कोथरूड येथील भुसारी कॉलनी व सवंगडी संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
स्वातंत्र्य दिनी आझम कॅम्पस मध्ये ‘ देशाच्या प्रगतीत युवा पिढी चे योगदान ‘ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम
स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एजुकेशन सोसायटी (आझम कॅम्पस ) मध्ये मुनवर पिरभोय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष पी ए इनामदार होते . विद्यार्थ्यांनी यावेळी ‘ देशाच्या प्रगतीत युवा पिढी चे योगदान ‘ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले
पुणे महापालिकेतर्फे संघर्ष सोशल फौंडेशनचे अध्यक्ष चैतन्य पुरंदरे यांचा सत्कार
येथील सामाजिक युवा संघटना संघर्ष सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चैतन्य पुरंदरे यांचा पुणे महापालिकेतर्फे पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सत्कार करण्यात आला.
पुरंदरे यांनी संघर्ष सोशल फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक व नागरी कार्याबद्दल महापालिकेतर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृह नेते शंकर केमसे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनी अजित पवार यांच्या उपस्थितीत नेत्र तपासणी शिबीर
कृष्ण दृष्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एक्सिस क्लिनिक च्या वतीने बारामती येथे आंतर राष्ट्रीय ख्यातीचे नेत्र तज्ञ डॉ रमेश मूर्ती यांच्या नेत्र तपासणी शिबिरात ३०० जण सहभागी झाले . माजी उप मुख्य मंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले . डॉ अपर्णा काटे,डॉ महेश काटे यांनी संयोजन केले .
यावेळी अजित पवार यांनी डॉ रमेश मूर्ती यांचा सत्कार केला .
नेशनल पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांचे वक्तृत्व सादरीकरण
दीपक बिडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशनल पब्लिक स्कूल ,कात्रज येथे स्वातंत्र्य दिनी ‘सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह ‘ चे अध्यक्ष दीपक बिडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी विध्यार्थ्यांनी विविध विषयांवर वक्तृत्व सादरीकरण केले . संस्थेचे अध्यक्ष एड . तारिक अन्वर पटेल , तमन्ना इनामदार ,देवेंद्र लोहोकरे ,प्रकाश खेडकर ,भानुदास मांगडे ,प्रकाश इंगळे उपस्थित होते