Home Blog Page 455

जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी पोलीस ठाण्याला माहिती देण्याचे आदेश

पुणे दि. 18: जिल्ह्यात ग्रामीण भागात जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. माहिती न दिल्यास असे व्यावसायिक भारतीय न्याय संहितेचे कलम 223 प्रमाणे कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झालेल्या असून जुन्या मोटारसायकली व वाहने यांची खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु याबाबत खरेदी विक्रीचा योग्य तो तपशील ठेवला जात नसल्याने गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनांची खरेदी विक्री होण्याची दाट शक्यता असते. खरेदी विक्रीबाबत योग्य तपशील उपलब्ध नसल्याने त्याचा गुन्हे उघडकीस येण्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे हे आदेश जारी करण्यात आले आहेत. हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील.

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबत वाहन क्रमांक, इंजिन, चासी क्रमांक, मूळ मालकाचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेले ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, ओळखपत्र, वाहनांचे आरसी, टीसी पुस्तक, खरेदी करणाऱ्याचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ओळखपत्र आदी माहिती दर 7 दिवसांनी स्थानिक पोलीस ठाण्याला द्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

गरिबांची घरे जमीनदोस्त – रिसॉर्ट, हॉटेल्स मात्र अबाधित!

पानशेत पाणलोटातील अन्यायकारक कारवाईचा विधिमंडळात मुद्दा!

मुंबई, १८ जुलै २०२५ महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात आज (दि. १८, जुलै, २०१५) खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पानशेत पाणलोट क्षेत्रात खडकवासला जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेल्या अन्यायकारक कारवाईबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी, वंझारवाडी (ता. वेल्हा) येथील धरणग्रस्त शेतकरी श्री. किसन शंकर कडू, श्री. विजय दिनकर कडू व श्री. हरिभाऊ शंकर कडू यांच्या पूर्वकालीन घरांवर पोलिस बंदोबस्तात कारवाई करत ती घरे जमीनदोस्त करण्यात आली. ही घरे अनेक वर्षांपासून अस्तित्वात होती व या कुटुंबांचे पानशेत धरणग्रस्त म्हणून पुनर्वसन झाल्याचा इतिहासही आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे त्याच परिसरातील पाणलोट क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स व व्यावसायिक बांधकामांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब गंभीर असल्याचे आमदार तापकीर यांनी अधोरेखित केले. या संदर्भात सभागृहात पुढील दोन महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या: 1. गुंजवणी, पानशेत आणि वरसगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या अनधिकृतपणे उभी असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स व व्यावसायिक बांधकामांची सविस्तर यादी व अहवाल सादर करण्यात यावा. 2. अशा अतिक्रमणधारकांची नावे, मालकीचा प्रकार, संबंधित भूखंडाची स्थिती व त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या अथवा प्रलंबित कारवायांची माहिती शासनाने जाहीर करावी. एकाच पाणलोट क्षेत्रात गरिबांच्या घरांवर कारवाई करत, श्रीमंत व्यावसायिक घटकांना वाचवण्याचा प्रयत्न प्रशासन करत असेल, तर ती शासनव्यवस्थेची मोठी तातडीने दखल घेण्याची गरज असलेली अन्यायकारक बाब आहे,” असे मत आमदार तापकीर यांनी मांडले. शासनाने या प्रकरणात निष्पक्ष व एकसमान कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी विधानसभेत केली.

ना हनी आहे ना ट्रॅप, नानांचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही-

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हनीट्रॅप संदर्भात केलेला आरोप धुडकावून लावला. ते म्हणाले, कालपासून हनीट्रॅपचा विषय सभागृहात येत आहे. यांनी कोणता हनीट्रॅप आणला? हे मला समजतच नाही. नानाभाऊंनी तर कुठला बॉम्बच आणला म्हणे… नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब… तुमच्याकडे तो असेल तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना… ना हनी आहे ना ट्रॅप आहे. नानाभाऊ एखादी घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. पण माहोल असा क्रिएट होतो की, आजी-माजी मंत्री. आता सगळे एकमेकांकडे पाहत आहेत. इकडे आजी आहेत, तिकडे माजी आहेत. हे आजी मंत्री आहेत की माजी मंत्री आहेत. कोण फसले आहे या हनीट्रॅपमध्ये?

