Home Blog Page 459

“संजय दत्तने तेव्हा सारे संगितले असते तर १९९३ च्या बॉम्बस्फोटात २६७ लोकांचा बळी गेलाच नसता!”

मुंबई प्रतिनिधी :
दि. १५ जुलै २०२५

भाजपा नेते बनलेले आणि राज्यसभेचे नवोदित सदस्य म्हणजे खासदार झालेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एका मुलाखतीदरम्यान 1993 मध्ये झालेला मुंबई बॉम्बस्फोट आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की जर संजय दत्तने त्यावेळी तोंड उघडले असते तर मुंबई शहर बॉम्बस्फोटांनी हादरले नसते आणि २६७ लोकांचा जीव गेला नसता.

संजय दत्तच्या एका चुकीमुळे मुंबईत बॉम्बस्फोट

१९९३ च्या बॉम्बस्फोटांशिवाय अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम केलेले उज्ज्वल निकम यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “अबू सालेम बॉम्बस्फोटाच्या एक दिवस आधी संजय दत्तच्या घरी शस्त्रांनी भरलेली व्हॅन घेऊन गेला होता. अभिनेत्याने त्यातून काही हँडग्रेनेड आणि बंदुका घेतल्या होत्या, त्यावेळी त्याने फक्त AK-47 बंदूक स्वतःकडे ठेवली होती आणि बाकी सर्व काही परत केल्या होत्या. जर संजय दत्तने त्या शस्त्रांनी भरलेल्या व्हॅनबद्दल पोलिसांना तेव्हाच माहिती दिली असती तर पोलिसांनी तपास केला असता आणि १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेला बॉम्बस्फोट रोखता आला असता.”

ते पुढे म्हणाले, “पोलिसांना माहिती न देणे हेच एवढा मोठा दहशतवादी हल्ला होण्यामागील कारण होते. अभिनेत्याने बाळगलेल्या मौनामुळे अनेकांचेजीव गेले.” बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल संजय दत्तला टाडा अंतर्गत अटक करण्यात आली होती. नंतर त्याला फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आणि पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. अभिनेत्याने पुण्याच्या येरवडा तुरुंगात ही शिक्षा पूर्ण केली. 2016 मध्ये त्याची सुटका झाली.

मुलाखतीदरम्यान, उज्वल निकम यांनी संजय दत्तला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आले तेव्हा त्यांनी अभिनेत्याला काय म्हटले होते ते देखील सांगितले. निकम म्हणाले, “मला त्याचे हाव भाव बदलताना दिसले. मला वाटले की त्याला धक्का बसला आहे. तो निकाल सहन करू शकला नाही आणि त्याचा चेहरा पडला होता. मी विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या संजय दत्तला सांगितले, ‘संजय, असे करू नकोस. मीडिया तुला पाहत आहे. तू एक अभिनेता आहेस. जर तू शिक्षेला घाबरलेला दिसलास तर लोक तुला दोषी मानतील. तुला अपील करण्याची संधी आहे.’ त्यावर संजय दत्तने “होय सर, हो सर” असे म्हटले आणि त्यानंतर तो गप्प बसला आणि निघून गेला.

उज्वल निकम यांनी असाही दावा केला की संजय दत्त निर्दोष आहे. त्याने शस्त्रांचा शौक असल्यानेच बंदूक ठेवली होती. कायद्याच्या दृष्टीने त्याने गुन्हा केला असला तरी प्रत्यक्षात तो एक साधा माणूस आहे. संजयकडे एके-47होती, पण त्याने ती कधीही वापरली नाही.

औंध, बालेवाडी व खडकी परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांवर तात्काळ कारवाई करण्याची माजी नगरसेवक सनी निम्हण यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पुणे : शहराच्या पश्चिम भागातील औंध, बालेवाडी व खडकी या रहिवासी आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरांमध्ये गेल्या काही दिवसांत भरदिवसा होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांच्या दागिन्यांची उघडपणे चोरी, घरे व व्यावसायिक स्थळांवर धाडसी चोऱ्या यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावत आहे. या घटनांना आळा घालावा आणि दोषींवर तत्काल कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात सनी निम्हण यांनी म्हटले आहे की,  चोरी आणि लुटीच्या घटनांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणेबाबतचा विश्वास डळमळीत होत चालला आहे. सार्वजनिक सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

या उपाययोजना करण्याची मागणी

१. संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त व बंदोबस्तात वाढ करावी, विशेषतः चोरी होणाऱ्या भागांमध्ये दिवसाच्या वेळेतही नियमित पोलीस गस्तीस प्राधान्य द्यावे.

२. सीसीटीव्ही यंत्रणेची स्थिती तपासून निकृष्ट वा बंद अवस्थेतील उपकरणे दुरुस्त अथवा बदलण्यात यावीत, सार्वजनिक ठिकाणांवरील देखरेखीच्या व्यवस्थेचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करावा.

३. स्थानीय रहिवाशांशी समन्वय साधण्यासाठी ‘मोहल्ला कमिटी’ व ‘बीट पोलिसिंग’ उपक्रम अधिक सक्रिय व प्रभावीपणे राबवावे, नागरिकांच्या सहभागातून स्थानिक पातळीवर गुन्हेगारी रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा.

४. चोरीच्या घटनांची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर व त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारे झालेल्या घटनांचे लवकरात लवकर उकल होणे आवश्यक आहे.

५. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी नियमित संवाद बैठकांचे आयोजन करावे, पोलिसांनी समुदायाशी थेट संवाद साधल्यास भीती दूर होऊन जनतेचा सहभाग वाढेल.

