत आकडेवारी नुसार 72 % नक्षलवाद संपुष्टात आल्याचे सांगून 2026 मध्येच, देश नक्षलवाद मुक्त होईल सांगितले. तर मग पुन्हा “युएपीए / मोक्का कायदा” अस्तित्वात असतांना देखील ‘जन सुरक्षा कायद्याची’ गरज का भासली..?याचे कारण स्वायत्त संस्थांवर, काही माध्यमांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करून ही ‘विरोधी आवाज , विरोधी मते , सरकार वा निवडणूक आयोग, ईडी आदी ना प्रश्न विचारणे थांबवत नाही हे लक्षांत आले आहे.सरकारची उत्तरे देण्यात दमछाक होते आहे म्हणूनच “जन सुरक्षा नव्हे तर सत्ता सुरक्षा” कायदा , एकमताने नव्हे तर ‘बहुमताच्या’ जोरावर मंजुर करण्यात आल्याची टिका काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ४० नक्षलवादी संघटना होत्या असे धक्कादायक, निराधार, तथ्यहीन व दिशाभूल करणारे आरोप केले होते.मात्र, गृहखाते हाताशी असुनही आज अखेर त्यातील एक ही नक्षलवादी असल्याचे सरकार सिद्ध करू शकले नाही किंबहुना ‘एकावर ही एफआयआर’ दाखल करू शकले नाही. त्यामुळे विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याची या सरकारची फॅशन झाली आहे. याविषयी मविआ नेत्यांनीही टिका केली आहे.राज्यातील विरोधी पक्ष हे जबाबदार सत्ता राबवलेले पक्ष असुन, त्यांना जनहितार्थ कोणत्या कायद्याची आवश्यकता आहे हे चांगल्या प्रकारे कळते.

मात्र सत्तेतील महायुतीच्या नेत्यांना स्वकर्तबगारी ची वानवा असल्याने, विरोधकांच्या प्रश्नांनाच सामोरे जाऊ नये असे वाटते व त्या अपराधीक, असुरक्षित भावनेतूनच जनसुरक्षा कायद्याचा घाट घातला हे ‘वास्तव राजकीय परिस्थितीतुन’ स्पष्ट होत असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

त्यामुळे फडणवीस सरकारचा हा जन सुरक्षा कायदा नव्हे तर सत्ता सुरक्षा कायदा करण्याचा प्रयत्न असून, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी हा कायदा केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. विरोधकांना चौकशी विना वा पुराव्या विना दिर्घ काळ चौकशी साठी, डांबण्यासाठी हा ‘जन सुरक्षा कायदा’ केला काय..? असा खरमरीत प्रश्न ही तिवारी यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जमिनही बिल्डरांनी सोडली नाही, बळकावली, इमारत उभारून फ्लॅट विकले , करोडो कमवले आणि नंतर सरकारने ती पाडून निरपराध बेघर केले

0

अधिकारी मजा मारत राहिले …अन सरकार बघत बसले …

मुंबई-

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेली मौजे तळवली, तालुका-कल्याण येथील जमीन भूमाफियांनी बळकावली व तिथे ‘तनिष्का रेसिडेन्सी’ नावाने ७ मजली इमारत उभी केली. आज याच मुद्द्यावरुन विधानसभेत आक्रमक होत अशा भूमाफियांना तडीपार करण्याची व त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली. यावेळी त्यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

शेख म्हणाले, भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदारांच्या जमीनीत हे भूमाफिया जर घुसखोरी करित असतील तर सर्वसामान्यांच्या मालमत्ता कशा सुरक्षित राहतील..?

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६० व २६७ (१) अन्वये १७/०२/२०२३ रोजी या इमारतीच्या बाबतीत सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी विकासकाने इमारतीच्या अधिकृततेबाबत कोणतीही कागदपत्र सादर केली नसल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४७८ मधील तरतुदीं नुसार दि. १४/०२/२०२३ च्या आदेशान्वये इमारत महानगरपालिकेकडून अनधिकृत घोषित करण्यात आली.

इमारत २०२३ साली अनधिकृत घोषित करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र ही इमारत निष्कासीत करण्यासाठी २०२५ साल उजाडावे लागले. मुळात एवढी मोठी इमारत उभी राहत असताना पालिकेचे अधिकारी काय करत होते..? आणि इमारत २०२३ साली अनधिकृत घोषित झाल्यानंतर ती पाडण्यासाठी २०२५ साल का उजाडावे लागले..?

इमारत बांधत असताना डोळेझाक करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार..?

इमारत निष्कासीत केली गेली, मात्र ही इमारत बांधणाऱ्यांवर कोणतीही कारवाई अद्याप का करण्यात आली नाही..? अशा विकासकांना तुम्ही तडीपार करणार आहात का..? एमपीडीए अंतर्गत अशा भूमाफियांवर कारवाई केली जाईल का..?

ज्या नागरिकांनी इमारत अधिकृत आहे असे समजून घरांसाठी आगाऊ रक्कम विकासकाला दिली होती, त्यांचे पैसे कोण परत करणार…? असे अनेक प्रश्न उपस्थित करत शेख यांनी सरकारला धारेवर धरले.

शेख पुढे म्हणाले दररोज मुंबईत शासनाच्या जागेवर शेकडो अनधिकृत झोपड्या बांधल्या जात आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना तडीपार करण्यात याव व त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेख यांनी केली.

आमदार अस्लम शेख यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांना उत्तर देताना मंत्री बावनकुळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुद्दा उपस्थित करुन हा सर्व प्रकार उघडकीस आणल्याबद्दल शेख यांचे अभिनंदन केले. मंत्री बावनकुळे म्हणाले, ज्यांनी या अनधिकृत इमारतीमध्ये घरे विकत घेतली, त्यांचे पैसे परत भेटलेच पाहिजेत. यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून एक विशेष बाब म्हणून हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात येणार आहे. महसूल विभागाने आपल्या अधिकार क्षेत्रात कारवाई केलेलीच आहे. त्याच बरोबर गृह विभाग व नगरविकास विभाग यांच्या सोबत विचार विनिमय करुन भूमाफियांवर कठोर कारवाईचे आश्वासन मंत्री बावनकुळे यांनी दिले.

मृद व जलसंधारण योजनांसंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक

“जलसंधारणात लोकसहभाग महत्त्वाचा”; मंत्री संजय राठोड यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. १० जुलै २०२५ : राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच धोरणात्मक सहकार्याच्या उद्देशाने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन केले.

