Home Blog Page 3537

मुंढवा येथे 71 हजारांची वीजचोरी उघड

0

qqq

पुणे : मुंढवा येथील घरगुती वीजग्राहकाने महावितरणची अधिकृत वीजजोडणी नसताना चोरीच्या विजेचा वापर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यात 6411 युनिटस्‌ची म्हणजे 71 हजार 340 रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 20) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, बंडगार्डन विभाग अंतर्गत मुंढवामधील सुतारवाडा येथील रामचंद्ग तुकाराम सुतार यांच्या घरात महावितरणची अधिकृत वीजजोडणी नाही. तथापि, त्यांच्या घरात जवळच असलेल्या लघुदाबाच्या खांबावरून केबलद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु असल्याचे दिसून आले. यात एकूण 6411 युनिटस्‌च्या म्हणजे 71,340 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.

याप्रकरणी पंचनामा करून रामचंद्ग तुकाराम सुतार विरुद्ध रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये शुक्रवारी (दि. 20) गुन्हा दाखल करण्यात आला.

नेत्रतज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांना “बेस्ट ऍकॅडमीक प्रायव्हेट प्रॅकिटशनर ऍवॉर्ड’ प्रदान

0
पुणे:
आंतरराष्ट्रीय किर्तीचे पुण्यातील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांना “बेस्ट ऍकॅडमीक प्रायव्हेट प्रॅकिटशनर ऍवॉर्ड’ ने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार “महाराष्ट्र ऑफ्थॉल्मॉलॉजिकल सोसायटी’च्या वतीने गोव्यात घेण्यात आलेल्या “मॉस्कॉन 2015′ या 35 व्या वार्षिक परिषदे दरम्यान प्रदान करण्यात आला. परिषदेचे उद्‌घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाले. या परिषदेमध्ये 1500 नेत्रतज्ज्ञ उपस्थित होते.
डॉ. रमेश मुर्ती यांना नेत्ररोग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  “बेस्ट ऍकॅडमीक प्रायव्हेट प्रॅकिटशनर ऍवॉर्ड’ ने  गौरविण्यात आले.
डॉ.वर्धमान कांकरीया यांनी या परिषदेचे नियोजन केले होते. पुरस्कार प्रदान समारंभ प्रसंगी जीवन लाडी (अध्यक्ष, एम.एस.ओ), उमा प्रधान , प्रकाश कान्कर्ला, उदय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रृतिका कांकरिया आणि डॉ. दिपाली मोहोले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. डॉ. अनिल सिंह यांनी आभार मानले.
unnamed unnamed

नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर

0

1 2 3 4

आपल्या राजकीय नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने जनमाणसांवर आपली छाप सोडणारे आणि राज्यातच नाही तर देशभरात वेगळी ओळख निर्माण केलेले नेते म्हणजे नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई. तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे हे नेते आपल्या रोखठोक भूमिकेमुळे कायम चर्चेत राहतात. असे हे तीन दिग्गज नेते प्रथमच एखाद्या मनोरंजक कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. झी मराठीवरील लोकप्रिय असलेला आणि महाराष्ट्राच्या घऱाघरात पोहचलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हे नेते सहभागी होणार आहेत. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच २३ आणि २४ नोव्हेंबरला रात्री ९.३० वा झी मराठीवरून हे विशेष भाग प्रसारित होणार आहेत.

प्रेक्षकांना भरभरून हसविणारा आणि काही वेळा डोळ्यांच्या कडाही ओला करणारा कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. थुकरटवाडी गावातील अतरंगी पात्र या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटतात आणि त्यांचं मनोरंजन करत निखळ आनंद देतात. ‘चला हवा येऊ द्या’च्या या मंचावरून या पात्रांना घेऊन आजवर विविध चित्रपट आणि नाटकांची प्रसिद्धी करण्यात आली. ज्यात प्रामुख्याने त्या चित्रपटाच्या किंवा नाटकाच्या कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचाही समावेश असायचा. याशिवाय काही विशेष भागांमधून अनेक कलाकारांचे, अभिनेत्यांचे अभिनेत्रींचे वेगळे पैलू, अंतरंगही जाणून घेता आले. आजवर सिनेक्षेत्राशी संबंधित व्यक्तिंना भेटण्याची त्यांना जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळाली पण आता प्रथमच या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत राजकीय पटलावरील काही मान्यवर व्यक्तिमत्व. येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागात नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई या राजकीय नेत्यांचे काही नवे पैलू ‘चला हवा येऊ द्या’ मधून बघायला मिळणार आहेत.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषविलेले नेते म्हणजे नारायण राणे. कोकणभूमीचे सुपुत्र असलेले राणे राज्यात ओळखले जातात ते त्यांच्या बेधडक वक्तव्य आणि निडर वृत्तीमुळे. मुख्यमंत्री असताना अनेक लोककल्याणाचे आणि विकासाचे निर्णय त्यांनी असेच बेधडकपणे घेतले. त्यांच्या याच कार्याच्या आठवणी जाग्या करणारं एक (काल्पनिक) पत्र या भागात ऐकायला मिळणार आहे जे लिहिलंय मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यांनं. थुकरटवाडीतील पोस्टमन काका हे पत्र वाचत असताना स्वतः राणेही भावूक झाले होते. यावेळी रंगलेल्या गप्पांमधून राणे यांनी राजकीय जीवनातील संघर्षाच्या आठवणीसोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या अनेक आठवणीही सांगितल्या.

