Home Blog Page 3294

खासदार संभाजीराजे ‘भाऊ रंगारी ‘ च्या पाठीशी …न्यायालयानेही सरकार आणि महापालिकेला म्हणणे मांडण्याचे दिले आदेश

0

पुणे–संभाजी ब्रिगेड शिवाय कोणीही उघड पणे पाठीशी नसताना एकाकी लढत देणाऱ्या भाऊ रंगारी मंडळास आज चाकरी उपोषणाच्या चौथ्या दिवशी  भेट देवून खासदार संभाजी राजे यांनी आपण या मंडळाच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले आहेत .तर दुसरीकडे मंडळांच्या विश्वस्तांची याचिका न्यायालयाने मान्य केली असून पुढील 14 दिवसात राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांनी या संदर्भात आपले म्हणणे मांडावे असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी हा वाद कोर्टात गेला आहे या पार्शवभूमीवर खासदार संभाजीराजे भोसले यांनी भाऊ रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भोसले म्हणाले ‘ ‘खरा इतिहास सर्वांसमोर यायला हवा’ भाऊ रंगारी ‘मंडळाकडे शासकीय पुरावे आहेत. त्यामुळे ‘मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान भाऊ रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून जाहीर करावे या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांची याचिका न्यायालयाने मान्य केली असून पुढील 14 दिवसात राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांनी या संदर्भात आपले म्हणणे मांडावे असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत देव हिंगोरणय, देवयानी कुलकर्णी, हवीश असराणी, प्रिथा वर्टीकर, दिपीत पाटील, समृद्धी कुलकर्णी यांना विजेतेपद

0

पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत देव हिंगोरणय, देवयानी कुलकर्णी, हवीश असराणी, प्रिथा वर्टीकर, दिपीत पाटील, समृद्धी कुलकर्णी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांच्या पराभव करून विजेतेपद संपादन केले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत  मिडजेट(10 वर्षाखालील) मुलींच्या गटात अंतिम फेरीत पुण्याच्या अव्वल मानांकित देवयानी कुलकर्णी हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत नागपूरच्या दुसऱ्या मानांकित जेनिफर व्हर्गीसचा 21/23, 13/15, 11/8, 11/6, 11/3 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. ९वर्षीय देवयानी हि सेंट हेलेना शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक उपेंद्र मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या वर्षातील हे या गटांतील तिसरे विजेतेपद आहे. मुलांच्या गटात मुंबई उपनगरच्या दुसऱ्या मानांकित देव हिंगोरणय आपली विजयी मालिका कायम ठेवत नांदेडच्या नवव्या मानांकित कौस्तुभ गिरगांवकरचा 11/7, 14/12, 11/6 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. देव हा पोदार शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून खार जिमखाना येथे प्रशिक्षक गंदीप भिवनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या गटांतील दुसरे विजेतेपद आहे.

कॅडेट(12 वर्षाखालील) मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात पुण्याच्या अव्वल मानांकित प्रिथा वर्टीकरने ठाण्याच्या दुसऱ्या मानांकित आर्या सोंगडकारचा 11/7, 8/11, 11/6, 11/9 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. 11 वर्षीय प्रिथा हि पीईएस मॉडर्न हायस्कुलमध्ये सहावी इयत्तेत शिकत असून रेडियंट स्पोर्ट्स अकादमी येथे प्रशिक्षक रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या गटांतील हे दुसरे विजेतेपद आहे. याच मुलांच्या गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकित हवीश असराणीने आपला शहर सहकारी तिसऱ्या मानांकित कुशल पटेलला11/9, 11/6, 11/5 असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकावले. हविश हा जसूदबेन एमएल शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून अंधेरी येथील वायएमसीएमध्ये प्रशिक्षक एरिक फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. हवीशचे हे तिसरे विजेतेपद आहे.

