सातारा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणारा समारंभ स्थगित करा . अशी मागणी छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्याने आता १९ ऑगस्ट चा समारंभ होतो किंवा नाही .. कि पुरस्कार नाकारून पुरंदरे हेच हा विषय संपवतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरुन महाराष्ट्रात उभी फूट पडली आहे. पुरंदरेंना पुरस्कार देण्यास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाम विरोध केला आहे. शिवाय, महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनीही पुरंदरेंना पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला आहे. या वादात आता राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनीही उडी घेतली आहे. पुरंदरेंना देण्यात येणाऱ्या पुरस्कार स्थगित करावा, अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी पुरस्कार देण्यास पाठिंबा दिला होता.बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या शिवरायांच्या इतिहासावर आक्षेप घेतले जात आहेत आणि त्या आक्षेपात काही प्रमाणात तथ्य असल्याचं आमचं मत आहे. त्यामुळे, या आक्षेपांची तपासणी करुन जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्थगित ठेवावा, अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे.