Home Blog Page 3614

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाच हजार विद्यार्थ्यांची अभिवादन मिरवणूक

0

पुणे :

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आझम कॅम्पसच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवार, दि.14 एप्रिल 2015 रोजी अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले . एकूण पाच हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले . या मिरवणुकीचे उद्घाटन ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या हस्तेझाले तर  मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतीफ मगदूम यांनी केले

दरबार ब्रॉस बॅण्डची दोन पथके, ढोल – ताशा, सनई चौघडे  समवेत ही मिरवणूक सकाळी 8 .30 वा. आझम कॅम्पस येथून निघून पुना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, जुना मोटार स्टँड, पद्मजी पोलीस चौकी, भारत सिनेमा, ए.डी.कॅम्प चौक, मॉडर्न बेकरी चौक, संत नरपतगिरी चौक, वीज वितरण कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणूकीची सांगता झाली , अशी माहिती संस्थेचे सचिव लतिफ मगदुम यांनी दिली.

या अभिवादन मिरवणूकीमध्ये पाच हजार विद्यार्थी, संस्थेचे सदस्य तसेच सर्व शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागीझाले होते

ओम पुरी आता प्रथमच मराठी चित्रपटात

0

12

१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी आता प्रथमच “””१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी” या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच ह्या चित्रपटाचा मुहूर्त महाराष्ट्राचे वनमंत्री पतंगरावकदम ह्यांच्या हस्ते पुणे येथे पार पडला.     

योगिराज एंटरटेन्मेंट निर्मित १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी ह्या चित्रपटाचे निर्माते लहु जाधव व शंकर मिटकरी असून  बर्‍याच प्रसिद्ध चित्रपटाचे जेष्ठदिग्दर्शक पितांबर काळे, हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. कथा पुरुषोत्तम बोरकर यांची असून त्यातील पटकथा, संवाद वगीते अशी तिहेरी बाजू आबा गायकवाड यांनीसांभाळली आहे.  यावेळी ओम पुरी म्हणाले, “मी मुंबईत गेली ४० वर्षे राहतो. महाराष्ट्राने मला नाव, पैसा दिला. महाराष्ट्राचा मी खूप आभारी आहे. मी स्वतःला मराठी समजतो.. आणि मला मराठी नाटक, चित्रपट व साहित्य आवडतं.”तसेच या चित्रपटात ओम पुरींसोबत मनोज जोशी, किशोरी शहाणे, दिपाली सय्यद, भाऊ कदम, प्रेमा किरण मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

‘आधी घर, पैसे नंतर- डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स तर्फे ४ नवीन गृहप्रकल्प

0

पुणे  : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ४ नवीन गृहप्रकल्प. पिरंगुट येथील पुष्पबन व चैत्रबन, डी.एस.के. विश्व, धायरी येथील नभांगण, हडपसर येथील  वेदांत. अशा ४ या प्रकल्पासाठी खास लोकाग्रहास्तव ‘आधी घर, पैसे नंतर- रिटर्न्स’ ही योजना आणली आहे. या योजनेचा कालावधी १४ एप्रिल ते १९ एप्रिल पर्यंत असून म्हात्रे पुलाजवळील घरकुल लॉन्स येथे  सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत याबद्दल अधिक माहिती मिळेल.गृहकर्जाचे वेगवेगळे पर्याय, सुटसुटीत ईएमआय आणि ग्राहक जेंव्हा घराचा ताबा घेतील तेंव्हाच बँकेचे हप्ते सुरु ही या योजनेची ठळक वैशिष्ठे आहेत.एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक व टाटा कॅपिटल यांच्याकडून गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर असणारे आनंदघन, नंदनवन, मयुरबन, कस्तुरी, गंधकोष यांसारख्या प्रकल्पांवर सुद्धा मोठी सवलत दिली  आहे.

झाडे जाळून नष्ट करण्याचा पुण्यात प्रयत्न -आयुक्त साहेब वाचवा हो ही झाडे -संदीप खर्डेकर

0
11 13 14
पुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात … झाडे नष्ट करण्यासाठी उन्हाळ्याचा आधार घेवून आता झाडे जाळली जात असल्याचे संदीप खर्डेकर यांनी उग्घाद्कीस आणले आहे
भाजपचे सरचिटणीस श्री खर्डेकर यांनी या संदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे या पत्रात असे म्हटले आहे कि , कर्वेनगर परिसरातील पोतनीस परिसर व गिरीजाशंकर विहार समोर एक मोठा रिकामा प्लाट असुन याठिकाणी काही उत्तम झाडे आहेत.या झाडाना हेतुपुरस्सर आग लावण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.मागील 15 दिवसात येथे दोन झाडाना आग लावण्याचा प्रयत्न झाला तर आज सकाळी मी येथुन जात असताना परत एका झाडाला आग लावल्याचे दिसुन आले.ओंकार सुरेश रोकडे व सुरज जनार्दन शर्मा या दोन शाळकरी मुलांच्या मदतीने पाणी टाकुन आग विजवण्यात यश आले व सदर झाड वाचले.मात्र या प्लोट ची मालकी कोणाची व वारंवार येथे आग लावण्याचे प्रकार कोणत्या हेतुने केले जातात याची चौकशी व्हावी व येथील झाडांच्या रक्षणाबाबत मनपा ने योग्य कार्यवाही करावी

या पत्रा सोबत त्यांनी फोटो हि जोडले आहेत .

