Home Blog Page 413

निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयाचा आधार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामाध्यमातून ५ हजारावर रुग्णांना साडेसहा कोटीहून अधिक रुपयांची वैद्यकीय मदत

समाजातील निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रयत्नांतून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या पाच महिन्यात पुणे जिल्ह्यातील ५ हजार ११२ रुग्णांना तब्बल ६ कोटी ५२ लाख ५६ हजार ६५७ रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.

धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ४१ अअ आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या (रिट याचिका क्र. ३१३२/२००४) निर्णयानुसार धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी मोफत आणि १० टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे.

विशेष वैद्यकीय मदत कक्षाची भूमिका

निर्धन व दुर्बल रुग्णांना धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा पारदर्शक व तातडीने उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई येथे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आहेत.
या कक्षाच्या कार्यकक्षेत पुढील बाबींचा समावेश होतो : धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल रुग्णांना त्वरित उपलब्ध करून देणे, उपलब्ध/रिक्त खाटांची माहिती रुग्णांना रिअल-टाईममध्ये देणे, कोणत्या रुग्णालयात कोणत्या आजारावर उपचाराची सुविधा आहे, याबाबत माहिती देणे, रुग्ण व नातेवाईकांना योजनेंतर्गत मिळणाऱ्या सवलतींची माहिती सहजतेने देणे, रुग्णालयात नियुक्त समन्वयकांमार्फत गरजूंना मदत करणे. या प्रक्रियेसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालयातील खाटा खरोखरच निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना मिळाव्यात, यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत देखरेख ठेवली जाते. विशेष मदत कक्षामुळे रुग्णांना खाटांची उपलब्धता, उपचार सुविधा व शासनाच्या सवलतींची माहिती रिअल-टाईममध्ये मिळते. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचण्यास मोठी मदत होत आहे.

जिल्हास्तरीय समिती व पुण्यातील धर्मादाय रुग्णालये

पुणे जिल्ह्यातील एकूण ५८ धर्मादाय रुग्णालयांतून निर्धन व दुर्बल रुग्णांना लाभ मिळत आहे. या रुग्णालयांना शासनाच्या विविध कर व अनुदान सवलती मिळतात. त्यामुळे गरीब रुग्णांसाठी आरक्षित खाटा उपलब्ध करून देणे त्यांच्यावर कायदेशीर जबाबदारी आहे. निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दराने उपचार मिळावेत, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समितीमार्फत धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटांची माहिती ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते आणि त्यावर राज्यस्तरीय मदत कक्ष सतत देखरेख ठेवतो.

वैद्यकीय मदतीसाठी अर्ज कसा करावा?

रुग्णांना मदत मिळण्यासाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो.
आवश्यक कागदपत्रे :
• रुग्णाचे आधारकार्ड
• शिधापत्रिका
• पॅनकार्ड
• उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांच्याकडून)
• रुग्णालयाने दिलेले उपचाराचे अंदाजपत्रक

कुठे संपर्क साधावा?

  • जिल्हाधिकारी कार्यालय कक्ष, पुणे. पत्ता: खोली क्रमांक १०, तळमजला, जुनी जिल्हा परिषद, पुणे
  • डॉ. मानसिंग साबळे, जिल्हास्तरीय कक्षाचे वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष आहेत,
    वैद्यकीय मदतीचा अर्ज भरण्यासंदर्भात अडचण आल्यास कक्ष प्रमुखांच्या ८०८७६७८९७७ या भ्रमणध्वनी क्रमांक तसेच cmrfpune@gmail.com ईमेल पत्त्यावर क्रमांकावर संपर्क साधावा.
    • टोल-फ्री हेल्पलाईन : १८०० १२३ २२११
    • संकेतस्थळ : https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in

रामेश्वर नाईक,कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई

धर्मादाय रुग्णालय निर्धन व दूर्बल घटकांतील रुग्णांसाठी आशादायी ठरत आहे. पारदर्शक व ऑनलाईन प्रणालीमुळे आरक्षित खाटांची माहिती रूग्ण व नातेवाईकांना सहज उपलब्ध होत आहे. त्यातून रूग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत. पुणे जिल्ह्यात वितरित करण्यात आलेली ६.५२ कोटींची मदत ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या कार्यप्रणालीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

