२७ नोव्हेंबरला ‘शाली’प्रेक्षकांच्या भेटीला

Date:

 

  • ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री  मधु मंगेश कर्णिक यांचे हृदय स्पर्शी संवाद !
  • कोकणातील दशावतारी लोककलेचा खुमासदार वापर !
  • चाहत्यांना अभिजात संगीताची मेजवानी  :- रुपकुमार राठोड, आरती अंकलीकरटीकेकर , बेला शेंडे यांनी गायली गाणी !
  • गुरु ठाकूर, मकरंद सावंत यांच्या अर्थपूर्ण शब्दरचनांना संगीतकार विजय नारायण, नंदू घाणेकर यांच्या कर्णमधुर संगीताची सुरेल साथ!

सिनेसृष्टीच्या उगमापासून जे आज पावेतो दमदार कथानक आणि पोषक वातावरणाची जोड  मराठी सिनेमाचा आत्मा राहिला आहे. बॉलीवूड पासून ते हॉलीवूडपर्यंत सार्यांनीच मान्य केले आहे. शाली हा आगामी सिनेमा याच पठडीतील ठरणार आहे.दिग्दर्शक अतुल साटम यांच्या ‘शाली’ सिनेमात रसिकांना दमदार कथानकासोबतच कोकणातील नयनरम्य वातावरण, चालीरीती, परंपरा, लोककला आणि मानवी व्यक्तिरेखांचे दर्शन घडणार आहे. हा चित्रपट येत्या २७ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
कनक एन्टरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते जयसिंग साटम यांनी ‘शाली’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. कै. शंकर पाटील यांच्या ‘शारी’ या कथेने  प्रेरित होऊन अतुल साटम यांनी लिहिलेल्या पटकथेवर ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी संवाद लेखन केले असून, विख्यात नेत्रशल्यविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांच्या विशेष भूमिका आहेत.
‘शाली’चे लेखक दिग्दर्शक अतुल साटम हे गेली २५ वर्षे हौशी, प्रायोगिक, व्यवसायिक रंगभूमि आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी ब-याच शॉर्टफिल्म्स्, डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन केलेले आहे. काही चित्रपट दिग्दर्शकांसोबत सहदिग्दर्शकाचं काम केलं आहे. या खेरीज विविध सामाजिक संस्थांसोबतही ते कार्यरत आहेत.  कोकणसारख्या निसर्गसंपन्न लोकेशन्सवर शालीचे सौदर्य अधिक खुलविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
`शाली’ हा मराठी चित्रपट आशयघन कथानकासोबतच कर्णमधुर संगीतामुळेही सिनेरसिकांच्या स्मरणात रहाणार  आहे. रुपकुमार  राठोड, आरती  अंकलीकर – टिकेकर,  बेला शेंडे  या दिग्गज गायकांच्या आवाजातील गाणी  रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. या चित्रपटातील दोन गाण्यांसाठी दोन निष्णात संगीतकारांची निवड केली गेली आहे. विजय नारायण आणि नंदकुमार घाणेकर या संगीतकारांनी या चित्रपटाला सुमधुर संगीताचा साज चढवला आहे. लोकप्रिय गायक रुपकुमार राठोड यांनी `नाही सांगणे काही अनंता, सर्व तुला ठावे…’ हे भजन गायलं आहे. तर फीमेल व्हर्जनमधील हे भजन आघाडीची गायिका बेला शेंडे यांच्या आवाजात अधिकच रसाळ झाले आहे. गुरु ठाकूर यांच्या समृध्द लेखणीतून उमटलेल्या या भजनगीताला संगीतकार विजय नारायण यांनी संगीतसाज चढवला आहे.

 

तर `पापण्याच्या भोवताली,   सावल्यांची साद आली…’ ही गीतकार मकरंद सावंत यांच्या लेखणीतून आकाराला आलेली गीतरचना आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायली आहे. संगीतकार नंदू घाणेकर यांनी संगीतबध्द केली आहे. `शाली’ सिनेमाचा आत्मा असलेलं हे गीत अत्यंत सुरेख असून शब्द आणि संगीताची जुगलबंदी रंगल्याचे रसिकांना नक्कीच जाणवेल.
कनक एन्टरटेन्मेंत बॅनरखाली निर्माते जयसिंग साटम यांनी ‘शाली’ चित्रपटाची निर्मिती केली असून कथा विस्तार, पटकथा आणि दिग्दर्शन अतुल साटम यांचे आहे. पंचविशीतल्या एका सुशील, शालीन, बुध्दिवान तसेच कर्तव्यनिष्ठ मुलीभोवती शालीची कथा फिरते. तिचे भावविश्व पडद्यावर रेखाटताना आजूबाजूला घडणा-या घटनांचा वेधही या सिनेमात घेण्यात आला आहे. या सिनेमातील कालखंड १९७०-८०च्या दशकातील असून कथेला कोकणची पार्श्वभूमी लाभली आहे. त्या अनुषंगाने कोकणामध्ये मनोरंजनासोबतच पौराणिक कथा सादर करण्याचा वसा जपणा-या दशावतारी नाट्याचा अविष्कार दादा कोणस्कर-राणे या प्रसिध्द दशावतारी कलावांताने `शाली’ तून घडविला आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक युगात पडद्याआड गेलेला दशावतारी थाट `शाली’च्या निमित्ताने रसिकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये चेतना भट, विजय गोखले, संजीवनी जाधव, दिगंबर नाईक, जयवंत वाडकर, शिवकांता सुतार, गनेश माने, अभय खडपकर व बालकलाकार साहिल गावकर तसेच दशावतारी कलावंत दादा राणे ऊर्फ दादा कोणस्कर इत्यादी कलावंताच्या प्रमुख भुमिका आहेत. शालीचं छायाचित्रण सुरेंद्र सिंग यांनी केले आहे तर कलादिग्दर्शन अल्हाद साटम यांचे असून कार्यकारी निर्मिती शंकर धुरी यांची आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...