पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आझम कॅम्पसच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवार, दि.14 एप्रिल 2015 रोजी अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले . एकूण पाच हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले . या मिरवणुकीचे उद्घाटन ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या हस्तेझाले तर मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतीफ मगदूम यांनी केले
दरबार ब्रॉस बॅण्डची दोन पथके, ढोल – ताशा, सनई चौघडे समवेत ही मिरवणूक सकाळी 8 .30 वा. आझम कॅम्पस येथून निघून पुना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, जुना मोटार स्टँड, पद्मजी पोलीस चौकी, भारत सिनेमा, ए.डी.कॅम्प चौक, मॉडर्न बेकरी चौक, संत नरपतगिरी चौक, वीज वितरण कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणूकीची सांगता झाली , अशी माहिती संस्थेचे सचिव लतिफ मगदुम यांनी दिली.
या अभिवादन मिरवणूकीमध्ये पाच हजार विद्यार्थी, संस्थेचे सदस्य तसेच सर्व शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागीझाले होते