Home Blog Page 3547

क्रेडाईच्या निषेध मोर्चात बिल्डर्सच्या एकीचे प्रदर्शन 18 हजारांहून अधिक जणांचा रॅलीत सहभाग

0

unnamed unnamed2

पुणे- सरकारी औदासीन्य आणि धोरणांमुळे ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांनी अलीकडेच केलेल्या आत्महत्येची तीव्र प्रतिक्रिया म्हणून बांधकाम व्यावसायिक समुदायाने आज आपल्या एकीचे प्रदर्शन घडविले. त्यांनी  लालफीतशाही, मान्यतेला लागणारा विलंब, ब्लॅकमेल आणि बांधकाम उद्योगासाठी परवानगीच्या प्रक्रियेतील सर्वच आव्हानांच्या विरोधात आवाज उठविला. क्रेडाई पुणे मेट्रोने आयोजित केलेल्या निषेध मोर्चामध्ये महाराष्ट्रातील 18 हजारांहून अधिक बांधकाम व्यावसायिक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी नोंदविला.

हा मोर्चा पूना क्लब ग्राउंडपासून सकाळी 10.30 वाजता सुरू झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पोचला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.  त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांनी विभागीय आयुक्त, पुणे महानगरपालिका आयुक्त व पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदने दिली.

या मोर्चामध्ये प्रामुख्याने  क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष श्रीकांत परांजपे, सुहास मर्चंट, रोहित गेरा, अनिल फरांदे, किशोर पाटे, मनीष जैन, मानदचिटणीस अनुज भंडारी, मानद संयुक्त चिटणीस अनुज गोयल, खजिनदार नितीन न्याती डी.एस. कुलकर्णी व अन्य मानवरांचा समावेश होता. क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनीजिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात एकूण रिअल इस्टेट उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 5 कलमी कार्यक्रमाचीअंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.

 

  1. सर्व मंजुरी प्रक्रियेतीलभेदाभेद नष्ट करा. मंजुरी, वहिवाट प्रमाणपत्रे, , चौथरा तपासणी प्रमाणपत्रे इ. अनावश्यकपणे स्थगित करणे संपवा. मनानुसार निर्णय घेण्याच्या अधिकारांना आळा घालायला हवा कारण यामुळे मंजुरीला विलंब लावण्याची अधिकाऱ्यांना खुली मुभा मिळते.
  2. अधिकाऱ्यांना त्यांच्या कृतीसाठी उत्तरदायी धरा. एखाद्या वेळेस त्यांनी फायलीला विलंब लावला किंवा निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ लावला, तर त्याला उत्तरदायी धरावे आणि अशा चुकार अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी.
  3. विकासकांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही तक्रारीची हाताळणी करण्यासाठी कालबद्ध प्रक्रिया निश्चित करा. सर्व तक्रारींची हाताळणी एकाच अधिकाऱ्याद्वारे / चमूद्वारे करावी आणि त्याने तक्रारीच्या संदर्भात निष्कर्ष लेखी मांडावेत. मूल्यांकनाची प्रक्रिया चालू असताना, प्रकल्प / अनेक प्रकल्प आणि मान्यता प्रक्रिया बंद करण्यात येऊ नये.
  4. औपचारिक सुनावणी न करता आणि नैसर्गिक न्यायाचे तत्त्व न पाळता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता कोणत्याहीविकसक किंवा प्रकल्पाला काम थांबविण्याची नोटीस देता कामा नये.
  5. बांधकामपरवानगी विभागातील राजकीय सहभाग संपूर्णपणे नष्ट करा. नकाशे मंजूर होण्याआधीच ब्लॅकमेलर्स आणि नगरसेवकांना विकसकांच्या फायली मिळण्याचे काही कारण नाही. समान नागरिक म्हणून निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनाही कागदपत्रे मिळण्यासाठी माहिती अधिकार वापरावा लागेल आणि प्रकल्पांच्या योजनांची माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांना थेट बोलविण्याचे अधिकार त्यांना नसावेत.

 

“क्रेडाईने असंख्य प्रसंगी हे सांगितले आहे, की प्रकल्प सुरू करण्यापूर्वी, प्रकल्पाचे बांधकाम करताना तसेच वहिवाट प्रमाणपत्र मिळविताना परवानगीसाठी लागणाऱ्या विलंबामुळे होल्डिंग कॉस्ट वाढून रिअल इस्टेट आणि सदनिकांचे खर्च वाढत आहेत. आमचे मुद्दे मांडण्यापूर्वी उच्च स्तरावर अनेकदा बैठका झाल्या तरीही एक खिडकी परवानगी हे अद्याप स्वप्नच वाटत आहे. अशी धोरणे आणि सरकारी अनास्था यांमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये वैफल्य आणि तणाव वाढत आहे. असा ताण आत्महत्येकडे घेऊन जातो. एक विकसक म्हणून आम्हाला ही भूमिका घ्यायची आहे आणि अखेर सामान्य माणसावर परिणाम करणाऱ्या अशा मुद्द्यांसाठी संघर्ष करायचा आहे,” असे मत शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, की राष्ट्रीय क्रेडाई, महाराष्ट्र क्रेडाई आणि क्रेडाई पुणे मेट्रो तसेच क्रेडाईच्या विविध शाखा एकत्र बसून पुढील कृतीची दिशा ठरवू.

उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल के. एस. बी. पम्पस लिमिटेडमधील कामगार भगवान मारुती वायाळ सन्मानित

0

unnamed unnamed1

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ३३ वा वर्धापनदिनानिमित विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल के. एस. बी. पम्पस लिमिटेडमधील कामगार भगवान मारुती वायाळ यांचा सन्मान करण्यात आला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते भक्ती शक्ती स्मारकाचे स्मृतीचिन्ह , शाल व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले .

   भगवान मारुती वायाळ यांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे ” गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार ” मिळाल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले . भगवान वायाळ हे युनिटी फॉर फ्रीडम फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष , एकता तरुण मंडळाचे अध्यक्ष असून त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते . तसेच मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते .  गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करतात , तसेच मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , गुणवंत कामगार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे . स्वछता अभियान , वृक्षारोपण कार्यक्रम देखील घेण्यात आलेले आहे .

  या सन्मान सोहळ्यास खासदार श्रीरंग बारणे  , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर शंकुतला धराडे , आझम पानसरे , आमदार महेश लांडगे व अन्य मान्यवर उपस्थित होते .

रंगूनवाला फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक संधिवात दिनानिमित्त मोफत ‘फिजिओथेरपी’ शिबिराचा 76 रूग्णांना लाभ

0
पुणे :
 ‘एम.ए.रंगूनवाला फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिसर्च महाविद्यालयामध्ये जागतिक संधिवात दिन साजरा करण्या आला. या दिना निमित्त मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये 76 रूग्णांनी लाभ घेतला.  या शिबिरा अंतर्गत फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांनी रूग्णांना मोफत सल्ला व व्यायामाबाबत मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये मान दुखी, पाठ दुखी, गुडघे दुखी, अर्धांगवायू आदी प्रकारच्या व्याधी असलेल्या रूग्णांना व्यायामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
हे शिबिर ‘महाराष्ट्र मेडिकल आणि रिसर्च सेंटर’चे अध्यक्ष डॉ.एन.वाय.काझी आणि डॉ.अरीफ मेनन (सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. रोनिका अगरवाल (‘एम.ए.रंगूनवाला फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिसर्च महाविद्याल) यांनी शिबिराचे संंयोजन केले.
शिबिरामध्ये रूग्णांना मार्गदर्शन करताना डॉ.एन.वाय.काझी म्हणाले, ‘संधिवात ही एक सामाजिक समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात मधूमेह, उच्चरक्तदाब यांसारख्या विविध आरोग्य समस्या वाढल्या आहे. या बरोबरच लहान वयात संधिवात ही व्याधी देखिल वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये तासन्तास एकाच जागी बसून काम करणे, जंकफूडचे वाढते प्रमाण यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. यालठ्ठपणामुळे सांध्याची झीज लवकर होते.यासाठी नियमित व्यायाम आणि आहाराचे योग्य प्रमाण याचा समतोेल आवश्यक आहे.’
rsz_1logo-for-portal

“श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुरस्कार” डॉ. दत्ता कोहिनकर यांना प्रदान

0
कुंभार समाजातर्फे दिला जाणारा “श्री  संत शिरोमणी गोरोबा काका  पुरस्कार” बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते विश्वशक्ति इंटरनॅशनल फाउंडेशन चे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांना प्रदान करण्यात  आला.यावेळी आ.मेधा कुलकर्णी,आ.बाळा भेगडे,सौ.टिळेकर,संतोष कुंभार यांची उपस्थिती होती .

नऊचा पाढा नवरात्रीचा झी मराठीची अनोखी स्पर्धा

0

गणेशोत्सवाचा जल्लोष संपला की सर्वांना वेध लागतात ते नवरात्रीचे. दुर्गामातेच्या पुजेचा हा सण आपण स्त्रीशक्तीचं प्रतिक म्हणून साजरा करतो. घटस्थापना ते दस-यापर्यंत सर्वत्र धामधूम असते ती देवीच्या जागराची. सुख, समृद्धी आणि मांगल्याच्या या सणात अनेक चांगल्या गोष्टींची सुरूवात, नव्या वस्तूंची खरेदी, व्यवहार या मुहूर्तावर करण्यात येतात. अशा या शुभमूहुर्ताच्या सणाप्रसंगी आता झी मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार आहे दररोज पैसे जिंकण्याची संधी ‘नऊचा पाढा नवरात्रीचा’ या अनोख्या स्पर्धेच्या माध्यमातून. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला सुरूवात होत असून यामध्ये ६.३० ते ११ या वेळेत दर अर्ध्या तासाला एक प्रश्न विचारण्यात येणार आहे. हा प्रश्न त्यावेळी सुरू असलेल्या कार्यक्रमाशी संबंधित असेल ज्यासाठी दोन पर्यायही देण्यात येतील. यातील अचूक उत्तर देणा-या भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे ९९९९ रूपयांचं बक्षिस.