कुठल्याही आजी-मंत्र्याच्या हनीट्रॅपची तक्रारही नाही. पुरावेही नाहीत. अशी घटनाही समोर आलेली नाही. हनीट्रॅप नाहीच. पण अशी एक तक्रार नाशिकच्या संदर्भात आली होती. एका महिलेने तक्रार केली. त्यानंतर त्यांनी ती तक्रार मागेही घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती. मला त्याचे राजकारण करायचे नाही. पण आपण सातत्याने व्यक्तीचा, हॉटेलचा, हॉटेल मालकाचा उल्लेख करत आहात. ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे. त्याने निवडणूकही लढली आहे. हा पाहा पंजा, असे फडणवीस सभागृहात एक पोस्टर दाखवत म्हणाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेला उत्तर दिले. ते म्हणाले,
अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यासाठी मी उभा असताना माझ्यासह आपल्या सर्वांच्या मनात वेदना आहेत. आपण अधिवेशन संपवतोय, पण ज्या काही घटना या अधिवेशनात घडल्या आहेत, त्यातून नेमका काय संदेश आपण घेऊन जाणार आहोत? आणि लोकांना काय संदेश आपण देत आहोत? ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही, मंत्र्यांच्या मालकीची नाही, मुख्यमंत्र्यांच्या मालकीची नाही. कुठल्या कर्मचाऱ्यांच्याही मालकीची नाही. ही विधानसभा महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांच्या मालकीची आहे. अशा विधानसभेत समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण या ठिकाणी विचारातून, चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथ्याबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असे वाटते की, आपण सर्वांनी याविषयी चिंतन करण्याची गरज आहे. मी आपले आभार मानेन की, आपण हे प्रकरण गांभिर्याने घेतले. दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते आले होते की नव्हते हे सोडले तर त्या दोघांनीही याठिकाणी खेद व्यक्त केला. पण मला असे वाटते की, शब्दांतून निघणारे विष हे एखाद्या नागाच्या विषाहूनही जास्त विषारी असते. त्यामुळे याठिकाणी चर्चा, चर्चेचा स्तर या प्रकरणी कटूता निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अनेकदा प्रसंग येतात. शेवटी आपण माणूस आहोत. राग अनावर होतो. पण त्यानंतरही आपल्या चर्चेचा स्थायीभाव हा भाव मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे. आपण पाहिले कुणी मीडियासमोरच अश्लील घोषणा देत आहे, कुणी अजून काही बोलत आहे, कुणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांविरोधातच अध्यक्ष मॅनेज आहेत असे बोलतंय. मला असे वाटते की, या सभागृहाने एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे. या सभागृहात 288 सदस्य आहेत. नियमाने या ठिकाणी 45 लक्षवेधी झाल्या पाहिजेत. आपण 45 च्या ऐवजी 200 लक्षवेधी करता. त्यानंतरही 288 सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जी काही भाषा आपण या ठिकाणी वापरतो. ती भाषा काही योग्य नाही. त्रिभाषा सूत्रावरही बरीच चर्चा झाली. आता कुठली भाषा कुठल्या वर्गात शिकवायची त्याचा निर्णय समिती करेन. पण मला असे वाटते की, आपल्याला निवडून आल्यानंतर एक त्रिसुत्री या प्रकरणी ठरवावी लागेल. ती म्हणजे, संसदीय परंपरांचे पालन, संसदीय भाषेचे पालन व सातत्यपूर्ण संवाद. ही त्रिसुत्री पाळली तर याठिकाणी निश्चितपणे आपण त्यातून एक चांगला संदेश देऊ शकतो.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, काल या ठिकाणी जी हाणामारी झाली. खरे म्हणजे कुणीही कुणाहीसोबत येत आहे या प्रकरणी काही ना काही शिस्त असली पाहिजे. आपण पाहिले तर ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर 6 गुन्हे आहेत. नितीन हिंदुराव देशमुख यांच्यावर 8 गुन्हे आहेत. यांची पार्श्वभूमी एवढी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. अशी मंडळी येथे येऊन मारामारी करतात. हे योग्य नाही. त्यामुळे सदस्यांनी यासंबंधी लक्ष आघेतले पाहिजे. अध्यक्षांनी या प्रकरणी घेतलेला निर्णय योग्य आहे. पण आपण सदासर्वकाळ लोकांसाठी सभागृह बंद करू शकत नाही. काही लोकांनी चूक केली नाही म्हणून आपण तसे करू शकत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की, आपण या सभागृहात खूप चांगले बदल केले आहेत. सभागृहाचा चेहरा आपण बदलला आहे. आता या सभागृहात पुढचे अधिवेशन हे मार्चमध्येच होणार आहे. यादरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यंगत येऊ द्या विना बिल्ला इथे दिसणार नाही. कारण, असेही माझ्या लक्षात आले आहे की, अनेक लोक कुणाच्याही परवागीशिवाय आतमध्ये येतात. ते येतात कसे? 2-4 लोक आले तर आले त्याने मला फरक पडत नाही. त्याची चिंता वाटत नाही. पण त्यातील एखाद्याने इथे येऊन अतिरेकी घटना केली तर तर उद्याला त्याची जबाबदारी कोण घेईन? म्हणून येथील सुरक्षा व्यवस्थेत बदल करून आत येणाऱ्या प्रत्येकाला ओळखपत्रासोबतच प्रवेश दिला पाहिजे. व्यक्तीच्या गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढले पाहिजे. हे झाल्याशिवाय स्थिती सुधारणार नाही, असे ते म्हणाले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपण अनेक गोष्टींवर खेद व्यक्त केला आहे. पण ते करतील की नाही हे मला माहिती नाही. पण ज्या लोकांनी आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून अध्यक्षांना एजंट म्हटले, हस्तक म्हटले. त्यांच्याकडून मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. याठिकाणी मी जे काही बोललो ते कोणत्याही एका पक्षाला लागू नाही. ते दोन्हीकडच्या आमदारांना लागू आहे. कारण, आपण जसे वैयक्तिक आहोत, तशी एक संस्था म्हणूनही आपली एक इमेज आहे. एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो, तेव्हा सगळ्या आमदारांविषयीचे मत समाज तयार करतो असतो. तेव्हा तो सत्ताधारी पक्षाचा आहे की विरोधी पक्षांचा आहे हे पाहत नाही. सर्वांबद्दल हे मत तयार होतो की, आपण कुठेही तरी सत्तेचा अपव्यवहार, अपव्यय करतोय. याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांच्या धमकीचा विषय निघताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत संतापले

आमदार माजलेत अशी सर्वत्र चर्चा
मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या परिसरात गुरूवारी झालेल्या हाणामारीवर तीव्र संताप व्यक्त केला. कालच्या घटनेमुळे कुणा एकाची प्रतिष्ठा गेली नाही. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. आज या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत, त्या एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते की, हे सगळे आमदार माजले म्हणून, असे ते म्हणालेत.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कालच्या घटनेवर आज विधानसभेत निवेदन केले. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्ती केली. अध्यक्षांनी केलेल्या सूचनांचे मी तंतोतंत पालन करेन. तसेच काल जी घटना घडली आहे, त्यावर मी खेद व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले. पडळकर यांच्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड बोलण्यास उठले. ते म्हणाले, आपण बोलत असताना नितीन देशमुख हे माझ्यासोबत आले होते. पण सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो. माझ्यासोबत मी कुणालाही आणत नाही. माझ्यामागे केवळ माझा पीए चालत असतो. त्याच्याशिवाय माझ्यासोबत कुणीही नसतो. मी कधीही कुणाला पासवर सही करत नाही. कुणाला पासही इश्यू करत नाही. त्यामुळे नितीन देशमुखला मी घेऊन आलो होतो हे रेकॉर्डवर चुकीचे जाऊ नये.