कार्यक्रमात धम्माल आणली ती रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कविता आणि अभिनयाने. खुमासदार राजकीय वक्तव्यांसोबतच आपल्या खुसखुशीत आणि उत्स्फुर्त राजकीय कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या आठवले यांनी शोलेतील गब्बरच्या भूमिकेचं एक प्रहसन रंगवलं शिवाय काही कविताही सादर केल्या.

आजच मी पाहिलेलं आहे तुमचं गाव

मीच जिंकणार आहे आजचा डाव

आपल्या दुश्मनावर घालणार आहे मी घाव

कारण आठवले आहे माझं नाव

अशी कविता सादर करताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

मराठी अस्मितेचा लढा पुकारणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांच्यासाठी थुकरटवाडीच्या बॅंडने ‘पळते भैय्ये पाहूया मामाच्या गावाला जाऊया’ हे गाणं सादर करत धम्माल उडवून दिली. याशिवाय अनेक गमती जमती या कार्यक्रमात घडल्या आहेत. येत्या २३ आणि २४ नोव्हेंबरला रात्री ९.३० वा. ‘चला हवा येऊ द्या’ चे हे विशेष भाग प्रेक्षकांना बघायला मिळतील.

राजकुमार हिरानी जन्मदिन पर भी रहना चाहते है काम में व्यस्त

0

जानी मानी फिल्म ‘मुन्नाभाई’, ‘३ ईडियट्स’, और पिछले साल की सबसे बड़ी हिट फिल्म ‘पीके’ के बाद अब इनकी आने वाली फिल्म ‘साला खडूस’ है, यहाँ बात हो रही है बॉलीवुड के सबसे ऊम्दा निर्देशक और फिल्म मेकर राजकुमार हिरानी की जिनका आज जन्मदिन है। इस दिन भी वह अपने आप को अपनी आने वाली फिल्म ‘साला खडूस’ के काम में व्यस्त रखा है| वो सेलिब्रेशन से ज्यादा काम करने में ही विश्वास रखते है|

‘साला खडूस’ की रिलीज़ डेट नज़दीक आ रही है, जो अगले साल जनवरी महीने की 29 तारिख को रिलीज़ होने वाली है, इसी वजह से राजकुमार हिरानी अपने जन्मदिन के सेलेब्रेशन से ज्यादा, इस फिल्म के काम को महत्व देना चाहते है। इस दिग्गज निर्देशक और फिल्म मेकर को सभी जगहों से लोगो का प्यार और जन्मदिन की शुभकामनाये मिल रही है|

29 जनवरी को उनकी फिल्म ‘साला खडूस’ रिलीज होने वाली है|

मराठीतला ..दर्दभरा संगीतकार …..

