Home Blog Page 359

राजकीय सुडबुद्धीने सोनिया, राहुल आणि गांधी घराण्यावर ED ची कारवाई,पण काँग्रेस डगमगणार नाही

दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज:हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसच्या सद्भावना शांती मार्चला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

नागपूर, दि. १६ एप्रिल २०२५
भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व खासदार राहुलजी गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. याआधीही ईडीने सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

नागपूर शहरात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढला. आजच्या पदयात्रेत दिक्षाभूमी, ताजुद्दीन बाबा व टेकडी गणेश मंदिरात दर्शन घेऊन सद्भावनेचे साकडे घालण्यात आले. या मोर्चात प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, अनिस अहमद, खासदार प्रतिभा धानोरकर, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आ विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलाश कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, जाती धर्माच्या नावावर सुरु असलेला भेदभाव थाबंवण्यासाठी काँग्रेसने सद्भावना यात्रा काढली असून अशा सद्भावना यात्रा राज्यभर काढल्या पाहिजेत. भाजपा जाती धर्माच्या नावाखाली भेदभाव करत आहे. नागपुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असताना या शहरात हिंसाचार झाला त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नागपूरचे आहेत तरीही त्यांना या घटनेची माहिती कशी मिळाली नाही? गुप्तचर विभागाने त्यांना माहिती दिली होती का? याचे उत्तर द्यावे लागेल आणि दंगलीची चाहुलच लागली नसेल तर हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे. महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री यांनी या दंगलीची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन दोषींना शिक्षा केली पाहिजे असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते पण पोलीस फोन उचलत नव्हते असे भाजपा आमदार सांगत होते, यातून दंगलीचे प्रायोजक कोण होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य टिकण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत व या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटला जात आहे. उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत. आपल्याला एकजुटतेने सद्भावनेच्या मार्गाने जावे लागणार आहे. संविधानाचा, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे आहे. सत्तेसाठी काही लोक भावाभावात, जातीपातीत भांडणे लावत आहेत. सत्तेसाठी अशांतता पसरवणाऱ्यांनी जाती धर्मात, भावा भावात भांडणे लावू नये, असे आवाहन सपकाळ यांनी केले.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पुरोगामी विचाराने चालवणाऱ्या महाराष्ट्रात आग लावणारे लोक सत्तेत आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढत राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम केले. संविधानाची शपथ घेतलेले मंत्री जाती धर्माच्या नावाने वाद निर्माण करत आहेत. एक मंत्री मशिदीत घुसून मारण्याची धमकी देतो पण मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत. नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून घर पाडले त्याप्रकरणी अधिकाऱ्यांना आता माफी मागावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारचा नपुंसक सरकार असा उल्लेख केला हे लाजीरवाणे आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

माजी मंत्री नितीन राऊत, सुनिल केदार, माणिकराव ठाकरे, अनिस अहमद यांनीही यावेळी भाषणे केली.

महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती बीआर गवई देशाचे 52 वे सरन्यायाधीश,14 मे पासून सर्वोच्च न्यायालयाचे काम हाती घेतील

नवी दिल्ली- भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या नावाची अधिकृतपणे शिफारस केली आहे. त्यांचे नाव केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. यासह, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.

पारंपारिकपणे, विद्यमान सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकारीच्या नावाची शिफारस तेव्हाच करतात जेव्हा त्यांना कायदा मंत्रालयाने तसे करण्याची विनंती केली असते. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे.

सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर ज्येष्ठता यादीत न्यायमूर्ती गवई यांचे नाव आहे. म्हणूनच न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यांचे नाव पुढे केले आहे. तथापि, त्यांचा कार्यकाळ फक्त ७ महिन्यांचा असेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवरील त्यांच्या प्रोफाइलनुसार, न्यायमूर्ती गवई यांना २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. त्यांची निवृत्ती तारीख २३ नोव्हेंबर २०२५ आहे.

न्यायमूर्ती गवई यांनी १९८५ मध्ये त्यांच्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केली

न्यायमूर्ती गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांनी १९८५ मध्ये त्यांच्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केली. १९८७ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली. यापूर्वी त्यांनी माजी अॅडव्होकेट जनरल आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिवंगत राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले.

१९८७ ते १९९० पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती. १४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती. १२ नोव्हेंबर २००५ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले.
दुसरे दलित सरन्यायाधीश, नोटाबंदीचे समर्थन केले

न्यायमूर्ती गवई हे देशातील दुसरे दलित सरन्यायाधीश असतील. त्यांच्या आधी न्यायमूर्ती केजी बालकृष्णन हे भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश झाले होते. २००७ मध्ये न्यायमूर्ती बालकृष्णन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती गवई यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामध्ये मोदी सरकारच्या २०१६ च्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करणे आणि निवडणूक रोखे योजना असंवैधानिक घोषित करणे समाविष्ट आहे.

एक वर्ष गैरहजर :पोलीस निरीक्षक निलंबित; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

पुणे-लोकसभा निवडणुकीपासून विविध सणउत्सवाच्या काळात महत्वाचे बंदोबस्त असतानाही ७१ दिवस रुग्ण रजेवर गेलेल्या व त्यानंतर आजतागायत विनापरवाना गैरहजर राहिलेल्या पोलीस निरीक्षकास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे.

पोलीस निरीक्षक अजित पोपटराव गावितअसे निलंबित केलेल्याचे नाव आहे. अजित गावित यांची पर्वती पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत झोपडपट्टीचे प्रमाण जास्त असून अतिसंवेदनशील भाग आहे. धुलीवंदन, रंगपंचमी, शिवजयंती, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, लोकसभा निवडणुक २०२४ अशा अत्यंत महत्वाचे बंदोबस्तास हजर राहणे अत्यंत आवश्यक असताना अजित गावित हे रुग्णता रजेवर गेलेले होते. १८ मार्च ते २७ मे २०२४ पर्यंत असे एकूण ७१ दिवस रजेवर गेले होते. त्यानंतर २८ मे २०२४ रोजी एक दिवस ते कर्तव्यावर हजर झाले. त्यानंतर २९ मे २०२४ पासून आजतागायत विनापरवाना गैरहजर राहिलेले आहेत. त्यामुळे अजित गावित यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे.