वरील गोष्टींची तात्काळ अंमलबजावणी केल्यास परिसरातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होईल आणि नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास पुनः दृढ होईल, अशी आम्हांस खात्री वाटते. आपल्याकडून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी अपेक्षा सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केली आहे.

कात्रज उद्यानातील १४ हरणांचा मृत्यू, प्रशासनाने दक्षता घेण्याची आमदार हेमंत रासनेंची विधानसभेत मागणी

मुंबई/पुणे (दि १५) : कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी संग्रहालयात मागील मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विषाणूजन्य आजाराने हरणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार हेमंत रासने यांनी हरणांच्या मृत्यूचा मुद्दा विधानसभेत मांडत प्रशासनाने इतर प्राण्यांना धोका होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

“कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय गेली दोन दिवसात 14 हरणांचा अचानक मृत्यू झाला असून अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. साथीच्या रोगामुळे असे झाल्याची शक्यता आहे, त्यामुळे इतर प्राण्यांना त्याचा काही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी तातडीने शासनाने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत” अशी मागणी रासने यांनी केली आहे..

याबद्दल बोलताना हेमंत रासने म्हणाले, “कात्रजच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात १४ हरणांचा मृत्यू ही अतिशय दुर्दैवी व धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा निर्माण झाला आहे. अद्याप पोस्टमार्टम अहवाल न आलेला असला, तरी साथीच्या रोगाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इतर प्राण्यांना धोका होऊ नये, यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. प्रशासनाने दक्षता घ्यावी. प्राणीसंग्रहाल पुणे शहरासह राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असल्याने प्राण्यांची सुरक्षितता महत्वाची आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड मध्ये ‘शासन आपल्या दारी’ला प्रचंड प्रतिसाद

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे गोकुळ सभागृह, सुतारदरा,कोथरूड येथे आयोजन केले होते . माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.विविध शासकीय सोयी सुविधांची माहिती आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे कशी उपलब्ध करवून घ्यावीत याची माहिती देत त्याबाबत प्रत्यक्षात कागदपत्रे आणि सुविधा मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांना विनामुल्य मदत केली .
या उपक्रमा अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ कोथरूड भागातील सुतारदरा,जयभवानी नगर, किष्किंधानगर, शिवतीर्थनगर, म्हातोबा नगर येथील सुमारे ७०० पेक्षा जास्त नागरिकांना करून देण्यात आला. त्यामध्ये आधारकार्ड दुरुस्ती करणे, रेशनकार्ड दुरुस्ती करणे, ज्येष्ठ नागरिक कार्ड, शहरी गरीब कार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर दाखला ही शासकीय कागदपत्रे तसेच राज्य सरकारच्या तरुण,तरुणी, महिलांसाठीच्या विविध योजना यांची माहिती देऊन पूर्तता करण्यात आली.
सदर लोकाभिमुख उपक्रमाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, सौ. तृप्ती शिंदे, सौ. कांता खिलारे यांनी अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले होते.

महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध.

मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसची “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” मराठी भाषा कार्यशाळा.

मुंबई, दि. १५ जुलै २०२५
मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही मारहाण करणार नाही तर मराठी शिकवू व ती टिकवू. महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच आहेत या मराठीला हात लावाल तर खरबरदार, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” मराठी भाषा कार्यशाळेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, भावना जैन, रमेश शेट्टी, मराठी भाषा विभागाचे दीपक पवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यासह हजारो मराठीप्रेमी जनता उपस्थित होती.

या कार्यक्रमात पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हिंदी सक्तीचा जो नंगानाच घातला गेला त्याचा उगम माजी सरसंघचालक गोलवकर यांच्या बंच ऑफ थॉट पुस्तकातून आलेला आहे. भाजपा व संघाला भारताचे संविधान मान्य नाही, विविधतेत एकता ही आपली ओळख आहे तर भाजपाला मात्र वन नेशन वन इलेक्शन, वन लँगवेज आणायची आहे. विविधता नाकारणारी विखारी व विषारी अशी ही संकल्पना बंच ऑफ थॉटमधून आलेली आहे. हिंदी, हिंदुत्व व हिंदुराष्ट्र ही संकल्पना भाजपा व संघाला राबवायची आहे, त्यासाठीच भाजपा सरकारने हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणलेला आहे.

या कार्यक्रमासाठी मीरा रोडच का निवडले हे सांगताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचे भूमिका नरोवा कुंजरोवा ची नाही. येथे पाय रोऊन ठामपणे भूमिका मांडण्यासाठी आलो आहे. ही विचाराची लढाई आहे, आम्ही मराठी, आम्ही भारतीय, हा संदेश देण्यासाठी मीरा रोडला आलो आहोत. मी मराठी बोलणार नाही हा माज योग्य नाही तसेच का बोलत नाही म्हणून मारणे हे सुद्धा चुकीचेच आहे. हिंदी सक्तीने शिक्षणाचे वाट्टोळे होणार आहे आणि पुढे जाऊन सक्तीचे मोफत शिक्षण कायदा सुद्धा रद्द केला जाऊ शकतो असे सपकाळ म्हणाले.