सबजुनियर (15 वर्षाखालील) मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत ठाण्याच्या व अव्वल मानांकित दिपीत पाटीलने दुसऱ्या मानांकित मुंबई उपनगरच्या मानव मेहताचा 6/11, 11/3, 14/12, 13/11, 9/11, 13/11 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. दिपीत हा फादर ऍग्नेल शाळेत नववी इयत्तेत शिकत असून फादर ऍग्नेल अकादमीमध्ये प्रशिक्षक सुहास चव्हाण, चैतन्य उदाने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील हे तिसरे विजेतेपद आहे. मुलींच्या गटात सोलापूरच्या सातव्या मानांकित समृद्धी कुलकर्णीने सुरेख खेळ करत मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकित विधी शहा11/8, 11/9, 11/5, 11/4 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. सम्रुद्धी हि शांती इंग्लिश शाळेत नववी इयत्तेत शिकत असून पार्क क्लब येथे प्रशिक्षक आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या गटांतील हे पहिलेच विजेतेपद आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व शिष्यवृत्ती आणि पारितोषिके मिळून एकूण पारितोषिक रक्कम 6,40,000/- अशी देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय नेमबाजपटू अंजली भागवत आणि मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नामदेव शेलार, एमजीज फिटनेस अकादमीचे संचालक महेंद्र गोखले, बी.यू भंडारीचे संचालक देवेन भंडारी, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस, उपाध्यक्षा स्मिता बोडस, माजी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू डॉ.मंदिरा ठीगळे-बसक, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतीन टिपणी,पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव श्रीराम कोणकर, प्रसाद साळुंखे, एनडीटीटीएचे सचिव नरेंद्र छाजेड, स्पर्धा संचालक राजेश शेलार, सुचेता शेलार, एम्स फीनप्रोचे जतिन माळी, सिग्मा वन लॅडमार्कचे व्यवस्थापकीय संचालक कपिल गांधी, व्हेरीयंट नेटवर्क प्रोडक्शनचे विक्रम गुर्जर, आदि मान्यवर उपस्थित होते.राहूल क्षिरसागर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- मिडजेट(10 वर्षाखालील)मुले– उपांत्य फेरी

कौस्तुभ गिरगांवकर(नांदेड,9)वि.वि.पियुष जाधव(नाशिक,4)10/12, 4/11, 11/9, 11/6, 11/8;

देव हिंगोरणय(मुंबई उपनगर,2)वि.वि.पार्थ देशपांडे(पुणे,6)11/9, 11/6, 11/9;

अंतिम फेरी:देव हिंगोरणय(मुंबई उपनगर,2)वि.वि.कौस्तुभ गिरगांवकर(नांदेड,9)11/7, 14/12, 11/6;

मिडजेट(10 वर्षाखालील)मुली: उपांत्य फेरी: 

देवयानी कुलकर्णी(पुणे,1)वि.वि.उर्वी चुरी(मुंबई उपनगर, 4)11/8, 11/3, 11/9;

जेनिफर व्हर्गीस(नागपुर,2)वि.वि.ऊर्जा निळे(धुळे)11/4, 11/8, 11/1;

अंतिम फेरी: देवयानी कुलकर्णी(पुणे, 1)वि.वि.जेनिफर व्हर्गीस(नागपुर,2)21/23, 13/15, 11/8, 11/6, 11/3;

कॅडेट(12 वर्षाखालील) मुले- उपांत्य फेरी

हवीश असराणी(मुंबई उपनगर,1)वि.वि.गौरव पंचांगम(ठाणे)11/3, 11/8, 11/6;

कुशल पटेल(मुंबई उपनगर,3)वि.वि.कुशल चोपडा(नाशिक,)10/12, 11/4, 5/11, 11/7, 11/8;

अंतिम फेरी:हवीश असराणी(मुंबई उपनगर,1)वि.वि.कुशल पटेल(मुंबई उपनगर,3)11/9, 11/6, 11/5;

कॅडेट(12 वर्षाखालील) मुली: उपांत्य फेरी:

प्रिथा व्हर्टीकर(पुणे,1)वि.वि.तनिषा कोटेचा(नाशिक,5)12/10, 11/4, 11/3;

आर्या सोंगडकार(ठाणे,2)वि.वि.साची दळवी(ठाणे,11)13/11, 14/12, 12/10;

अंतिम फेरी: प्रिथा वर्टीकर(पुणे,1)वि.वि.आर्या सोंगडकार(ठाणे,2)11/7, 8/11, 11/6, 11/9;

