Home Blog Page 3573

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणारच – विनोद तावडे

0
मुंबई –
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास कितीही विरोध होत असला तरी कोणत्याही परिस्थितीत १९ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा रद्द केला जाणार नाही, असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता राजभवनावर कडेकोट बंदोबस्तात हा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वीचे सोहळे हे गिरगाव चौपाटीवर किंवा एखाद्या सभागृहात सामान्यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे. पुरंदरे यांनाही षण्मुखानंद सभागृहात पुरस्कार वितरण हाेणार हाेते. मात्र राज्यातील विविध संघटनांचा विरोध पाहता या कार्यक्रमाचे स्थळ सरकारने बदलले अाहे.विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांसह साहित्यिकांनीही पुरंदरे यांच्या नावाला विरोध केला आहे. हा वाढता विरोध पाहून राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. पुरस्कार सोहळ्याला फक्त मुंबईतील मंत्री आणि आमदारांसह केवळ २५० मान्यवरांनाच बोलवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या कार्यक्रमात काेणताही गोधळ होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला अाहे.

 दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना राज्य सरकारने जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार रद्द करावा, या मागणीसाठी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा पुरस्कार जाहीर करताना पुरस्कार विजेत्याची गुणवत्ता तपासली नाही, तसेच शासनाने घेतलेला निर्णय हा इतर योग्य आणि अधिक पात्र व्यक्तींवर अन्यायकारक असून तो योग्य विचारांती न घेतल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

दरम्यान, या पुरस्काराचे वितरण १९ ऑगस्टला सायंकाळी होणार असल्याने उच्च न्यायालयानेही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता याच दिवशी सकाळी सुनावणी ठेवली आहे.
पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे या कार्यकर्त्यांनी ही जनहित याचिका दाखल केली अाहे. यात प्रामुख्याने हा पुरस्कार जाहीर करताना राज्य सरकारने आपल्याच १ सप्टेंबर २०१२ मध्ये जारी केलेल्या शासन निर्णयातील निकषांचे पालन केले नाही, असा आरोप लावण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारने या पुरस्कारासाठी नावाची शिफारस करण्यासाठी नेमलेल्या समितीनेही शिफारस केलेल्या मान्यवरांच्या यादीत पुरंदरे हे नवव्या क्रमांकावर असून त्यांच्या आधी डॉ. प्रकाश आमटे, डॉ.रवींद्र आणि सीमा कोल्हे, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, आशा भोसले, राजदत्त, हिंमतराव बाविस्कर आणि बाबा कल्याणी या मान्यवरांची शिफारस केलेली आहे. तसेच या यादीत शिफारस केलेल्या मान्यवरांमध्ये पद्म पुरस्कार विजेते अनेक मान्यवर असूनही त्यांना डावलून पुरंदरेंना हा पुरस्कार देण्यात आल्याचा अाक्षेपही या जनहित याचिकेत नमूद
करण्यात आला आहे.
काय आहेत निकष?
1. पुरस्कार प्राप्त व्यक्तीने त्याच्या कार्यक्षेत्रात सेवाभावी वृत्तीने किमान वीस वर्षे विशेष आणि उल्लेखनीय काम केलेले असावे.
2. त्या व्यक्तीचे किमान पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असावे.
3. सरकारच्या पद्म पुरस्काराने गौरव झालेल्या व्यक्तींना या पुरस्कारासाठी प्राधान्यक्रम दिला जावा.
पुरंदरे यांची यांनी केली निवड…
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, सांस्कृतिक कार्य सचिव वल्सा नायर सिंह, चित्रकार वासुदेव कामत, कीर्तनकार मंगलाताई कांबळे, माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा समावेश होता. या समितीत एकही इतिहास तज्ज्ञ नसल्याचा विराेधकांचा अाराेप अाहे.

