रत्नागिरी, निवळी घाट येथे झालेल्या अपघातात 10 गंभीर रूग्णांना मिळाले ‘डायल 108’ मुळे जीवदान
मंचर विभागामध्ये त्रिसुत्रीअंतर्गत 1172 कामे, 176 नवीन वीजजोड
पुणे : महावितरणच्या मंचर विभागातील पाच ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 10) एकाच दिवशी वीजयंत्रणेची दुरुस्ती, नवीन वीजजोडण्या व वीजमीटर व देयकांसंबंधी 1172 कामे एकाच दिवशी पूर्ण करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे जुन्नर उपविभागातील केवाडी, उंडेखडक व कुसुर या गावात एकाच दिवशी 145 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राजगुरुनगर विभागातील टाकवे (वडगाव), कडूस (राजगुरुनगर) व कोयाळी (चाकण) या तीन ग्रामपंचायतींमध्ये 353 कामे पूर्ण करण्यात आली आहे. यात नवीन वीजजोडणीचे 51 एवन फॉर्म महावितरणला प्राप्त झाले आहेत. तसेच वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे 222 कामे व वीजदेयके व वीजमीटरसंदर्भात विविध तक्रारी निवारणाचे 80 कामे करण्यात आली आहेत.
मंचर विभागात गावडेवाडी (मंचर), गंगापूर व पिंपळगाव (घोडेगाव), खिरेश्वर (आळेफाटा), कुसुर (जुन्नर) व निमगाव सावा (नारायणगाव उपविभाग) या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून मागेल त्यांना वीजजोडणीमध्ये 176 वीजजोडण्या देण्यात आल्या. यात 167 घरगुती व 9 कृषीपंपांचा समावेश आहे. जुन्नर तालुक्यातील कुसुर, केवाडी, उंडेखडक या गावांत एकाच दिवशी 145 वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यातील 90 पेक्षा अधिक वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या असून उर्वरित जोडण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे.
यासोबतच वीजदेयकांबाबत तक्रारी निवारण, सदोष व नादुरुस्त मीटर बदलणे, मीटरचे रिंडींग घेणे आदी प्रकारचे 472 कामे करण्यात आली तर वीजयंत्रणेमधील वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्या झाडाच्या फांद्या तोडणे आदी प्रकारचे 472 कामे पूर्ण करण्यात आली. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मठपती, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री रमेश कावळे, अविनाश चौगुले, संतोष तळपे, विवेक सुर्यवंशी, जयंत गेटमे यांच्यासह 24 अभियंते व 185 कर्मचारी सहभागी झाले होते.
मुळशी विभागामध्ये त्रिसुत्रीअंतर्गत एकाच दिवसात 1664 कामे मार्गी – पाच ग्रामपंचायतींमध्ये 194 नवे वीजजोड
पुणे : महावितरणच्या मुळशी विभागातील पाच ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी वीजयंत्रणा व वीजसेवेविषयक तब्बल 1664 कामे पूर्ण करण्यात आली. यात वाघोली येथील 115 घरांसह पाच ग्रामपंचायतींमध्ये एकूण 194 ठिकाणी नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
वाघोली (हडपसर ग्रामीण), कदमवाक वस्ती (उरळीकांचन), कोंढावळे व पिंरगुट (मुळशी), केळवडे (नसरापूर) या ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 10) वीजयंत्रणेची दुरुस्ती, नवीन वीजजोडण्या व वीजमीटर व देयकांसंबंधी कामे करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे वाघोली ग्रामपंचायतीमध्ये एकाच दिवशी 115 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
नवीन वीजजोडण्यांमध्ये 159 सिंगल फेज तर 35 वीजजोडण्या तीन फेजच्या आहेत. त्या कार्यान्वित करण्यात येत आहेत. याशिवाय वीजयंत्रणेमधील वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्या झाडाच्या फांद्या तोडणे आदी प्रकारचे 842 कामे पूर्ण करण्यात आली. तर वीजदेयकांबाबत तक्रारी निवारण, सदोष व नादुरुस्त मीटर बदलणे, मीटरचे रिंडींग घेणे आदी प्रकारचे 628 कामे करण्यात आली आहेत. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री किरण सरोदे, कल्याण गिरी, राहुल डेरे, राजेंद्ग भुजबळ आदींसह अभियंता, जनमित्रांनी त्रिसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी केली.