प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यावेळी म्हणाले की, आता राम मंदिराचा मुद्दा संपलेला आहे त्यामुळे भाजापाने जातीवाद, प्रांतवाद व भाषावाद सुरु केला आहे. काँग्रेस सरकारने ७० वर्षात निर्माण केलेली देशाची संपत्ती विकली जात असताना तसेच जनतेचे मुलभूत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाषावाद सारखे मुद्दे उकरून काढले जात आहेत. या भागात इतर राज्यातून लोक आले व महाराष्ट्राने त्यांना आपले करून घेतले कोणालाही जात, धर्म भाषेवरून वेगळी वागणूक दिली नाही. पण भाजपाने जाणीवपूर्वक भाषा वाद सुरु केला आहे त्यामागे राजकीय स्वार्थ आहे असे ते म्हणाले.

मराठी भाषा विभागाचे डॉ. दीपक पवार म्हणाले की, आंदोलन हे तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात होते पण सरकाराला मात्र ते हिंदी विरोधी करायचे होते. सरकारने आता दोन जीआर रद्द केले असले तरी त्यांनी डॉ. नरेंद्र जाधव यांची समिती स्थापन केली आहे परंतु डॉ. नरेंद्र जाधव समितीने काहीही अहवाल दिला तरी तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आमचा विरोधच राहिल. पहिलीपासून हिंदी शिकवली तर मराठी ही हिंदीची पोटभाषा होईल. महाराष्ट्रावर व मराठीवर प्रेम करणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजकाल मुंबईबदद्ल बोलत नाहीत तर MMRDA बद्दल बोलतात. या भागात उत्तर भारतीयांची लोकसंख्या जास्त प्रमाणात आहेत. MMRDA वेगळे राज्य करण्याचा धोका आहे आणि हा धोका हिंदी सक्तीच्या पोटात आहे, त्यामुळे मराठीची फरफट तर होणारच अशी भितीही दीपक पवार यांनी व्यक्त केली

टाटा आर्बिट्रेज फंडमध्ये तीन महिन्यांमध्ये पुण्यातील गुंतवणूकदारांनी ३५६ कोटी रुपयांची केली गुंतवणूक

बाजारपेठेतील अस्थिरतेने बदलली धोरणे

पुणे, १४ जुलै: इक्विटी मार्केटमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, आर्बिट्रेज फंड्स हे कमी जोखमीच्या गुंतवणूक संधींच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आकर्षक पर्याय ठरत आहेत. कॅश आणि फ्युचर मार्केट्समधील किमतींमधील फरकांचा लाभ घेत हे फंड्स उतारचढावांच्या परिस्थितीत अधिक चांगली कामगिरी करतात आणि इंट्रा-मंथ ट्रेडिंग संधींमध्ये फंड मॅनेजर्सना अधिक जास्त वाव देतात.

टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर श्री शैलेश जैन म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत बाजारपेठेतील अस्थिरतेचे संभाव्य लाभ घेत असतानाच गुंतवणूकदारांना थेट इक्विटी जोखमीपासून वाचवण्यासाठी आर्बिट्रेज फंड्स अतिशय योग्य आहेत. उत्पन्नाचे पारंपरिक मार्ग कमी आकर्षक बनलेले असताना देखील एलिव्हेटेड रोल स्प्रेड आणि सततची अस्थिरता यामुळे आर्बिट्रेज  फंड्स वाजवी परतावा देण्यास सक्षम आहेत. इक्विटी टॅक्स रिटर्न शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आर्बिट्रेज फंड एक योग्य प्रस्ताव प्रस्तुत करतात.”

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या माहितीनुसारएप्रिल ते जून २०२५ दरम्यान आर्बिट्रेज फंड्समध्ये ४३,०७७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलीइतर हायब्रीड आणि इक्विटी विभागांमधील गुंतवणुकीपेक्षा ही गुंतवणूक जास्त होतीअनिश्चितता खूप जास्त वाढलेली असतानाइक्विटी जोखीम कमीत कमी ठेवून तुलनेने जास्त चांगला परतावा देऊ शकतील अशा साधनांकडे गुंतवणूकदार वळत असल्याचे या वाढीतून दिसून येतेपण नफा होईलच याची हमी नाही.

उद्योगक्षेत्रातील व्यापक ट्रेंड्सना अनुसरून टाटा आर्बिट्रेज फंडमध्ये देखील एप्रिल ते जून २०२५ या काळात ,२१७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलीत्यापैकी ३५६ कोटी रुपये पुण्यातून गुंतवले गेले होते३० जून २०२५ रोजी या फंडमध्ये व्यवस्थापनांतर्गत संपत्ती १४,२७४ कोटी रुपये होती

वातावरण आर्बिट्रेज धोरणांसाठी अनुकूल आहे कारण वाढलेली अस्थिरता आणि मजबूत रोल स्प्रेड्स यांनी संभाव्य परतावा संधी खुल्या केल्या आहेतरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हल्लीच्या शिथिलीकरणाच्या उपायांमुळे – रेपो रेट ५० बेसिस पॉईंट्सने आणि कॅश रिझर्व्ह रेशो १०० बेसिस पॉईंट्सने कमी केल्यामुळे – निश्चित उत्पन्न देणाऱ्या पारंपरिक गुंतवणूक मार्गांच्या तुलनेत आर्बिट्रेज फंड्सची आकर्षकता अजून जास्त वाढली आहेआगामी कॉर्पोरेट उत्पन्न आणि सकारात्मक मान्सून दृष्टिकोन देखील बाजारपेठेतील भावना उत्तेजित करेल अशी अपेक्षा आहे.

