Home Blog Page 3639

बेकायदा कामांना पाठिशी घालणा-यांवर कारवाई करा -विजय कुंभार यांचे महापालिका आयुक्ताना पत्र

0

प्रति,

१)मा.श्री.कुणाल कुमार

आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे

२) मा.श्री. ओमप्रकाश बकोरिया

अतिरिक्त आयुक्त (विशेष), पुणे महानगरपालिका, पुणे

३)मा.श्री.राजेंद्र जगताप

अतिरिक्त आयुक्त (जनरल्), पुणे महानगरपालिका, पुणे

४)मा.श्री .प्रशांत वाघमारे

नगर अभियंता , पुणे महानगरपालिका

विषय – बेकायदा कामांना पाठिशी घालणा-यांवर कारवाई करणेबाबत

महोदय,

सध्या पुणे महापालिकेत बेकायदा गोष्टींना पाठिशी घालण्यासाठी पुणे पालिकेचे अधिकारी वाट्टेल त्या थराला जाउ लागले आहेत.आपली दुष्क़ृत्ये लपवण्यासाठी ते आता माहिती अधिकाराचीही हेळसांड करू लागले आहेत.

पुण्यातील कोथरूड येथील सर्वे क्र.१५२ येथे सी. एन.जी पंपासाठी नकाशे मंजूर करताना अनेक गैरप्रकार झाल्याची चर्चा गेली अनेक महिने सुरू आहे. संबधितांनी आजुबाजूच्या जागांवर अतिक्रमण केल्याचे आणि पालिकेच्या अधिका-यांशी संगनमताने सदर पंपाचे नकाशे मंजूर केल्याचे बोलले जात होते.तसेच या प्रकरणात पालिकेच्या कर्मचारी आणि अधिका-यांनी मोठ्या प्रमाणात हात ओले करून घेतल्याचीही चर्चा होती.आतापर्यंत केवळ चर्चा असलेल्या या गैरप्रकारामध्ये तथ्य असल्याचा पुरावा आता समोर आला आहे.

सदर पंपासंदर्भात एक नागरिक श्री. माळी गेली अनेक वर्षे माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मागण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पालिकेचे अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देउन प्रकरण टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.आता त्या नागरिकाने माहिती अधिकारात जी माहिती मागीतली होती त्यामध्ये १) सदर पंपाच्या नकाशांना जनहिताच्या दृष्टीकोनातून परवानगी देताना नागरिकांच्या हरकती सूचना मागवल्या असल्यास त्याच्या अहवालाची प्रत ( सदर पंपाला जनहिताच्या दृष्टीकोनातून विशेष बाब म्हणून काही नियम व अटींअध्ये सवलत देण्यात आली आहे) तसेच २)सदर पंपाला विकास नियंत्रण नियमावलीतून सवलत देण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची प्रत या दोन बाबींचा समावेश होता.

वास्तविक पहाता या दोन बाबी अगदी साध्या आणि सरळ उत्तर देण्याजोग्या आहेत. मात्र पालिकेच्या अधिका-यांनी त्यांना ही साधी सोपी माहिती दिली नाहीच.परंतु त्या अल्पशिक्षीत नागरिकाला माहिती देत असल्याचे भासवून विनाकारण अव्वाच्या सव्वा पैसे भरायला लावून दिशाभूल करणारी माहिती दिली. ( असे आत्तापर्यंत अनेकवेळा घडले आहे)

यासंदर्भात दोन बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे महापालिकेच्या दक्षता विभागाकडे अनअ/जा/ज/१५४८ दि – २१/३/२०१३ अन्वये अतिरिक्त अभियंत्यांनी ’सदरचा प्रस्ताव सार्वजनिक आणि कल्याणकारी वर्ग़ात येत असल्याने विकास नियंत्रण नियमावलीतील ६.६.२.१ (v) नुसार अटी शिथील करून प्रस्ताव मान्य करण्याची प्रवानगी मागीतली होती’ त्यावर दक्षता विभागाने ’ ६.६.२.१ (v) अंतर्गत सार्वजनिक उपक्रमाच्या ऑपरेशनल कन्स्ट्रक़्शनकरता मा . मुख्य सभेच्या मान्यतेनंतर परवानगी देण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना आहेत. तथापी या प्रकाराच्या बांधकाम प्रकारांची डि.सी. नियम ५.१.१ अंतर्गत यादी पहाता या यादीत प्रस्तुत बांधकामाचा अंतर्भाव नाही‘ असा अहवाल दिला होता. ५.१.१ ची तरतुद अशी आहे.

5.1.1 The following operational construction of the Government, whether temporary or permanent, which is necessary for the operation, maintenance, development or execution of any of the following services may be exempted from the purview of the rules. (i) Railways:(ii) National Highways:(iii) National Waterways:(iv) Deleted(v) Airways and Aerodromes:(vi) Posts and Telegraphs, telephones, wireless, broadcasting and other like forms of communications: (vii) Regional grid for electricity;

या यादीमध्ये भर घालण्याचा अधिकार महापालिकेस नाही. त्यासाठी ५.१.१ (viii) मधील तरतुद अशी आहे.

(viii) Any other service which the State Government may, if it is of opinion that the operation, maintenance, development or execution of such service is essential to the life of the community by notification, declare to be a service for the purpose of this clause.

याचाच अर्थ या तरतुदीप्रमाणे जर विशेष परवानगी द्यायची असेल तर ती ५.१.१ मधील यादीतील बाबींसाठीच देता येते. अन्य बाबींसाठी नाही आणि या यादीत राज्य शासनाने भर घातली तरी अशी परवानगी देताना सर्वसाधारण सभेची पूर्व मान्यता घ्यावीच लागते.त्यामूळे सदर सी.एन.जी पंपास मान्यता देणे सर्वस्वी चूकीचे होते, दक्षता विभागाचा अभिप्राय स्पष्ट असतानाही त्याचा गैरअर्थ लावून ६.६.२.१ (v) नुसारच्या परवानगीची गरजच नाही असे भासवण्यात आले.सदर कागदपत्रांमधील खाडाखोडही बरेच काही सांगून जाते.

