पुणे – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर चित्रपट तयार करून देतो असे सांगणाऱ्यांनी चक्क केंद्र आणि राज्य सरकारचीच तब्बल 3 कोटीची फसगत केल्याचा आरोप करून हि रक्कम जनतेच्या कराच्या रकमेतील असल्याने ती सव्याज वसूल करावी अशी मागणी येथे माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि विष्णू कमळापुरकर यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे
हा चित्रपट करण्यासाठी राज्य सरकारने एकरकमी 50 लाख रुपये तर केंद्र सरकारने 2001 मध्ये अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यापैकी निर्माते विनय धुमाळे यांना सव्वा कोटी रुपयांचा अॅडव्हान्सही देण्यात आला होता. पुढे नंतर उरलेले सव्वा कोटी रुपयेही देण्यात आले. संबंधित मंत्रालयास 2005-06 मध्ये या चित्रपटाच्या काही प्रती दिल्या असे सांगण्यात येत आहे. मात्र, अडीच कोटी रुपये खर्च करूनही लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्रपट लोकांना मात्र आजवर पाहण्यास मिळालेला नाही.दरम्यान राज्य सरकारने मात्र आपण दिलेले 50 लाख रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश देवूनही अद्याप त्यावर काही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही असे येथे माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि विष्णू कमळापुरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
गेली दोन वर्षे सातत्याने पत्रव्यवहार करूनही चित्रपट प्रदर्शनाबद्दल काहीही माहिती मिळत नाही, निर्माते धुमाळे याना देण्यात आलेली रक्कम त्वरित वसूल करावी तसेच ही वसुली करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मंचाचे विवेक वेलणकर आणि वि. रा. कमळापूरकर यांनी केली आहे .
पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …
लोकमान्य टिळकांवर चित्रपट प्रकरणी फसगत झाल्याने सरकारने 3 कोटी सव्याज वसूल करावे (व्हिडीओ)
Date: