Home Blog Page 3305

पूना कॉलेजमध्ये यापुढे आठवड्यातून एकदिवस “ऊर्दू लोकराज्य”चा विशेष तास

0

पुणे दि.1: शासनाच्यावतीने प्रसिध्द करण्यात येणारे “लोकराज्य” मासिक हे विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. लोकराज्यच्या वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वात मोठा बदल होणार आहे, त्यामुळे यापुढे पूना कॉलेजमध्ये प्रत्येक आठवड्यातून एक दिवस “लोकराज्य”चा विशेष तास घेणार असल्याचे प्रतिपादन पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख यांनी केले.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय माहिती कार्यालय, पुणे, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे आणि वाय ॲण्ड एम अंजूमन खैरुल इस्लाम संस्थेच्या पुना कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “ऊर्दू लोकराज्य वाचक मेळाव्या”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शेख बोलत होते. यावेळी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मोईनुद्दीन खान, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य इब्राहिम खन, पर्यवेक्षक मेहराजवुल हक उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. शेख म्हणाले, लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त माहिती देण्यात येते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक अत्यंत उपयुक्त आहे. या मासिकाच्या नियमित वाचनाने शासनाच्या विविध निर्णयांची, योजनांची माहिती मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडते. ऊर्दू लोकराज्य हे ऊर्दू भाषिकांसाठी उपयुक्त आहे. मातृभाषेत मिळणारी माहिती अधिक चटकन समजते त्यामुळे ऊर्दू लोकराज्य हे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी या लोकराज्यचा लाभ घेवून ते तळागाळापर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.

श्री. मोहन राठोड म्हणाले, ऊर्दू भाषेत गोडवा आहे. या भाषेच्या अभ्यासामुळे वक्तृत्व बहरते. त्यामुळे ऊर्दू भाषेचे महत्व वेगळे आहे. सर्व भाषांचे जतन-संवर्धन होणे आवश्यक आहे त्यामुळे ऊर्दू भाषेला चालना देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी शासन विविध उपाययोजना अवलंबत असते. ऊर्दू लोकराज्यच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

मोईनुद्दीन खान म्हणाले, ऊर्दू भाषेला चालना देण्याचे काम महाराष्ट्र शासन करत आहे. ऊर्दूच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना शासन राबवत असते, ही ऊर्दू भाषेसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. ऊर्दू लोकराज्य हे अत्यंत उपयुक्त असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला गती मिळेल. या ऊर्दू लोकराज्य वाचक चळवळीला गती देण्यासाठी पूना कॉलेज सक्रीय मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती सहाय्यक जयंत करपे यांनी केले. अभार राजेंद्र सरग यांनी मानले. या कार्यक्रमाला माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहाय्यक संग्राम इंगळे, विलास कसबे, विशाल कार्लेकर, रोहीत साबळे, संजय गायकवाड, सुर्यकांत कासार, ए. एम. खान, रावजी बांबळे, पूना महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छता दूत म्हणून काम करण्याची तयारी…. अभिनेत्री मुक्ता बर्वे