पुरंदरे विरोधकांना राज ठाकरेंचा इशारा …

0

…  तर राज्यभर तांडव करेन-शरद पवार यांचे गलिच्छ राजकारण …

मुंबई – छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह भालचंद्र नेमाडे डॉ. नागनाथ कोतापल्ले, विद्या बाळ, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे , जितेंद्र आव्हाड यांच्यासह -काँग्रेस राष्ट्रवादी पक्षानेही बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध केल्यानंतर आज दुपारी बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी महाराष्ट्रभर तांडव करेन’, असा  इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.आणि सर्व विरोधकांना ; पुरंदरेंच्या बाजूने आपण रणांगणात उतरलो  असल्याचे दाखवून दिले आहे यावेळी  बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करण्यामागे शरद पवार यांचे गलिच्छ राजकारण आहे, असा आरोपही राज यांनी केला. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत असताना राज यांनी पवारांवर केलेले आरोप राजकीय वर्तुळात महत्वपूर्ण मानले जात आहेत . स्वतः नामनिराळे राहून पवारच फूस देवून गालिच्छ  राजकारण करीत असल्याचा राज ठाकरे यांनी केलेल्या  आरोपाला  राष्ट्रवादी कसे उत्तर देणार याकडे आता लक्ष लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपमधीलच काही मंत्र्यांनी मिळून हे सगळं कुभांड रचलं आहे. मला फडणवीस यांची बाजू घ्यायची नाही मात्र ते खुर्चीवर बसल्यापासूनच हे राजकारण सुरू झाले आहे. पवारांना भाजपमधील कोण कोण सामिल आहेत ते मला महित आहेत पण मी त्यांची नावे सांगणार नाही. फडणवीस ज्युनियर आहेत. ब्राम्हण आहेत. म्हणूनच हे जातीचं राजकारण चाललंय. पवारच विष कालवण्याचे काम करत आहेत’, अशी तोफ राज यांनी डागली.
बाबासाहेबांच्या शिवचरित्रात जिजाऊंचा अपमान झाल्याचा साक्षात्कार आता ५० वर्षांनतर कसा काय झाला?, असा सवाल राज यांनी केला. शरद पवार यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला होता. आत्ता आत्ता महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. अजित पवारही त्यांचा आदर करतात. मग आता अचानक हे घुमजाव कशासाठी?, असा सवालही राज यानी विचारला. केवळ एखाद्या वाक्यासाठी संपूर्ण शिवचरित्रावर आक्षेप घेणे योग्य नाही. त्यातही जे आक्षेप आहेत त्यावर खुली चर्चा होऊ शकते. त्यासाठी एवढा गदारोळ माजवण्याची गरज नाही, असे राज यांनी ठणकावले. राज यांनी कृष्णनीतीचाही यावेळी दाखला दिला. कृष्णाच्या १६ हजार बायका होत्या यावर चर्चा करत बसायचं की कृष्णनीतीचं आचरण करायचं?, असा सवाल राज यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांचाही राज यांनी समाचार घेतला. पवारांच्या गलिच्छ राजकारणामुळेच जितेंद्र आव्हाड यांच्यात एवढं बोलण्याची हिम्मत आली आहे. पवारांनीच आव्हाड यांना फूस लावली आहे, असा आरोप राज यांनी केला. माझ्या आजोबांच्या पुस्तकातील दाखले आव्हाडांनी देऊ नयेत, असेही राज यांनी सुनावले.
नेमाडे यांच्यावर टीका
पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विरोध करणारे ज्ञानपीठप्राप्त भालचंद्र नेमाडे यांच्यावरही राज यांनी टीका केली. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वागावं याचे धडे नेमाडेंनी कुसुमाग्रज वा विंदांच्या आचरणातून घ्यायला हवेत, असा टोला राज यांनी लगावला. नेमाडे यांना ज्ञानपीठ देण्यासही विरोध झाला होता तरीही त्यांनी तो पुरस्कार स्वीकारलाच ना, असा मुद्दाही राज यांनी उपस्थित केला.

ए बी पी माझा या वृत्तवाहिनीने राज ठाकरे यांची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली … यातून राज ठाकरे नेमके काय म्हणाले ते त्यांच्या शब्दात प्रत्यक्ष जसेच्या तसे  ऐका आणि पहा … इथे ए बी पी माझा ची  यू ट्युब वरील संबधित लिंक इथे दिली आहे

 

https://www.youtube.com/watch?v=Ywg5FEApxU0

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण ; स्थगित करा -उदयनराजे

0

सातारा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणारा समारंभ स्थगित करा . अशी मागणी  छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्याने आता १९ ऑगस्ट चा समारंभ होतो किंवा नाही .. कि पुरस्कार नाकारून पुरंदरे हेच हा विषय संपवतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरुन महाराष्ट्रात उभी फूट पडली आहे. पुरंदरेंना पुरस्कार देण्यास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाम विरोध केला आहे. शिवाय, महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनीही पुरंदरेंना पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला आहे. या वादात आता राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनीही उडी घेतली आहे. पुरंदरेंना देण्यात येणाऱ्या पुरस्कार स्थगित करावा, अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी पुरस्कार देण्यास पाठिंबा दिला होता.बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या शिवरायांच्या इतिहासावर आक्षेप घेतले जात आहेत आणि त्या आक्षेपात काही प्रमाणात तथ्य असल्याचं आमचं मत आहे. त्यामुळे, या आक्षेपांची तपासणी करुन जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्थगित ठेवावा, अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे.

Udayan Letter

ऑर्किड शाळेचा ११ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

0

unnamed13unnamed

पुणे-

ऑर्किड  शाळेने आपला ११ व वर्धापन दिन साजरा करण्यासाठी  एक अत्यंत मोठा  भव्यदिव्य  कार्यक्रम  आयोजित

केला  होता.  त्या निमीत्ताने. सर्व पालक , विद्यार्थी व शिक्षक  आणि  शाळेशी  संबंधित  अनेक सहकारी  हे  एकत्र आले

होते.  १३ ओगस्ट ला  संध्याकाळी  शाळेच्या  पटांगणात  हा  कार्यक्रम आयोजित केला होता.

हा कार्यक्रमा साठी भारताचे   प्रसिद्ध    महान असे सांस्कृतिक   संगीतज्ञ  रघु दीक्षित  ह्यांना  निमंत्रित  केले गेले होते.