त्यांच्यासह सचिव श्री गणेश पाटील, श्रीमती मृदुला देशपांडे (उपसचिव, मृद व जलसंधारण विभाग), श्री रणदिवे (मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास, पुणे) प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला श्रीमती अपर्णा पाठक, कोमल धस, शिरीष कुलकर्णी, रमेश भिसे, संतोष राऊत, लतिका राजपूत, अरुण शिवकर, मंगल कुलकर्णी, कल्पेश कुलकर्णी, अश्लेषा खंडागळे, तसेच श्रीमती सुनिता मोरे यांची ऑनलाइन उपस्थिती होती.

बैठकीच्या सुरुवातीस राज्यातील दुष्काळी भागांमध्ये अद्यापही मूलभूत पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर असल्याचे अधोरेखित करताना मंत्री संजय राठोड म्हणाले, “दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे आपले सामूहिक ध्येय असले पाहिजे. जलसंधारणात लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे.”

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जलसंधारणाच्या योजनांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी काही ठोस उपाय सुचवले. “काम करू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी आपण छोटे-छोटे युनिट तयार करू. उपसभापती कार्यालयाकडून अशा १५ विश्वासार्ह स्वयंसेवी संस्थांची यादी दिली जाईल. त्या संस्थांना पुढील कामात सहभागी करून घेतले जाईल,” असे त्या म्हणाल्या.

त्याचबरोबर, जल व मृदसंधारण क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या गावांची सादरीकरणे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. राज्यभरातील कार्यरत स्वयंसेवी संस्थांसाठी एक राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्याचा प्रस्तावही डॉ. गोऱ्हे यांनी मांडला.

विशेष म्हणजे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या. “सामाजिक संस्थासाठी नियमावली बनवून सर्वसमावेशक धोरण ठेवावे. त्यामध्ये लाडक्या बहिणी, एकल महिला यांना जल व मृदसंधारणाच्या कामात सहभागी करून घेता येईल. यामुळे त्यांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य प्राप्त होईल,” असे त्या म्हणाल्या.

तसेच भटक्या व विमुक्त समाजासाठी विशेष उपक्रम तयार करून त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय, “चौथ्या महिला धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करताना, त्यानुसार विभागाच्या योजना व धोरणे तयार करावीत,” असेही त्या स्पष्टपणे नमूद केले.

या बैठकीत पुढील काळात केवळ योजना सादरीकरणापुरते मर्यादित न राहता “क्रियान्वयन, मूल्यांकन आणि लोकसहभाग” या तीन मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून धोरणात्मक बैठका घेण्यावर एकमत झाले. भविष्यात पावसाचे प्रमाण, भूजल पातळी, शाश्वत सिंचन योजना आणि गावस्तरावर महिला पाणी समित्यांचा सहभाग यावरील सादरीकरणांची मालिका घेण्याची कल्पनाही बैठकीत मांडण्यात आली.

संजय शिरसाटांचा नोटांच्या बॅगेसह VIDEO:सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हातात सिगारेट अन् शेजारी पैसे

मुंबई-महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये बसलेले सिगारेट पीत आहेत आणि समोर एक बॅग दिसत आहे. या बॅगमध्ये पैसे असल्याचा दावा केला जात आहे. तसेच बाजूला आणखी एक बॅग उभी असल्याचे दिसत आहे.

(हा व्हायरल व्हिडीओ आहे ,खरा खोटा याबाबत आमचा कोणताही दावा नाही mymarathi.net)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात एका बॅगमध्ये पैसे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यावर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले असून राऊत यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

विधानभवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांनी आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचे काम केले आहे. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते, मग ते अमित शहा यांना भेटले आणि शिवसेना भाजपमध्ये विलीन करतो म्हणाले, असे मूर्खासारखे स्टेटमेंट संजय राऊतच करू शकतात. आम्ही जे काही त्यांना टोचले आहे, त्याची जखम आजही त्यांची भळभळते.

पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, एकंदरीत टार्गेट एकनाथ शिंदे असतात. एकनाथ शिंदे यांनी 3 वर्षापूर्वी जी काही भूमिका मांडली होती त्यामुळे त्यांची गेलेली सत्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आम्हाला सत्तेतून या माणसाने खेचले. माझी खुर्ची घेतली, मग 50 खोके, या सगळ्या वल्गना करून झाल्यावर नवीन स्टोरी बनवतात. संजय राऊत यांना हातपाय बांधून हॉस्पिटलमध्ये न्यावे की के अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

व्हिडिओ काय दाखवतो आहे की माझे घर आहे, माझी बेडरूम आहे, माझा लाडका कुत्रा आहे आणि एक बॅग तिथे ठेवली आहे. याचा अर्थ मी प्रवास करून आलो आहे आणि मी बेडवर बसलो आहे. अरे मूर्खांनो, पैसे असते तर अलमारीमध्ये ठोसले असते. परंतु, यांना कपड्याची बॅग सुद्धा पैशांची बॅग वाटते. यांना पैशांशिवाय काहीच दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या विमानातून खाली उतरून जात होते आणि त्यांचे बॉडीगार्ड ज्या काही बॅगा घेऊन चालले होते, त्यात पण यांना पैसे असल्याचे वाटले होते.

पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, आमच्याकडे मातोश्री 1, मातोश्री 2 नाही. माझे मतदारसंघातील प्रत्येक माणसाला विचारा, सगळ्यांना स्वागत असते. कार्यकर्ते असतात, एखाद्याने उत्साहाच्या भरात व्हिडिओ काढला असेल. माझ्याकडे कोणालाही चिठ्ठी देऊन बोलावले जात नाही. कार्यकर्त्यांसाठी आम्ही आहोत. आम्हाला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवले आहे, तुम्ही कार्यकर्ता म्हणून रहा.