0
पुणे-मी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेचा प्रश्न सोशल मीडिया च्या माध्यमातून मांडला तो एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक जबाबदार नागरिक म्हणून आणि मी प्रश्न मांडल्यावर अवघ्या काही तासात  महापौर मुक्ता टिळक,संदीप खर्डेकर,स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांसह तेथे धाव घेतली व त्वरित स्वच्छता करवून घेतली याचे मला कौतुक वाटते,आणि आज मी माझ्या नाट्यप्रयोगासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गेले असता तेथील स्वच्छ व प्रसन्न वातावरण बघून मला आनंद झाला.मात्र स्वच्छतेच्या प्रश्नात नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून या साठी एखादी डॉक्युमेंट्री तयार केली व त्या माध्यमातून सोप्या शब्दात नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत तसेच त्याच्या विघटनाबाबत माहिती देता आली व त्या माध्यमातून जनजागृती करता आली तर त्यासाठी मी माझा वेळ व आवाज द्यायला तयार आहे ,किंबहुना आपली पुणे अधिक स्वच्छ व सुंदर होणार असेल तर त्यासाठी स्वच्छता दूत म्हणून काम करण्यास देखील मी तयार आहे असे मनोगत प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केले.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रभाग कर १३ हा झीरो गार्बेज प्रभाग करण्याच्या दृष्टीने  बसविलेल्या ओला व सुका कचरा वर्गीकरणाच्या वेगळ्या कचरा पेट्यांच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी आदर पुनावाला क्लीन सिटीस इनिशिएटिव्ह्ज च्या वतीने प्रभागाची त्रिलो मशीन,ग्लुत्तों मशीन व १०० कचरा पेट्या देण्यात आल्या.हे सर्व यंत्र स्वच्छतेसाठी कार्यान्वित करण्याचा शुभारंभ पटवर्धन बागेतील डा श्यामाप्रसाद मुखर्जी  उद्यानात अभिनेत्री  मुक्ता बर्वे यांच्या हस्ते करण्यात आला.
मी माझ्या प्रभागात इ कचरा,प्लास्टिक कचरा,जैव वैद्यकीय कचरा यांच्या संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून हा प्रभाग झीरो गार्बेज प्रभाग करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे यासाठी नागरिकांचा आणि प्रशासनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मी या कार्यात नक्कीच यशस्वी होईन असा विश्वास या उपक्रमाच्या संयोजिका नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला.
या उपक्रमात आदर पुनावाला ग्रुप,क्रिएटिव्ह फाउंडेशन,जनवानी आणि पुणे महानगरपालिका यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्य लाभले असून आपले शहर आपला परिसर स्वच्छ व सुंदर असावा यासाठी विविध संस्था संघटना व कंपन्यांनी सी एस आर अंतर्गत आपले योगदान द्यावे असे ही सौ खर्डेकर म्हणाल्या.
आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसेच आपला परिसर व आपले शहर ही स्वच्छ असावे हे जोपर्यंत नागरिकांना मनापासून वाटत नाही तोपर्यंत हे कार्य यशस्वी होणार नाही असे सांगतानाच यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.तसेच आपणच कचरा निर्माण करतो त्यामुळे त्याचे वर्गीकरण आणि विघटनाची जबाबदारी ही आपलीच असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.
या धर्तीवर कोथरूड मधील सर्वच प्रभागात अशी मोहीम राबवून आपला कचरा आपल्याच भागात जिरविण्याचा प्रयत्न करू असे वारजे कर्वेनगर प्रभाग समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे म्हणाले.तर या सर्व उपक्रमांना सक्रिय सहकार्य करू असे मनोगत नगरसेवक दीपक पोटे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास नगरसेवक दीपक पोटे,माधुरी सहस्रबुद्धे,सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने,वरिष्ठ आरोग्य निरीक्षण दीपक ढेलवान,अलंकार पोलीस स्टेशनच्या पो नि रेखा साळुंखे,जनवाणीचे पावन बडगुजर,भाजप चे प्रभाग अध्यक्ष गौरी करंजकर,सरचिटणीस बाळासाहेब धनवे,राजेंद्र येडे,सुयश गोडबोले,मयूर देशपांडे,ऋत्विक अघोर,कल्पना पुरंदरे,मंगल शिंदे,निलेश गरुडकर,संगीताताई आडवडे,अनुराधा एडके, अपर्णा लोणारे,सुवर्णा काकडे,इ मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..श्री राज तांबोळी यांनी सुंदर फेटा बांधून मुक्ता बर्वे यांचा सन्मान केला,तर पटवर्धन बागेतील नागरिकांनी चंद्रकांत भिसे,मालतीताई दाणी,अंजलीताई रोडे यांच्या हस्ते मुक्ता बर्वे यांना सन्मानित केले.अनुज खरे यांनी महाराष्ट्रातील सस्तन प्राणी हे पुस्तक भेट देऊन तर सारंग राडकर यांनी पुणे विद्यापीठ इमारत जेथे मुक्ता बर्वे यांचे शिक्षण झा ले त्याचे तैलचित्र देऊन मुक्ता बर्वे यांचा सन्मान केला.मुक्ता बर्वे यांनी स्वच्छतेचा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडल्याबद्दल पतित पावन संघटनेच्या वतीने सीताराम खाडे,मनोज नायर,दिनेश भिलारे,गोकुळ शेलार यांनी त्यांना सन्मानित केले.
प्रास्ताविक मंजुश्री खर्डेकर,सूत्र संचालन संदीप खर्डेकर तर आभार प्रदर्शन गणेश सोनुने यांनी केले.