धर्मादाय रुग्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण ५८ धर्मादाय रुग्णालये असून निर्धन व दूर्बल घटकांतील रुग्णांना लाभ देण्यात येत आहे. रुग्णालये धर्मादाय स्वरुपाची असल्याने त्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ देण्यात येतो. रुग्णालयांनी गरिबांकरिता आरक्षित खाटा पारदर्शकपणे उपलब्ध करून देऊन योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी शासनाने विहीत केलेल्या अटी व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याकरिता समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. १८: हर घर जल-जल जीवन मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याकरिता जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, यादृष्टीने सर्वांगिण बाबींने विचार करुन जिल्ह्यातील एकही वाडी, वस्ती, शाळा, अंगणवाडी पाण्यापासून वंचित राहणार नाही,याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. डूडी म्हणाले, हर घर जल-जल जीवन मोहिमेअंतर्गतपाणी पुरवठा योजनांचा प्रस्ताव सादर करतांना शाश्वत पाणीसाठा, प्रकल्पाकरिता लागणारी जागेची उपलब्धता व त्याकरिता पर्यायी व्यवस्था, सोलार प्रकल्प, पाणी पुरवठा योजना चालविणारी यंत्रणा आदी सर्वांगीण बाबींचा समावेश करावा. प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रीत करुन ती गतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता प्रशासकीय यंत्रणेने स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. पुर्ण झालेली पाणीपुरवठा योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी. या योजनांकरिता लवकरात लवकर महावितरणने वीज जोडणी करुन द्यावी. पाणी पुरवठा योजनांअंतर्गत पाण्याचा शाश्वत स्त्रोतांचा समावेश करुनच अटल भूजल योजनेअंतर्गत आराखडा सादर करावेत. यापूर्वी जिल्हा भूजल विकास यंत्रणेने स्थळ पाहणी करुन पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करावी.

श्री. पाटील म्हणाले, जलजीवन मोहिमेत जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, यामाध्यमातून ९ हजार ३३५ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. जागेबाबत प्रलंबित कामाबाबत यंत्रणेने पाठपुरावा करावा, स्थानिक पातळीवरील विषय जागेवर मार्गी लावण्याकरिता समन्वय ठेवावा, असेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी जलजीवन मोहिमेतील कामांची सद्यस्थिती, जिल्हा परिषद आणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने कामाच्याअनुषंगाने प्रस्तावित आराखडा, कृती आराखडा, प्रगतीपथावरील कामे, कामे करतांना येणाऱ्या अडचणी, प्रकल्पाकरिता लागणरी जागा, वीज जोडणी आदी विषयांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

स्पेनचे महाराष्ट्र मंडळ, युगांडाचे बेंजामिन तुमवेसीगये  ठरले ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२४’चे विजेते

पुणे: पुण्याच्या गौरवशाली गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी गेल्या वर्षीपासून ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये झालेल्या ग्लोबल गणेश करंडक २०२४ या जागतिक स्पर्धेत स्पेनच्या बार्सिलोना येथील महाराष्ट्र मंडळ (उत्सव विभाग) व युगांडाच्या बेंजामिन तुमवेसीगये (फोटोग्राफी विभाग) हे विजेते ठरले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गणेशोत्सव झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते घेण्यात येणार आहे.

उत्सव विभागात जपान येथील योकोहामा मंडळाने द्वितीय, झाम्बिया येथील महाराष्ट्र मंडळ लुसाकाने तृतीय, तर नायजेरियाच्या महाराष्ट्र मंडळ रेसिडेन्स असोसिएशनने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. फोटोग्राफी विभागात जर्मनीतील कार्तिक संघानी यांनी द्वितीय, तर भारतातील पुणेकर असलेल्या आनंद चैनी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेसाठी ऋशिकेष कायत, ऋतुजा नराल, तेजस्विनी गांधी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले होते.

स्पर्धेच्या संयोजनात ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ, स्वागत समिती प्रमुख अमोल जोशी, आंतरराष्ट्रीय समन्वयक धनश्री पाटील, मुख्य समन्वयक अनिरुध्द येवले, डॉ. सतिश देसाई, प्रणव भुरे, चिन्मय वाघ यांनी पुढाकार घेतल्याचे प्रसिद्धीप्रमुख जीवराज चोले यांनी कळवले आहे.