पुण्यातील वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज; सोनाली मारणे यांनी घेतली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने, शिवसेनेच्या नेत्या  सोनाली मारणे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री  योगेश कदम यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा केली. त्यांनी मंत्री कदम यांच्याकडे पुणेतील महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र मानलं जातं, मात्र गेल्या काही महिन्यांत महिलांवरील अत्याचारांची वाढती संख्या या शहराची प्रतिमा मलिन करत आहे. या पार्श्वभूमीवर सोनाली मारणे यांनी गृहराज्यमंत्र्यांकडे खालील आकडेवारीसह निवेदन सादर केलं: बलात्काराचे गुन्हे (2024): ५०५, विनयभंगाचे गुन्हे (2024): ८६४, कौटुंबिक हिंसाचार: पुणे शहर राज्यात पहिल्या क्रमांकावर – २१८ गुन्हे (तुलनात्मकदृष्ट्या मुंबईत १८५ गुन्हे नोंदले गेले), एकूण गंभीर गुन्हे (2024): १२,९५४ या आकडेवारीवरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, त्वरित कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सोनाली मारणे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी  महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत, यामध्ये कायद्याची कडक अंमलबजावणी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तत्काळ कारवाई., पोलिसी यंत्रणा सक्षम करणे  आवश्यक आहे यात  महिला पोलीस पथकांची वाढ, तक्रारींवर त्वरित दखल, हेल्पलाईन क्रमांक अधिक सक्रिय करणे., महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल माहिती देणे, कायद्यांची जाणीव करून देणे. अत्याचारग्रस्त महिलांसाठी मानसिक आधार व मार्गदर्शनासाठी केंद्रांची गरज असल्याचे मारणे यांनी सांगितले.  

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतल्याचे समजते. पुणे पोलिसांसह संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना देऊन लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना राबवण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

“नव्या कार्यपद्धतीची नवी सुरुवात”खासदार मुरलीधर मोहोळ यांचे 24×7 नागरी सेवा देणारे अत्याधुनिक कार्यालय

पुणे – नागरिकांच्या केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित सर्व समस्या, मागण्या, योजनांचे मार्गदर्शन आणि तात्काळ सेवा मिळाव्यात यासाठी शहरात एक 24×7 सुरु असणारे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे संगणकीकृत नागरी सेवा कार्यालय जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी बागेसमोर सुरू करण्यात आले आहे. नागरिक केंद्रबिंदू ठेवून आखलेली ही संकल्पना नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार १२ जुलै दुपारी साडेतीन वाजता करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मुरलीधर मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यालय उद्घाटन समारंभा नंतर करण्यात येणार आहे. याच वेळेला मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या कोरोना काळातील स्वानुभवाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याचवेळी दोन सुसज्ज रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच पुण्यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमासाठी येत आहे. शहर भाजपच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यालयाचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले असून, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र काउंटरची व्यवस्था आहे. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, तसेच पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, पीएमआरडीए इत्यादी स्थानिक संस्थांशी संबंधित नागरी तक्रारीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रमुख सेवा विभाग खालीलप्रमाणे:

  1. केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित सेवा मार्गदर्शन
  2. नागरी विमान वाहतूक विभागासाठी स्वतंत्र कक्ष
  3. सहकार विभागासाठी स्वतंत्र काउंटर
  4. रेल्वे व तीर्थयात्रांशी संबंधित मदत केंद्र
  5. शासकीय योजना व लाभांसाठी मार्गदर्शन कक्ष
  6. महा ई सेवा केंद्र – सर्व प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे तत्काळ मिळण्याची सोय
  7. नोकरी व स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन विभाग
  8. स्वतंत्र वैद्यकीय सहायता कक्ष
  9. दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र सहाय्य केंद्र
  10. शैक्षणिक विभाग व शिष्यवृत्ती मार्गदर्शन केंद्र
  11. कायद्याविषयक सल्ला व मदत कक्ष

या कार्यालयाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे संपूर्ण सेवा डिजिटल व संगणकीकृत स्वरूपात उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांना रांगा लावाव्या लागणार नाहीत. डिजिटल टोकन, ई-डॉक्युमेंट सबमिशन आणि व्हर्च्युअल सल्ला सुविधा यामुळे हा अनुभव अधिक गतिमान आणि पारदर्शक ठरेल.

सर्वसामान्य नागरिक हेच केंद्रबिंदूया कार्यालयाची रचना ही पूर्णतः नागरिक केंद्रित आहे. शासकीय यंत्रणांमध्ये वावरण्याचा त्रास, माहितीच्या अभावामुळे होणारी अडथळे आता दूर होतील. विशेष म्हणजे दिव्यांग नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही सुलभ मार्गदर्शन आणि सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत.हे कार्यालय केवळ सेवांची सुविधा पुरवणारे नसून, लोकशाही मूल्यांना बळकट करणारा एक उपक्रम म्हणून पाहिले जात आहे. सर्व शासकीय सेवा एका छताखाली, २४ तास उपलब्ध करून देण्याची ही अभिनव संकल्पना भविष्यातील जनसंपर्क कार्यालयांसाठी एक रोल मॉडेल ठरणार आहे.

-केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ

खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा  “नाट्य परिषद करंडक”

पुणे-रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यंदा पुन्हा राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सव म्हणजेच ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आला आहे असे परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी हा स्पर्धात्मक महोत्सव राज्यस्तरावर आयोजित केला असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.

मागील वर्षी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर यशस्वीरित्या सादर झाला. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा यांचा समावेश होता.

यावर्षी पासून दरवर्षी ‘नाट्य परिषद करंडक’ ह्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीने ठरविले आहे.

ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अश्या दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ व रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ पासून विविध केंद्रांवर प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक २५ कलाकृतींची अंतिम फेरी मुंबई येथे दिनांक १५, १६, १७ व १८ सप्टेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, माटुंगा – माहीम, मुंबई येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकांकिका स्पर्धा घेण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका येतील त्याठिकाणी स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या मधून मिळणार आहे.

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी रोख पारितोषिके

एकांकिका स्पर्धा सर्वोत्कृष्ट प्रथम रु.१,००,०००/-,

उत्कृष्ट द्वितीय रु.७५,०००/-, उत्तम तृतीय रु.५०,०००/,

दोन उत्तेजनार्थ पारितोषिके  रु.१५,०००/-

तसेच लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/रंगभूषा व वेशभूषा/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय  वैयक्तिक रोख पारितोषिके (एकांकिका स्पर्धेसाठी) रु.७,०००/-, रु.५,०००/-, रु.३०००/- देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस सहभाग घेणाऱ्या संस्थांना सादरीकरण मानधन रु.२०००/- रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी कलावंत, तंत्रज्ञ यांना सहभागपत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रु.१०००/- ठेवण्यात आली आहे.

