Home Blog Page 3596

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

0

 

पुणे: राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. विधानभवन परिसरात झालेल्या कार्यक्रमात पुरवठा विभागाचे उपायुक्त प्रकाश कदम यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी पुनर्वसन विभागाचे उपायुक्त बी.एस. पऱ्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, तहसीलदार अर्चना यादव, मोहिनी चव्हाण यांनीही राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले.
यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालखी मार्गावरील अतिक्रमणे तत्काळ काढा- पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे, दि. 27 – पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान मार्गावर वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात. पालखी मार्गावरील अतिक्रमणे तत्काळ काढावीत, रस्ते दुरूस्ती करावी तसेच पालखी तळावर वारकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज झालेल्या समन्वय बैठकीत दिल्या.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे झालेल्या या बैठकीस सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले की, देहू आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावरील अतिक्रमणे तत्काळ हटवली जावीत. त्यासाठी महसूल, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्त मोहीम राबवावी. पालखी मार्गावरील खड्डे बुजवावे. जेथे आवश्यक आहे तेथे रस्त्यांची दुरूस्ती करावी. रस्त्यांच्या साईड पट्ट्यांचे काम देखील करून घ्यावे जेणेकरून वारकरी यांना चालताना त्रास होणार नाही.
पालखी विसावा आणि तळावर आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जाव्यात. त्यासाठी राज्य शासनाच्या तिन्ही जिल्हापरिषदांचे आरोग्य विभाग यांनी एकत्रित सुविधा पुरवाव्यात. सोलापूर जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्याजागी पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर करावी. त्यासाठी आवश्यकता भासल्यास विभागीय आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य विभागांशी संपर्क साधावा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. वारकऱ्यांना आरोग्य विषयक सुविधा पुरवितानाच बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जावी. त्यासाठी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. त्याचबरोबर पालखी मार्गावर रूग्णवाहिका उपलब्ध ठेवा असेही पालकमंत्री बापट यांनी सांगितले.
पालखी मार्गावर, विसाव्याच्या ठिकाणी आणि पालखीच्या तळावर स्वच्छता राखली जाईल याची काळजी संबंधित जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचना पालकमंत्री बापट यांनी दिल्या. त्याचबरोबर दिंडीना तिन्ही जिल्ह्यात वापरता येईल, असे एकच शिधापत्रिका वितरित करा. पालखी मार्गावरील सर्व हॉटेल आणि अन्न पदार्थांच्या विक्रीच्या स्टॉलची पाहणी अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे केली जावी, असे आदेशही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.
तिन्ही जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांनी पालखी मार्गावर चोख बंदोबस्त ठेवावा, वाहतुकीचा वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी आवश्यक तो ट्रॅफिक प्लॅन बनवावा, असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले. सासवड येथून निघणाऱ्या संत सोपानदेव महाराजांच्या पालखीसोबत पाण्याचा टँकर आणि पोलीस संरक्षण पुरवावे, असेही त्यांनी पोलीस विभागाला सांगितले.
पालखींच्या पुर्वतयारीबाबत प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेण्यात आली असून त्याबाबत सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले. तिन्ही जिल्ह्यात संबंधित अधिकाऱ्यांचे नाव आणि त्यांच्या संपर्क क्रमांकाची पुस्तिका तयार करण्यात येणार असून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडी प्रमुखांना वितरित केली जाईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव, तुकाराम मुंडे आणि अश्विन मुदगल यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती आणि अतिक्रमण हटावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.
पालखींच्या प्रस्थानानुसार जलसंपदा विभागाने इंद्रायणी नदीपात्रात आणि कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर अशा तिन्ही जिल्ह्यात संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्याचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश कपोले यांनी सांगितले.
बैठकीस पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार सर्वश्री दिलीप सोपल, लक्ष्मण जगताप, दत्तात्रय भरणे, ॲड. राहुल कुल, महेश लांडगे, जगदीश मुळीक, संजय ऊर्फ बाळा भेगडे त्याचबरोबर देहू आणि आळंदी संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, पुरवठा विभागाचे उपायुक्त प्रकाश कदम, अन्न औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त शशिकांत केकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी.वाय.पाटील आदी उपस्थित होते.

उत्तराखंडमध्ये पुन्हा पुर- चारधाम यात्रा बंद- १५ हजार भाविक अडकल्याची भीती

0

नवी दिल्ली-  बुधवारपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे त्यामुळे ऊ त्तराखंडमधील केदारनाथ यंदा पुन्हा जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली आहे.गंगेच्या उपनद्या कोपल्या आहेत. केदारानाथमध्ये सुमार 15 हजार यात्रेकरू अडकल्याचे वृत्त आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (एनडीआरएफ) जवानांनी नऊ हजार यात्रेकरुंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुढील 72 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर केदारनाथ यात्रा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आल्याची घोषणा येथील सरकारने केली आहे

उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे राज्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. यात्रेकरुन हिम्मत सोडू नये, प्रशासनातर्फे यात्रेकरूंना मदत केली जाणार आहे. दुसरीकडे, कैलास मानसरोवर यात्रेचा चौथा जत्था धारचूला बेस कॅम्पमध्ये रोखण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हेमकुंड साहिब आणि बद्रीनाथ भागातील 12 पेक्षाजास्त रस्ते आणि अनेक पूल वाहून गेले आहेत.
सोनप्रयाग जवळील पूल आणि रस्ता पुरात वाहून गेल्याने भाविकांना शुक्रवारी पुढे जाता आले नाही. त्याचप्रमाणे रुद्रप्रयाग जवळील एका पुलाची दुरुस्ती केली जात आहे. केबल कारच्या मदतीने अनेक यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जात आहे.एनडीआरएफच्या पथकाने 14 हेलिकॉप्टरच्या मदतीने शुक्रवारी 900 यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह केदारनाथ येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांकडून क्षणाक्षणाला माहिती जाणून घेत आहेत.