0

धग ” या चित्रपटाला ऑस्करच्या  पाश्चिमात्य प्रादेशिक भाषा चित्रपटाच्या नामावलीत  समाविष्ट करण्यात आले आणि , महाराष्ट्राच्या शिरपेचात वैश्विक सन्मानाचा तुरा खोवला गेला,  राष्ट्रीय पुरस्कार ते ऑस्कर चा प्रवास…. धग ने केला आणि मराठीतला  एक दर्दभरा गीतकार रसिकांपुढे आला !!!जग जळतं,जळतं … राख होतं …. या गाण्याने आणि ‘ उधळले तुझ्यावर गाव , जिव्हारी … या वाडकरांच्या आवाजातील गाण्याने हा दर्द रसिकांच्या मनामनात जागविला . फ.मुं. शिंदे यांच्या गझलांवर आधारित ” फकिराची मुशाफिरी “आणि आता येणाऱ्या “खैन्दुऴ” ने या संगीतकाराचे अष्टपैलू गुण रसिकांसमोर येणार आहेत
मराठी चित्रपटाच्या ह्या भरारीत आणि काफिल्यात , संगीत दिग्दर्शक म्हणून शामिल होणे हे  माझ्यासारख्या सामान्य पार्श्वभूमी असलेल्या   व्यक्तीसाठी एक  वेगळे वळण होते  असे नम्रपणे नमूद करणारा एक साधा आणि व्रतस्थ प्रतिभावान संगीतकार म्हणजे आदि रामचंद्र,  पूर्ण नाव “आदित्य रामचंद्र पटाईत”, जन्म गाव : धर्माबाद , जिल्हा : नांदेड
वडील कै .रामचंद्र विनायकराव पटाईत, धर्माबाद येथील लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते.पण उत्कृष्ठ गायक आणि सर्व संगीत प्रकारांची उत्तम जाण असलेल्या पटाईत सरांनी आपल्या मुलाला सांगीतिक वारसा देण्यात कुठलीही कसर सोडली नाही याचाच परिणाम आणि जवाबदारी म्हणून कि काय “आदि रामचंद्र” हे नाव आज राष्ट्रीय पुरस्कारांच्या  यादित जावून पोचले आहे.
असे संगीतकार आदि रामचंद्र याचे हे मनोगत :
संगीताचा वारसा वडिलांकडून मिळाला , लहान असतांनापासून सतत वडिलांनी सवाई गंधर्व महोत्सवास न्यायला सुरुवात केली ज्या योगे पं  वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं भीमसेन जोशी , वडाळी बंधू , या  सारख्या दिग्गज कलावंतांचे श्रवण संस्कार घडवून आणले ,
१ ९ ९ ४ या वर्षी वडिलांच्या अकाली निधना नंतर आम्ही धर्माबाद सोडले,आई श्रीमती सुधा रामचंद्र पटाईत यांचा कठीण परिस्थितीत भक्कम आधार,  त्याला अनुकंपा धर्तीवर वडिलांच्या जागी नोकरी मिळत असतांना पण आईच्या आग्रहास्तव औरंगाबाद गाठले, सरस्वती भुवन कला महाविद्यालयात संगीत विभागात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला, तेथे पहिले  गुरु पं शिवराम गोसावी गवसले. हळू हळू रियाझ वाढू लागला, पं शिवरामजींनी   पं. नाथ नेरळकर यांचेकडे गायकी आणि नायकी च्या अभ्यासासाठी पाठवले, तेथे गुरुजी ८ तास रियाझ करून घ्यायचे , भरपूर मेहेनत घेतली, दरम्यान नाट्यशास्त्र विभागात अनेक नाटकांना त्याने संगीत दिले, शिव कदम या घनिष्ठ मित्राने दिग्दर्शित केलेल्या मोहन राकेश लिखित ” आषाढ का एक दिन”, महानिर्वाण, इडीयट, सये तुझे डोळे, चि.त्र्य. खानोलकरांच्या गूढ गर्भ कवितांवर आधारित “मी म्हणावे” अश्या अनेक नाटकांना संगीत देण्या -पाठोपाठ, नाट्यदर्पण या मुंबईतील गाजलेल्या एकांकिका स्पर्धेतील ” अरविंद जगताप” लीखित “शुक्राणू” या विजेत्या नाटकास पण संगीत दिले.
औरंगाबाद येथे स्वतंत्र गाण्याच्या मैफिलीना  सुरुवात केली, १९९८ या वर्षी मुंबई गाठले, कुणाच्या हि शिफारशी विना सरळ सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना माझ्या चाली ऐकविल्या, त्यातून ” बेजुबान” या हिंदी अल्बम ची निर्मिती केली, आणि सुरेश वाडकरांच्या आवाजात १९९९ साली या अल्बमची रेकॉर्डिंग केली, तिथपासून सुरेश वाडकरांचा आशीर्वाद आणि सानिद्ध्य सतत लाभले, आदित्य च्या प्रतिभेवर  फिदा असणारी अनेक दिग्गज व्यक्तीनी मला साथ दिली, घरच्या जीम्मेदारीमुळे १२ वर्षे नौकरीत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापकापर्यंतचा प्रवास लीलया पेलवला, या नोकरीच्या प्रवासात नांदेडला २००५ ते २००८ या काळाtे कधी नांदेड कधी औरंगाबाद परिक्षेत्रात नौकरी सुरूच होती , महाराष्ट्र केबल न्यूज नेटवर्क चा संपादक सचिन अनर्थे  या मित्राने अनेक जिंगल्स संगीतबद्ध करण्यास दिल्या, कठीण परिस्थितीशी दोन हात करत असतांना व नातेवाईकांची कुठली हि मदत नसतांना केवळ अशा वरिष्ठ मित्रांच्या भरघोस प्रतिसादाच्या जोरावर आज मार्गक्रमण सुरु आहे.
चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी घनिष्ट मित्र समीर रावसाहेब याने सतत प्रोत्साहन दिले, नौकरी सुरु असतांना माझा सृजनशीलतेचा दिवा तेवत ठेवला , त्याचा हा आग्रह होता कि माझे क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात माझी उर्जा खर्च होऊ नये , आणि इतरही मित्रांचे असेच मत बनत गेले, मग एके दिवशी निर्णय घेतला ,   विभागीय व्यवस्थापक पदाची नौकरी सोडून  २०१० या वर्षी पुण्यात स्थायिक झालो  आणि मला  “धग” या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून बोलावणे आले, गाणे संगीतबद्ध झाल्यानंतर निर्माते विशाल गवारे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी ते सुखविंदर सिंग या सुप्रसिद्ध हिंदी गायकाच्या आवाजात रेकॉर्ड  करावे  असा सल्ला दिला, मी स्वतःच्या आवाजात जेंव्हा रेफरन्स रेकॉर्डिंग केले तेंव्हा अभिनेता उपेंद्र लिमये याच्या डोळ्यात पाणी तरळून आले, आणि असे ठरले कि माझाच आवाज हा योग्य आहे, आणि त्याचे डॉल्बी मिक्स माझ्याच  आवाजात झाले, अशारितीने मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पदार्पण आणि त्यात राष्ट्रीय पुरस्कार.

धग नंतर समीर रावसाहेब दिग्दर्शित ” जागरण” या मराठी चित्रपटाला मी  संगीत दिले ज्यात ” हरिहरन” ” सुरेश वाडकर ” ” वैशाली सामंत” यांनी गाणी गायिली ,शिव कदम , प्रसन्ना देशमुख या  गीतकारांना घेऊन त्याचा हा प्रवास सुरु आहे एवढेच नव्हे तर जागरण मधील एक गाणे गायिले आहे, www.dhingana.com वर ही गाणी डिजिटलि लॉंच केली गेली, आजवर या गाण्यांचे लाखांमध्ये डाउनलोडस आहेत.