या स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून एकांकिका स्पर्धेची माहिती, नियमावली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक १० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, महाविद्यालय, हौशी संस्था, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला सहा पुरस्कार;सीएमडीलोकेश चंद्र यांना दोन पुरस्कार

मुंबई, दि. ११ जुलै २०२५: जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये ‘उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरण सहा पुरस्कारांचे मानकरी ठरले. यामध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचा वैयक्तिक गटात दोन पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

मानव संसाधन विकासाला चालना, कर्मचारी क्षमता, कौशल्य व ज्ञानाचा विकास, नवीन संकल्पना, एआय तंत्रज्ञान तसेच हरित ऊर्जेचा वापर व योजना आदींवर मुंबई येथे गुरूवारी (दि. १०) एक दिवसीय जागतिक मानव संसाधन विकास परिषद झाली. देशभरातील खासगी व सरकारी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित होते. यावेळी महावितरणकडून कर्मचारी प्रशिक्षण, विद्युत सुरक्षा मोहीम, एआय तंत्रज्ञानाचा वापर, हरित ऊर्जेवरील विविध योजनांची माहिती देण्यात आली.

या परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ अंतर्गत विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात महावितरणला सहा पुरस्कारांनी गौरवण्यात आले. सांघिक गटामध्ये, शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘बेस्ट इनोव्हेशन इन पॉवर/ एनर्जी’, मानव संसाधन विभाग अंतर्गत कर्मचारी कौशल्य विकास, क्षमतावाढ प्रशिक्षण व विद्युत सुरक्षेचे उपक्रम यासाठी ‘अवार्ड फॉर एक्सलेन्स इन ट्रेनिंग’, पुणे येथील हरित ऊर्जेवरील राज्यात पहिल्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी ‘बेस्ट एनवायरनमेंट फ्रेंडली प्रोजेक्ट’ हे तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांना वैयक्तिक गटात ‘सीएमडी ऑफ द इयर’ व ‘लिडरशिप एक्सलेन्स इन टेक्नोलॉजी इनोव्हेशन’ हे दोन पुरस्कार तर संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना ‘प्राईड ऑफ द प्रोफेशन’ पुरस्कार जाहीर झाला. या परिषदेत मानव संसाधन विकासाचे विशेषज्ञ डॉ. आर. एल. भाटिया, ‘आयआयएमए’च्या माजी अधिष्ठाता डॉ. इंदिरा पारेख यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट, कार्यकारी अभियंता (प्रशिक्षण) श्री. नरेंद्र सोनवणे, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी, सहायक अभियंता श्री. रूपेश खरपकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्राची फुले – शाहू – आंबेडकर भावना अन् विचारसरणी नष्ट करेल!

मुंबई-वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक किंवा महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध केला आहे. हे विधेयक महाराष्ट्राची फुले – शाहू – आंबेडकर भावना व विचारसरणी नष्ट करेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र विधानसभेने गुरूवारी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावर आपली मोहोर उमटवली. विरोधी पक्षांनी या विधेयकातील काही निवडक तरतुदींवर आक्षेप घेतला आहे. पण हे विधेयक विधानसभेमध्ये आवाजी मताने पारित करण्यात आल्यामुळे या आक्षेपांना आता फारसे महत्त्व उरले नाही. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला आहे.

प्रकाश आंबेडकर या विधेयकाला विरोध करताना म्हणाले की, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक किंवा महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे कठोर, दडपशाही, असंवैधानिक, अस्पष्टपणे परिभाषित, मनमानी आणि दुरुपयोगाची शक्यता वाढवणारे आहे. पण दुर्दैवाने हे विधेयक विधानसभेत विरोधकांच्या कोणत्याही हरकतींशिवाय मंजूर झाले. वंचित बहुजन आघाडी व आमच्या सदस्यांनी निवड समितीला 9 पानांचे पत्र लिहून हे विधेयक तत्काळ मागे घेण्याची मागणी केली होती.

या 9 पानी पत्रात आम्ही म्हटले होते की, आम्हाला चिंता आहे की, नक्षलवादाचा निपटारा करण्याच्या नावाने प्रस्तावित कायद्याचा वापर सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्या किंवा संभाव्य चुकांबद्दल वैध चिंता व्यक्त करणाऱ्यांना शांत करण्यासाठी केला जाईल. विशेषतः या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले तर सरकारच्या नीती, धोरणांविरुद्ध असहमती, निषेध, बंड आणि विरोध व्यक्त करणाऱ्या नागरिक, संघटना, राजकीय आणि धोरणकर्ते यांना गुन्हेगार ठरवण्यास कायदेशीर मान्यता देईल. महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक महाराष्ट्राची फुले – शाहू – आंबेडकर भावना आणि विचारसरणी नष्ट करेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक गत हिवाळी अधिवेशनात सरकारने हे विधेयक सभागृहाच्या पटलावर आणले होते. परंतु त्यातील काही तरतुदींवर कडाडून टीका झाली. त्यानंतर ते संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले होते. या समितीने आपला अहवाल 9 जुलै रोजी विधानसभेत सादर केला. समितीने केलेल्या सुधारणांनुसार विधेयकात बदल करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी (10 जुलै) सुधारित जनसुरक्षा विधेयक महायुती सरकारने विधानसभेत सादर केले. त्यानंतर संक्षिप्त चर्चेअंती ते लगेचच हातावेगळे करण्यात आले.

मूळ विधेयकात ‘व्यक्ती आणि संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी’ अशी तरतूद होती. त्याऐवजी ‘कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या किंवा त्यासारख्या संघटनांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांचा प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींकरीता तरतूद करण्यासाठी विधेयक’ असा बदल करण्यात आला आहे.मूळ विधेयकात ‘व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी विधेयक’ अशी तरतूद होती.

