शाकाहारीं विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या प्रशिक्षणाच्या मागणीसाठी विसर्जन मिरवणुकीत जनजागरण
पुणे :
शाकाहारी विद्यार्थ्यासाठी हॉटेल मेनेजमेंट शिक्षणात वेगळा अभ्यासक्रम असायला हवा या मागणीसाठी पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत सी ए चंद्रशेखर लुणिया यांच्या नेतृत्वाखाली जनजागरण करण्यात आले.
या जनजागरण मोहिमेत चंद्रशेखर लुणिया, रमेश शिंगवी , संजय उपासनी, संजय डांगरे, योगिता वैशंपायन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे इस्ट चे सदस्य हे सहभागी झाले होते .
महापौर दत्ता धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, अनंत गाडगीळ, मोहन जोशी यावेळी उपस्थित होते .