संपूर्ण महाराष्ट्र टोल मुक्तीच्या दिशेने- यापुढे लहान वाहनांना टोल नाही ;सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

0
कोल्हापूर –  यापुढे लहान वाहनांना टोल द्यावा लागणार नाही. त्यामुळे टोलमुक्त महाराष्ट्र होणार असून, मोठ्या वाहनांना परवडेल, अशा पद्धतीने टोल आकारला जाईल, असे शासनाने धोरण निश्‍चित केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
महाराष्ट्र टोलमुक्त व्हावा, यासाठी राज्य शासनाला किंमत मोजावी लागणार असून, यासाठी चारशे कोटी रुपये द्यावे लागतील. अर्थखात्याने त्याला मंजुरी दिली आहे. याशिवाय एमएसआरडीसीला दर वर्षी 225 कोटी रुपये असे पाच हप्त्यांत अकराशे कोटी, सार्वजनिक बांधकाम पावणेदोनशे कोटी रुपयांप्रमाणे 25 वर्षे द्यावे लागणार आहेत. एकूण टोलमुक्तीसाठी शासनाला 8 हजार 900 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. लहान वाहनांना टोलमुक्ती मिळणार असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

राष्ट्रीय महामार्गावरील टोलसंबंधीच्या धोरणाबाबत केंद्र लवकरच निर्णय घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. पण मुंबईत प्रवेश करताना लागणारे पाच टोल नाके, कोल्हापूर टोलचे 9 टोल नाके, मुंबई-पुणे महामार्गावरील 9 टोल व मुंबईमधील वरळी सिलिंगचा असे एकूण 24 टोल नाक्‍यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही. यासाठी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. लवकरच याबाबतही निर्णय घेतला जाईल.

200 कोटी रुपयांवरील सर्व प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसारच उभारले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम खात्याला 2900 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत होता. तो सध्या 3 हजार सातशे कोटींवर नेला आहे. त्यात आणखी तरतूद करून तो चार हजार कोटींवर नेला जाईल. एकेका प्रकल्पाला तीन ते चार हजार कोटी रुपयांची गरज आहे. इतका निधी उपलब्ध होणे कठीण असल्याने ते “बीओटी तत्त्वावरच राबवले जातील. अवजड वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे रस्ते खराब होत असल्याने त्यांना टोल द्यावाच लागणार आहे. अर्थात हा टोल वाहनधारकांना परवडेल असा असावा, यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी काही रक्कम राज्य शासन देणार आहे. मोठे प्रकल्प राबवल्यानंतर त्यांची देखभाल दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरतूद करता यावी, म्हणून मोठ्या वाहनांकडून टोल आकारावा लागणार आहे. लहान वाहनांना टोल द्यावा लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

संसदेच्या अधिवेशनापूर्वी देशव्यापी आंदोलन-अण्णा हजारे

0

पुणे – राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचे आणि टोल रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे यांनी केले मात्र याच वेळी भूमी अधिग्रहण विधेयकात शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याविरोधात आगामी संसदेच्या अधिवेशनापूर्वी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे  दिला.

भूमी अधिग्रहण विधेयकासंदर्भात चर्चा करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पुण्यात झाली. सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत चाललेल्या या बैठकीनंतर हजारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी विधेयकाबाबत भूमिका स्पष्ट केली. सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, विक्रांत पाटील, विनायक पाटील आदी उपस्थित होते. आंदोलनासंदर्भात दिल्लीत लवकरच विस्तारित बैठक होणार असून, त्यामध्ये आंदोलनाची तारीख आणि स्वरूप ठरविण्यात येणार असल्याचे हजारे यांनी सांगितले. ते म्हणाले,””दिल्लीत ज्यादिवशी आंदोलन होईल, त्याचदिवशी प्रत्येक राज्य, जिल्हा, गाव पातळीवर आंदोलन केले जाईल. तत्पूर्वी त्याबाबत देशभर जनजागृती करण्यात येणार आहे.‘‘
“”भूमी अधिग्रहण विधेयकाबाबत आमची भूमिका चुकीची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असेल, तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे,‘ असे खुले आव्हान हजारे यांनी दिले. ते म्हणाले,””राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेला भूमी अधिग्रहण अध्यादेशात विशेष बदल नाहीत. यापूर्वीच्या अध्यादेशात रुग्णालये, शाळा, महाविद्यालयांसाठी जागा देण्याची तरतूद होती. नव्या अध्यादेशातून ती वगळली आहे. मात्र, त्याजागी स्वयंसेवी संस्थांचा उल्लेख केला आहे. अशाप्रकारच्या संस्थांमार्फतच रुग्णालये, शाळा चालविल्या जातात. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या या संस्थांना अधिकार मिळावेत, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते. विधेयकातील काही त्रुटींमुळे आम्ही त्याला विरोध करत आहोत.‘‘
राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचे आणि टोल रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत हजारे यांनी केले. ते म्हणाले,””कोणता पक्ष सत्तेत आहे, हे महत्त्वाचे नसून, ते सरकार जनहितासाठी काय करते, याचा विचार केला पाहिजे.‘‘ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी “शेतकऱ्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नये‘ असे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. याबाबत हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात‘ या कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. परंतु हा कार्यक्रम एकतर्फी असल्याचे हजारे यांनी सांगितले.

देशात पेटविला जातोय हिंदू -मुस्लिम वाद ?