ते आपल्या ताब्यात आहेत. त्यांना विचारा ते कसे आले होते? मी हे कृत्य करण्यास भाग पाडले असा कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून मी हे स्पष्टीकरण देत आहे. चुकीचे रेकॉर्डवर येऊ नये. काल ही घटना घडली तेव्हा मी सभागृहात नव्हतो. मी परिसरातही नव्हतो. मी मरीन लाईन्समध्ये होतो. त्यामुळे या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कोणताही संबंध नाही. ही घटना घडावी म्हणून मी कुणाला उद्युक्त केले नाही. मी कुणाला खुणावलेही नाही. राहिली गोष्ट या लोकशाहीच्या मंदिराची… ही मंदिरात घडलेली घटना कुणीही घडवली असेल, कशीही घडली असेल, या इमारतीच्या दगडात लोकशाही जिवंत आहे. या मंदिरात झालेली ती अप्रिय घटना कशी घडली हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले. मला यावर बोलायचे नाही.

पण अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे एक निवेदन केले होते. माझ्या व्हॉट्सएपवर अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आली. मला मारण्याची धमकी देण्यात आली. मला बोलू द्या अध्यक्ष महोदय, असे आव्हाड म्हणाले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मध्येच हस्तक्षेप केला. या विषयाचे गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी घेणे आवश्यक आहे. तुम्ही इतर सर्व गोष्टी मला माझ्या दालनात येऊन सांगितल्या आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार करून सुरक्षा रक्षकांकडून अहवाल मागितला. पण आता तुम्हाला या विषयाचे राजकारण करायचे असेल तर हे योग्य नाही. मला वाटते आपल्याला सभागृहाच्या भावनेचा आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले.

अध्यक्षांच्या या भूमिकेवर शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला. जितेंद्र आव्हाड यांना धमकी आली आहे, त्यामुळे त्याचा उल्लेख करण्यास बंदी करणे हे योग्य नाही, त्यांना बोलू द्या, असे ते म्हणाले.

जयंत पाटील यांच्या या विनंतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेत हस्तक्षेप केला. ते म्हणाले, धमकीचा उल्लेख करण्यास कुणाचीही मनाई नाही. पण विषय काय चालला आहे? आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर आपण कधीतरी राजकारणाच्या पलिकडे जाणार आहोत की नाही? ते वेगळे मांडता येईल ना. पण अध्यक्षांनी एक विषय मांडला एक निर्देश अध्यक्षांनी मांडला, तर असे नाही होत.

जयंतराव एक लक्षात घ्या. फार सिनिअर आहात आपण. ही प्रतिष्ठा काही कुण्या एका व्यक्तीची नाही. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत, त्या एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते की, हे सगळे आमदार माजले म्हणून. त्यामुळे थोडे गांभिर्याने घ्या. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगणार आहात जयंतराव? हे बरोबर नाही. अशा प्रकारे समर्थन करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अधिवेशन काळात केवळ आमदार, स्वीय सहाय्यक, अधिकाऱ्यांनाच प्रवेश; मंत्र्यांनाही बैठका घेण्यास बंदी

विधानसभा अध्यक्षांचा निर्णय
मुंबई-विधानसभा अध्यक्षांनी काल झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे विधान भवन परिसरामध्ये अधिवेशन चालू असताना केवळ आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. काल झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर भूमिका घेत, हा निर्णय आज जाहीर केला.

विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार आता आमदारांच्या खासगी कर्मचाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अधिवेशन सुरु असताना विधिमंडळ परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. इतकेच नाही तर अधिवेशन काळात विधिमंडळातील सभागृहांमध्ये मंत्र्यांना बैठका न घेण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत. मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात या बैठका घ्याव्यात, असे देखील अध्यक्षांनी सांगितले आहे.

आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नीती मूल्य समिती गठीत करण्याचा विचार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. त्यासाठी विधान परिषदेच्या सभापतींशी विचार विनिमय करून तसेच गटनेत्यांशी चर्चा करुन, या विषयाचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.

यावेळी राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, बऱ्याच वेळा मंत्र्यांच्या वतीने देखील विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये बैठका आयोजित करण्यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्याची विनंती करण्यात येते. मात्र, आता त्यांना त्यांच्या बैठका या मंत्रालयातील त्यांच्या दालनात घ्याव्या लागतील. अत्यंत महत्त्वाच्या परिस्थितीत, माननीय अध्यक्ष आणि सभापती यांचा समावेश असलेल्या मंडळाची मान्यता घेतल्याशिवाय मंत्र्यांना देखील विधानमंडळात बैठक घेण्याचे आणि अभ्यागतांना प्रवेश देण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे देखील नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

या विषयी बोलताना विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, सर्वांचे उत्तरदायित्व हे संविधानाशी आहे. संविधानानुसार आपले विधानमंडळ आणि इतर सर्व संस्था आहेत. विधिमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेताना आपण संविधानाबद्दल खरी श्रद्धा, निष्ठा बाळगण्याची व कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची शपथ घेतली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून विधिमंडळ परिसरामध्ये अधिवेशन काळात कालावधीत यापुढे केवळ सन्माननीय सदस्य त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल. इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच आमदारांसोबत येणाऱ्या अभ्यागतांच्या वर्तणुकीची जबाबदारी देखील त्या आमदारांवर निश्चित करण्यात येणे आवश्यक असल्याचे अध्यक्षांनी म्हटले आहे.

