‘दिल दोस्ती दुनियादारीने’महिनाभरात आकर्षित केली तरुणाई
झी मराठीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली तरूणाईची मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारीने’ आज एक महिना पूर्ण केला. या यशस्वी माहपूर्तीच्या क्षणी निर्माते संजय जाधव यांनी सर्व दोस्तांसाठी सेटवर केक पाठवला आणि सुजय, आशू, अॅना, मीनल, रेश्मा आणि कैवल्य सोबत टीममधील सर्वांनीच हा खास क्षण धम्माल पद्धतीने साजरा केला. या मालिकेने एका विशिष्ट चौकटी च्या बाहेर मालिकांचे विश्व नेण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीच्या प्रेक्षक्वर्गाबाहेर असलेला तरुण प्र्क्षक हि निर्माण करण्याचा प्रय्त्न्केल्याचे समीक्षक सांगतात