विकसित भारतासाठी युवकांची भूमिका महत्वाची – ले. जनरल धिरज सेठ

पुणे, १८ ऑगस्टः” गेल्या ७८ वर्षांमध्ये देशाने तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात उत्तुंग झेप घेऊन विकसीत भारताची घोडदौड सुरू केली आहे. देशातील प्रत्येकाला प्रगतीचे द्वार खुले करून आत्मनिर्भर भारताची नींव रोवली आहे. देशाला आकार देण्यासाठी युवकांबरोबरच प्रत्येक नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.” असे मत ले. जनरल धिरज सेठ यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने कोथरुड कॅम्पस येथे ले. जनरल धीरज सेठ व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७९ वां स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी व डब्ल्यूपीयूचे कुलसचिव गणेश पोकळे उपस्थित होते. तसेच संस्थेचे सर्व संचालक, प्राध्यापक, कर्मचारी व हजारो विद्यार्थी उपस्थित होते.
ले. जनरल धीरज सेठ म्हणाले,”राष्ट्रपिता म. गांधी यांनी अहिंसेचा नारा दिला तर सुभाषचंद्र बोस यांनी सेना उभी करून देशाला सशक्त बनविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे हा मंत्र देऊन क्रांतीचे बीज पेरल्याचे त्यांनी सांगितले.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”भारतमातेसाठी समर्पित भावना जागविण्याचा हा दिवस आहे. शिस्त, चारित्र्य आणि समर्पण या गोष्टींच्या आधारे प्रत्येकाने देशसेवा करावी. तसेच प्रत्येकाने माता, पिता आणि देशसेवेचे कर्तव्य बजावावे. भारताजवळ विश्वगुरू बनण्याबरोबरच जगाला सुख, शांती आणि समाधान देण्याची शक्ती आहे.”
डॉ.प्रसाद खांडेकर यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकांनी कार्य करण्याचे सांगितले. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले. विद्यार्थी पृथ्वीराज शिंदे यानी सर्वांनी शपथ दिली.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व अक्षिता सक्सेना यांनी आभार मानले.

माऊलींच्या सुवर्णकलशाला श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सची झळाळी-संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीकडून २२ किलो कलश निर्मितीचा मान

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगरकरांचा सन्मान

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण झाले. भाविकांच्या वर्गणीतून तयार केलेला हा अद्वितीय २२ किलोचा सुवर्ण कलश पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सने साकारला आहे. अपार श्रद्धा आणि उत्तम कामगिरीचा आशीर्वाद म्हणून आळंदी देवस्थान संस्थानाने नगरकर परिवाराला मिळाल्याची भावना आहे. कलशाचे विधिवत पूजन करून, नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर हा कलश नगरकर परिवाराने देवस्थान समितीकडे सुपूर्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, बापूसाहेब पाठारे, महेश लांडगे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, यांच्यासह संत परंपरेतील मान्यवर व देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नगरकर ज्वेलर्सचे वसंत नगरकर, प्रसाद नगरकर व पुष्कर नगरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या संमतीने नगरकर ज्वेलर्सला हे पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली. ८ ऑगस्टला कलश निर्मितीची सूचना आल्यानंतर वरचा कळस आणि खाली कुंभ असे दोन भागात काम सुरु झाले. चोख २२ किलो सोन्याच्या वापर करीत सलग सहा दिवस २२ ते २५ कारागिरांनी भक्तीभाव, निष्ठा व सर्जनशील कौशल्यातून हा कलश साकारला. हा सुवर्ण कलश केवळ वास्तूशोभा नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेला दिलेला तेजोमय मुकुट आहे, अशी भावना वसंत नगरकर यांनी व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त मंदिरावर प्रतिष्ठापित झालेला सुवर्णकलश बनविण्याचा क्षण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे. नगरकर ज्वेलर्ससाठी हा क्षण म्हणजे भक्तिभाव, समर्पण आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठीचा सुवर्ण वारसा आहे. नगरकर ज्वेलर्सना लाभलेला हा ऐतिहासिक मान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला समृद्ध करणारा ठरला, असे प्रसाद नगरकर म्हणाले.

श्रावण महोत्सवानिमित्त भव्य भजन स्पर्धा; महिलांच्या सहभागामुळे समाजाला नवा आत्मविश्वास : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. १८ ऑगस्ट २०२५ —
शिवसेना पुणे शहराच्या श्रावण महोत्सवानिमित्त द्वारका गार्डन, सुनिता नगर, वडगावशेरी येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संयोजन हेमंत बत्ते यांनी केले होते. मनोज अष्टेकर, गौरव कश्यप, उदय खांडके, प्रणव जोशी, दिनेश मुकुलकड, उत्तम नार्वेकर, श्रीकांत अप्पा कुलकर्णी, तुषार टाकळकर, रोहन साळवी आदींनी स्पर्धेचे आयोजन यशस्वी केले.

या प्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आज श्रावणी सोमवार असून महिलांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम हा खरोखरच प्रेरणादायी आहे. महिलांच्या आवाजातली भक्ती ऐकताना संत जनाबाईंची आठवण होते. घरची जबाबदारी सांभाळून जेव्हा महिला अशा पवित्र कार्यात सहभागी होतात तेव्हा त्या संपूर्ण समाजाला नवा आत्मविश्वास देतात.”

तसेच महिलांच्या विकासाबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “महायुती सरकारने स्त्रियांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा दिल्यामुळे एसटी महामंडळ पुन्हा नफ्यात आले आहे. हजारो महिला एसटीने प्रवास करू लागल्याने एसटीच्या अर्थचक्राला गती मिळाली आहे. तसेच महिलांचे बचत गट, उद्योजकता यामुळे ग्रामीण व शहरी भागात आर्थिक चक्राला बळकटी मिळत आहे. महिलांना दिलेली कर्ज ९९% परतफेडीचा विक्रम करतात हीच त्यांची विश्वासार्हता आहे. महिलांनी घेतलेले कर्ज फक्त परतफेडच नव्हे तर अनेक ठिकाणी रोजगारनिर्मिती आणि कुटुंबाच्या स्थैर्याला बळ देण्यासाठीही मोलाचे ठरले आहे.”

या कार्यक्रमाला शिवसेना पुणे शहर संघटक आनंद गोयल, दिलीप देवकर, विनोद गलांडे, अनिता परदेशी, पद्मा शेळके, चेतन गलांडे, लक्ष्मण सावंत, धनंजय शिंदे, मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पृथ्वी वाचवायची असेल तर पर्यावरण वाचविणे काळाची गरज -शोभाताई आर धारीवाल

पुणे-पृथ्वी वाचवायची असेल तर पर्यावरण वाचविणे काळाची गरज आहे ,वृक्षतोडीवर वृक्षारोपण हा पर्याय नसून वृक्षपुनर्रोपण हा जास्त प्रभावी उपाय असे प्रतिपादन येथे शोभाताई आर धारीवाल यांनी केले आहे .रवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रविवार रोजी सायंकाळी 4 वाजता पद्मश्री आचार्य चंदनाजी , मुकेश मुनिजी , जयप्रभ विजयजी ,आगमचंद्रजी स्वामी यांच्या उपस्थितीत ” उवसग्गहरं स्तोत्र ‘सामूहिक जपाचे आयोजन श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल स्थानक बिबवेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आलेले होते .यावेळी त्या बोलत होत्या .या कार्यक्रमासाठी पुनीत बालन ,पोपटशेठ ओसवाल, वालचंदजी संचेती , विजयकांतजी कोठारी ,अचल जैन, विविध जैन संस्थांचे पदाधिकारी,नामवंत उद्योजक, तसेच शोभाताई आर धारीवाल वसतिगृह एफसी रोड, शोभाबेन आर धारिवाल छात्रालय डेक्कन व शोभाताई आर धारीवाल वसतिगृह चिंचवड येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी , विविध गणेश मंडळे , आळंदी येथील वारकरी संप्रदायाचे भाविक तसेच जैन- अजैन बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते.

शोभाताई धारिवाल म्हणाल्या,’ जैन धर्मामध्ये संस्कार आणि मूल्य यांची परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे , धर्मात अनेक मंत्र सांगितलेली आहे त्यापैकी उवसग्गहरं मंत्र संकटावर मात करणारा असून याच मंत्राने श्रीमान रसिकशेठ धारीवाल साहेब रुग्णालयात व्हेंटिलेटर असतांना वैद्यकीय सेवेसोबतच रोजच्या जापणे सकारात्मक ऊर्जा तयार होऊन प्राण वाचू शकले अशी माझी धारणा आहे ,म्ह्णूनच मी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा दरवर्षी सामूहिक स्तोत्र पठण जाप आयोजीत करते जेणेकरून समाजामध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल आणि अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे ही सामाजिक गरज आहे , यात फक्त जैन समाज सामील होत नसून इतर समाजही मोठ्या प्रमाणात स्तोत्र पठणाचा लाभ घेतो, यावर्षीचे आयोजनाचे हे नववे वर्ष आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वतःहून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांचे स्वागत करते असे प्रतिपादन शोभाताई आर धारिवाल यांनी वावेळी व्यक्त केले ,आर एम डी फाऊंडेशन द्वारा आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भारत भर कार्य केले जाते ,गरजू व हुशार विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे उच्चशिक्षणासाठी मदत केली जाते, अत्यवस्थ शाकाहारी रुगांना आर्थिक मदत केली जाते , आज बांधकाम किंवा रस्ते विस्तारण्यासाठी मोठ्या मोठ्या झाडांना तोडल्या जाते , वृक्षतोडीवर वृक्षारोपण हा पर्याय नसून वृक्षपुनर्रोपण हा जास्त प्रभावी उपाय आहे अशा वेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांच्या द्वारे ५० ते १०० वर्षे वयाची मोठी वृक्ष वाचविण्याची मोठी मोहीम हाती घेतलेली असून आतापर्यंत २१०० पेक्षा जास्त वृक्षांना वाचविण्यात यश आले आहे, पृथ्वीला वाचविण्यासाठी पर्यावरण वाचविणे गरजेचे आहे आवाहनही यावेळी शोभाताई यांनी उपस्थितांना केले . त्याच वेळी त्यांनी यावर्षी डीजे मुक्त दहीहंडी उत्सव साजरा करणारे बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांची स्तुतीही केली आणि एकप्रकारे पृथ्वीला आणि पर्यावरणाला वाचविण्याची धुराच जान्हवी धारिवाल बालन आणि पुनीत बालन यांनी खांद्यावर घेतली आहे यासाठी त्यांनी दोघांचेही अभिनंदन केले .