भास्कर जाधवांनी माफी मागितली :अध्यक्षांवर टीका करताना अवमानास्पद हातवारे केल्याचा होता आरोप

मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी गुरूवारी सभागृहाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी कथितरित्या अश्लील हातवारेही केले होते. मंत्री शंभूराज देसाई यांनी आज हा मुद्दा सभागृहात मांडत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सत्ताधारी बाकावरील इतरही नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जाधवांनी या प्रकरणी माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. भास्कर जाधव काल पत्रकारांशी संवाद साधताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. मी सभागृहात 293 अन्वये प्रस्ताव मांडला. त्यावर संबंधित मंत्र्यांनी उत्तरे देण्याचा दंडक आहे. पण प्रस्तावावर बोलताना माझी अडवणूक करण्यात आली. अध्यक्ष राहुल नार्वेकर दुतोंडी आहेत. ते स्वतःलाच सरकार समजतात. त्यांनी सरकार बरखास्त करून स्वतःच उत्तरे द्यावीत. ते स्वतःला ज्ञानी समजतात, असे ते म्हणाले. मंत्री शंभूराज देसाई यांनी आज हा मुद्दा सभागृहात मांडला. मंत्री देसाई म्हणाले, काल सभागृहात राईट टू रिप्लायच्या मुद्यावर झालेल्या गदारोळानंतर विरोधकांनी सभागृहाबाहेर जाऊन पत्रकारांशी अध्यक्षांविरोधात अश्लील हातवारे करत टीका केली. यासंबंधीचे काही गंभीर व्हिडिओ आम्ही पाहिले. त्यात थेट अध्यक्षांवर आरोप होताना दिसून येत आहेत. आपल्या अनुमती असेल तर ते व्हिडिओ मी देतो. या प्रकरणी कोणतेही राजकारण करण्याची गरज नाही. पण या सभागृहाच्या सर्वोच्च आसनावर बसलेल्या व्यक्तीविरोधात असा हेतूआरोप घेऊन असे विधान करणे हे सभागृहाचा अवमान करणारे आहे. याविषयी आज सभागृह संपण्यापूर्वी आपण निर्णय घ्यावा. अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केले तर ही प्रवृत्ती बोकाळेल. त्यानंतर यासंबंधी कोणतीही परंपरा, प्रथा, नियम, आदर राहणार नाही. या प्रकरणी संबंधितांनी माफी मागावी किंवा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी असे ते म्हणाले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडलेल्या मुद्यावर मला बोलायचे नव्हते. पण सभागृहाच्या आत व सभागृहाच्या बाहेर सदस्यांचे आचरण कसे असावे यासंदर्भात मी सांगायचे गरज नाही. इथे आलेला प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे केवळ सभागृहाबद्दलच त्यांची जबाबदारी नव्हे तर आपल्या मतदारसंघाप्रती असणारी जबाबदारी लक्षात घेऊन यापुढे आपली वर्तणूक ठेवावी. मंत्री दादा भुसे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. बाहेर पत्रकारांशी बोलताना संबंधितांनी अत्यंत अश्लील हावभाव केले, असे ते म्हणाले. मंत्री आशिष शेलार यांनीही त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यानंतर ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधव यांनी झाल्या प्रकारावर माफी मागितली. माझ्या भाषणात मुद्दा अडथळे आणले जातात -जाधव भास्कर जाधव म्हणाले, मी सभागृहाला व आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो. मला माफी मागितली पाहिजे हे नमूद करतो. काल उपमुख्यमंत्र्यांनी भाष केले. मी येथे शांतपणे बसून ऐकलो होतो. मी पूर्वी सभागृहात बसून टॉन्टिंग करत होतो. पण मागील 4-5 वर्षांपासून मी तसे करत नाही. मी सभागृहाच्या कामकाजाविषयी व नियमांविषयी आग्रही असतो. आपण पाहिले असेल की, मी सभागृहात आकांडतांडव करत नाही. कुणावर ओरडतही नाही. पण मी सभागृहात एक शब्दही बोलला तरी सत्ताधारी बाकावरून कदाचित जाणिवपूर्वक माझ्या बोलण्यात अडथळे निर्माण केले जातात. मला काहीही बोलायचे म्हटले तरी खालून इतक्या कमेंट्स होतात की, त्याला काही मर्यादा असली पाहिजे. आत्ता आपण कालच्या विषयावर येऊया. मी कबूल करतो, माझ्या इतक्या वर्षाच्या टर्ममध्ये एकदाही माझ्याकडून असंसदीय शब्द गेला नाही. सभागृहात केव्हाही माझ्यावर माफी मागण्याची वेळ आली नाही. पण इथे मी माफी मागावी किंवा न मागावी हे ला सांगा. पण मी बाहेर जे बोललो ते मी घरी जाऊन पाहिले त्याचा खेद मला सुद्धा वाटला. मी तसे बोलायला नको होते. मी या ठिकाणी सभागृह जेव्हा नियमाने चालावे असा आग्रह धरतो, भांडण करतो, तेव्हा माझ्याकडून अशी चूक होता कामा नये असे मला वाटते. आज आमची काही मंडळी राज्यपालांना भेटण्यासाठी गेली आहे. पण हा विषय आज सभागृहात निघणार हे मला ठावूक होते. त्यामुळे त्याकडे पाठ न फिरवता मी त्याला फेस करण्यासाठी येथे थांबलो. हो, माझ्याकडून मीडियाशी बोलताना जे शब्द गेले ते जायला नको होते. मी जाहीरपणे सांगतो, अध्यक्षांनी दिलेली कोणतीही शिक्षा मला मान्य असेल, असे भास्कर जाधव या प्रकरणी माफी मागताना म्हणाले.