येरवडा येथील हॉट मिक्स प्लांटला ठोकले आंदोलकांनी टाळे, यामुळे श्वसनाचे आजार होत असल्याचे आरोप

पुणे- शहर कॉंग्रेस कमिटी व वडगावशेरी विधानसभा मतदार संघ यांच्यावतीने येरवडा येथील डांबर प्लांटला टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.या डांबर प्लांटच्या प्रदुषणा मुळे येरवडा भागातील नागरिकांना श्वसनाचा आजार टि.बी., दमा, कॅन्सर असे अनेक रूग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त व मुख्य अभियंता (पथ विभाग) यांना निवेदन द्वारे तक्रार करण्यात आली होती व कारवाई न केल्यामुळे गुरूवार दिनांक १०|०७।२०२५ रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने येरवडा ब्लॉक काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रमेश सकट यांच्या नेतृत्वाखाली डांबर प्लांटच्या गेटला कुलूप लावून टाळा ठोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनास नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

याप्रसंगी अरुण वाघमारे, आश्विनी डॅनियल लांडगे, ज्योती विल्सन चंदेवळ, राकेश चौरे, संतोष आरडे, रेखा घलोत,विशाल मलके,अमित कांबळे, सुरेश राठोड,आनिल आहिर, डॅनियल लांडगे,विल्सन चंदेवळ,नागेश भालेराव, हसिनाआपा सय्यद,सुनील काळोखे,आमर मांडलिक, कैलास गलांडे,युसूफ शेख, दिनेश कांबळे,तारा शर्मा, गणेश मिसाळ, संजय दहिभाते, गणेश कांबळे, डॅनियल मगर,मकसूद शेख,सुनील खरे,लतेश सारंग, पप्पीसिंग सहोत्रा,मुस्तफा हानुरे व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक सहभागी झाले होते.

पीएमआरडीए क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा वेग वाढवा:आमदार सुनील शेळके

पुणे-पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरआढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे.

पीएमआरडीए कडून काही मोठ्या गृहप्रकल्पांना कोणतीही शहानिशा न करता, नियमनाचे उल्लंघन करत पूर्णत्वाचे दाखले दिले जात असल्याच्या तक्रारी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत मांडल्या होत्या. त्यावरून १९ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीत संबंधित प्रकल्पांची यादी, कारवाईचा तपशील व विकासकांविरोधातील लेखी तक्रारी याबाबत आठ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.आज झालेल्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या अहवालात मावळ तालुक्यातील काही प्रकल्पांमधून दूषित व पिण्यायोग्य नसलेले पाणी पुरवले जात असल्याचे स्पष्ट झाले. अनेक प्रकल्पांमधून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले जात असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अपुऱ्या नागरी सुविधांमुळे रहिवासी त्रस्त आहेत, तर विकासकांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.

विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना पुढील १५ दिवसांत ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले. “नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही,” असे ते म्हणाले.या फेरआढावा बैठकीस संबंधित वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. योगेश म्हसे (महानगर आयुक्त, पीएमआरडीए), शेखर सिंह – (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका) सुरेंद्र नवले (उपविभागीय अधिकारी, मावळ), विक्रम देशमुख (तहसीलदार, मावळ) आदींचा समावेश होता.या निर्णयामुळे मावळ, मुळशी आणि पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित पाणी, योग्य सुविधा, पर्यावरण रक्षण आणि कायदेशीर आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विषय निर्णायक वळणावर पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.

साधु वासवानी मिशनमध्ये १०८ हवनांनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

दीदी कृष्णाकुमारी यांनी गुरूच्या महानतेविषयी भावस्पर्शी मनोगत व्यक्त केलं

पुणे-साधु वासवानी मिशनमध्ये गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव गुरुवार, १० जुलै रोजी अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या दिवशी, गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची अर्पणावाणी वाहताना, देश-विदेशातून आलेले शेकडो श्रद्धावान भाविक उपस्थित होते. अनेक श्रद्धाळू गुरुदेव साधु वासवानी आणि परमपूज्य  दादा जे . पी.वासवानी यांना आपले आध्यात्मिक गुरू मानतात, आणि त्यांच्या कालातीत शिकवणींना समर्पित हा दिवस होता. मिशनच्या आंतरराष्ट्रीय केंद्रांमध्येही यानिमित्ताने विशेष सत्संग, उपासना आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उत्सवाची सुरुवात पहाटे ६ वाजता, गुरूंच्या समाधीस्थानी त्यांच्या पवित्र मूर्तीवर अभिषेक व पूजनाने झाली. त्यानंतर, अत्यंत पवित्र वातावरणात १०८ हवन करण्यात आले, आणि १०८ वेळा गायत्री मंत्राचा घोष झाला. ऋषिमुनींनी १०८ या संख्येला पूर्णत्वाचे आणि दिव्यतेचे प्रतीक मानले असून, ती माणसाला दैवतेशी जोडते, असा गाढ विश्वास आहे. विशेष म्हणजे, या हवनांमध्ये लहान मुलेदेखील सहभागी झाली होती, ज्यांची वय केवळ चार वर्षांची होती.

सकाळी ११:३० वाजता सत्संगाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात भक्तीमय भजने, कीर्तने सादर करण्यात आली, तसेच मिशनच्या प्रमुख दीदी कृष्णाकुमारी यांनी आपल्या आध्यात्मिक विचारांची अमृतवाणी प्रकट केली. त्या म्हणाल्या, “गुरूचं अस्तित्व हे शाश्वत असतं. तो आपल्या जीवनाचा संरक्षक, मार्गदर्शक असतो. मात्र शिष्याने त्या मार्गावर श्रद्धा आणि समर्पणाने चालावं लागतं.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थित भाविकांच्या अंतःकरणात भावनांचे गंगेचे वाहावं, अशी अवस्था निर्माण झाली.

दुपारी १ वाजता सर्व भाविकांसाठी लंगर म्हणजेच प्रसादरूप भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळच्या सत्संगातही भजने, कीर्तने व गुरुदेव साधु वासवानी आणि  परमपूज्य दादा जे . पी.वासवानी यांच्या जीवनदृष्टी, शिकवणी यांचे मनोगत ऐकवण्यात आले. या आध्यात्मिक पर्वाचे महत्त्व सांगताना मिशनने सामाजिक सेवाही पुढे नेली.
सेवा उपक्रमांतर्गत:
• पुण्यातील रुग्णालयांमध्ये फळांचे वाटप करण्यात आले.
• गरजू कुटुंबांना अन्नधान्याची मदत देण्यात आली.
• महापालिकेच्या चार शाळांमधील तब्बल ८०० विद्यार्थ्यांना स्टेशनरी किट्स, मोजे आणि रुमाल यांचे वाटप करण्यात आले.

या दिवशी अनेक भाविकांनी गुरूंच्या कृपेचे अनुभव शेअर केले.

राजू अकाली म्हणाले, “गुरू हा क्षमाशील, प्रेमळ आणि सदैव देणारा असतो. तो आपल्यासोबतच असतो – देवाच्या प्रत्यक्ष रूपात.”