लाचखोर फौजदार अँटीकरप्शनच्या जाळ्यात:जप्त केलेली दुचाकी सोडण्यासाठी घेत होता ३० हजारांची लाच

पुणे-पिंपरी पाेलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील वाहन साेडण्यासाठी पाेलिस उपनिरीक्षकांनी ४० हजार रुपयांची मागणी करुन तडजाेडीअंती ३० हजार रुपये घेऊन वाहन साेडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) सापळा रचून पाेलिस उपनिरीक्षक निलेश रमेश बाेकेफाेडे (वय- ३८) यांना रंगेहाथ अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी २४ वर्षीय तरुणाने पिंपरी पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, यासंबंधी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासबंधीच्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांच्याविराेधात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदाराचे जप्त करण्यात आलेले वाहन साेडविण्यासाठी पाेलिस उपनिरीक्षक निलेश बाेकेफाेडे यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली.

त्यानुसार, पाेलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांनी तक्रारीची पडताळणी केली असता, निलेश बाेकेफाेडे यांनी तक्रारदार यांना गुन्ह्यात मदत करण्याकरिता ४० हजार रुपये मागितल्याचे सिध्द झाले. तडजाेडीअंती ३० हजार रुपये घेताना एसीबीचे पथकाने पिंपरी पाेलिस स्टेशन अंकित माेहननगर पाेलीस चाैकीत सापळा रचून आराेपीला अटक केली. सदरची कारवाई पाेलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पाेलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली. काेणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी कायदेशीर फी व्यक्तिरिक्त सरकारी अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत तात्काळ एसीबीकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.

सोने प्रथमच 94 हजारांच्या पुढे…

नवी दिल्लीआज म्हणजेच १६ एप्रिल रोजी सोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ₹१,३८७ ने वाढून ₹९४,४८९ झाली. पूर्वी १० ग्रॅम सोन्याची किंमत ९३,१०२ रुपये होती.

आज एक किलो चांदीचा भाव ३७३ रुपयांनी वाढून ९५,४०३ रुपये प्रति किलो झाला आहे. पूर्वी चांदीची किंमत प्रति किलो ₹ 95,030 होती. तर २८ मार्च रोजी चांदीने १,००,९३४ रुपयांचा उच्चांक गाठला होता आणि ११ एप्रिल रोजी सोन्याने ९३,३५३ रुपयांचा उच्चांक गाठला होता.

सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची ३ कारणे

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे व्यापार युद्धाचा धोका वाढला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावू शकतो. जागतिक मंदीची भीतीही वाढली आहे. अशा परिस्थितीत लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. मंदीच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते.
डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. कारण जेव्हा रुपया कमकुवत होतो तेव्हा तो आयात करण्यासाठी जास्त पैसे लागतात. या वर्षी रुपयाचे मूल्य जवळपास ४% घसरले आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव आला आहे.
लग्नसराईचा हंगाम जवळ येत आहे, त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे. मुंबई, दिल्ली आणि चेन्नईसारख्या शहरांमधील ज्वेलर्सनी सांगितले की, लोक सोन्याला गुंतवणूक आणि समृद्धीचे प्रतीक मानत असल्याने, उच्च किमती असूनही विक्री तेजीत होती.
भोपाळ आणि ४ मेट्रो शहरांमध्ये सोन्याचा भाव

दिल्ली: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८८,३०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९६,३२० रुपये आहे.
मुंबई: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८८,१५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९५,१८० रुपये आहे.
कोलकाता: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८८,१५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९६,१७० रुपये आहे.
चेन्नई: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८८,१५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९६,१७० रुपये आहे.
भोपाळ: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८८,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९६,२२० रुपये आहे.

या वर्षी आतापर्यंत सोने १८,३२७ रुपयांनी महागले

या वर्षी, १ जानेवारीपासून आतापर्यंत, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७६,१६२ रुपयांवरून १८,३२७ रुपयांनी वाढून ९४,४८९ रुपये झाली आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत देखील ९,३८६ रुपयांनी वाढून ८६,०१७ रुपये प्रति किलोवरून ९५,४०३ रुपये झाली आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये सोने १२,८१० रुपयांनी महाग झाले होते.

वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव ₹१.१० लाखांपर्यंत पोहोचू शकतो

अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार युद्धामुळे आणि मंदीच्या भीतीमुळे, यावर्षी सोन्याचा भाव प्रति औंस $३,७०० पर्यंत पोहोचू शकतो. आंतरराष्ट्रीय दरांनुसार मोजले तर भारतात १० ग्रॅम सोन्याची किंमत १.१० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. परदेशी गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने हा अंदाज जाहीर केला आहे.

फक्त प्रमाणित सोने खरेदी करा

नेहमी भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे प्रमाणित हॉलमार्क केलेले सोने खरेदी करा. सोन्यावर ६ अंकी हॉलमार्क कोड असतो. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID म्हणतात. ही संख्या अल्फान्यूमेरिक आहे, म्हणजे अशी काहीतरी – AZ4524. हॉलमार्किंगद्वारे विशिष्ट सोने किती कॅरेटचे आहे हे जाणून घेणे शक्य आहे.

पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यास निघालेल्या ९ जणांच्या टोळीला पोलिसांनी पकडले

पुणे- परप्रांतातून महाराष्ट्रात आलेली १८ ते २० वर्षे दरम्यानची ९ पोरे जमा झाली , हत्यारे घेऊनच ती आली, वाकडेवाडी येथील जुना-पुणे मुंबई हायवे रोडवरील अंडर पास ब्रिजखालील फुटपाथवर जमा होऊन तेथून वाकडेवाडीच्या भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यास निघाली खरी ..पण पुण्याच्या पोलिसांनी झडप घातली आणि या ९ जणांच्या टोळीला पकडून गजाआड केली .

