Home Blog Page 3835

बिबवेवाडीतील घरे नियमित करणार- माधुरी मिसाळ

0

पुणे : बिबवेवाडीतील डोंगरउतार व डोंगरमाथ्यावरील घरे नियमित करू, असे आश्‍वासन पर्वतीतील भाजप, आरपीआय, शिवसंग्राम, रासप आणि स्वाभिमानी महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी दिले.
निवडणुकीच्या प्रचारासाठी मिसाळ यांनी आज महेश सोसायटी, ओटा अप्पर, विघ्नहर्तानगर, शिवतेजनगर, जागडे चाळ परिसरात पदयात्ना काढली. माजी नगरसेवक गोपाळ चिंतल, प्रभाताई मटाले, कालिदास जागडे, नितीन बेलदरे, अजय भोकरे, विशाल दारवटकर, सचिन मारणे, मामा डोलारे, आशाताई बिबवे यांचा प्रमुख सहभाग होता.
मिसाळ म्हणाल्या, बिबवेवाडीतील गावकर्‍यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत. निवासीकरण झालेल्या जमिनीवर हिल टॉपचे आरक्षण टाकण्यात आले. प्रस्तावित विकास आराखड्यात हे आरक्षण कायम आहे, पण बिल्डर्सच्या जमिनीवरील आरक्षण उठविण्यात आले. हरीश परदेशी, मंगेश सप्रे, अनिल जाधव, संगीता चौरे यांचा प्रमुख सहभाग होता. या परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मिसाळ यांनी या वेळी सांगितले. आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे, औषधे फवारणी केली जात नाही, स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. कचराकुंडीमुक्त प्रभाग ही संकल्पना राबविणार असून, खतनिर्मिर्ती, बायोगॅसनिर्मिर्ती प्रकल्पांना प्राधान्य देणार आहे. आमदार निधीतून सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देणार आहे.

शशिकांत सुतार आणि महादेव बाबर हे कार्यसम्राट च

0

कोंढवा खु. येथे परिसरातील महिला मेळाव्यात माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी आ. महादेव बाबर या कार्यसम्राटाला पर्याय नाही. मतदारांनी विशेषत: महिलांनी सकाळी सर्वाधिक मतदानाचा उच्चांक गाठावा, असे आवाहन करण्यात आले मेळाव्यात कल्पना थोरवे, स्मिता महादेव बाबर, संगीता ठोसर, मेधाताई बाबर आदी महिला आघाडीप्रमुखांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले.
कोंढवा-कात्रज मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या भागात उड्डाणपूल उभारणी, नाला चॅनलिंग, भाजी मंडईचे पुनर्वसन, गुंठेवारी नियमित करणे, तिप्पट लादलेले कर कमी करणे, तसेच या भागात विशेष जादा पाणीपुरवठा करणे या प्रश्नांना प्राधान्य व अग्रक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत शिवसेना हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव बाबर यांनी त्या परिसरातील नागरिकांना वाघनगर येथे मतदारांशी संपर्कप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कोंढवा बु., कामठेनगर, पुण्यधाम कॉर्नर, कोंढवा बु., कात्रज हायवे आंबेडकरनगर या परिसरात आ. बाबर यांना मतदारांनी औक्षण केले. पदयात्रेत नगरसेवक भरत चौधरी, संगीता ठोसर, गणेश कामठे, माउली कामठे, बाळू कामठे, दादा सकुत, आदित्य हगवणे, ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
यामध्ये माजी नगरसेवक तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर यांचाही समावेश

भानगिरे यांच्या साठी वसंत मोरे सरसावले

0

कात्रज परिसराच्या विकासाचा पॅटर्न नाना भानगिरे संपूर्ण हडपसर मतदारसंघात राबवतील. आपण केलेल्या विकासकामांची पोहोच पावती कात्रजवासीयांनी भानगिरे यांना द्यावी, असे प्रतिपादन मनसे गटनेते वसंत मोरे यांनी कात्रज येथे बोलताना केले.
मनसे उमेदवार प्रमोदनाना भानगिरे यांनी कात्रज परिसराचा झंझावाती दौरा केला. यावेळी कोपरा सभेत वसंत मोरे बोलत होते. यावेळी भानगिरे, शहरप्रमुख आशिष साबळे, राजाभाऊ कदम, मंगेश रासकर, बाळासाहेब फाटे, नितीन जगताप, योगेश खैरे, प्रशांत मोरे, महेश खेडेकर, मनीषा दीक्षित, अंजली सुपेकर, मंदाताई शेंडगे, शिल्पा तुपे, शेलार काकू, तोंडे काकू, सागर गोळे, नीलेश वतारी यांच्यासह हजारो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना भानगिरे म्हणाले, मनसेची उमेदवारी मला देण्यात वसंतभाऊचे योगदान आहे. कात्रजचा विकासाचा पॅटर्न संपूर्ण हडपसर मतदारसंघात मी राबवेन. कात्रजवासीयांनी या प्रचार दौर्‍यात जो उदंड प्रतिपाद देऊन पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली, त्याची परतफेड कात्रज, सासवड रस्त्याचे चौपदरीकरण आणि विकासकामांकरिता अधिकाधिक निधी देऊन मी काम करणार आहे.
या प्रचार दौर्‍यात कात्रज गावठाण, गोकुळनगर, संतोषनगर, भाजीमंडई, अंजनीनगर, गुजरवाडी फाटा आदी भागात भानगिरे यांचे विविध मंडळे, बचतगट प्रतिष्ठाने, भाजी विक्रेते, कामगारवर्गांनी फटाके लावून जोरदार स्वागत केले.

