‘डीएसके मास्टर प्लॅन’ला उदंड प्रतिसाद

Date:

index
घराचे बुकींग केल्यानंतर कुमारसाहेब साळुंके यांचे आभार मानताना डी. एस. कुलकर्णी.

 

पुणे :- वैशिष्ट्यपूर्ण गृहप्रकल्पांद्वारे ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सतर्फे सादर झालेल्या ‘डीएसके मास्टर प्लॅन‘ या योजनेला केवळ पुण्यातूनच नव्हे, तर राज्यभरातून तसेच परदेशातूनही उदंड प्रतिसाद मिळत आहे.

मंगळवारपासून सुरू झालेल्या प्रदर्शनाला राज्यातील औरंगाबाद, लातूर, जळगाव, नाशिकपासून अगदी नागपूरमधील तसेच परराज्यातील ग्राहकांनी आवर्जून भेट देत आपल्या स्वप्नातील घराचे बुकींग केले. विशेष म्हणजे ऑनलाइन योजनेला जपान, जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेतूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. खासगी कंपन्या, सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी आणि अधिका-य़ांनी या वेळी भेट दिली.

अशाच योजनांमार्फत उत्तमोत्तम गृहप्रकल्प लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. ग्राहकांनी दिलेल्या या भरघोस प्रतिसादाबद्दल डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सच्या अध्यक्षा हेमंती कुलकर्णी यांनी ग्राहकांचे आभार मानले.

माझी नोकरी मुंबईत झाली. मात्र, शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात होतो. येथेच स्थायिक व्हायचे हे नक्की होते. त्यातही डीएसकेंकडे घर घ्यायचे हे ठरविले होते. त्यानुसार येथे घर बुक केल्याचे माजी सरकारी अधिकारी कुमारसाहेब साळुंके यांनी सांगितले. तर डीएसके डेव्हलपर्सच्या व्यवहारातील पारदर्शकता आणि त्यात हि उत्कृष्ट योजना यामुळे आम्ही येथे फ्लॅट्स घेण्याचे नक्की केले. निसर्ग सौंदर्य, प्रदूषणविरहित वातावरण व वाढत्या शहरीकरणाचा विचार करून त्यांनी या प्रकल्पाची केलेली रचना खूप आवडली, असे संकेत पारेकर यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...