रंगूनवाला दंत महाविद्यालयात मौखिक आरोग्य दिन साजरा

0
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयात १ ऑगस्ट रोजी सकाळी ‘मौखिक आरोग्य दिन ‘साजरा करण्यात आला .
 एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालय आणि इंडियन सोसायटी ऑफ पेरीओडेंटॉलॉजी च्या सहकार्याने व्याख्यान आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .उपस्थितांना ओरल बी च्या वतीने मौखिक आरोग्य किट चे वितरण करण्यात आले .  डॉ . सकीना शेख ,डॉ . संगीता मुगलीकर यांनी मार्गदर्शन केले . प्राचार्य रमणदीप दुग्गल ,महाविद्यालयाचे रजिष्ट्रार आर . ए . शेख ,अरिफ गुडाकूवाला उपस्थित होते . श्रद्धा सिकतीया यांनी आभार मानले

परवडणाऱ्या घरांना प्रोत्साहन देण्यासाठी हवे सरकारी पाठबळ

0

पुणे  :-   “परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळण्यासाठी विकसकांना विविध योजनांच्या माध्यमातून सरकारी पाठबळ मिळायला हवे. सरकार आणि बांधकाम व्यावसायिक यांनी यासाठी एकत्रित प्रयत्न केले तरच २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर लाभेल,”असे मत क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केले.

क्रेडाई महाराष्ट्राच्या २० विकसकांनी लखनौ येथे नुकत्याच पार पडलेल्या क्रेडाईच्या ( ईसीजीसी) या  राष्ट्रीय परिषदेत आपला सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी परवडणारी घरे यावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना कटारिया बोलत होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ,उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा  तसेच कॅबिनेट मंत्र्यांनी देखील उपस्थित राहून या परिषदेत मार्गदर्शन केले.

कटारिया म्हणाले की, परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. परंतु, अशा घरांची निर्मिती करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना राज्य सरकारकडून देखील सहकार्य  प्राप्त झाले तर निश्चितच विकसक स्वतःहून पुढाकार घेतील.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संपर्कात राहून क्रेडाई याविषयी सक्रिय प्रयत्न करत असून विकसक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने आपण पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट्य साध्य करू शकू. यात विकसकांचा सिंहाचा वाटा असेल, असेही कटारिया यांनी सांगितले.

यावेळी रेरा कमिटीचे सुहास मर्चंट यांनी रेराची महाराष्ट्रातील अंमलबजावणी याविषयी  सादरीकरण केले. महाराष्ट्र राज्य पातळीवर महिला समितीच्या संयोजक म्हणून काम पाहणाऱ्या दर्शना परमार-जैन यांनी महिला सबलीकरण या विषयावर सादरीकरण करत येत्या ६ महिन्यात देशभरातही अशा प्रकारच्या ७५हून अधिक शहरात महिला समितीची स्थापना करण्याची ग्वाही दिली.

या परिषदेत क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर,आदित्य जावडेकर, सचिन कुलकर्णी, दिलीप मित्तल यांच्यासह क्रेडाई पुणे मेट्रोचे प्रातिनिधिक पदाधिकारी सहभागी झाले होते.या परिषदेत क्रेडाईच्या १५० पेक्षा जास्त शहराध्यक्षांनी हजेरी लावली. प्रश्नोत्तरांच्या तासातून शंकांचे निरसन, बांधकाम विषयक विविध कायद्याची सविस्तर चर्चा व  तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे क्रेडाईची ही परिषद उपस्थितांसाठी फलदायी ठरली.