नवरात्रीचा हा सण झी मराठीवर अनोख्या पद्धतीने साजरा होणार आहे. झी मराठीवरील विविध मालिकांमधून स्त्रीशक्तीचं आणि देवीच्या विविध रूपांचं दर्शन तर घडणार आहेच सोबतच ही स्पर्धाही रंगणार आहे. झी मराठीवर संध्याकाळी ६.३० ते रात्री ११ या वेळेत प्रसारित होणा-या मालिकांमध्ये म्हणजेच ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘का रे दुरावा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘अस्मिता’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांदरम्यान एक प्रश्न विचारला जाईल. हा प्रश्न त्या दिवशी प्रसारित होणा-या भागांशी संबंधित असेल. नवरात्रीमध्ये १३ ते २१ ऑक्टोबरदरम्यान दर दिवशी असे ९ प्रश्न विचारले जातील ज्याच्या प्रत्येक अचूक उत्तरासाठी प्रेक्षकांना ९९९९ रूपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. लकी ड्रॉ पद्धतीने विजेत्यांची निवड होणार असून त्यांच्या नावांची घोषणा दस-याच्या दिवशी झी मराठीवरून करण्यात येईल.

झी मराठी अवॉर्ड २०१५ च्या मतदानाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद -यावर्षीही रंगणार चुरशीची स्पर्धा

0

 

झी मराठी आणि महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे एक अतूट नाते आहे. झी मराठीवरील व्यक्तिरेखांशी याच मायबाप रसिकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. किंबहूना या व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या घराघरातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. म्हणूनच आपल्या लाडक्या व्यक्तिरेखांवर झी मराठी अवॉर्डमध्ये आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवून त्यांना जिंकवून देण्यासाठी रसिक प्रेक्षक उत्सुक असतात. यंदाच्या वर्षी रसिकांनी लोकप्रियतेचे दान कुणाच्या पदरी टाकले ? प्रेक्षकांची लाडकी जोडी कोण ठरणार? यंदाची सर्वाधिक आवडती मालिका कुठली? याबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीये. कोण होणार झी मराठी अवॉर्डचे मानकरी याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.

2 3 4 5 6 7

यावर्षी पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वापरण्यात आलेली विविध माध्यमे आणि राज्यातील मोठ्या शहरांसोबतच छोट्या गावातील प्रेक्षकांचा सहभाग. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी, धुळे, नगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर, परभणी, नागपूर, अमरावती, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण आणि रत्नागिरी या २० शहरांतील एकूण ७२ केंद्रांवर हे मतदान घेण्यात आले. या मतदान केंद्रांवर सुमारे ५० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग घेतला. या शिवाय फ्री मिस्ड् कॉल वोटींग, एसएमएस आणि ऑनलाइन वोटींगद्वारे सुमारे ५ लाखांहून जास्त प्रेक्षकांनी आपले आवडते कलाकार आणि आवडत्या मालिकेसाठी मत नोंदविले.

 

झी मराठीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची’ मधील श्री आणि जान्हवी, ‘का रे दुरावा’ मधील जय – अदिती, ‘नांदा सौख्य भरे’ मधील नील आणि स्वानंदी या सर्वांवर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेक्षक जीवावापड प्रेम करतात. ‘जय मल्हार’ ही खंडेरायाची मालिका भक्तीभावाने बघतात. ‘होम मिनिस्टर’ मधून घरोघरी जाणारे आदेश बांदेकर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी बनलेले आहेत तर ‘चला हवा येऊ द्या’ मधून घराघरांत मनोरंजनाची आणि हास्याची हवा पसरलेली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील मित्रांचं ‘माजघर’ आणि त्यातील किस्से सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे. याच आणि इतर लोकप्रिय कार्यक्रमांना आणि त्यातील कलाकारांना सर्वोत्कृष्ट ठरवण्याचा सन्मान प्रेक्षकांच्या मतदानातून झाला. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट नायक-नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासू-सासरे, सर्वोत्कृष्ट आई-वडील, सर्वोत्कृष्ट स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट खलभूमिका, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत, सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक, सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट मालिका आदि विभागांचा समावेश आहे.

यावर्षी सर्वोत्कृष्ट मालिकेसाठी ‘जय मल्हार’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘का रे दुरावा’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ यांत चुरस रंगणार असून सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमासाठीची स्पर्धा ‘होम मिनिस्टर’, ‘आम्ही सारे खवय्ये’ आणि ‘चला हवा येऊ द्या’मध्ये रंगणार आहे. सर्वोत्कृष्ट नायकाच्या मानासाठी खंडोबा, नील जहागिरदार, श्रीरंग गोखले, जयराम खानोलकर यांना नामांकने मिळाले असून म्हाळसा, बानू, स्वानंदी, जान्हवी, अदिती आणि अस्मिता यांच्यामधून सर्वोत्कृष्ट नायिकेची निवड होणार आहे. याशिवाय इतर महत्त्वांच्या विभागांमध्ये अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखांचा समावेश आहे. यावर्षीच्या रंगतदार सोहळ्याचं निवेदन ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील कैवल्य आणि आशुतोष ही जोडगोळी करणार असून आपल्या खुमासदार शैलीने या सोहळ्यात ते हास्याचे आणि मैत्रीचे विविध रंग भरणार आहेत. येत्या १ नोव्हेंबरला हा सोहळा झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

 

कलाकारांच्या उपस्थितीत रंगला आनंद सोहळा

 

झी मराठी अवॉर्डच्या आधी रंगणारा आनंद सोहळा याहीवर्षी एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या थाटात पार पडला. ‘मनोरंजनाची जत्रा’ अशी संकल्पना असलेल्या या आनंद सोहळ्यात सर्व कलाकारांनी रंगबिरेंगी पोषाखात हजेरी लावली होती. यात प्रत्येक मालिकेच्या विषयावर आधारित काही मजेदार खेळांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या दोन विशेष भागांचंही चित्रीकरण करण्यात आलं. येत्या २६ आणि २७ ऑक्टोबरला रात्री ९.३० वा. हे भाग प्रसारित होणार आहेत.