नीलम यांनी सांगितले, “‘दादा माझे गुरू आहेत’ हे स्मरणच अंतःकरणाला शांतता आणि बळ देतं. त्यांच्या समाधीसमोर उभं राहिलं की, एक अद्भुत शक्तीची अनुभूती होते.”

रामप्रसाद, जे गेली २८ वर्षे मिशनमध्ये वॉचमन म्हणून कार्यरत आहेत, म्हणाले, “दादा हे आमचे दिशादर्शक आहेत. ते शरीररूपात असताना जसं रक्षण करत होते, तसंच आजही सूक्ष्म रूपात आमचं मार्गदर्शन करत आहेत.”

आषाढ पौर्णिमा, म्हणजेच गुरुपौर्णिमा — हा दिवस केवळ उत्सव नव्हे, तर शिष्याच्या अज्ञानातून ज्ञानाकडे, अंध:कारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूला कृतज्ञतेने नमन करण्याचा दिवस आहे.

दीदी कृष्णाकुमारी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली साधू वासवानी मिशन दररोज गरजूंना मोफत अन्नदान, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मदतकार्य आणि प्राणीमित्रांसाठी सेवाभाव असे विविध उपक्रम सातत्याने राबवत असते — हीच खरी गुरूस्मृती!

वाहनधारकांसाठी भाजी, फळ विक्रेत्यांना हटवायचे हे कसले नियोजन आहे?फेरीवाल्यांना न हटवता वाहतुकीचे नियमन करा:व्यापारी, नागरिक शहराचे आधारस्तंभ

पुणे– खुर्चीत बसून शहराचे नियोजन होत नाही. त्यासाठी ग्राऊंडची स्थिती लक्षात घ्यायला हवी. वाहतूक कोंडी होतेय म्हणून फेरीवाल्यांना हटवणे हा त्यावरचा पर्यायच असू शकत नाही. वाहतुकीचे नियोजन करण्यापेक्षा नियमन महत्वाचे आहे.बाजारात येणाऱ्या लोकांना त्यांच्या मोटार सायकलींसाठी पार्किंगची व्यवस्था जवळपास करायला हवी. वाहनधारकांचे लाड बंद करुन स्थानिक प्रशासनाने फेरीवाल्यांचे नियोजन करायला हवे. शहर वाढत असल्याने त्या त्या भागात काही दुकाने सबसिडीच्या धर्तीवर भाजीविक्रेत्यांसाठी द्यायला हवेत. व्यापारी, नागरिक हे शहराचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यासाठी कोणाला किती महत्व द्यायचे याचे तारतम्य ठेवले पाहिजे. पारंपारिक जागा महत्वाच्या आहेत. परंपरेचा अभियान असल्याचे म्हंटले जाते.

वाहनधारकांसाठी भाजी, फळ विक्रेत्यांना हटवायचे हे कसले नियोजन आहे. व्यापारी, नागरिकांसाठी सोयीचे धोरण आवश्यक आहे. वाहतूकीच्या नियोजन ऐवजी नियमन करावे लागेल. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या दुचाकींसाठी काही अंतरावर पार्किंगची व्यवस्था करायला हवी. फेरीवाले संदर्भात निर्णय घेताना घटनास्थळावर जावून सर्वे करावा. व्यापारी, नागरिकांच्या दृष्टीने व्यापारासाठीचा विचार प्राधान्याने व्हावा. वाहनधारकांसाठी व्यापाऱ्यांना अडचण निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.अशी मते आता अनेक मान्यवर नागरिकही मांडू लागले आहेत

कर्नाटक:४० दिवसांत १९ ते ४५ वयोगटातील हार्ट अटॅकने 30 मृत्यू; भीतीपोटी हासनहून म्हैसूरला आला जमाव

कर्नाटकात म्हैसूरमध्ये श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोव्हॅस्कुलर सायन्सेस अँड रिसर्चचे मोठे रुग्णालय आहे. सायंकाळचे ४.०० वाजले तरीही ३०० लोक येथे आहेत. यात बहुतांश १११ किमी दूर हासन व मांड्यातून आले आहेत. तेथे ४० दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने सुमारे ३० मृत्यू झाले आहेत. मृतांचे वय १९ ते ४५ दरम्यान होते. त्यामुळे या वयोगटातील बहुतांश लोक या रुग्णालयात तपासणीसाठी आले आहेत.

यातील ४२ वर्षीय डी.सदागौडा यांनी सांगितले की, आमच्या भागात भीतीचे वातारण आहे. सर्व लोक घाबरले आहेत. आम्ही ३० जण सोबत आलो आहोत. दोन दिवसांपासून रांगेत आहोत, मात्र नंबर आला नाही. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. के.एस. सदानंद यांनी भास्करला सांगितले की, येथे हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या १००% हून जास्त वाढली आहे. याआधी रोज ३०० ची ओपीडी होती. आता हासन, मांड्या, कोडागू, चामराजनगरमधून १ हजार लोक येत आहेत. सकाळी ५.०० पासून रांग लागली आहे. हासनची माती आणि पाण्यात असे काही नाही, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकेल, हे आम्ही लोकांना समजून सांगितले आहे. हे केवळ जीवनशैलीचे प्रकरण आहे.

डाॅ. सदानंद यांच्यानुसार, कन्नड अभिनेता पुनीतकुमार यांच्या हार्ट अटॅकने झालेल्या मृत्यूनंतर जशी गर्दी झाली होती, तशी आता होत आहे. लोक छातीत जळजळ झाल्यावरही रुग्णालयात येत आहेत. याचे कारण म्हणजे, हृदयविकाराची समस्या तिशीतील लोकांनाही होत आहे. हासनच्या रुग्णालयातही हीच स्थिती आहे. येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.अनिल म्हणाले, सामान्य वैद्यकीय अहवाल आल्यानंतरही लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही.त्यामुळे अनेक जण बंगळुरू आणि म्हैसूरला येत आहेत.

श्री जयदेव इन्स्टिट्यूटचे संचालक डाॅ. रवींद्रनाथ म्हणाले, हासनच्या खासगी रुग्णालयांत हृदयविकाराचे २०० वर रुग्ण आहेत. हृदयविकाराच्या झटक्याचा मृत्युदर ५ ते ६% असतो. अनेकदा हा ८% पर्यंत पोहोचतो. गेल्या ४० दिवसांत तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे रुग्ण का वाढले, याची चौकशी केली. मात्र, हासनमध्ये होत असलेले मृत्यू राज्यातील इतर जिल्ह्यांसमान आहेत.