यानंतर पुण्यात आर्चिस साउंडप्रो प्रा.लि. हा   स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडीओ थाटला, २०१३- २०१४ या कालखंडात
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी फ.मुं. शिंदे यांच्या गझलांवर आधारित ” फकिराची मुशाफिरी ” या ध्वनिमुद्रीकेस संगीतबद्ध केले व या ध्वनिमुद्रीकेची निर्मिती सुद्धा केली.

तानाजी घाटगे दिग्दर्शित , अरविंद जगताप लिखित ” विनाकारण राजकारण” ,  आशिष पुजारी दिग्दर्शित ” अतिथी ”   व “खैन्दुऴ” या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले,

“भगवा” या विवेक आपटे लिखित ऐतिहासिक नृत्य नाट्य अविष्कारात तब्बल १२ गाणी संगीतबद्ध केली

आज गुगल सर्च वर आदि रामचंद्र असे टाईप केले कि त्याची कारकीर्द आपल्याला दिसून येते.
त्यात ऑस्कर साठी नामांकन म्हणजे उत्तुंग भरारीच आहे
त्याला त्याच्या ह्या यशाबद्दल विचारले असता तो ” अजून खूप काम  करायचे आहे, ज्यासाठी जन्म झालाय त्या भूमिकेस न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु आहेत ” अशी प्रांजळ प्रतिक्रिया द्यायला विसरत नाही.

वजीर में पहली बार एक्शन करते नज़र आएंगे फरहान

index1

डॉन और डॉन-2 जैसी एक्शन थ्रीलर मूवी को डायरेक्ट करने वाले फरहान अख्तर अब खुद एक्शन एक्टर के किरदार में दिखेंगे। फरहान ने अपनी आने वाली फिल्म वजीर में काफी सारे एक्शन सीन किए हैं।

फरहान के पिता जावेद अख्तर ने वजीर में फरहान के एक पुलिस के किरदार को निभाने और एक्शन सीन करने की काफी तारीफ की है। आपको बता दें कि जावेद ने हिंदी फिल्म इंडस्ट्री के लिए काफी सारी स्क्रिप्ट पुलिसवाले सिनेमा के लिए भी लिखा है। अमिताभ बच्चन को जंजीर से एंग्री यंगमैन बनाने वाले जावेद ही हैं। इसके अलावा जावेद ने कई पुलिस कैरेक्टर को भी रचा है।

जावेद ने वजीर में फरहान के काम की काफी तारीफ की है। जावेद ने फिल्म की टीम से मिलकर पूरी टीम को बधाई दी है। जावेद ने पुलिस के किरदार में फरहान अख्तर के लुक को पूरी तरह से परेक्ट बताया और कहा कि फरहान ने एक पुलिसवाले के किरदार को पूरी तरह से निभाया है।

वजीर के टेलर को लोगों का काफी अच्छा रिस्पांस मिला है। अब लोग बेसब्री से फिल्म  के रिलीज होने का इंतजार कर रहे हैं।

यह पहली बार है जब फरहान अख्तर ने एक पुलिसवाले का किरदार निभाया है और महानायक अमिताभ बच्चन के साथ काम किया है। फिल्म के प्रवक्ता ने भी इस बात की पुष्टि की है कि वजीर के टेलर और फरहान के काम की सभी ने तारीफ की है। तारीफ तब और अच्छी लगती है जब जावेद जी जैसा लीजेंड कसीदे पढ़े।

चाकण येथील स्वप्ननगरीत 69 ठिकाणी वीजचोरी उघडकीस – फ्लॅटमध्ये चोरीच्या विजेचा वापर

0

पुणे : चाकण (ता. खेड) येथील स्वप्ननगरी कॉम्प्लेक्समधील पाच इमारतींमध्ये तब्बल 69 ठिकाणी वीजचोरी उघडकीस आली आहे. यात 70,347 युनिट्‌सच्या 6 लाख 66 हजार रुपयांची वीजचोरी झाली आहे.

चाकण येथील झगडेवस्तीमधील स्वप्ननगरी कॉम्प्लेक्समध्ये महावितरणच्या सुमारे 20 जणांच्या पथकाने मंगळवारी (दि. 17) सुमारे 350 फ्लॅटमधील वीजजोडण्यांची तपासणी केली. यातील एस, टी, यू, ए-वन आणि एम या पाच इमारतींमध्ये एकूण 67 फ्लॅटमध्ये व दोन इमारतींमधील कॉमन वीज वापरासाठी महावितरणची अधिकृत वीजजोडणी नसताना वीजवापर सुरु असल्याचे आढळून आले. वीजपुरवठा करणार्‍या बसबार या यंत्रणेतून थेट वीजचोरी केल्याचे दिसून आले.

