पुणे- गणेश मंडळांनी ढोल वाजविताना लोखंडी टोल वाजवू नये असा आदेश असताना आणि पोलिसांनी त्याबाबत समाज देवूनही त्यांना न जुमानता टोल वाजवून बेकायदा कृत्य केल्याबद्दल खडकी पोलिसांनी मानाजी बाग सार्वजनिक मंडळाचे गोविंद पांडुरंग निंबाळकर आणि ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे पोलीस नायक किरण घुटे यांनी याबाबत ताक्रात नोंदविली आहे .
विसर्जन मिरवणुकीत ८० हजाराच्या सोनसाखळ्या गायब ..
पुणे- विसर्जन मिरवणूक पाहत असताना दोन मित्रांच्या गळ्यातील २ सोनसाखळ्या भर गर्दीत म्हणजे जिथे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती बसतो तिथे … फिरताना अज्ञात चोरट्याने लांबविल्या .. हा प्रकार रात्री पावणेआठ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान झालायचे पोलिसांनी सांगितले
सचिन मांढरे (वय ४६ रा. कोथरूड )यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली आहे हनुमंत गोरख कांबळे (वय ३८ रा. इंदिरानगर , बिबवेवाडी ) यांच्यासह ते फिरत असताना या दोघांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविण्यात आल्या . विश्रामबाग पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक रावूत याप्रकरणी तपास करीत आहेत
विसर्जन घाटावरील तैनात असणारे जीवरक्षक व सुरक्षारक्षकांना अल्पोपहार
पुणे कॅम्प भागात सोलापूर बाजारात कालव्याजवळ गणेश विसर्जन घाटावरील तैनात असणारे जीवरक्षक व सुरक्षारक्षकांना नगरसेवक विवेक यादव यांच्याहस्ते अल्पोपहार देण्यात आला . या कार्यक्रमाचे संयोजन नितीन आडसुळे यांनी केले होते . दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला . यावेळी जीवरक्षक रामचंद्र गायकवाड , मोहन आवटे . विशाल दगडे , महेंद्र महामुनी , प्रमोद चव्हाण , सुरक्षारक्षक सचिन धोत्रे , फईम शेख ,मोहसीन शेख आदीनी अल्पोपहाराचा लाभ घेतला . या कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी बाबूलाल जग्गीड , मनोहर परदेशी , राजू साळुंके , आनंद शितोळे ,साळवे , सुनील कांबळे आदींनी केले होते 
भोसरीमध्ये कारखान्यात वीजचोरी उघड; गुन्हा दाखल
पुणे, दि. 29 : भोसरी एमआयडीसीमध्ये सिपी पॉलीयुरेटिन्स प्रा. लि. या कंपनीत वीजमीटरमध्ये फेरफार करून 30,000
युनिटस्च्या 3,59,220 रुपयांची वीजचोरी झाल्याचे नुकतेच उघड झाले. याप्रकरणी महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे
याबाबत माहिती अशी, की भोसरी एमआयडीसीमधील सिपी पॉलीयुरेटिन्स प्रा. लि. ही कंपनी
महावितरणची उच्चदाब वीजग्राहक आहे. या कंपनीत विजेच्या वापराची नोंद होऊ नये यासाठी वीजमीटरमध्ये फेरफार
करण्यात आल्याचे निदर्शनात आले. सिपी कंपनीने मीटरमध्ये फेरफार करून 26 मार्च ते 20 एप्रिल 2015 या कालावधीत
30,000 युनिटस्च्या विजेची चोरी केल्याचे आढळून आले आहे. या वीजचोरीप्रकरणी सिपी कंपनीला 3,59,220 रुपयांचे
देयक देण्यात आले व त्याचा कंपनीने भरणा केला आहे. तथापि वीजचोरी केल्याप्रकरणी सिपी कंपनीचे संचालक सुभाष
सिपी तसेच एस. बी. घोरपडे, एस. बी. गायकवाड व इतर यांच्याविरुद्ध महावितरण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 24)