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२५ Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2025

पोलिसाचे वर्तन पाहून ..रोहित पवार भडकले,म्हणाले, आवाज खाली,हातवारे करून बोलायचे नाही

शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचे नाही, पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले
मुंबई:शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचे नाही, अशा शब्दात कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले आहे. आवाज खाली, हातवारे करुन आमदारासोबत बोलायचे नाही, असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला. काल मध्यरात्री विधिमंडळात झालेल्या गोंधळ झाल्या नंतर आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे पोलिस ठाण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, तो कार्यकर्ता सदरील पोलिस ठाण्यामध्ये नसल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी रोहित पवार आणि पोलिसांमध्ये चांगली जुंपली होती. रोहित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला.
मध्यरात्री नंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आव्हाड आणि रोहित पवार समर्थकांसह पोलिस ठाण्यात पोहोचले होते. तिथे त्यांचा पोलिसांशी वाद झाला. त्या वेळेचा हा व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहे. रोहित पवार यांनी संतप्त स्वरात थेट पोलिसांना दमदाटी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याबरोबरच त्यांचे कार्यकर्ते देखील यावेळी चांगलेच आक्रमक झालेले दिसून येते.

विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी नंतर पडळकरांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मध्यरात्री नंतर ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या कार्यकर्त्यांना पाहण्यासाठी आव्हाड आणि रोहित पवार थेट पोलिस ठाण्यामध्ये गेले. त्याच वेळेचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये रोहित पवार हे चांगलेच संतापलेले दिसून येतात. हात वारे करायचे नाही, सांगून ठेवतो. शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचे नाही, असा आवाज या व्हिडिओमध्ये रोहित पवारांचा येत आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या विषयी रोहित पवार म्हणाले की, सत्तेत असलेल्या आमदारांच्या समर्थकांमध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रथम वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली. त्यांनी आरोप केला की, भाजप आमदार 4-5 गुंडांसह विधानभवनात आले होते. त्या लोकांनी जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे सुनियोजित होते, त्यांना आधीच मेसेजद्वारे धमकी देण्यात आली होती. नितीन देशमुख आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना वाचवले. आमदार स्वतः विधानभवनात सुरक्षित नाहीत, तेव्हा इतर कोणाच्या सुरक्षिततेची हमी काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. तुम्ही आमच्या अंगावर गाडी चालवा पण मी गाडी खाली हळू देणार नाही, असा पवित्रा आव्हाड यांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी बाळाचा वापर करत गाडी पुढे नेली. यावेळी आव्हाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली असली तरी त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. चव्हाण नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरने गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना वडापाव आणून दिला. तसेच त्याला तंबाखू मळून दिली. पोलिस गुन्हेगारांना तंबाखू मळून देतात हे काय चाललेय? त्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे.

पकडून आणलेल्या २२ वर्षीय आरोपीने केला पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हल्ला

आरोपीसह काही जखमी पोलीस देखील ससून रुग्णालयात …

आरोपी आणि पोलिसात हाणामारी …?

पुणे- पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये पकडून आणलेल्या अवघ्या २२ वर्षीय सराईत गुन्हेगाराने पोलिसांवरच हल्ला करून पोलीस ठाण्याची तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंढे असं तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याने पोलीस ठाण्यात तोडफोड करत खिडक्यांच्या काचा फोडल्या,कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेत त्याला सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आलं होतं,पोलीस स्टेशन मधील कॉम्प्युटर देखील त्यांनी फोडले

पोलिसांच्या तोंडावर मिरचीचा स्प्रे मारला…
ही घटना गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. गुन्हेगार हा आधीपासूनच गुन्हेगारी जगतात सक्रिया असल्याीच माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडे आक्रमक होत लोंढे याने ४ ते ५ पोलिसांच्या तोंडावर पेपर स्प्रेची फवारणी केली. ज्यामुळे संबंधित पोलिसांना तातडीने वैद्यकीय उपाचारासाठी पाठवण्यात आले. गुन्हेगाराने पोलिसांना घरात घुसून हत्या करण्याचीही धमकी दिल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.रात्रभर चाललेल्या या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यात खळबळ माजली होती. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे. बारक्या लोंढेवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.गुन्हेगाराला अटक केल्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. उलट त्याने थेट पोलीस ठाण्यातच काचा फोडल्या, खुर्च्या फेकल्या आणि आरडओरड करत स्वतःलाच जखमी करण्याचा प्रयत्न केला.

इथे मारामारी झाली होती.. विधिमंडळ आवारात तिथे स्मारक उभारा, म्हणाले , सुधीर मुनगुंटीवार

0

मुंबई-विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी कालच्या हाणामारीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, काल झालेल्या प्रकारावर आपण इथे आपल्या भावना व वस्तुस्थिती मांडली नाही आणि आम्ही न्यायाची अपेक्षा आपल्याकडून करणार नाही, तर कुणाकडून करायची? काल बोलताना तुम्ही (अध्यक्ष) म्हणाले महाराष्ट्राच्या विधानसभेत नावलौकीक व विधानसभेच्या पावित्र्याविषयी वक्तव्य केले. काल इथे अंतिम आठवडा प्रस्तावानंतर याच सभागृहाच्या लॉबीमध्ये पायऱ्यांच्या आसपास जी घटना घडली, संपूर्ण देशातच नाही तर देशाबाहेरही महाराष्ट्राची बदनामी झाली, अशा प्रकारच्या बातम्या व चर्चा आहेत.विजय वडेट्टीवार यांच्या विचारणे नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी प्रश्नोत्तराच्या तासानंतर निवेदन देणार असल्याची माहिती दिली. कालच्या घटनेकडे बऱ्याच सदस्यांनी याकडे लक्ष वेधले. या संपूर्ण प्रकाराची मी माहिती घेतली. या प्रकरणी पुढील कारवाई काय करणार आहोत, याविषयी मी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहाला अवगत करेन, असे ते म्हणाले.