दहिसर नदीच्या पुनरुज्जीवनाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत – मुख्यमंत्री

0

मुंबई : दहिसर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या 150 कोटी रुपयांच्या प्रकल्प अहवालातील सर्व प्रस्तावित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

दहिसर नदीचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण, दहिसर नदीच्या परिसरात खारफुटी उद्यान (मॅंग्रुव्हज् पार्क) विकसित करणे आणि गणपत पाटील नगरात मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आदी दहिसर विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. या बैठकीस आमदार मनीषा चौधरी, महापालिका आयुक्त अजोय मेहता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितिन करीर, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शर्मा आदीसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, दहिसर नदीचा 4.5 कि.मी. लांबीचा परिसर सुशोभित करण्यासाठी नदी पात्राच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधणे, नदीवर चार पादचारी उड्डाणपूल बांधणे आदी कामांबरोबरच वने आणि पर्यावरणाचे संरक्षण होण्यासाठी नदी परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कामास प्राधान्य देण्यात यावे. तसेच या परिसरातील खारफुटीच्या जंगलाचे रक्षण करण्यासाठी वने, पर्यावरण आणि पर्यटन विभागाच्या मदतीने मॅंग्रुव्हज् पार्क उभारण्यासाठी आवश्यक ती योजना तयार करण्यात यावी. त्याचबरोबर दहिसर परिसरातील गणपत पाटील नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाने समिती नेमून तिचा अहवाल एक महिन्यात सादर करावा, असे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी निगडीत पाच स्थळांचे स्मारकात रुपांतर करुन पंचतीर्थ उभारणार – पंतप्रधान

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक व मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते
12112122_1615958021998813_5999852229130521012_n 12115425_1615957981998817_8154518534976210922_n
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे उभारण्यात येणारे स्मारक लोकशाहीवर विश्वास असणाऱ्यांसाठी प्रेरणास्थळ बनेल अशा पध्दतीने त्याची निर्मिती करा. लोकसहभागातून स्मारकाच्या परिसरात वृक्षारोपण करुन निसर्गसंपन्न वातावरणात स्मारक उभारा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत पाच स्थळांचे स्मारकात रुपांतर करुन त्यांचे पंचतीर्थ उभारण्यात येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

येथील बांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दहिसर ते डीएनए नगर मेट्रो आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रोचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. त्यावेळी झालेल्या सभेत पंतप्रधान बोलत होते. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विजय साखला, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यु. पी. एस. मदान व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधान यावेळी म्हणाले की, ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. हा दुग्धशर्करा योग आहे. बाबासाहेबांचे इंदू मिलमध्ये जे स्मारक बनविण्यात येणार आहे. त्याची निर्मिती अशा पध्दतीने करा की, तेथे आल्यावर प्रत्येकाला शांती मिळेल. याठिकाणी वृक्षारोपण करुन ते निसर्गरम्य बनवा. हे स्मारक फक्त विटा, सिमेंट यापासून न बनवता लोकसहभागातून त्याची निर्मिती करा. महाराष्ट्रात आज सुमारे 40 हजार गावे आहेत. प्रत्येक गावातून एक वृक्ष आणून ते स्मारकाच्या ठिकाणी लावण्यात यावे आणि या वृक्षाच्या संवर्धनासाठी त्या गावाने 11 हजार रुपये लोक वर्गणी जमा करावी. त्याच बरोबरच देशातील सर्वच राज्यातून एक-एक रोप आणून आणि सर्व जगभरातूनदेखील झाडे मागवून ते या स्मारकाच्या ठिकाणी लावण्यात यावे. या स्मारकाचे सारे विश्व वृक्ष संपदेने व्यापून जाईल. देशात तयार झाले नसेल असे हे स्मारक बनले पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेले विचार प्रेरणादायी आहेत. त्याप्रमाणेच त्यांचे स्मारकदेखील प्रत्येकासाठी प्रेरणास्थळ बनले पाहिजे. असा प्रयत्न झाला पाहिजे. बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत जी पाच ठिकाणे आहेत. त्यांचा पंचतीर्थ म्हणून निर्माण करण्यात येणार आहे. त्यामध्ये महू (मध्यप्रदेश) येथील बाबासाहेबांचे जन्मस्थळ, दिल्ली येथील अलिपूर रस्त्यावरील वास्तू जेथे बाबासाहेबांचे वास्तव्य राहिलेले आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेगाव, इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आणि लंडन येथील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले घर या पाच वास्तूंना स्मारकाचा दर्जा देऊन त्यांचे पंचतीर्थ म्हणून विकसित केले जाणार आहे.

डॉ.बाबासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय दिला. बाबासाहेब हे फक्त दलितांचे नव्हे तर जगातील सर्व शोषितांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी देशाला संविधान दिले. त्यामुळे त्यांच्या या कार्याची प्रेरणा आणि त्याबाबतची माहिती नव्या पिढीला व्हावी. यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याचे आम्ही ठरविले आहे, असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, हे स्मारक लवकरात लवकर व्हावे यासाठी जो पुढाकार घेतला आहे यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो.