‘ स्मार्ट पुणे ‘ म्हणजे काय रे भाऊ?
पुणे-
शहरे स्मार्ट करायला कोण का विरोध करेल भाऊ? कोणाला वाटेल आपले शहर स्मार्ट नसावे ? आणि आमचे पुणे होते किती सुंदर … सगळीकडे रस्तोरस्ती होती झाडे … हवेशीर पुणे .. पेन्शरांचेपुणे -सायकलीचे पुणे .. विसरलोत कुठे आम्ही ..ना विसरलो खंडाळ्याचा घाट.. आणि त्यातील हवा थंडगार … ना विसरलो कोतवाल चावडी … ना विसरलो वाड्यावाड्यात पोहोचणारे चवदार थंड पाणी … पण आता जमाना बदलला तसे नको का आम्हाला बदलायला … आता जो तो आपल्या गावात- राज्यात पोटापाण्याच्या समस्येने त्रस्त झाला म्हणून धावतोय पुण्याकडे … बापरे बाप इथला सारा प्रकारच बदलला इथली सदाशिव पेठ दूर पळाली… टांगे – सायकली नाहीस्या झाल्या .. बरे बसचा कारभार डोईजड म्हणून दुचाक्या लोकांनी पत्करल्या . दुचाकी असेल तरच नौकरी होती आणि आहे कि भाऊ… वाढ वाढ शहरे वाढली … अजगर नाही वाढत , बकासुर नाही वाढणार , कुंभकर्ण नाही एवढा झोपणार … एवढी शहरे बकाल झाली .. आमच्या पुण्याचं रुपडं हरवलं . वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी स्काय बस .. बी आर टी , पीएमपीएमएल.. खूप धावल्या … आता म्हणे मेट्रो येणार … ऐकावे ते नवलच .. शिवाजी नगर हून स्वारगेट पर्यंत ती अंडर ग्राऊंड पद्धतीने येणार म्हणे … काय काय नवनवीन तंत्र आले , येईल भाऊ.. भुयारातून मेट्रो पुण्यात येईल … जशी बीआरटी आली आणि नाहीसी झाली तशी होवू नये म्हणजे झाले … आता पुणे स्मार्ट करणार म्हणे काय करणार ? १२०० कोटी तर मेट्रोच्या पहील्या टप्प्याला जाणार .. अर्थात तिचा स्मार्ट पुण्याशी संबध नसेल ? हो ना रे भाऊ? मग करणार काय? वाहतुकीचा प्रश्न मेट्रोने सुटेल .आणखी … ? पिण्याच्या पाण्याचे खूप हाल आहेत भाऊ सध्या .. शहरात प्रत्येक ऑफिसात पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे – येते कधी.. आणि जाते कधी..कळतच नाही . त्यामुळे आम्ही घरूनच पाणी नेतो . ते ही आमच्या सौ . घरी पिण्याचे पाणी जेव्हा कधी येईल त्यासाठी सर्वात प्रथम तत्पर असतात म्हणून . शहर जर स्मार्ट झाले तर सगळी कडे २४ तास प्यायला पाणी मिळेल कारे भाऊ? आणि हो आमचे एक महत्वाचे दुखणे आहे … कुठ्ठे भाऊ लघुशंकेला जागाच नाही मिळत . सगळीकडे लोक ये जा करीत असतात त्याचा हि प्रश्न सुटेल कारे ? नौकरीची शाश्वती , सुलभ आणि उपयुक्त शिक्षणाची हमी . कमी खर्चात लग्न होण्याची आणि अधून मधून म्हणजे महिन्यातून दोनदा सिनेमा पहायला अगदी खर्चाचे टेन्शन ना घेता मज्जेत जाता येईल कारे भावू ? आणि हो भाऊ.. सारखे सारखे पेट्रोल पंपावर जावे लागते ३५ रुपयाच्या पेट्रोल वर ३५ रुपये कर भरून पदरात घ्यावे लागते ते पेट्रोल विना कर मिळेल कारे भावू ? आणि ३० रुपयांची तुरडाळ पुन्हा कधी १००-२०० ने घ्यायची वेळ तर येणार नाही न भाऊ?
एक ना अनेक प्रश्न आहेत रे दादा तुझे ? एक जरा समजून घे … ‘स्मार्ट पुणे’ म्हणजे काय याचा शोध आपल्यासारख्याला लागायचाय अजून .