उत्तराखंडमधील जवळपास सर्वच नद्यांना महापूर आला आहे. मुसळधार पावसामुळे गढवाल आणि कुमाऊंच्या सर्व नद्या दुथडी भरून वाहात आहेत. गढवालमध्ये अलकनंदा, मंदाकिनी आणि भागीरथीच्या जलपातळीत वाढ झाली आहे. ऋषिकेश व हरिद्वारमध्ये गंगेची जलपातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. प्रशासनतर्फे हायअलर्ट जारी केला आहे.दुसरीकडे, कुमाऊंमध्ये शारदा, सरयू, गोमती आणि काली नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पिथौरागढ जिल्ह्यात काली नदीचे पाणी एका गावात शिरल्याने 40 कुटुंबांना बेघर व्हावे लागले आहे.

मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रेत मोठा अडथळा आला आला आहे. पिठोरागड जिल्ह्यातील दोभाट कालापानी मार्गावर दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे यात्रेकरूंची तिसरी चौथी तुकडी रोखून धरण्यात आली आहे. या तुकड्या अनुक्रमे गुंजी धारचुला येथे थांबवण्यात आल्या आहेत. तथापि, सर्व प्रवासी सुरक्षित आहे

गरोदरपणाच्या नवव्या महिन्यातील स्त्रियांसाठी 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकांची सेवा

0

“मदर अँड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम’ प्रकल्पास उत्तम प्रतिसाद

पुणे:

“गरोदरपणाच्या नवव्या महिन्यातील स्त्रियांसाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या “डायल 108′ सवेतर्फे विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवे द्वारे शासनाकडे नोंदणी केलेल्या गरोदर स्त्रियांना रूग्णवाहिका सेवेकडून दूरध्वनी केला आहे. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार असे वाटल्यानंतर रूग्णवाहिका बोलावण्यास उशीर केला जाऊ नये आणि लवकर मदत मिळून मातामृत्यू व अर्भक मृत्यू टाळता यावेत असा या सेवेचा उद्देश आहे.’ अशी माहिती “महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.

दररोज राज्यात 10 ते 15 बाळंतपणे रूग्णवाहिकेत होत असून डॉक्टर ही आपत्कालीन मदत सुरक्षितपणे हाताळत आहेत.  “26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी 108 या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. 108 डायलच्या वातानुकुलित विनामूल्य सेवा रूग्णवाहिकांमध्ये प्राण वाचविण्यासाठी व्हेंटीलेटरसहित सर्व अत्याधुनिक वैद्यकीय साधने आहेत.

“रोजच्या आकडेवारीनुवार 35 ते 40 टक्के म्हणजे साधारणत : 400 ते 450 गरोदर स्त्रियांना 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिका मदत करत आहेत. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार असे वाटल्यावर रूग्णवाहिकेला दूरध्वनी करण्यास उशीर करू नये, तसेच गुंतागुंत टाळण्यासाठी रूग्णालयात वेळोवेळी तपासणी गरजेची आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून यासाठीचा पथदर्शी प्रकल्प चालवला गेला. जूनपासून हा प्रकल्प पूर्णत: सुरू केला जात आहे. “मदर अँड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम’ या प्रकल्पाअंतर्गत गोळा होणारी गरोदर मातांची आकडेवारी यासाठी वापरली जाते.

राज्यात दररोज सुमारे 4 हजार बाळंतपणे होत असून त्यातील 40 ते 50 टक्के बाळंतपणे खासगी रूग्णालयात, तर 50 ते 60 टक्के शासकीय रूग्णालयात होणाऱ्या बाळंतपणापैकी 20 ते 25 टक्के गरोदर स्त्रिया 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची मदत घेऊन रूग्णालयात दाखल झालेल्या असतात’ अशी माहिती डॉ. प्रविण साधले यांनी दिली.

दिनांक 1 फेब्रुवारी 2014 पासून ते 17 जून 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डायल 108 रूग्णवाहिकेत झालेल्या प्रसुतीची जिल्हानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे अहमदनगर (161), अकोला (90), अमरावती (109), औरंगाबाद (214), बीड (189), भंडारा (32), बुलढाणा (121), चंद्रपूर (73), धुळे (75), गडचिरोली (72), गोंदीया (43), हिंगोली (87), जळगांव (90), जालना (93), कोल्हापूर (109), लातूर (162), मुंबई (45), नागपूर (97), नांदेड (154), नंदूरबार (84), नाशिक (212), उस्मानाबाद (124), परभणी (73), पुणे (255), रायगड (34), रत्नागिरी (29), सांगली (98), सातारा (135), सिंधुदूर्ग (16), सोलापूर (244), ठाणे (119), वर्धा (23), वाशिम (63), यवतमाळ (110), पालघर (67).

दिनदर्शिकेद्वारे “चिंटू’ देणार रंजकतेने मूल्यशिक्षण !

0

“सिनर्जी’ व “गंगोत्री’ या संस्थांचा चारुहास पंडित यांच्याबरोबरचा “चिंटू गँग’ दिनदर्शिका उपक्रम

पुणे :