या प्रकरणी खडकी पोलीस ठाणे येथील पोलीस अंमलदार सुधाकर राठोड यांनी फिर्याद नोंदविली आहे. पकडलेल्या तरुण आरोपींची नावे १) अभिषेक राजकुमार महतो, वय २२ वर्षे, रा.पुणे फिरस्ता, मुळगाव बेटिया थाना अहमदाबाद, जि. कटियारा बिहार २) दिनेश राजकुमार नोनिया, वय १८ वर्षे रा. पुणे फिरस्ता, मुळगाव बेटियाथाना अहमदाबाद, जि. कटियारा बिहार ३) रोहनकुमार विलोप्रसाद चौरोसिया, वय १९ वर्षे, रा.पुणे फिरस्ता, मुळगाव मु. नयाइला, तिलझारी, महाराजपुर, जि. साहेबगंज, राज्य झारखंड ४) राजेश धर्मपाल नोनियाँ, वय १८ वर्षे, रा. पुणे फिरस्ता, मुळगाव ढामरा कोलीयरी पत्थरखदान, पो. काली पबाडी, राणीगंज, जि बर्धमान, पश्चिम बंगाल ५) सचिन सुखदेव कुमार, वय २० वर्षे, रा.पुणे फिरस्ता, मुळगाव ग्राम नयाटोला, कल्याणी, महाराजपुर बाजार, तिलझारी, महाराजपुर, जिल्हा साहेबगंज, राज्यझारखंड ६) उजीर सलीम शेख, वय १९ वर्षे, रा.पुणे फिरस्ता, मुळ गाव बेटियाथाना अहमदाबाद, जि कटियारा बिहार ७) अमिर नुर शेख वय १९ वर्षे रा. झारखंड ८) सुमित मुन्ना महातोकुमार वय १९ वर्षे रा. झारखंड ९) कुणाल रतन महातो वय २१ वर्षे रा. जि कटियारा बिहार अशी आहेत. दि.१५/०४/२०२५ रोजी रात्रौ २३/४५ वा.चे सुमा, वाकडेवाडी, जुना-पुणे मुंबई हायवे रोडवरील अंडर पास ब्रिजखालील अंडर पास फुटपाथ रस्त्यावर अंधारात वाकडेवाडी येथे हे हे सर्व आपले कब्जात बेकायदेशीररित्या व अनधिकृतपणे घातक शस्त्रे आपले जवळ बाळगुन, हत्याराची व साथीदारांची जमवाजमव करून, वाकडेवाडी पुणे येथील भारत पेट्रोलपंप येथे दरोडा टाकण्यासाठी व स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी दरोडा टाकण्याचे तयारीत असताना हाती लागल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले मो. नं.९६५७९९०६०६ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 अनंतराव पवार अभियांत्रिकीची औद्योगिक अभ्यास सहल संपन्न…

पुणे-  अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच  ऋचा इंजिनीरिंग टूल टेक टूलिंग प्रा.ली.  छत्रपती संभाजी नगर  ला भेट दिली.   या भेटी दरम्यान ऋचा इंजिनिअर्सच्या तांत्रिक टीमने विद्यार्थ्यांनी आधुनिक उत्पादन प्रणाली, ऑटोमेशन, अभियांत्रिकी-केंद्रित औद्योगिक उत्पादनांचे डिझाइनिंग, प्रेस पार्ट्स, स्ट्रक्चरल एलिमेंट्स, ट्रान्समिशन सिस्टम्स, एक्झॉस्ट सिस्टम्स, इंजिनशी संबंधित असेंब्ली आणि प्लास्टिक मोल्डेड पार्ट्स, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा या विषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला भेट देऊन न्यायालयीन कामकाजाचे थेट निरीक्षण केले आणि प्रशासन आणि औद्योगिक नियमनात न्यायव्यवस्थेची भूमिका जाणून घेतली. या अभ्यास सहलीचे आयोजन प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ.रमा गायकवाड  यांनी केले. समन्वयक म्हणून प्रा.संभाजी नवले यांनी काम पहिले. या अभ्यास सहलीमध्ये डॉ.रमा गायकवाड, डॉ.प्रांजली मोरे, डॉ.जितेंद्र मुसळे, प्रा.देवेंद्र भारंबे, प्रा. प्रांजळ मोरे  यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  या  औद्योगिक अभ्यस सहलीत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा, औद्योगिक कामाचा जवळून  अनुभव घेता आल्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाने औद्योगिक अभ्यस सहलीचे  आयोजन केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिलाताई गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

तनाएराचे ‘समर सॉन्ग्स’ निसर्गाचे रंग आणि ताल यांच्यापासून प्रेरित होऊन उन्हाळ्यात देखील  ताजेतवाने ठेवणारे, आनंद देणारे कलेक्शन सादर

साड्या, कुर्ते, कुर्ता सेट्स, सुंदर टॉप्स आणि फ्लोई ड्रेसेसचे सुंदर कलेक्शन तुमच्या समर वॉर्डरोबमध्ये असेल तर उन्हाळा देखील होईल सुसह्य 

पुणे-16 एप्रिल२०२५मोठे दिवसगरम हवा अशा वातावरणात तुम्हाला तजेला आणि आनंद देईल असे नवे ‘समर सॉन्ग्स‘ कलेक्शन तनाएराने आणले आहेसूर्यप्रकाशाने लख्ख उजळलेले दिवसहलक्या हवेच्या झुळुका आणि निसर्गातील ताल यांचे सार ‘समर सॉन्ग्स‘ मध्ये सामावले आहेशानदार आणि तरीही आरामदायी कपडे ज्यांना आवडतात अशा महिलांसाठी डिझाईन करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये आरामदायी कॉटननाजूक सिल्कसिल्क कॉटनहवेशीर ऑर्गन्झा आणि कोटा असे विविध प्रकार आहेतभारतातील सर्वोत्तम टेक्स्टाईल्सचीप्रत्येक काळात पसंद केली जाणारी कारीगरी यामध्ये पाहायला मिळेल.