आमचे सरकार आल्यापासून देशात विकासाला गती मिळाली आहे. जी कामे गेल्या दहा वर्षात झाली नाही. ती गेल्या 15 महिन्यात करण्यावर आम्ही भर दिला आहे. देशात आज प्रतीदिन 15 कि. मी. लांबीचे रस्ते तयार होत आहेत. वाढणारी शहरे ही संधी आहे, असे म्हणून बदलत्या शहरांच्या जीवनशैलीसाठी उपयुक्त पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस अभिनंदन करतो. त्यांनी मुंबई मेट्रोचा डीपीआर कमीत कमी कालावधीत तयार करुन त्याला गती दिली आहे. शहरातील पायाभूत सुविधांबरोबरच समुद्र किनाऱ्याच्या राज्यांमधील बंदरांचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणावर आम्ही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. बंदरे जर सक्षम असतील तर आर्थिक व्यवस्था गतीशील असते. त्यामुळे आम्ही बंदर विकासाच्या कामांना गती दिली आहे. ‘मेक इन इंडिया’ संकल्पना यशस्वी करीत असताना देशांतर्गत गुंतवणूक करणारे उत्पादकांकडून देशात जे उत्पादन होईल, तो माल जागतिक बाजार पेठेत पाठविण्यासाठी ह्या बंदरांचा मोठा फायदा होणार आहे. बंदरांना जोडणारे रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूक आणि शीतगृहांची साखळी ह्या सुविधा आवश्यक आहेत. देशातील संपूर्ण समुद्र किनारा जोडणारा सागर माळा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आम्ही सुरु करीत आहोत. समुद्र किनारे असलेल्या राज्यांचा त्यामध्ये सहभाग असेल. पुढील काळ हा सामुद्रीक आणि अंतराळ क्षेत्राचा असल्याने भारत या दोन्ही क्षेत्रात पुढाकार घेईल, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

देशातील सिंचन क्षमता वाढविणे आवश्यक आहे. पावसावर शेती अवलंबून असल्याने शेतकऱ्याला दुष्काळाचा सामाना करावा लागतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना यशस्वीरित्या राबविण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे महाराष्ट्र भविष्यात दुष्काळावर मात करेल, असा मला विश्वास वाटतो असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की फक्त 1400 कोटी रुपये खर्च करुन राज्यातील 6200 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सिंचनाचे काम केले आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी 300 कोटी रुपयांचा निधी लोकवर्गणीतून जमा झाला आहे ही अभिनंदनीय बाब आहे. अशाच पध्दतीने सिंचन क्षमता वाढवून महाराष्ट्र कृषी क्षेत्रात आघाडीवर राहून देशाला नवी दिशा देण्याचे काम करेल असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांनी पुढाकार घेतल्यामुळे आजचा इंदू मिलच्या जागेवर स्मारक उभारण्याचा सोहळा संपन्न होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षात राज्य शासनाने 125 कोटी रुपये मागासवर्गीय बांधवांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. इंदू मिलच्या जागेवर उभे राहणारे बाबासाहेबांचे स्मारक हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बाबासाहेब लंडनमध्ये शिकत असताना ते ज्या घरात राहत होते. ते घर खरेदीची प्रक्रिया आमचे शासन सत्तेवर आल्यावर गतीमान झाली आणि लंडनमधील ती वास्तू राज्य शासनाने खरेदी केली. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेबांचे स्मारक व्हावे यासाठी सामान्य दलित बांधवांनी वेळोवेळी आंदोलने केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता मात्र आम्ही हे गुन्हे तातडीने मागे घेणार आहोत. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या समतेच्या विचाराने चालणार आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळत आहे. राज्यातील आणि मुंबईसारख्या महानगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्तारण्यावर आमचा भर आहे. मुंबईला स्मार्ट सिटी करायचे असेल तर स्मार्ट ट्रान्सपोर्ट व्यवस्थेचे जाळे उभारण्याची गरज आहे. यासाठीच मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून 2019 पर्यंत मुंबईमध्ये 108 कि. मी. लांबीचे मेट्रोचे नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. मेट्रोसोबतच उपनगरीय रेल्वेचे जाळे देखील वाढविण्यात येणार आहे. रेल्वे, मेट्रो, मोनो आणि बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचे एकत्रित सांगड कशी घालता येईल याचे नियोजन आम्ही करीत आहोत. त्याअंतर्गत एकाच तिकीटावर या चारही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधून प्रवास करण्याची संधी मुंबईकरांसाठी उपलब्ध करुन देता येईल, यावर आम्ही भर दिला आहे. ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड सारख्या प्रकल्पांच्या माध्यमांतून मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व प्रकल्पांमध्ये केंद्राचे सहकार्य मिळत असल्याने पूर्वी ज्या परवानग्यांना सात ते आठ वर्ष लागायचे ते आता दोन ते तीन महिन्यातच मिळत असल्याने प्रकल्पाच्या कामांना चालना मिळाली आहे. 2019 पूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय शहर बनविण्यासाठी आमचा निर्धार आहे. जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढवून राज्यातील गावांगावातील दुष्काळ दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, देशाला विकासाकडे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या आठ हजार कोटी रुपयांच्या कंटेनर टर्मिनलचे आज भूमिपूजन झाले. त्यामुळे सुमारे 4 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात अपेक्षित असून सुमारे सव्वा लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. बंदरांचा विकास करण्यावर भर दिला असून त्यामुळे देशात पहिल्यांदाच बारा बंदरे आणि तीन महामंडळे नफ्यामध्ये आली आहेत. येत्या सहा महिन्यात बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामाला शुभारंभ करण्यात येईल, असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंतप्रधानांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक न्याय मंत्री बडोले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार आठवले यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेच्या ठिकाणी दादर येथील चैत्यभूमी व इंदू मिल येथील स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. कार्यक्रमास राज्य मंत्रीमंडळातील सदस्यांबरोबरच खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील जलस्त्रोतांचे मॅपिंग करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : राज्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आतापर्यंत एक लाख 20 हजार कामे पूर्ण करण्यात आली असून या कामांमुळे आगामी काळात राज्याच्या कृषि क्षेत्राच्या उत्पादनात निश्चितच वाढ होणार आहे, अशी माहिती देताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (नरेगा) माध्यमातून लहान शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात यावी व सर्व जिल्ह्यांतील जल स्त्रोतांचे मॅपिंग करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