सदर प्रकरणी माहिती अधिकारात मागीतलेल्या माहितीच्या अर्जाला उत्तर देताना पालिकेच्या अधिका-यांनी सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावाची प्रत देणे, तसा ठराव मंजूर झाला नसल्यास तसे स्पष्टपणे आपल्या उत्तरात नमूद करणे आवश्यक होते किंवा ज्या कलमान्वये सदर पंपास विशेष परवानगी देण्यात आली ते नमूद करणे आवश्यक होते.ज्याअर्थी अधिका-यांनी त्या ठरावाची प्रत दिली नाही किंवा त्याबाबतीत पूर्णपणे मौन बाळगले आहे त्यावरून सदर पंपाला सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता परस्पर सवलत देउन मान्यता दिल्याचे सिद्ध होते. अर्थात पालिकेच्या अधिका-यांनी तसे करण्याचा पुरेपूर मोबदला वसूल केला असणार हे उघड आहे.

त्याच प्रमाणे माहितीच्या अधिकारात उत्तर देताना जन माहिती अधिका-याने स्वत:चे नांव व उत्तराने समाधान झाले नसल्यास ज्याच्याकडे अपील करावयाचे असते त्या प्राधिका-याचे नांव , किती दिवसात अपील करता येते त्याची माहिती व त्याचा पत्ता देणे अपेक्षित होते. परंतु पुणे पालिकेत कर्मचारी नव्हे तर केवळ ठोकळे काम करत असल्याने त्यांना कदाचित स्वत:चीही नांवे माहिती नसावित. त्यामूळे ती जाहिर करायला ते लाजत असावेत. अर्थात त्यांच्या अशा लाजण्याची पुरेपूर किंमत ते वसूल करत असल्याने त्यांना काही वाटत नसले तरी पुण्याची मान मात्र शरमेने खाली जात आहे.

या प्रकरणात संबधित नागरिक यथावकाश अपीले वगैरे करतीलच . परंतु ही बाब पुणे पालिकेला मान खाली घालायला लावणारी असल्याने आपणही संबधितांवर सेवा नियमावलीतील तरतुदींप्रमाणे कारवाई करावी, सदर प्रकरणात सकृतदर्शनी गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत असल्याने त्याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी व सदर सी एन जी पंपाला मज़ूरी देताना झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करून संबधितांवर कडक कारवाई करावी हि विनंती.
Regards,
Vijay Kumbhar
(Surajya Sangharsh Samiti)
www.surajya.org
vijaykumbhar.blogspot.in
09923299199

‘आय. पी. एल’ येत्या २६ डिसेंबरपासून महाराष्ट्रात

0

पुणे:- प्रेमाची परिभाषा वेगळ्याप्रकारे रेखाटणारा ‘आय.पी.एल.’ हा नवा मराठी चित्रपट येत्या २६ डिसेंबरपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. एम.आर.पी.फिल्म्स प्रस्तुत ‘आय.पी.एल.’ या चित्रपटाची निर्मिती मोहन पुरोहित आणि मुस्ताक अली यांनी केले असून दिग्दर्शन दीपक कदम यांनी केले आहे. ” चित्रपटाचे नाव ‘आय.पी.एल.’ असले तरी त्याचा क्रिकेटशी अजिबात संबंध नाही. चित्रपटाचे खरे नाव ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ असे असून या चित्रपटात प्रेमाची आगळीवेगळी मैच पाहायला मिळणार आहे असे सांगताना दिग्दर्शक दीपक कदम म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत असलेले उदात्त भावनात्मक प्रेम आजच्या काळात हरवत चालले आहे त्याचाच उहापोह एका वेगळ्या प्रेमकथेद्वारे या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाची तांत्रिक मुल्ये उच्च दर्जाची आहेत असेही ते म्हणाले. याप्रसंगी चित्रपटातील प्रमुख कलावंत विजय पाटकर, नायक (ज्यु.) स्वप्नील जोशी, नायिका शीतल उपरे तसेच सहनिर्माते मुस्ताक अली हे उपस्थित होते.
(ज्यु.) स्वप्नील जोशी याचा नायक म्हणून तसेच शीतल उपरे हिचा नायिका म्हणून पहिलाच चित्रपट असून या चित्रपटातील आमच्या भूमिकेला आम्ही जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे उभयतांनी यावेळी सांगितले. शीतल उपरे हिने नेपाळ येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस हेरीटेज सुंदरी स्पर्धेत भाग घेऊन द्वितीय क्रमाक पटकाविला आहे. श्री विजय पाटकर यांनीही चित्रपटातील भूमिकेचे अनुभव कथन केले. तर मुस्ताक अली यांनी चित्रपट चांगला होण्यासाठी उच्च तांत्रिक मूल्यात कोठेही तडजोड केली नाही. असे जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक व सध्याचे मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सांगितले.
‘आय.पी.एल.’ या चित्रपटाची कथा पटकथा दीपक कदम यांचीच असून संवाद प्रकाश भागवत यांचे आहेत. प्रसिद्धीप्रमुख रामकुमार शेडगे असून प्रशांत मिसळे यांनी छायादिग्दर्शन केले असून कलादिग्दर्शक आहेत ऋग्वेद रानडे. अभिजित कुलकर्णी यांच्या गीतांना आशिष डोनाल्ड आणि देव यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटातील पाच गाणी आदर्श शिंदे, बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर, श्रुती राणे, विक्रांत राणे आणि मित यांनी गायली आहेत. ‘आय.पी.एल.’ येत्या २६ डिसेंबरपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या करियर महोत्सवाचे महादेव जानकर यांच्या हस्ते उद्घाटन उपेक्षित आणि बेरोजगारांचे प्रश्न हाती घेवू :महादेव जानकर