ग्रीष्माच्या कवितेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेले हे कलेक्शन ऋतूच्या बदलत्या रंगांचा आनंद साजरा करतेउन्हामुळे शुष्क झाल्यामुळे सोनेरी छटा आलेल्या पानांपासून समुद्रकिनारी चमकणाऱ्या कोरल गार्डन्सपर्यंत या कलेक्शनमधील प्रत्येक पीस ऋतूच्या तजेलदारचमकदारमनमोहक पॅलेट्स दर्शवतोमऊशार पेस्टल्सहिरवाई आणि चमकदार कोरल्स या कलेक्शनमधील नाजूक प्रिंट्सहाताने रंगवलेले डिटेल्स आणि नव्याजुन्या प्रत्येक काळात पसंद केल्या जाणाऱ्या विणकाम परंपरांमधून जिवंत साकार झाल्या आहेतदररोजच्या कपड्यांपासून विलक्षण सुंदर आणि शानदार कपड्यांपर्यंतचा बदल तुमच्या वॉर्डरोबमध्ये अगदी सहजपणे घडवून आणण्याचे काम हे कलेक्शन सराईतपणे करते.

हवेशीरआरामदायी कापडापासून तयार करण्यात आलेल्यानव्याजुन्या सर्व काळात पसंद केल्या जातील अशाआधुनिक गरजांना अनुरूप बहुउपयोगीविचारपूर्वक डिझाईन करण्यात आलेल्यासाड्या आणि रेडीटूवेयर कपडे या कलेक्शनचा मुख्य भाग आहेसाड्यांच्या रेन्जमध्ये राजस्थानच्या संगानेरी ब्लॉक प्रिंट्सबंगालच्या मलमल आणि जामदानी या विणकामांनी सजवलेल्या प्युअर कॉटन साड्या आहेतदररोज वापरता येतील आणि तरीही अतिशय सुंदर  शानदार दिसतील अशा या साड्या वापरायला अगदी सहज आहेतकोटा साड्यांची तजेलदार शानहाताने रंगवलेल्या मुर्शिदाबाद सिल्कस् आणि सिल्क कॉटन  ऑर्गन्झा साड्यात्यावरील प्रिंट्सएम्ब्रॉयडरीहाताने केलेल्या रंगकामाची शान यामुळे या साड्या ऑफिसमध्ये घालता येतील आणि कॅज्युअल समारंभांमध्ये देखील तितक्याच उठून दिसतील.

तनाएराच्या हेड ऑफ डिझाईन श्रीमती अनिंदिता सरदार म्हणाल्याग्रीष्म ऋतू म्हणजे सहजतरल आणि भरपूर ऊर्जेचा काळसमर सॉन्ग्स कलेक्शनमध्ये आम्ही अशा साड्या आणि कपडे डिझाईन केले आहेत जे या सगळ्याचे सार दर्शवतातहे कलेक्शन म्हणजे हवेशीर फॅब्रिक्स आणि तरल सिल्हटस् हालचालींमध्ये सहजता सुनिश्चित करतातग्रीष्मातील मोठे दिवसत्यांच्या वेगाशी हे कलेक्शन सुसंगत आहेअतिशय विचारपूर्वक क्युरेट केलेले हे कलेक्शन सादर करून तनाएराने सर्व एथनिक कपड्यांसाठी अल्टिमेट डेस्टिनेशन हे आपले स्थान मजबूत करणे आणि त्याची नवी व्याख्या सादर करणे सुरु ठेवले आहे.”

या कलेक्शनच्या किमती १४९० रुपयांपासून पुढे आहेतवर्कवेयरदररोज वापरण्याचे कपडेवीकएंडच्या खास समारंभांसाठीचे कपडे यामध्ये आहेतप्रत्येक साडी आणि कपडा विचारपूर्वक डिझाईन करण्यात आला आहेवापरण्यातील सहजता आणि सौंदर्य यांची सांगड या कलेक्शनमध्ये घालण्यात आली आहेwww.Taneira.com वर किंवा तुमच्या जवळच्या तनाएरा स्टोरमध्ये समर सॉन्ग्स कलेक्शन उपलब्ध आहे

म.फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षक सन्मान दिन उत्साहात साजरा

पुणे: संविधान जागर समिती मार्फत संविधान जागर अभियान जानेवारी महिन्यापासून संपूर्ण राज्यभर चालवले जात आहे. म. फुले हे आपल्या सर्वांचे आद्य शिक्षक असून त्यांनी शिक्षणाचा हक्क नाकारलेल्या स्त्रिया आणि बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. तसेच बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमाने शिक्षणाचा हक्क कायद्याच्या रूपाने संविधानात आणला. म्हणून संविधान जागर अभियान मार्फत म. फुले आणि बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचा सन्मान करत 11 एप्रिल हा दिवस शिक्षक सन्मान दिन म्हणून उत्साहात साजरा झाला. हा दिवस बारामती तालुक्यातील यशवंतराव मोरे पाटील आश्रम शाळा, मोडवे, छत्रपती शिवाजी विद्यालय, मुर्टी, कै.ह.तु. थोरवे प्राथमिक विद्यालय, कात्रज, चंद्रकांत दांगट पाटील शिक्षण व मंडळ, एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च आणि पुण्यातील काही शाळांमध्ये साजरा करण्यात आला. त्यात 500 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. 

संविधान जागर अभियानाचे सुरेश राजपुरे यांच्या अथक परिश्रमाने शिक्षकांशी ऋणानुबंध जोडता आले आणि संत विचाराच्या माध्यमातून त्यांनी संविधानाचा जागर शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये केला. कार्यक्रमाला कॉसमॉस बँकेचे सौजन्य लाभले. कॉसमॉस बँकेचे संचालक श्री. बाळासाहेब साठे यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्यामध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे गरजेचे आहे.