राज- उद्धव यांनी एकत्र यावे अशी नाना पाटेकर यांची ही इच्छा

0

2379327851_037b037a58

राज आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र यावे अशी माझी पहिल्यापासून मनोमन इच्छा आहे ,महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव व राज ठाकरे हे दोघे बंधू नक्कीच एकत्र येतील असे मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. नाना पाटेकर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते तेव्हा ते बोलत होते.आपण राजकारणात जाणार नाही. कारण तो आपला प्रांत नाही. कॅमेरा आपला प्रांत आहे. मात्र, कोणी जर मला राज्यसभेत पाठवले तर मी जरूर संसदेत जाईन. ज्याने मला पाठवले त्याच्यापेक्षा तेथे मी माझे विचार मांडेन असेही नानाने सांगितले
नाना पाटेकर म्हणाले, राज आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र यावे अशी माझी पहिल्यापासून मनोमन इच्छा आहे. पण ते एकत्र येत नव्हते. पण सध्या जी राजकीय स्थिती तयार झाली आहे त्यामुळे ते एकत्र येतील असे मला 100 टक्के नव्हे तर 300 टक्के वाटते. राज आणि उद्धव यांच्यात कोण ऐकत नाही याविषयी नानांना छेडले असता बिनधास्त नाना म्हणाले, दोघेही समंजस आहेत. पण त्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या होत्या. या दोघांतील कोण ऐकत नाही हे सांगणे कठीण आहे, कारण ऐकतील ते ठाकरे कसले? असा फटकेबाजी नानाने केली. सेना-भाजप युती तुटू नये असे मला वाटत नव्हते. आघाडीही तुटायला नको होती. कारण यात सर्वांचे नुकसान होणार आहे. युती, आघाडीच्या वेळी मतदान कोणाला करायचे ते ठरवता यायचे आता सर्वच जण मैदानात असल्याने कोणाला शिक्का मारावा ते कळत नाहीये असा त्रागा नाना यांनी व्यक्त केली.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना मत देऊ नका मग तो कोणत्याही का पक्षाचा असेना असे आवाहन करताना नाना म्हणाले, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी एक समाजातील एक सामान्य माणूस आहे. पण मला शरद पवार, बाळासाहेब ठाकरे व बड्या लोकांवर टीका केली पटत नाही. सध्या सामान्यांवर खूप बंधनं आहेत मात्र ती राजकारण्यावर आहेत. आपण राजकारणात जाणार नाही. कारण तो आपला प्रांत नाही. कॅमेरा आपला प्रांत आहे. मात्र, कोणी जर मला राज्यसभेत पाठवले तर मी जरूर संसदेत जाईन. ज्याने मला पाठवले त्याच्यापेक्षा तेथे मी माझे विचार मांडेन. पण मला सर्वांनी भरभरून दिले आहे आता मी त्यांना देण्याची वेळ आली आहे, असेही नानांनी सांगितले.

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूमागे घातपात नसल्याचा सीबीआयचा निर्वाळा