विधानभवनातील लॉबीत झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर आज आम्ही महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. ते या प्रकरणी न्यायाची मागणी करतील अशी अपेक्षा आहे.असे यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले . तेव्हा आपण दुपारी दीड वाजता निवेदन करू असे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले.

विधिमंडळात गँगवॉर, राष्ट्रपती राजवट लावा:खासदार संजय राऊत संतापले

अंडरवर्ल्ड प्रमाणेच भाजपमध्ये भरती होत असल्याचा आरोपमहाराष्ट्राच्या संस्कृतीचे वस्त्रहरण सुरु

मुंबई-महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे, असे शिवसेनेचे स्पष्ट मत आहे. यांना महाराष्ट्र राज्य सांभाळता येत नाही. काल विधिमंडळात जे झाले, ते जर इतर कोणत्या राज्यात झाले असते किंवा दुसरा कोणी मुख्यमंत्री असता, तर हेच देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन किंचाळले असते. हे सरकार बरखास्त करुन येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली असती, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन केल्यानंतर माझ्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, हे त्यांना देखील कळेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. काल हाणामारी केलेल्यांना मी दोन आमदारांचे समर्थक म्हणणार नाही. समर्थक अशा प्रकारचा हल्ला करत नाही. भाजपच्या आमदार बरोबर जे त्यांचे लोक होते, त्यांचा रेकॉर्ड तपासा, असे आव्हान देखील राऊत यांनी दिले आहे.

राज्यपाल खरेच घटनेचे आणि संविधानाचे रखवालदार असतील तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायला हवी, अशी मागणी देखील राऊत यांनी केली. काल केवळ चाकू-सुरे असे हत्यारे बाहेर काढायचेच बाकी राहिले होते. त्यांच्या गाडीमध्ये अशा प्रकारचे हत्यारे होती, अशी माझ्याकडे माहिती आहे. जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा हा कट होता, अशी पक्की माहिती माझ्याकडे असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केली आहे.

मकोकाचे आरोपी, दाऊदचे हस्तक, हे विधिमंडळात तुमच्या राज्यात यायला लागले आहेत. उद्या ते विधानसभेत देखील जातील. अशा प्रकारचा गँगवॉर हा सभागृहात देखील होईल. त्याला भारतीय जनता पक्षच उत्तेजन देईल, असा आरोप देखील राऊत यांनी केला. गेल्या दोन महिन्यात भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झाली आहे, पूर्वी जशी अंडरवर्ल्ड मध्ये भरती व्हायची, त्या पद्धतीची ही भरती झाली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, पांडव कमजोर होते म्हणून द्रौपदीचे वस्त्रहरण ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते. तसेच वस्त्रहरण आज महाराष्ट्राच्या संस्कृतीचे होत आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते उघड्या डोळ्यांनी द्रौपदीचे वस्त्रहरण पाहत आहेत. त्याला सर्वस्वी जबाबदार देखील तेच आहेत. कारण ते जुगाराच्या अड्ड्यावर बसलेले आहेत. काल विधिमंडळात झालेले हे गँगवॉर आहे. मकोका, खून, दरोड्यातील आरोपी काल विधानभवनाच्या परिसरात कसे आले? त्यांना कोणी आणले होते? त्यांच्यावर काय कारवाई झाली? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले.

हनी ट्रॅप प्रकरणावरून देखील प्रश्नचिन्ह-नाशिक आणि इतर जिल्ह्यात झालेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून देखील संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर देवेंद्र फडणवीस काही म्हणाले का? त्यांनी या विषयावर बोलायला हवे होते. असे त्यांनी म्हटले आहे. नाना पटोले, जयंत पाटील यांनी विधानसभेत तर अंबादास दानवे, अनिल परब यांनी परिषदेत अनेकांनी हा विषय विधिमंडळात मांडला आहे. त्यावर सरकार गप्प आहे. कालच्या घटनेवर सरकारचे मत काय? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. या सर्व मुद्द्यांवर विधि मंडळामध्ये आवाज उठवू नये म्हणूनच त्यांना विधानसभेत विरोधी पक्ष नेता पद दिलेले नसल्याचा आरोप राऊत यांनी केला.

काय अवस्था झालीये महाराष्ट्राची? राज ठाकरेंचा सवाल

मुंबई- विधिमंडळामध्ये झालेल्या हाणामारीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची? कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी सरकारला गंभीर इशारा देखील दिला आहे.

या संदर्भात राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे. जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा, असे आव्हान देखील त्यांनी सरकारला दिले आहे.

राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा….

काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ‘ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?’ सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, ‘कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?’ मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय? अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये… सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही ! माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका. । राज ठाकरे

