पुणे-
“मर्सिडीज- बेंझकडून लक्षणीय टप्पा पार, २,००,००० व्या ‘मेड इन इंडिया’ मर्सिडीज बेंझ कारचे उत्पादन, भविष्यात भारत उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनण्याचे निदर्शक. भारतीय प्लँट्सने उत्पादनाची उच्च आणि वेगवान पातळी गाठली आहे. या प्लँट्सद्वारे जागतिक दर्जाच्या आयसीई आणि ईव्हीज एकाच छताखाली तयार केल्या जातात. त्यावरून टीमचे तांत्रिक कौशल्य आणि लवचिक उत्पादनाची उत्त पातळी दिसून येते. या प्लँट्समध्ये बाजारपेठ तसेच ग्राहकांच्या बदलत्या गरजा वेगाने पूर्ण करण्याची क्षमताही दिसून येते. भारतीय उत्पादन केंद्राद्वारे १०० चक्के अक्षय उर्जेचा वापर आमच्या जागतिक पातळीवर राबवल्या जाणाऱ्या शाश्वत उत्पादन धोरणाला मोठ्या प्रमाणावर योगदान दिले जाते. पर्यायाने शाश्वत उत्पादन पद्धतींसाठी असलेली आमची बांधिलकी आणखी दृढ झाली आहे.
डॉ. जोर्ग बर्झर, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य, मर्सिडीज- बेंझ ग्रुप एजी प्रॉडक्शन, क्वालिटी अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट
“मर्सिडीज बेंझची उत्पादन सुविधा आमच्या भारतातील कामकाजाचा कणा असून या केंद्राने आमच्या बाजारपेठेने मिळवलेल्या यशात आणि जागतिक दर्जाची आयसीई व बीईव्ही उत्पादनांची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मर्सिडीज बेंझ यापुढेही उत्पादनाच्या दर्जाचे नवे मापदंड प्रस्थापित करण्यासाठी, भारतातील कोणत्याही लक्झरी ओईएमद्वारे करण्यात आलेल्या सर्वाधिक गुंतवणुकीसह बाजारपेठेतील गुंतवणूक कायम राखेल. आम्ही येथील अत्याधुनिक उत्पादन केंद्राद्वारे कार्यरत राहून भारतीय बाजारपेठेत मर्सिडीज बेंझ उत्पादनांना असलेली वाढती मागणी पूर्ण करत राहू.”
संतोष अय्यर, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मर्सिडीज- बेंझ इंडिया
– २००,००० मेड इन इंडिया मर्सिडीज- बेंझ कार्सचा ऐतिहासिक टप्पा पार, डॉ. जोर्ग बर्झर, यांच्या हस्ते माइलस्टोन कारचे- ईक्यूएस एसयूव्हीचे चाकण, पुणे येथील उत्पादन केंद्रातून रोल- आउट
– उत्पादनाच्या वेगाला चालना – पहिल्या ५०,००० कार्सचे उत्पादन १९ वर्षांत करण्यात आले, तर त्यानंतरच्या १००,००० कार्स नऊ वर्षांत तयार करण्यात आल्या आणि त्यापुढच्या ५०,००० कार्सचे उत्पादन केवळ २ वर्ष ३ महिन्यांत झाले.
–
o ५०,००० कार्स २०१४ | १५०,००० कार्स, २०२३ | २०,००० कार्स: एप्रिल २०२५
– असामान्य कामगिरी – जर्मनीबाहेर तयार करण्यात आलेल्या पहिल्या मर्सिडीज- मेबॅकचे (S500) उत्पादन २०१५ मध्ये भारतात.
– लक्झरी ईव्ही स्थित्यंतरात आघाडीवर – २०२२ मध्ये ईक्यूएस सेदानसह इलेक्ट्रिक वाहनांच्या स्थानिक उत्पादनाची सुरुवात, त्यानंतर २०२४ मध्ये ईक्येस एसयूव्ही 580
– शाश्वततेप्रती बांधिलकी – २०२२ पासून हरित उर्जेद्वारे उत्पादन केंद्राला चालना
११ लक्झरी मॉडेल्ससह सर्वसमावेशक स्थानिक उत्पादन श्रेणी, भारतात स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या लक्झरी कार्सची व्यापक श्रेणी उपलब्ध
लक्झरी कार उत्पादक कंपनीद्वारे भारतात करण्यात आलेली सर्वाधिक गुंतवणूक – ३००० कोटी रुपये, २०२४ मध्ये २०० कोटींची नवी गुंतवणूक
पुणे: भारतातीलसर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज- बेंझने आज पुण्यातील चाकण येथे वसलेल्या उत्पादन केंद्रात तयार करण्यात आलेल्या २००,००० व्या रोल- आउटसह ऐतिहासिक टप्पा पार केला. डॉ. जोर्ग बर्झर, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य, मर्सिडीज- बेंझ ग्रुप एजी प्रॉडक्शन, क्वालिटी अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट यांच्या हस्ते भारतातील २००,००० मर्सिडीज- बेंझ, ईक्येस एसयूव्हीचे रोल- आउट करण्यात आले. यावेळी संतोष अय्यर, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मर्सिडीज- बेंझ इंडिया आणि व्यंकटेश कुलकर्णी, कार्यकारी संचालक आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख, मर्सिडीज बेंझ इंडिया हे उपस्थित होते.
