Home Blog Page 332

कोंढवा येवलेवाडी कार्यालयाच्या तळमजल्यावर ग्रंथालय आणि टेरेसवर गार्डन

पुणे- मुख्यमंत्री यांचे निर्देशानुसार १०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने व कामगार दिन व कोंढवा येवलेवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांचे संकल्पनेतून कार्यालयातील सेवकांना सध्याच्या संगणक व इंटरनेटच्या युगामध्ये सुद्धा वाचनाचे स्थान अबाधित असून, वाचनामुळे मेंदूचा व्यायाम व्हावा. त्यांची एकाग्रता वाढावी. सातत्याने वाचन केले तर आपल्यामधील आत्मविश्वाेस कसा वाढतो. वाचनाने डोळ्यावर येणारा ताण हा टि.व्ही. व संगणकाकडे बघून येणाऱ्या ताणापेक्षा खूपच कमी असल्याने या सर्व बाबी सेवकांकरिता आवश्यक असल्याने कोंढवा येवलेवाडी कार्यालयाच्या तळमजल्यावर ७०० ते ८०० पुस्तकांचे ग्रंथालय अतिशय छोट्या जागेत तयार करणेत आले आहे.तसेच कार्यक्षेत्रातील ओला व सुका कचऱ्यापासून कार्यालयाच्या गच्चीवर ओला व सुका कचरा वापरून बाग फुलाविणेत आली आहे.

या तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डनचे उद्घाटनप्रमुख पाहुणे अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी, व उप आयुक्त जयंत भोसेकर , यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका व साई जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डन तसेच नागरिक व सेवक यांचेसाठी वाचनालय यांचा उद्घाटन समारंभ पार पडला.
सदर प्रसंगी मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील १०० दिवसाचा ७ कलमी कार्यक्रमांतर्गत कोंढवा येवलेवाडी कार्यालयात राबविण्यात आलेले विविध उपक्रमाबाबत भेट देवून कार्यालयाची पाहणी केली. भेटी दरम्यान त्यांनी कार्यालयातील सर्व विभागाची पाहणी करून काही आवश्यक व मार्गदर्शक सूचना केल्या. कार्यालयीन परिसर , सुशोभीकारण , टेरेस गार्डन व उन्हाची दाहकता लक्षात घेवून पक्षासाठी केलेली पिण्याचे पाणी व्यवस्था तसेच परिसरात केलेली नागरिकांसाठीची बैठक व्यवस्था , दिव्यांग व्यवस्था , अभ्यागत नोंदणी कक्ष , हिरकणी कक्ष , समुपदेशन कक्ष , दुचाकी पार्कींग व्यवस्था , पिण्याचे पाणी व्यवस्था यांची पाहणी केली. तसेच कार्यालयातील विविध विभागाची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. पुणे महानगरपालिका ही संस्था (वरं जनहितं ध्येयम ) नागरिकांशी निगडीत असून आपण केलेल्या कामाचा प्रभाव हा नागरिकांवर होत असतो व नागरिकांकडून आपल्या सेवेबाबत मिळणारे समाधान कौतुक हे आपल्या कामाची पावती असते ही कोंढवा येवलेवाडी कार्यालयास मिळाली असल्याचे सांगितले तसेच कार्यालयाने अगदी कमी जागेत छान काम केलेबद्दल कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिली.
पृथ्वीराज बी पी यांनी कार्यालयास दिलेल्या भेटीबद्दल कार्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करून आभार व्यक्त करणेत आले. सदर पाहणी दरम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी सर्व खात्यांच्या कामकाजाबाबत सर्व पातळीवर उत्कृष्ट शेरा देवून समाधान व्यक्त करून कौतुक केले आहे. तसेच आवर्जून गुणवंत सेवकांचा सत्कार व कौतुक समारंभास अनमोल वेळ देवून सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त दिपक राऊत , अपेक्स कमिटी मेंबर मंदार वेदक , श्रीमती नेराळे मॅडम , तंवर मॅडम , मोहल्ला कमिटी सदस्य , धायभर सदस्य तसेच उप अभियंता चौधरी मॅडम , प्रशासन अधिकारी मोरे , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दुल्लम व कदम कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

माझ्या स्थायी समिती अध्यक्ष ते महापौर आणि केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या कारकीर्दीचा फायदा जनतेला पोहोचविण्यासाठी मी कटीबद्ध – मुरलीधर मोहोळ