नवोदित कलाकारांना योग्य व्यासपीठ:स्क्रीन अकॅडमीची घोषणा !

 सिनेमाचे प्रशिक्षण देणा-या नामांकित शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना अकॅडमीकडून शिष्यवृत्ती दिली जाईल. ही संस्था ना नफा तोट्यावर काम करेल. कान्स आणि ऑस्कर पुरस्कार विजेत्या गुनीत मोंगा, पायल कपाडिया, रेसुल पुकुट्टी या संस्थेचे सदस्य म्हणून काम पाहतील.

मुंबई, :  इंडियन एक्सप्रेस ग्रुप आणि स्क्रीन या प्रकाशन संस्थेने बुधवारी स्क्रीन अकॅडमीची घोषणा केली आहे. व्यावसायिक प्रगतीसाठी या अकॅडमीची उभारणी होत नसल्याचे अकॅडमीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. नवोदित कलाकारांना योग्य व्यासपीठ देणे स्क्रीन अकॅडमीचे मुख्य उद्दिष्ट आहे. संस्था भारतीय चित्रपटसृष्टीतील करिअर घडवू इच्छिणा-या नवोदित कलाकारांना त्यांचे कौशल्य विकसित करण्यात मदत करेल, त्यांना मार्गदर्शन करेल.

कान्स आणि ऑस्कर पुरस्कार विजेते गुनीत मोंगा, पायल कपाडिया, रेसुल पुकुट्टी तसेच ज्येष्ठ पटकथा लेखक अंजुम राजाबली आदी मान्यवर या स्क्रीन अकॅडमीचे सदस्य म्हणून काम पाहतील. येत्या काळात अनेक प्रतिथियश व्यक्ती या संस्थेशी जोडली जाणार आहेत. स्क्रीन अकॅडमी भारतीताल प्रमुख चित्रपट संस्थांसोबत काम करेल. या माध्यमातून भारतातील नव्या प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांना जागतिक स्तरावरील चित्रपट निर्मितीचे शिक्षण देता येईल. या शिक्षणातून नवोदितांना आपली कला सादर करण्याच्या अनेक संधी निर्माण होतील. या नव्या चेह-यांची स्वतंत्र ओळख निर्माण होईल, असा विश्वास स्क्रीन अकॅडमीच्यावतीने व्यक्त करण्यात आला. लोढा फाऊंडेशनचे संस्थापक अभिषेक लोढा यांनी या अकॅडमीच्या उभारणीसाठी आर्थिक साहाय्य केले. स्क्रीन अकॅडमी नवोदित कलाकारांना चित्रपटाशी संबंधित मूलभूत शिक्षण देईल.  पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी थेट अर्ज करता येणार नाही. त्यांना यापूर्वी सिनेमाचे प्रशिक्षण देणा-या संस्थांच्यावतीनेशिष्यवृत्तीसाठी शिफारस करावी लागेल. अर्जप्रक्रियेचा तपशील  www.screenacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

“योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी स्क्रीन अकॅडमीची उभारणी होत आहे, या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्क्रीन अकॅडमीची प्रशंसा केली. मुंबई शहराचे चित्रपटसृष्टीशी अतूट नाते आहे. अगदी गरजेच्या वेळी योग्य ठिकाणी या अकॅडमीची उभारली जात आहे. द इंडियन एक्सप्रेस ग्रुपतर्फे सुरु होणी स्क्रीन अकॅडमी ही संस्था ना-नफा तत्त्वार सुरु होत असल्याचे ऐकून मला अतिशय आनंद झाला. या अकॅडमीतून शिकणारे नवोदित आणि प्रशिक्षित चित्रपटकर्मी भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देतील. या नव्या प्रतिभावंत कलाकारांमुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा वेगाने विकास होईल, ” असा विश्वास मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.  

इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक आनंद गोएंका यांनी स्क्रीन अकॅडमीच्या उभारणीमागील आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “आम्ही स्क्रीन अकॅडमीच्या माध्यमातून मनोरंजन आणि संस्कृतीच्या क्षेत्रात उत्कृष्टतेला संस्थात्मक स्वरुप देण्याच्या दिशेने टाकलेले धाडसी पाऊल आहे. या संस्थेतून आम्ही उत्कृष्ट कलाकारांचा सन्मान करु. कलाकारांना आर्थिक मदतीसह आवश्यक संसाधनेही पुरवली जातील.”

लोढा फाऊंडेशनचे संस्थापक अभिषेक लोढा यांनी सांगितले, आपल्या देशातील कलाक्षेत्राचा विकास साधत आपण इतर देशांवर प्रभाव टाकण्याची क्षमता ठेवतो. या कामासाठी स्क्रीन अकॅडमीचे कार्य फार महत्त्वाचे आहे. यामुळे आपला देश सर्जनशील कलाक्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडी घेऊ शकतो. लोढा फाऊंडेशन २०२७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वतोपरि पाठिंबा देत आहे. चित्रपट आणि सर्जनशी कला हे आपल्या देशाची प्रमुख ताकद आहे. या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर आघाडी मिळवून देण्यासाठी स्क्रीन अकॅडमी महत्त्वाची भूमिका बजावेल. या महत्त्वकांक्षी उपक्रमात स्क्रीन अकॅडमीसोबत भागीदारी करताना लोढा फाऊंडेशनला आनंद होत आहे.”

शैक्षणिक उत्कृष्टता आणि उद्योगाचे एकत्रिकरण स्क्रीन अकॅडमी फेलोशिप २०२५ अंतर्गत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संपूर्ण आर्थिक साहाय्य दिले जाईल. हे पदव्युत्तर शिक्षण पुण्यातील फिल्म एण्ड टेलिव्हिजनइन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म एण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आणि मुंबईतील व्हिललिंग वुड्स इंटरनॅशनल या संस्थांमधून पूर्ण करण्याची संधी असेल. भविष्यात देशभरात आपला विस्तार करण्याची स्क्रीन अकॅडमीची योजना आहे. यातून देशभरातील विविध चित्रपट शाळांचा अकॅडमीत समावेश करता येईल.