लहानवयातच जान्हवी यांनी बिहारमधील विरायतन संस्थेच्या कार्यात खूप मोठं सहकार्य केले आहे आज विरायतन संस्थेच्या द्वारे सुरु असलेली रुग्णसेवा,शिक्षण कार्य यामध्येही त्यांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे मी त्यांना खूप आशीर्वाद देते असे मत आचार्य पद्मश्री चंदनाजी यांनी व्यक्त केले . पू . श्री जयप्रभ विजयजी यांनी उवसग्गहरं स्तोत्र चे महत्व श्रावकांना समजावून सांगितले, तर पू .श्री आगमचंद्रजी स्वामी यांनी अशा प्रकारचे उपक्रम स्तुत्य असून त्याचा लाभ सर्वांना व्हावा , मुकेश मुनिजी यांनी अशा प्रकारचे सामूहिक स्तोत्र जपाचे लोकांसाठी लाभदायक आहेत असे असे आशीर्वाद दिले .
स्तोत्र पठणानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता .

जीवनात यशस्वी होण्यासाठी कल्पक, ध्येयवादी रहावे-डॉ. भावेश भाटिया यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

पुणे: “जीवनात यशस्वी होण्यासाठी कल्पक, ध्येयवादी व प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. आयुष्यात यश साध्य करायचे असेल, तर फक्त स्वप्न पाहू नका; ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत राहा,” असा सल्ला सनराईज कँडल्स अँड ओशोनिक व्हिजन फॉर ब्लाइंड वेलफेयर सोसायटीचे संस्थापक डॉ. भावेश भाटिया यांनी विद्यार्थ्यांना दिला.

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. भावेश भाटिया प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समितीच्या मुलींचे नवीन वसतिगृहात झालेल्या कार्यक्रमावेळी भाटिया यांची पत्नी नीता, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, पद्माकर जोगदंड, दिनकर वैद्य, चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओंकार शिंदे, मानसी जाधव यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले. डॉ. आपटे वसतिगृहात कर्नल दीनानाथ सिंग, सुमित्रा सदनमध्ये विनया ठोंबरे, लजपत भवनमध्ये श्रीधर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

कार्यक्रमाची सुरवात देशभक्तीपर गीते आणि ऑपरेशन सिंदूर वरील ऍक्ट सादर करून झाली. संघर्षपूर्ण वाटचाल करत यशस्वी उद्योजक बनलेल्या दृष्टीहीन डॉ. भावेश भाटिया यांनी आपला प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. यशस्वी उद्योजकासोबतच गिर्यारोहक, क्रीडापटू, सायकलपटू अशी भाटिया यांची उल्लेखनीय कामगिरी ऐकून उपस्थित प्रभावित झाले. या प्रवासात पत्नी नीता हिची मोलाची साथ लाभल्याचे सांगून समिती आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहे, तेही एक प्रकारे देशसेवेचेच कार्य आहे, अशा शब्दांत समितीच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

डॉ. भाटिया म्हणाले, “घरची परिस्थिती बिकट असताना, आईच्या आजारपणात नातेवाईकांची साथ लाभली नाही. अशावेळी महाबळेश्वर येथे मसाजचा व्यवसाय करत यशस्वी होण्याचे ध्येय उराशी बाळगून ५००० रु पासून सनराईज मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. कोणतीही वस्तू बनवण्यापेक्षा ती विकणे कठीण असते. मात्र, नफ्याचा विचार न करता ग्राहकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करत व्यवसाय केला. हा व्यवसाय करताना माणसे जोडली. रेल्वे प्लॅटफॉर्म, बस स्टॅन्डवर अनेक दिव्यांग, दृष्टिहीन बांधव भीक मागण्याचे काम करतात. त्यांना रोजगार उपलब्ध करून दृष्टीहीन, तसेच दिव्यांगांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही भाटिया यांनी नमूद केले.