पुणे- शहरातील वाहतूक सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे, कारण सिंहगड रस्ता (Sinhagad Road) परिसरातील अत्यंत अपेक्षित असलेला उड्डाणपूल महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) वाहतुकीसाठी सज्ज होत आहे. यामुळे परिसरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.या महत्त्वपूर्ण प्रकल्पासह अन्य दोन पुलांची मूळ संकल्पना आणि त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद स्थायी समिती (Standing Committee) अध्यक्षपदाच्या काळात करण्यात आली होती. यामध्ये नळस्टॉप (Nal Stop) येथील दुहेरी उड्डाणपूल, सध्या खुला होणारा सिंहगड रस्त्यावरील पूल आणि कर्वेनगर (Karvenagar) ते सनसिटीला (Suncity) जोडणारा मुठा नदीवरील (Mutha River) पूल यांचा समावेश होता, या तिन्ही कामांना त्यावेळी प्रशासकीय मान्यता मिळाली, असं मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी त्यांच्या X वर ट्विट करत म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, सिंहगड रस्त्यावरील या पुलाचे बांधकाम महापौरपदाच्या कार्यकाळात पूर्णत्वास नेण्यात आले. त्यावेळी संकल्पित केलेल्या तीन प्रमुख पुलांपैकी दोन पूल आता नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहेत, तर तिसऱ्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने (Bharatiya Janata Party) केलेल्या प्रयत्नांचे हे यश मानले जात आहे, असंही त्यांनी म्हटलं.

नवीन मार्गाचे स्वरूप आणि अपेक्षित लाभ-
हा नवीन उड्डाणपूल (Murlidhar Mohol) राजाराम पूल (Rajaram Bridge) येथून थेट फनटाईम थिएटर (Funtime Theatre) पर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी देणार आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या असंख्य वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण सध्या या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी अनुभवायला मिळते.
पुलाच्या उद्घाटनानंतर या भागातील वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि प्रवासाच्या वेळेत लक्षणीय बचत होईल, अशी अपेक्षा आहे. हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला असून त्यामुळे नागरिकांची सोय वाढणार आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

पुणे मेट्रोचे सर्व कॉरिडॉर लवकरच लोहगाव विमानतळाशी थेट जोडले जाणार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली असून, हा निर्णय पुणे विमानतळ (Pune Airport)  ॲडव्हायझरी कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.

सुमारे तीन वर्षांनंतर झालेल्या या बैठकीत पुणे विमानतळाच्या सुधारणा आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीसंदर्भात (Pune metro) महत्वपूर्ण चर्चा झाली. आता शहरातील विविध भागांतून विमानतळापर्यंत थेट मेट्रोने पोहोचता येणार आहे.

कोणते मेट्रो मार्ग विमानतळाशी जोडले जाणार? :

निगडी ते स्वारगेट मेट्रो कॉरिडॉर
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉर
वनाज ते रामवाडी मेट्रो कॉरिडॉर
खडकवासला ते विमानतळ (भविष्यातील प्रस्तावित मार्ग)
खराडी ते विमानतळ (नवीन प्रस्तावित मार्ग) (Pune Airport News)

Pune Airport काय आहे सरकारचा प्लॅन? :

केंद्रीय मंत्री मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी स्पष्ट केलं की, महा-मेट्रो आणि पुणे महानगरपालिकेला विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेचा उद्देश म्हणजे पिंपरी-चिंचवड (PCMC) आणि पुणे जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून विमानतळापर्यंत सहज प्रवास शक्य करणे.पुणे (Pune) आणि परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुढील 50 ते 100 वर्षांचा विचार करून ही योजना आखण्यात आली आहे. यामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल.

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १: आगामी पाच वर्षात महाराष्ट्राच्या, वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंत बांधण्यात आलेल्या २ हजार १२० मीटर लांबीच्या पुलाचे उद्घाटन (टप्पा क्र. २) च्या उद्घाटन प्रसंगी श्री. पवार बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त एमजे प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, माजी महापौर दत्ता धनकवडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, या पुलामुळे वडगाव, धायरी, नरे, नांदेड आणि खडकवासला येथील वेगाने वाढत असलेल्या परिसराचा वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. इनामदार चौक, हिंजवडी चौक, संतोष हॉल चौक, दत्त हॉटेल चौक आणि गोयेगाव असे पाच चौक ओलांडता येणार असल्यामुळे हवेचे प्रदूषण होणार नाही तसेच वाहतुकीसाठी अर्धा तास कमी होणार आहे. येथून सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करत असतात. हा उड्डाणपूल केवळ एक वाहतूक प्रकल्प नसून शहराच्या नवनिर्मितीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहर वाढत असल्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पुण्याला मुळशी धरणाचे आणि पिंपरी चिंचवडला ठोकरवाडी धरणाचे पाणी मिळावे असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मध्यंतरी विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम केले. ते देखील कमी पडत असल्यामुळे नवीन विमानतळाचे काम हाती घेतले आहे. काही नाराजी असली तरी जमीन घेतल्याशिवाय, पुनर्वसन केल्याशिवाय विकास होत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी येरवड्यापासून नवीन बोगदा, ई – वाहने वाढण्याच्यादृष्टीने प्रोत्साहन पर रक्कम देण्यासाठी पुढच्या पाच वर्षांसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातूनही शहरातील पर्यावरणाचा विचार केला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीने सुविधा देणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुला-मुलींकरता रोजगार निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. टाटा ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ३५० कोटी रुपयांचा प्रकल्प बाणेर येथे हाती घेतला आहे. यातून येथील मुला मुलींना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे प्रशिक्षण रत्नागिरी तसेच गडचिरोली येथे सुरू केले असून छत्रपती संभाजीनगर, बीड येथे सुरू करण्यात येणार आहे.