स्क्रीन अकॅडमीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ तर मिळेलच शिवाय सिनेसृष्टीतील नामवंत आणि अनुभवी कलाकारांकडून मार्गदर्शन मिळेल. तज्ज्ञांकडून अकॅडमीच्या कामकाजाही पाहिले जाईल. अकॅडमीतील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना चित्रपटांशी संबंधित विविध बारकावे शिकवतील, त्यांच्या मार्गदर्शनातून थेट कामकाजाशी संबंधित इंटर्नशिपच्याही संधी उपलब्ध होतील.

फिल्म एण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक धीरज सिंग यांनी स्क्रीनसोबतच्या नव्या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “स्क्रीन हे सिनेमा विषयातील पत्रकारितेतील अत्यंत प्रतिष्ठित नाव आहे. स्क्रीन सोबतच्या भागीदारीतून चांगले परिणाम दिसून येतील. या शिष्यवृत्तीमुळे चांगले विद्यार्थी घडतील तसेच सिनेसृष्टीलाही नवे मूर्त स्वरुप येईल.”

सत्यजित रे इन्स्टिट्यूटचे प्रभारी संचालक समीरन दत्ता यांनी स्क्रीन फेलोशिपचे महत्त्व पटवून दिले. “आपल्याकडे केवळ शहरातूनच नव्हे तर देशाच्या विविध कानाकोप-यांतील लोकांमध्ये उत्तम कल्पना आणि कथानकांची प्रतिभा दडलेली आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील शिक्षणाचा भार पेलता येत नाही. स्क्रीन अकॅडमीची फेलोशिप या विद्यार्थ्यांना सिनेमाचे तंत्रशुद्ध शिक्षण देण्यास मदत करेल.”, असे समीरन दत्ता म्हणाले.

व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षा मेघना घई पुरी म्हणाल्या, “ व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन बदलते. विद्यार्थ्यांमध्ये दडलेली सर्जनशीलता आणि महत्त्वकांक्षेत आर्थिक अडचणी उभ्या राहतात. परंतु आय.ई.स्क्रीन फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीमुळे या आर्थिक अडचणीवरही मात करता येणे शक्य झाले आहे. ही भागीदारी उत्कृष्टता, सर्वसमावेशकता आणि भविष्यातील कलाकार घडवणे या सामायिक मूल्यांवर आधारित आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड प्रसिद्ध पटकथा लेखक आणि चित्रपटतज्ज्ञ अंजुम राजाबाली यांच्या देखरेखीखाली कार्यरत समितीकडून केली जाईल. “हा उपक्रम नवोदित तरुण कलाकारांना कला क्षेत्रातील मूलभूत शिक्षण देण्यासाठी आधार देत आहे. चित्रपटी, टीव्ही तसेचओटीटी क्षेत्रातील प्रतिभावान कलाकारांकडून मार्गदर्शन लाभल्याने हे नवोदित कलाकार कायमच कृतज्ञ राहतील. या शब्दांत अंजुम राजाबाली यांनी शिष्यवृत्तीचे महत्त्व पटवून दिले. “या शिष्यवृत्तीमुळे लेखन आणि चित्रपट निर्मितीची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. ” अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ”

स्क्रीन अकॅडमीमध्ये सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार, तज्ज्ञ मंडळी आपले अभूतपूर्व योगदान देणार आहे. या प्रतिथियश कलाकारांच्या नावांची यादी खाली नमूद करण्यात आली आहे.

● गुनीत मोंगा – ऑस्कर पुरस्कार विजेता निर्मात्या.

पायल कपाडिया – कान्स ग्रँण्ड प्रिक्स विजेत्या, कपाडिया यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले आहे.

● रेसुल पुकुट्टी – ऑस्कर विजेते ध्वनी डिझायनर

● रॉनी स्क्रूवाला – आरएसव्हीपी फिल्म्सचे संस्थापक आणि अपग्रेड या ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक

● सुभाष घई– ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलचे संस्थापक

स्क्रीन अकॅडमीमध्ये सहभागी सदस्यांची पूर्ण यादी लवकरच www.screenacademy.org या अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल.

उत्कृष्टतेचा नवा आयाम

येत्या काळात स्क्रीन अकॅडमी स्क्रीन पुरस्कारांचेही आयोजन करेल. या पुरस्कारांमध्ये चित्रपटसृष्टीतील कलात्मक सर्जनशीलता, सांस्कृतिक गुणवत्ता आणि तांत्रिक नवकल्पनांचा गौरव केला जाईल. या पुरस्कार निवडीसाठी अकॅडमीच्या सदस्यांची मतदान प्रक्रिया राबवली जाईल. या मतदानातून पुरस्कार निवडीचा अंतिम निर्णय घेताना विश्वासार्हता आणि अनुभव संपन्नता जपली जाईल. स्क्रीन अकॅडमीची उत्कृष्ट गुणवत्ता सांभाळण्याची जबाबदारी पेलण्यासाठी रेसिडेंट क्रिटिक्स पॅनलची स्थापना करण्यात आली आहे. यात लॉस एंजेलिस येथील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधील सिनेमा आणि मिडीया स्टडीज विभागातील सिनेमॅटिक आर्ट्सच्या प्राध्यापिका डॉ. प्रिया जयकुमार, स्क्रीन पुरस्कारांच्या आयोजिका प्रियांका सिन्हा झा, द इंडियन एक्सप्रेसच्या चित्रपट समीक्षिका शुभ्रा गुप्ता, वी आर युवा या डिजीटल प्लॅटफॉर्मचे निखिल तनेजा, प्रसिद्धपटकथा लेखक आणि व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल तसेच एफटीआयआयमधील पटकथा लेथन विभागाचे प्रमुख अंजुम राजाबाली यांचा या रेसिडेंट क्रिटिक्स पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

स्क्रीन अकॅडमीच्या स्क्रीन पुरस्कारांच्या आयोजिका प्रियांका सिन्हा झा यांनीही आपले मत मांडले. त्या म्हणाल्या, “स्क्रीन अकॅडमी भविष्यात चित्रपट, संगीत, रंगभूमी, प्रादेशिक चित्रपट आणि इतर संबंधित कला प्रकारांमधील उत्कृष्ट योगदानाचा सन्मान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यातील पारदर्शकता, न्याय आणि विश्वासार्हता निश्चित करण्यासाठी योग्य वर्गवारी, आवश्यक निकष तसेच मूल्यांकन या घटकांवर आधारित प्रणाली तयार केली जाईल.”