0
मुंबई -हिंदू हित कि बात करेगा … वोही देश पे  राज करेगा …. हि घोषणा  आता मावळली जणू… ? कि कृतीत येते आहे ? आणि मुस्लिम हित कि बात करेगा चा नारा च जणू सुरु झाला आहे .? जुन्या जमान्यातील म्हणजे १९७७ ते १९९७ च्या काळातील शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे  यांची कॉपी करू पाहणारे ओवेसी आणि त्यांचा एमआयएम हा मुस्लीमांसाठीच देशभर लढावयास निघालेला पक्ष मानला जावू लागला आहे . शिवसेना महाराष्ट्रात प्रथम मराठी माणूस हा मुद्दा घेवून रणांगणात उतरली नंतर हिंदुत्वाची ज्योत त्यांनी प्रज्वलीत केली . भाजप हा पक्ष हि हिंदुत्ववादी पक्ष मानला जातो . याच धर्तीवर एम आय एम मुस्लिमांसाठी आता लढा देवू लागली आहे दुसरीकडे या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि  राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणासाठी आता शड्डू ठोकत आहेत तर शिवसेनेने मुस्लिमांचे आरक्षण काय मतदानाचा हक्कच रद्द करावा असा विचार हळूच संजय राऊत यांच्या एका लेखाद्वारे सोडून दिला आहे
बाळासाहेब ठाकरे यांची जी ताकद होती ती जणू आजच्या शिवसेनेत उरलीच नाही असे वाटत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याची मागणी केल्यामुळे मोठे वादंग माजले आहे. व्होट बँक म्हणून मुस्लिमांचा होणारा वापर टाळण्यासाठी त्यांच्या मतदानाच्या अधिकारावरच बंदी घातली पाहिजे, असे मत  राऊत यांनी लिहिलेल्या लेखात मांडले आहे.तर 
‘आघाडी सरकारने मराठा समाजासह मुस्लिमांना दिलेले आरक्षण भाजप सरकारला कायम ठेवता आले नाही. तर उलटपक्षी दिलेले हे आरक्षणही काढून घेण्यात आले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या मुस्लिम बांधवांच्या न्याय्य हक्‍कासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे. मुस्लिम आरक्षणाच्या निर्णायक लढ्यायासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाची तयारी करावी’, अशी हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी दिली आहे .
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वतीने मुस्लिम आरक्षण परिषद बोलावण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.आघाडी सरकारने नोकरी आणि शिक्षणात मुस्लिमांना ५ टक्‍के आरक्षण दिले. पण, कोर्टाने त्यास स्थगिती दिल्यानंतर भाजप सरकारने केवळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढून मुस्लिम समाजावर अन्याय केला. या दोन्ही समाजाला आरक्षणाची गरज आहे. पण, सरकार मुस्लिम आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकारला याबाबतचा धडा शिकण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक व्हावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.दरम्यान, या आरक्षण परिषदेत खासदार तारिक अन्वर यांनीही सरकारच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. तर, प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, ‘गोवंश हत्याबंदीपेक्षाही आरक्षणाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. मुस्लिम समाजाचे आरक्षण नाकारलेच नाही तर हिरावून घेतले आहे. भविष्यात भाजपला मुस्लिम समाज धडा शिकवेल’.या परिषदेला राज्यभरातून मुस्लिम समाजाचे नेते आणि कार्यकर्ते निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जलालुद्दीन सय्यद यांनी या परिषदेमागील भूमिका स्पष्ट केली.
मुस्लिमांच्या न्याय्य हक्‍कांचे संरक्षण करणारा राष्ट्रवादी हा एकमेव राजकीय पक्ष असल्याचे सांगत, पक्षाच्या व्यासपीठावरून व पाठबळाने मुस्लिम आरक्षणाचा लढा तीव्र करण्यात येईल, असे सय्यद यांनी सूचित केले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याची मागणी केल्यामुळे मोठे वादंग माजले आहे. व्होट बँक म्हणून मुस्लिमांचा होणारा वापर टाळण्यासाठी त्यांच्या मतदानाच्या अधिकारावरच बंदी घातली पाहिजे, असेमत राऊत यांनी लिहिलेल्या लेखात मांडले आहे.

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन आणि असदुद्दीन ओवेसी यांची ‘विषारी साप’आणि त्यांच्या पक्षाची ‘सापांचे वारुळ’ अशा शब्दांत संभावना केली आहे. राऊत यांच्या या भूमिकेवर सर्वच पक्षांनी कडाडून हल्ला केला असून लोकांत फूट पाडण्याचे हे षड‌्यंत्र असल्याचे म्हटले आहे.

लोकांच्या भावना भडकावून त्यांच्यात फूट पाडण्याचे शिवसेनेचे हे कारस्थान आहे. अशा शक्तींना भारतीय समाजात अजिबात स्थान नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत वारंवार आश्वासने देऊनही अशा वादग्रस्त वक्तव्यांची हेतुत: पुनरावृत्ती केली जात असल्याचेही काँग्रेसने संजय राऊत यांचा निषेध करताना म्हटले आहे. एकीकडे असा हिंदू -मुस्लिम वाद राजकीय स्तरावरून पेटवून दिला जात असताना सर्वाधिक -आणि ऐतिहासिक बहुमताने सत्ता मिळवलेल्या भाजपकडून किंवा नरेंद्र मोदींकडून मात्र याबाबत काहीही दिशा देण्याचे व भूमिका स्पष्ट करण्याचे काम होताना दिसत नाही . असा आरोप होतो आहे . नरेंद्र भाई क्यू चूप है ? असाच प्रश्न यावा उपस्थित होण्यासारखा आहे

दरम्यान सत्तेच्या आणि एकंदरीत देशाच्या राजकारणात पुन्हा हिंदू -मुस्लिम  भेद आणि वादाला फोडणी देण्याचे काम राजकीय स्तरावरून होत असल्याचे दिसते आहे मानवता  हा धर्म; माणुस ही जात हे तत्व या राष्ट्रात  कधी मानले जाईल अशी स्थिती जवळपास दिसत नाहीच

 

‘दिल दोस्ती दुनियादारीने’महिनाभरात आकर्षित केली तरुणाई

0
झी मराठीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली तरूणाईची मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारीने’ आज एक महिना पूर्ण केला. या यशस्वी माहपूर्तीच्या क्षणी निर्माते संजय जाधव यांनी सर्व दोस्तांसाठी सेटवर केक पाठवला आणि सुजय, आशू, अॅना, मीनल, रेश्मा आणि कैवल्य सोबत टीममधील सर्वांनीच हा खास क्षण धम्माल पद्धतीने साजरा केला. या मालिकेने एका विशिष्ट चौकटी च्या बाहेर मालिकांचे विश्व  नेण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीच्या प्रेक्षक्वर्गाबाहेर असलेला तरुण प्र्क्षक हि निर्माण करण्याचा प्रय्त्न्केल्याचे समीक्षक सांगतात

मुख्यमंत्र्यांची घोषणा: 12 टोलनाके बंद तर 53 टोलनाक्यावर खाजगी छोट्या वाहनांना सूट

