विसर्जन मिरवणुक बंदोबस्तातील पोलिसांना भोजन पाकीटांचे वाटप
पुणे:
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान श्री.बालाजी मंदीर, नारायण पेठ महिला मंडळाच्या वतीने बंदोबस्तातील पोलिस अधिकारी, होमगार्ड, हवालदार यांना जेवणाच्या पाकीटांचे वाटप करण्यात आले. याचे उद्घाटन तुषार जोशी (परिमंडळ एक चे उपायुक्त) महापौर दत्ता धनकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
विजय टॉकीज, लक्ष्मी रोड येथे त्यासाठी मंडप उभारण्यात आला होता . मोफत जलसेवा आणि लिंबू सरबत वाटप सेवा देण्यात येत होती .या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष होते.१० हजार लिटर मिनरल वाटर ,२५ हजार ग्लास सरबत ,१ हजार फूड पेकेट वितरीत करण्यात आली
मंडळाच्या अध्यक्षा शारदा भगीरथ राठी, सचिव सीता राठी ,प्रदीप आसावा ,संजय चांडक,सत्येंद्र राठी,पोलिस उपयुक्त राम गायकवाड ,पोलिस निरीक्षक मिनल पाटील मंडळाचे सर्व पदाधिकारी, माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित व्यापारी आदी मान्यवर, महिलावर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
पोलिस अधिकारी, होमगार्ड आणि बंदोबस्तातील इतर पोलीस कर्मचार्यांना देण्यात येणार्या जेवणाच्या पाकीटांचे वाटप समाधान चौक ते अलका टॉकीज या मार्गावर करण्यात आले. तसेच या उपक्रमातंर्गत गणेशभक्त, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मोफत शुद्ध फिल्टर मिनरल पाण्याचे वाटप तसेच मसाला लिंबू सरबताचे देखिल वाटप करण्यात आले. विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
—————————— —————————— —