जम्मू काश्मीर येथे घडलेल्या घटनेची बाब अत्यंत गंभीरतेने घेतली असून या घटनेच्या पार्श्वभीवर सुरक्षितता बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जम्मू काश्मीर येथील घटना ही विकृती असून अशा विकृतीला ठेचून काढण्यासाठी प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे.

हडपसर येथून यवतपर्यंत खालून ६ पदरी आणि वरून चार पदरी उन्नत मार्ग करण्याचा निर्णय कालच मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच वडगाव शेरी पासून वाघोलीच्यापुढे शिक्रापूरपर्यंत वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनेही निर्णय घेतला आहे. एक बाह्यवर्तुळ मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळमार्फत आणि दुसरा पुणे महानगर प्रदेश विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशा पद्धतीने राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून कामे पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न चालू आहे, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, या पुलासाठी सिंहगड रस्त्यावरील रहिवाश्यांनी गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण या पुलाच्या निर्मितीमुळे कमी होईल. पुण्यातील सर्वाधिक लांबीचा हा उड्डाणपूल ठरला. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा, नागरीकरणाचा विचार करता या पुलाची आवश्यकता होती, असेही ते म्हणाले.

श्री. मोहोळ पुढे म्हणाले, पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासन महानगरपालिकेच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू झाले आहेत. आज पुण्यामध्ये ३२ किलोमीटर पेक्षा अधिक लांबीची मेट्रो सुरू आहे. आता खडकवासला ते खराडी या नवीन मेट्रो मार्गालाही राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तृत प्रकल्प अहवाल झाले आहेत. पुढील काळामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रोची अंतिम मंजुरी केंद्र शासनाकडून लवकरात लवकर मिळवण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये ई बसेस आणि सीएनजी बसेस मिळून जवळपास पंधराशे नवीन बसेस येत आहेत. २०१८- १९ मध्ये सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आज उद्घाटन झालेल्या या पुलासह, नदीवरील सनसिटी ते कर्वेनगर पूल तसेच नळ स्टॉप चा दुहेरी उड्डाणपूल असे प्रकल्प हाती घेतले, अशी माहिती त्यांनी दिली.

आज पुण्याचा कायापालट होत आहे. लोकसंख्या, नागरीकरण वाढल्यानंतर नागरी प्रश्न वाढतात मात्र ते सोडवण्यासाठी आधीच काळजी घेण्यात येत आहे. आजही देशात राहण्याचे सर्वात सुरक्षित शहर तसेच पहिली पसंती म्हणून पुण्याचे नाव घेतले जाते. त्यामुळे येथील नागरिकांच्या सुविधेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

प्रास्ताविकात आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, सप्टेंबर २०२१ मध्ये या पुलाच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. मध्यंतरी कोविड काळ असतानाही पुलाचे काम गतीने करण्यात आले. पुलाच्या माध्यमातून ५ चौक टाळले गेल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा ३० मिनिटांचा वेळ वाचेल. या मार्गावर दररोज सुमारे १.५ लाख वाहने असतात. त्यामुळे खडकवासला, नऱ्हे, वडगाव, धायरी तसेच पुणे शहरातील सर्व नागरिकांना या पुलाचा फायदा होईल.

प्रारंभी फीत कापून या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर श्री. पवार यांच्यासह अन्य मान्यवरांनी चार चाकी वाहनातून या पुलावरून प्रवास करून पाहणी केली.

उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये:
सिंहगड रस्त्यावरुन स्वारगेटकडे येताना वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने तीन टप्प्यात उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. कामाची निविदा ११८ कोटी ३७ लाख रुपयांची आहे. त्याअंतर्गत टप्पा १ मध्ये राजाराम पुलाजवळील स्वारगेट कडे जाणारा ५२० मी लांब एकेरी उड्डाणपूल ऑगस्ट २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. टप्पा २ मध्ये विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर पर्यंतचा सिंहगड कडे जाणारा २.२ कि. मी. लांब उड्डाणपूल आज खुला करण्यात आला तर टप्पा ३ च्या इंडिअन ह्यूम गेट (गोयल गंगा चौक) ते इनामदार चौक पर्यंतच्या स्वारगेटकडे जाणाऱ्या १.५ कि. मी. लांबीच्या उड्डाणपूलाचे काम १५ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

टप्पा २ च्या पुलाचे काम प्रिस्ट्रेस बॉक्स गर्डर पद्धतीने करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या रस्त्याची रुंदी ७.३ मी असून एकूण पिलर ६० आहेत.
0000

काँग्रेसवर टिका करत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, मोदी सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा सामाजिक न्यायासाठी ऐतिहासिक निर्णय

पुणे:काँग्रेसवर टिका करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, मोदी सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा सामाजिक न्यायासाठी ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान . नरेंद्र मोदी जी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील झालेल्या CCPA बैठकीत आगामी जनगणनेत जाती आधारित माहितीचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय देशात सामाजिक न्यायाची प्रक्रिया बळकट करणारा आणि प्रत्येक घटकाच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी असे म्हटले आहे की,दशकानुदशके काँग्रेसने सत्तेत असताना या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, तर विरोधात असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर केला. मात्र आता, मोदी सरकारने टाकलेल्या निर्णायक पावलामुळे समाजातील सर्व स्तरांतील मागास, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळेल, त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होईल आणि सर्वसमावेशक भारत घडवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं जाईल.

डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन

पुणे, दि.३०: उपमुख्य अधिकारी, गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) यांच्या डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तिसोबत सदनिकेचा विक्री करारनामा करु नये; अन्यथा संबंधित विकासक आणि व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे म्हाडाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

म्हाडातर्फे ऑक्टोबर २०२३ पुर्वीच्या सर्व सोडतींमधील १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर विक्रीअभावी शिल्लक सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी नोंदणी व वितरण प्रक्रियेकरिता https://bookmyhome.mhada.gov.in/ संकेतस्थळावर सुरु करण्यात आले आहे.

या योजनेच्या वितरणासाठी कोणत्याही एजन्सीची नेमणूक केलेली नाही व कोणत्याही व्यक्तीस मध्यस्थी म्हणून नियुक्त केलेले नाही, नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये.

सदनिका वितरणाची प्रक्रिया पुर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक असून देकार पत्र हे उपमुख्य अधिकारी,म्हाडा यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांच्या लॉग-इन आयडीमध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. कोणतेही देकार पत्र मानवी हस्ताक्षर करुन तसेच रबरी शिक्क्याचा वापर करुन दिले जात नाही, अशी माहिती उपमुख्य अधिकारी अतुल खोडे यांनी दिली आहे.

जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ

केंद्र सरकारने आता आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही हटवावी.

मुंबई, दि. ३० एप्रिल २००२५
सर्व जात समुहाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे ही आमचे नेते राहुलजी गांधी यांची आग्रही भूमिका होती यातूनच त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. भाजपाचा याला विरोध होता पण उशिरा का होईना त्यांना जाग आली, त्याचे स्वागतच आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जातनिहाय जनगणनेमुळे सर्व समाज घटकांना विकासात योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल. काँग्रेस पक्षाने नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी यासाठी मोठा संघर्ष केला असून पुन्हा त्यांच्या दूरदृष्टीचा अनुभव देशाला व सरकारला आला आहे. आता केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी पुढचे पाऊल टाकावे. समाजातील दलित, वंचित, मागास समाजापर्यंत विकासाचे फळ मिळाले पाहिजे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखपदी ओबीसी, मागास व दलित समाजातील स्वयंसेवकांनाही संधी कधी मिळेल याकडे आमचे लक्ष आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे.