0
मुंबई- राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटची दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 12 टोलनाके 1 जूनपासून बंद होतील अशी घोषणा केली. याचबरोबर राज्यभरातील 53 टोलनाक्यावरून खासगी वाहनांना 1 जून 2015 पासून टोलमधून सूट देण्याचीही घोषणा करण्यात आली. यात एसटी, रिक्षा, कार व जीप यासारख्या खासगी छोट्या चारचाकी गाड्यांना सूट मिळणार आहे. कोल्हापूर टोलनाक्याविषयी 31 मे पर्यंत सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.दरम्यान कोल्हापूर बरोबर खेडशिवापूर टोल नाकाही बंद झाला पाहिजे अशी मागणी आता राजकीय वर्तुळातून  मागे पडली आहे .तत्कालीन  मनसे आमदार स्वर्गीय रमेश वांजळे यांनी खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन केले होते . अनेक वेळा या नाक्यावर दादागिरीमुळे मारामाऱ्या झाल्या आहेत
 जे 53 टोल नाके ठराविक खाजगी वाहनांना टोल मुक्त करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे त्यातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 26 टोल नाके आहेत, तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 27 टोलनाक्यांचा समावेश आहे.
जे 12 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्या टोलची मुदत काही दिवसांमध्ये संपत आहे. कंत्राटदारांना या 12 टोलनाक्याचे उर्वरित  सुमारे 450ते 500 कोटी रूपये देऊन हे टोल राज्य सरकार ताब्यात घेणार आहे. यासाठी 500 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे

पीडब्ल्यूडीचे 9 टोलनाके असून, ते बंद करण्यासाठी सरकार 226.51 कोटी रूपये ठेकेदारांना देणार आहे. याबरोबरच चंद्रपूर जिल्ह्यातील एमएसआरडीसीचे तीन (ताडाली येथील) टोलनाके बंद करण्यासाठी सरकार 168 कोटी देणार आहे.
पीडब्ल्यूडीचे हे 9 टोलनाके कायमचे बंद होणार (कंसात सरकार कंत्राटदारांना देणारी रक्कम)

1) अलिबाग – पेण – खोपोली – वडवळ. (4.29 कोटी रूपये)
2) शिक्रापूर – (44.33 कोटी रूपये)
3) मोहोळ – (11.38 कोटी रूपये)
4) भंडारा – (23.94 कोटी रूपये)
5) कुसळंब – (42 कोटी रूपये)
6) अकोले – (17.68 कोटी रूपये)
7) ढकांबे – नांदुरी – सप्तश्रुंगी. (20.56 कोटी रूपये)
8) तापी पूल – (35.36 कोटी रूपये)
9) रावणटेकडी – (27 कोटी रूपये)
खासगी व छोट्या चारचाकी वाहनांना सूट मिळणाऱ्या पीडब्लूडीच्या टोलनाक्यांची यादी-

1.कशेळी टोलनाका – भिवंडी रस्त्यावर वडपा
2.मालोडी टोलनाका – चिंचोटी – कामण रस्ता
3.वाघोटे टोलनाका – मनोर-वाडा भिवंडी
4.कवाड टोलनाका- मनोर-वाडा भिवंडी
5.खारघर टोलनाका – सायन – पनवेल
6.शिक्रापूर टोलनाका- नाशिक-निफाड-औरंगाबाद
7.अंदरसूल टोलनाका- नाशिक -निफाड औरंगाबाद (शिलापूर आरओबी)
8.शेंडी – नगर – वडाळा- औरंगाबाद
9.खडकाफाटा – वडाळा-वाळूज लिंबे टोलनाका
10.देहरे – नगर-कोपरगाव टोलनाका
11.म्हसणे फाटा टोलनाका – पुणे-नगर
12.भाबडबारी टोलनाका – प्रकाशा-सटाणा
13.ताहारबाद टोलनाका – प्रकाशा-सटाणा
14.दुगाव टोलनाका- चांदवड-मनमाड
15.पानेवाडी टोलनाका- चांदवड-मनमाड
16.येसगाव टोलनाका – मालेगाव-कोपरगाव
17.लाडगाव टोलनाका – औरंगाबाद – जालना
18.नागेवाडी टोलनाका- औरंगाबाद जालना
19.बरबडा टोलनाका – नांदेड-नरसी
20.खानापूर टोलनाका – नरसी देगलूर
21.शिरूर तासबंद – मुखेड (लातूर) टोलनाका
22.पिंपरीफाटा टोलनाका – जालना-वाटूर
23.मलकापूर टोलनाका – बुलडाणा
24.आरंभा टोलनाका – जाम वरोरा
25.नंदूरी टोलनाका – चंद्रपूर बामणी
26.विसापूर – चंद्रपूर बामणी

भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय माता दुग्ध पेढी (ह्युमन मिल्क बँक) परिषदेस प्रारंभ

0

 

पुणे-नेटवर्क ऑफ ह्युमन मिल्क बँक व डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र,

पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय माता दुग्ध पेढी (ह्युमन मिल्क बँक) आंतरराष्ट्रीय

परिषदेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला. केंद्रीय आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. अजय खेरा यांच्या हस्ते या

परिषदेचे उद्घाटन झाले.

डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र येथील सभागृहामध्ये ही परिषद आयोजित

करण्यात आली आहे. भारतातील माता दुग्ध पेढ्यांचे सिंहावलोकन व सध्याची प्रगती याविषयावर

आयोजित या परिषदेला भारतातील १० माता दुग्ध पेढ्यांचे (ह्युमन मिल्क बँक) १५० डॉक्टर्स सहभागी

झाले आहेत. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नॉर्वे इंडिया पार्टनरशिप इनिशिएटिव्ह (एनआयपीआय) प्रमुख

उन्नी सिल्कोसेट, युरोपियन मिल्क बँकिंग असोसिशनचे अध्यक्ष गीलीअन वेवर, डॉ. डी. वाय पाटील

विद्यापीठाच्या विश्वस्त स्मिता जाधव, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. एन. राझदान,

डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ब्रिगेडियर डॉ. अमरजित सिंह , नेटवर्क ऑफ

ह्युमन मिल्क बँकचे संस्थापक सदस्य डॉ. उमेश वैद्य, अॅकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.