गेली 24 वर्षे मराठी मनांवर अधिराज्य गाजविणारा “चिंटू’ आता “चिंटू गँग’ या मुलांसाठीच्या दिनदर्शिकेतून आपल्याला वर्षभर भेटणार आहे. या दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ शि. द. फडणीस (ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार), विनोद  तावडे (उच्च शिक्षणमंत्री व सांस्कृतिक मंत्री), एअर मार्शल भूषण गोखले (अध्यक्ष – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी) व  श्रीरंग गोडबोले (अभिनेता, लेखक, दिग्दर्शक) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सामाजिक भान जपणाऱ्या “सिनर्जी प्रॉपर्टीज’ व “गंगोत्री ग्रीनबिल्ड’ या संस्थांची निर्मिती असणाऱ्या “चिंटू गँग’ दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ रविवार, 28 जून 2015 रोजी सायंकाळी सहा वाजता काळे हॉल, गोखले इन्स्टिट्यूट प्रांगण, बीएमसीसी रस्ता, डेक्कन जिमखाना पुणे येथे होणार आहे. या दिनदर्शिकेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. अशी माहिती चारुहास पंडित, मकरंद केळकर, मंदार देवगावकर, गणेश जाधव, राजेंद्र आवटे व महेश पोहनेरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जुलै 2015 ते जून 2016 या शैक्षणिक वर्षाची ही दिनदर्शिका रंजकतेने मूल्यशिक्षण देणारी दिनदर्शिका आहे. यामध्ये “पर्यावरण’, “पाणी’, “ध्वनी प्रदूषण’, “वाहतूक’, “कचरा समस्या’ या विषयांवर संवाद साधला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर अधिराज्य गाजविणाऱ्या “चिंटू’ या व्यक्तिचित्राद्वारे मूल्याधारित शिक्षण पोहोचविण्याचे काम होणार आहे. “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’, “शिक्षणविवेक’ व “रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थ’ च्या मदतीने ही दिनदर्शिका 18,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार आहे. ही दिनदर्शिका 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे.

प्रकाशन समारंभप्रसंगी रोहन भडसावळे व ओजस नातू यांची तबला जुगलबंदी व स्वरुप-वर्धिनी संस्थेचे विद्यार्थी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. प्रकाशन समारंभाला उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना ही दिनदर्शिका मोफत देण्यात येणार आहे.

घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणाची जबाबदारी माध्यमांबरोबरच सर्व घटकांची : राष्ट्रपती मुखर्जी

0

 

पुणे – राज्य घटनेने सामान्य नागरिकांना दिलेल्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी माध्यमांबरोबरच लोकशाहीतील सर्व घटकांची आहे. सामान्य नागरिकांच्या या अधिकाराचे रक्षण करण्यात प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केले.

येथील त्रिदल संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुण्यभूषण पुरस्कार समारंभात राष्ट्रपती श्री. मुखर्जी बोलत होते. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित समारंभात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. आर.ए. माशेलकर, पुण्यभूषण फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, घटनेने प्रत्येक भारतीयाला दिलेल्या अधिकारांचा कोणालाही संकोच करता येणार नाही. या अधिकार आणि हक्कांचे संरक्षण करण्याची लोकशाही प्रक्रियेतील प्रत्येक घटकांची जबाबदारी आहेच. त्याचबरोबर प्रसार माध्यमांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. त्यांनी ती भूमिका अतिशय जबाबदारीने पार पाडावी. त्याचबरोबर लोकशाहीत संवादाची आवश्यकता भासते. प्रसारमाध्यमांनी सुसंवाद साधण्याची भूमिका पार पाडायला हवी.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, माझी बहुतांश कारकीर्द संसदेच्या आवारात गेली. अनेकवेळा माझ्यावर माध्यमांनी टीका केली. पण मी नेहमीच ती सकारात्मकरित्या घेतली. लोकशाहीत माध्यमांनी सुसंवाद साधण्यासाठी सेतूप्रमाणे काम करण्याची आवश्यकता आहे. माध्यमांनी अशा रीतीने काम केल्यास भारतीय लोकशाही आधिक सशक्त आणि मजबूत होईल. त्यामुळे लोकशाहीसाठी आवश्यक असलेल्या विविध यंत्रणा सक्षम होण्यास हातभार लागेल.पुणे स्वातंत्र्याच्या लढ्यात आघाडीवर असलेले शहर होते. या शहरातील अनेक सुपुत्रांनी स्वातंत्र्यांच्या लढ्यात अतुलनीय, असे योगदान दिले आहे. देशासाठी शहिद झालेले राजगुरू याच मातीतले होते. पुण्याने शिक्षण, उद्योग, समाजकारण, राजकारण, समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रात योगदान दिले आहे. असा गौरवपूर्ण उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाले की, ‘ प्रतापराव पवार यांचे व्यक्तिमत्व त्या प्रभावळीतील आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वातून पुण्याची परंपरा आधिक समर्थपणे पुढे नेली आहे. प्रतापराव पवार यांनी सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात अतिशय चांगले काम केले आहे. सकाळ माध्यमसमूह समाज सुधारणेच्या क्षेत्रात कशा पद्धतीने चांगले काम करून दाखवू शकतो हे प्रतापराव पवार यांनी आणि सकाळ समूहाने आपल्या कामातून दाखवून दिले आहे.’ माध्यमांनी त्यांच्या कामाचे अनुकरण करण्याची आवश्यकता असल्याचेही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले की, राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती आहे. शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून दिलेली शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शक आहे. त्यांनी आपल्या कार्यातून घालून दिलेली कामांची पद्धती आजही अनुकरणीय आहे.