भाजपा सरकारने मागील ११ वर्षात जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. वर्षाला दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पट्रोल, डिझेल ४० रुपये लिटर करणार, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार ही आश्वासने चुनावी जुमले ठरले आहेत. हा निर्णय तसाच ठरू नये.
राहुलजी गांधी यांनी याआधीही जे मुद्दे मांडले त्याकडे अहंकारी तानाशाही सरकारने दुर्लक्ष केले होते पण नंतर राहुल झी गांधी यांची भूमिकाच योग्य होती असे स्पष्ट झाले आहे. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने पुन्हा तेच सिद्ध झाले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

दुर्लभ कला प्रकारांचे ‘अर्पण’ चित्रकला प्रदर्शन १ ते ४ मे

दादरकर आर्ट स्टुडिओच्या वतीने राजश्री दादरकर यांचे कला प्रदर्शन 

पुणे: टेराकोटा, मोज़ॅईक आणि स्टेन ग्लास या दुर्लभ होत चाललेल्या कला प्रकारांचे दर्शन घडविणारे अर्पण कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय दादरकर यांच्या स्मरणार्थ राजश्री दादरकर यांच्या कला प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १ ते ४ मे दरम्यान मॉडेल कॉलनीतील रवी परांजपे स्टुडिओ मध्ये करण्यात आले आहे. 

प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक्ट  हरी आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. दिनांक ४ मे पर्यंत दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे. 

राजश्री दादरकर म्हणाल्या, या प्रदर्शनामध्ये सुमारे २०० ते २५० कलाकृतींचा समावेश असून त्यात टेराकोटा वॉल फ्रेम्स, स्टेन ग्लास डिझाईन आणि मोज़ॅईक वर्कचे विविध नमुने पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या प्रदर्शनात “डीआयवाय टेराकोटा किट” ही नाविन्यपूर्ण संकल्पनाही प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे. या किटद्वारे प्रेक्षक स्वतः टेराकोटाचे डिझाईन बनवण्याचा अनुभव घेऊ शकतील.

राजश्री आणि संजय दादरकर यांची कला यात्रा १९७८ साली अभिनव कला महाविद्यालयातून सुरू झाली. संजय दादरकर यांनी पॉटरी आणि सिरॅमिक्समध्ये प्रशिक्षण घेऊन पुण्यात १९८० मध्ये स्वतःचा स्टुडिओ सुरू केला. भद्रावती येथील कृष्णमूर्ती मिरमिरा यांच्या मार्गदर्शनाखाली संजय यांनी कुंभारकाम, टेराकोटा दिवे, सिरॅमिक्स म्युरल्स आणि स्टेन ग्लास यामध्ये उल्लेखनीय कार्य केलं. त्यांच्या कार्याची ठसा आजही बालगंधर्व रंगमंदिर आणि सारसबागेतील सावरकर टाइल पेंटिंगमधून पाहायला मिळतो.

केसरीवाड्यात अभिवादन करुन गौरवशाली महाराष्ट्र मंगल कलश रथयात्रा पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ…

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यंदाच्या ६५ व्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा पुढील मार्गावर मार्गस्थ झाली. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे व पिंपरी-चिंववड च्यावतीने केसरी वाड्यातील श्री गणपती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. ही रथ यात्रा पुढे पिंपरी चिंचवड शहराकडे रवाना झाली.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे २९ एप्रिल रोजी या रथयात्रेचे लालमहाल, कसबा पेठ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर गौरव मंगल कलश रथयात्रा ही पक्ष कार्यालय, गुप्ते मंगल कार्यालय येथे मुक्कामी होती. आज सकाळी वारकरी दिंडी काढत विठू रायाच्या जयघोषात ही दिंडी केसरीवाड्यात गेली. आमदार शंकर मांडेकर यांनी आणलेल्या माती व पाणी या गौरव मंगल कलशात अर्पण करण्यात आले. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या, त्यांच्या महान कार्यांनी प्रेरित अशा भागांतील माती, विशेष नद्या आणि संगमस्थळांहून आणलेले पाणी या मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात येणार असून १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे आणले जाणार असून तेथे भव्य दिव्य असा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल,प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