ते  भारताचे एक रॉक संगीत गायक आहेत. कन्नड सिनेमाच्या जगात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.  ते  उत्तम

गायक ,  निर्माते तसेच  गाणे लिहून त्याला  संगीताचा साज चढवणारे  संगीततज्ञ आहेत. त्यांचे   रॉक संगीत  असले

तरी त्याचा मुळाशी भारतीय  परंपरा तसेच भरतीय  संस्कृती व संगीताचाच  भरभक्कम  आधार दिसतो  त्याचे

सादरीकरण करताना ते  वेष्विक संगीतातून  करतात.

रघु दीक्षित  ह्याचा कार्यक्रम  अत्यंत  बहारदार झाला. त्यांनी रंग मंच दणाणून सोडला. आपल्या  गाण्यावर  सर्वाना

नाचायला भाग पडले.  विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन  नवीन गाण्याची  मेजवानी दिली.  तसेच त्यांच्या शालेय

जीवनाशी संबधित गाणी  त्यांनी ऐकवली . सर्व पेक्षक  त्यांच्या गाण्यात रंगले होते. रॉक संगीत  असल्यामुळे  सर्वजण

उभे राहून आनंदात , उत्साहात ,  गाण्याची  मजा लुटत होते. एक अविस्मरणीय असा अनुभव  हा कार्यक्रम देऊन गेला.

लोकसांगितला नव्या संगीताचा साज  त्यांनी चढवून  आपल्या  स्पष्ट , खणखणीत  आवाजातून त्यांनी  गाऊन  प्रेक्षकांना

मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांना  बरोबर घेऊन त्यांना सतत  नाचवत ठेऊन  ते गाणे गात होते. त्यांच्या आवाजात  एक

वेगळीच जादू  आहे. एका विशिष्ट प्रकारच्या   संगीतात न रमता  आधुनिक संगीताचा आविष्कार  त्यांच्या गाण्यातून

, गाण्याच्या चालीतून प्रकट होत होता.

आमच्या मुलांचे भाग्य असे  की  रघु दीक्षित  ह्यांच्या बरोबर  मुलांना संवाढ साधता आला. त्यांनी आपली  संगीतातील

वाटचाल कशी होत गेली हे सांगितले.   त्यांच्या बरोबर  काम करणाऱ्या  लोकांची त्यांनी ओळख न विसरता करून

दिली.

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांना उजाळा

0

unnamed

बंदुकीच्या गोळीने माणूस मारता येतो; त्याचे विचार नाही.. महात्मा गांधींच्या हत्येपासून ते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येपर्यंतच्या घटना बघितल्या तर वरील वाक्याची प्रचिती येते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) सारख्या पुरोगामी विचारसरणीच्या संस्थेच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणा-या हजारो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. दाभोलकरांची तीन वर्षांपूर्वी पुण्यात दिवसाढवळ्या हत्या झाली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली त्यांच्या मारेक-यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कडक शिक्षा करावी यासाठी विविध स्तरांतून उत्स्फूर्तपणे आंदोलनेही झाली. तीन वर्षांनंतरही त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात आपल्या सरकारी यंत्रणेला अजून यश आलेले नाही. मात्र यामुळे अंनिसचे कार्यकर्ते खचले नाहीत याउलट ते अधिक जोमाने आपल्या जनजागृतीच्या कार्याचा गाडा पुढे रेटत आहेत. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या उक्तीचा अनुभव घेत पुढे चाललेल्या या चळवळीचं पुढचं पाऊल आहे ‘रिंगणनाट्य’. मारेकऱ्यांचा निषेध करणे, विवेकी विचारासाठी लोकांना प्रवृत्त करणे यासाठी जे वेगवेगळे मार्ग कार्यकर्त्यांनी निवडले त्यापैकी एक प्रभावी मार्ग म्हणजे रिंगणनाट्य. या नाट्यचळवळीचा प्रचार अधिक जोमाने व्हावा आणि डॉ. दाभोलकरांना त्यांच्याच विचारांद्वारे आदरांजली वाहण्यासाठी झी मराठीच्या ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर रिंगणनाट्यच्या सदस्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले. यामध्ये रिंगणनाट्यची संकल्पना मांडणारे दिग्दर्शक अतुल पेठे , डॉ. दाभोलकरांचं कार्य नेटाने पुढे नेणारे त्यांचे चिरंजीव डॉ. हमीद आणि कन्या मुक्ता दाभोलकर यांचा सहभाग असणार आहे. येत्या १८ ऑगस्टला रात्री ९.३० वा. हा विशेष भाग झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.

प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील अं. नि. स. चे कार्यकर्ते आणि तरुण नाटकवेडे कलाकार यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. यामधून हा विचार नाटकरूपाने लोकांपर्यंत घेऊन जाण्याची इच्छा असलेले १६ गट तयार झाले. मुंबई, पुणे, जळगाव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर ते पार शहद्यापर्यंतचे गट यामध्ये आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व बहुतेक तालुक्यांत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शाखा असल्याने हे गट तयार करणे तसेच नाटक बसल्यानंतर गावोगावी रिंगणनाट्याचे कार्यक्रम करणे हे त्यामुळे सुलभ झाले.