लोकमान्य टिळकांवर चित्रपट प्रकरणी फसगत झाल्याने सरकारने 3 कोटी सव्याज वसूल करावे (व्हिडीओ)

0

पुणे – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर चित्रपट तयार करून देतो असे सांगणाऱ्यांनी चक्क केंद्र आणि राज्य सरकारचीच तब्बल 3 कोटीची फसगत केल्याचा  आरोप करून हि रक्कम जनतेच्या कराच्या रकमेतील असल्याने ती सव्याज वसूल करावी अशी मागणी येथे माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि  विष्णू कमळापुरकर यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे
हा चित्रपट करण्यासाठी राज्य सरकारने एकरकमी 50 लाख रुपये तर केंद्र सरकारने  2001 मध्ये अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला  होता. त्यापैकी निर्माते विनय धुमाळे यांना सव्वा कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्सही देण्यात आला होता. पुढे नंतर उरलेले सव्वा कोटी रुपयेही देण्यात आले. संबंधित मंत्रालयास 2005-06 मध्ये या चित्रपटाच्या काही प्रती दिल्या असे सांगण्यात येत आहे. मात्र, अडीच कोटी रुपये खर्च करूनही लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्रपट लोकांना मात्र आजवर पाहण्यास मिळालेला नाही.दरम्यान राज्य सरकारने मात्र आपण दिलेले 50 लाख रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश देवूनही अद्याप त्यावर काही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही असे येथे माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि  विष्णू कमळापुरकर यांनी पत्रकार परिषदेत  सांगितले
गेली दोन वर्षे सातत्याने पत्रव्यवहार करूनही चित्रपट प्रदर्शनाबद्दल काहीही माहिती मिळत नाही, निर्माते धुमाळे याना देण्यात आलेली रक्कम त्वरित वसूल करावी तसेच ही वसुली करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मंचाचे विवेक वेलणकर आणि वि. रा. कमळापूरकर यांनी केली आहे .
पहा  आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा पिंपरीत सत्कार

0

पिंपरी- श्रमिक पत्रकार तसेच छोटे दैनिक-साप्‍ताहिकांच्‍या  प्रश्‍नांची मला जाण असून हे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी कार्यालयीन स्‍तरावर मी माझ्या परीने प्रयत्‍न करीन, अशी ग्‍वाही जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी दिली.

येथील पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे श्री. सरग यांचा सत्कार नुकताच पार पडला. यावेळी सत्‍काराला उत्‍तर देतांना ते बोलत होते. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

पिंपरी महानगरपालिकेच्या कै. भा.वि. कांबळे पत्रकार कक्षात हा सत्‍कार संपन्‍न झाला.

श्री. सरग यांना आद्य पत्रकार देवर्षी नारद व्यंगचित्रकारिता  पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्तानेही शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्‍यात आला. अधिस्‍वीकृती पत्रिका मिळण्‍यासाठीचे नियम,  शासनमान्‍य यादीवर येण्‍यासाठीचे नियम, शासनाचे मुखपत्र असलेल्‍या लोकराज्‍य या मासिकाबाबत त्‍यांनी माहिती दिली.

कार्यक्रमास पिंपरी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गणेश हुंबे, समन्वयक अनिल वडघुले, उपाध्यक्ष संजय बोरा, विश्‍वास शिंदे, खजिनदार दादा आढाव, सरचिटणीस अजय कुलकर्णी, अनिल भालेराव, मदन जोशी, नंदकुमार रानडे, सीताराम मोरे, नाना कांबळे , प्रकाश जमाले, दत्ता गायकवाड, डी. एस.  कांबळे, संदीप तापकीर, बाबू कांबळे आदी उपस्थित होते

जब शाहरुख खान ने सबसे पहले बनारसी पान खाने की गुजारिश की!