0

नवी दिल्ली- सतीश शेट्टी यांचे मारेकरी सापडत नाही म्हणून कोर्टाला क्लोजर रिपोर्ट देणाऱ्या सीबीआयने चार महिन्यापूर्वी दिल्लीत झालेल्या दिवगंत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचा निर्वाळा दिला आहे. सीबीआयने केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबतचा अहवाल आज सादर केला. त्यात ही बाब पुढे आली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री गडकरींवर हल्ला होण्यामागे मुंडेंच्या मृत्यूची चौकशीबाबत सरकार टाळाटाळ करीत असल्याने वंजारी समाजाच्या तरूणाने नैराश्यातून गडकरींवर बूट उगारल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याने भाजपनेच हा अहवाल तत्काळ पुढे आणण्याच्या जोरदार हालचाली केल्याचे वृत्त एका वृत्त संस्थेने प्रसिध्द केले आहे
मोदी सरकारने जुलै महिन्यात मुंडेंच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी मान्य करीत सीबीआयला तसे आदेश दिले होते. आता तीन-चार महिन्यानंतर सीबीआयने मुंडेंच्या अपघाती मृत्यूचा अहवाल तयार करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या विभागाकडे सादर केला आहे. हा अहवाल अधिकृतरित्या जाहीर केला नसला तरी त्यातील निष्कर्ष बाहेर आला आहे. यात मुंडेंच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचा निर्वाळा सीबीआयने दिला आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना सोमवारी रात्री पुण्यातील कोथरूड भागात बूट मारण्याचा प्रयत्न झाला ज्या माथेफिरू तरूणाने गडकरींवर बूट उगारला त्याचे नाव भारत कराड असून तो वंजारी समाजाचा व भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी जरी या माथेफिरूने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगीतले असले तरी याबाबत नानाविध शंका उपस्थित केल्या जात आहेत
विरोधकांसह भाजपमधील अनेक नेत्यांनी मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर या चर्चेला आणखीच तोंड फुटले होते. गडकरी-मुंडे यांच्यातील राजकीय वितृष्टामुळे मुंडे समर्थकांत गडकरींबाबत रोष आहे. त्यामुळेच मुंडेंच्या अंत्यविधीला गडकरींना भाजपमधील काही मंडळींनी जाऊ दिले नव्हते. एवढेच नव्हे तर आता गडकरींना बीडमध्ये प्रचारालासुद्धा येऊ दिले नाही. मुंडेंचा अपघाती मृत्यू हा वंजारी समाजासाठी मोठा धक्का होता. . अखेर भाजपने यावर पडदा टाकत सीबीआयचा अहवाल पुढे आणला आहे.

खडकमाळ आळीत अभय छाजेड यांची प्रचार फेरी

0

abhay
पर्वती मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार अभय छाजेड यांनी खडकमाळ आळी व घोरपडी पेठेच्या परिसरात प्रचारयात्रेच्या
माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या समवेत संजय बालगुडे , निता परदेशी , कमल व्यवहारे ,अजित दरेकर अमित बागुल, नंदकुमार बानगुडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. खडक गणपतीपासून सुरु झालेली ही प्रचारयात्राविठ्ठल मंदिर, नवलोबा मंदिर जहागीरदार मारुती, जोशी वाडा,पांडव प्रताप, असा मार्गक्रमण करीत झगडेवाडी पोलीसलाईन येथे समाप्त झाली.

शेतकऱ्यांच्या भेटीसाठी थेट शेतावर

0

laygude

अवघे काहीच दिवस प्रचारासाठी राहिल्याने आणि मतदार संघ मोठा असल्याने प्रत्येक वस्ती, वाडी, गावे हा सर्व परिसर खडकवासला मतदार संघाचे म न से चे उमेदवार राजाभाऊ लायगुडे पिंजून काढत आहेत. खडकवासला मतदारसंघाचा बराचसा भाग ग्रामीण भागात येत असल्याने खेड़ेगावातील मतदारांना राजाभाऊ थेट शेतातच जावून भेटत आहेत सुगीचे दिवस आसल्याने व पाऊस वेळी, अवेळी येत असल्याने शेतकरी सध्या हवालदिल आहे. त्यामुळे सकाळ ते सायंकाळ पर्येंत शेतकरी शेतात काम करत आहेत. खेड्यामध्ये शेतकरी भेटत नाही त्यामुळे थेट मतदारांपर्येंत पोहचण्यासाठी राजाभाऊ शेतकऱ्यांच्या भेटीसाठी थेट शेतावर जाऊंन भेटी घेत आहेत. कुडजे, आगळंबे, खडकवाडी, मांडवी,भगतवाडी, सांगरुण, बहुली, जांभळी या गावातून त्यांनी पदयात्रा काढल्या.या वेळी महेश महाले, संजय पायगुडे, जगदिश वाल्हेकर , प्रजोत लगड, सचिन चव्हाण , अमोल गोडांबे, आतिश बड्डे, सुर्यकांत कोडीतकर, पद्माकर लायगुडे, आकाश तुपे, राज कुभांर असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारत सहभागी झाले होते.