दादा , साडेतीन हज्जार कोटी रुपये ५ वर्षात खर्च करून पुण्याचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा … हे शहर स्मार्ट करायचे असा निर्णय भाजपच्या सरकारने घेतला आहे अर्थात यासाठी केवळ ५०० कोटी केंद्राने तर राज्याने २५० कोटी निधी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे . आणि महापालिकेला २५० कोटी खर्च करा असे सांगितले आहे . आता प्रश्न आहे तो बाकीच्या २५०० कोटींचा ? ते कुठून आणणार ? तर साहजिक … यांच्या कंपन्या … उद्योजक तयार आहेत . हा पैसा लावायला … कारण पुणे स्मार्ट करायचे आहे ना ? आता हा पैसा त्यांनी लावला तर ते वसूल हि करणारच कि दादा … आपण अनेक रस्त्याची कामे खाजगी कंपन्यांकडून झालेली पाहतो आणि ते टोल गोळा करतानाही पाहतो … आता सध्या जे २५०० कोटी रुपये खाजगी उद्योजक लावणार आहेत असे म्हटले जाते साहजिकच हा आकडा वाढणार हि आहेच . आणि या पैशाची वसुली अर्थातच याच कंपन्या करतील आणि ती आपल्याकडूनच बरे दादा, हे सूर्य प्रकाश इतके स्वच्छ आहे म्हणजे आताचे २५०० कोटी … संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यावर किती कोटीपर्यंत पोहोचणार ? आणि समजा होणारच असेल तर त्यातून पुणे किती स्मार्ट होणार ?काय काय नागरिकांपर्यंत पोहोचणार ? असे अनेक प्रश्न आहेतच आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुणे अशा प्रकारे स्मार्ट झाल्यावर ..पुणेकरांना आपल्या खिशातून कुठे कुठे -कसा कसा टोल भरावा लागणार , मिळकत कर , पाणीपट्टी , भाऊ पे फस्ट… नंतर पार्किंग … यात काय काय फरक होणार आहे याचा विचार नको का करायला ?
आता मुंबईत मेट्रो आणली .. तर तिचे भाडे ठरविण्यावरून , रस्त्यांवर टोल भरण्यावरून , नंतर त्यापोटी हप्ते खाणाऱ्यावरून भांडणे होतातच की… मुंबई केंद्राच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला .केंद्रात जरी प्रचंड बहुमत असले तरी यापुढे होणाऱ्या विविध निवडणुकात भाजपला बहुमत मिळविणे मुश्कील होत चालले आहे . आता पुढे कुठे कोणत्याही निवडणुका होवू देत ,,तिथे भाजपचे नाही सरकार आले तरी … होल्ट मात्र भाजपचाच राहायला हवा या साठी तर अशा ‘स्मार्ट’ स्वप्नांची मखमली चादर ऐन थंडीत पांघरण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? अशी शंका का येवू नये आपल्याला . कारण ‘अच्छे दिन ‘ची वाट पहाता पहाता आता आपण स्मार्ट पुण्याचे स्वप्न पाहू लागलो आहोत .
दादा स्वप्नच ती , झोपेतच पहावीत रे . .. जागेपणी स्वप्नांच्या मागे धावून, स्वप्ने हाती लागतील काय ? त्या पेक्षा
आपण रमू या नक्कीच स्वप्नात .. राहू देखील स्वप्नांच्या जगात … पण आता दिवस उगविला आहे , सोड सारे आणि लक्ष दे आपल्या कामात …
पुणेकरांसाठी ‘स्मार्ट सिटी ‘ हा प्रकल्प राज्य सरकारने राबवावा. .. डीएसके
पुणे-पुणेकरांसाठी ‘स्मार्ट सिटी ‘ प्रकल्प महत्वाचा आहे असे विद्धान प्रख्यात बांधकाम व्यवसायिक आणि उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी म्हटले आहे स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबतमहापालिकेच्या सभागृहात घटना अत्यंत क्लेशकारक आहे. याकडे राजकारणविरहित दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. देशात केवळ शंभर शहरे स्मार्ट होणार असून, त्यात पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा बदलणार आहे. या प्रकल्पात पुण्याचा समावेश न झाल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. पुण्यात होण्याऱ्या संभाव्य गुंतवणुकीवर विपरित परिणाम होऊ शकतो. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि राहण्यासाठी सुयोग्य ठिकाण आहे. गेल्या काही वर्षांत शहराला आलेली मरगळ झटकून टाकून नव्याने शहर घडविण्याची ही मोठी सुसंधी आहे. जगातील अनेक शहरे स्मार्ट होत असताना पुणे त्यात मागे राहू नये असे पुण्यावर प्रेम करणाऱ्यांचे प्रामाणिक मत आहे. या प्रकल्पातून बाहेर पडल्यास आपण हजारो मैल मागे पडू शकतो. हा प्रकल्प कोण राबवत आहे? किती निधी मिळणार आहे? या पेक्षा पुणे स्मार्ट होणार हे महत्त्वाचे आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याने त्यात राजकारण येऊ नये. पुणेकरांसाठी हा प्रकल्प राज्य सरकारने राबवावा.