प्रमिद जोग, अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, पुणेचे अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे, या परिषदेच्या संयोजन

समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर यावेळी उपस्थित होते.

डॉ. अजय खेरा, भारत सरकारच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने देशात नवजात बालकांच्या

आरोग्यासंदर्भात अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भारतात नवजात बालकांच्या मृत्यूचा दर हा

निम्म्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे नवजात बालकांच्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून

अनेक पावले उचलली जात आहेत. नवजात बालकाच्या आरोग्यासाठी मातेचे दुध हे महत्वाचे आहे. परंतु

अनेक वेळेला नवजात बालकाला त्याच्या आईचे दुध मिळू शकत नाही. अशावेळी इतर मातांनी त्यांचे

दुधदान करणे हा योग्य पर्याय आहे. त्यातूनच माता दुग्ध पेढीची (ह्युमन मिल्क बँक) संकल्पना पुढे

आली आहे.

उन्नी सिल्कोसेट म्हणाल्या, नॉर्वेला माता दुग्ध पेढ्या चालवण्याचा दीर्घकाळापासून अनुभव आहे. पहिली

माता दुग्ध पेढी १९४२ मध्ये सुरु करण्यात आली. एनआयपीआयच्या सहकार्याने कलकत्ता येथील

एसएसकेएम रुग्णालयात सन २०१३ पासून माता दुग्ध पेढी सुरु करण्यात आली आहे. तसेच जयपूर

येथील महिला चीकीच्छा रुग्णालयात २०१५ मध्ये माता दुग्ध पेढी सुरु करण्यात आली आहे. नवजात

बालकाला माता दुग्धपेढीच्या माध्यमातून स्तनपानाची सुविधा उपलब्ध करून देवून त्यांचा जीव कसा

वाचवता येतो या आमच्या अनुभवाचा उपयोग होतो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

या परिषदेचा शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी समारोप केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत

होणार असून पुण्याचे खासदार अनिल शिरोळे हे उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेला इंडियन मेडिकल असोसीएशन, पुणे चाप्टर, नॉर्वे इंडिया पार्टनरशिप इनिशिएटिव्ह

(एनआयपीआय),नॅशनल नेनोटोलॉजी (एनएनएफ) महाराष्ट्र स्टेट चाप्टर, नॅशनल मेडीक्लोज ऑर्गनायझेशन

(एनएमओ), अॅकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स, आरोग्य भारती यांचे सहकार्य लाभले आहे.

परिषदेच्या आयोजनामागचा हेतू संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर व राष्ट्रीय समन्वयक

डॉ. उमेश वैद्य यांनी विशद केला. डॉ. शरद आगरखेडकर यांनी आभार मानले.

“स्वप्नपूर्तीचा खजिना-लिव्ह युअर ड्रीम” लवकरच प्रकाशित

0

पुणे –       भारताचे विक्रमवीर व शिखरवीर डॉ.आनंद बनसोडे याचे दुसरे प्रेरणादाई पुस्तक “स्वप्नपूर्तीचा खजिना-लिव्ह युअर ड्रीम” हे पुस्तक तयार झाले असून येत्या काही दिवसातच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. आनंदला सतत प्रेरित करणाऱ्या तसेच त्याला आतापर्यंत ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरे विश्वविक्रमासह गाठून देणाऱ्या प्रेरणादाई व्याक्यांचा संग्रह या पुस्तकात आहे. विजय प्रकाशन द्वारे हे पुस्तक प्रकाशित होत आहे.

तरुणांनांसह सर्वांनाच आपल्या कार्याद्वारे व “स्वप्नपूर्ती फौंउंडेशन” द्वारे प्रेरित करणाऱ्या आनंद बनसोडे याने या पुस्तकात सर्वांनाच रोजच उपयोगी पडतील असे प्रेरानादाई वाक्ये या पुस्तकात दिली आहेत. यशाच्या मार्गात अनेकांना वेगवेगळ्या अडचणी आल्यास, अनेक वेळा माघार घेवू वाटते अशा अडचनिवेळी आनंदला नेहमीच शिखरांची सर्वोच्च उंची गाठून देणाऱ्या वाक्यांचा संग्रह या पुस्तकात आहे. या पुस्तकाची विशेषता म्हणजे या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर सहा खंडातील सहा लोकांनी आनंदला या पुस्तकाच्या निमित्ताने सुभेच्छा दिल्या आहेत. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका येथील आनंदच्या “स्वप्नाकडून सत्याकडे” जाणार्या मार्गाला जवळून पाहणाऱ्या लोकांनी यानिमिताने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“या पुस्तकातील व्याक्याचे चिंतन केल्यास नक्कीच आपल्या स्वप्नांच्या दिशेने जाण्यास एक शक्ती मिळेल व येणाऱ्या सर्व अडचणी व संकटाना सामोरे जाण्याचे धाडस अंगी येईल. हे पुस्तक एका दिवसात तयार केले असून सर्व वयोगटासाठी योग्य ठरेल असेच हे पुस्तक आहे. सुट्टीत मुलांना त्यांचे स्वप्न ठरवण्यासाठी व तसे नियोजन करण्यासाठी नक्कीच हे पुस्तक उपयोगी ठरेल”, असे आनंदने सांगितले.

 

-सहा खंडातील सम्माननीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया-

“आनंदच्या हस्याशिवाय त्याची कल्पना करता येणे शक्य नाही. एव्हरेस्ट चढताना ऑक्सिजन मास्क मध्ये पण तो हसतच असला पाहिजे. पाय जमिनीवर ठेवून असल्यामुळे विश्वविक्रम केलेला आनंद हाच का ? हा प्रश्न पडतो”

व्हायोलेट ( मास्को , रशिया-युरोप)

“आम्ही जे पाहिजे ते मिळवू शकतो असा विश्वासही आनंदच्या मैत्रीने दिला”

अहमद अल्सेहरी ( सौदी अरेबिया, आशिया)

“प्रत्येक टीमचा आनंद एक सकारात्मक भाग असतो”

रोबर्ट डॉबसन (सिडनी, ऑस्ट्रेलिया)

“आनंदसारखा दयाळू माणूस मी पहिला नाही.त्याला कधीच विसरू शकणार नाही”

माटे (टांझानिया, आफ्रिका)

“अजून एवढी शिखरे…आनंदला काहीही शक्य आहे”

संड्रा (इक्वोडोर, दक्षिण अमेरिका)

एका वेळी एक पावूल या प्रमाणे आयुष्याच्या संघर्षातून तू बाहेर आलास.”