मोदी जास्त काळ जनतेची दिशाभूल करू शकणार नाही – वंदना चव्हाण

0

जनतेची दिशाभूल करून , खोटी स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदींनी जरी केंद्रात बहुमताने सत्ता प्रस्थापित केली असली तरी फार काळ ते जनतेला फसवु शकणार नाहीत . आणि कसब्यात तर एकाच नेतृत्वाला दिलेली कायमची जहागिरी हि सामान्य माणसाच्या हिताची ठरू शकली नाही त्यामुळे राष्ट्रवादीने केलेली विकासाची कामे , समाजातील विविध घटकांना दिलेले आरक्षण , दिलेले प्रकल्प आणि विकासासाठी सातत्याने चालविलेली – राबविलेली मोहीमच जनता लक्षात घेईल आणि जनमताचा कौल राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच मिळेल असा विश्वास आमदार वंदना चव्हाण यांनी येथे व्यक्त केला कसबा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर आयोजित केलेय मेळाव्यात त्या बोलत होत्या .
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यावेळी भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होईल असा दावा केला ते म्हणाले , उत्तर प्रदेश , बिहार . मध्य प्रदेश येथे हि स्थानिक नागरिकांनी स्थानिक पक्षांनाच स्वीकारले आणि भाजपला झिडकारले आहे .दीपक मानकर यांनी यावेळी आपण तळागाळातील , संकटातील जनतेसाठी धावून जावू त्यांच्या कामांना प्रथम प्राधान्य देवू असे सांगितले . आमदार कमलताई ढोले पाटील , दत्ता एकबोटे , रवींद्र माळवदकर , अण्णा थोरात ,वकील म . वि , अकोलकर ,मनीषा बोडके , विनायक हनमघर ,बाबा शेख , दीपक जगताप ,सुनील खाटपे ,विजय ढेरे आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

वानवडी परिसराचा विकास हाच माझा ध्यास – रमेश बागवे

0

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे आज प्रभाग क्रंमांक ४६ व ६१ मध्ये वानवडी आणि पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड वार्ड क्रंमांक ६मध्ये वानवडी बाजार , फातिमानगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती . ताई लक्षात ठेवा पंजा , दादा लक्षात ठेवा पंजा, आले रे आले पंजावाले असे नारे देत पदयात्रेमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात कार्यकर्ते सहभागी झाले होते .फटाक्यांच्या आतिषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात येत होते . *
या पदयात्रेस सोलापूर रोडजवळील मनीष दर्शन सोसायटीपासून , गणेश चौक , गवळी धाडगे नगर , फातिमा कॉन्व्हेंट , विठ्ठलराव शिवरकर मार्ग , परमार नगर , होले वस्ती , वानवडी गाव , जांभुळचौक , जगताप चौक , केदारीनगर , आझाद नगर या भागात काढून वानवडी बाजार येथे पदयात्रेचा समारोप झाला .
या पदयात्रेत माजी नगरसेवक शिवाजी केदारी , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विनोद मथुरावाला , पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष साहिल केदारी , केविन मेनव्हेल , अमीन सय्यद , अजय खामकर , विनोद मोगरे , राजू परदेशी , उमेश ननावरे , प्रविण मोगरे , श्रीकांत काबा , राजू नायडू , बिपीन केदारी , तुकाराम जांभुळकर , सुनील गवळी , विक्रम परदेशी , संजय संकपाळ , सुनील कटके , निलेश कुरे , प्रविण काकडे , बबलू परदेशी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते . यावेळी पदयात्रेच्या समारोप प्रसंगी माजी नगरसेवक शिवाजी केदारी यांनी सांगितले कि , रमेश बागवे यांच्या आमदार निधीतून वानवडी परिसरामध्ये विविध विकास कामे करण्यात आली आहेत , यामध्ये खाजगी सोसायटीमध्ये इंटरलॉक ब्लॉक बसविण्याची कामे , कॉंक्रिटिकराणाची कामे , सीमा भिंतीची कामे करण्यात आली आहेत , महादजी शिंदे येथील मुस्लिम दफनभूमीची सीमा भिंतीचे काम करून पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत . केदारी नगर मधील केदारी सर्कलचौकामध्ये हायमास्ट लेम्प बसविण्यात आले आहेत.यामुळे वानवडीचा विकास साधण्यात रमेश बागवे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे . त्यामुळे रमेश बागवे यांच्या पाठीशी राहून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्यानी निवडून द्यावे .वानवडी उपनगर वेगाने वाढत आहे , या भागात आमदार निधीतून अनेक विकास कामे केली आहेत , त्यामुळे पुढील काळातहि विकास कामे आपण करणार , वानवडी परिसराचा विकास हाच माझा ध्यास असल्याचे रमेश बागवे यांनी सांगितले .