तुषार रंजनकर यांनी प्रास्ताविकात समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली. समिती हे युवा परिवर्तनाचे केंद्र बनले असून, विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याचा दृष्टीने काम केले जात आहे. दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाते. यावेळी समितीचे हितचिंतक असलेल्या पद्माकर जावडेकर यांच्या परिवाराकडून दोन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समितीतील विद्यार्थ्यांनी देणगी स्वरूपात काही रक्कम गोळा करून ती डॉ. भाटिया यांच्या संस्थेला दिली. ओंकार शिंदे व पर्णवी म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. सानिका खामणकर हिने आभार मानले.

आयुक्त साहेब,उड्डाणपूल खुले करा..भाजपच्या ‘इव्हेंट’ची वाट पाहण्याचे तुमचे काम नाही, लोकहिताला प्राधान्य द्या

  • माजी आमदार मोहन जोशी यांचे
    महापालिका आयुक्तांना पत्र

पुणे : वाहतूक कोंडी सुटण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आणि सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीने खुले करावेत, भाजपच्या ‘इव्हेंट’ची वाट पाहात बसू नका, अशा मागणीचे पत्र माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिले आहे.

मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मिळत नसल्याने या दोन पुलांचे उदघाटन थांबले आहे, अशी माहिती मिळते. हा प्रकार पुणेकरांचा मनःस्ताप वाढविणारा आहे. सिंहगड रस्त्यावरील गंगा भाग्योदय चौक ते विठ्ठलवाडी या मार्गांवर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे कामही पूर्ण झालेले असल्याने हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी तातडीने खुले करून वाहनचालकांची कोंडीतून मुक्तता करून, त्यांना दिलासा द्यायला हवा, असे मोहन जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.

या दोन्ही ठिकाणी नागरी वस्ती वाढली आहे. त्यामुळे रहदारीही वाढली आहे. या दोन्ही ठिकाणांवरून दिवसभरात अक्षरशः हजारो वाहने येत जात असतात. गर्दीच्या वेळी तीन-तीन तास वाहतूक कोंडी होते. आता गणेशोत्सव काळात वाहतुकीत अजून भरच पडेल. मग, पुणेकरांची कोंडी कशासाठी करत आहात? असा सवाल मोहन जोशी यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

सत्ताधाऱ्यांना उदघाटनाच्या निमित्ताने एक ‘इव्हेंट’ करून निवडणुकीत राजकारण साधायचे आहे. या वृत्तीला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. प्रशासनाने हे पूल वाहतुकीसाठी खुले करावेत, अन्यथा काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी पत्रात दिला आहे.

दोन-तीन दिवसात प्रभाग रचना जाहीर होणार?

पुणे -महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दोन तीन दिवसात प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. दरम्यान मतपत्रिकेवर मतदान घ्यावे आणि एक वार्ड एक नगरसेवक एक मतदार एक मतदान या जुन्याच पद्धतीने लोकाना आजही मतदान पद्धतीवर गाढ विश्वास आहे.EVM आणि प्रभाग पद्धतीला मतदारांचा विरोध होऊ लागला आहे असे असताना निवडणूक आयोग मात्र मनमानी कारभार करत असल्याचा आरोप होत असताना महापालिकेची निवडणूक होणार आहे.