नंदकुमार जगताप, विश्वजीत किर्तीकर, संतोष जगताप, सचिन कड देशमुख, दिनकरराव देशमुख, बाळासाहेब महाडिक, संजय देशमुख आणि श्रद्धा रेखा राजेंद्र यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. 

मर्सिडीज- बेंझ इंडियातर्फे ऐतिहासिक विक्रमी टप्पा पार, २,००,००० व्या ‘मेड इन इंडिया’ कारचे रोल-आउट

पुणे-

“मर्सिडीज- बेंझकडून लक्षणीय टप्पा पार, २,००,००० व्या ‘मेड इन इंडिया’ मर्सिडीज बेंझ कारचे उत्पादन, भविष्यात भारत उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनण्याचे निदर्शक. भारतीय प्लँट्सने उत्पादनाची उच्च आणि वेगवान पातळी गाठली आहे. या प्लँट्सद्वारे जागतिक दर्जाच्या आयसीई आणि ईव्हीज एकाच छताखाली तयार केल्या जातात. त्यावरून टीमचे तांत्रिक कौशल्य आणि लवचिक उत्पादनाची उत्त पातळी दिसून येते. या प्लँट्समध्ये बाजारपेठ तसेच ग्राहकांच्या बदलत्या गरजा वेगाने पूर्ण करण्याची क्षमताही दिसून येते. भारतीय उत्पादन केंद्राद्वारे १०० चक्के अक्षय उर्जेचा वापर आमच्या जागतिक पातळीवर राबवल्या जाणाऱ्या शाश्वत उत्पादन धोरणाला मोठ्या प्रमाणावर योगदान दिले जाते. पर्यायाने शाश्वत उत्पादन पद्धतींसाठी असलेली आमची बांधिलकी आणखी दृढ झाली आहे.

डॉ. जोर्ग बर्झर, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य, मर्सिडीज- बेंझ ग्रुप एजी प्रॉडक्शन, क्वालिटी अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट

“मर्सिडीज बेंझची उत्पादन सुविधा आमच्या भारतातील कामकाजाचा कणा असून या केंद्राने आमच्या बाजारपेठेने मिळवलेल्या यशात आणि जागतिक दर्जाची आयसीई व बीईव्ही उत्पादनांची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मर्सिडीज बेंझ यापुढेही उत्पादनाच्या दर्जाचे नवे मापदंड प्रस्थापित करण्यासाठी, भारतातील कोणत्याही लक्झरी ओईएमद्वारे करण्यात आलेल्या सर्वाधिक गुंतवणुकीसह बाजारपेठेतील गुंतवणूक कायम राखेल. आम्ही येथील अत्याधुनिक उत्पादन केंद्राद्वारे कार्यरत राहून भारतीय बाजारपेठेत मर्सिडीज बेंझ उत्पादनांना असलेली वाढती मागणी पूर्ण करत राहू.”

संतोष अय्यर, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मर्सिडीज- बेंझ इंडिया

–          २००,००० मेड इन इंडिया मर्सिडीज- बेंझ कार्सचा ऐतिहासिक टप्पा पार, डॉ. जोर्ग बर्झर, यांच्या हस्ते माइलस्टोन कारचे- ईक्यूएस एसयूव्हीचे चाकण, पुणे येथील उत्पादन केंद्रातून रोल- आउट

–          उत्पादनाच्या वेगाला चालना – पहिल्या ५०,००० कार्सचे उत्पादन १९ वर्षांत करण्यात आले, तर त्यानंतरच्या १००,००० कार्स नऊ वर्षांत तयार करण्यात आल्या आणि त्यापुढच्या ५०,००० कार्सचे उत्पादन केवळ २ वर्ष ३ महिन्यांत झाले.

–           

o     ५०,००० कार्स २०१४ | १५०,००० कार्स, २०२३ | २०,००० कार्स: एप्रिल २०२५ 

–          असामान्य कामगिरी – जर्मनीबाहेर तयार करण्यात आलेल्या पहिल्या मर्सिडीज- मेबॅकचे (S500) उत्पादन २०१५ मध्ये भारतात.

–          लक्झरी ईव्ही स्थित्यंतरात आघाडीवर – २०२२ मध्ये ईक्यूएस सेदानसह इलेक्ट्रिक वाहनांच्या स्थानिक उत्पादनाची सुरुवात, त्यानंतर २०२४ मध्ये ईक्येस एसयूव्ही 580

–          शाश्वततेप्रती बांधिलकी – २०२२ पासून हरित उर्जेद्वारे उत्पादन केंद्राला चालना

११ लक्झरी मॉडेल्ससह सर्वसमावेशक स्थानिक उत्पादन श्रेणी, भारतात स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या लक्झरी कार्सची व्यापक श्रेणी उपलब्ध

लक्झरी कार उत्पादक कंपनीद्वारे भारतात करण्यात आलेली सर्वाधिक गुंतवणूक – ३००० कोटी रुपये, २०२४ मध्ये २०० कोटींची नवी गुंतवणूक

पुणेभारतातीलसर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज- बेंझने आज पुण्यातील चाकण येथे वसलेल्या उत्पादन केंद्रात तयार करण्यात आलेल्या २००,००० व्या रोल- आउटसह ऐतिहासिक टप्पा पार केला. डॉ. जोर्ग बर्झरव्यवस्थापकीय मंडळाचे सदस्यमर्सिडीज- बेंझ ग्रुप एजी प्रॉडक्शनक्वालिटी अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट यांच्या हस्ते भारतातील २००,००० मर्सिडीज- बेंझ, ईक्येस एसयूव्हीचे रोल- आउट करण्यात आले. यावेळी संतोष अय्यरव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीमर्सिडीज- बेंझ इंडिया आणि व्यंकटेश कुलकर्णी, कार्यकारी संचालक आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुखमर्सिडीज बेंझ इंडिया हे उपस्थित होते.

