मुंबई- राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटची दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 12 टोलनाके 1 जूनपासून बंद होतील अशी घोषणा केली. याचबरोबर राज्यभरातील 53 टोलनाक्यावरून खासगी वाहनांना 1 जून 2015 पासून टोलमधून सूट देण्याचीही घोषणा करण्यात आली. यात एसटी, रिक्षा, कार व जीप यासारख्या खासगी छोट्या चारचाकी गाड्यांना सूट मिळणार आहे. कोल्हापूर टोलनाक्याविषयी 31 मे पर्यंत सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.दरम्यान कोल्हापूर बरोबर खेडशिवापूर टोल नाकाही बंद झाला पाहिजे अशी मागणी आता राजकीय वर्तुळातून मागे पडली आहे .तत्कालीन मनसे आमदार स्वर्गीय रमेश वांजळे यांनी खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन केले होते . अनेक वेळा या नाक्यावर दादागिरीमुळे मारामाऱ्या झाल्या आहेत
जे 53 टोल नाके ठराविक खाजगी वाहनांना टोल मुक्त करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे त्यातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 26 टोल नाके आहेत, तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 27 टोलनाक्यांचा समावेश आहे.
जे 12 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्या टोलची मुदत काही दिवसांमध्ये संपत आहे. कंत्राटदारांना या 12 टोलनाक्याचे उर्वरित सुमारे 450ते 500 कोटी रूपये देऊन हे टोल राज्य सरकार ताब्यात घेणार आहे. यासाठी 500 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे
पीडब्ल्यूडीचे 9 टोलनाके असून, ते बंद करण्यासाठी सरकार 226.51 कोटी रूपये ठेकेदारांना देणार आहे. याबरोबरच चंद्रपूर जिल्ह्यातील एमएसआरडीसीचे तीन (ताडाली येथील) टोलनाके बंद करण्यासाठी सरकार 168 कोटी देणार आहे.
पीडब्ल्यूडीचे हे 9 टोलनाके कायमचे बंद होणार (कंसात सरकार कंत्राटदारांना देणारी रक्कम)
1) अलिबाग – पेण – खोपोली – वडवळ. (4.29 कोटी रूपये)
2) शिक्रापूर – (44.33 कोटी रूपये)
3) मोहोळ – (11.38 कोटी रूपये)
4) भंडारा – (23.94 कोटी रूपये)
5) कुसळंब – (42 कोटी रूपये)
6) अकोले – (17.68 कोटी रूपये)
7) ढकांबे – नांदुरी – सप्तश्रुंगी. (20.56 कोटी रूपये)
8) तापी पूल – (35.36 कोटी रूपये)
9) रावणटेकडी – (27 कोटी रूपये)
खासगी व छोट्या चारचाकी वाहनांना सूट मिळणाऱ्या पीडब्लूडीच्या टोलनाक्यांची यादी-
1.कशेळी टोलनाका – भिवंडी रस्त्यावर वडपा
2.मालोडी टोलनाका – चिंचोटी – कामण रस्ता
3.वाघोटे टोलनाका – मनोर-वाडा भिवंडी
4.कवाड टोलनाका- मनोर-वाडा भिवंडी
5.खारघर टोलनाका – सायन – पनवेल
6.शिक्रापूर टोलनाका- नाशिक-निफाड-औरंगाबाद
7.अंदरसूल टोलनाका- नाशिक -निफाड औरंगाबाद (शिलापूर आरओबी)
8.शेंडी – नगर – वडाळा- औरंगाबाद
9.खडकाफाटा – वडाळा-वाळूज लिंबे टोलनाका
10.देहरे – नगर-कोपरगाव टोलनाका
11.म्हसणे फाटा टोलनाका – पुणे-नगर
12.भाबडबारी टोलनाका – प्रकाशा-सटाणा
13.ताहारबाद टोलनाका – प्रकाशा-सटाणा
14.दुगाव टोलनाका- चांदवड-मनमाड
15.पानेवाडी टोलनाका- चांदवड-मनमाड
16.येसगाव टोलनाका – मालेगाव-कोपरगाव
17.लाडगाव टोलनाका – औरंगाबाद – जालना
18.नागेवाडी टोलनाका- औरंगाबाद जालना
19.बरबडा टोलनाका – नांदेड-नरसी
20.खानापूर टोलनाका – नरसी देगलूर
21.शिरूर तासबंद – मुखेड (लातूर) टोलनाका
22.पिंपरीफाटा टोलनाका – जालना-वाटूर
23.मलकापूर टोलनाका – बुलडाणा
24.आरंभा टोलनाका – जाम वरोरा
25.नंदूरी टोलनाका – चंद्रपूर बामणी
26.विसापूर – चंद्रपूर बामणी