विविध गावांमध्ये विविध गटांद्वारे याचे प्रयोग होत आहेत. या पैकी इस्लामपूर येथील गटाने क्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम हे रिंगणनाट्य बसवले. पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये आणि अगदी दिल्लीमध्येही हा रिंगणनाट्याचे अनेक प्रयोग झाले आहेत. यातील एक छोटी नाटीका ‘चला हवा येऊ द्या’ मधून सादर होणार आहे. याशिवाय डॉ. हमीद आणि मुक्ता तसेच अतुल पेठे या नाट्यचळवळीची माहितीही देणार आहेत. येत्या मंगळवारी १८ ऑगस्टला रात्री ९.३० वा. ‘चला हवा येऊ द्या’ चा हा विशेष भाग प्रसारीत होणार आहे.

स्वतःचा कचरा स्वतःच जिरविण्याचा सुवर्णरत्न गार्डन सोसायटीच्या प्रकल्पाचा आदर्श सर्वांनी घ्यावा-गिरीश बापट.

0
पुणे-आपण निर्माण केलेला कचरा आपणच जिरवला पाहिजे ही भावना स्तुत्य असून शहरातील अन्य गृह्संकुलांनी ही याचा आदर्श घ्यावाअसे आवाहन पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी येथे केले
कर्वेनगर मधील सुवर्णरत्न गार्डन सोसायटीने उभारलेल्या ओला कचरा विघटन
प्रकल्पाचे उद्घाटन पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना बापट म्हणाले ‘२०० सदनिका असणार्या सोसायटीने सामाजिक जाणीवेतून हा प्रकल्प उभारला आहे,यासाठी सोसायटीला दहा लाख रुपये खर्च आला आहे,मात्र  आपण निर्माण केलेला कचरा आपणच जिरवला पाहिजे ही भावना स्तुत्य असून शहरातील अन्य गृह्संकुलांनी ही याचा आदर्श घ्यावा व असे प्रकल्प उभारावेत,मी पालक मंत्री झाल्यापासून शहरातील ज्या प्रमुख समस्या सोडविण्याचा निर्धार केला आहे त्यात कचरा समस्या,वाहतूक समस्या,सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे,मेट्रो यासारखे अनेक विषय आहेत,मात्र सर्वात गुंतागुंतीची समस्या कचऱ्याची असून यासाठी नागरिकांनी ही पुढाकार घेतला पाहिजे.आज जरी या प्रकल्पासाठी खर्च झाला असला तरी मनपा करात ५% सवलत सर्व सदनिका धारकांना मिळणार असून यातून निर्माण होणारे खात विकून ही खर्च भागवता येणार आहे.आम्ही गेल्या सहा महिन्यात सुमारे पासष्ठ हजार मेट्रिक टन कचरा खत म्हणून पुणे परिसरातील शेतीत पुरविला आहे असे ही ते म्हणाले.कचऱ्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्यापेक्षा असे प्रकल्प उभारणे श्रेयस्कर आहे.सुका कचरा गोळा करण्याच्या व त्याचे मार्केटिंग करण्याच्या संदर्भात ही आमची चर्चा सुरु असून इच्छा शक्ती असली तर सगळे प्रश्न सुटतात,आणि सर्व प्रश्न सोडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खा.अनिल शिरोळे म्हणाले आपली संस्कृती खूप चांगली आहे असे म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेतो मात्र आपला कचरा दुसऱ्याच्या दारात टाकू नये ही आपली संस्कृती आपण अनेक वेळा विसरतो,मात्र या गृहसंकुलातील नागरिकांनी व अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांनी ही संस्कृती जोपासली याबद्दल त्यांचे अभिनंदन.पुण्यात कचऱ्याची समस्या मोठी आहे,मात्र याच्या सोडवणुकीसाठी  पुणे महापालिकेने व नागरिकांनी अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे.ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे जे काम नागरिकांकडून अपेक्षित आहे ते आपण सुजाण  नागरिक म्हणून केले पाहिजे.आपले पुणे स्वच्छतेच्या बाबतीत देशात एकतिसावी आहे.त्यामुळे केंद्र शासनाचे स्वच्छतेचे अनुदान जर आपल्याला मिळावे असे वाटत असेल तर आपला कचरा आपल्या भागातच जिरवला जाईल यासाठी काम करणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले.
यावेळी बोलताना  आ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या की मी कचरा विघटन प्रकल्प व जलपुनर्भरण प्रकल्पांसाठी सर्वतोपरी मदत करेन.मी काही सोसायत्यांमध्ये गांडूळ खत प्रकल्पासाठी मदत केली असून नुकतीच एका सोसायटीस असा प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान दिले आहे.नजीकच्या काळात कोथरूड मध्ये अनेक ठिकाणी असे प्रकल्प उभारण्यास मी कटिबद्ध आहे,
सुवर्णरत्न गार्डन सोसायटीतील प्रकल्प उभारणारे earth care equipments चे रमेश वाघ यांनी या प्रकल्पाच्या वैशिष्ठ्यांची माहिती देतानाच १२०० स्क़.फुट,जागा उपलब्ध केल्यास १० टन प्रती दिन पर्यंतचा कचरा जिरविण्याचा प्रकल्प आपण उभारू शकतो असे सांगितले.या वेळी ,कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त उमेश माळी,प्रसिद्ध नाट्य कलावंत श्रीकांत मोघे,संदीप खर्डेकर,रवि अनासपुरे,डा.संदीप बुटाला,बापू मेंगडे,मंदार घाटे,गणेश पासलकर,प्रशांत हरसुले.दिलीप उंबरकर,शिवराम मेंगडे  इ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी केले तर अशोक खांडेकर यांनी सूत्र संचालन व ए.रमेश राय यांनी आभार मानले.