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या – महाराष्ट्र दौ-याची’ दणक्यात सुरूवात
गेल्या दिड वर्षांपासून झी मराठीवर
अव्याहतपणे चालणारी विनोदाची ही हवा आता वादळाचं रूप घेणार असून हे वादळ महाराष्ट्राच्या
गावागावात पसरणार आहे कारण प्रथमच ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आणि टीम निघाली
आहे महाराष्ट्राच्या दौ-यावर. महाराष्ट्रातील विविध शहरांत जाऊन तेथील प्रेक्षकांच्या समोर ‘चला
हवा येऊ द्या’ चे काही विशेष भाग चित्रीत होणार असून याची अतिशय दणक्यात सुरूवात पनवेल येथून झाली .
मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट
आणि नाटकांना प्रसिद्धचं एक प्रभावी व्यासपिठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा
झी मराठीवरील कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे. थुकरटवाडी गावातील ही अतरंगी
मंडळी सोमवार आणि मंगळवारी रात्री ९.३० ला प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि पुढचा एक तास
निखळ मनोरंजन करणार याची जणू खात्रीच देते. पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात
हाऊसफुल्ल प्रतिसादात पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘कॅरी ऑन देशपांडे’ आणि ‘नागपूर
अधिवेशन-एक सहल’ या मराठी चित्रपटांची टीम सहभागी झाली होती. धम्माल विनोदी स्किट्स,
रंगतदार नृत्य आणि सोबतीला अनेक किस्से, आठवणी आणि मजेदार गप्पा असा मनोरंजनाचा
भरपूर मसाला असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. येत्या सोमवारी आणि
मंगळवारी म्हणजेच १४ आणि १५ डिसेंबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवरून ‘चला हवा येऊ द्या
– महाराष्ट्र दौ-याचे’ हे भाग बघायला मिळतील.
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने पहिल्या भागापासूनच रसिक प्रेक्षकांच्या
मनाची पकड घेतली. आठवडयागणिक ती अधिकच मजबूत होत गेली आणि आता तर घराघरात
लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा कार्यक्रम जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. प्रत्येक भागात काही तरी
नविन आणि हास्याचा धमाका उडवून देण्याचं काम करणारी मंडळी म्हणजेच भारत गणेशपुरे,
कुशल बद्रिके, विनित बोंडे, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भाऊ कदम आणि या सर्वांचा सुत्रधार
म्हणजेच डॉ. निलेश साबळे या सर्वांच्या विनोदाची चौफेर फटकेबाजी या कार्यक्रमात बघायला
मिळते. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. यातील कलाकारांना प्रत्यक्ष भेटावं, त्यांची
विनोदाची फटकेबाजी प्रत्यक्ष बघावी ही अनेकांची इच्छा असते परंतु प्रत्येकच प्रेक्षकाला
त्यांच्यापर्यंत पोहचणं शक्य नसतं. त्यामुळेच मग या रसिक प्रेक्षकांना भेटण्यासाठी ‘चला हवा
येऊ द्या’ ची टीम निघाली आहे महाराष्ट्र दौ-यावर. एरवी स्टुडिओमध्ये मोजक्या प्रेक्षकांसमोर
सादर होणारा हा कार्यक्रम आता विविध शहरांतील आणि गावांतील प्रेक्षकांपर्यंत प्रत्यक्ष जाणार
आहे. याची सुरूवात ९ डिसेंबरला नवी मुंबईतील पनवेलपासून झाली. यावेळी दोन भाग चित्रीत
करण्यात आले. नेपथ्यापासून ते सादरीकरणापर्यंत अनेकविध नव-नव्या गोष्टी या दोन भागांतून
बघायला मिळणार आहेत. महाराष्ट्र दौ-याची सुरूवात होणार आहे ‘नागपूर अधिवेशन – एक
सहल’ या चित्रपटातील कलाकार म्हणजेच मकरंद अनासपूरे, चेतन दळवी, संकर्षण क-हाडे आणि
मोहन जोशी यांच्या सोबतीने. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकात मोहन जोशी तर चित्रपटात मकरंद
अनासपुरे यांनी सावळा कुंभार ही व्यक्तिरेखा साकारली होती. यामुळे या भागात जे विनोदी
प्रहसन (स्किट) सादर करण्यात आलं ते यावरच आधारित होतं. या स्किटला पनवेलकर प्रेक्षकांनी
भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या निमित्ताने मकरंद अनासपुरे पहिल्यांदाच ‘चला हवा येऊ
द्या’ च्या मंचावर आले हे विशेष. मकरंद यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांतील अनेक आठवणी
सांगितल्या शिवाय सध्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मदतीसाठी त्यांनी नाना
पाटेकरांसोबत सुरू केलेल्या उपक्रमाविषयीचे अनुभव सांगताना उपस्थितांना अंतर्मुखही केले.