0

पुणे :
‘राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात सत्ताधाऱ्या मित्र पक्षाबरोबर असला तरी उपेक्षित ,वंचित ,गरीब ,शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न हाती घेवून ठामपणे कार्यरत राहील . या उपेक्षितांची प्रश्न सोडवणुकीसाठी पक्षयंत्रणा कार्यरत राहील ‘ असा निर्वाळा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी आज दिला
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यात आयोजित करियर महोत्सव आणि बेरोजगार मेळाव्यात उद्घाटन करताना ते बोलत होते . अध्यक्ष स्थानी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहटा होते ,
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राजीव नगरकर उपस्थित होते . रविवारी ओसवाल बंधू कार्यालयात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता .
जानकर म्हणाले ,’ गुणवान आणि गरजू युवक -युवतींना पक्ष तज्ञांच्या मदतीने चांगल्या नोकऱ्या आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल . त्यासाठी हा राज्यातील पक्षाचा करियर महोत्सव उपयुक्त ठरेल पण युवकांनी नोकऱ्यांवर समाधानी न राहता उद्योजक होण्याची स्वप्ने पहावीत . स्पर्धेचे युग आहे तरी नकारात्मक दृष्टीकोन न बाळगता भवितव्य घडवावे. राष्ट्रीय समाज पक्ष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रही आगामी काळात सुरु करणार आहे ‘
प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राउत ,प्रवक्ते दीपक बिडकर ,पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख डॉ उज्वला हाके ,मराठवाडा महिला आघाडी प्रमुख रोहिणी कसबे ,पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे ,पुणे जिल्हाधाय्क्ष संदीप चोपडे ,उपाधाय्क्ष बापूराव सोनवलकर ,हरीश खोमणे ,दीपक मासळ ,रोहित बोरकर ,सचिन शेंडगे ,जय कसबे उपस्थित होते
सुरज खोमणे यांनी प्रास्ताविक केले . सोनाली गावडे . यांनी सूत्रसंचालन केले

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकामधील वार्ड क्र. तीन मधील उमेदवारांनी एकत्रित येऊन साधला सवांद

0

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकामधील वार्ड क्र. तीन मधील उमेदवारांनी एकत्रित सवांद साधला. निमित होते पुणे कॅम्प मधील बज्मे रहेबर कमिटीच्यावतीने वार्ड क्र. तीन मधील उमेदवारांसाठी स्नेह मिलन कार्यक्रम ठेवण्यात आला होता . या कार्यक्रमास बज्मे रहेबर कमिटीचे अध्यक्ष अक्रम शेख , उपाध्यक्ष जाकीर सय्यद , सचिव इरफान मुल्ला , खजिनदार अमित चव्हाण , उपखजिनदार फैय्याज शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते .

या स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गिरमकर , शिवसेनेचे उमेदवार मनीष सोनिग्रा , कॉंग्रेसचे उमेदवार अझीम गुडा कुवाला , अपक्ष उमेदवार प्रसाद केदारी , शैलेश उग्राल , सरफराज कुरेशी , सिकंदर पटेल आदी उमेदवार सहभागी झाले होते . यावेळी सर्व उमेदवारांनी आपला परिचय करून दिला . तसेच आपल्या सामाजिक कार्याची माहिती दिली . पुणे कॅंटोन्मेंट विकासासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करू . निवडणूक खेळी मेळीने लढविण्याचे सर्वांनी आश्वाशन दिले . प्रसाद केदारी यांनी वार्ड क्र. तीन मधील प्रमुख अनुभवी व्यक्तींची कमिटी बनवावी , जेणेकरून अनुचित प्रकार लक्ष ठेवण्याचे काम हि कमिटी करेल . तसेच निवडणुकीच्या दिवशी बूथ होणारी गर्दी कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा जेणे करून वाद निर्माण होणार नाहीत .

दिलीप गिरमकर यांनी जास्तीत जास्त मतदान कसे होईल याचा प्रयत्न सर्वांनी करावा , निवडणूक दहा दिवसाची आहे परंतु आपल्या सर्वांचा मैत्री तसाच राहणार आहे . त्यासाठी निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा .

या कार्यक्रमामध्ये सर्व उमेदवाराना बज्मे रहेबर कमिटीच्यावतीने गुलाबपुष्प देऊन शुभेछा देण्यात आल्या . तसेच सर्वांनी कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला . या कार्यक्रमास संदीप भोसले , दिनानाथ सल्ले , मोहसीन शेख , कुमार शिंदे , माणिक खंडे , इस्माईल शेख , अतिश कुराडे , विशाल ओव्हाळ , संदीप कांबळे , नितीन आडसुळे , अनिल जगताप , निलेश कणसे , बाबा कुरेशी , जितेंद्र राशिनकर , छबुआक्का जाधव , तौफिक शेख , टिपू शेख , अमजद शेख , जमीर शेख , अन्वर शेख आदी उपस्थित होते .

कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत बज्मे रहेबर कमिटीचे अध्यक्ष अक्रम शेख यांनी केले तर सूत्रसंचालन अमित चव्हाण यांनी केले .
3