प्रतापराव पवारांचे काम आदर्शवत : फडणवीस

उद्योग तसच माध्यम क्षेत्रात प्रतापराव पवारांचं कार्य उल्लेखनीय आहे. समाजातील नव्या पिढीला उत्तेजन देण्यासाठी कांही व्यक्तिमत्व समाजासमोर दिसावीत या दृष्टीने पुण्यभूषण सारखे पुरस्कार महत्वाचे ठरतात. असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ स्वातंत्र्यपूर्व काळात माध्यमांची भूमिका समाज परिवर्तनाची होती. समाजात स्वातंत्र्य प्राप्तीचे स्फल्लींग चेतवण्याची होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाज परिवर्तन व समाजात चांगल्या गोष्टी रुजविण्याकरिता माध्यमांनी भूमिका स्वीकारली प्रतापराव पवारांनी सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमांतून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून विविध उपक्रम राबवून आदर्शवत कार्य केले आहे. जलयुक्त शिवार या शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमास तनिष्क उपक्रमाच्या सहाय्याने सकाळ माध्यम समूहाने अत्यंत पथदर्शी अस कार्य केल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोलिवडे या ग्रामीण भागात जन्मलेल्या मातोश्री शारदाबाई पवार यांनी आम्हाला शिक्षण देण्याचा पराकाष्ठेने प्रयत्न केला. अस सांगून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार म्हणाले की, ‘मातोश्रींच्या सुयोग्य संस्कारामुळेच आम्हा सर्व भावंडाची सुयोग प्रगती होऊ शकली. जीवनातील विविध क्षेत्रात आम्ही यशस्वी होऊ शकलो. माझे बंधू प्रतापराव हे अभियांत्रिकी पदवीधर पण त्यांनी या क्षेत्रापेक्षा उद्योग, माध्यम व सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन कार्य करून आमच्या कुटुंबाचा अभिमान वृद्धीगंत केला आहे.सत्कारास उत्तर देताना प्रतापराव पवार म्हणाले की, ‘पुणे प्रगल्भ शहर आहे. सर्वांगीण विकासासाठी चांगल्या संस्थांची गरज असते. चांगल्या संस्था या विचारमंथनाद्वारे निर्माण होऊ शकतात. ते पुढे म्हणाले, ‘प्रश्नांचा केवळ उहापोह करण्यापेक्षा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करायला हवेत. शहरात जनसेवा सारखी चांगली संस्था कार्यरत आहे. या संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते प्रतापराव पवार यांना शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, एक लक्ष रुपये व स्मृती चिन्ह देऊन पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक मालतीबाई दास्ताने, बाबुराव जंगम, विठ्ठल महाजन, दुर्गातंत गायतोंडे, शंकरराव होडरकर यांचाही मानपत्र देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्रिदल संस्थेचे अध्यक्ष संतोष देसाई यांनी प्रास्ताविक केले तर पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आभार मानले.समारंभास खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, अंकुशराव काकडे, जब्बार पटेल, अभिजित पवार तसेच पवार कुटुंबिय व नागरिक उपस्थित होते.

“पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस’च्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

0

पुणे :
पुणे शहर “राष्ट्रवादी कॉंग्रेस’च्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पक्ष कार्यालयात ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी माजी उपमहापौर नंदू मोझे, शंकर शिंदे, राहूल मोझे, ऍड. घनश्याम खलाटे, अविनाश वेल्हाळ, आनंद रिठे, प्रशांत गांधी, मनाली भिलारे, बाळासाहेब धमाले, शिल्पा भोसले, बापू धूमाळ, योगेश वराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कधी खळखळून हसविणारा तर कधी अंतर्मुख करणारा – ‘किल्ला ‘

0
killa killa1
(समीक्षण )
कलाकार – अमृता सुभाष, अर्चित देवधर, पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी
निर्माता – दिग्दर्शक अविनाश अरूण
 दर्जा ४/५
कोकणाच्या निसर्ग सौंदर्यात प्रेक्षकांना घेवून जाणारा , बालपणीच्या शालेय जीवनात नेणारा  आणि कौटुंबिक समस्या अधोरेखीत करणारा असा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेता चित्रपट ‘किल्ला ‘कधी प्रेक्षकांना मनमुराद खळखळून हसवितो तर कधी अंतर्मुख व्हयला भाग पाडतो असाच आहे , लहान मुलांचे भावविश्व रेखाटणारे कितीतरी चित्रपट आपण पहिले असतील तरी एकदा तरी सिनेमागृहात जावून पाहून यावा असाच हा चित्रपट आहे
 ‘किल्ला’ ची कथा सुरू होते, चिनू आणि त्याच्या आईच्या नातेसंबंधाला बसलेल्या गाठींनी. आईच्या नोकरीतील बदलीमुळे पुण्यातून कोकणातल्या गुहागरला आलेला चिन्मय काळे आपल्याला दिसतो. पुण्यासाऱख्या शहरातून आपला मामा आणि
मामेभाऊ यांना सोडून कोकणात आल्यावर तो आईवर आणि एकंदरीत जीवनशैलीवर नाराजच असतो. पण नंतर हळूहळू चिन्मय नव्या वातवरणाशी जुळवून घेत असतानाच त्याच्या आयुष्यात त्याच्याच वर्गातील चार उनाड मित्र येतात.आणि शालेय जीवनातील धमाल मस्ती इथेच प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करते .  काही दिवसांतच एकमेकांचे चांगले मित्र बनलेल्या या पाचही जणांच्या आयुष्यातला किल्ला हा महत्वाचा दूवा आहे. किल्ल्यात कधी भांडणं, कधी मैत्री, कधी मस्ती असं सगळं घडतं. वयात आलेला चिन्मय आणि त्याचे मित्र यांचा कधी एकत्र तर कधी एकटा प्रवास आपल्याला दिसतो. हा प्रवास पाहताना आपण त्यात गुंतत जातो, कधी शिकतं जातो, तर कधी आंतरमुख होतो.आणिप्रेक्षकांनाही हि कथा मधून मधून अंतर्मुख व्हायला भाग पाडते
कोकणच्या निसर्गसौंदर्याचा नितांत सुंदर अनुभूती हा चित्रपट देतो. दिग्दर्शक अविनाश अरूण याचा हा दिग्दर्शनाचा पहिला अनुभव असला तरी, तो उत्तम सिनेमॅटोग्राफर आहे आणि ते या चित्रपटातील अप्रतिम छायाचित्रणाने दिसून येतं. अगदी पहिल्या सीनपासून ते शेवटच्या सिक्वेन्सपर्यंत आपण हा चित्रानुभव एकटक पाहत राहतो. साधी सरळ पण मनाला भिडणारी कित्येकांना थोड्या बहुत फरकाने का होईनात पण आपल्या जीवनातील वाटणारी कथा हे यातलं वैशिष्ट्य.
या चित्रपटात अर्चित देवधर, पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी या बालकलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.  लहान असूनही अभिनयात सर्वाधिक उंची दाखविणाऱ्या या मुलांचे कौतुक क करावे तेवढे थोडकेच . अतिशय सहज, संयत अभिनय या सर्व मुलांकडून आपल्याला पाहायला मिळतो.यातला बंड्या लई भारी …