सुमारे 10 तासांच्या तपासणीत 67 फ्लॅट व दोन इमारतीच्या कॉमन वीज वापराच्या ठिकाणी 70,347 युनिट्‌सच्या 6 लाख 66 हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. या सर्व वीजचोरींचा पंचनामा करण्यात आला आहे. या 69 वीजचोरीप्रकरणी संबंधीतांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता श्री. रामचंद्ग चव्हाण, सहाय्यक अभियंता मंगेश सोनवणे, श्री. विक्रम राठोड, जनमित्र श्री. विलास सातकर, नारायण जाधव, श्री. संपत शिंदे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.

भो भो पोहोचला दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात!!!

0

सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून महाराष्ट्राला वेड लावणारा ‘भो भो’, दिल्ली

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाऊन पोहोचलाय. 5 ते 10 डिसेंबर 2015 दरम्यान

रंगणाऱ्या या महोत्सवात भो भो ही स्पर्धा करणार आहे. सुमुखेश फिल्म्स प्रस्तुत

आणि भरत गायकवाड निर्मित भो भो नव्या वर्षात आपल्या भेटीला येणार असला तरी

फेसबुक, व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून भो भो घराघरात पोहोचलाय. भो भो आणि

भोंडेंमधले विनोदी संवाद अवघ्या महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य खुलवण्यात यशस्वी

होत आहेत. आणि यामुळेचं या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले

भो भो आणि भोंडे यांची मुख्य भूमिका असलेला आगामी ‘भो भो’ हा सस्पेन्स थ्रिलर

असला तरी विनोदी शैलीने मांडण्यात आला असल्याने तो नक्कीच प्रेक्षकांना खिळवून

ठेवेल अशी आशा, चित्रपटाचे दिग्दर्शक भरत गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

लोकप्रिय हिंदी मालिकांच्या दिग्दर्शनाबरोबरचं धावा धाव या मराठी चित्रपट

दिग्दर्शनानंतर भरत गायकवाड भो भोच्या निमित्ताने एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर

घेऊन येत आहेत.

भोंडे या खासगी गुप्तहेराच्या भूमिकेत प्रशांत दामलेंना आपण पाहू शकणार आहोत.

यानिमित्ताने प्रशांत दामले मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. त्याशिवाय सुबोध

भावे, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, सौरभ गोखले, संजय मोने, किशोर चौगुले आणि

अनुजा साठे अशी नावाजलेली कलाकार मंडळी आपल्याला महत्त्वाच्या भूमिकांमध्ये

दिसणार आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्व. इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

0
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारताच्या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. हिराबाग, टिळक रोड येथील पक्ष कार्यालयात स्व. इंदीरा गांधी यांच्या प्रतिमेस खासदार, शहराध्यक्ष अ‍ॅड.वंदना चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी दिलीप बराटे, विशाल तांबे, अप्पा रेणूसे, आनंद रिठे, शंकर शिंदे, अ‍ॅड. घनश्याम खलाटे, दीपक जगताप, दादासाहेब सांगळे, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ आदी मान्यवर आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. संजय गाडे यांनी आभार मानले.
unnamed

रणबीर और दीपिका है इस जनरेशन के गोल्डन जोड़ी! २७ नवम्बर को ‘तमाशा ‘

0

रणबीर और दीपिका की आने वाली फिल्म तमाशा रिलीज़ के करीब है, और इस जोड़ी की केमिस्ट्री की चर्चा लोग हमेशा ही करते है| रणबीर और दीपिका की ऑन-स्क्रीन और ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री के वजह से दर्शकों को इनके जोड़ी  से काफी उम्मीदे रहती है|

ट्रेलर लांच से लेकर गाने रिलीज़ तक, फैन्स ने इस जोड़ी  को साथ देखने की इच्छा लगातार ज़ाहिर की है, लेकिन अफ़सोस इस बात का है कि उनके फैन्स उन्हें असल ज़िन्दगी में साथ नहीं देख सकते इसीलिए उनकी ये ख्वाइश सिल्वर स्क्रीन पर उन्हें साथ देखकर ही पूरी होगी|

हमने ऐसे कई पेअर्स को ऑफ़ स्क्रीन और ऑन स्क्रीन साथ में देखा है और उनके बारे में कई अफवाए सुनने मिली है| शाहरुख खान और काजोल एक ऐसे ही गोल्डन जोड़ी  का सबसे बड़ा उदाहरण है, इन के बाद अब रणबीर और दीपिका को गोल्डन जोड़ी  माना जाता है| ये अब आज के जनरेशन की फेवरेट जोड़ी बन गयी है|

index

तमाशा के लिए लोगो में बहुत ही उत्सुकता बनी हुई है| दर्शाकों की सबसे प्यारी जोड़ी रणबीर कपूर और दीपिका पादुकोण इस फिल्म के साथ फिर से एक बार ऑन स्क्रीन नजर आयेंगे| युटीवी मोशन पिक्चर्स और नाडियाडवाला ग्रैंड सन एंटरटेनमेंट की इस फिल्म का निर्देशन इम्तियाज़ अली ने किया है| फिल्म २७ नवम्बर को रिलीज होगी|

2 3 4 5 6 7

stills of Ranbir and Deepika from yesterday’s chemistry meter event that took place at a suburban hotel.