याशिवाय कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटातील पुष्कर श्रोत्री, विजय कदम, जयवंत वाडकर, संजय
खापरे, मानसी नाईक आणि इतर अभिनेत्री तसेच दिग्दर्शक विजय पाटकर उपस्थित होते. या
टीमसोबत थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कच्या पत्रकारांसोबत रंगलेल्या थुकरट चर्चेने
प्रेक्षकांना खळखळून हसविले. येत्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० वा. झी मराठीवरून हे
भाग प्रसारित होणार आहेत.
पुण्यात ‘स्मार्ट सिटी ‘ प्रकल्प व्हायलाच हवा – भाजप आमदार सरसावले ….
नागपूर – एकीकडे मनसे ने ‘स्मार्ट सिटी ‘ प्रकल्पाविरोधात रणशिंग फुंकले असताना , काँग्रेसनेही या प्रकल्पास विरोध चालविला असताना , या प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी ने डबल ढोलकी ची भूमिका घेतली असताना आणि शिवसेना तळ्यात मळ्यात असताना आता ‘स्मार्ट सिटी ‘ प्रकल्पासाठी पुण्यातील भाजपचे सर्व आमदार सरसावले आहेत . पुण्यातील भाजप आमदारानी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेउन निवेदन सादर केले. आणि आपण हस्तक्षेप करून स्मार्ट सिटी चा प्रकल्प पुण्यात राबवा आम्ही आणि तमाम पुणेकर तुमच्या पाठीशी आहोत अशी गावही हि त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिली
तत्पूर्वी आ.मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, विजयराव काळे , दिलीप कांबळे , जगदीश मुळुक, योगेश टिळेकर , भीमराव तापकीर आदींनी निदर्शने करीत मनसे आणि दोन्ही काँग्रेसचा निषेध केला .
राज्याचा समतोल विकास आणि प्रत्येकाला समान संधी मिळावी- राज्यपाल
सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मानवी हक्क संरक्षण’ दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख, मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व न्यायमूर्ती एस.आर.बान्नूरमठ, सचिव अमिताभ जोशी, आयोगाचे सदस्य भगवंत मोरे आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, मानवाच्या सर्वांगिण विकासासाठी मानवी हक्कांची आवश्यकता असून, शिक्षण व्यवस्थेचे परिवर्तन जर मूल्यवर्धीत शिक्षण व्यवस्थेत केले तर सर्वांगिण विकास साधता येईल. गरिबी हा समाजातील मानवी हक्कांची पायमल्ली करणारा सर्वात मोठा अडथळा आहे. गरीबीचे मुळापासून उच्चाटन करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे. जेणेकरुन प्रत्येक नागरिकाच्या मुलभूत गरजा पूर्ण होतील. असंघटीत क्षेत्रातील कामगार, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुली आणि महिला यांच्या विकासावर लक्ष केंद्रीत केल्यास खऱ्या अर्थाने मानवी हक्कांची जोपासना होईल, असे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले, जगातील मानवतावादाला सुरक्षा महत्त्वाची असून मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त नितीचा वापर करावा लागेल.