अर्थात हा चित्रपट केवळ लहान मुलांसाठी नाही तर मोठ्या माणसांसाठी प्रामुख्याने महत्वाचा ठरतो

पालक आणि त्यांच्या मुलांचं नातंही यात उलगडतं जातं. ऑफिस मधले ताणतणाव आईकडे आणि शालेय जीवनातातील मुलाचे भावविश्व यांचा हलकासा पण लक्ष्यवेधी संघर्षाचा प्रसंगही कौटुंबिक अवस्थेच वास्तव चित्रण  करून जातो जो मनाला भिडल्याशिवाय राहत नाही फक्त चिनू आणि त्याची आईचं नाही, तर यत्त सर्वात भाव खावून जातो तो शाळेचा  वर्ग आणि त्यातील मस्तीखोर मुले चित्रपट रंगवितात  अगदी कोणताही फारसे किंवा डॉयलॉग नसलेल्या मुलींचे हि काम अप्रतिम झाले आहे .

जगुनी घे जरा .. पाहुनी ये हा सिनेमा , हो बरा …

0
 (समीक्षण )
(रसिकांसाठी येथे या सिनेमातील व्हिडीओ गाणे देत आहोत … पहा .. ऐका)
कलाकार -स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, मुरली शर्मा, भारती आचरेकर, राजेश्वरी सचदेव, प्रशांत दामले, ऊर्मिला कानेटकर-कोठारे, पुष्कर श्रोत्री, विवेक लागू, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर आणि जयवंत वाडकर
निर्माता – दिग्दर्शक उमेश घाडगे
 दर्जा – ४/५

जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा,
विसरु कालच्या उद्याच्या चिंता ही जरा..


या गाण्याच्या ओळीतच ‘वेलकम जिंदगी ‘ या सिनेमाचा सारा  अर्थ समावला आहे हा करमणुकीसाठी नाही ,पण प्रत्येकाने किमान एकदा तरी सिनेमागृहात जावून बघण्यासाठीचा सिनेमा मात्र निश्चित आहे . राजेश खन्नाच्या ‘आनंद ‘ ची अनुभूती यातील स्वप्नील जोशीने साकारलेला ‘आनंद ‘ देतो असे म्हणणे कोणाला फारच अतिशयोक्ती वाटली तरी राजेश खांना च्या ‘आनंद’ ची आठवण मात्र तो हमखास च देतोच देतो . 
नैराश्य  दूर करण्याचा प्रयत्न करणारा , आगळी वेगळी कथा आणि संकल्पना मांडणारा गणेश मतकरी लिखीत आणि उमेश घाडगे दिग्दर्शित ‘वेलकम जिंदगी’ काल  रिलीज झालाय.व्यसनमुक्ती केंद्रांप्रमाणे अगदी  आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशा निर्णयाप्रत पोहोचलेल्या , नैराश्य आलेल्या व्यक्तींसाठी आगळे वेगळे प्रबोधन केंद्र उघडून त्यांना जगण्याची उभारी देण्यासाठी अफलातून संकल्पना या चित्रपटातून मांडली आहे. त्यामुळे मध्यंतरापर्यंत थोडा प्रबोधनकारी सिनेमा वाटला तरी मध्यंतरानंतर मात्र त्याने वेग घेतला आहे . या सिनेमात स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर आहेत या दोघांनीही अफलातून काम केले आहे . पण महेश मांजरेकर, मुरली शर्मा, भारती आचरेकर, राजेश्वरी सचदेव, प्रशांत दामले, ऊर्मिला कानेटकर-कोठारे, पुष्कर श्रोत्री, विवेक लागू, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर अशी लोकप्रिय कलाकारांची भलीमोठी फौज आहे. आणि फावल्या वेळेत आत्म्हत्येपासून परावृत्त  करणारी संस्था ते कशी चालवीत असतात हे यात पाहायला मिळते

 मीरा अत्यंत स्वच्छंदी, मनमिळावू मुलगी. तिची आई तिला आधीच सोडून गेली आहे. वडिलांनी दुसरं लग्न केलंय. त्या दोघांचं मीरावर प्रेम आहे. परंतु, मीरा वेगळी रहाते. मीराही आपल्या एका जुन्या मित्राशी ती लग्नगाठ बांधणार आहे. लग्न अवघ्या दहा दिवसांवर आलंय. परंतु, काही कारणाने तिचा प्रियकर या लग्नाला नकार देतो. मीरा आतून हालते. एकाकी होते आणि आत्महत्येचा निर्णय घेते. झोपेच्या गोळ्या विकत आणून ती त्या घेणार तोच घरात आनंद अवतरतो.
आनंद प्रभू हा आत्महत्या करण्याची इच्छा असलेल्यांना आपल्या हॅपी एडिंग सोसायटी या संस्थेद्वारे  आत्महत्येचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देतो. पण तो स्वत: मात्र आयुष्य भरभरून जगण्यामध्ये विश्वास ठेवणारा आहे आणि असा हा आनंद प्रभू आयुष्यातल्या सगळ्या वाटा बंद झाल्याने वैफल्याने ग्रस्त असलेल्या मीराच्या आयुष्यात पोहोचतो आणि तिचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन च बदलवून टाकतो. वरकरणी आत्महत्या करण्याचे प्रशिक्षण देण्याविषयी चित्रपट वाटतं असला, तरी यातल्या विनोदी बाजाने जीवनाविषयी ओढ  निर्माण करण्याचा या चित्रपटाचा उद्देश आहे.अर्थात चित्रपटाचे नाव ‘वेलकम जिंदगी’ आहे यातच सारे काही आले युवपिधीच नाही तर वयस्कानाही  आवडेल असा हा सिनेमा आहे फक्त पूर्ण सिनेमा पाहूनच यावर प्रतिक्रिया देणे कधी हि छान…।