 

२७ नोव्हेंबरला ‘शाली’प्रेक्षकांच्या भेटीला

0

 

  • ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री  मधु मंगेश कर्णिक यांचे हृदय स्पर्शी संवाद !
  • कोकणातील दशावतारी लोककलेचा खुमासदार वापर !
  • चाहत्यांना अभिजात संगीताची मेजवानी  :- रुपकुमार राठोड, आरती अंकलीकरटीकेकर , बेला शेंडे यांनी गायली गाणी !
  • गुरु ठाकूर, मकरंद सावंत यांच्या अर्थपूर्ण शब्दरचनांना संगीतकार विजय नारायण, नंदू घाणेकर यांच्या कर्णमधुर संगीताची सुरेल साथ!

सिनेसृष्टीच्या उगमापासून जे आज पावेतो दमदार कथानक आणि पोषक वातावरणाची जोड  मराठी सिनेमाचा आत्मा राहिला आहे. बॉलीवूड पासून ते हॉलीवूडपर्यंत सार्यांनीच मान्य केले आहे. शाली हा आगामी सिनेमा याच पठडीतील ठरणार आहे.दिग्दर्शक अतुल साटम यांच्या ‘शाली’ सिनेमात रसिकांना दमदार कथानकासोबतच कोकणातील नयनरम्य वातावरण, चालीरीती, परंपरा, लोककला आणि मानवी व्यक्तिरेखांचे दर्शन घडणार आहे. हा चित्रपट येत्या २७ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
कनक एन्टरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते जयसिंग साटम यांनी ‘शाली’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. कै. शंकर पाटील यांच्या ‘शारी’ या कथेने  प्रेरित होऊन अतुल साटम यांनी लिहिलेल्या पटकथेवर ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी संवाद लेखन केले असून, विख्यात नेत्रशल्यविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांच्या विशेष भूमिका आहेत.
‘शाली’चे लेखक दिग्दर्शक अतुल साटम हे गेली २५ वर्षे हौशी, प्रायोगिक, व्यवसायिक रंगभूमि आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी ब-याच शॉर्टफिल्म्स्, डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन केलेले आहे. काही चित्रपट दिग्दर्शकांसोबत सहदिग्दर्शकाचं काम केलं आहे. या खेरीज विविध सामाजिक संस्थांसोबतही ते कार्यरत आहेत.  कोकणसारख्या निसर्गसंपन्न लोकेशन्सवर शालीचे सौदर्य अधिक खुलविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
`शाली’ हा मराठी चित्रपट आशयघन कथानकासोबतच कर्णमधुर संगीतामुळेही सिनेरसिकांच्या स्मरणात रहाणार  आहे. रुपकुमार  राठोड, आरती  अंकलीकर – टिकेकर,  बेला शेंडे  या दिग्गज गायकांच्या आवाजातील गाणी  रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. या चित्रपटातील दोन गाण्यांसाठी दोन निष्णात संगीतकारांची निवड केली गेली आहे. विजय नारायण आणि नंदकुमार घाणेकर या संगीतकारांनी या चित्रपटाला सुमधुर संगीताचा साज चढवला आहे. लोकप्रिय गायक रुपकुमार राठोड यांनी `नाही सांगणे काही अनंता, सर्व तुला ठावे…’ हे भजन गायलं आहे. तर फीमेल व्हर्जनमधील हे भजन आघाडीची गायिका बेला शेंडे यांच्या आवाजात अधिकच रसाळ झाले आहे. गुरु ठाकूर यांच्या समृध्द लेखणीतून उमटलेल्या या भजनगीताला संगीतकार विजय नारायण यांनी संगीतसाज चढवला आहे.

 

तर `पापण्याच्या भोवताली,   सावल्यांची साद आली…’ ही गीतकार मकरंद सावंत यांच्या लेखणीतून आकाराला आलेली गीतरचना आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायली आहे. संगीतकार नंदू घाणेकर यांनी संगीतबध्द केली आहे. `शाली’ सिनेमाचा आत्मा असलेलं हे गीत अत्यंत सुरेख असून शब्द आणि संगीताची जुगलबंदी रंगल्याचे रसिकांना नक्कीच जाणवेल.
कनक एन्टरटेन्मेंत बॅनरखाली निर्माते जयसिंग साटम यांनी ‘शाली’ चित्रपटाची निर्मिती केली असून कथा विस्तार, पटकथा आणि दिग्दर्शन अतुल साटम यांचे आहे. पंचविशीतल्या एका सुशील, शालीन, बुध्दिवान तसेच कर्तव्यनिष्ठ मुलीभोवती शालीची कथा फिरते. तिचे भावविश्व पडद्यावर रेखाटताना आजूबाजूला घडणा-या घटनांचा वेधही या सिनेमात घेण्यात आला आहे. या सिनेमातील कालखंड १९७०-८०च्या दशकातील असून कथेला कोकणची पार्श्वभूमी लाभली आहे. त्या अनुषंगाने कोकणामध्ये मनोरंजनासोबतच पौराणिक कथा सादर करण्याचा वसा जपणा-या दशावतारी नाट्याचा अविष्कार दादा कोणस्कर-राणे या प्रसिध्द दशावतारी कलावांताने `शाली’ तून घडविला आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक युगात पडद्याआड गेलेला दशावतारी थाट `शाली’च्या निमित्ताने रसिकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये चेतना भट, विजय गोखले, संजीवनी जाधव, दिगंबर नाईक, जयवंत वाडकर, शिवकांता सुतार, गनेश माने, अभय खडपकर व बालकलाकार साहिल गावकर तसेच दशावतारी कलावंत दादा राणे ऊर्फ दादा कोणस्कर इत्यादी कलावंताच्या प्रमुख भुमिका आहेत. शालीचं छायाचित्रण सुरेंद्र सिंग यांनी केले आहे तर कलादिग्दर्शन अल्हाद साटम यांचे असून कार्यकारी निर्मिती शंकर धुरी यांची आहे.