पीएमसी कॉलनीतील नागरीकांना न्याय देणार-विनायक निम्हण

0

nim1

मुळा रोड, आदर्शनगर, संभाजीनगर येथील पीएमसी कॉलनी , पाटील इस्टेट हा परिसर वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक विकासापासून वंचितठेवण्यात आला आहे. या भागातील झोपडपट्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या घरबांधणी योजना या भागाचे वर्षानुवर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार अनिल भोसले व नगरसेविका रेश्मा भोसले यांनी जाणीवपूर्वक राबवल्या नाहीत. या झोपडपट्यांमध्ये राहत्या ठिकाणीच राजीव गांधी आवास योजनेच्या माध्यमातून दुमजली घरे बांधून देणार, असे ठोस आश्वासन शिवाजीनगर मतदारसंघातील काँग्रेस -पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी दिले.
विनायक निम्हण म्हणाले, नागरीकांनी या खासगी बिल्डरांकडून 570 स्क्वेअर फुटाची घरे मिळावीत, अशी मागणी केली असतानाही त्या परिसरातील नागरीकांवर स्वत:च्या फायद्यासाठी दबाव टाकून स्किम डेव्हलप करण्याचा प्रयत्न आमदार अनिल भोसले करीत आहेत. जनता त्यांच्या वॉर्डात खूप नाराज आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत भोसले यांच्या पत्नीला केवळ 50 मतांनी निसटता विजय मिळवता आला. आणि विधानसभा निवडणुकीत भोसले यांना जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे विनायक निम्हण यांनी सांगितले.
मुळारोड आदर्शनगर, पीएमसी कॉलनी, पाटील इस्टेट या ठिकाणी मंगळवारी सकाळी शिवाजीनगर मतदारसंघातील काँग्रेस -पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी पदयात्रा काढत प्रचार केला. यावेळी नागरीकांनी त्यांचे स्वागत केले. घरोघरी औंक्षण करण्यात आले. यावेळी संजय खडसे, बाळासाहेब अरगडे, समाधान शिंदे, वाहबभाई खान, अय्यान काझी, मारुती गायकवाड, विजू शिंदे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी सोमवारी सायंकाळी खिलारेवाडी येथे काढलेल्या पदयात्रेलाही नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी नगरसेवक शिवा मंत्री,
अॅड. सुरेश लांडे, शैलेश घोलप, अभिषेक सुर्वे, राजेश बालवडकर, बाबुजी वाळुंज आदी उपस्थित होते. पुलाचीवाडी परिसरात पदयात्रा काढून मत देण्याचे आवाहन मतदारांना केले. निम्हण यांनी पुलाचीवाडी, 1202, पोलिस लाईन, आपटे रोड परिसर पिंजून काढला. त्यांच्यासमवेत कार्यकर्ते मोठ्या सं‘येने सहभागी झाले होते. विशेषत: तरूणांचा मोठा सहभाग होता. यावेळी अनिल पायगुडे, शिवराज मित्रमंडळाचे अध्यक्ष सचिन पायगुडे, प्रणालीताई सोनवणे, अमोल येनपुरे, मुकुंद जाधव, संजय इंगळे, नंदकुमार कामठे, साहेबराव कामठे, रामभाऊ दिघे, रामदास मारणे, देवेंद्र देवकर, संदीप मोरे, धनंजय काळे, मनोज कासट, भाऊ काळे आदी सहभागी झाले होते. नरवीर तानाजी वाडी, भैय्यावाडी, शिवाजीनगर परिसरात काढलेल्या पदयात्रेसही चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष भूष्ण आतिक, प्रशांत धोत्रे यांनी काँग‘ेसमध्ये प्रवेश केला. यावेळी संजय बालवडकर, समाधान शिंदे, रवी परदेशी, आलिश शिंदे, अभिजित जेऊर, शुभाष परदेशी, विनोद पवार आदी उपस्थित होते.

जोपर्यंत मी दिल्लीत -तोपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे नाही; मोदी