खडकी -पुणे केंटोन्मेंट निवडणुकांसंदर्भात भाजपची व्यूहरचना

0

खडकी व पुणे केंटोन्मेंट निवडणुकांसंदर्भातील व्युहरचने ची बैठक आज पार पडली.सदर बैठकीस प्रदेश संघटन मंत्री सुनिलजी कर्जतकर,शहर अध्यक्ष खा.अनिलराव शिरोळे,समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,पुणे शहर संघटन मंत्री रवी अनासपुरे,खडकी केंटोन्मेंट निवडणुकीचे प्रभारी संदीप खर्डेकर,धीरज घाटे,तसेच सुनिल कांबळे उपस्थित होते.या वेळी खडकी व पुणे केंटोन्मेंट च्या आत्तापर्यंतच्या प्रचाराचा आढावा घेण्यात आला.तसेच पुढील प्रचाराचे नियोजन व व्युहरचना निश्चित करण्यात आली.
सर्व आठ जागा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व त्यासाठी शहर पदाधिकारी व नगरसेवकाना दोनही केंटोन्मेंट मधील प्रचारात जबाबदारया द्याव्यात,प्रदेश व केंद्रातील अनेक नेते येत्या आठवडयात प्रचारात सहभागी होतील असे सुनिलराव कर्जतकर यानी सांगितले.शहर अध्यक्ष अनिल शिरोळे व राज्यमंत्री दिलीप कांबळे हे प्रचाराच्या नियोजनावर लक्ष ठेवुन असतील.
दरमयान रुपेश सोरटे यांच्या संगमवाडी येथील निवडणुक कचेरीचे उद्घाटन खडकी चे प्रभारी संदीप खर्डेकर,धीरज घाटे तसेच रवीजी अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.या वार्ड क्रमांक आठ मधील प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असुन मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे श्री.सोरटे यानी स्पष्ट केले.
1

नितीन दीक्षित दिग्दर्शित ‘अवताराची गोष्ट’ खुलतेय प्रमोशनल साँगच्या कोंदणात

0

पुणे –

बहुचर्चित असणारा आणि अनेक पुरस्कार पटकावणारा एशियन एण्टरटेन्मेण्ट निर्मित ‘अवताराची

गोष्ट’ हा सिनेमा नाताळ (ख्रिसमस)च्या सुटीचे विशेष आकर्षण ठरणार आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी

संपूर्ण महाराष्ट्रातील थिएटर्समध्ये आपल्याला ‘अवताराची गोष्ट’ अनुभवता येऊ शकेल.

झी गौरव २०१४ च्या दिमाखदार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संवाद

आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री हा पुरस्कार लीना भागवतने पटकावला. इतकंच काय तर, ५१

व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट

संवाद या पुरस्कारांवर मोहोर उमटवून आणखीन मानाचा तुरा खोवला गेला. इतकंच काय तर

सह्याद्री सिने पुरस्कार २०१४मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार

या पुरस्कारांवर नाव कोरण्याची किमया या सिनेमाने केली आहे.

अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांना ज्याच्या आवाजाने एक जान आणली अशा रोहित श्याम राऊतसारख्या

लिटिल चॅम्पने आता एक नव्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे ते म्हणजे संगीताचा साज चढवण्याचा…

त्याचा साथीदार श्रीधर मेनन सोबत त्याने पहिल्यावहिल्या गाण्याला चाल देऊन अवताराची गोष्टसाठी

दणक्यात प्रमोशनल गाणं केलं आहे.

डोक्याचं झालंय भजं… अशा शब्दात रचलेलं हे प्रमोशनल गाणं आहे… त्यावरून ते किती धमाकेदार असेल अन्

त्यामधला अंदाज शब्दांवरून आला असेल, पण त्याला लाभलेली सूरावटही तितकीच मस्त आहे. दिग्दर्शक

नितीन दीक्षितमधला कवी – गीतकार आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. शरयू दाते, सिद्धी लोकरे अन्

रोहित श्याम राऊत यांनी ते तितक्याच दमदारपणे गायलं आहे. या गाण्यासाठी संगीत संयोजन केलं आहे ते

युगंधर देशमुखने.

याप्रसंगी दिग्दर्शक नितीन दीक्षित म्हणाले की, हा सिनेमा भाष्य करतो तो दोन मित्र अन् एका ठराविक

परिस्थितीत त्यांच्या वागण्या बोलण्यावर… त्यांच्या प्रतिक्रियेवर. आपल्या जगाकडे लहान मुले कशी

बघतात… त्यामधून ते त्याचं भावविश्व… कल्पनाविष्कार अन् विस्तार हा कशाप्रकारे करतात… या गाण्याची

रचना करताना सिनेमातील प्रमुख पात्रांचा विचार हा प्रामुख्याने केला गेला. सिनेमातील व्यक्तिरेखांभोवती हे

गाणं गुंफले गेले आहे. माझ्या या शब्दांना सुरेखपणे न्याय दिला आहे तो रोहित अन् श्रीधर यांनी. उत्साहाने

रसरसलेलं अन् प्रचंड ऊर्जा देणारं असं ठेका धरायला लावणारं हे गाणं वेगवेगळया वयोगटाला आपलेसे वाटेल.

या सिनेमाची कथा फिरते ती लहान मुलांच्या भावविश्वाभोवती. त्यांच्या कल्पनाविष्काराभोवती. रूपेरी

पडद्यावर पदार्पण करणारा मिहिरेश जोशी (सिनेमातील व्यक्तिरेखेचं नाव कौस्तुभ) आणि य़श

कुलकर्णी (म्हणजे सिनेमातील व्यक्तिरेखेचे नाव मंग्या). ती दशावतारमयी जगातील कल्पनाविश्वात

सुरस चमत्कारिक अन् साहसी जगात रममाण झालेले हे दोन चिमुरडे आणि त्यांच्या भावविश्वाची ही

कथा आहे. इथल्या प्रत्येक कलावंताने सिनेमाला चार चाँद लागेल, असं परफॉर्मन्सचे नाणे

खणखणीतपणे या सिनेमात वाजवले आहे. या सिनेमातील प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे, सुलभा

देशपांडे, सुनील अभ्यंकर, लीना भागवत आणि रश्मी खेडेकर आपल्याला दिसतील, एका विशेष

भूमिकेत प्रतिभावंत कलाकार आशिष विद्यार्थी आपल्याला झळकताना दिसेल.

या सिनेमाच्या लेखन अन् दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे नितीन दीक्षितने. कथा, पटकथा अन्

संवादांचे काम अतिशय संवेदनशील पद्धतीने नितीन दीक्षितने हाताळलेले आहे. सिनेनिर्मितीची

जबाबदारी सचिन साळुंखेने उचलली आहे. सिनेमॅटोग्राफी नागराज दिवाकरने सांभाळली असून मयूर

हरदासने संकलक म्हणून तर गंधारने संगीत दिले असून शान आणि जसराज यांच्या सुमधुर

आवाजातील ही गाणी श्रवणीय झालेली आहेत.