दरोडा टाकायला निघालेल्या टोळीला पोलिसांनी घेरले ,एकाला पकडले अन ४ पळाले

पुणे- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एकास अटक करुन एकुण ५,८५,०००/- रु. कि.चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ पुणे शहरातील प्रत्येक पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दि.१७/०७/२०२५ रोजी रात्रौ ऑल आऊट कोबिग ऑपरेशन मोहिम राबविण्या बाबत आदेश दिले होते.त्याप्रमाणे कारवाई करणे करीता दि.१७/०७/२०२५ रोजी मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेडे व निलेश बडाख यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील एक पथक तयार करुन त्यांना रेकॉर्डवरील आरोपी व संशयास्पद फिरणारे इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे कारवाई करणेकामी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील रात्रगस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उप-निरीक्षक सिध्देश्वर रायगोंडा, तपास पथकातील पोलीस अंमलदार शेलार, तांगडे, जाधव, किरण तळेकर असे वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शेलार यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, म्हाडा कॉलनी, एसआरए बिल्डींग, वारजे माळवाडी पुणे या ठिकाणी चार ते पाच इसम एका चारचाकी गाडीमध्ये बसुन सदर ठिकाणी चोरी करण्या करीता आलेले आहेत.
मिळालेल्या बातमीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उप-निरीक्षक सिध्देश्वर रायगोडा यांनी पोलीस स्टाफ सोबत बातमीच्या ठिकाणी गेले असता म्हाडा कॉलनी इ बिल्डींग समोरील रोडवर एक बोलेरो गाडी क्र. एमएच ४५ ए ८४५८ ही अंधारामध्ये थांबलेली असल्याचे दिसुन आल्याने वरील स्टाफ सदर गाडी पाशी जात असताना पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने तेथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले एकुण ५ अनोळखी इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागल्याने त्यापैकी एका इसमास पोलीस स्टाफच्या मदतीने शिताफिने पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता हे सोनु कपुरसिंग टाक वय २९ वर्षे रा. तुळजा भवानी वसाहत, बंटर शाळेमागे गाडीतळ, हडपसर, पुणे असे सांगितले. तसेच नमुद इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडुन २,५०,०००/-रू.कि.ची बोलेरो गाडी, ३,२५,०००/-रू. किं.चे चांदीचे दागिणे व १०,०००/-रु. किंमतीचे घरफोडीचे साहीत्य व प्राणघातक हत्यारे असा एकुण ५,८५,०००/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस अंमलदार शेलार यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन इसम नामे सोनु कपुरसिंग टाक व त्याचे गुन्ह्यातील इतर साथिदार यांचे विरुध्द वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३०२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १११, ३१०(४), ३१०(५), ३१० (६), आर्म अॅक्ट ४ (२५), मपोका कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिवाभावाच्या कार्यकर्त्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले, पोलिसांनी खेचून बाहेर काढलं

मध्यरात्री विधानभवनाच्या परिसरात हायव्होल्टेज राडा

जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले,पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे. म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता,पळून जाणार पडळकर चे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर..! सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..!

मुंबई : विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याने आता वेगळच वळण घेतलंय. जितेंद्र आव्हाड यांनी रात्री 2 वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात पोलिसी बळाला जोरदार विरोध केल्याचं पाहायला मिळालं. विधानभवनच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केलं. यावेळी मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली जात आहे. तर मारहाण करणाऱ्या 5 जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.प्रत्यक्ष मारहाण करणाऱ्या पडळकरांच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांना सोडून देत जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पकडून पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी अक्षरक्ष: जितेंद्र आव्हाड यांना बळाचा वापर करत बाजूला केलं. यावेळी सरकार विरोधात निदर्शने आणि या पोलिसांचा निषेध करण्यात आला. सुमारे तासभर सुरू असलेल्या या राड्याने परिसरात एकाच गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.

दरम्यान, या संपूर्ण राड्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून आता या प्रकरणाचे राजकीय पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे. ऐकूणच विधानभवनच्या परिसरात दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली तुंबळ हाणामारी आणि शिवीगाळमुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा ढासळ्याची आता सर्वच स्तरातून टीका होत आहे. तर दुसरीकडे पोलिसांचा कृतीवर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर कडाडून टीका केली आहे.दरम्यान, विधानभवन परिसरात सुमारे तासभर चाललेल्या या राड्यानंतर पोलिसांनी पोलीसी बळाचा वापर करत धरपकड सुरू केली. तर यावेळी आव्हाड हे थेट पोलिसांच्या कार समोर ठिय्या देत होते. यावेळी त्यांनी कार रोखून धरली असता पोलिसांनी अक्षरक्ष: त्यांना फरफटत बाहेर ओढलं. त्यानंतर पोलिसांनी फौज बोलावली आणि कार्यकर्त्यांना व्यस्त ठेवलं. तर दुसरीकडे गपचूप दुसरी गाडी बोलावून कार्यकर्त्याला नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी आमदार आव्हाडांनी हे पाहिलं आणि परत राडा झाला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील हजार होते.

विधिमंडळाचं अधिवेशन आज (18 जुलै) संपणार आहे, त्यापूर्वी आदल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यामध्ये त्यांनी त्यांना नुकताच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी झालेला वाद, त्यानंतर आलेल्या धमक्यांसंदर्भात माहिती दिली. यानंतर थोड्याच वेळात विधानभवनाच्या लॉबीत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. जितेंद्र आव्हाड या घटनेंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात वाद झाला.

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

मुंबई: बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार केला आहे. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रतिनिधी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण बी, महापारेषणचे संजीव कुमार आदी उपस्थित होते. श्रीमती शुक्ला आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे वरिष्ठ सल्लागार मोहित भार्गव यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या करारामुळे महाराष्ट्रातील उर्जा क्षेत्रात संशोधन, तांत्रिक नवकल्पना आणि धोरणात्मक सहकार्याला गती मिळणार आहे. उर्जेचा स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणारा पुरवठा, ऊर्जा साठवणूक उपाय, वीज बाजार रचना, ग्रीड प्रसारण प्रणालीतील सुधारणा, हवामानाशी जुळवून घेणारी धोरणे आणि प्रशिक्षण कार्यक्रम या क्षेत्रांमध्ये संयुक्त काम होणार आहे.