0

धुळे – होय आम्ही विदर्भ स्वतंत्र राज्य करणार , २० वर्षापासून विदर्भ स्वतंत्र राज्य करणे हा भाजपचा अजेंडाच आहे असे तीन -चार दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र मी जोपर्यंत दिल्लीत आहे तोपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होवू देणार नाही अशी गर्जना केली आहे . ते म्हणाले ,या निवडणुकीत काँग्रेस नेते खोट्या अफवा पसरत आहेत. पण ते साठ वर्षे एवढे खोटे बोलले की, लोकांना आता ते पटत नाही. कापूस, कांदा या मुद्यावरून खोट्या अफवा पसर वतात. सध्या त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे होणार, मुंबई पळवणार अशा अफवा पसरवायला सुरुवात केली आहे. पण जोपर्यंत मी दिल्लीत आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. त्याच प्रमाणे महाराष्ट्र मुंबई शिवाय अधुरी आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या रणधुमाळीतील अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धुळ्यातील शिंदखेडा येथील दोंडाईचा येथे घेतलेल्या प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला.
ते म्हणाले , मी येथे आलो होतो. तुम्ही मला दोन्ही खासदार विजयी करून माझ्या शब्दाचा मान ठेवला. चार महिन्यात मी पुन्हा तुमच्या भेटीला आलो आहे. प्रचार सभांत काहीही बोलायचे आणि विसरायचे हा नेत्यांचा स्वभाव असतो. पण मी नेता नाही. मी तुमचा सेवक आहे. मी देशाचा प्रधानसेवक आहे. त्यामुळे वचने विसरण्यासाठी नव्हे तर त्यांची आठवण परत करून देण्यासाठी मी आलो आहे. त्यामुळे मी आपल्याला वचन देतो. ज्यावेळी आमचे 60 महिने पूर्ण होतील त्यावेळी प्रत्येक गोष्टीचा हिशेब देईल.
आम्ही खोटे बोलण्यासाठी वचने दिलेली नाही. तर आम्ही विकासासाठी वचने दिली आहेत. विकास करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. धुळे, नंदूरबारला आम्ही मुख्य प्रवाहात आणू. मी लहानपणापासून कांदा खात आलो आहे. त्यामुळे लहानपणापासून आम्हाला कांदा खाऊ घालणा-यांना आम्ही निराश करणार नाही. आम्ही पूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर लगेचच राज्य आणि केंद्रातील सरकार मिळून कांदा उत्पादक शेतक-याच्या सर्व समस्या आम्ही दूर करू.
आम्ही काँग्रेसप्रमाणे खोटी आश्वासने देणारे नाही. काँग्रेसने प्रत्येकवेळी रेल्वे लाईन बाबत किती आश्वासने दिली. मनमाड इंदूर लाईनची एवढी जुनी मागणी असूनही केवळ आश्वासने दिली आहेत. साठ वर्षे पंचायतींपासून केंद्रापर्यंत त्यांचेच राज्य होते. त्यांनी कोणतीही वचने पाळली नाही. कामाचा हिशेब दिला नाही. पण आता ते मला हिशेब मागत आहेत. पण त्यांनी देऊ अथवा नाही पण मी तुम्हाला प्रत्येक पैशाचा हिशेब देईल हे माझे वचन आहे.असे ते म्हणाले

मोदींना ‘चले जाव’ चाच इशारा द्यायचा बाकी …

0

हा महाराष्ट्र आमचा … दिल्ली दिलीना , ती पहा, तिथून पेट्रोल -डीझेल -ग्यास च्या किंमती कमी करा , रेल्वे स्वस्त आणि छान बनवा …महाराष्ट्रा कडे आणि महाराष्ट्रातील मुंबईकडे पाहाल तर खबरदार अशा आशयाचा इशारा देत सर्व प्रादेशिक पक्ष आता मोदी आणि भाजपवर तुटून पडले आहेत , मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राची स्वायत्तता जागृत करण्याचा प्रयत्न हि सारी मंडळी करीत आहेत उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजप तर आफ्जाल्खानाची फौज असल्याची टीका केली आहे राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली असताना भाजप नेत्यांना सत्तेची स्वप्ने पडायला लागली आहेत. त्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही निवडणूक आपल्या हाती घेतली असून, राज्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. खरे म्हणजे देशाचे पंतप्रधान म्हणून प्रचारादरम्यान त्यांनी महाराष्ट्रहित, विकासाचे मुद्दे प्रखरपणे मांडले पाहिजेत. परंतु त्याऐवजी त्यांनी वैयक्तिक पातळीवर विखारी टीका सुरू केल्याने आता विरोधी पक्षांतील नेत्यांनीही म्यानातील तलवारी काढून त्यांच्यावर तुटून पडायला सुरुवात केली आहे. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींवर कडाडून प्रहार सुरू केलेला असतानाच लोकसभा निवडणुकीत मोदींना डोक्यावर घेऊन त्यांचे सातत्याने गुणगाण गाणारे शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आक्रमक पवित्रा धारण करून ते एकाचवेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपवर तुटून पडले आहेत. सर्वत्र प्रचार शिगेला पोहोचलेला असताना सर्वच विरोधी पक्षांनी मोदी विरोधात रान उठविल्याने आता भाजपचीच कोंडी झाली आहे.
ही अफजलखानची फौज
तुळजापूर : एकीकडे भाजपने शिवसेनेच्या विरोधात टीका करायची नाही, हे जाहीर केलेले असताना शिवसेना नेते उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर ठाकरी भाषेत तुटून पडत आहेत. आज तुळजापूर येथे झालेल्या सभेत तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांना थेट अफजलखानाची फौज असल्याचे सांगत ही महाराष्ट्र तोडायला आली आहे, असे म्हटले आहे. यातून शिवसेनेच्या विरोधाची तीव्रता लक्षात येते.
मोदी ग्रामपंचायतीचा ही प्रचार करतील
मुंबई : तिकडे सीमेवर जवानांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. अनेकजण शहीद होत आहेत. मात्र, पंतप्रधान इकडे विधानसभेच्या प्रचारात मग्न आहेत. एक तर भाजपकडे आयात केलेले उमेदवार आहेत. या उमेदवारांची यादी वाचून दाखवत हे असेच सुरू राहिले, तर पंतप्रधान मोदी यांना नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीतही प्रचाराला यावे लागेल, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोदी यांना जोरदार टोला लगावला.
मोदींना महाराष्ट्राबद्दल आकस
नंदूरबार : १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याची वल्गना करणारे मोदी १०० रुपयेही आणू शकले नाहीत. उलट ते पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचे काम करीत आहेत. पालघरमधील सागरी सुरक्षा अकादमी प्रकल्प द्वारकेत नेला. तसेच सरसंघचालकांचे भाषण थेट प्रक्षेपित करून त्यांनी देशाची सत्ताच रा. स्व. संघाच्या ताब्यात देण्याचा घाट घातला आहे, त्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस आहे, असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
प्रादेशिक पक्षांना
संपविण्याचा डाव
सोलापूर : भाजप, संघ परिवाराला देशात हिंदुत्वाच्या नावाखाली जातीयवादाचा पक्का अजेंडा प्रभावीपणे राबवावयाचा आहे. त्याच भूमिकेतून प्रादेशिक पक्षाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून शरण येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करतानाच माझे नाव घेतल्याशिवाय मोदींना चैनच पडत नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोलापुरात केली. पंतप्रधानांनी व्यक्तिगत टीका करणे योग्य नाही, परंतु, मोदी व्यक्तिगत टीका करून पदाची प्रतिष्ठा घालवत आहेत.