भारतीय विद्युत कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे शहरात गणेशोत्सवामध्ये ‘डायल 108’ सेवेच्या वतीने 56 रूग्णांना मदतीचा हात
पुणे लष्कर भागात सात तासात शांततापूर्ण वातावरणात विसर्जन मिरवणूक संपन्न
पुणे लष्कर भागात सात तासात शांततापूर्ण वातावरणात विसर्जन मिरवणूक संपन्न झाली . लष्कर भागातील मानाचा समजला जाणारा कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीचा प्रारंभ सेंटर स्ट्रीटवर परिमंडल २ चे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . यावेळी लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीषक बरकत मुजावर , कामाठीपुरा मंडळाचे अध्यक्ष प्रसाद केदारी व अन्य मान्यवर उपस्थित होते . या कामाठीपुरा मंडळाने विद्युत रोषणाईच्या सजावटीत आपल्या श्री ची मूर्ती विराजमान केली होती . या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भगवे फेटे घातल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते . या मंडळानतर पापा वस्ताद वीर शैव लिंगायत गवळी समाज गणेशोत्सव मंडळ . ताबूत स्ट्रीट गणेशोत्सव मंडळ , हिंद तरुण मंडळ , नवयुग तरुण मंडळ , श्री गणेश उत्सव मंडळ , शिवशक्ती कमलमळा तरुण मंडळ , आशीर्वाद मित्र मंडळ , नवयुग सुवर्णकार मित्र मंडळ , सुयोग मित्र मंडळ , धोबीघाट मित्र मंडळ ट्रस्ट , उत्सव सवर्धंक संघ , कुंभारबावडी स्थायिक सेवा मंडळ , राजेश्वर तरुण मंडळ , श्रीकृष्ण तरुण मंडळ , नंदनवन तरुण मंडळ , कुंभारबावडी तरुण मंडळ , नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळ , श्री नवचैतन्य मंडळ , श्री साईनाथ गणेशोत्सव मंडळ , अशोक चक्र मंडळ आदी मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती .
यामध्ये हिंद तरुण मंडळाने पंजाबी गीतांवर भांगडा नृत्य सादर केले . तरुण हिंद गर्जना पथकाने भोपळे चौकात सर्वाचे लक्ष वेधून घेतले . श्री साईनाथ मंडळाने फुलांच्या सजावटीत श्री ची मूर्ती विराजमान केली होती . साईनाथ मंडळ दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पुणे शहरातील टिळक रोडवरच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते . अनेक मंडळानी फुलांची सजावट केली होती . कामाठीपुरा स्थायिक मंडळाने एल ई डी मधील स्टारचा विद्युत रोषणाईचा देखावा सादर केला . तर पापा वस्ताद मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आपल्या पारंपारिक नृत्याने मिरवणुकीत कार्यकर्ते सहभागी झाले .
विसर्जन मार्गावर सेंटर स्ट्रीट पोलिस चौकीसमोर पुणे कॅंटोन्मेंट शांतता समितीने सर्व गणेश मंडळाचे श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब गानला यांच्याहस्ते स्वागत केले . तर अल कुरेश व्यापारी संघटनेच्यावतीने कुरेश नगरचौकात सर्व गणेश मंडळाचे श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अबरार कुरेशी व पुणे शहर अध्यक्ष हसन कुरेशी यांच्याहस्ते स्वागत केले . पुलगेट पोलिस चौकीमध्ये पोलिस मित्र संघटना पुणे कॅंटोन्मेंट विभागाच्यावतीने पोलिस बांधवाना अल्पोहाराची पाकिटे संघटनेचे पुणे कॅंटोन्मेंट विभागाचे अध्यक्ष मनीष सोनिग्रा यांच्याहस्ते करण्यात आले .