जलयुक्त शिवार अभियान या महत्‍त्वाकांक्षी योजनेच्या आढाव्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली. ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला. ते पुढे म्हणाले, हे अभियान राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्‍त्वाचे आहे. मुंबईत काल (दि. 11) झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी जलयुक्त शिवार अभियानाची जाहीररित्या प्रशंसा केली होती. त्यामुळे हे अभियान अधिक यशस्वी करून देशासमोर राज्याचा आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत एक लाख 20 हजारे कामे पूर्ण झाली असून 35 हजार कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात खोलीकरण व रुंदीकरणाची 1500 किमी लांबीची कामे झाली आहेत, ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे.

प्रत्येक तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबविणारी आदर्श गावे तयार झाली पाहिजेत. त्यातून प्रेरणा घेऊन राज्यातील अन्य गावेही आदर्श होण्यासाठी प्रयत्न करतील. तसेच या अभियानात लोकसहभाग देखील मोठ्या संख्येने वाढेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘नरेगा’च्या माध्यमातून शेततळ्यांच्या कामांवर भर देऊन राज्यात लहान शेततळ्यांची कामे जास्त प्रमाणावर होण्यासाठी मजुरांचे समूह तयार करावेत. पुढील तीन वर्षात एक लाख 50 हजार शेततळी करण्याचे नियोजन पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

प्रत्येक जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे मॅपिंग करणे आवश्यक असून जुन्या जलस्त्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यात धडक सिंचन विहिरींच्या कामाला गती देण्यात यावी. आतापर्यंत 35 हजार 985 धडक सिंचन विहीरींची कामे पूर्ण झाली असून 1534 कामे प्रगतीपथावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी सादरीकरण केले.

कोंढव्यातून … पुण्यात होणार एमआयएम चा प्रवेश .. तयारी सुरु … भाजपच्या सर्व आमदारांना ओवेसीचे आव्हान ?

0

पुणे – पुण्यात सर्वच्या सर्व आमदार भाजपचे आहेत या सर्व आमदारांपुढे  आता शहरात ..असदद्दुदीन ओवेसी यांच्या  एम आय एम ला कसे रोखणार ? हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे कारण कोंढव्यात महापालिकेच्या प्रभागातील पोटनिवडणुकीत उतरण्याचे एमआयएमने ठरविल्याने या निवडणुकीत आता रंग भरले जाण्याची शक्‍यता आहे. मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या या भागातील ही लढत महापालिकेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार असून, औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील निवडणुकीबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
“ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन‘ (एमआयएम) ने मुस्लिम मतांच्या  जोरावर  जोरदार फिल्डिंग लावली आहे. आपला  किल्ला शाबूत ठेवण्यासाठी शिवसेना सरसावली आहे मात्र त्याचबरोबर  भाजप, कॉंग्रेस आणि मनसेही नशीब अजमावणार आहे. परिणामी, मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असल्याने या निवडणुकीमुळे नवी राजकीय समीकरणे आकारला येण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचे नगरसेवक भरत चौधरी यांचे पद रद्द झाल्याने कोंढव्यातील प्रभागासाठी (क्र.63 अ) येत्या एक नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू झाली असून, सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सुमारे 42 हजार 700 मतदार असलेल्या या प्रभागात 50 टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा होईल, या आशेने “एमआयएम‘ने या निवणुकीवर लक्ष केंद्रित केले असून, पक्षाचे कार्यकर्ते मझहर मणियार यांना उमेदवारी देऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. विशेष म्हणजे, पक्षाचे नेते खासदार असदद्दुदीन ओवेसी यांच्या सभेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे “एमआयएम‘च्या आशा उंचावल्या आहेत. या प्रभागात गेल्या 30 वर्षांपासून एकतर्फी विजयी मिळविणारी शिवसेना आपला गड राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. स्थानिक कार्यकर्ते सोमनाथ हरपुडे यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विजयासाठी माजी आमदार महादेव बाबर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे; तर भाजपने सतपाल पारगे यांच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. याशिवाय कॉंग्रेसने माजी नगरेसवक अनिस सुंडके यांचे बंधू रईस यांना मैदानात उतरविले आहे. अमोल शिरस यांना उमेदवारी देऊन कोंढव्यात ताकद वाढविण्याचा मनसेचा इरादा आहे. राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार दिलेला नाही.

मनातली कुजबुज उघडपणे ऐकण्याची एकमेव संधी! “मन की बात….” हे नाटक लवकरच रंगभुमीवर!!

