पुणे – ‘रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर’ तसेच रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, पुणे बस ओनर्स असोसिएशन आणि आरटीओ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या बसचालकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर चे सर्व्हिस डायरेक्टर डॉ. भगवान नारखेडे व डॉ. हर्षिता नारखेडे यांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगरचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक जोशी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय बसचालकांच्या वैद्यकीय तपासणीच्या आवश्यकतेवर भर दिला तसेच रोटरीच्या अन्य उपक्रमांची माहिती दिली.
बसचालकांच्या या वैद्यकीय तपासणी शिबिराचा सुमारे ४०० बसचालकांनी लाभ घेतला. त्यामध्ये काही महिला चालकांचाही समावेश होता. वैद्यकीय तपासणीबरोबरच या सर्वांना त्यांच्या आरोग्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगरचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष शिरीष पुराणिक, सचिव जयंत लष्करे, खजिनदार दीपक नानिवडेकर आणि सर्वश्री, अशोक बापट, मिलिंद अग्निहोत्री, हरीश घाटपांडे, समिर खळे, आशा आमोणकर, आकांक्षा पुराणिक, सोनाली मोकाशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.