विसर्जन मिरवणुकीतील पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार मंडळांना गणेश प्रतिमा भेट
शाकाहारीं विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या प्रशिक्षणाच्या मागणीसाठी विसर्जन मिरवणुकीत जनजागरण
विसर्जन मिरवणुक बंदोबस्तातील पोलिसांना भोजन पाकीटांचे वाटप
भारताची पहिली अंतराळ वेधशाळा ‘अॅस्ट्रोसॅट’ चे उड्डाण …
मुंबई : खगोलशास्त्राला समर्पित ‘अॅस्ट्रोसॅट’ ही भारताची पहिली वेधशाळा अंतराळात सोडण्यात आली. पीएसएलव्ही सी 30 प्रक्षेपकाच्या सहाय्याने, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा प्रेक्षपण स्थळावरून ‘अॅस्ट्रोसॅट’ अवकाशात झेपावलं.‘अॅस्ट्रोसॅट’ ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. अॅस्ट्रोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे अशा प्रकारचा उपग्रह लॉन्च करणारा भारत चौथा देश ठरला आहे.यापूर्वी अमेरिका, रशिया आणि जपानने अशा प्रकारची अंतराळ वेधशाळा लॉन्च केली आहे.1513 किलो इतकं या ‘अॅस्ट्रोसॅट’चं वजन आहे. अॅस्ट्रोसॅटसोबत अन्य सहा विदेश उपग्रहाचं प्रक्षेपणही इस्त्रोने केलं.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे … उद्या सरकारशी चर्चा
पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट तथा ‘एफटीआयआय‘च्या अध्यक्षपदी चौहान यांच्या निवडीच्या निषेधार्थ येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत एक पावूल मागे घेत केलेल्या आवाहनानुसार दखल केंद्र सरकारने घेतली आहे आंदोलक विद्यार्थ्यांना सरकारने चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे हे उपोषण तब्बल 108 दिवस चालू होते. चर्चेच्या निर्णयानंतर काल (रविवार) उपोषण सोडण्यात आले. परंतु, आंदोलन चौहान यांच्याबद्दल निर्णय होईपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात चर्चेसाठी निमंत्रित करीत असल्याचे पत्र केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याच्या सहसचिवांनी दिले. याबाबत 29 सप्टेंबरला मुंबईत ही चर्चा होणार आहे.
पुण्यात डौलाने -थाटामाटात विसर्जन -दगडूशेठ मिरवणुकीला सोमवारी प्रारंभ
पुणे – शहरातील मानाच्या पाचही गणपतींचे गणपतींचे ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात विसर्जन झाले. डेक्कनच्या पांचाळेश्वर घाटावरील कृत्रिम हौदात या मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले. पुण्यातील रस्ते रांगोळ्या, फुलांनी अक्षरश: फुलल्या होत्या. चौकाचौकात भाविकांनी गर्दी केली होती.डेक्कनच्या पांचाळेश्वर घाटावर सर्व गणपतींचं विसर्जन झालं. दरम्यान, यापुढे दरवर्षी हौदातच विसर्जन करण्याचा निर्णय केसरीवाडा गणपती मंडळाने घेतला आहे.


मानाच्या गणपतीचीं दिमाखदार सुरवात
ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता पालखीतून निघाली. तत्पूर्वी महापौर दत्तात्रेय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर आबा बागूल यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. रमणबाग, शिववर्धन या ढोल-ताशा पथकांनी आणि नगारावादनाने मिरवणुकीत खरी रंगत आणली. त्यात प्रभात बॅंडच्या धूनने आणखीनच आनंदाचे रंग भरले. “सत्यम् शिवम् सुंदरम्‘ आणि “बाप्पा मोरया रे बाप्पा मोरयाऽऽ‘ या गीतांवर अनेकांनी ठेका धरला. कामायनी विद्या मंदिर, आर्ट ऑफ लिव्हिंग, सांगलीतील संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठानचे हिंदू धर्मरक्षक पथक आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर “पाणी वाचवा‘चा देखावाही मिरवणुकीत सहभागी झाला होता. मंडळाच्या “श्रीं‘चे दुपारी साडेचारच्या सुमारास नटेश्वर घाटावरील हौदात विसर्जन करण्यात आले.