पतंगराव कदम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मान …

0

पुणे -‘उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये संख्यात्मक वाढ दिसत असली, तरी गुणात्मक वाढीबाबत मोठी झेप घेणे गरजेचे आहे,’ असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्यासाठी कौशल्याधारित शिक्षणाची बाब गांभीर्याने घेऊन २०३० पर्यंत ५० कोटी जनतेपर्यंत ते पोहोचविण्याचे अभियान हाती घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारती विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राष्ट्रपती बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पतंगराव कदम यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या संग्रहालयाचेही राष्ट्रपतींच्या हस्ते उद घाटन करण्यात आले. शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीत विकसित देशांची बरोबरी करण्यासाठी भारतातील खासगी शैक्षणिक संस्था फार महत्त्वाची भूमिक पार पाडू शकतात. शैक्षणिक संस्थांच्या संख्यात्मक वाढीसोबतच या संस्थांनी गुणवत्तेचाही ध्यास घेणे गरजेचे असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. नावीन्याचा ध्यास घेतलेली समाजाभिमुख संशोधने आणि सामाजिक बदलांना चालना देणारी शिक्षणपद्धती भविष्यात देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पवार, शिंदे, चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. विश्वजित कदम यांनी प्रास्ताविक केले.

कलमाडींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

0

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी आणि त्यांच्या पत्नी मीरा कलमाडी यांनी काल  सायंकाळी राजभवन येथे जावून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिछ्या  भेट घेतली .

रोमांचकारी ‘शटर’ उघडणार ३ जुलै रोजी – व्ही. के. प्रकाश यांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

0

1 2 3

मल्याळम मधील शटर या सुपरहिट सिनेमाचा रिमेक त्याच नावाने मराठीत होत आहे. उत्कंठा वाढवणारा शटर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शितहोणाऱ्या या सिनेमाबाबतची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. सिनेमात रहस्य, रोमांच यासारख्या मनोरंजनाचा तडका लावणाऱ्या झकास गोष्टी असल्यामुळे सगळ्यांच्याच नजरा या सिनेमाकडे लागल्या आहेत. बहुचर्चित असा शटर सिनेमा ३ जुलै रोजी सर्वत्र महाराष्ट्भर प्रदर्शित होत आहे.  मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक जॉन मेथ्यू यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे. त्यांची हिच कथा प्रेक्षकाच्या पारंमपारिक विचारांचे शटर उघडेल आणि त्यांना एका नव्या दृष्टीकोनातून समाजात घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची दृष्टी देईल. एका शटरमध्ये अडकलेल्या अनोळखी स्त्री पुरुषाची कहाणी सिनेमाचा गाभा आहे.  सिलिकॉन मिडिया ट्रेंड्स अॅडफिल्म मेकर्स प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभिनेता सचिन खेडेकर आणि  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एकत्र पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या माध्यमातून घरा घरात पोहोचलेला कैवल्य म्हणजेच अमेय वाघ भूमिका सिनेमात विशेष मायने ठेवतो. मराठी सिनेसृष्टीत निर्माण होणारे आशयघन आणि उत्तमरित्या हाताळले जाणारे सिनेमे त्यांची प्रादेशिकता ओलांडत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शटर हा सिनेमा. या सिनेमाचे दिग्दर्शक व्ही.के.प्रकाश हे स्वतःराष्ट्रीय पुरस्कार विजेते असून पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी आजपर्यंत २० सिनेमे केलेआहेत. शटरच्या निमित्ताने त्यांचे हे मराठीत पहिले पदार्पणआहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता प्रकाश बरे यांनी सिनेमात विशेष भूमिका बजावलीआहे. मंगेश कांगणे आणि अश्विनी शेंडे यांनी ;सिनेमाची हृदयस्पर्शी गीते लिहिली असून पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. रोहित राऊतने आपल्या गस्ट या बॅंडसोबत सिनेमात परफॉर्मन्स दिला आहे. दिग्गज अॅड फिल्म मेकर, अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक व्ही . के.  प्रकाश (व्हीकेपी) मल्याळम, कन्नड तेलुगु, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवल्यानंतर शटर या  चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने दक्षिणेतले अनेक तंत्रज्ञही मराठीत पहिल्यांदाच काम करीत आहेत. कोणत्याही सेट शिवाय एकाच वेळी फक्त दोन कॅमेरे वापरून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. शटर हा सिनेमा एका मध्यमवयीन व्यक्तीची कथा आहे.  चार व्यक्तींबरोबर २४ तासांत घडलेल्या अनपेक्षित घटनांचे चित्रिकरण सिनेमात करण्यात आले आहे. अमेय वाघ, प्रकाश बरे, राधिका हर्षे, कमलेश सावंत,जयवंत वाडकर, कौमुदी वाळोकर हे कलाकारही आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहेत. संजीव एमपी आणि प्रकाश बरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून पटकथा आणि  संवाद मनिषा कोरडे यांनी लिहिले आहेत. के. के. मनोज यांनी सिनेमाच्या छायाचित्रीकरण केले असून भक्ती मायाळू यांनी संकलन केले आहे. रहस्य, रोमांच, सामाजिक उपहास अशी बांधणी असलेला शटर हा सिनेमा ३ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.    