अभिनेता शाहरुख खान इन दिनों अपनी आगामी फिल्म “जब हैरी मेट सेजल” के प्रचार में व्यस्त है और इसी प्रचार के सिलसिले में अभिनेता पहुँचे बनारस की भूमि पर।

शाहरुख खान पान के कितने शौक़ीन है इस बात से तो हर कोई वाकिफ़ रखता है और ऐसे में जब बनारस जाए और वहाँ का प्रसिद्ध बनारसी पान ना खाएं तो कुछ अधूरा-अधूरा सा लगना लाज़मी है। ऐसे में, बनारस पहुंचते ही अभिनेता ने अपनी टीम से बनारसी पान खाने के लिए कहा। शाहरुख ने सबसे पहले वहाँ का सुप्रसिद्ध बनारसी पान खाया और फिर बनारस में स्थित अशोका इंस्टिट्यूट जा कर अपनी फिल्म का प्रचार किया।

इससे पहले 2006 में आई फ़िल्म “डॉन” में भी अभिनेता ने बनारसी पान का लुत्फ उठाया था लेकिन बनारस की भूमि पर जा कर उस पान को खाने का मज़ा ही कुछ ओर होता है और इसिलए बनारस पहुंचते ही शाहरुख ने सबसे पहले पान से अपना मुँह मीठा किया और फिर अपनी फिल्म का प्रचार किया।

इम्तियाज अली द्वारा निर्देशित इस फ़िल्म में शाहरुख एक पंजाबी मुंडे हैरी की भूमिका में नज़र आएंगे और यह फ़िल्म 4 अगस्त, 2017 को देशभर में रिलीज होगी।

युवक मतदारनोंदणी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पुणे : तरुण मतदार व पात्र प्रथम मतदारांचा वय 18 ते 21 वयोगटातील विद्यार्थी तसेच युवक महाविद्यालयात शिकत नाहीत आणि ज्यांनी मतदार यादीमध्ये नावनोंदणी करण्यासाठी फॉर्म नंबर 6 दाखल केलेले नाहीत,अशा शाळा व महाविद्यालयबाह्य युवकांनी त्याची नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदानकेंद्र व महाविद्यालयांमध्ये दि. 29 जुलै 2017 रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला असून ,मोहिमेमध्ये अर्ज नमुना 6,7,8 व 8अ एकूण 23,894 अर्ज प्राप्त झालेले आहेत.अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली आहे.

संगीत आणि सिनेदिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या हस्ते ‘ड्राय डे’ चे मुझिक लाँच

0
आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित  ‘ड्राय डे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  ‘ड्राय डे’ या सिनेमाच्या नावामुळेच या चित्रपटाची अधिक चर्चा होत असून. या सिनेमाचे नुकतेच अंधेरी येथील कोहिनूर हॉटेलमध्ये संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत म्युझिक लाँच करण्यात आले. संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमात हिंदीचे सुप्रसिद्ध, निर्माते,  दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांच्या हस्ते ‘ड्राय डे’ सिनेमाच्या गाण्यांचे सादरीकरण केले गेले.
संजय पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमातील जय अत्रे लिखित ‘अशी कशी’ आणि  ‘दारू डिंग डांग’ ही दोन गाणी म्युझिक लॉंच सोहळ्यात सादर करण्यात आली.  संगीतदिग्दर्शक अश्विन श्रीनिवासन यांनी संगीतबद्ध केलेल्या या दोन गाण्यांपैकी ‘अशी कशी’ हे प्रेमगीत असून,  जोनीता गांधी आणि अॅश किंग या हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज त्याला लाभला आहे. आजच्या तरुण पिढीला प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर या गाण्यातून होणार आहे, शिवाय आजच्या तळीरामांवर आधारित  ‘दारू डिंग डांग’ हे गाणेदेखील झिंग चढवणारे ठरत आहे. गायक विशाल ददलानी यांच्या आवाजातील ह्या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाददेखील लाभत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतल्या या ‘ड्राय डे’ चे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन  अमित कुमार यांनी केले आहे. तरुणाईवर आधारीत असलेल्या या सिनेमात ऋत्विक केंद्रे, कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी,  मोनालिसा बागल, आयली घिए,अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.