‘ज्योती कुलकर्णी फाउंडेशन’तर्फे विनामुल्य पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन

0
पुणे : महिलांच्या  सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यातून इतर महिलांनीही प्रेरणा घ्यावी यासाठी ‘ज्योती कुलकर्णी फाउंडेशन’तर्फे महिलांसाठी पुष्परचनेवर आधारित विनामुल्य कार्यशाळेचे येत्या शनिवारी  २२ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दुपारी ४ ते ६ या वेळेत म्हात्रे पुलाजवळील रॉयल पार्क, डी.पी. रोड येथे पुष्परचनाकार सरोज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
 
“महिलांच्या  सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना नेहमी स्वावलंबी बनविण्याचा ‘ज्योती कुलकर्णी फाउंडेशन’ चा  हेतू असतो. या कार्यशाळेद्वारे महिला अधिकाधिक आकर्षक पुष्परचनेचे प्रकार शिकू शकतील व सणासुदीला त्याप्रकारे सजावट करू शकतील.”  अशी माहिती फाउंडेशन च्या विश्वस्त अश्विनी देशपांडे यांनी दिली.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी महिलांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही यामुळेच जास्तीतजास्त महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा व इच्छुकांनी ०२० – ६६०४७१०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील अश्विनी देशपांडे यांनी केले आहे.      

अण्णाभाऊ साठे यांच्या मानवतेचा संदेशामुळे मागासवर्गीय समाज मुख्य प्रवाहात -राधाकृष्ण विखे पाटील

0

2 3

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  मानवतेचा संदेशामुळे  मागासवर्गीय समाज  मुख्य प्रवाहात आला आहे परंतु , सध्या काही जातीयवादी पक्षाकडून  जातीयवादाचे विष पेरण्याचे काम करून समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे , असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले .

   महात्मा फुले पेठमधील सावित्रीबाई फुले स्मारकमधील सभागृहात मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित ” समाजाचा प्रबोधन मेळावा ” व गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव समारंभ ते बोलत होते . मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून व  महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले . या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे , विशेष उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे  प्रवक्ते सचिन सावंत , माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड ,मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे , उपाध्यक्ष अप्पा उकरंडे शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी , नगरसेविका लता राजगुरू , मातंग एकता आंदोलनाचे पुणे शहर अध्यक्ष सुरेश अवचिते , मुख्य समन्वयक विठ्ठल थोरात , महिला आघाडी प्रमुख सुरेखा खंडाळे , संघटनेचे राज्य भरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते टेब , अण्णाभाऊ साठे यांचे खंड देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला .

       यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी  सांगितले कि , अण्णाभाऊ साठे यांनी समाजव्यवस्थेला बदलण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान दिले . समाजात विचाराने क्रांती घडवून आणली , समाजाला जनजागृत करण्याचे काम त्यांनी केले . अण्णाभाऊनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान विसरता कामा नये . पहिल्या दलित साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते . सध्याच्या माध्यमांनी अतिरिकेंच्या फाशीच्या बातम्या दाखवण्यापेक्षा अण्णाभाऊ साठे यासारख्या महापुरुषांचे जीवनपट दाखवले पाहिजे . मातंग समाज नेहमीच कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहिला आहे , विरोधी पक्षाच्या नात्याने आपल्या मागण्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले .

    यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे  प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले कि , महाराष्ट्राला युगपुरुषांनी जे चित्र निर्माण केले ते चित्र तसे उभे राहण्याची गरज आहे परंतु गोळ्वलकर गुरुजींच्या विचाराचे चित्र महाराष्ट्रात उह्जे राहत आहे . शिक्षकांना रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण केंद्रात वेगळ्या प्रकारचे  प्रशिक्षण दिले जात आहे . सर्व ठिकाणी संघाची लोक भरण्याचे काम चालू आहे . नथुराम गोडसे यांचे मंदिर बांधण्याचे काम चालु आहे . यांचा विचार काय आहे ? या जातीयवादामुळे प्रगती खुंटली आहे . मनुस्मृतीच्या विचारांच्या धारेतून आलेली लोकांची सत्ता व गोळ्वलकर गुरुजीच्या विचार धारेतून आलेली सत्ता समाजाला कोठे नेणार आहे ? अण्णाभाऊ साठेचे साहित्य जागतिक स्तरावर २७ भाषामधून प्रकाशित झाले आहे . अण्णाभाऊनी काटेरी आयुष्यातून निवडुंग फुलविण्याचे काम केले आहे . त्यामुळे अण्णाभाऊच्या विचारांनी प्रेरित असलेले रमेश बागवे यांचे नेतृत्वाची वाट मातंग समाज बघत आहे .

    मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांनी सांगितले  कि , मातंग समाजाने लोकसंख्येच्या प्रमाणात स्वंतत्र आरक्षण मागत आहे . मातंग आयोग , भूमिहीन शेतकरी बांधवाना जमीन , सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची मागणी करण्यात येत आहे . समाजाला सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , आर्थिक न्याय मिळाला पाहिजे . प्रामाणिकपणे वागणारा समाज आहे . समाज बांधव कष्टाचे जीवन जगत आहे . समाजातून सर्वोच्च पदावर जो पर्यंत जात नाही तो पर्यंत काम केले पाहिजे . मातंग समाज आता पिवळ्या झेंड्याखाली एकत्र येत आहे .

     मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांनी आपल्या भाषणात सांगितले कि , मातंग एकता आंदोलनाच्या माध्यमातून अडचणी न मांडता कृतीतून समाजासाठी काम केले आहे . त्यासाठी समाजासाठी असणारी तळमळ व्यक्त करण्यासाठी आपण आपली ताकद उभी केली पाहिजे. मातंग एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन समाजबांधवांची कामे केली पाहिजेत .

    यावेळी माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांनी सांगितले कि , शासनाने मागासवर्गीय बांधवांचे प्रश्न मांडलेले नाही या सरकारला मागासवर्गीय समाजाची जाण राहिलेली नाही . त्यामुळे अछे दिन ज्या वेगाने आलेले आहेत्याच वेगाने जाणार असून बुरे दिन येणार आहे.

    या मेळाव्याचेप्रास्ताविक  विठ्ठल थोरात यांनी केले तर सूत्रसंचालन रमेश सकट यांनी केले तर आभार सुजित यादव यांनी मानले . राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली .

उत्स्फूर्त लोकसहभागामुळे जलयुक्त शिवार अभियानाचे कार्य प्रशंसनीय -पालकमंत्री विजय शिवतारे

0

11892258_1599193513675264_184439952507356109_n
सातारा (जिमाका):- राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन याचबरोबर लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाचे कार्य प्रशसंनीय ठरले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काढले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कामांचा जलपूजन समारंभ पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते आज शिंदेवाडी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा अधीक्षक कृ षी अधिकारी जितेंद्र शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, शिंदेवाडीच्या सरपंच अर्चना मनवे, कृषी, पाटबंधारे, महसूल विभागातील अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असला तरी दुष्काळी भागातील जनतेच्या दृष्टीने याला विशेष महत्व आहे. त्यामुळे आज येथे जलपूजन करीत असताना जलदेवतेची कृपा या भागावर अशीच राहू दे, अशी कामना केल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, जलसंधारणाच्या कामाला सरकारने विशेष प्राधान्य दिले असून यामुळे दुष्काळी भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे या भागातील जनतेला दीर्घकालीन लाभ मिळणार आहे. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री. शिवतारे पुढे म्हणाले की, पुढील काळात जलसंधारण आयुक्तालय उभारुन या क्षेत्रातील सर्व कामे एका छत्राखाली व्हावीत या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे.
जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी शिंदेवाडी गावातील नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे जलयुक्त शिवार अभियानाचे काम केल्याबद्दल गावकऱ्याचे अभिनंदन करुन पाण्याचा योग्य वापर केला तर काय घडू शकते याचं उदाहरण या गावाने सर्वांपूढे ठेवले आहे, असे सांगून यापुढेही येथे असेच एकदिलाने हे कार्य पुढे चालू ठेवले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार श्री.भोसले यांनी राज्य शासन, पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांनी खोऱ्याच्या विकासासाठी आणि या भागातील जनतेच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य केले जात असल्याबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी ग्रामस्थांतर्फे पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, अन्य शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला

५ वर्षानंतर ऐश्वर्या चे पुनरागमन

0

Jazbaa

मुंबई : माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चनआणि इरफान खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जज्बा’ चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहेसंजय गुप्ता दिग्दर्शित ‘जज्बा’ हा चित्रपट क्राईम स्टोरी असल्याचं सांगण्यात येते . गुप्ता यांनी ट्विटरवरुन चित्रपटाचं पोस्टर लाँच केलं. आता तब्बल ५ वर्षांच्या ब्रेक नंतर ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहे ‘जज्बा’ चित्रपटात शबाना आझमी, जॅकी श्रॉफ, अतुल कुलकर्णी, अभिमन्यू सिंग यांच्याही भूमिका आहेत. ‘जज्बा’ 9 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.विशेष म्हणजे ऐश्वर्याचं बॉलिवूडमधील पदार्पण असलेला ‘और प्यार हो गया’ हा 1997 मध्ये याच तारखेला प्रदर्शित झाला होता..आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने ब्रेक घेतला होता. काही जाहिराती आणि फॅशन शोमध्ये ऐश्वर्याचं दर्शन घडलं तरी मोठ्या पडद्यावर तिचे दर्शन होणे बंद झाले होते हृतिकसोबत केलेल्या ‘गुजारिश’ चित्रपटानंतर तब्बल 5 वर्षांच्या अंतराने ऐश्वर्या आता मोठ्ठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