सदरप्रसंगी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, उपाध्यक्ष सुरेश घुले, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल, पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, शैलेश टिळक, माजी आमदार विलास लांडे, पुणे जिल्हा मध्य. बँकेचे संचालक सुनील चांदेरे, प्रवीण शिंदे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, दत्तात्रय धनकवडे,बाबुराव चांदेरे, शांतीलाल मिसाळ, पिंपरी चिंचवड शहर महिलाध्यक्ष कविता आल्हाट
विधानसभा अध्यक्ष खडकवासला प्रदीप धुमाळ, ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र पवार, मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, संतोष बारणे, शाम लोंढे, शिवाजीनगर अभिषेक बोके, विद्यार्थी शुभम माताळे, सोशल मिडिया अध्यक्ष शितल मेदने, अल्पसंख्याक अध्यक्ष पंकज साठे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मारुती अवरगंड, युवक अंगद माने, शहर सरचिटणीस शितल जौंजाळ, शलाका पाटील, दुष्यंत जाधव,उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर, डिंपल इंगळे,संजय पाटील, प्रदीप चोपडे, चिटणीस शाम शेळके, विधानसभा कार्याध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट गोरखनाथ भिकुले, शिवाजीनगर बाळासाहेब आहेर, योगेश वराडे, शहर महिला कार्याध्यक्ष गौरी जाधव, युवक कार्याध्यक्ष सुरज गायकवाड, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, सागर चंदनशिवे, सुरज गायकवाड,युवती कार्याध्यक्ष लावण्या शिंदे, उपाध्यक्ष स्नेहल कांबळे, सामाजिक, महिला संघटक सचिव प्रीती डोंगरे, विजया भोसले,सांस्कृतिक कार्याध्यक्ष अशोक जाधव,शैलेश मानकर, युवक अध्यक्ष कसबा गजानन लोंढे, विधानसभा उपाध्यक्ष संतोष हत्ते यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी आदी उपस्थित होते.

वंचित, गुणवंत विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी आर्थिक पाठबळ

पुणे : ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ. दीपक शिकारपूर यांनी वंचित, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्थापन केलेल्या शिकारपूर सोशल फाऊंडेशनच्या वतीने दहा विद्यार्थ्यांना आज (दि. 30) शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
मल्टिव्हर्सिटी ग्रुप, आय-स्पेस, बावधन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि परम महासंगणकाचे निर्माते पद्मभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ. विजय भटकर, नचिकेत भटकर, एम. के. सी. एल.चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, एम. के. सी. एल.चे महाव्यवस्थापक अतुल पटोडी आदी उपस्थित होते.
एम. के. सी. एल.तर्फे कौशल्य वाढीसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. येथे विविध शैक्षणिक शाखांमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. डॉ. भटकर यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.
शिष्यवृत्ती योजनेविषयी माहिती सांगताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, महत्त्वाकांक्षी युवा पिढीला सक्षम करून त्यांना त्यांच्या पायवर उभे राहण्यासाठी मदत व्हावी या करीता ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. भारताची ओळख युवकांचा देश अशी आहे. आय. टी. म्हणजे ‌‘इंडियन टॅलेंट‌’ असून इनोव्हेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीने ‌‘इंडियाज टुमॉरो‌’ बनावे. विद्यार्थ्यांनी व्यक्तीमत्त्व विकास साधत कायम स्वरूप शिष्याची भूमिका स्वीकारून नवनवीन कौशल्ये आत्मसात करावी जेणेकरून उद्याचा आत्मनिर्भर विकसित भारत निर्माण होण्यास मदत होईल.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी आर्थिक मदतीमुळे ऐच्छिक शिक्षण घेण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली. अतुल पतोडी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत भाग्यश्री जाधव यांनी केले तर आभार विश्वजीत उत्तरवार यांनी मानले.

ऐतिहासिक चित्रपटांमुळे संस्कारक्षम पिढी घडेल : मुरलीधर मोहोळ

पुणे : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचा इतिहासही वैभवशाली आहे. मुलांना ऐतिहासिक चित्रपट दाखविल्यास भविष्यात संस्कारक्षम पिढी निश्चित घडेल, असा विश्वास केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप व कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल-कुमार चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ आज (दि. 30) सिटी प्राईड, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मंत्री मोहोळ बोलत होते. प्रसिद्ध उद्योजक,सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर तसेच ‌‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‌’ या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते अजय पुरकर, संवाद, पुणेचे सुनील महाजन, कावरे आईस्क्रीमचे राजूशेठ कावरे, जान्हवी कावरे, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, निकिता मोघे, केतकी महाजन, विनोद सातव आदी उपस्थित होते. ‌‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‌’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचा समारोप झाला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोषात मुरलीधर मोहोळ यांनी मुलांचा उत्साह वाढवला. ते पुढे म्हणाले, सत्तावीस वर्षांपासून पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकण्याचे काम संवाद करत आहे. ही साहित्य, कला आणि सांस्कृतीची सेवा अशीच पुढे चालत राहो.
पसायदानाचा अर्थ लक्षात ठेवा आणि त्यानुसार वागा असा संदेश दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मुलांना दिला. लांजेकरांचे पाच चित्रपट या महोत्सवात मुलांना पाहायला मिळाले.
महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती बाल-कुमारांना व्हावी तसेच महाराष्ट्रातील संत परंपरा व वैभवशाली इतिहास मुलांना कळावा या हेतूने महोत्सवात पाच ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात आले. सत्तावीस वर्षांपासून सातत्याने सुरू असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव बाल चित्रपट महोत्सव आहे, असे सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मंत्री मोहोळ यांचे स्वागत राजूशेठ कावरे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. निकिता मोघे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सुनील महाजन यांनी आभार मानले.