मानाचा दुसरा गणपती असलेल्या श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या “श्रीं‘ची विसर्जन मिरवणूकही कसबा गणपतीच्या पाठोपाठ वाजत-गाजत टिळक पुतळ्यापासून निघाली. चांदीच्या पालखीत विराजमान झालेली बाप्पांची विलोभनीय मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. याशिवाय, आढाव बंधूंचे नगारावादन, ताल, शिवमुद्रा ढोल पथके आणि न्यू गंधर्व ब्रास बॅंडने मिरवणुकीत रंग भरले. श्रुती मराठे, तेजस्विनी पंडित यांच्यासह इतर मराठी कलावंतांनी ढोल-ताशा वादन करून उत्साह द्विगुणित केला. पारंपरिक वेशभूषेत महिलांबरोबरच अश्वारूढ बालशिवाजी आणि रणरागिनीही आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात साठवून घेण्यासाठी गर्दी झाली होती. दुष्काळामुळे “एक मूठ धान्य दुष्काळग्रस्तांसाठी‘ असे आवाहन करून सामाजिक जाणीवही मंडळाने दाखवून दिली. या मंडळाच्या बाप्पांचे सुमारे पावणेपाचच्या सुमारास विसर्जन करण्यात आले.
मानाचा तिसरा गणपती असलेल्या श्री गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक आकर्षक फुलांच्या शिवरथात काढण्यात आली. हा रथ जवळपास 16 फूट उंच आणि 14 फूट रुंद होता. मिरवणुकीत सहभागी झालेला जयंत नगरकर यांचा सनईचौघडा ऐकण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. तसाच प्रतिसाद अश्वराज बॅंड पथक, चेतक स्पोर्टस क्लब, नादब्रह्म, शिवगर्जना हा ढोलताशा पथकांनाही मिळाला. या पथकांच्या तालावर अनेकांची पावले थिरकत होती. लाल फेटा आणि पांढऱ्या रंगाचा झब्बा या वेशात मंडळाचे पदाधिकारी व पथकांचे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. नेहमीप्रमाणे मंडळाने यंदाही गुलालाची मुक्त उधळण करत आणि प्रत्येक चौकात मनसोक्त नाचत मिरवणूक काढली. परिणामी तब्बल सव्वासहा वाजता टिळक चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास “श्रीं‘चे विसर्जन करण्यात आले.
मानाचा चौथा गणपती असलेल्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाच्या “श्रीं‘ची विसर्जन मिरवणूक विविध वाद्यांच्या निनादात आणि फुलांच्या भव्य, आकर्षक रथात निघाली. मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर दाखल होताच अनेकांचे लक्ष या मिरवणुकीकडे वळले. लोणकर बंधूंचा नगारा, स्व-रूपवर्धिनी, श्री गजलक्ष्मी, हिंद तरुण मंडळ या ढोल-ताशा पथकांनी रंगत आणली. “सहजयोग आजका महायोग‘ हा देखाव्याबरोबरच पुणे डॉक्टर्स असोसिएशनचा अवयव दान जनजागृती रथ, “स्मार्ट सिटी‘चा रथ यांनीही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रथाच्या माध्यमातून पुणे शहर हे “स्मार्ट सिटी‘मध्ये पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे, हा संदेश पोचविण्यात आला, तसेच मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिकेही विद्यार्थ्यांनी सादर केली. मंडळाच्या गणपतीचे साडेसातच्या सुमारास हौदातील पाण्यात विसर्जन करण्यात आले.