’युवा क्रीडा प्रशिक्षक गौरव समारंभ व कार्यकर्ता मेळावा उत्साहात साजरा

0

पुणे :

’पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी क्रीडा विभागातर्फे ’युवा क्रीडा प्रशिक्षक गौरव समारंभ व कार्यकर्ता मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. रविवारी हा कार्यक्रम मुक्तांगण शाळा हॉल येथे झाला. गौरव समारंभातंर्गत विविध खेळात स्वतः पदक मिळवलेले व नवीन खेळाडू घडविण्यात मोलाचे योगदान देत आहेत अशा खेळातील 3 महिला व 4 पुरुष प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

’राष्ट्रवादी कॉगे्रस पार्टी’चे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, विरोधी पक्षनेते चेतन तुपे – पाटील, पुणे शहर सरचिटणीस नितीन कदम, छत्रपती पुरस्कार विजेते राजेंद्र राऊत यांच्या हस्ते गौरवचिन्ह देण्यात आले. यावेळी क्रीडा विभागाच्या 8 नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. कार्यक्रमाला क्रीडा विभागाचे 500 कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात आलेल्या खेळाडू आणि युवा प्रशिक्षकांमध्ये पल्लवी वाघचौरे (कब्बडी), शिवानी गरुड (हॅण्डबॉल), मंगल कांबळे (मॅरेथॉन), नितीन शेटे (कराटे), ओंकार राठोड (किक बॉक्सिंग), संभाजी वाघ (फुटबॉल), तुषार गोळे (कुस्ती) यांचा समावेश होता.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस क्रिडा विभाग शहराध्यक्ष विपुल म्हैसूरकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘पुणे शहरामध्ये अनेक प्रतिष्ठित क्रीडा प्रशिक्षक आहेत, ज्यांचे अनेक सत्कार झाले आहेत. पण हेच सत्कार त्यांच्या उमेदीच्या काळात म्हणजे ते घडत असतानाच्या काळात जर झाले असते, तर त्यांचा आत्मविश्‍वास अजून, वाढला असता म्हणूनच आज आम्ही असे युवा क्रीडा प्रशिक्षक निवडले की जे स्वतः आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू आहेत, व असेच खेळाडू घडवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देत आहेत. तसेच क्रीडा विभागाच्या कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जाऊन लोकांची कामे करून, पक्षाला बळकटी दिली पाहिजे.’

रवींद्र माळवदकर म्हणाले, अशा प्रकारच्या मेळाव्याबद्दल कौतुक आहे व अशाच प्रकारची कामे आगामी काळात चालू ठेवणे आवश्यक आहे. आमचा कायम पाठिंबा राहील.’
चेतन तुपे पाटील म्हणाले, ‘आगामी काळात क्रीडा विभागातर्फे वेगवेगळ्या खेळात महापौर स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे.’

यावेळी ’पुणे महानगरपालिके’तर्फे महिला खेळाडू व महिला क्रीडा प्रशिक्षकांसाठी विशेष शिष्यवृत्ती चालू करावी, अशी मागणी ’क्रीडा सेल’च्या वतीने चेतन तुपे यांच्याकडे करण्यात आली. चेतन तुपे यांनी मागणीस त्वरित होकार दिला.

कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये राष्ट्रवादीचे पुणे शहर सरचिटणीस नितीन कदम, ’क्रीडा सेल’ शहर अध्यक्ष विपुल म्हैसूरकर, समीर पवार, प्रशांत कदम, ओम कासार, युवराज दिसले, अमोल नागटिळक, कुमार भोसले, ओंकार पालकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

सामाजिक विषमता बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीसाठी काम करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

0

चिंचवड : आपला देश विविधतेत एकता असलेला देश असल्याने भाषा हा मुद्दा गौण आहे. भाषेपेक्षाही भावना महत्वाच्या असतात. भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती करायची आहे. त्यामुळे सामाजिक विषमता बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्रित पणे देशाच्या प्रगतीसाठी काम केले पाहिजे असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. चिंचवड मल्याळी समाजाला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येथील रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आयोजित  कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महापौर नितीन काळजे, नगरसेवक बाबू नायर, राजू मिसाळ,अनुराधा गोरखे, महापालिका विरोधी पक्ष नेते योगेश बहल, चिंचवड मल्याळम समाजाचे टी. पी विजयन, जी. रघुनाथान, पी.व्ही जनार्दन,टी. व्ही. भास्करण, कामगार नेते राजन नायर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, मल्याळी माणूस हा अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. आपल्या याच गुणाच्या आधारे त्याने देशात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. केरळ निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या निसर्गाचा उपयोग करत त्यांनी आयुर्वेद क्षेत्रात अत्यंत भरीव कामगिरी केली आहे.  त्याच प्रमाणे केरळ रबर उद्योग आणि केरळी नृत्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.  आपल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी इतरही अनेक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.

श्री बापट म्हणाले, केरळी समाज जेथे राहतो तेथील संस्कृती आत्मसाद करतो. महाराष्ट्रातही त्यांचे योगदान अमूल्य आहे. हे राज्य १००टक्के साक्षर असणारे आहे. याचाही आम्हाला अभिमान वाटतो.

मराठी माणसा सोबतच मल्याळी समाजाचा ही पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या प्रगती मध्ये महत्वपूर्ण वाटा आहे.  या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार तसेच पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका त्यांच्या पाठीशी राहील असं ही ते म्हणाले.

महापौर नितीन काळजे यांनी पिंपरी चिंचवड मध्ये देशाच्या सर्व भागातून नागरिक स्थायिक झाले असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

नगरसेवक बाबू नायर यांनी पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक शहराच्या जडणघडणीत केरळी समाजाचं योगदान असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. तर जी. रघुनाथान यांनी चिंचवड मल्याळम समाजाच्या ५० वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर तर्फे शालेय बसचालकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर

0
 पुणे – ‘रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर’ तसेच रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, पुणे बस ओनर्स असोसिएशन आणि आरटीओ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसचालकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर चे सर्व्हिस डायरेक्टर डॉ. भगवान नारखेडे व डॉ. हर्षिता नारखेडे यांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगरचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक जोशी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय बसचालकांच्या वैद्यकीय तपासणीच्या  आवश्यकतेवर भर दिला तसेच रोटरीच्या अन्य उपक्रमांची माहिती दिली.


               बसचालकांच्या या वैद्यकीय तपासणी शिबिराचा सुमारे ४०० बसचालकांनी  लाभ घेतला. त्यामध्ये काही महिला चालकांचाही समावेश होता. वैद्यकीय तपासणीबरोबरच या सर्वांना त्यांच्या आरोग्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगरचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष शिरीष पुराणिक, सचिव जयंत लष्करे, खजिनदार दीपक नानिवडेकर आणि सर्वश्री, अशोक बापट, मिलिंद अग्निहोत्री, हरीश घाटपांडे, समिर खळे, आशा आमोणकर, आकांक्षा पुराणिक, सोनाली मोकाशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पहा कशी घाटात कोसळली दरड …सुदैव -हानी टळली(व्हिडीओ)

0

पुणे-सिंहगडावर जाणाऱ्या घाटात आज (रविवारी) सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने  मोठी हानी टळली.

सुट्टीचा दिवस असल्यामुळे सिंहगडावर आज पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती . त्यात आज सायंकाळी गडावर जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी दगड घसरत असल्याचे सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने गडावर जाणारी व गडावरून येणारी वाहतूक अडवली. त्यामुळे दरड कोसळल्यामुळे होणारी मोठी हानी टळली.