“कॅलिफोर्निया विद्यापीठासारख्या संस्थेच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात उर्जा क्षेत्रात जागतिक दर्जाचे संशोधन आणि नवसंशोधनाला चालना मिळेल. या सामंजस्य करारामार्फत उर्जा साठवणूक, वीज बाजार, प्रसारण व्यवस्था आणि हवामान बदलाशी जुळवून घेणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता वृद्धी यांना चालना मिळणार आहे. स्वच्छ, विश्वासार्ह आणि शाश्वत उर्जेच्या दिशेने सहकार्याचा नवा अध्याय सुरू होत आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र सरकार आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले यांच्यातील हे सहकार्य परस्पर विश्वास, समानता आणि सामूहिक हिताच्या तत्त्वांवर आधारित असून, राज्याच्या उर्जा क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार स्थानिक उपाययोजना विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

हा करार लवचिक स्वरूपाचा असून त्यामुळे भविष्यातील प्रकल्पांनुसार सहकार्याचे दरवाजे खुले राहतील. या करारामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि प्रशासन यांना नवसंशोधन, क्षमता वृद्धी व प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही आणि शाश्वत उर्जेच्या दिशेने राज्याचा प्रवास अधिक गतिमान होईल, असा विश्वास ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी व्यक्त केला.

या सामंजस्य करारामध्ये खालील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ज्ञानसंपादन, संशोधन आणि प्रशिक्षणाची संधी मिळणार

  • स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या वीजेचा विकास
  • उर्जा साठवण  तंत्रज्ञानावर संयुक्त संशोधन
  • वीज मार्केटची रचना आणि धोरण निर्मिती
  • ग्रीड प्रसारण क्षेत्रातील नवोन्मेष
  • हवामान अनुकूलता (climate resilience) उपाययोजना
  • कौशल्यविकास आणि प्रशिक्षण उपक्रम

माध्यम प्रतिनिधींसाठी ‘आपल्या भोवतालचे महासागर जाणून घ्या’ या संकल्पनेवर आधारित वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन

पणजी

गोव्यातील पत्रसूचना कार्यालयातर्फे (पीआयबी) प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी ‘आपल्या भोवतालचे  महासागर जाणून घ्या’  या संकल्पनेवर आधारित वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था(एनआयओ), राष्ट्रीय ध्रुवीय तसेच महासागर संशोधन केंद्र (एनसीपीओआर) तसेच भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त सहकार्याने जुन्या गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्यसभा सदस्य सदानंद तनावडे यांच्या हस्ते झाले.

उपस्थितांना संबोधित करताना, सदानंद तनावडे यांनी वार्तालाप कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पीआयबीची प्रशंसा केली. संसद सदस्य तनावडे म्हणाले, “माध्यम प्रतिनिधी आणि सरकारी संस्था यांना एका मंचावर एकत्र आणल्याबद्दल मी पीआयबीचे अभिनंदन करतो. केंद्र सरकारी योजना, कार्यक्रम तसेच नियोजन यांची आणि केंद्र सरकारी संस्था जनता तसेच देशासाठी करत असलेल्या कामांची माहिती जनतेला देणे ही काळाची गरज आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम हा हेतू साध्य करतात.” ते पुढे म्हणाले की अशा उपक्रमासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी सामान्य लोक आपल्यासारख्या लोकप्रतिनिधीशी संपर्क साधू शकतात.

गोवा पत्रसूचना कार्यालयाचे संचालक नाना मेश्राम म्हणाले की सरकारी संपर्क माध्यमे  आणि माध्यम व्यावसायिक यांच्यातील संवाद आणि सहकार्याला चालना देणे हे वार्तालाप कार्यक्रमाच्या आयोजनाचे उद्दिष्ट  आहे. ते म्हणाले, “वार्तालाप हा कार्यक्रम पत्रकार आणि सरकारी अधिकारी यांना सरकारी उपक्रमांशी संबंधित माहितीसंदर्भात परस्पर संवाद, चर्चा आणि स्पष्टीकरण यासाठीचा अवकाश पुरवतो. येथे आम्ही महासागराच्या संदर्भातील संशोधनात सहभागी असलेल्या एनआयओ तसेच एनसीपीओआर या प्रमुख संस्था तसेच आपल्या महासागरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारे भारतीय तटरक्षक दल यांच्या सहकार्यासह हा कार्यक्रम करत आहोत. या कार्यशाळेच्या माध्यमातून माध्यमांमध्ये कार्यरत व्यक्तींना या संस्थांचे कामकाज समजून घेता येईल.”   

सरकारी संपर्क माध्यमे  आणि माध्यमे यांच्यातील नाते अधिक बळकट करुन माहितीचे अधिक परिणामकारक प्रसारण शक्य करणे हा वार्तालाप कार्यक्रमाचा उद्देश आहे असे ते पुढे म्हणाले.

यानंतर सीएसआयआर-एनआयओवर आधारित सत्रामध्ये मुख्य वैज्ञानिक डॉ. मंगेश गौंस यांनी या संस्थेच्या कामकाजाबद्दल चर्चा केली तसेच या संस्थेतर्फे हाती घेण्यात आलेल्या शास्त्रीय कार्यांची थोडक्यात माहिती दिली, तर ज्येष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ.पवन देवगण यांनी ‘जैविक आणि भूगर्भीय समुद्रशास्त्र यांतील गहन विचारधन’ या संकल्पनेबाबत माहिती दिली.

एनसीपीओआरवर आधारित सत्राचे नेतृत्व डॉ.अविनाश कुमार, वैज्ञानिक ई आणि प्रकल्प वैज्ञानिक डॉ.स्वाती नागर यांनी केले. ध्रुवीय विज्ञानासंदर्भात केंद्राने केलेले कार्य त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. उप कमांडंट एन अरुण कुमार यांनी देशाचे किनारे निर्धोक आणि  सुरक्षित ठेवण्यातील भारतीय तटरक्षक दलाची भूमिका विषद केली.

गोव्यातील विविध माध्यम संस्थांचे सुमारे 40 प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.