विल्सन (कॅनडा, उत्तर अमेरिका) 

प्रसिद्ध डिझायनर कृष्णा मेहतांची आयएनआयएफडीसाठी कार्यशाळा

0
3
पुणे : कोथरूड येथील इंटरनैशनल इन्स्टिट्युट ऑफ फ़ैशन डिझाईन ( आयएनआयएफडी) च्या विद्यार्थ्यांसाठी प्रख्यात लाईफस्टाईल डिझायनर कृष्णा मेहता यांची कार्यशाळा नुकतीच झाली. या कार्यशाळेत  आयएनआयएफडीच्या उदयोन्मुख  फ़ैशन  डिझायनरसाठी मेहता यांनी मार्गदर्शन केले व त्यांना या क्षेत्रतिल महत्वाचे पैलू उलगडले. 
 
लैक्मे फ़ैशन वीक आणि फ़ैशन डिझाईन काउन्सिल ऑफ इंडियाच्या सल्लागार समितीवर असलेल्या श्रीमती मेहता या गेल्या २० वर्षापासून कृष्णा मेहता या आपल्या ब्रान्डच्या क्रिटिव्ह डायरेक्टर आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सोनक्षी सिन्हा, विद्या बालन, उर्मिला मातोंडकर, झीनत अमान, प्राची देसाई आदींनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. मेहता यांनी डिझाईन केलेली वस्त्रे या अभिनेत्रींनी परिधान केली आहेत. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी मेहता यांना सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात मिलान फ़ैशन वीकमध्ये त्यांच्या वेशभूषा प्रदर्शित झाल्या होत्या. मेहता आयएनआयएफडीच्या मार्गदर्शक आहेत. या कार्यशाळेत मेहता यांनी विद्यार्थ्यांना डिझायनिंग क्षेत्रातील महत्वाच्या टिप्स दिल्या. या क्षेत्रात काम करताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या बाबी त्यांनी स्पष्ट केल्या. डिझाईन इंडस्ट्रीतील बदलांची माहिती देताना त्यांनी सांगितले, कि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगभरात इ कॉमर्स वाढला आहे. ग्राहकांच्या गरजा-शैली बदलली असून, अद्यावत फ़ैशनचे ज्ञान व भान ग्राहकांना आहे.
या कार्यशाळेत श्रीमती मेहता यांचे प्रश्नोत्तराचे  सत्र झाले. डिझाईन इंडस्ट्रीविषयी माहिती देताना त्यांनी स्वत:चा उद्योग कसा सुरु करावा, फ़ैशन मार्केटिंग आणि व्यवसायातील तपशील त्यांनी खास यांच्या शैलीत विशद केला व या क्षेत्रातील मार्केटिंगचा नवा मार्ग त्यांनी विद्यार्थ्यांपुढे उलगडला. ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यासाठी सुयोग्य विश्लेषण, दुकानदारांचे विक्री कौशल्य, वर्तणूक कौशल्य व दूरदृष्टीची गरज त्यांनी विशद केली. डिझाईन प्रक्रियेच्या विविध टप्प्यांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. फ़ैशन क्षेत्रातील विविध प्रवाहांच्या परिणाम आपल्या उत्पादनावर सातत्याने होतो. हे प्रवाह उत्पादनाचे अस्तित्व व त्याच्याशी निगडीत अर्थकारण प्रभावित करत असतात, असेही मेहतायांनी स्पष्ट केले. स्वत:च्या सृजनशीलतेत सातत्य राखण्यासाठी अवलंबवाव्या लागणाऱ्या कार्यपध्दतीबाबतही मेहता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमुळे आयएनआयएफडी च्या विद्यार्थ्यांना  प्रदीर्घ अनुभवी मेहता यांच्या ज्ञानाचा लाभ मिळाला. विद्यार्थ्यांना  फ़ैशन क्षेत्रातील आगामी प्रवाहांविषयी माहिती मिळण्यासही मदत झाली.        

क्रेडाई पुणे मेट्रो’च्या ‘कुशल’चे दोन कामगार जाणार न्यूझीलंडला- जागतिक कौशल्य स्पर्धा ‘ओशनिया’मध्ये होणार सहभागी…

0

2

पुणे : ‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या कुशल उपक्रमांतर्गत प्रशिक्षित टिकम सिंग आणि परशुराम नायक हे दोन कामगार

न्यूझीलंड येथे होत असलेल्या ‘ओशनिया’ या जागतिक विभागीय कौशल्य स्पर्धेसाठी शुक्रवारी (ता. १० एप्रिल) रवाना

होत आहेत. या स्पर्धेतील भिंत-फरशीकाम आणि वीटकाम (वॉल अ‍ॅन्ड फ्लोअर टायलिंग व ब्रिक लेईंग) या प्रकारात

होणाऱ्या  स्पर्धेत ते सहभागी होतील. त्यानंतर ऑगस्ट २०१५ मध्ये ब्राझीलमध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेतही

ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘कुशल’चे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्रॉफ यांनी सांगितले, की विविध क्षेत्रांतील युवा कामगारांचे कौशल्य आजमावण्यासाठी ही स्पर्धा विविध देशांत दर

दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येते. विविध देशांतील कुशल कामगार त्यात सहभागी होतात.

नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे (एनएसडीसी) प्रथमच बांधकाम तंत्रज्ञानातील या प्रकारासाठीच्या स्पर्धेसाठी

हा संघ पाठवण्यात येत आहे. त्याच्या निवडीसाठी राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य स्पर्धा आयोजित करण्याच्या

जबाबादारीचा मान ‘कुशल क्रेडाई पुणे मेट्रो’ला मिळाला. महाराष्ट्र, बिहार, उत्तरप्रदेश आदी विविध राज्यांतील

कामगारांनी या स्पर्धेत भाग घेतला. यातील कठीण फे-यांमधून या दोन जणांची निवड करण्यात आली. या

दोघांसोबत ‘कुशल’च्या सुकाणू समितीचे सदस्य कविश थकवानी आणि मदन ठोंबरे न्यूझीलंडला जाणार आहेत.

‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी सांगितले, की हा संघ न्यूझीलंड आणि ब्राझिलला जात आहे, ही

‘क्रेडाई पुणे मेट्रो’साठी अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे. ‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या या ‘कुशल’ उपक्रमास नुकताच

२०१४-१५ चा ‘ई गव्हर्नन्स’साठीचा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘विकासासाठी माहिती-संवाद तंत्रज्ञानाचा

(आयसीटी) प्रभावी वापर करणारी अशासकीय संस्था (एनजीओ)’ म्हणून भारत सरकारने या पुरस्काराने ‘कुशल’ला

अहमदाबाद (गुजरात) येथील सोहळ्यात सन्मानित केले. क्वालालंपूर (मलेशिया) येथे २५ मार्च २०१५ रोजी

झालेल्या सोहळ्यात ‘अंतर्गत संवाद आणि विकासासाठी उत्कृष्ट प्रशिक्षण कार्यक्रम राबवणारी अशासकीय संस्था

(एनजीओ)’ या प्रकारांतर्गत ‘द गोल्डन ग्लोब टायगर्स समिट अ‍ॅवार्ड २०१५’ने सन्मानित होण्याचा मानही ‘कुशल’ने

मिळवला आहे.

‘कुशल’चे विधी, मनुष्यबळ व प्रशासकीय सचिव समीर बेलवलकर यांनी सांगितले, की ‘कुशल’तर्फे २०१२ पासून

बांधकाम क्षेत्रातील कामगारांना प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला जात आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या

अधिकृत माहितीनुसार ‘कुशल’ने आतापर्यंत २० हजारांहून अधिक कामगारांना प्रशिक्षित करून उल्लेखनीय यश

संपादन केले आहे.

विदर्भातील नाट्यकर्मींनी साकारलेली अतिमहत्त्वकांक्षी पालकांची भावस्पर्शी कथा ‘ते दोन दिवस’

0

आजचं युग हे शिक्षणाचं व विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. कॉम्पुटरच्या युगात जन्मलेली हल्लीची मुलं विलक्षण बुद्धीमत्तेची आहेतच,पण त्यांचे पालकही शिक्षणाच्या बाबतीत अधिक सजग झाले आहेत. म्हणूनच त्यांच्या उच्चशिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर करताना कोणतिही तडजोड करणं त्यांना पसंत नाही.

मुलांच्या करियरची अवास्तव काळजी करणाऱ्या अशाच एका कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी म्हणजे शिवसाई एण्टरटेन्मेंट निर्मित चित्रपट‘ते दोन दिवस’.विदर्भातील झाडीपट्टी नाट्यचळवळीतील अभिनेता-दिग्दर्शक देवेन्द्र दोडके यांनी दिग्दर्शक म्हणून तसंच नागपुरातील नाट्यकर्मींनीया चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे.  मुंबई-पुणे ही चित्रपट निर्मितीची केंद्रबिंदू मानली जात असताना नागपूरच्या रंगकर्मीनी संपूर्ण चित्रपट नागपूरात चित्रीत करून मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्याचा केलेला हा स्तुत्य प्रयत्न आहे.

‘ते दोन दिवस’ या नावातच एक उत्सुकता आणि गूढ दडलेलं आहे. दोन मुलांचे करियर सुखासुखी घडत असतानाच रत्नपारखी कुटुंबाशी नियती असा काही खेळ खेळते की या कुटुंबावर एक विचीत्र आभाळ कोसळंत. मुलीच्या शिक्षणासाठी, तिच्या भविष्यासाठी ओढावलेल्या संकटातून मार्ग काढताना नियतीच्या कात्रीत सापडलेले ते कुटुंब आयुष्यातील‘ते’दोन दिवस कसे घालवतात याचे भावस्पर्शीचित्रण म्हणजेच ‘ते दोन दिवस’हा चित्रपट.

मोहन जोशी, अलका कुबल, अरुण नलावडे, विलास उजवणे या दिग्गज कलाकारांसोबत रुपाली कोंडेवार-मोरे, देवेंद्र दोडके आणि बाल कलाकार चिन्मय देशकर आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. नवतारका प्रसिद्धी आयलवार व संजीत धुरी या नव्या चेहऱ्यांनी ते दोन दिवस या सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.या सिनेमाची निर्मिती रुपाली कोंडेवार-मोरे, संजय वाढई, देवेन्द्र बेलनकर आणि सोमेश्वर बालपांडे यांची असूनकथा देवेन्द्र बेलनकर यांची आहे. संवाद सोमेश्वर बालपांडे यांचे, तर पटकथा–गीत लेखन, दिग्दर्शन देवेंद्र दोडके यांचे आहे. संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांचे संगीत अत्यंत श्रवणीय असून ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, श्रुती चौधरी, अंकीत टकले यांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. कला दिग्दर्शन नाना मिसाळ, अनुप मेंढे यांचे तर नृत्यदिग्दर्शन दिलीप मेस्त्री यांचे आहे. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी छायालेखन केले असून संकलन पंकज सपकाळे यांचे आहे. वेशभूषाकार पूजा पिंपळकर असूनसदाशिव चव्हाण निर्मिती प्रमुख आहेत.एस टी व्ही – पिकल एण्टरटेनमेंट संयुक्तरीत्या सिनेमा वितरण करीत आहेत.

अती महत्त्वाकांक्षी पालकांची नियतीने घेतलेली परिक्षा आणि त्यांच्या भावभावनांचीहृदयस्पर्शी कथा प्रत्येक आईवडिलांनी मुलांसह आवर्जून पाहवी, असा हा सिनेमा 17 एप्रिल रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे.