स्थानिक उत्पादनाचा वाढते प्रमाण:

मर्सिडीज बेंझ इंडियाच्या उत्पादनाची वाढती आकडेवारी वेगवान विकास दर्शवणारी आहे – पहिल्या १९ वर्षांत ५०,००० कार्स ते १५०,००० युनिट्स केवळ एका दशकभरात (२०१५-२०२५). सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे कंपनीने गेल्या केवळ २ वर्षांत ५०,००० कार्सची निर्मिती केली आहे. हे ऐतिहासिक टप्पे भारताच्या लक्झरी कार बाजारपेठेत होत असलेली वेगवान क्रांती दर्शवणारे असून त्यावरून भारतीय ग्राहकांमध्ये मर्सिडीज बेंझची वाढती लोकप्रियताही अधोरेखित होते.

मर्सिडीज बेंझ इंडियाच्या उत्पादन केंद्राने विविध उल्लेखनीय टप्पे पार केले आहेत. त्यामध्ये २०१५ मध्ये जर्मनीबाहेर मर्सिडीज- मेबॅकचे (S500) उत्पादन करणारी पहिली बाजारपेठ बनण्याच्या कामगिरीचा समावेश आहे. भारतीय उत्पादन केंद्र लक्झरी इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रचलित करण्यातही आघाडीवर असून २०२२ मध्ये ईक्यूएस 580 सेदानचे स्थानिक उत्पादन सुरू करण्यात आले होते. यावरून कंपनीची शाश्वत उत्पादनाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. मर्सिडीज बेंझ इंडियाच्या उत्पादन केंद्रात २०२२ पासून पूर्णपणे हरित उर्जा वापरण्यात येते.

स्थानिक पातळीवर तयार केल्या जाणाऱ्या ११ लक्झरी मॉडेल्सच्या सर्वसमावेशक श्रेणीसह मर्सिडीज बेंझ भारतीय ग्राहकांना मेड इन इंडिया लक्झरी वाहनांची व्यापक श्रेणी उपलब्ध करून देते. कंपनी भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारी लक्झरी ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनी असून त्यातून बाजारपेठेप्रती दीर्घकालीन बांधिलकी अधोरेखित झाली आहे. कंपनीने २०२४ मध्ये केलेल्या २०० कोटी रुपयांच्या ताज्या गुंतवणुकीसह एकूण ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक देशात केली आहे.

उत्पादन क्षेत्रात पार करण्यात आलेल्या या विक्रमी टप्प्याला मर्सिडीज बेंझच्या विस्तृत रिटेल नेटवर्कची जोड लाभली आहे. कंपनीचे हे नेटवर्क भारतातील लक्झरी कार उत्पादक कंपन्यांमध्ये सर्वाधिक असून ५० पेक्षा जास्त शहरांत एकूण १०० लक्झरी टचपॉइंट्स कार्यरत आहेत. स्थानिक पातळीवर तयार करण्यात येणारी कंपनीची वाहने देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची खात्री या नेटवर्कद्वारे केली जाते. ठिकाण कोणतेही असोसर्व ग्राहकांना एकसमना लक्झरी अनुभव आणि गुणवत्तापूर्ण सेवा दिली जाते. स्थआनिक उत्पादन क्षमता आणि विस्तृत रिटेल नेटवर्कमुळे मर्सिडीज बेंझला पर्सनलाइज्ड लक्झरी अनुभव देणे तसेच बाजारपेठेच्या गरजा वेगाने पूर्ण करणे शक्य होते.

उत्पादन क्षेत्रात साध्य करण्यात आलेला हा टप्पा मर्सिडीज बेंझचे मेड इन इंडियाफॉर इंडिया हे धोरण अधोरेखित करणारे आहे. ही उत्पादने जागतिक दर्जानुसार आणि भारतीय लक्झरी कार ग्राहकांच्या आवडीला साजेशी आहेत. मर्सिडीज बेंझ यापुढेही भारतातील उत्पादन क्षमता आणखी बळकट करत ही कामगिरी भारतातील लक्झरी मोबिलिटी क्षेत्राला आकार देण्याच्या कंपनीच्या प्रवासातील लक्षणीय टप्पा ठरेल याची खात्री करणारी आहे.

पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्सला एडव्हान्स्ड ब्रेन स्ट्रोक केअरसाठी प्रतिष्ठित एनएबीएच प्रमाणपत्र प्रदान

पुणे– १६ एप्रिल २०२५– नगर रोड येथील सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला त्यांच्या सुरक्षित आणि उच्च दर्जाची आपत्कालीन सेवा प्रदान करण्याच्या क्षमतेसाठी आणि प्रगत स्ट्रोक सेंटर्ससाठी एनएबीएच प्रमाणपत्र मिळाले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रक्रियांचे कठोर मूल्यांकन केल्यानंतर हे प्रमाणपत्र दिले गेले आहे. यामुळे देशातील अशा प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या निवडक रुग्णालयांच्या यादीत पहिल्या तीन रुग्णालयांमध्ये सह्याद्रि हॉस्पिटलची गणना होत आहे.

आज जगभरात ब्रेन-स्ट्रोक हे मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण बनले असून अपंगत्वाचे तिसरे प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे. आणि दरवर्षी १६० दशलक्ष वर्षांचे निरोगी आयुष्य गमावण्यासाठी जबाबदार ठरते आहे. व्यक्ती, कुटुंबं आणि समाजावर स्ट्रोकचा होणारा परिणाम प्रचंड आहे. स्ट्रोकच्या उपचारांमध्ये “गोल्डन अवर” म्हणजे स्ट्रोकची लक्षणे दिसल्यानंतर पहिल्या 60 मिनिटांचा काळ हा अतिशय महत्वाचा ठरतो. या काळामध्ये केलेल्या त्वरित वैद्यकीय हस्तक्षेपामुळे रुग्णाच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होते. त्यामुळेच रुग्णांसाठी सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर उपचार सेवा देणारे रुग्णालय हे एनएबीएच मान्यता मिळाल्याने राष्ट्रीय मानकांनुसार सर्वोच्च दर्जाचे ठरते.

सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, नगररोड येथे समर्पित न्यूरो आयसीयू आहे. त्याशिवाय येथे मेंदूविकार विभागाचे संचालक डॉ. नसली आर. इचापोरिया यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी स्ट्रोक रुग्णांसाठी एक विशेष टीम आहे. हि टीम स्ट्रोकच्या आपत्कालीन परिस्थितीवर जलद आणि प्रभावी उपचार करण्यात विशेषज्ञ आहे. रुग्णालय थ्रोम्बोलिसिससाठी स्थापित मानकांचा वापर करत स्ट्रोकचे परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करते. या बरोबरच, सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये यांत्रिक थ्रोम्बेक्टोमीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, ज्या रुग्णांच्या मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या काढण्यासाठी वापरल्या जातात. असे उपचार हे तज्ञ क्लिनिकल टीमद्वारे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून केले जातात.

सह्याद्रि हॉस्पिटल्सना जागतिक स्ट्रोक ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएसओ)/एंजल्स पुरस्कार समितीकडून देखील मान्यता मिळाली आहे. हि समिती विशिष्ट निकषांनुसार प्रभावी डेटा प्रदान करणाऱ्या आणि उच्च दर्जाची काळजी व उपचार देणाऱ्या रुग्णालयांना पुरस्कार देते. सह्याद्रि हॉस्पिटल्सना सलग १४ तिमाहीत दर्जेदार स्ट्रोक केअरसाठी डायमंड पुरस्कार हा सर्वोच्च दर्जाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार सतत डेटा कॅप्चरिंग आणि विश्लेषणावर भर देणाऱ्या कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्यामुळे ब्रेन-स्ट्रोक रुग्णालय उपचार देताना त्यातील सुधारणा ओळखून  त्यावर उपाय करणे शक्य होते.

सह्याद्रि ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वैद्यकीय संचालक डॉ. सुनील राव म्हणाले, एनएबीएच प्रमाणपत्र मिळवणे म्हणजे केवळ उच्च मानकांची पूर्तता न करता त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करून आरोग्यसेवेत नवीन मापदंड स्थापित करणे. ही मान्यता सह्याद्रितर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च दर्जाच्या काळजीसाठी तसेचरुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी असलेल्या आमच्या अथक समर्पणाचे प्रतिबिंब आहे. भारतातील अशा काही मोजक्या रुग्णालयांपैकी एक होण्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या सर्व रुग्णालयांमध्ये ही गुणवत्ता कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

चाकणमधील महावितरणच्या शेलपिंपळगाव उपकेंद्राला ‘आयएसओ’चे मानांकन; नवीन वीजवाहिनीही कार्यान्वित

पुणे, दि१६ एप्रिल २०२५: राजगुरुनगर विभाग अंतर्गत शेलपिंपळगाव ३३/२२ केव्ही उपकेंद्राने मानांकनाचे निकष पूर्ण करीत ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकन मिळविले आहे. महावितरणच्या पुणे परिमंडलातील ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र मिळवणारे हे दहावे उपकेंद्र आहे. सोबतच शेलपिंपळगाव उपकेंद्रातील एका वीजवाहिनीचे विभाजन करून २२ केव्ही क्षमतेची नवीन वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली.

शेलपिंपळगाव उपकेंद्रामध्ये मंगळवारी (दि. १६) आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नवीन काळूस २२ केव्ही वीजवाहिनी देखील श्री. पवार यांच्याहस्ते कार्यान्वित करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र येडके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत गाडे, चाकणचे उपकार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र गोरे आदींची उपस्थिती होती.

महावितरणच्या उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणासोबतच त्याची योग्य निगा, दर्जा व गुणवत्ता वाढीचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे चाकण उपविभागातील भोसे शाखे अंतर्गत शेलपिंपळगाव ३३/२२ केव्ही उपकेंद्रामध्ये गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सर्व प्रकारची सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, पर्यावरण दस्ताऐवजीकरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदी कामे करण्यात आली. २७ अटी व शर्तींच्या मानकांनुसार हे उपकेंद्र ‘आयएसओ’च्या मानांकनासाठी पात्र ठरले. या उपकेंद्राला ‘आयएसओ’चे मानांकन मिळवून देण्यासाठी सहायक अभियंता सुरेश माने, प्रधान यंत्रचालक राजेंद्र बिचकर, यंत्रचालक कोमल कांबळे यांनी योगदान दिले.

सोबतच या उपकेंद्रातील शेलपिंपळगाव २२ केव्ही गावठाण वीजवाहिनीचे विभाजन करण्यात आले आहे व नवीन काळूस २२ केव्ही वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे शेलपिंपळगाव, मोहितेवाडी, वडगाव, शेलगाव, भोसे, काळूस व दौंडकरवाडी या सात गावांतील ६ हजार १५८ वीजग्राहकांना आणखी सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.

फ्लॅट बुकिंगची रक्कम परत मागितल्याने कोयता फिरवत पसरवली दहशत

पुणे:फ्लॅटच्या बुकिंगसाठी भरलेली रक्कम मागितल्याचा राग मनात धरून एका तरुणाने कोयता घेऊन थेट इस्टेट एजंटच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडलाय. हातात लांबलचक कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याचा राग मनात ठेवत तरुणाकडून थेट कोयत्याने दहशत माजवणाऱ्या तरुणाचं नाव ऋषिकेश भगवान गायकवाड असे आहे. 29 वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात उत्तम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. यावर पोलीस अधिक तपास करत आहेत.