उद्धव-राज पाठीशी असतानाही ;शिवशाहीरांना मोठा विरोध …

0

पुणे-मनसे चे राज ठाकरे , शिवसेनेचे उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे अजित पवार अशां मोठ मोठ्ठ्या नेत्यांचा पाठींबा असतानाही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ला विरोध करणाऱ्यांची यादी वाढतच चालली  आहे आता त्यात ‘ज्ञानपीठ’ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची भर पडली आहे डॉ. नागनाथ कोतापल्ले, विद्या बाळ, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे आदींचा विरोध करणाऱ्यात समावेश आहे..
‘बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचं केलेलं चित्रण इतिहासाला धरून नाही. त्यामुळं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये,’ असं स्पष्ट मत नेमाडे यांनी व्यक्त केलं आहे.
‘बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी अजिबात शंका घेता येणार नाही. त्यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. मात्र, शिवाजी महाराजांबद्दलची आमच्या मनात असलेली प्रतिमा वेगळी आहे. बाबासाहेबांचं शिवरायांविषयीचं लेखन आमच्या आकलनात बसत नाही,’ असं नेमाडे यांनी म्हटलं आहे.नेमाडे यांच्याबरोबच साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध दर्शवणारे एक निवदेन  डॉ. नागनाथ कोतापल्ले, विद्या बाळ, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे आदीं मान्यवरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

‘आपले सरकार’ पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ

0

मुंबई -जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व सूचना ऑनलाईन पद्धतीने थेट शासनासमोर मांडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. जनतेला ऑनलाईन सेवा देण्याच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर आपले सरकार हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले होते. या उपक्रमाचा पहिला टप्पा 26 जानेवारी 2015 रोजी जनतेसाठी सुरू करण्यात आला होता. नागरिकांकडून मंत्रालय स्तरावरील 10000 तक्रारी आजपर्यंत प्राप्त झाल्या असून त्यापैकी 78 टक्के तक्रारींचा निपटारा झाला आहे. पोर्टलवर मिळणाऱ्या प्रतिसादानुसार नागरिकांच्या तक्रारींचे समाधानकारक निपटाऱ्याचे प्रमाण 84.5 टक्के इतके लक्षणीय आहे. आता ही सेवा जिल्हास्तरावर विस्तारण्यात आली आहे. पथदर्शी तत्त्वावर राबविण्यात येणारा हा उपक्रम सुरुवातीला सहा जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून त्यामध्ये ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. हळूहळू हा उपक्रम ३० जिल्ह्यात सुरु करण्यात येईल.

राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते पुण्यात ध्वजवंदन समारंभ

0
पुणे ( ‘महान्यूज’): भारतीय स्वातंत्र्याच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात ध्वजवंदन झाले. विधानभवन परिसरात सकाळी नऊ वाजता झालेल्या या शानदार समारंभास पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राव यांचे सकाळी नऊ वाजता विधानभवन येथे आगमन होताच पालकमंत्री श्री. बापट आणि विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपाल श्री. राव यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार सर्वश्री भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जयदेव गायकवाड, आमदार माधुरी मिसाळ, आमदार नीलम गोऱ्हे, माहिती आयुक्त रवींद्र जाधव, पोलीस आयुक्त के.के. पाठक, कृषी आयुक्त विकास देशमुख, शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजीव जाधव, नोंदणी महानिरीक्षक एन. रामास्वामी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक जय जाधव आदी उपस्थित होते.
समारंभानंतर श्री. चोक्कलिंगम, अतिरिक्त आयुक्त श्याम देशपांडे, श्री. रामास्वामी, पीसीएनटीडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ऐतिहासिक शनिवारवाडा येथे ध्वजवंदन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

 

महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविणार- मुख्यमंत्री

0
मुंबई (‘महान्यूज’) : राज्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडविण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वजारोहण समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, आमदार विनायक मेटे, आमदार राज पुरोहित, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक, राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया, पोलीस महासंचालक संजीव दयाल, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया, तिन्ही सेना दलाचे प्रमुख यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
१४ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा
शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता आहे. पण मागील काही काळात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला सावरण्यासाठी राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये सुमारे ६० लाख शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना सुरु करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. यात मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांचा तर विदर्भातील ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. यात शेतकऱ्यांना ३ रुपये किलो दराने तांदूळ तर २ रुपये किलो दराने गहू उपलब्ध करुन दिला जाणार आहे. बळीराजावर संकट आले तरी तो उपाशी राहू नये, यासाठी ही योजना सुरु करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
‘जलयुक्त शिवार’मध्ये मोठा लोकसहभाग
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गेले काही दिवस निसर्गाची अवकृपा झाली आहे. शेतकरी संकटात आहे. पण राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पहिल्या वर्षीचे पूर्ण तर पुढील चार वर्षाचे अर्धे व्याज राज्य शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील ही सर्वात मोठी लोकसहभागाची योजना आहे. या योजनेतून पुढील पाच वर्षांत साधारण २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात दीड लाख शेततळी तर एक लाख विहिरी बांधण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले. याशिवाय राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना मार्च २०१६ पर्यंत विजेची जोडणी उपलब्ध करुन दिली जाईल.
महाराष्ट्राला ‘महाउद्योग राज्य’ बनविण्याचा निर्धार
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात उद्योग क्षेत्रात सुमारे ६० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातील मोठी गुंतवणूक राज्यात प्रत्यक्षात झालीही आहे. यातून साधारण एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन निर्मितीवर राज्यात भर दिला जाणार आहे. महाराष्ट्राला महाउद्योग राज्य बनविण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून यातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
‘आपले सरकार’वर महसुली मुख्यालये
शासनाचा कारभार अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने खरेदीची नवीन पद्धती स्विकारली आहे. लोकांना वेळेत सेवा मिळावी यासाठी शासनाने सेवा हमी विधेयकही संमत केले आहे. ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर सुमारे एक लाख तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील साधारण ८५ हजार तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. या वेबपोर्टलवर आता महसूली मुख्यालयांचाही समावेश केला जाणार असून आज त्याचा शुभारंभ होत आहे, असे त्यांनी सांगितले.
१६ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश
मुख्यमंत्री म्हणाले, वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नरत आहे. राज्यातील साधारण २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमधून शिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेतून आतापर्यंत साधारण १६ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना भरती करण्यात आले आहे. मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र शासनामार्फत जागा मिळाली आहे. बाबासाहेबांचे लंडनस्थित घर विकत घेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. हे काम निश्चित वेळेत पूर्ण केले जाईल. हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष आहे. शासन हे वर्ष ‘समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरा करेल, असे ते म्हणाले.
मुंबईत ऑक्टोबर २०१६ पर्यंत ६ हजार सीसीटीव्ही
राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबद्ध आहे. विशेषतः महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुण्यात सीसीटीव्ही सुरु करण्यात आले असून मुंबईतही ऑक्टोबर २०१६ पर्यंत साधारण ६ हजार सीसीटीव्ही बसविण्यात येतील. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून राज्यात अपराधसिद्धीचा दर वाढत आहे, असे ते म्हणाले.
नागपूर-मुंबई दरम्यान कम्युनिकेशन सुपर एक्स्पेस वे
नागपूर-मुंबई दरम्यान कम्युनिकेशन सुपर एक्स्पेस वे बांधण्यात येणार आहे. या मार्गावर फायबर ऑप्टिक टाकण्यात येणार आहे. ८०० किमीचे हे अंतर साधारण १० तासात पूर्ण करता येईल. यामुळे राज्यातील व्यापार, उद्योग आणि आयात-निर्यातीला चालना मिळेल. शासनाने नागरीकरणाला आव्हान न समजता संधी म्हणून स्विकारले असून केंद्र शासनाच्या सहभागातून राज्यातील १० शहरे ‘स्मार्ट शहरे’ बनविली जाणार आहेत. पायाभूत सुविधा, रोजगारांनी युक्त ही शहरे जागतिक शहरांशी स्पर्धा करणारी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोस्टल रोड, मेट्रो रेल्वे, जलमार्गांची निर्मिती वेगाने होण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे सहकार्य लाभत आहे. छोट्या वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मराठीला राजभाषेचा दर्जा
आपली मायबोली असलेल्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी विधीमंडळात कायदा संमत करण्यात आला आहे. तसेच शिक्षणाचे बाजारीकरण रोखण्यासाठी फी नियंत्रण कायदाही संमत करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

 

पुण्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण…विविध कार्यक्रम…

0

1 2

कोथरूड येथील भुसारी कॉलनी व  सवंगडी संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

 

स्वातंत्र्य दिनी आझम कॅम्पस मध्ये ‘ देशाच्या प्रगतीत युवा पिढी चे योगदान ‘ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम 

unnamed
स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एजुकेशन सोसायटी (आझम कॅम्पस ) मध्ये मुनवर पिरभोय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष पी ए इनामदार होते . विद्यार्थ्यांनी यावेळी ‘ देशाच्या प्रगतीत युवा पिढी चे योगदान ‘ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले
  पुणे महापालिकेतर्फे संघर्ष सोशल फौंडेशनचे अध्यक्ष चैतन्य पुरंदरे यांचा सत्कार
1
 येथील सामाजिक युवा संघटना संघर्ष सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चैतन्य पुरंदरे यांचा पुणे महापालिकेतर्फे पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सत्कार करण्यात आला.
 पुरंदरे यांनी संघर्ष सोशल फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक व नागरी कार्याबद्दल महापालिकेतर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
 महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृह नेते शंकर केमसे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनी अजित पवार यांच्या उपस्थितीत नेत्र तपासणी शिबीर 

1 2

कृष्ण दृष्टी स्पेशालिटी हॉस्पिटल  आणि एक्सिस क्लिनिक च्या वतीने बारामती येथे आंतर राष्ट्रीय ख्यातीचे नेत्र तज्ञ  डॉ रमेश मूर्ती यांच्या नेत्र तपासणी शिबिरात ३०० जण सहभागी झाले . माजी उप मुख्य मंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले .   डॉ अपर्णा काटे,डॉ महेश काटे यांनी संयोजन केले .
 यावेळी अजित पवार यांनी डॉ रमेश मूर्ती यांचा सत्कार केला .
नेशनल पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांचे वक्तृत्व सादरीकरण 
दीपक बिडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण 
unnamed
नेशनल पब्लिक स्कूल ,कात्रज येथे स्वातंत्र्य दिनी  ‘सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह ‘ चे  अध्यक्ष दीपक बिडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी विध्यार्थ्यांनी विविध विषयांवर वक्तृत्व सादरीकरण केले . संस्थेचे अध्यक्ष एड . तारिक अन्वर पटेल , तमन्ना इनामदार ,देवेंद्र लोहोकरे ,प्रकाश खेडकर ,भानुदास मांगडे ,प्रकाश इंगळे उपस्थित होते