शहर पोलीस दलातील २० पोलीस अधिकारी, पोलीस हवालदार यांना महाराष्ट्र दिनानिमित्त महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

पुणे- महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप, दिलीप फुलपगारे, गणेश माने यांच्यासह पुणे शहर पोलीस दलातील २० पोलीस अधिकारी, पोलीस हवालदार यांना सेवा कालावधीत प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. १५ वर्षाहुन अधिक काळ सेवाभिलेख उत्तर राखल्याबद्दल त्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

निळकंठ राजाराम जगताप (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
दिलीप मगनशेठ फुलपगारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस ठाणे)
गणेश जगन्नाथ माने (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा)
ज्ञानेश्वर काळुराम नागवडे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे)
प्रविण पंढरीनाथ जगताप (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे)
राजू उत्तम जाधव (सहायक पोलीस फौजदार, खडकी पोलीस ठाणे)सौदागर भगवान माने (सहायक पोलीस फौजदार, वानवडी पोलीस ठाणे)
राहुल देवराम मखरे (सहायक पोलीस फौजदार, गुन्हे शाखा)
संजयकुमार ज्ञानोबा भोसले (सहायक पोलीस फौजदार, विशेष शाखा)
रमेश वसंत दळवी (सहायक पोलीस फौजदार बॉम्ब शोधक व नाशक पथक)
राहुल विष्णु जोशी (पोलीस हवालदार, फरासखाना पोलीस ठाणे)
पांडुरंग सुभाष पवार (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा)
शरद बबन वाकसे (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा)
राजू यशवंत कदम (पोलीस हवालदार, मुंढवा पोलीस ठाणे)
ऋषिकेश गुलाबराव महल्ले (पोलीस हवालदार, कोंढवा पोलीस ठाणे)
प्रमोद बबन टिळेकर (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा)
अमजद गुलाब पठाण (पोलीस हवालदार, बंडगार्डन पोलीस ठाणे)
राहुल रामचंद्र माने (पोलीस हवालदार, फरासखाना पोलीस ठाणे)
अतुल ज्ञानेश्वर साठे (पोलीस हवालदार, शिवाजीनगर पोलीस ठाणे)
सुरेखा दीपक महाजन (पोलीस हवालदार, नियंत्रण कक्ष, पुणे शहर

वडगावशेरी मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत करावा – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्या समवेत आमदार बापूसाहेब पठारे यांनी मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत व सुनियोजित करावा यासंदर्भात पाहणीदरम्यान मागणी केली .

पुणे – वडगावशेरी मतदारसंघातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध करण्याच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब तुकाराम पठारे यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला.

या दौऱ्यात लोहगाव बाजारतळ येथील सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी करण्यात आली. हे काम सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. त्यानंतर हरणतळे वस्ती, विमाननगर, तुळजा भवानी नगर, खराडी या भागांतील पाण्याच्या टाक्यांची पाहणी करण्यात आली. या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टाक्यांमध्ये साठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

भामा आसखेड योजनेअंतर्गत वडगावशेरी परिसरासाठी दररोज २०० एमएलडी पाण्याची मंजुरी असूनही सध्या केवळ १४२ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. उर्वरित ५८ एमएलडी पाणी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच अनियमित पाणीपुरवठा सुरळीत व सुनियोजित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व कामांच्या गतीचा अधिकाऱ्यांसह आढावा घेतला. यावेळी काही महत्त्वाच्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविल्या जातील असे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितल्याचे पठारे यांंनी सांगितले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी करावी – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पठारे यांची मागणी..

पुणे – वडगावशेरी मतदारसंघातील चंदननगर येथील जुन्या मुंढव्या रस्त्यालगत असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत दि. २३ एप्रिल २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, यात नागरिकांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आल्याने अनेकांनी आपले सर्वस्व गमावले आहे. ही आगीची घटना अतिशय दुर्दैवी होती.

सदर घटना घडून एक आठवडा होवूनही आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सदर आगीच्या दुर्घटनेची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या आगीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षितता आणि भीतीमय वातावरण तयार झाले आहे. सदर वसाहतीत लागलेल्या आगीच्या घटनेबाबत अनेक नागरिक खाजगीत वेगवेगळी चर्चा करत आहे. आगीच्या घटनेचे कारण अद्याप स्पष्ठ झाले नसल्या कारणाने सदर घटनेकडे नागरिक संशयाने पाहत आहेत. या सर्व बाबी विचारात घेता या घटनेची उच्चस्तरीय सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून सदर दुर्घटनेमागील सत्य कारणे समोर येतील आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करता येवू शकतात असे पठारे म्हणाले.