मुंबई पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली देणे हा विचारही भारतीय संघरचनेसाठी धोकादायक-शरद पवार गरजले ….

0

मुंबई- मुंबईचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून, ही समिती भारतीय संघरचनेसाठी धोकादायक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
पवारांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहा पानी पत्र पाठवून याबाबत आपली सविस्तर भूमिका विषद केली आहे. याच विषयाची माहिती देशातील इतर मोठ्या राजकीय नेत्यांच्याही निदर्शनास पवारांनी आणून दिली आहे. पारदर्शक कारभाराचा उल्लेख करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पहिल्याच मोठ्या धोरणात्मक निर्णयात पारदर्शकता दिसत नाही, असे मत मांडत त्यांच्या कार्यशैलीबद्दल शंका उपस्थित केली आहे. सकाळी ब्रीच कॅण्डी रूग्णालयातून डिस्चार्ज घेताच शरद पवारांनी चार्ज होत पंतप्रधान मोदींना खरमरीत पत्र लिहल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी सहा पानी पत्र लिहून विस्तृत माहिती दिली. या पत्रातील काही ठळक मुद्दे व मांडलेली भूमिका खालीलप्रमाणे…
– मुंबईचा विकास करण्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत आहे, याची माहिती मला माध्यमांकडून कळली. जर अशी समिती स्थापन होत असेल तर त्या समितीचे अधिकार, कार्यक्षेत्र काय असणार आहे? मुंबई महानगरपालिकेचा यामध्ये काय सहभाग असणार आहे ?
– भारतीय घटनेच्या 74 व्या दुरूस्तीनुसार मुंबई महापालिकेचे काम चालते. जिचे बजेट काही राज्यांपेक्षाही अधिक आहे. भारताने संघराज्य पद्धत स्वीकारली आहे. ज्यामध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्येच केंद्राचा हस्तक्षेप मान्य केला आहे. मग अशी कोणती परिस्थिती उदभवली की केंद्राला हस्तक्षेप करावा लागत आहे ?
– आपण सुद्धा जास्तीत जास्त अधिकार राज्यांना मिळाले पाहिजे, अशा विचारांचे आहोत. परंतु या संदर्भामध्ये राज्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात आलेली नाही किंवा पालिका आणि राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही विश्वासात घेतलेले नाही.
– कुठलाही महत्त्वाचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाच्या संदर्भात घेत असताना त्यावर अनौपचारिक चर्चा करून पंतप्रधान कार्यालयाची मान्यता घेतल्यावरच अशा प्रकारचे निर्णय जाहिर करण्याचा प्रघात आहे. मग अशी कोणती प्रक्रिया पार पडलेली आहे का?
– ही गोष्ट खरी आहे की स्थानिक राजकारणामुळे मुंबईच्या विकासात काही अडचणी आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे. पण समस्या राज्यातील असताना त्याचे निराकरणही राज्यातच व्हायला हवे, दिल्लीत नव्हे.
– राज्याचा प्रशासनाचा गाडा चालवण्याचे अधिकार मुख्यमंत्री आणि कॅबिनेट असे दोघानांही असून ही जबाबदारी ते झटकू शकत नाहीत. तशी शपथच त्यांनी घेतलेली असताना त्यांनी या शपथेचा अवमान केला नाही का ?
– यामधून असे दिसून येते की राज्यात विचारवंताची, योजनाकर्त्यांची आणि दुरदृष्टी असणाऱ्यांची कमतरता आहे? तरीही माझे असे मत आहे की राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा मुख्यमंत्र्यांचा काही हेतू नाही.
– राज्यांच्या अनेक योजना केंद्राच्या मदतीने चालतात म्हणून काही पंतप्रधानांनी अशा समितीचे अध्यक्ष व्हावे, असे म्हणणे चुकीचे आहे. आपण दोघेही मुख्यमंत्री राहिलेलो आहोत. राज्याच्या विकासासंबंधी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा आपला अनुभव आहे. पंतप्रधान म्हणून आपल्यावर देशाची जबाबदारी आहे. मग अशी समिती फक्त मुंबईसाठीच का? चेन्नई, शिलाँग, दिल्ली किंवा आंध्राच्या दोन नव्या राजधान्यासाठी का नाही? किंवा गांधीनगर का नसू नये? तुम्ही फक्त एका राज्याच्या राजधानीकडेच कसे काय विशेष लक्ष देऊ शकता ?
– या पद्धतीने मुख्यमंत्री राज्यातील इतर शहरांची जबाबदारी कशी काय झटकू शकतात. असे जर असेल तर मग नागपूरचीही जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडेच द्यावी. मुख्यमंत्र्यांनी या विषयाचे राजकारण करू नये, असे म्हटले आहे. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला दोन वर्ष उरले असताना मुख्यमंत्री मुंबईच्या बाबतीत राजकारण करत नाहीत का ?
– तरी आपण आपल्या सदसदविवेकबुद्धीला स्मरुन आणि आपल्यापाशी असलेल्या प्रशासन चालवण्याचा प्रदिर्घ अनुभव लक्षात घेता, ज्या “गुड गर्व्हनन्स”साठी आपण आग्रही आहात त्यासाठी आपण अशा कोणत्याही समितीचे अध्यक्षपद स्वीकारु नये, जेणेकरुन भारतीय संघराज्याच्या सरंचनेला धक्का बसेल.

पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याला भारतच जबाबदार;बदला घेवू –दहशतवादी हाफीज सईद

0

इस्लामाबाद-पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याला भारतच जबाबदार असून त्यांचा बदला घेण्यात येईल, अशी वक्तव्ये

पाकमध्ये दहशतवादाची बीजे पेरणारा दहशतवादी हाफीज सईदने केली आहेत पेशावरमधील ‘आर्मी स्कूल’मध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतालाच जबाबदार धरले आहे. सईद मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या हल्ल्यानंतर पाकच्या पाठिशी भारत ठामपणे उभा राहिला असताना, त्याच्या या वक्तव्याचा एकाही पाकिस्तानी नेत्याने निषेध केला नाही, हे विशेष! सईदच्या लष्कर-ए-तोयबावर पाकमध्ये बंदी असली तरी त्याचा वावर खुलेआम आहे.
दहशतवादाला आजवर खतपाणी घालणारा पाकिस्तान मंगळवारचा कोवळ्या जिवांचा आक्रोश ऐकल्यानंतर खडबडून जागा झाला असून दहशतवाद संपवण्यासाठी आठवड्याभरात ‘नॅशनल प्लॅन’ जाहीर करणार असल्याचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी जाहीर केले. पाकिस्तानातील शेवटचा दहशतवादी संपपर्यंत दहशतवादाविरोधातील लढा सुरू राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
शरीफ यांनी दहशतवादी गुन्ह्यांमधील फाशीच्या शिक्षेवर घालण्यात आलेली देशांतर्गत बंदी उठविली असून, दहशतवाद अथवा अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यास त्यांनी बुधवारी मंजुरी दिली. सर्व पक्षीय बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

तालिबान्यांचा म्होरक्या मुल्लाह फझल्लुहचा ताबा मिळावा, यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी बुधवारी तातडीने अफगाणिस्तानकडे धाव घेतली. शरीफ यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घानी यांच्याशी बातचीत केल्यानंतर राहील काबूलला गेले.
पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी तेथील राज्यकर्ते, राजकीय नेते, लष्कर यांना धारेवर धरले आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कट्ट्ररतावाद रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, अशी थेट टीका ‘द नेशन’ या वृत्तपत्राने केली आहे. ‘पाकिस्तानने आपले अनेक शूर सैनिक गमावले, तरीही लष्कर प्रमुख जनरल राहील शरीफ यांनी कट्टरवाद्यांना पांघरूण घातले आहे. पाकिस्तानी तालिबानींना नेस्तनाबूत करण्यासाठी लष्कराने मोहिमा आखल्या; परंतु अफगाण तालिबानसारख्या धर्मांध किंवा ‘जमात उद दवा’सारख्या जिहादी संघटनांना संरक्षण दिले. गेल्या दशकभरापासून देशाने जे बीज पेरले आहे, त्यालाच आज ही फळे आली आहेत,’ असा घरचा आहेरही त्यात देण्यात आला आहे.

पीएमपी तिकीट दरवाढीने राष्ट्रवादी अधिक बदनाम

0

पुणे – एकीकडे डीझेल चे दर कमी होत असताना पीएमपी ची दरवाढ करण्यात येत असल्याने -आणि महापालिकांचा कारभार राष्ट्रवादींच्या पदाधिकार्यांच्या हाती असल्याने
पीएमपी तिकीट दरवाढीने राष्ट्रवादी अधिक बदनाम होत आहे मात्र याकडे लक्ष द्यायला कोणीही उत्सुक नसल्याचे दिसत आहे यामुळेच पुण्यातील दुचाकी वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत हि वस्तुस्थिती आहे

खिळखिळ्या पीएमपीचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी पुणेकर प्रवाशांवरच सहा ते पंचवीस रुपयांच्या तिकीट दरवाढीचा बोजा पडणार आहे. पीएमपीने सादर केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) गुरुवारी मान्यता दिली असून, उद्यापासून (शनिवार) ही दरवाढ लागू होणार आहे. दैनंदिन व मासिक पासच्या दरात वाढ करण्यास मात्र प्राधिकरणाने नकार दिला आहे.

पहिल्या सहा किलोमीटरच्या प्रवासाचे दर कायम ठेवण्यात आले असून, सहा किलोमीटरनंतरच्या प्रवासाच्या तिकीटदरात सहा ते पंचवीस रुपयांनी वाढ होणार असल्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरव राव आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘ग्रामीण भागातील मार्गांवरील तिकीटदरांमध्ये तुलनेने अधिक वाढ करण्यात आली आहे. त्या भागात एसटीच्या दरांमध्ये समानता आणण्याच्या उद्देशाने हे धोरण स्वीकारण्यात आले आहे. मात्र, दैनिक पास, मासिक पास, विद्यार्थी-ज्येष्ठ नागरिकांचे सवलतीचे पास व ‘पुणे दर्शन’च्या पासमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.’

तिकीट दरवाढ अपरिहार्य असल्याचे दोन दिवसांच्या चर्चेअंती लक्षात आल्यानंतर त्याला मान्यता दिल्याचे राव यांनी सांगितले. या दरवाढीतून पीएमपीला दरमहा १०८ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. यापूर्वी जानेवारी २०१३ मध्ये पीएमपीच्या तिकीटदरात वाढ करण्यात आली होती, तर ऑगस्ट २०१३ मध्ये या दरांचे सुसूत्रीकरण (रॅशनलायझेशन) करण्यात आले होते. जानेवारीनंतर डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या पीएमपीला दरमहा सुमारे १६ कोटी रुपयांची तूट येत असून, त्याचा

परिणाम बससेवेवर होत आहे, असे पीएमपीने म्हटले आहे.