या संदर्भात उज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,प्रशांत बधे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे कि,’या दोन-तीन दिवसात प्रभाग रचना जाहीर होणार आहे या विषयात आम्ही थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार आमच्या मते जुने जे प्रभाग आहेत ते साधारणपणे तसेच राहत आहेत फक्त त्यातील काही भाग वाढेल व कमी होईल साधारणपणे सर्व प्रभागांमध्ये 90 ते 95 हजार मतदार असतील असे गृहीत धरल्यास आत्ताच्या असलेल्या प्रभागात 12 15 याद्या वाढवाव्या लागतात त्या प्रशासनाच्या सोयीनुसार ते वाढवतील असे वाटते तसेच काही ठिकाणी नाला ही हद्द धरल्यामुळे काही प्रभागाचे मात्र दोन भाग होतील त्यातील एक भाग शेजारच्या प्रभागाला जोडला जाईल तर दुसऱ्या भागामध्ये चार चा प्रभाग करताना नवीन मोठा भाग जोडला जाईल अशी अशी प्रभाग रचना साधारणपणे आहे
जुन्या पुण्यातील प्रभाग मध्ये मतदार संख्या साधारणपणे 90000 ते 95 हजार असु शकते तर खडकवासला पासून केशवनगर पर्यंत नवीन आलेली सर्व गावे ही आत्ता असलेल्या प्रभागांना जोडू शकतात यामध्ये उदाहरण म्हणून जुना धायरी चा प्रभाग त्याला उर्वरित धायरी व खडकवासला नांदेड नांदोशी किरकटवाडी हा भाग जोडला जाऊ शकतो फक्त वाघोली लोहगाव मध्ये एखाद्या वेळेला स्वतंत्र प्रभाग होऊ शकतो असा आमचा अंदाज आहे हे आम्ही वेळोवेळी वर्तमानपत्राच्या द्वारे जी माहिती येत होती व लोकसंख्येची 2००7 परिस्थिती या आधारे अभ्यास करून केला आहे बघू आमच्या अभ्यासाला कितपत यश मिळते ते 22 तारखेला समजेल
आयुक्त साहेबांनी ऐकले सर्वांचे आणि केले मनाचे…अर्थात मार्गदर्शक तत्त्वा नुसार …अशी माहिती आहे,खरे खोटे प्रभाग जाहीर झाल्यावर कळेल.

विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट

बुलढाणा/ मुंबई दि. १८ ॲागस्ट २०२५

बुलढाण्याच्या जळगाव-जामोद तालुक्यातील आडोळ डॅम परिसरातील गावठाण रस्त्याच्या मागणीसाठी गौलखेड येथील तरुण विनोद पवार यांचा जलसमाधी आंदोलनात मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज गौलखेड येथे पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामविजय बुरुंगले, स्वातीताई वाकेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की स्वातंत्र्यदिनी आपल्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना एखाद्या शेतकऱ्याचा जीव जावा, ही आपल्या लोकशाहीला कलंक लावणारी बाब असून शासन-प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे निदर्शक आहे. या दुर्देवी घटनेनंतर जिल्हाधिका-यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन हलगर्जीपणा बद्दल माफी मागितली पाहिजे होती व ते मुजोरी दाखवत आहेत.

सततच्या संघर्षानंतरही शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही. एखाद्या शेतकऱ्याला आपला जीव देऊन मागण्या मांडाव्या लागतात, हे कोणत्याही जबाबदार शासनासाठी लज्जास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व मागण्यांची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी तसेच पवार यांच्या कुटुंबियांना भरघोस मदत करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

पुण्यात पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का ?

मुंबई दि. १८ ॲागस्ट २०२५
पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तरुणींनी केली होती. त्यांच्या तक्रारीची साधी दखलही पोलिसांनी घेतली नाही. १२ तासांहून अधिक काळ पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद केला नाही. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पुणे पोलिसांनी केला आहे. हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

१ ऑगस्ट रोजी कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करणा-या पोलिसांवर तात्काळ ॲट्रॅासिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला पाहिजे होता पण पोलिसांनी त्यांची साधी तक्रारही घेतली नाही. म्हणून
या पीडित मुलींनी पोलीस आयुक्तांलयात दाद मागितली पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तिथेच ठिय्या आंदोलन केले. पण पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, उलट या प्रकरणी गुन्हा दाखल करता येणार नाही असे पत्र देऊन पीडितांना पाठवून दिले. याप्रकरणी पुणे पोलिसांविरोधात जनमानसातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करत आहेत, आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत, हे पुण्यात पोलिसांचे जंगलराज आल्याचे निदर्शक आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मुंबई, पुण्यासह 7 जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट

मुंबई, मराठवाड्यासह थेट विदर्भापर्यंत रविवारी रात्रीपासून पावसाने धूमशान घातले.सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत, रायगड येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला.

तालुकानिहाय पर्जन्यमान, दि. १८ ऑगस्ट (मि.मी.)संध्या. 5:30 वा. अलिबाग – 135 मुरुड – 47 पेण –142 पनवेल – 134.6 उरण –56 कर्जत – 47 खालापूर –85 माथेरान –147 रोहा –160 सुधागड 84 माणगाव – 142 तळा –134 महाड –93 पोळाडपूर –106 श्रीवर्धन –140 म्हसळा –143 एकूण –1795.6 सरासरी –112.23

आता उद्या मंगळवार, 19 ऑगस्ट रोजीही मुंबई पुण्यासह एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केलाय. तर विदर्भातल्या गडचिरोलीसह चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. तूर्तास तरी पूरस्थिती आटोक्यात असून, जवळपास एक हजार हेक्टरवरील शेतपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला.