जागतिक आणि देशांतर्गत अनिश्चितता बाजारपेठेच्या भविष्यावर परिणाम करत असतानागुंतवणूकदारांना अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी आर्बिट्रेज फंड हा एक पर्याय आहेव्याजदर घसरत चालले आहेत आणि बचत खात्यातील परतावा कमी होत आहेत्यामुळे पारंपारिक निश्चित उत्पन्न पर्यायांची आकर्षकता परताव्यासाठी तुलनेने कमी झाली आहेत्याच वेळीअपेक्षित भारतअमेरिका व्यापार करारटॅरिफ वाटाघाटी आणि सध्या सुरु असलेले भूराजकीय तणाव यासारखे घटक बाजारातील अस्थिरता वाढवत आहेतअमेरिकन डॉलर निर्देशांक सध्या जरी कमी असला तरीजागतिक जोखीम टाळण्यासाठी कोणत्याही वाढीमुळे बाजारात नवीन चढउतार होऊ शकतातया पार्श्वभूमीवरआर्बिट्रेज फंड गुंतवणूकदारांना थेट इक्विटी एक्सपोजरशिवाय अस्थिरतेचा फायदा घेण्यासाठी कमी जोखीमचा मार्ग देण्याचा प्रयत्न करतात.

आर्बिट्रेज फंड देखील कर बचत करण्यात सक्षम आहेतकारण त्यांच्यावर इक्विटी म्युच्युअल फंडाप्रमाणे कर आकारला जातो – ज्यामुळे त्यांना अल्पकालीन कर्ज साधनांवर फायदा मिळतोविशेषतः जास्त उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांसाठी जे कर भरणा केल्यानंतरचा परतावा ऑप्टिमायझ करू इच्छितातइक्विटी मार्केट एक्सपोजरमध्ये कमी जोखीम शोधणाऱ्यांसाठीपारंपारिक बचत पर्यायांच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक परताव्याच्या संभाव्यतेसहआर्बिट्रेज फंड आजच्या अस्थिर वातावरणात संभाव्य गुंतवणूक संधी सादर करतात.

कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पाच दिवसात15 हरणांचा संशयास्पद मृत्यू- भुवनेश्वर प्रयोगशाळेच्या अहवालांची प्रतीक्षा

पुणे-मागील ७ तारीख ते १२ जुलै दरम्यानच्या पाच दिवसांत पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 15 चितळ प्रकारातील हरणांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्राणी संग्रहालय प्रशासन आणि पुणे महानगरपालिकाही चक्रावून गेली आहे.प्राथमिक माहितीनुसार, यामागे एखाद्या साथीच्या आजाराची शक्यता वर्तवली जात असली तरी, अद्याप मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. प्राणीसंग्रहालयात एकूण 99 चितळ प्रकारातील हरणे होती, त्यापैकी 15 हरणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मृत हरणांचे शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या पशु रोग तज्ञांनी केले आहे. तसेच, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र नागपूर, बरेली, भोपाळ आणि ओरिसा येथील भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालांनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

प्राणीसंग्रहालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार म्हणाले ,’ चार ते पाच दिवसात आमच्याकडील एकूण 15 हरणांचा अचानक मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे या घटनांच्या मृत्यूबाबत विविध पातळ्यांवर तपासणी केली जात आहे, शहरातील आणि शहराबाहेरील काही महत्त्वाच्या नामांकित प्रयोगशाळांना जैविक नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल तीन चार दिवसात आम्हाला प्राप्त होईल हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेमाचे नेमके कारण स्पष्ट होईल.

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव म्हणाले,’ गेले पाच ते सहा दिवसांत आमच्याकडील 16 चितळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत हरणांचे जैविक नमुने तपासणीसाठी चार महत्त्वाच्या प्रयोगशाळांना पाठवले आहेत. या हरणांच्या मृत्यूमागचे नेमके कारण प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच समोर येईल. मात्र, या हरणांच्या मृत्यूमागे साथीचा आजार आहे का, हे देखील आमच्याकडून तपासले जात आहे.

समाजाचे ऋण फेडणाऱ्या गणपती मंडळांचा आदर्श ठेव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांचे मत : श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
पुणे : पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचे नेहमीच कौतुक वाटते, कारण हे मंडळे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक भान राखून समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्य करतात. तुळशीबाग मंडळाने गेल्या १२५ वर्षांपासून या सामाजिक कार्याची परंपरा जपली आहे. विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण फेडणाऱ्या अशा गणपती मंडळांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी व्यक्त केले.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले. बाजीराव रस्त्यावरील नुमवी प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, शैलेश गुजर, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या आयोजनात चकोर सुबंध, साई डोंगरे, मयूर दिवेकर, प्रतीक इप्ते, तुषार पवार, सागर पेद्दी, अक्षय पुजारे, अनिरुद्ध बारणे यांनी विशेष परीश्रम घेतले. किटमध्ये १२५ दप्तरे, १२५ पाण्याच्या बाटल्या, १२५ कंपास बॉक्स आणि १२५० वह्या मुलांना देण्यात आल्या.

उदय जगताप म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निश्चित करायला हवे. जे आपण पेरतो तेच उगवते, त्यामुळे भविष्यात काय हवे आहे याचा गांभीर्याने विचार करून तशीच वागणूक ठेवावी.

कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले, अनेक विद्यार्थी केवळ अपुऱ्या शैक्षणिक साहित्यामुळे शिक्षण सोडतात. अशा होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

हिंदुजा फाउंडेशनतर्फे 15 राज्यांमधील 8 लाखांहून अधिक युवकांना सक्षम बनवत जागतिक युवा कौशल्य दिन साजरा

 रोड टू स्कूल आणि रोड टू लाईव्हलीहुड कार्यक्रमांद्वारे प्रभावी परिवर्तन
 भारत सरकारच्या “स्किल्ड इंडिया” दृष्टिकोनाशी आणि युवकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रनिर्माणाशी
सुसंगत प्रयत्न
 मुंबई, 15 जुलै, 2025: जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त 110 वर्षांची परंपरा असलेल्या हिंदुजा
समूहाच्या समाजपयोगी उपक्रम शाखा हिंदुजा फाउंडेशनने हिंदुजा ग्रुपमधील कंपन्यांच्या सहकार्याने
राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांद्वारे भारतातील युवकांना परिवर्तनकारी व भविष्यकालीन कौशल्यांनी सुसज्ज
करण्याची आपली बांधिलकी आणखी मजबूत केली आहे. वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल-प्रथम
अर्थव्यवस्थेत शिक्षण व उपजीविकेसाठीच्या कार्यक्रमांतील फाउंडेशनचे निश्चित प्रयत्न भारतीय तरुणांना
आत्मविश्वासाने आणि ध्येयाने यशस्वी होण्यासाठी सक्षम करत आहेत.
हिंदुजा ग्रुपने शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रभाव निर्माण केला आहे.
कौशल्यविकासाच्या आघाडीवर, रोड टू लाईव्हलीहुड (RTL) कार्यक्रम आणि व्यावसायिक प्रशिक्षण,
डिजिटल साक्षरता वाढविणे, संवादकौशल्य व कार्यशक्ती म्हणून तयार करणे अशा विविध उपक्रमांद्वारे
जवळपास 1 लाख युवकांना सक्षम बनवले आहे. शिक्षणाच्या आघाडीवर आर्थिक वर्ष 25 पर्यंत, रोड टू
स्कूल (RTS), रोड टू लाईव्हलीहुड (RTL), हरयाणा डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड आणि इतर गट-
नेतृत्वाखालील शैक्षणिक उपक्रमांद्वारे 15 हून अधिक राज्यांतील 7.4 लाखांहून अधिक युवकांना लाभ
मिळाला आहे. RTS आणि हरियाणा DIB हे मूलभूत शिक्षणावर लक्ष केंद्रित करत असताना, RTL शिक्षण
आणि रोजगार यांच्यामध्ये पूल उभारत आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना हिंदुजा फाउंडेशनच्या स्टीयरिंग कमिटी सदस्य नम्रता हिंदुजा म्हणाल्या,
“हिंदुजा फाउंडेशनमध्ये आम्ही युवक सक्षमीकरणाकडे केवळ एका कार्यक्रमाचे ध्येय म्हणून बघत नाही तर
राष्ट्रनिर्माणाचा मूलाधार मानतो. कौशल्ये, मूल्ये आणि दृष्टीकोनाने परिपूर्ण व्यक्तिमत्त्व तयार करून आपण
एक असा पाया घालत आहोत जिथे प्रत्येक भारतीय तरुण अधिक समावेशक, लवचिक आणि प्रगत
भारतासाठीचा प्रेरक घटक बनेल.”
यावेळी बोलताना हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम म्हणाले, “25 वर्षांखालील 600 दशलक्षांहून
अधिक भारतीय असलेल्या देशात युवक कौशल्यांचा मुद्दा राष्ट्रीय महत्वाचा आहे. हिंदुजा फाउंडेशनमध्ये
आम्हाला विश्वास आहे की खरे सक्षमीकरण म्हणजे तरुणांना भविष्यकालीन डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज
करणे आहे. डिजिटल दरी भरून काढत आणि स्थानिक पातळीवरील नाविन्यपूर्णतेला चालना देत आपण
आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि उद्दिष्टपूर्ण दृष्टीने डिजिटल अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल अशी पिढी निर्माण
करत आहोत. तरुणांना हवामान बदल, संसाधनांचा सजग वापर, सामाजिक विषमता यांसारखे मुद्दे
समजून घेण्यासाठी आणि त्याबाबत अर्थपूर्ण कृती करण्यासाठी मदत करणे हे देखील एक मोठे आव्हान
आहे.”
हे प्रयत्न कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या “स्किल्ड इंडिया” दृष्टिकोनाशी व भारत
सरकारच्या “विकसित भारत” धोरणाशी पूर्णपणे सुसंगत आहेत. यामध्ये फाउंडेशनच्या युवक नेतृत्वाधारित
राष्ट्रनिर्माणाच्या तत्त्वज्ञानाचाही समावेश आहे. डिजिटल साक्षर, सामाजिकदृष्ट्या जागरूक व
भविष्यकालीन कौशल्यांनी सज्ज पिढी तयार करून हिंदुजा फाउंडेशन भारताच्या आत्मनिर्भर व जागतिक
स्तरावर स्पर्धात्मक आणि कार्यक्षम बनण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

आपल्या प्रमुख शैक्षणिक उपक्रमांद्वारे हिंदुजा फाउंडेशनने वंचित समुदायांमध्ये मोठाच परिणाम साधला
आहे. रोड टू स्कूल आणि रोड टू लाईव्हलीहुड कार्यक्रमांनी राष्ट्रीय स्तरावर परिवर्तन घडवून आणले आहे:

  • 7,44,300 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच
  • 7,965 शाळा याअंतर्गत
  • 18,000 शिक्षकांवर परिणाम
  • 2,40,000 समुदाय सदस्य सहभागी
  • 72% गळती झालेल्या विद्यार्थ्यांचा पुन्हा समावेश
  • 15,464 विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमधून सरकारी प्रकल्प शाळांमध्ये आणले
    आपल्या निश्चित लक्ष्य ठेऊन केलेल्या कौशल्यविकास उपक्रमांद्वारे हिंदुजा फाउंडेशनने समूहातील
    कंपन्यांच्या सहकार्याने वंचित तरुणांना भविष्यकालीन कौशल्यांनी सक्षम केले आहे. त्यामुळे भारतभरात
    रोजगारयोग्यता आणि डिजिटल समावेशनात भर पडली आहे.
     रोड टू लाईव्हलीहुड (RTL) सह इतर कौशल्य विकास उपक्रमांद्वारे सुमारे 1 लाख युवकांना लाभ
    झाला आहे.