हवामानातील अनियमितता, नैसर्गिक आपत्ती, जागतिक वातावरणातील बदल यांचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. चेन्नईमध्ये होणारी अतिवृष्टी आणि मराठवाड्यातील कोरडा दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती या मानवा समोरील खूप मोठे आव्हान आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी मानवी मूल्यांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोग खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मानवी हक्कांचे संरक्षण आणि लोकांचा विश्वास संपादित करुन योग्य तो न्याय देण्यासाठी मानवी हक्क आयोग नेहमीच सकारात्मक व प्रयत्नशील असेल, असे श्री.मोरे यांनी समारोपप्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात प्रतिज्ञा घेऊन सर्वांनी शपथ घेतली.
निगडी, रावेत परिसरात 11 लाखांची वीजचोरी उघड
पुणे : महावितरणच्या भोसरी विभागअंतर्गत निगडी व रावेत परिसरात वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत 23 ठिकाणी 11 लाख 24 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. वीजचोरीच्या यातील 4 प्रकरणांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरी विभागाकडून नुकत्याच झालेल्या निगडी व रावेत परिसरातील वीजमीटर तपासणीच्या विशेष मोहिमेत 22 ठिकाणी घरगुती व एका ठिकाणी औद्योगिक वीजवापरासाठी चोरी होत असल्याचे आढळून आले. यात रावेत येथील तीन घरगुती व एका औद्योगिक वर्गवारीतील वीजचोरीत 95,000 युनिटची वीजचोरी आढळून आली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तर उर्वरित 19 वीजचोरीच्या प्रकरणांत कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राजेश गुजर, सहाय्यक अभियंता कल्याण जाधव, सुरेश पवार, कविता ढाके, तेजश्री म्हात्रे तसेच जनमित्रांनी ही विशेष मोहिम राबविली.
‘डीएसके मास्टर प्लॅन’ला उदंड प्रतिसाद

पुणे :- वैशिष्ट्यपूर्ण गृहप्रकल्पांद्वारे ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सतर्फे सादर झालेल्या ‘डीएसके मास्टर प्लॅन‘ या योजनेला केवळ पुण्यातूनच नव्हे, तर राज्यभरातून तसेच परदेशातूनही उदंड प्रतिसाद मिळत आहे.
मंगळवारपासून सुरू झालेल्या प्रदर्शनाला राज्यातील औरंगाबाद, लातूर, जळगाव, नाशिकपासून अगदी नागपूरमधील तसेच परराज्यातील ग्राहकांनी आवर्जून भेट देत आपल्या स्वप्नातील घराचे बुकींग केले. विशेष म्हणजे ऑनलाइन योजनेला जपान, जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेतूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. खासगी कंपन्या, सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी आणि अधिका-य़ांनी या वेळी भेट दिली.
अशाच योजनांमार्फत उत्तमोत्तम गृहप्रकल्प लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. ग्राहकांनी दिलेल्या या भरघोस प्रतिसादाबद्दल डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सच्या अध्यक्षा हेमंती कुलकर्णी यांनी ग्राहकांचे आभार मानले.
माझी नोकरी मुंबईत झाली. मात्र, शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात होतो. येथेच स्थायिक व्हायचे हे नक्की होते. त्यातही डीएसकेंकडे घर घ्यायचे हे ठरविले होते. त्यानुसार येथे घर बुक केल्याचे माजी सरकारी अधिकारी कुमारसाहेब साळुंके यांनी सांगितले. तर डीएसके डेव्हलपर्सच्या व्यवहारातील पारदर्शकता आणि त्यात हि उत्कृष्ट योजना यामुळे आम्ही येथे फ्लॅट्स घेण्याचे नक्की केले. निसर्ग सौंदर्य, प्रदूषणविरहित वातावरण व वाढत्या शहरीकरणाचा विचार करून त्यांनी या प्रकल्पाची केलेली रचना खूप आवडली, असे संकेत पारेकर यांनी सांगितले.
‘ स्मार्ट सिटी ‘प्रकल्प नागरिकांसाठी कि ठेकेदारांसाठी ? मनसे च्या रवी सहाने यांचा सवाल
लोकप्रतिनिधींना लोकभावना समजत नाहीत काय ?