पुढील 3-4 तासांत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वारे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली असून, राज्यात उद्याही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.हवामान विभागाने जवळपास 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलाय. त्यात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळचा समावेश आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. या काळात वाऱ्याचा वेग साधारणतः 30-40 किमी प्रतितास राहील.

पुतिन यांनी PM मोदींशी फोनवरून चर्चा -रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने भारतावर कर लादला

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गेल्या आठवड्यात अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल त्यांना सांगितले.

मोदींनी युक्रेन युद्धावर संवादाद्वारे शांततापूर्ण तोडगा काढण्याबद्दल बोलले. ते म्हणाले की, भारत या संदर्भातील सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावरही चर्चा केली.शुक्रवारी रात्री उशिरा अलास्कामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट झाली. युक्रेन युद्ध संपवण्याबाबत त्यांची सुमारे ३ तास बैठक झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी फक्त १२ मिनिटे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.

पत्रकार परिषदेदरम्यान ट्रम्प म्हणाले की, आमची बैठक खूप सकारात्मक होती. आम्ही अनेक मुद्द्यांवर सहमत झालो, पण कोणताही करार झाला नाही. जेव्हा तो अंतिम होईल तेव्हाच करार होईल.

ट्रम्प यांनी या बैठकीला १० पैकी १० गुण दिले. दुसरीकडे, पुतिन म्हणाले की रशियाची सुरक्षा त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. त्यांनी पुढील बैठक मॉस्कोमध्ये आयोजित करण्याचा सल्ला दिला. आपापली बाजू सांगितल्यानंतर दोन्ही नेते लगेचच व्यासपीठावरून निघून गेले.

त्याच वेळी, झेलेन्स्की यांनी एक्स वर पोस्ट केले की त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दीड तास चर्चा केली. झेलेन्स्की १८ ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन डीसीला जातील आणि ट्रम्प यांना भेटतील. त्यांनी सांगितले की, युक्रेन पूर्ण ताकदीने शांतता प्रस्थापित करण्यास तयार आहे.
भारत हा रशियन तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे

भारत हा चीननंतर रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. युक्रेन युद्धापूर्वी, भारत रशियाकडून फक्त ०.२% (प्रतिदिन ६८ हजार बॅरल) तेल आयात करत असे. मे २०२३ पर्यंत ते ४५% (प्रतिदिन २० लाख बॅरल) पर्यंत वाढले, तर २०२५ मध्ये, जानेवारी ते जुलै या काळात, भारत दररोज रशियाकडून १७.८ लाख बॅरल तेल खरेदी करत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून, भारत दरवर्षी १३० अब्ज डॉलर्स (११.३३ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीचे रशियन तेल खरेदी करत आहे.

हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल यांची निवड

पुणे : हिंदू समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि संघटनबांधणीसाठी अखंड कार्यरत असलेल्या हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी पुण्याचे कोहिनूर, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

ही निवड समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत करण्यात आली. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास समितीचे अखिल भारतीय संयोजक गुणवंतसिंग कोठारी आणि पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

महामंत्री किशोर येनपुरे यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. त्यानुसार –

उपाध्यक्ष: पंडित शिवकुमार शास्त्री

संयोजक: किशोर येनपुरे

सहसंयोजक: अॅड. संदीप सारडा

मठ-मंदिर उपाध्यक्ष: संजय भोसले

प्रशासकीय संस्था उपाध्यक्ष: सीए राधेश्याम अगरवाल, चरणजीतसिंग सहानी

कार्यालय प्रमुख: योगेश भोसले

कोषाध्यक्ष (कॉर्पोरेट): नितीन पाटणकर, संजय गांधी, नितीन पैलवान, गुरुबक्षसिंह मखेजा

कोष कॉर्पोरेट मार्गदर्शक: प्रल्हाद राठी

दस्तावेजीकरण: प्रकाश ढगे, उदय कुलकर्णी

जाती समूह प्रमुख: सिद्धेश कांबळे, राजन बाबू

प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क: सीए डॉ. केतन जोगळेकर, कुंदन साठे, संतोष डिंबळे, सीए सुनील सुरतवाला, राजेश मेहता

महिला सहभागाला प्राधान्य देत मातृशक्ती विभागाची जबाबदारी अॅड. कीर्ती कोल्हटकर, अनुपमा दरक, विद्या घाणेकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर मार्गदर्शक मंडळात महेश सूर्यवंशी, राजेंद्र भाटिया, सुभाष परमार, सुनंदा राठी यांची निवड झाली आहे.

एकूण ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या नव्या कार्यकारिणीमुळे समितीच्या कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.