शिवाजी आखाड्याचे आधुनुकीकरण करणार

0

पुणे –
पुण्यातील मल्लांचे जगभरात नाव होण्याकरिता मंगळवार पेठ येथील शिवाजी आखाड्यास अत्याधुनिक कुस्तीकेंद्र बनवण्याचा मानस कसबा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर यांनी व्यक्त केला. मानकर यांच्या प्रचारानिमित्त कसबा विधानसभा मतदार संघात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
तरुण पिढीस आज वातानुकुलीत जीमचे आकर्षण वाटत आहे. यामुळे पारंपरिक व्यायाम पद्धतीत शिकवणार्‍या तालीम पद्धतीचे आकर्षण कमी झाले आहे. या व्यायाम पद्धतीला प्रोत्साहन देण्यास आपला प्रयत्न राहणार असल्याचे मानकर यांनी सांगितले.उपमहापौर असताना शनिपार येथील निंबाळकर तालमिची भिंत कोसळली असता मानकर यांनी केवळ दोन दिवसात सदर तालमीच्या भिंतीचे काम करुन तालिम पूर्ववत केली होती. या स्मृतींचा उजाळा विश्‍वस्त बंडू अण्णा कर्पे यांनी दिला.
बकरी ईदचे औचित्य साधून सर्व मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा मानकर यांनी दिल्या. पदयात्रेत मौलाना काजीसाहब, मौलान इम्रान साहब, मौलान इब्राहम साहब व अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवार पेठ येथील शिवाजी आखाडा हा अत्यंत जुना कुस्तीचा आखाडा असून,या आखाड्यात नामवंतांच्या लढती झाल्या आहेत.