पुणे- स्मार्ट सिटी च्या नावाने ३००० कोटीचा प्रकल्प नागरिकांसाठी असणार आहे कि मुठभर कंपन्या आणि ठेकेदारांसाठी असणार आहे ? असा सवाल मनसे चे युवा नेते रवी सहाने यांनी केला आहे . त्यांनी स्मार्ट सिटी साठी जोरदार आग्रह करणाऱ्या माध्यमांवर कडाडून टीका केली . यांनी काय ” स्मार्ट सिटी प्रकल्पाची ” ची एजन्सी घेतलीय का – संपूर्ण देशात प्रथम राज ठाकरे यांनी यांनी स्मार्ट सिटी ची पोल खोलली आणि नंतर पुणे मनपात मनसे च्या धाडसी नगरसेवकांनी मुख्य सभेत हा विषय हाणुन पाडला यावर काही माध्यमांनी राज ठाकरे व मनसे वर टिका करण्यास सुरुवात केली .म्हणे हे दूतोंडी आहेत एकीकडे विरोध आणि नाशिक मधे बाजु घेतल्याचा आरोप करीत आहे .मुळात संबधित माध्यमांना या प्रकल्पामध्ये मधे इतका रस का आहे ?… काय या अंतर्गत येणाऱ्या कामाचे ठेके मिळणार आहेत का ..?असा सवाल करून श्री सहाने म्हणाले ,तूटपूंजी रक्कम देवून घटनेने महापालिकेला दिलेला अधिकार केंद्र सरकार काढून घेत आहे हे त्यांना नाही दिसत का?आणि लोकांनीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना लोकभावना समजत नाहीत काय , लोकभावना जर समजते तर ‘बस डे’ आणि ‘सायकल चालवा’ अभियानाचे काय झाले हे त्यांनी सांगावे .लोकभावना हि आहे कि स्वस्तात, कमी वेळेत सुलभतेने कामावर आणि घरी पोहोचत यावे . तुमच्या ‘बस डे’ ने ते शक्य झाले नाही आणि सायकल चालवा अभियानाने हि झाले नाही . म्हणून पुण्यात दुचाक्या ना प्राधान्य दिले जाते . पुणेकरांची लोकभावना हि त्यांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे त्यांना केवळ नित्यनियमाने पाणी , स्वच्छता ,सुरळीत वाहतूक हवी आहे .मुलभूत कामे जी महापालिकेने करायला हवीत त्यासाठी वृत्तपत्रांचाही अंकुश बोथट झाला कि काय ? असा सवाल हि त्यांनी केला आहे
स्मार्ट सिटी प्रकल्पात सहभागी होणे आवश्यक सर्वानुमते तोडगा काढावा : क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे आवाहन
बिग बॉस के घर में पॉलिटिकल लीडर की एंट्री ? उत्तराखंड के पॉलिटिकल लीडर विशाल डोभाल को आया बिग बॉस का बुलावा
सलमान खान निर्दोष सुटला …….
सलमान खानच्या गाडीचा अपघात होण्यापूर्वीच गाडीचा टायर फुटला की अपघातानंतर फुटला याबद्दल न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे आहेत. वास्तविक फिर्यादी पक्षाने टायर फुटण्याच्या प्रक्रियेचा प्रयोग शाळेतून तांत्रिक अहवाल मागवायला हवा होता असेही न्यायमूर्ती जोशी यांनी आपल्या निकालात नमूद केले आहे.
सोनिया गांधी यांच्याच पाठीशी राहील देश – संगीता तिवारी
पुणे-सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घराण्याला इतिहास आहे देशासाठी त्यागाचे , बलिदानाची पार्श्वभूमी असलेले हे घराणे आहे देश त्यांच्या पाठीशी सदैव दृश्य- अदृश्य स्वरूपात राहीलच असा विश्वास येथे महापालिका शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी व्यक्त केला . शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड यांच्या उपस्थितीत सौ. तिवारी यांनी काँग्रेस भवन येथे सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी तीन रंगातले केक कापण्यात आले .
जनता पक्षाची बहुमताने सत्ता आल्यावर त्यांनी ही इंदिराजींना त्रास दिला होता . त्याच जनता पक्षाची पुढे २ शकले झाली आणि भाजप चा जन्म झाला . सध्याचे भाजपा सरकारही त्याच दिशेने जाते आहे . पण त्याग बलिदान यांची परमप्र आणि स्वातंत्र्य चळवळीतले योगदान कधी विसरले जाणार नाही आणि निस्वार्थी देशप्रेमी गांधी घराण्याच्याच पाठीशी देश उभा राहील असे यावेळी सौ. तिवारी म्हणाल्या .