0

“मन की बात” हे प्रतीक कोल्हे यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नवं मराठी नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर येत आहे.या नाटकाची निर्मिती संतोष कोल्हे यांनी केली असून या नाटकाच्या निमित्ताने दोघांचेही मराठी रंगभूमीवर प्रथमच पदार्पण होत आहे.
प्रतीक कोल्हे यांचे हे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून पहिलेच नाटक आहे,सध्या ते कलर्स मराठी वाहिनीमध्ये नॉन फ़्रिक्शनहेड म्हणून काम पहातात.टीव्ही वरच्या विविध कार्यक्रमाच्या संकल्पना आणि निर्मितीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. याआधी झी मराठी, एबीपी माझा या वाहिनीतल्या कामाचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे.मुंबई विद्यापीठाच्या अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस् मधून नाटकाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू. “मन की बात” च्या निमित्ताने ते पहिल्यादाच लेखक दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत.
संतोष कोल्हे यांचे निर्माता म्हणून हे पहिलेच नाटक असून, नाटकाची निर्मिती संतोष कोल्हे यांच्या लॉजिकल थिंकर्स आणी संवर्धनफौन्डेशन या संस्थांनी केली आहे.याआधी त्यांनी हिंदी, मराठी मालिकांचे, चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तसेच काही मराठी मालिकांची निर्मितीही त्यांनी केली आहे.
“मन की बात” ह्या नाटकातून संशयी पुरूषाच्या मनातली कुजबुज ऐकण्याची आपल्याला संधी मिळते. हे नाटक रामायणावर पूर्णपणे आधारीत नसलं तरी नाटकाचं सूत्र मात्र रामायणातल्या अग्निपरीक्षा ह्या घटनेभोवती फिरत रहातं. पुराणकाळापासून आपली पत्नी पवित्र असावी अशी भावना नवऱ्याच्या  मनात असतेच…आणि हे नाटक पण ह्याच भावनेवर आधारीत आहे. रामायणात ज्याप्रमाणे कुणाच्यातरी सांगण्यावरून रामाला सीतेची अग्निपरीक्षा घ्यावी वाटली तशीच घटना जर आज पुन्हा घडली तर काय काय होऊ शकेल?? हे आपल्याला नाटकात पहायला मिळतं. हे नाटक आजच्या काळात घडत असल्यामुळे नाटकावर सध्याच्या सोशल मिडीयाचा आणि रिअँलिटी शोज चा प्रभाव आहे.
एकीकडे शरीरसुखाचे नवनवीन पर्याय उपलब्ध असताना दुसरीकडे बायकोच्या शरीरावर सत्ता गाजवणारी पुरूषी मानसिकता हे नाटक अधोरेखित करतं. त्याचप्रमाणे नवऱ्याच्या मनात बायकोविषयी संशय निर्माण करणारं तिसरं पात्र खरंच अस्तित्वात असंतं की ते पात्र नवऱ्याने त्याच्या सोयीने निर्माण केलेलं असतं ह्यावर लेखकाने प्रकाश टाकलाय. हे नाटक परिणामकारक करण्यासाठी दिग्दर्शकाने वेगवेगळ्या खेळांचा आणि नृत्याचा वापर केला आहे ज्यामुळे हे नाटक प्रेक्षकांचं फक्त मनोरंजन करणार नाही तर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवेल.
“मन की बात” या नाटकात प्रमुख भूमिकेत अक्षय शिंपी,केतकी विलास,पूर्णानंद,नम्रता सुळे,जयेश शेवलकर आणि आनंद प्रभू हे कलाकार आहेत. नाटकाचे संगीत ऋत्विक गौतमी शंकर याचे आहे तर नेपथ्य स्वप्नील टकले यांनी केले आहे.नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धेश दळवी सांभाळत आहेत.

यंदाच्या “साऊथ कॅरोलिना अंडरग्राउंड फिल्म फेस्टिवल”मध्ये “सिंड्रेला”ची निवड!!

0

अभिनय कट्टा व कृपासिंधु पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या आणि अभिनय कट्ट्याच्या किरण नाकती यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी ‘सिंड्रेला’ सिनेमाची अधिकृत निवड यंदाच्या “साऊथ कॅरोलिना अंडरग्राउंड फिल्म फेस्टिवल” (SCUFF) मध्ये करण्यात आली आहे.१४ नोव्हेंबर २०१५ रोजी चार्लस्टन, साऊथ कॅरोलिना येथे हा फेस्टिवल सुरु होणार आहे.‘सिंड्रेला’ सिनेमाच्या निमित्ताने अभिनय कट्ट्याच्या किरण नाकती यांनी सिने-दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे.
“सिंड्रेला” या सिनेमाच्या माध्यमातून भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे. एकंदरीत या सिनेमाची कथा ही आपल्या सर्वांच्या जवळची असून ही “खरी कथा की परी कथा” हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हा सिनेमा पहावा लागणार आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची उत्तम चुणूक दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. अभिनेता मंगेश देसाईने एक उत्तम व्यक्तिरेखा साकारली असून एका वेगळ्या भूमिकेतून विनीत भोंडेच्या अभिनयाची जादू ही आपल्याला पहायला मिळणार आहे. याकुब सईद व जनार्दन परब यांच्याही सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. सुप्रसिद्ध कॅमेरामन राजा फडतरे यांच्या नजरेतून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले असून येत्या ४ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

तलवार का शानदार कलेक्शन ।

0

अपने रिलीज़ के दूसरे हफ्ते तलवार का शानदार प्रदर्शन जारी है। देश का अलग अलग वर्ग फिल्म को काफी उत्साहजनक प्रतिक्रिया दे रहा है।

गांधी जयंती के दिन रिलीज़ हुई तलवार अपने रिलीज़ के शुरुवाती हफ्ते से ही बॉक्स ऑफिस पर मजबूत पकड़ बनायीं हुई है।पहले ही हफ्ते से वीकेंड में फिल्म ने अच्छा काम किया और कलेक्शन काफी अच्छे रहे।
फिल्म निर्माता फिल्म को लेकर, लोगो के रिस्पांस से काफी खुश है और फिल्म के लम्बी पारी खेलने की उम्मीद जाता रहे है।

बात बॉक्स आफिस के कलेक्शन की करे तो फिल्म ने पहले हफ्ते, शुक्रवार- 2.50 cr, शनिवार- 2. 70 cr, रविवार- 3.30 cr, सोमवार- 1.60 cr, मंगलवार- 1.65 cr, बुधवार- 1.65 cr, गुरुवार- 1.65 cr,  कुल 15.55 cr (Including Paid Previews- 0.50 cr ) का व्यापार किया है ।
दूसरे हफ्ते ही शुरुवात करे तो शुक्रवार को 1.50 cr का कारोबार किया।
शुक्रवार  तक के ये आंकड़े है।

‘श्रीकृष्ण मित्र मंडळ ट्रस्ट’ व ‘हर्षल झगडे मित्र परिवारा’तर्फे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी 25 हजार रूपयांचा मदतनिधी

0

पुणे :

मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ला ‘श्रीकृष्ण मित्र मंडळ ट्रस्ट’ व ‘हर्षल झगडे मित्र परिवारा’तर्फे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी 25 हजार रूपयांचा मदतनिधी देण्यात आला.

यावेळी श्रीकृष्ण मित्र मंडंळाचे प्रमुख कार्यकर्ते हर्षल झगडे, अभिषेक कवडे, गणेश पवार, तुषार पासलकर, विनायक पैलवान, मनोज वैरागकर, चिन्मय जगताप, अमित श्रीवास्तव, शुभम कुदळे व अजय नडगेरे उपस्थित होते.

चतुःशृंगी देवस्थान ट्रस्ट;असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव ..

0

चतुःशृंगी देवस्थान ट्रस्ट-असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव

unnamed1

‘    नवरात्रौत्सव १३ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०१५
‘    मंगळवार, १३ ऑक्टोबर सकाळी ९ घटस्थापना
‘    अभिषेक, श्रीसुक्त, रुद्राभिषेक, महापुजा, महावस्त्र अर्पण करणे सकाळी ६ ते ९
‘    सकाळी १० महाआरती
‘    देवीला पहिल्या दिवशी हिर्‍याची नथ
‘    सकाळी १० व रात्री ९ दररोजची आरती
‘    उत्सव काळात मंदिर २४ तास खुले
‘    गणपती मंदिरात दररोज दुपारी पाच भजने
‘    शुक‘वार, १६ डिसेंबर सकाळी १० वाजता तनिष्का ग‘ुपच्या वतीने श्रीसूक्त पठण
‘    शनिवार, १७ ऑक्टोबर सकाळी १०.३० शिवशक्ती संघातर्फे ‘ललिता सहस्त्रनाम’ व वेदपठण
‘    शनिवार, १७ ऑक्टोबर दुपारी ४.३० वाजता वृध्दाश्रमातील महिलांसाठी सुयोग मित्र मंडळाच्या वतीने ‘आजीबाईंचा भोंडला’
‘    गुरुवार, २२ ऑक्टोबर सकाळी ८.३० नवचंडी होम
‘    विजयादशमीनिमित्त गुरुवार, २२ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजता, मंदिरापासून पुणे विद्यापीठ गेटपर्यंत सिमोल्लंघनाची मिरवणुक, मिरवणुकीत बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुते, वाघ्या-मुरळी, देवीचे सेवेकरी यांचा सहभाग, पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
‘    सुहास प्रभाकर अनगळ या वर्षीचे सालकरी
‘    नारायण कानडे गुरुजी पौरोहित्य
‘    पुजा व प्रसाद साहित्याचे ७ स्टॉल
‘    पोलीस, होमगार्ड, २० खाजगी रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक
‘    व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुध्द सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक
‘    महापालिकेतर्फे किटकनाशकांची फवारणी, कचरा उचलण्यासाठी जादा कंटेनर, पाणी निर्जंतुकीकरण करणे
‘    ग‘ीन हिल्स ग‘ुपच्या सहकार्याने निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा प्रकल्प
‘    अग्निशामक दलाची गाडी
‘    तातडीचे वैद्यकीय मदत केंद्र व रुग्णवाहिका
‘    पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था
‘    सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून २० सीसीटीव्ही कॅमेरे
‘    दर्शन घेऊन लवकरात लवकर बाहेर पडता यावे यासाठी बॅरिकेटची व्यवस्था
‘    मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, वीज गेल्यास जनरेटरची सोय
‘    सर्व भाविकांचा यात्रेसह संपुर्ण वर्षाचा मंदिराच्या परिसरात विमा
‘    रांगेत उभे राहाणार्‍या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
‘    समाजप्रबोधन व मनोरंजनासाठी कम्युनिटी रेडिओ
‘    संपर्क ः नंदकुमार अनगळ, कार्यकारी विश्‍वस्त -९८२२२६१५६५