दोस्तों से मिला श्रद्धा कपूर को एक फरमान

बॉलीवुड जगत में कई सितारें ऐसे भी हैं जो इन दिनों अपनी आने वाली फिल्मों को लेकर इतने व्यस्त है कि अपनी फैमिली और फ्रेंडस को समय नही दे पा रहें हैं, ऐसे में उनका शिकायत करना तो लाजमी हैं।

बात हो रही है बॉलीवुड की नवोदित अभिनेत्री श्रद्धा कपूर की जो इन दिनों अपनी फिल्मों को लेकर इतनी व्यस्त हैं कि अपने दोस्तों के लिए समय नहीं निकाल पा रहीं हैं। श्रद्धा काफी लंबे समय से अपने दोस्तों से नहीं मिल पाई है तो उनके दोस्तों ने इन दिनों में से एक दिन में उनके लिए तीन घटें निकालने के लिए कहा हैं।

आपको बता दें, श्रद्धा, इस साल के शुरू में उनकी फिल्म के प्रचार में व्यस्त थी। जिसके तुरंत बाद ही वह अपनी आने वाली दो फिल्मों की शूटिंग में व्यस्त हो गई। वह हाल ही में शूटिंग का एक हिस्सा पूरा करने के बाद शिलांग से वापस लौटी है, और अब मुंबई में शूटिंग के कुछ दिनों के बाद, श्रद्धा फिल्म ‘बागी’ की शूटिंग के कार्यक्रम के लिए बैंकॉक रवाना होंगी।

चूकिं आगे श्रद्धा कपूर काफी व्यस्त रहने वाली है इसलिए उनके दोस्त चाहते है कि वो जाने से पहले उनसे मिलने के लिए भी कुछ समय निकाले। ये दोस्त श्रद्धा के स्कूल व बचपन के दोस्तों मेें से हैं जो कि लंच के लिए श्रद्धा के घर पर आ रहें हैं।

श्रद्धा ने बताया, जब मैं शिलांग से वापस लौटी तो मेरे दोस्तों में से एक का फोन आया और उन्होंने मुझे इस योजना के बारे में बताया। वे पहले से ही मेरे माता-पिता के साथ मिलकर ये सब कुछ प्लॉन कर चुके थे। वह आगे कहतीे हैं, यह लंबे समय से लंबित है। मैं वास्तव में इस छोटे से रियूनियन के लिए काफी उत्साहित हूं।

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ मुलांची शैक्षणिक पुनर्वसनाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने घेतली

0
पुणे: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ मुलांची शैक्षणिक पुनर्वसनाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने घेतली असून त्यामध्ये १९३ मुले तर १३२ मुलींचा समावेश आहे. या पाल्यांचे समारंभपूर्वक स्वागत २१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघोली येथे होणार आहे. तसेच पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट व सर्वपक्षीय मान्यवरदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. 
 
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसनाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने घेतली असून यामध्ये १९३ मुले व १३२ मुलींचा समावेश आहे. तसेच या मुलांचे ५वी ते १२वी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च भारतीय जैन संघटना करेल. पुण्यातील वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या शैक्षणिक संकुलात या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण केले जाणार असून, येथे राहण्याची सोयही करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबर ह्या जागतिक आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या आधार दिनी या मुलांचे पुनर्वसन करण्यात येईल व जैन संघटनेच्या वाघोली येथे निवास व शिक्षण दिले जाईल. 
 
जैन संघटनेने या तीन जिल्ह्यातील ४२२ आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण केले आणि त्यातून बीड जिल्ह्यातील १०६ मुले आणि ७५ मुली, लातूर जिल्ह्यातील ३० मुले व १८ मुली तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ५७ मुले आणि ३९ मुली यासाठी निवडण्यात आल्या आहेत. या सर्वांना वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन केंद्रात ठेवले जाणार आहे.     

rsz_1logo-for-portal
भारतीय जैन संघटना (बीजेएस) ही एक स्वयंसेवी संस्था आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. २०१३ च्या दुष्काळामध्ये बीजेएसने मराठवाड्यात विनाअनुदानित तत्वावर ३० ठिकाणी छावण्या उभारून १००००
जनावरांचे व्यवस्थापन केले होते. तसेच बीड जिल्ह्यातील ११५ तलावांचा गाळ पूर्णपणे काढून जिल्ह्यामध्ये एक विक्रम प्रस्थापित केला होता, त्याचा परिणाम म्हणजे जेव्हा २०१४ मध्ये चांगला पाउस झाला तेव्हा हे सर्व तलाव पूर्णपणे भरले होते. अशा प्रकारे बीजेएस दुष्काळामध्ये दूरदृष्टीने आप्पत्ती निवारण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून करीत आहे.