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाबाबत वेळापत्रक जाहीर

पुणे दि. १५ : समाज कल्याण आयुक्तालयामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकिया https://hmas.mahait.org संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने होणार असून प्रवेशाबाबत अर्ज स्वीकारण्यासोबतच याद्या अंतिम करण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शालेय आणि इयत्ता ११ वी व १२ वी विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी १७ जुलै रोजीपर्यंत अर्ज करावा. २१ जुलै रोजी प्रवेशाबाबतची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी २१ जुलैपर्यंत अर्ज करावा. या विद्यार्थ्यांची २५ जुलै रोजी प्रवेशाबाबत अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाअंतर्गत जिल्ह्यात १४ मुलांची व १० मुलींची अशी मागासवर्गीय मुलां-मुलींची २४ शासकीय वसतिगृहे आहेत. पुणे व पिंपरी-चिचवड शहरामध्ये एकूण १२ शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी मुलांची ८ व मुलींची ४ वसतिगृहे आहेत. तसेच १२ शासकीय वसतिगृहे ही तालुकास्तरावर आहेत. इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
0000

शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनेंतर्गत प्रवासी कंपनी निवडीसाठी निविदा प्रसिद्ध

पुणे, दि. १५: कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे योजना राबविण्यात येत आहे. अभ्यासदौरे आयोजित करण्याकरिता प्रवासी कंपनीची निवड करण्यासाठी ‘जेम’ अर्थात गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलवर निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली असून २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत निविदा सादर कराव्यात, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होऊन त्यांचे ज्ञान व क्षमता उंचावण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर, शेतीमध्ये करण्यासाठी साहाय्य करणे यादृष्टीने हे दौरे आयोजित करण्यात येतात. तसेच विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून मिळणार असून त्या त्या देशातील क्षेत्रीय, संबंधित संस्थांना भेटी या दौऱ्यात देण्यात येणार आहेत.

या योजनेंतर्गत युरोप दौरा १२ दिवस, इस्राईल ९ दिवस, जपान, दक्षिण कोरिया प्रत्येकी १० दिवस, चीन ८ दिवस, तसेच मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स देशासाठी १२ दिवस अभ्यासदौरे असणार आहेत. त्यांच्या आयोजनासाठी प्रवासी कंपनीची निवड करण्यात येणार आहे. या निविदा प्रक्रियेंतर्गत १८ जुलै, २०२५ रोजी निविदापूर्व सभा राजमाता जिजाऊ समिती सभागृह, कृषी आयुक्तालय, दुसरा मजला, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे, असेही कळविण्यात आले आहे.

बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 15: बदलत्या काळात नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्याकरिता सायबर कक्षाची मदत घेवून कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. योजनांचे लाभ देणे, सायबर फसवणुकीबाबत अद्यावत माहिती देऊन जनजागृती करणे आदींसाठी बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावेत, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बँकर्ससमवेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक भूषण लगाटे, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाप्रबंधक रामचंद्र रागिरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.

जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, जिल्ह्यात केंद्र सरकार व राज्य शासनाच्यावतीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएम विश्वकर्मा योजना आदी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार, कौशल्य विकासाच्या अनुषंगाने बँकेकडे कर्जमागणीबाबत प्रलंबित प्रकरणांचा विचार करता ती वेळेत मंजूर करण्याची कार्यवाही करावी. एकही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सूचना दिल्या, केंद्र शासनाच्या, राज्य सरकारच्या योजना तसेच विविध महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी. याकरिता जिल्ह्यातील सर्व बँक, शाखा व्यवस्थापकांकरिता येत्या 5 ऑगस्ट रोजी कार्यशाळा आयोजित करावी. योजनांसाठी जिल्ह्याकरिता दिलेले उद्दिष्ट सर्व बँकांनी डिसेंबर अखेर पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा करावा.

बँकेकरिता आवश्यक असलेल्या जागेबाबत प्रस्ताव सादर केल्यास त्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. कर्जपुरवठ्याकरिता उमेद अभियानाच्या धर्तीवर प्रणाली विकसित करण्याबाबत विचार करावा, असेही श्री. डुडी म्हणाले.

श्री. लगाटे म्हणाले, जनसुरक्षा मोहिमेअंतर्गत जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटन पेन्शन योजना या योजनेत अद्यापही सहभागी न झालेल्या नागरिकांना समाविष्ट करुन घेणे आणि गाव पातळीवर १०० टक्के सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्याचा उद्देश आहे. या मोहिमेंतर्गत सर्व बँकांनी सक्रीय सहभाग घेऊन नागरिकांना सहभागी करुन घेण्याची कार्यवाह करावी, असेही ते म्हणाले.