फ्लॅट न घेतल्यामुळे रक्कम परत मागण्यासाठी फिर्यादी कुटुंबीय गायकवाड यांच्या घरी गेले होते. त्यावेळी ऋषिकेशने कोयता घेऊन धमकी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इस्टेट एजंट असून त्यांनी उत्तमनगर परिसरातील एक फ्लॅट त्यांच्या आईच्या नावाने, नातेवाईक भगवान गायकवाड यांच्याकडून घेण्यासाठी 5 लाख रुपये आगाऊ दिले होते. मात्र काही आर्थिक अडचणीमुळे डिसेंबर महिन्यात फ्लॅट न घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी भरलेली रक्कम परत मागितली. मात्र गायकवाड यांनी पैसे परत न करता वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली. 15 एप्रिल रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास, फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय पैसे मागण्यासाठी गायकवाड यांच्या घरी गेले. त्यावेळी भगवान गायकवाड घरी नसताना, त्यांचा मुलगा ऋषिकेश गायकवाड याने अचानक घरातून लांब कोयता आणला आणि संतप्तपणे फिर्यादीच्या दिशेने धाव घेतला. या प्रकारामुळे घाबरलेल्या फिर्यादीने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.

या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात ऋषिकेश भगवान गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता

आयएमडीचा नैऋत्य मान्सून हंगामी पावसाचा दीर्घकालीन अंदाज


±5% च्या फरकाने दीर्घकालीन सरासरीच्या 105% हंगामी पाऊस अपेक्षित

एनसो परिस्थिती तटस्थ, परंतु ला निना सारखा वातावरणीय आकृतिबंधही तटस्थ आढळला, संपूर्ण मान्सून हंगामात एनसो कायम राहण्याची शक्यता

ठळक मुद्दे

अ) 2025 मध्ये संपूर्ण देशभरात नैऋत्य मोसमी हंगामी पाऊस (जून ते सप्टेंबर) सामान्यपेक्षा जास्त (> दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) 104%) असण्याची शक्यता आहे. परिमाणात्मकदृष्ट्या संपूर्ण देशभरात हंगामी पाऊस सरासरीच्या 105% राहण्याची शक्यता आहे ज्यामध्ये ± 5% प्रारूप त्रुटी अंतर्भूत आहे. 1971-2020 या कालावधीत संपूर्ण देशभरात हंगामी पावसाची दीर्घकालीन सरासरी 87 सेंमी आहे.

ब) सध्या विषुववृत्तीय प्रशांत प्रदेशावर तटस्थ एल निनो-दक्षिणी दोलन (एनसो) परिस्थिती दिसून येत आहे. तथापि, वातावरणीय परिसंचरण वैशिष्ट्ये ला निना परिस्थितीसारखीच आहेत. नवीनतम मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टम (एम एम सी एफ एस) तसेच इतर हवामान प्रारूप अंदाज असे दर्शवतात की मान्सून हंगामात तटस्थ एनसो स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

क) सध्या हिंदी महासागरावर तटस्थ हिंद महासागर द्विध्रुवीय (आय ओ डी) परिस्थिती आहे आणि नवीनतम हवामान प्रारूपाच्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून हंगामात तटस्थ आय ओ डी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

ड) गेल्या तीन महिन्यांमध्ये (जानेवारी ते मार्च, 2025) उत्तर गोलार्ध आणि युरेशियामधील बर्फाच्छादित क्षेत्रे सामान्यपेक्षा कमी होती. उत्तर गोलार्ध आणि युरेशियामधील शीतकालीन तसेच वसंत ऋतूतील बर्फाच्छादित क्षेत्रांचा त्यानंतरच्या भारतीय उन्हाळी मान्सून पावसाशी व्यस्त संबंध आहे. आय एम डी मे 2025 च्या शेवटच्या आठवड्यात मान्सून हंगामातील पावसासाठी अद्यतनित अंदाज जारी करेल.

सिंहगड रस्ता: खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून सराफी दुकानावर दरोडा, २५ तोळे सोन्याची लुट

पुणे- सिंहगड रस्त्यावर दिवसाढवळ्या एका सराफ दुकानात तीन चोरटे मंगळवारी दुपारी हातात शस्त्र घेऊन शिरले. त्यांनी दुकानदाराला धमकावत दुकानातील २० ते २५ तोळे सोने जवळच्या पिशवीत टाकून पसार होताना दुकानदाराने विरोध केला असता, संबंधित पिस्टल हे खेळण्यातील असल्याचे ते तुटून खाली पडल्याने समजले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावर धायरी येथे रायकर मळा आहे. संबंधित ठिकाणी काळुबाई चौकात श्री सराफ ज्वेलर्स नावाचे दुकान असून दुकान मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि कामगार दुकानात मंगळवारी होते. त्यावेळी दुपारी दुकानात वर्दळ कमी असताना, एक अनोळखी व्यक्ती दुकानात शिला. त्याने सोन्याची चैन दाखवा असे दुकान मालकास सांगितले. त्यानंतर दुकान मालक सोन्याची चैन दाखवत असतानाच, आणखी दोन अनोळखी व्यक्ती एकापाठोपाठ दुकानात आले. त्यांनी दुकानात शिरताच, पिस्तुलाचा धाक दाखवून दुकान मालक व कामगारास धमकावले. त्यानंतर दुकानातील २० ते २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्यांनी स्वत: जवळील पिशवीत टाकले. यावेळी दुकान मालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्याशी हाताने मारहाण केली. पिस्टलचे बट ने चोरटे मारहाण करत असताना, ती तुटून खाली जमिनीवर पडली आणि ती खेळण्यातील बंदुक असल्याचे निष्पन्न झले. त्यानंतर घाईगडबडीत चोरटे दुचाकीवरून पसार झाले आहे. याबाबतची घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी तीन दरोडेखोर यांच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून घटनास्थळी पोलिसांची पथके दाखल होऊन त्यांनी आरोपींचा माग काढणे सुरु केले आहे.