48 तासांत पाकच्या तुरुंगातील 3000 दहशतवाद्यांना फाशी द्या, पाक लष्करप्रमुखांची शरीफ यांच्याकडे मागणी

0

इस्लामाबाद – पेशावर मध्ये केलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर ट्वीटर वर संभाषणे होवू लागली आहेत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना तुरुंगात कैदेत असलेल्या 3 हजारहून अधिक दहशतवाद्यांना 48 तासांच्या आत फाशी द्यावी असे ट्वीटर वर म्हटले आहे. राहील शरीफ यांनी ट्वीट केले आहे की, मी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सर्व दहशतवाद्यांना फाशी देण्यास सांगितले आहे. 3 हजारहून अधिक दहशतवाद्यांना पुढच्या 48 तासांच फाशी द्यायला हवी.
जनरल शरीफ यांनी ट्वीटरवरच दहशतवाद्यांच्या विरोधात युद्ध पुकारल्याची घोषणा केली होती. त्यांनी ट्वीट केले होते की, खूप झाले. आता दहशतवाद्यांच्या बाजुने बोलणा-या लोकांच्या विरोधात कारवाई करायलाच हवी. जेव्हा पाकिस्तानी लष्कर पेशावरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढत होते, त्याचवेळी जनरल शरीफ यांनी ट्वीटरवर खैबर पख्तूनवा प्रांतात दहशतवाद्यांच्या तळावर मोठा हवाई हल्ला केल्याची माहिती दिली होती. तासभरात 10 हवाई हल्ले केल्याचेही त्यांनी सांगितले. दुस-या एका ट्वीटमध्ये जनरलने तालिबानला म्हटले आहे की, ‘तहरीक ए तालिबानसाठी संदेश – तुम्ही आमच्या मुलांना मारले आहे. त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागणार आहे. या चिमुकल्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा मोबदला आम्ही घेऊ. हे माझे वचन आहे.
तालिबानच्या विरोधात पंतप्रधान नवाझ यांनीही ट्वीट केले. पंतप्रधानांनी लिहिले की, तालिबान, पाकिस्तान आर्मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हाल संपवूनच राहील. पण ते तुमच्या बायका मुलांवर हल्ला करणार नाहीत. ते तुमच्या सारखे नाहीत. शरीफ यांनी पाकिस्तानी जनतेला लष्कराला पाठिंबा देण्याचे आव्हानही केले आहे

26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला जामीन दिल्याने मोदींनी केला पाक चा निषेध

0

नवी दिल्ली- पा‍किस्तानने 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी जकीउर रहमान लखवी याला जामीन मंजूर केला आहे. हे अतिशय धक्कादायक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. लखवीच्या जामीनाविरोधात शुक्रवारी लोकसभेत प्रस्ताव देखील मांडण्यात आला. तसेच लखवीचा जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. लखवीला जामीन मिळाल्याने भारताने तीव्र निषेध होत आहे. दरम्यान, भारताच्या तीव्र विरोधानंतर पाकिस्तानने लखवीला पुन्हा तुरुंगात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्‍तानच्या भूमिकेवर प्रचंड नाराजी व्यक्ती केली आहे. भारताने कठोर शब्दात पाकिस्तानाला संदेश पाठवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले. पेशावरमधील आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तान इतकी भारतालाही वेदना झाली. पेशावरमधील मृत निरागस मुले पाहून भारतातील प्रत्येक मुलाचे डोळे पानावले होते. पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याने मी देखील चिंतेत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.
पंतप्रधान म्हणाले, 26/11च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी आणि लष्कर-ए-तैयबाच्या कमांडर जकी उर रहमान लखवी याला जामीन मिळणे, हे अतिशय धक्कादायक आहे. पेशावरमधील आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतासह अन्य देशांनी निषेध नोंदवला. मात्र, त्यानंतर लगेचच लखवी याला जामीन मंजूर करणे, ही पाकिस्तान भूमिका निंदनीय आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्‍वराज यांनीही लखवीला जामीन मंजूरीवर सवाल उपस्थित केला आहे. पा‍किस्तान सरकारने आपला निर्णय तत्काळ बदलावा, अशी मागणी केली आहे.

अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल च्या वतीने पेशावर हल्ल्यातील निष्पाप बळी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

0

पुणे :

“महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या “अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’च्या वतीने पाकिस्तानमधील पेशावर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 141 विद्यार्थी आणि शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

“अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’ च्या विद्यार्थीं आणि शिक्षकांनी 16 डिसेंबर रोजी घडलेल्या हल्ल्यातील मृतांच्या आत्म्यास शांती मिळावी तसेच याप्रकारचे क्रूर कृत्य पुन्हा घडू नये यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका आयेशा ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना केली. यावेळी शाळेतील विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यंानी दोन मिनिटे स्तब्ध उभेराहून निष्पाप बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

गिर्यारोहक अरूणिमा सिन्हा यांच्या “बॉर्न अगेन ऑन द माऊंटेन’ पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन

0

पुणे :
“बीव्हीजी इंडिया लि’ या कंपनीच्या “ब्रॅण्ड ऍबॅसिडर’ आणि प्रसिद्ध गिर्यारोहक अरूणिमा सिन्हा यांच्यावरील पेन्ग्विन प्रकाशनाच्या “बॉर्न अगेन ऑन द माऊंटेन’ पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. कृत्रिम पायाने सर्वोच्च शिखर “माऊंट एव्हरेस्ट’ सर करणारी पहिली महिला असा नावलौकीक असलेल्या अरूणिमा सिन्हा यांच्या गिर्यारोहणाच्या अनुभवाचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. हा प्रकाशन कार्यक्रम संसदेतील पंतप्रधान कार्यालय (दिल्ली) येथे झाला.
यावेळी बीव्हीजी इंडिया लि. कंपनीचे संस्थापक एच.आर.गायकवाड, ओमप्रकाश (अरूणिमा सिन्हा यांचे मेहुणे), विपीन वर्मा (बीव्हीजी इंडिया लि चे उत्तर भारत उपाध्यक्ष) उपस्थित होते. कंपनीचे संस्थापक एच.आर.गायकवाड यांनी “स्वच्छ भारत अभियान’ याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि स्वच्छता विषयक उपक्रमांची माहिती दिली.
“भारत विकास ग्रुप'(बीव्हीजी इंडिया लि.) ही कंपनी स्वच्छता, “हाऊस कीपिंग मेंटेनन्स’ या क्षेत्रात दहा वर्षांहून अधिक काळ अग्रेसर असून, कंपनीमध्ये 45 हजाराहून अधिक कर्मचारी काम करतात. संसद पंतप्रधानांचे निवासस्थान यासह देशातील अनेक सरकारी, निमसरकारी आणि कार्पोरेट जगतातील आस्थापनांची कामे “बीव्हीजी’ कडे आहेत.
अलिकडेच अरूणिमा यांनी आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर यशस्वीरित्या सर केले होते. एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर जगातील सर्व महत्वपूर्ण शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार केला होता. यासाठी पुण्यातील “बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड’ कंपनीतर्फे त्यांना मदत देण्यात आली होती,
उत्तर प्रदेशात अरूणिमा सिन्हा यांना 2011 मध्ये रेल्वेतुन उतरताना ढकलले गेले आणि वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा पाय कापण्याची वेळ आली. मात्र डगमगून न जाता कृत्रिम पाय लावून एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निर्धार अरूणिमा सिन्हा यांनी केला आणि प्रत्यक्षात उतरवला.