ऑनलाईन बिनलाईन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

0

सोशल मिडिया साईटवर अपडेट असण ही सध्याच्या युथची अगदी महत्वाची गरज झाली आहे. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात घडणाऱ्या लहान सहान गोष्टींचीही अपडेट आजची तरुणाई सोशल साईटवर देत असते. आजच्या तरुणाईचा सोशल साईटवरचा सगळ्यात आवडता शब्द म्हणजे ऑनलाईन. सिनेमात नेहमीच समाजाचं प्रतिबिंब दिसत अस म्हटलं जात  या सोशल मिडियावर आधारित असलेला ऑनलाईन बिनलाईन सिनेमा ३ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सध्या मराठी सिनेसृष्टीत चाकोरी बाहेरचे विषय हाताळले जात आहेत. सिनेमाच्या नावावरूनच सिनेमाचा विषय वेगळा असणार आहे

मराठी सिनेसृष्टीतले जय- वीरू म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे हे या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या  दोघांसोबतच
ऋतुजा शिंदे हा नवा चेहरा मराठीसृष्टीत पदार्पण करतोय. ऋतुजा शिंदे यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. आजच्या तरुण पिढीच्या इंटरनेट व्यसनावर हा सिनेमा असून केदार गायकवाड यांनी सिनेमाच दिग्दर्शन केलं आहे, सिनेमाची निर्मिती श्रेयस जाधव आणि नीता जाधव यांनी केली आहे.

ऋषिकेश रानडे, जसराज जोशी, सौरभ या तिघांनी मिळून सिनेमा संगीत दिल आहे. २००१ साली हिट झालेलं ‘ओहो काय झालं’ हे पॉप सॉंगही आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे गाणं हरिहरन यांनी  गायल असून संगीत लेस्ली लुईस यांनी दिल आहे. “ऑनलाईन बिनलाईन” सिनेमाचा एक वेगळाच विषय आणि हटके टायटल असलेल्या या सिनेमाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या सॅनिटेशन प्रोग्राम व कम्युनिटी टॉयलेट अंमलबजावणीबाबत पंतप्रधानांकडून प्रशंसा

0

2 3

नवी दिल्ली – पुणे महानगरपालिकेच्या सॅनिटेशन प्रोग्राम व कम्युनिटी टॉयलेट अंमलबजावणीबाबत
पंतप्रधानांकडून प्रशंसा करण्यात आली आहे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी कार्यक्रम प्रसंगी भारत सरकारच्या वतीने तीन योजनेचा आरंभ आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात आला.
देशातील शहरी भागाच्या विकासासाठी आखलेल्या तीन महत्वाच्या योजनांना आजपासून प्रारंभ झाला. यामध्ये स्मार्ट सिटी योजना, पाचशे गावांच्या विकासासाठी अमृत योजना आणि गृहनिर्माणाची योजना अशा या तीन योजना आहेत.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शंभर शहरांचा सर्वांगीण विकास केला जाणार असून अमृत योजनेतून पाचशे शहरांचा पायाभूत विकास करण्याची योजना आहे.
कार्यक्रम प्रसंगी अयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या विविध स्टॉल्सना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटी दिल्या. पुणे महापालिकेच्या स्टॉल्सला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्यानंतर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पुणे शहरातील विविध विकास कामांची माहितीसह पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या व पुढील कालावधीकरिता यशस्वी नियोजन करण्यात आलेल्या पुणे शहरातील सॅनिटेशन प्रोग्राम व कम्युनिटी टॉयलेट संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देताना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले की, पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या सॅनिटेशन प्रोग्राम व कम्युनिटी टॉयलेट- सार्वजनिक शौचालया संदर्भात प्रशासनासह स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहभागाने तसेच सीएसआर(कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सबिलीटी) अंतर्गत विविध कंपन्या, संस्था व नागरी सहभाग पुणे शहरात अतिशय उल्लेखनियरित्या कार्यरत असल्याचे सांगितले
स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने १९९९ पासून ते आजपर्यंत ८५८ ब्लॉक विकसित व पुर्ननिर्मित, पुनरुज्जीवित व वापरायोग्य करण्यात आले आहेत. यामध्ये सुमारे १५००० पेक्षा अधिक सीटस आहेत. तर १२०० पेक्षा अधिक सीटस सार्वजनिक शौंचालयाचे ठिकाणच्या वापरायोग्य केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे महिलांकरिता स्वतंत्र शौचालयाच्या निर्मितीकरिता मनपाने यशस्वी प्रयत्न केलेले आहेत.
यामध्ये स्त्रिया व पुरुषांकरिता (पब्लिक युरिनल्स) १५०० सीटस यांचा सहभाग आहे. महिलांकरिता टॉयलेट १४९ ब्लॉक असून ४४९ सीटस आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणी प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेच्या या चांगल्या यशस्वी सेवेची दखल घेऊन “पुणे मॉडेल” सर्वत्र राबविले जावे असे मत नोंदविले आहे. तसेच सीएसआर अंतर्गत सुमारे १०० मनपा शाळांमधून शौचालयांच्या संदर्भात कामे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भातील मनपाने तयार केलेल्या माहितीचे एकत्रित पोस्टर्सबाबत भारत सरकारने स्वत: दखल घेऊन सदरचे पोस्टर्स छापून भारतातील सर्व शहरांना पाठविले आहे. ही पुणे मनपाच्या दृष्टीने आत्यंतिक कौतुकाची बाब असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले.
या संपूर्ण माहिती व यशस्वितेबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे महापालिकेच्या या योजना व यशस्वितेबाबत प्रशांसोद्गार काढले.
याप्रसंगी भारतामधील विविध महापालिकांचे महापौर, आयुक्त तसेच राज्यस्तरावील या विषयाशी निगडीत अधिकारी यांचा सहभाग होता.