तूर्तास दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पर्यटकांना गडावरच थांबण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तासाभरातच दरड रस्त्यातून बाजूला करण्यात येईल व रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. दरम्यान, मिळालेल्या वृत्तानुसार जेसीबी यंत्रणा पोहोचली असून दुचाकी गाड्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

उल्हास पवार यांचा सत्कार

0
पुणे- माजी आमदार उल्हास पवार यांचा वाढदिवसा निमित्त माजी केंद्रीय मंत्री . सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते जाहीर सत्कार मुक्तांगण शाळा, शिवदर्शन, पुणे येथे संपन्न झाला.

सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पगडी उपरणं,श्रीफळ व हार ने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजीव जगताप, अंकलकोट पाटील,शशिकांत पागे,श्रीपाल सबनीस नरेंद्र व्यवहारे, मोहन जोशी, रमेश बागवे,कमलव्यवहारे, इत्यादी उपस्थित होते. उल्हास पवार यांचे चाहते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

दोनवेळा जाहिरात देवून एकाचेच टेंडर ..स्मार्ट सिटी तला ‘गजहब ‘?

0

पुणे- महापालिकेने दोन वेळा जाहिरात देवूनही ,मुदतवाढ देवूनही चार कामाचे टेंडर  एकाच कंपनीने भरल्याने पालिका प्रशासनाने  तेच आता स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवले आहे .तर अन्य 2 कामांबाबतही असाच प्रकार झालेला असून  यावर आता स्थायी समिती निर्णय घेणार आहे .
बालगंधर्व रंगमंदिरात फायर फायटिंग च्या कामासाठी ९६ लाख 3 हजार ९८५ रुपयांचे सावरकर भवनाच्या फायर फायटिंग च्या कामासाठी ७१ लाख ९९ हजार १३२ रुपये,यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या याच कामासाठी ७६ लाख २४ हजार रुपये,आणि मंगळवार पेठेतील आंबेडकर भवनात याच कामासाठी ७२ लाख ६२ हजार रुपयांचे टेंडर वारज्यातील एचडी फायरकॉन नावाच्या कंपनीने भरले आहेत . हे चारही टेंडर महापालिकेने केलेली पुर्वगनण पत्रकातील रकमेपेक्षा .50 म्हणजे अर्धा टक्का कमी दराने आलेले आहेत . या कामासाठी  २३  डिसेंबर २०१६ रोजी महापालिकेने तीन वर्तमानपत्रातून जाहिरात दिली होती . मात्र याच  एकमेव कंपनीची निविदा आली होती . म्हणून पुन्हा निविदेला मुदतवाढ देवून 5 जानेवारी २०१७ रोजी पूर्वी ज्यांना दिली नाही अशा 3 वर्तमान पत्रातून या टेंडर ची जाहिरात देण्यात आली . तरीही हेच एक टेंडर आले . आणि विशेष म्हणजे चारही टेंडर अर्धा टक्के कमी दराने ….
आधुनिक ,स्मार्ट शहरात आलेल्या अशा एकमेव टेंडर ला महापालिका अतिरिक्त आयुक्त (ज) यांनी मान्यता दिली असून आता हे मान्यतेसाठी स्थायी समिती पुढे ठेवण्यात आले आहे . उद्याच्या मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे .
दरम्यान हडपसर क्षेत्रीय कार्यालयांर्गत प्रभाग क्रमांक ४५ येथे हि सार्वजनिक स्वच्छतेसाठी कंत्राटी सेवक नेमण्या साठी आदित्य सप्लायर्स यांचे ८३ लाखाचे साडेअकरा टक्के जादा दाराचे एकमेव टेंडर आले असून ,प्रभाग क्रमांक ४३ मध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या कामासाठी याच आदित्य सप्लायर्स यांचे एकमेव ५९ लाख ४९ हजार रुपयांचे अकरा टक्के जादा दाराचे टेंडर आलेले आहे . हे दोन्ही टेंडर्स महापालिका प्रशासनाने संमत करून मंजुरी साठी स्थायी समितीकडे पाठविले आहेत . आता निर्णय स्थायी समितीने घ्यायचा आहे .