लर्निंग लायसन्सच्या परीक्षेसाठी ओरियन्ट प्रणाली अवलंबवावी-महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनची मागणी

0

राज्यात पुणे , ठाणे , अंधेरी , वडाळा या मोठ्या शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात परवाना काढण्यासाठीचा ओघ पाहता लर्निंग लायसन्स साठी ऑन लाईन पध्दत कायम ठेवावी , मात्र परीक्षेसाठी स्टोल ऐवजी ओरियन्ट प्रणाली सुरु करावी , ग्रामीण भागात महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात होणारे बारा ते पंधरा तासाचे भार नियमन लक्षात घेता अशा भागातील अस्तित्वात असलेल्या परिवहन कार्यालयामध्ये शिकाऊ परवाना आणि पक्के परवाना साठी ऑन लाईन पध्दत रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देयून केली आहे . महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ परवाना आणि पक्के परवाना साठी ऑन लाईन पध्दत हि नागरिकांच्या हिताची नसून यामध्ये नागरिकांचा वेळ वाचण्याऐवजी नागरिकांचा वेळेचा अपव्यय होत आहे . म्हणून या ऑन लाईन प्रणाली बाबत रद्द करावी .

जुलै २०१४ पासून ज्या उमेदवारांनी लर्निंग लायसन्स काढले आहे त्यांच्या लायसन्स ची मुदत संपत आलेली आहे अशा उमेदवारांना ऑन लाईन प्रणाली भेटीची वेळ न मिळाल्याने महाराष्ट्रमधून हजारो वाहन चालक वंचित राहणारा आहेत त्याबाबत वेगळा विचार परिवहन विभागाने करावा अशी मागणी करण्यात आली आहे . सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूलला युझर आय डी पासवर्ड देण्यात यावा , ड्रायव्हिंग स्कूल साठी वेगळे मोटार वाहन निरीक्षक व वेगळे वार व दिवस नेमून दिलेले असतात , ड्रायव्हिंग स्कूल साठी स्वंतत्र कोटा देण्यात यावा , व पुणे शहरात पक्क्या लायसन्स ओघ लक्षात घेता कोटा वाढवून मिळावा परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारीची संख्या वाढवण्यात यावी , परिवहन कार्यालयामध्ये महिलासाठी स्वछता गृहांची संख्या वाढवावी . उपाहार गृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी . राज्यात रिजनल ड्रायव्हिंग स्कूल सेंटर साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी , अवजड वाहनाची परीक्षा पूर्वी प्रमाणे परिवहन कार्यालयात व्हावी अशा मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री , परिवहन मंत्री , संसदीय कार्य मंत्री , परिवहन राज्य मंत्री यांना महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने देण्यात आली .

वाहन चालविण्याच्या लायसन्ससाठी नागरिकांचा जादा ओघ असलेल्या शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यालयात ओरियन्ट प्रणाली सुरु करण्याबाबत सकारात्मक पावले उचलणार व राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रश्नाबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक लावणार असे आश्वासन दिवाकर रावते यांनी दिले आहे .

यावेळी राजू घाटोळे , यशवंत कुंभार , ज्ञानेश्वर वाघोले , बाप्पू भावे , निलेश गांगुर्डे , निखिल बोराडे , विवेक माळवदे , नानासाहेब शिंदे , मिलिंद बैसाणे , सुनील चौधरी , स्वप्नील पवार, मनोज नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते .
12

१ एप्रिल २०१५ पूर्वी राज्यातून एलबीटी हद्दपार करू- महसूलमंत्री

0

नागपूर-१ एप्रिल २०१५ पूर्वी राज्यातून एलबीटी हद्दपार करू, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केली.
राज्यपालांच्या अभिभाषणातील चर्चेदरम्यान खडसेंनी याबाबतची माहिती दिली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या अभिभाषणात एलबीटी रद्द करण्याबरोबर सुधारित व सुटसुटीत करप्रणाली आणणार असल्याचे सभागृहात म्हटले होते. याबाबत विरोधकांनी सरकारला उत्तर मागितले. त्यावेळी महसूलमंत्री या नात्याने खडसेंनी सभागृहाला माहिती दिली.
दरम्यान, एलबीटी रद्द करून नव्या आर्थिक वर्षात राज्यात जीएसटी लागू करण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारने या अधिवेशनात जीएसटी विधेयके आणण्याचे निश्चित केले आहे. तसेच काही त्रुटी वगळण्यास सांगून काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षापासून देशात जीएसटी लागू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे. त्यामुळेच राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन व्यापा-यांना दिले होते. त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. एलबीटी व जकात रद्द करण्यामुळे राज्याचे होणारे नुकसान केंद्र सरकार भरून काढणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला साडेचौदा हजार कोटी रूपये जकातीची तडजोड रक्कम म्हणून देणार असल्याचेही खडसेंनी सभागृहात सांगितले.