‘हायवे’चा फर्स्ट लुक, ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

0

1 2 3

– ‘‘मुंबईची ‘धाव’आणि पुण्याची ‘चाल’यांना जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस ‘हायवे. मुंबई – पुण्याहून वेगवेगळ्या वाहनातून वेगवेगळी माणसे निघतात आणि हायवेवरील वाहने पळू लागतात… ’या एवढ्याशा ‘वनलाईन’ला घेऊन सध्याची ‘स्टार’लेखक – दिग्दर्शक जोडगोळी गिरीश-उमेश कुलकर्णी यांनी एक विचार करायला लावणारी, तरीही मनोरंजन करणारी चित्रकथा रंगवली आहे. उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि विनय गानू यांच्या “आरभाट कलाकृती” आणि “खरपूस फिल्म्स” कृत ‘हायवे’हा नवा मराठी चित्रपट येत्या २४ जुलैला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

‘हायवे’चा फर्स्ट लुक, ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा एका अनोख्या पद्धतीने संपन्न झाला. या सोहळ्याला जणू अख्खं तारांगणचं लोटलं होतं. चित्रपटात असलेली भलीमोठ्ठी स्टारकास्ट तर उपस्थित होतीच पण पाहुण्या कलावंतांचीही विशेष हजेरी लाभल्याने हा सोहळा विशेष ठरला. चित्रपटाचा फर्स्ट लुक जेष्ठ नाटककार अभिनेते पद्मश्री सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला. हायवेच्या निमित्ताने बॉलीवूड मधील लोकप्रिय संगीतकार अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताचे प्रकाशन सुपरस्टार संगीतकार अजय – अतुल यांच्या हस्ते करण्यात आले तर ट्रेलर लॉंचसाठी जेष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, एव्हरेस्टचे संजय छाब्रिया, झी मराठीचे दीपक राजाध्यक्ष यांना आमंत्रित केले होते.

‘माणूस प्रवासाने घडतो आणि माणूस प्रवासातच कळतो… मग तो प्रवास जीवनाचा असो किंवा ‘हायवे’वरचा. या भन्नाट कल्पनेभोवती गिरीश – उमेश कुलकर्णी यांनी ही चित्रकथा रंगवली आहे. ‘चेहरे’टिपण्यात माहीर असलेल्या या लेखक – दिग्दर्शक जोडगोळीने माणसांचा ‘हायवे’वरचा प्रवास मांडताना रसिकांना एक वेगळा, नवा आणि तजेलदार अनुभव दिला आहे. वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरामधली माणसं आपापल्या भावभावनांच, प्रश्नाचं वेदनांच, बॅगेज घेऊन प्रवासाला निघतात आणि मग…? हा त्यांच्या प्रवासातील ‘पॉझ’त्या प्रत्येक प्रवाशाचा ‘चेहरा’उघड करतो. एकूणच हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाचा, नव्या जमान्याचा ‘एक सेल्फी आरपार’ असेच म्हणता येईल.

सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’पुरस्कार विजेत्या ‘देऊळ’नंतर गिरीश – उमेश कुलकर्णी या दोघांचा हा आणखी एक नवा आशयघन आणि वेगळ्या धाटणीचा भन्नाट चित्रपट आहे. आतापर्यंत सलग चार चित्रपटांसाठी या दोघांनी लेखक-दिग्दर्शक म्हणून काम केले असून त्यांच्या ‘आरभाट कलाकृती’ची ही सहावी निर्मिती आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांच्या नावावर चित्रपट चालतो अशा कलाकारांमध्ये लेखक – दिग्दर्शक म्हणून गिरीश-उमेश यांचे नाव आघाडीवर असून दर्जेदार आणि वेगळ्या वाटेवरचे चित्रपट निर्माण करून ते रसिकांपर्यंत पोचविण्यात ही जोडी विशेष प्रवीण आहे. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे. तर पोस्टकार्ड आणि अनुमती या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटांचे निर्माते विनय गानू यांची ‘हायवे’ च्या निर्मितीसाठी विशेष साथ लाभली आहे.

‘हायवे’मध्ये प्रमुख भूमिकेत गिरीश कुलकर्णी, रेणुका शहाणे, सुनील बर्वे, मुक्ता बर्वे, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, सतीश आळेकर, किशोर कदम, छाया कदम, नागराज मंजुळे, नंदकिशोर चौघुले, विद्याधर जोशी, मयुर खांडगे, श्रीकांत यादव, उमेश जगताप, शुभम, शकुंतला नगरकर, पूर्णानंद वांदेकर, निपुण धर्माधिकारी, देवेंद्र गायकवाड, सविता प्रभुणे, मकरंद सप्तर्षी, धीरेश जोशी, ओम भूतकर, पूर्वा पवार, शिवकांता औरंगाबादकर, शशांक शेंडे, शिल्पा अनासपुरे, जयंत गाडेकर, आदित्य कुलकर्णी, उर्मिला निंबाळकर, भूषण मंजुळे, शंकर डोंगरे, सहर्ष शुक्ला यांच्या सोबतच प्रथम पदार्पण करणारे समीर भाटे आणि वृषाली कुलकर्णी हे आपली वेगळी छाप सोडून जातात.

उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि विनय गानू यांच्या आरभाट कलाकृती आणि खरपूस फिल्मस् कृत ‘हायवे’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुधाकर रेड्डी यांनी केले आहे. वैभव जोशी यांच्या गीताला संगीतकार अमित त्रिवेदी यांचे संगीत आहे. पार्श्वसंगीताचा भार मंगेश धाकडे यांनी उचलला असून ध्वनी संयोजन साऊंड डिझायनर अंथोनी रुबेन यांचे आहे. ‘हायवे’चे संकलन परेश कामदार यांनी केले असून कॉस्च्युम डिझायनर म्हणून सीमा आरोळकर यांनी काम पाहिले आहे. कला दिग्दर्शन प्रशांत बिडकर यांचे असून वेशभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे तर कार्यकारी निर्माते नितीन प्रकाश वैद्य आहेत. येत्या २४ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.