मानाच्या पाचवा गणपतीची अर्थात श्री केसरी-मराठा ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या “श्रीं‘ची विसर्जन मिरवणूकही मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिकता सांभाळत फुलांच्या रथात निघाली. बिडवे बंधूंचा सनई-चौघडा, श्रीराम, शौर्य, शिवमुद्रा ही ढोल पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. त्यांच्या कलाविष्काराने मिरवणुकीचा माहोल आणखीनच रंगला. या वेळी इतिहासप्रेमी मंडळांचा “विदेशी कपड्यांची होळी‘ हा देखावाही सादर झाला. लोकमान्य टिळक, वीर सावरकर, क्रांतिरत्न पिंगळे यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते, तर प्रयास संस्थेने सामाजिक विषयावरील पथनाट्य सादर केले. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मागील वर्षी मानाच्या पाचही गणपतींचे साडेपाचपर्यंत विसर्जन झाले
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ रात्री साडेअकराच्या सुमारास बेलबाग चौकातून मार्गस्थ झाले. पाठोपाठ अखिल मंडई मंडळाचे नगारा पथक चौकात आले. त्यांच्यासमोर असलेल्या नादब्रह्म आणि शिवगर्जना या संस्थांचे ढोल पथकांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. उत्साही वातावरणात शारदा-गजाननाच्या “स्वराज्य‘ रथाचे रात्री साडेबारा वाजता बेलबाग चौकात आगमन झाले. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी . सोमवारी रात्री १२.४१ वाजता जागेवरुन निघाला . पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे जल्लोषात आणि भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली.श्रीमंत दगडूशेठ गणेश मंडळाचा विसर्जन रथ ओढण्यासाठी ४ बैल जोडी लावण्यात आल्या आहेत. सोमवारी पहाटे ४ वाजणेच्या सुमारास दगडूशेठ गणपतीचे विसर्जन होणार आहे. दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली असून पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. रात्री १२ नंतर डीजेला परवानगी नाकारण्यात आल्याने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे प्रस्थान होत आहे.





शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री बबनराव लोणीकर
जालना : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असे पीक मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. परंतु समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची गरज असून शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह जालना येथे श्री.गणेश महासंघ व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 32 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बबनराव लोणीकर यांच्या हस्ते साडी, चोळी रोख रूपये 10 हजार प्रत्येकी मदत वाटप करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सुनील आर्दड, अभय करवा, चंपालाल भगत, जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार रेवनाथ लबडे, परतूरचे तहसीलदार विनोद गुंडमवार आदी उपस्थित होते.
श्री. लोणीकर म्हणाले की, राज्यात नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना शासनामार्फत विविध सोई सुविधांचा लाभ देण्याबरोबरच 3 लक्ष रुपये एवढ्या किमतीची एक विहीर व एक शेततळे देण्यात येणार आहे. येत्या काळात सर्व शेतकऱ्यांना सोलर पंपाचे वितरण शासनामार्फत करण्यात येणार आहे. या पंपामुळे शेतकऱ्यांना वीज देयक भरण्याची गरज लागणार नाही.
गतवर्षात खरीप हंगामामध्ये बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाचे तसेच पीक विमा, ठिंबक सिंचनाचे अनुदानही पात्र शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांप्रती शासनाचा सकारात्मक दृष्टीकोन असून त्यांना कर्जवाटप, छोट्या, मोठ्या उद्योगासाठी आर्थिक मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये आत्महत्या न करता मनोधैर्य कायम राखत या संकटाचा सामना करावा.
स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
मुंबई : थोर समाजचिंतक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती ‘अंत्योदय दिवस’ म्हणून विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विभानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसेच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे, सचिव यु.के.चव्हाण, सभापतीचं सचिव महेंद्र काज, मा.अध्यक्ष यांचे सचिव राजकुमार सागर, उपसचिव विलास आठवले, मा.अध्यक्ष यांचे विशेष कार्य अधिकारी निलेश मदाने, वित्तीय सल्लागार सु.सा.गायकवाड, अवर सचिव रवींद्र जगदाळे, मुख्य सुरक्षा अधिकारी शशिकांत बोराटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.








