नेत्रतज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांना “बेस्ट ऍकॅडमीक प्रायव्हेट प्रॅकिटशनर ऍवॉर्ड’ प्रदान
पुणे:
आंतरराष्ट्रीय किर्तीचे पुण्यातील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांना “बेस्ट ऍकॅडमीक प्रायव्हेट प्रॅकिटशनर ऍवॉर्ड’ ने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार “महाराष्ट्र ऑफ्थॉल्मॉलॉजिकल सोसायटी’च्या वतीने गोव्यात घेण्यात आलेल्या “मॉस्कॉन 2015′ या 35 व्या वार्षिक परिषदे दरम्यान प्रदान करण्यात आला. परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाले. या परिषदेमध्ये 1500 नेत्रतज्ज्ञ उपस्थित होते.
डॉ. रमेश मुर्ती यांना नेत्ररोग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “बेस्ट ऍकॅडमीक प्रायव्हेट प्रॅकिटशनर ऍवॉर्ड’ ने गौरविण्यात आले.
डॉ.वर्धमान कांकरीया यांनी या परिषदेचे नियोजन केले होते. पुरस्कार प्रदान समारंभ प्रसंगी जीवन लाडी (अध्यक्ष, एम.एस.ओ), उमा प्रधान , प्रकाश कान्कर्ला, उदय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रृतिका कांकरिया आणि डॉ. दिपाली मोहोले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. डॉ. अनिल सिंह यांनी आभार मानले.