सदर आगीच्या गंभीर घटनेची तातडीने दखल घेवून आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एका उच्चस्तरीय चौकशी समितीची नेमणूक करावी. ज्यामार्फत ही समिती निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य कारणे समोर आणतील. जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करता येतील. तसेच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी असल्याचे पठारे यांनी सांगितले

मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नका

महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबईदि. 30 एप्रिल 2025 –

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसविण्यात येत आहेत. प्रतीक्षा यादी बदलून पंप आधी बसवून देतो, असे आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी अशा बनावट कॉल किंवा मेसेजला बळी पडू नये तसेच अशा कॉलनुसार कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक आहे. शेतकऱ्यांनी ज्या क्रमाने नोंदणी केली आहे त्यानुसार पंप बसविण्यात येत आहेत. कोणालाही प्रतीक्षा यादी बदलून व इतरांना डावलून पंप देण्यात येत नाहीत. शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर पंप बसविण्यासाठी नंतर कधीही पैसे भरण्याची गरज नाही. 

शेतकऱ्याने आपल्या हिश्श्याची रक्कम भरून पंप बसविणाऱ्या एजन्सीची निवड केली की त्या शेतकऱ्याचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट होते. यादीनुसारच पंप बसविण्यात येत आहेत. 

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत प्रतीक्षा यादी डावलून आधी पंप बसवून देतो असे बनावट कॉल आले, तर शेतकऱ्यांनी त्याबाबत महावितरणच्या 1800 233 3435 अथवा 1800 212 3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी. तसेच जवळच्या महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून शंका निरसन करता येईल.

या योजनेत शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व सौर कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो. केंद्र सरकारकडून 30 टक्के तर राज्य सरकारकडून 60 टक्के अनुदान मिळते. अनुसूचित जाती – जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. सौर पॅनेल्समधून 25 वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ पंपाचे बिल येत नाही. तसेच दिवसा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते.

राज्य सरकारने जाहीर केलेली ही योजना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. सौर कृषी पंप बसविण्याच्या बाबतीत सध्या महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लवकरात लवकर पंप बसविण्यासाठी महावितरण प्रयत्न करत आहे.

साहित्याची मागणी चुकीची

शेतात सौर कृषी पंप बसविताना काही ठिकाणी संबंधित एजन्सीकडून शेतकऱ्यांकडे वाहतूक खर्च अथवा अन्य साहित्याची मागणी झाल्याच्याही तक्रारी महावितरणकडे आल्या आहेत. परंतु सौर कृषी पंप बसविण्याबाबत संपूर्ण कामाची जबाबदारी संबंधित एजन्सीची असल्याने शेतकऱ्यांनी अशा प्रकारे साहित्याची मागणी झाल्यास त्याची दखल घेऊ नये व महावितरणकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अल्पसंख्यांक विभागाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला आढावा

मुंबई दि ३० – अल्पसंख्यांक विभागामार्फत सुरू असलेल्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, जैन आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट‍्रराज्य हज समितीच्या कामकाजाबाबत अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत जे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यावर देखरेख ठेवावी आणि परताव्‍याचे प्रमाण वाढविण्यात यावे. तसेच जैन आर्थिक विकास महामंडळाला केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. या महामंडळाच्या पद निर्मिती आणि भरती प्रक्रिया राबविली बाबत आढावा घेतला सोबतच सर्व पायाभूत सुविधांचा विकास करण्यात बाबत उपाय योजना करण्यात यावेत तसेच जास्तीत जास्त अल्पसंख्यांक वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचनाही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी दिल्या. तक्रारींसाठी १८२२५७८६ या टोल फ्री नंबर जास्तीत जास्त लोकांपर्यत पाहोचावा. पंजाबी साहित्य अकादमी आणि उर्दु साहित्य अकादमीसाठी मिळणाऱ्या निधीचा योजनेअंतर्गत असलेल्या कार्यक्रमासाठी वापर करून जास्तीत जास्त साहित्यीक आणि साहित्य प्रेमींना त्याचा लाभ मिळेत यासाठी प्रयत्न करावेत.

हज यात्रेसाठी १८ हजार ९४९ हजी जात आहेत त्यांच्या प्रवासाचे नियोजन, सोयी सुविधा, आणि सुरक्षितेची सोय करावी अशा सुचनाही राज्यमंत्री मिसाळ यांनी यावेळी केल्या.