… तर लावणीवर ही थिरकणार

0
पुणे- राजस्थान मध्ये साकारलेली ‘लीला ‘ भूमिकेतून बाहेर येवू देत नव्हती . रोल संपल्यावरही अंगात संचारलेल्या ‘लीला ‘ मधून बाहेर येण्यास वेळ लागत होत. असे सांगत जगभरात सर्वाधिक अशी भारत माझी आवडती भूमी ठरली आहे . मराठी आणि अन्य भाषिक चित्रपटांसाठी ऑफर येतात पण चांगला चित्रपट असेल तर मी मेहनत घेऊन मराठीत काम करेल मराठी भाषा शिकेल लावणी हि शिकेल मला आवडेल ते … असे प्रख्यात अभिनेत्री सनी लियोन हिने येथे सांगितले

१० एप्रिल ला प्रदर्शित होणाऱ्या ‘एक पहेली लीला’ या चित्रपटाच्या अनुषंगाने सनी आपले  पती डँनियल वेबरआणि सिनेमाचे दिग्दर्शक बॉबी खान यांच्यासमवेत पुण्यात आली होती . यावेळी स्वतंत्र रित्या आणि सामुहिक रित्या आलेल्या अशा सर्व माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला

ती म्हणाली , मला बिग बॉस  मुळे  भारतात येण्याची संधी मिळाली , बिग बॉस चा फोन आला आणि पती नेही तत्काळ भारतात येण्याची परवानगी दिली त्यानंतर मागे-पुढे पहिले नाही -जे मला येत नाही त्यावर हि कष्ट घेत ते ते करीत राहिले आणि बॉलीवूडची  वाट हि कधी धरली समजले नाही . भारतात खूप प्रेम मिळाले आणि मग माघारी जाण्याची इछ्या होईना . आता तर माझा पती हि बरोबरच इथे आहे जीवनात त्यंची साथ खूपच महत्वपूर्ण ठरली . शूट आऊट वडाळा  च्या सेटवर ‘लैला ‘  या गाण्याच्या  चित्रीकरणाच्या समयीच बॉबी खान ने लीला तूच कर असे सांगितले . लीला मध्ये प्रमुख पाहुण्याची भूमिका हि माझा पती डँनियलने केली . आता तो हि बॉलीवूड मध्ये काम करू लागला आहे

 लीला या चित्रपटासाठी हिंदी भाषा येणे आवश्यकच होते या साठी स्पेशल हिंदी क्लास च सुरु केला आणि हिंदी बोलण्यास प्रारंभ केला मराठी चित्रपट चांगला मिळाला तर मराठी हि शिकेल . लीला या चित्रपटात माझ्या वेगवेगळ्या भूमिका आहेत . रहस्य आहे यात . एक राजस्थानची लीला आणि एक लंडनची लीला मी साकारली आहे राजस्थान मध्ये भयानक उष्मा होता   आणि तीथे मेक अप करून कामाला सुरुवात केली कि १५ मिनिटात मेक अप खराब होत आणि पुन्हा पुन्हा मेक अप करावा लागे या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आणि भारतात मेहनतीचे फळ मिळतेच मिळते  असा माझा अनुभव आहे आणि विश्वास हि आहे असे ती म्हणाली

बॉबी खान म्हणाले. माझे शिक्षण पुण्यात झाले आहे . चित्रपटाची कथा पुनर्जन्मावर आधारित असली तरी रहस्य शेवटी उघड होते या चित्रपटासाठी जोधपुरच्या अलीकडे खिम्सार येथे लीला चे गावच आम्ही वसवले होते भूषणकुमार , किशनकुमार ,अहमदखान आणि सायरा खान असे ४ निर्माते या चित्रपटाला लाभले आहेत जय भानुशाली हा चित्रपटाचा नायक आहे तर जस अरोरा खलनायकाच्या भूमिकेत दिसेल . असे बॉबी खान यांनी सांगितले

लीला ला १०० लिटर दुधाने घातलेली अंघोळ -या चित्रपटाला ” सत्यम  शिवम सुंदरम’ चित्रपटाच्या पुढची कॉपी  म्हणणे , खास लंडन हून लीला साठी तयार करवून घेतलेला ड्रेस अशी या चित्रपटाची वैशिष्टे प्रदाशित होण्यापूर्वीच गाजत आहेत भारतीय वंशाची कॅनेडियन अभिनेत्री असलेल्या सनी लियोनचा जन्म 13 मे, 1981 रोजी लाकॅनडातील सर्निया शहरात झाला. सनीचा जन्म पंजाबी शीख कुटुंबात झाला. तिचे खरे नाव करनजीत कौर वोहरा असे आहे. सनीने वयाच्या 19 व्या वर्षी अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. अॅडल्ट स्टार बनण्यापूर्वी सनी एका जर्मन बेकरीत काम करत होती.सनी लियोनने 2011 मध्ये कलर्स चॅनलवरील कंट्रोव्हर्शियल रियालिटी शो ‘बिग बॉस’ सीजन 5 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री केली होती. बिग बॉसमुळेच सनीला बॉलीवूडमध्ये संधी मिळाली. दरम्यान, बिग बॉसच्या एका शोमध्ये डायरेक्टर महेश भट्ट पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी सनीला पाहिले आणि आपल्या सिनेमासाठी सिलेक्ट केले. परंतु, सनीच्या ‘जिस्म 2’ला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही. परंतु ‘रागिनी एमएमएस 2’ हा सिनेमा हिट ठरल्यामुळे बी टाऊनमध्ये सनीकडे सिनेमांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत.

यापूर्वी सनी ‘जिस्म 2’ (2012), ‘जॅकपॉट’ (2013) आणि ‘रागिनी एमएमएस 2’ मध्ये ‍झळकली होती. ‘रागिनी एमएमएस 2’ हा सिनेमा हिट ठरल्यामुळे बी टाऊनमध्ये सनीकडे सिनेमांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत. सनीचा ‘मस्तीजादे’, ‘टीना और लोलो’ आत्रर ‘वन नाइट स्टँड’ हे तीन सिनेमे रिलिज होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.