आता बस्स… नाही तर गाठ माझ्याशी आहे

0

आष्टी – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पन्नास वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेले आरोप आधी सिद्ध करावे, मगच बोलावे,आता बस्स… नाही तर गाठ माझ्याशी आहे असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टीकचे लक्ष केले होते. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला ‘भ्रष्टाचारवादी’ म्हणून त्यांनी पक्षाची संभावना केली. मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी ‘आधी आरोप सिद्ध करा नाही तर गाठ माझ्याशी आहे,’ असा दम भरला आहे. त्या बीड जिल्ह्यातील आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले डॉ. विजयकुमार गावित आणि पक्ष नेतृत्व कार्यकर्त्यांचे ऐकत नसल्याचा आरोप करुन बाहेर पडलेले बबनराव पाचपूते यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीत असतांना पाचपुते व गावीत यांच्यावर भाजपानेच आरोप केलेले आहेत.त्यांना पक्षात घेतले की ते संत झाले का ? राज्यातील भाजपात दमच नाही त्यांच्याकडे त्यांच्याकडे नेता नाही. त्यामुळे मोदींना राज्यात 24 सभा घेण्याची वेळ आली आहे.राष्ट्रवादीवर केलेले मोघम आरोप आम्ही सहन करणार नाहीत.मोदींनी आमच्यावर आरोप करण्यापुर्वी विचार करावा. शरद पवार व त्यांच्या घरातील संस्कार वेगळे आहेत.
सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यावर तोफ डागली. त्या म्हणाल्या, ‘मोदी साहेब ,तुमचे एकमंत्री लोकांकडून पैसे घ्या आणि मतदान भाजपला करा असे म्हणतात. हा भ्रष्टाचार नाही का ? असा सवाल केला. त्या म्हणाल्या, ‘निवडणूकीत लक्ष्मी चालुन आली तर नाही म्हणु नका असे म्हणुन राजरोस पैसे घेण्याचे सांगणारे नितीन गडकरी यांना राजकारणातुन हद्दपार केले पाहीजे. राजकारण विचारांवर तत्वांवर असावे.’ राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत देण्याचा आवाहन करताना त्या म्हणाल्या, ‘बीड जिल्ह्याने पवारांना कायम साथ दिली आहे. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील परंतु जास्त काम जो करतो तोच चुकू शकतो.’
सभेला महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हजारो महिलांकडे पाहुन सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपण दररोज भाकरी थापतांना मालकाला राष्ट्रवादी… राष्ट्रवादी अशी हाक द्या. सर्व नवरोजी मतदान यंत्रापर्यंत जाईपर्यंत त्यांच्या कानात हाच आवाज घुमला पाहीजे.असा निवडणुकीचा मंत्र त्यांनी दिला.

लायगुडे खेडशिवापूर टोल नाका बंद करणार काय ?

0

स्वर्गीय रमेश वांजळे यांनी खेडशिवापूर नाक्यावर टोल विरोधात आंदोलन केले होते , हा टोल नाका आता बंद करण्याची गरज आहे असा कल नागरिकांचा असतानाच मनसे उमेदवार राजाभावू लायगुडे यांनी म्हटले आहे कि राज्यभरात अनेक वर्षांपासून टोलवसुलीच्या बोजाखाली सर्वसामान्य जनता दबली जात आहे. मनसेच्या वतीने अनेकवेळा टोलमुक्तीसंदर्भात आंदोलने, निदर्शने करण्यात आली आहेत. मनसेच्या आंदोलनाला काही ठिकाणी यश येऊन अनेक टोलनाके बंदही करण्यात आले आहेत. मात्र राज्यातील जनतेची टोलवसुलीपासून मुक्तता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ लायगुडे यांनी दिले आहे
प्रचारासाठी काहीच दिवस हाती असताना मनसेचे खडकवासल्याचे उमेदवार नगरसेवक राजाभाऊ लायगुड़े यांनी आज ६ ऑक्टोबरला
न-हे, सुखसागरनगर, स्टेट बँक काँलनी, बावधन, भुसारी काँलनी या भागात प्रचार केला. पदयात्रा काढून त्यांनी या भागातून शेकडोे मन सैनिकांनाच्या सोबत शक्ती प्रदर्शन केले.त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
राजाभाऊ म्हणाले, “मी नगरसेवक म्हणून जनतेच्या कामांना व त्यांच्या स्मस्यां सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहे आणि आज देखिल घेतोय. काही दिवसापूर्वी मा. राज ठाकरेनीं महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट जनतेसमोर सादर केली आहे. आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा आहे. मुख्यता खडकवासला मतदार संघाचा विकासाचा आराखडा माझ्याकडे तयार आहे. आपन एखदा मला संधी द्या. जनतेचीच कामे करायची आहेत, असे भावनिक आवहान त्यांनी केले.
राजाभाऊंनी भर उन्हात जनतेशी संवाद सादत तेथिल रहिवाशी, व्यापारी व सामन्य जनतेशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व ते म्हणाले, मी आपल्या या परिसरातील सर्व समस्या सोडवेन. या परिसरातील पाणी, कचरा, अंतर्गत रस्ते अशा अनेक प्रश्नांवर मी कामे करेन,असे त्यांनी आश्वासन दिले.
या वेळी प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला होता. गणेश नायकवडी, विशाल गायकवाड, जगदिश वाल्हेकर, संजय पायगुडे, विकास बा्पु दांगट, सुर्यकांत कोडीतकर, चंदन कड, रमेश करंजावणे, प्रजोत लगड , प्रविण दांगट, भरत लायगुडे, रुपेश घुले, राहुल वाळूंजकर, विरेंद्र सैंदाणे असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.