महावितरणला देशपातळीवरील ग्रीन ग्रीड व बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी अ‍ॅवार्ड

0

दिल्ली येथे नुकत्याच आयोजित नवव्या भारतीय ऊर्जा परिषदेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला पहिला क्रमांकाचा ग्रीन ग्रीड अ‍ॅवार्ड तर द्वितीय क्रमांकाचा बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी अ‍ॅवार्डने नुकतेच गौरविण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने आणि इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित परिषदेत केंद्गीय विद्युत प्राधिकारणाचे अध्यक्ष श्री. मेजर सिंग, माजी अध्यक्ष     श्री. एच.एल. बजाज, ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव श्री. अनिल राजदान व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महावितरणचे संचालक (संचालन) श्री. अभिजीत देशपांडे, वीज खरेदी विभागाच्या मुख्य अभियंत्या श्रीमती रंजना पगारे, कार्यकारी अभियंते श्री. जितेंद्ग फुले व श्री. मकरंद कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महावितरणने विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करण्यात लक्षणीय यश मिळविले आहे.  सिंगल फेजिंग आणि गावठाण फिडर सेप्रेशन यामुळे सुमारेᅠ 5000 मेगावॅट विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे.  तसेच ऊर्जा बचतीसाठी एल.ई.डी बल्बच्या वाटपासह विविध अभिनव उपक्रम महावितरणने यशस्वीपणे राबविले त्यामुळे महावितरणला ग्रीन ग्रीड अ‍ॅवार्डच्या प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

महावितरणच्यावतीने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.  त्यात ग्राहकांसाठी सुविधा केंद्गे, तक्रार निवारणासाठी 247 ऑनलाईन सुविधा, ग्राहकाभिमुख विविध अत्याधुनिक सेवा, वीज बिल भरण्यासाठी मोबाईल अ‍ॅपसह वेगवेगळे उपयुक्त पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याशिवाय पायाभूत आराखडा अंतर्गत मोठया प्रमाणात विज वितरण प्रणालीची कामे झाली असल्यामुळे ग्राहक सेवेचा दर्जा उंचावला आहे.  या सर्व बाबींची दखल घेत महावितरणला द्वितीय क्रमांकाचा बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी अ‍ॅवार्ड प्रदान करण्यात आला.

राज्य शासनाच्या भरीव सहकार्यामुळे भविष्यात ग्राहकांना आणखी वाजवी दरात वीज, कृषिपंपांना मोठया प्रमाणात वीजजोडणी  व पायाभूत आराखडयाद्वारे वीज व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याचा प्रयत्न महावितरणद्वारे केला जात आहे, अशी प्रतिक्रिया संचालक (संचालन) श्री. अभिजीत देशपांडे यांनी या परिषदेत व्यक्त केली.

संस्कार आयुर्वेदचा मधुमेह मुक्त भारत अभियानाला प्रारंभ

0

( बाल मधुमेय दत्तक  योजनेला सुरवात  )

index1 index2

पुणे :  संस्कार ग्रुप आणि संस्कार आयुर्वेद याच्या संयुक्त विद्यमानाने  नुकतीच  ‘बाल मधुमेही’ दत्तक योजनेची सुरवात  करण्यात आली.  या प्रसंगी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी  संस्कार उद्योगसमूहाचे अध्यक्ष मा. वैकुठ कुंभार, संस्कार आयुर्वेदचे मा. डॉ. रविंद्र नांदेडकर, मा. खासदार गजानन बाबर उपस्थित होते.  १ ते १८ या वयोगटातील बाल मधुमेही ( जुवेनाइल डायबेटिक ) या रुग्णांची  तसेच प्रौढ मधुमेही रुग्णांची  मोफत रक्तातील शर्करेची  तपासणी करून औषध उपचार करण्यात आले.  या वेळी मधुमेही रुग्णांबरोबरच नागरिक देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळ संस्कार उद्योगसमूहाचे वैकुठ कुंभार यांनी संस्थेच्या सामजिक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि डॉ. नांदेडकर यांनी मधुमेहाच्या औषधा संदर्भात  अथक संशोधन करून नागरिकांना मधुमेहाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. या वेळी मधुमेह मुक्त भारत अभियानाच्या योजनेला प्रारंभ झाला. या वेळी डॉ. नांदेडकर म्हणाले; आम्ही बालमधूमेहांसाठी विनामुल्य मोहीम हाती घेतली आहे. आम्हाला भारतातील बालमधूमेहांच्या रुग्णांच्या पालकांनी  संस्थेशी संपर्क साधल्यास त्यांची मोफत तपासणी व  औषध उपचार करू. आमच्या  संस्थेचे प्रतिनिधी दर सहा महिन्यांनी संबंधित बालमधुमेही यांच्या घरी जावून त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत

या वेळी डायबेटिक जीवनावरचं शुगर फ्री नाटक  ‘साखर खाल्लेला माणूस ’ सादर करण्यात आले. तसेच  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मधुमेह संशोधक व राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. रविंद्र नांदेडकर यांनी मधुमेह संबंधीचे  बहुमुल्य मार्गदर्शन उपस्थित असणाऱ्या नागरिकांना केले. भारत हि जागतिक मधुमेह रुग्णांची राजधानी होत असताना यावर  संस्थेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.