स्थानिक उत्पादनाचा वाढते प्रमाण:
मर्सिडीज बेंझ इंडियाच्या उत्पादनाची वाढती आकडेवारी वेगवान विकास दर्शवणारी आहे – पहिल्या १९ वर्षांत ५०,००० कार्स ते १५०,००० युनिट्स केवळ एका दशकभरात (२०१५-२०२५). सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे कंपनीने गेल्या केवळ २ वर्षांत ५०,००० कार्सची निर्मिती केली आहे. हे ऐतिहासिक टप्पे भारताच्या लक्झरी कार बाजारपेठेत होत असलेली वेगवान क्रांती दर्शवणारे असून त्यावरून भारतीय ग्राहकांमध्ये मर्सिडीज बेंझची वाढती लोकप्रियताही अधोरेखित होते.
मर्सिडीज बेंझ इंडियाच्या उत्पादन केंद्राने विविध उल्लेखनीय टप्पे पार केले आहेत. त्यामध्ये २०१५ मध्ये जर्मनीबाहेर मर्सिडीज- मेबॅकचे (S500) उत्पादन करणारी पहिली बाजारपेठ बनण्याच्या कामगिरीचा समावेश आहे. भारतीय उत्पादन केंद्र लक्झरी इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रचलित करण्यातही आघाडीवर असून २०२२ मध्ये ईक्यूएस 580 सेदानचे स्थानिक उत्पादन सुरू करण्यात आले होते. यावरून कंपनीची शाश्वत उत्पादनाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. मर्सिडीज बेंझ इंडियाच्या उत्पादन केंद्रात २०२२ पासून पूर्णपणे हरित उर्जा वापरण्यात येते.
स्थानिक पातळीवर तयार केल्या जाणाऱ्या ११ लक्झरी मॉडेल्सच्या सर्वसमावेशक श्रेणीसह मर्सिडीज बेंझ भारतीय ग्राहकांना मेड इन इंडिया लक्झरी वाहनांची व्यापक श्रेणी उपलब्ध करून देते. कंपनी भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारी लक्झरी ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनी असून त्यातून बाजारपेठेप्रती दीर्घकालीन बांधिलकी अधोरेखित झाली आहे. कंपनीने २०२४ मध्ये केलेल्या २०० कोटी रुपयांच्या ताज्या गुंतवणुकीसह एकूण ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक देशात केली आहे.
उत्पादन क्षेत्रात पार करण्यात आलेल्या या विक्रमी टप्प्याला मर्सिडीज बेंझच्या विस्तृत रिटेल नेटवर्कची जोड लाभली आहे. कंपनीचे हे नेटवर्क भारतातील लक्झरी कार उत्पादक कंपन्यांमध्ये सर्वाधिक असून ५० पेक्षा जास्त शहरांत एकूण १०० लक्झरी टचपॉइंट्स कार्यरत आहेत. स्थानिक पातळीवर तयार करण्यात येणारी कंपनीची वाहने देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची खात्री या नेटवर्कद्वारे केली जाते. ठिकाण कोणतेही असो, सर्व ग्राहकांना एकसमना लक्झरी अनुभव आणि गुणवत्तापूर्ण सेवा दिली जाते. स्थआनिक उत्पादन क्षमता आणि विस्तृत रिटेल नेटवर्कमुळे मर्सिडीज बेंझला पर्सनलाइज्ड लक्झरी अनुभव देणे तसेच बाजारपेठेच्या गरजा वेगाने पूर्ण करणे शक्य होते.
उत्पादन क्षेत्रात साध्य करण्यात आलेला हा टप्पा मर्सिडीज बेंझचे ‘मेड इन इंडिया, फॉर इंडिया’ हे धोरण अधोरेखित करणारे आहे. ही उत्पादने जागतिक दर्जानुसार आणि भारतीय लक्झरी कार ग्राहकांच्या आवडीला साजेशी आहेत. मर्सिडीज बेंझ यापुढेही भारतातील उत्पादन क्षमता आणखी बळकट करत ही कामगिरी भारतातील लक्झरी मोबिलिटी क्षेत्राला आकार देण्याच्या कंपनीच्या प्रवासातील लक्षणीय टप्पा ठरेल याची खात्री करणारी आहे.