सन २०२४-२५ च्या जिल्हा पतपुरवठा उदिष्टच्या अनुषंगाने ३ लाख ५३ हजार ५२४ कोटी रुपये कर्ज वाटप करून बँकांनी वार्षिक पत पुरवठ्याचे ११७ टक्के लक्ष्य गाठले आहे. यामध्ये प्रामुख्याने ६ हजार ३७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज उदिष्टाच्या तुलनेत ७ हजार ९२० कोटी पीक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड) वाटप केले. तसेच लघू, सुक्ष्म व मध्यम उद्योगांसाठी एकूण ५२ हजार कोटी रुपयाचे उदिष्ट देण्यात आले होते. तथापि, ६१ हजार ८८५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करून ११९ टक्के लक्ष्य गाठले.

सन २०२५-२६ या वर्षाकरिता ३ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून यामध्ये ७ हजार ३०० कोटी रुपये पीक कर्ज तर लघू, सुक्ष्म व मध्यम उद्योगांसाठी ६५ हजार २०० कोटी रुपयांचा समावेश आहे. यावेळी २०२५-२६ वार्षिक पत पुरवठा पुस्तिकेचे प्रकाशनही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांच्या हस्ते करण्यात आले.

बैठकीच्या अनुषंगाने संगणकीय सादरीकरणाद्वारे श्री. पाटील यांनी माहिती दिली.

“आमची लाज काढू नका, तुम्ही काय केलं ते सांगा”, मंत्री शंभूराज देसाईंची विरोधकांबरोबर खडाजंगी.

मुंबई-

विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान, विधानसभेत आज (१५ जुलै) आमदार वरुण सरदेसाई, आमदार राम कदम व आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील झोपडपट्ट्यांसह केंद्रीय संस्थांच्या, संरक्षण दलाच्या अखत्यारित असलेल्या जमिनीवरील विकासकामांचा मुद्दा मांडला.त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी केवळ शासकीय कागदपत्रांवरील उत्तर दिलं. ज्यावर, विरोधी पक्षांच्या आमदारांनी आक्षेप घेतला. त्यानंतर शंभूराज देसाई संतापल्याचं पाहायला मिळालं. तसेच दोन्ही शिवसेनेच्या (ठाकरे व शिंदे) नेत्यांमध्ये बाचाबाची झाली.
आमदार वरुण सरदेसाई म्हणाले होते की “तुम्हाला सचिवांनी जेवढी माहिती दिलीय तेवढंच उत्तर देताय. परंतु, मला ठराविक वेळ मर्यादा सांगा की ही कामं नेमकी कधीपर्यंत पूर्ण होतील.” त्यावर शंभूराज देसाईंचा पारा चढला आणि ते म्हणाले, “२०१९ ते २०२२ या कालावधीत ज्यांचं सरकार होतं त्यांनी या गोष्टीचा किती पाठपुरावा केला?”
शंभूराज देसाई म्हणाले, “घाटकोपरमधील संरक्षण दलाच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही घेतला आहे. त्यापैकी अर्धी जमीन वायूदलाची व अर्धी संरक्षण दलाची आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडू व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती करू. मात्र, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे ठेवण्याआधी ज्या-ज्या विधानसभा सदस्यांच्या मतदारसंघांचा संरक्षण दलाच्या जमिनीशी संबंध आहे त्यांनी माझ्या दालनात यावं. आपण यासंबंधी एक बैठक घेऊन सविस्तर प्रारुप तयार करू आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर करू.
यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासामाचा मुद्दा उपस्थित केला. तर, वरुण सरदेसाई म्हणाले, “गृहनिर्माण विभागाअंतर्गत टॉप प्रायोरिटी म्हणून या गोष्टीचा पाठपुरावा करावा. कारण गेल्या आठ वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित आहे. २०१७ पासून अनेक अधिवेशनांमध्ये माझ्या मतदारसंघातील संरक्षण दालाच्या जागेवरील विकासाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, अद्याप ते काम प्रलंबित आहे. अजूनही मंत्री हे काम कधीपर्यंत होईल ते सांगत नाहीत. केवळ त्यांच्या सचिवांनी दिलेलं ब्रीफिंग (माहिती) वाचून दाखवायचं काम करत आहेत.”
वरुण सरसदेसाई यांचं हे वक्तव्य ऐकून शंभूराज देसाई यांचा पारा चढला. त्यानंतर ते म्हणाले, “मला याच्या खोलात जायचं नाही. परंतु, २०१९ ते २०२२ या अडीच वर्षात कोणाचं सरकार होतं. या प्रकरणाचा पाठपुरावा तत्कालीन सरकारने एकदाही केंद्राकडे केला नाही. तुम्ही २०१९ ते २०२२ दरम्यान काय केलं? एकही पत्र पाठवलं नाही, पठपुरावा केला नाही. २०२२ ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्ही केंद्र सरकारला चार पत्र पाठवली. तुम्ही काय केलं? आमची लाज काढू नका. तुम्ही काय केलं ते सांगा. तुमचं काम सांगा. तुम्ही काही केलंच नाही. आम्ही पत्रं पाठवली. परंतु, तुम्ही काय केलं ते सांगा.
यावेळी तालिका अध्यक्ष समीर कुणावार सातत्याने दोन्ही वाजूच्या सदस्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचं कोणीही ऐकलं नाही.यावेळी भास्कर जाधव पुन्हा उठले. त्यांनी सरकारचा कोणताही मंत्री कोणत्याही विभागावर भाष्य करत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. हे चुकीचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी गदारोळात चांगलीच वाढ झाली. त्यामुळे तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले.

मास्टर कृष्णराव यांना सांगीतिक मानवंदना

गुरुपौर्णिमेनिमित्त कलांगण, मुंबईतर्फे अनोखे सादरीकरण

पुणे : संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव म्हणजे संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेली वेगवेगळ्या धाटणीची गीते सादर करून त्यांना गुरुपौर्णिमेच्यानिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. ७ वर्षापासून ते २५ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गायन, वादन, निवेदनाची बाजू सांभाळत कल्पकता आणि कलात्मकतेची चुणूक दर्शविली.
कलांगण, मुंबई संस्थेच्या संस्थापिका वर्षा भावे यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून शनिपार येथील भारत गायन समाज येथे या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शास्त्रीय संगीत, भारूड, गवळण, अभंग, भक्तिगीते, नाट्यगीतांसह चित्रपटगीते अशा विविध गीत प्रकारांना मास्टर कृष्णराव यांनी दिलेल्या चाली आजही स्मरणात राहणाऱ्या आहेत. गुरुपौर्णिमेच्यानिमित्ताने गुरूंना वंदन करण्याच्या उद्देशाने मास्टर कृष्णराव यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘बात कान सुनिये जी’, ‘किस्न्याची माया लय भारी’, ‘असा नेसून शालू हिरवा’, ‘क्षण आला सौख्याचा’, ‘काका अप्पा शूर शिपाई’ यासारखी वैविध्यपूर्ण धाटणीची गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. ‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ या अजरामर गीताने झालेली सांगता हा क्षण कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरला.
श्रीरंग जोशी, सानिका फडके, जुई देशपांडे, विभा हरिश्चंद्रकर, तनय नाझिरकर, भार्गव वैद्य, इवा जोशी यांनी गीते सादर केली. अन्वी पाटणकर (संवादिनी), सिद्धी देशपांडे, इरा परांजपे (व्हायोलिन), ऋषभ गोडबोले (की-बोर्ड), अभय ओक (बासरी), आदित्य केळकर, वेदांग जोशी (तबला), मानस कांबळे (तालवाद्य) यांनी समर्पक साथसंगत केली. तर आद्या दामले आणि वर्षा भावे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
मास्टर कृष्णराव या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहताना लहान मुलांनी समजून-उमजून केलेले सादरीकरण कौतुकास्पद ठरले. मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेली सुमधुर पदे सादर करत बालकलाकरांनी कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेत सादरीकरणाचे शिवधनुष्य पेलले.
लहान वयापासूनच मुलांना संगीत, वाद्य याची गोडी लागावी यासाठी कलांगण संस्था काम करीत असल्याचे संस्थेच्या संचालिका वर्षा भावे यांनी रसिकांशी संवाद साधताना सांगितले. मास्टर कृष्णराव यांनी आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केलेल्या पुण्यात पहिल्यांदाच कार्यक्रमाचे सादरीकरण करता आले, याचे समाधान असल्याचेही त्या म्हणाल्या.

आमदार, खासदारांना देखील म्हाडाची घरे केवळ साडेनऊ लाख रुपयांमध्ये

अधिनियम 1976 नुसार घरे राखीव ठेवावी लागतातम्हाडाच्या 5,285 घरे आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी

म्हाडा कोकणी मंडळाची हजारो घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद सदस्य असलेल्या आमदारांसाठी 98 घर राखीव ठेवण्यात आली आहेत. तर राज्यातील आमदार आणि खासदारांसाठी राखीव असलेल्या या घरांची किंमत केवळ साडेनऊ लाख रुपये ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.वास्तविक महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम 1976 नुसार उत्पन्न गटांनुसार आमदार आणि खासदारांना घरे राखीव ठेवावी लागतात. या घरासाठी आमदार खासदारांकडून अर्ज न आल्यास ती खुल्या वर्गातील अर्जदारांना उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे आता या घरांच्या संदर्भात आमदार, खासदार अर्ज करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

म्हाडाची ही घरे कल्याण सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी असणार आहेत. ही घरे अत्यल्प – उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहेत. यातच एका आमदाराचे सध्याचे वेतन हे एका महिन्याला लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त त्यांना महागाई भत्ता आणि इतर उत्पन्न देखील असते. त्यामुळे या आमदारांना राखीव ठेवण्यात आलेली घरे आता कोणाला मिळतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

म्हाडाची लॅाटरी निघाली आहे. पण आमदारांना 9 लाखांत घर मिळणार असे काही नाही. राज्य किंवा केंद्र कोणत्याही सरकारची योजना असो जे निकष सर्वसामान्य लोकांना लागू असतील तेच निकष आमदारांना लागू असतील, असे राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले आहे.

वास्तविक मुंबईच्या आसपास स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी कोकण गृहनिर्माण विकास मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि वसई (पालघर जिल्हा) येथे 5,285 घरे आणि ओरोस (सिंधुदुर्ग जिल्हा), कुळगाव-बदलापूर येथे 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली जाईल. या लॉटरीसाठी नोंदणी आणि पेमेंट प्रक्रिया आज पासून सुरू झाली. इच्छुक 13 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

कोकण मंडळाने जाहीर केलेली ही लॉटरी पाच भागात विभागली गेली आहे. 20 टक्के समावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहेत, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3,002 फ्लॅट, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1,677 फ्लॅट, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 41 फ्लॅट (50 टक्के परवडणारे फ्लॅट). याशिवाय, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.