सबजुनियर (15 वर्षाखालील) मुले- उपांत्य फेरी

दिपीत पाटील(ठाणे,1)वि.वि.करण कुकरेजा(पुणे, 5)11/7, 8/11, 11/7, 11/7, 11/4;

मानव मेहता(मुंबई उपनगर,2)वि.वि.आरुष गलापल्ली(पुणे,14)11/7, 11/8, 11/13, 12/10, 13/11;

अंतिम फेरी: दिपीत पाटील(ठाणे,1)वि.वि.मानव मेहता(मुंबई उपनगर,2)6/11, 11/3, 14/12, 13/11, 9/11, 13/11;

 

सबजुनियर (15 वर्षाखालील) मुली- उपांत्य फेरी

विधी शहा(मुंबई उपनगर,1)वि.वि.खेया शहा(ठाणे,5)11/8, 5/11, 12/10, 11/8, 6/11, 12/10;

समृद्धी कुलकर्णी(सोलापूर,7)वि.वि.तिया डिसुजा(मुंबई उपनगर,11)6/11, 3/11, 11/5, 13/11, 11/7, 11/5;

अंतिम फेरी: समृद्धी कुलकर्णी(सोलापूर,7)वि.वि.विधी शहा(मुंबई उपनगर,1)11/8, 11/9, 11/5, 11/4.

प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: मुले: मानव मेहता; मुली: समृद्धी कुलकर्णी;

उदयोन्मुख खेळाडू: मुले: हविश असरानी; मुली: प्रिथा वर्टीकर;

शिष्यवृत्ती पुरस्कार विजेते: स्वस्तिक घोष, राधिका सपकाळ, नील मुळ्ये, ओम चोपडे, देवयानी कुलकर्णी, जश मोदी, कुशल चोपडा,

आर्या सोंगडकर, आरुष गलापल्ली, रिया कोठारी, कौस्तुभ गिरगांवकर, सायली वाणी.

उरळी – फुरसुंगी प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता

0

पालकमंत्री गिरीश बापट यांचा पाठपुरावा 

पुणे : महापालिकेच्या कचरा डेपोसाठी जागा देणाऱ्या उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील प्रकल्पग्रस्तांच्या वारसास महानगरपालिकेत कायम स्वरूपी नोकरी देण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील शेतकऱ्यांच्या जागा महानगरपालिकेने कचरा डेपोसाठी ताब्यात घेतली  आहे. मात्र कचरा डेपो मुळे गावात अनेक समस्या निर्माण झाला असल्याचे सांगत २००९ पासून फुरसुंगी आणि उरळी या दोन्ही गावांमधील ग्रामस्थांनी आंदोलन करत कचरा टाकण्यास तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केले होते. त्यावेळी ग्रामस्थांकडून या डेपोसाठी जागा देणाऱ्यांच्या मुलांना महानगरपालिकेत कायम स्वरूपी सेवेत घेण्याची मागणी केली होती.  शासन स्तरावर हि प्रक्रिया सुरु असल्याने या गावातील ६२ मुलांना २०११ पासून बिगारी म्हणून सहा महिन्यांसाठी पालिकेच्या सेवेत घेतले. त्यानंतर प्रकल्प ग्रस्तांच्या मुलांना पालिकेत कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र तो निर्णय शासनाकडे प्रलंबित होता.

त्यानंतर पुन्हा या मागणीसाठी या गावातील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरु केले होते. त्यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सेवेत कायम करण्याबाबतचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाठपुरावा करत याबाबतचा फेर प्रस्ताव महापालिकेला राज्य शासनाकडे पाठवण्यास सांगितला होता. महापालीकेकडून आलेल्या फेर प्रस्तावावर आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होवून या गावातील ५७ मुलांना नोकरीत कायम करण्याच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

पालिकेच्या सहकार्याने रोटरी क्लबचा निर्माल्य खत निर्मिती प्रकल्प प्रथमच पुण्यात

0
पुणे :
निर्माल्य व्यवस्थापनासाठी पुण्यातील ​तीन ‘रोटरी क्लब’ने पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सवात या तीन क्लबच्या पुढाकाराने आणि पालिकेच्या सहकार्याने निर्माल्य खत निर्मिती प्रकल्प प्रथमच पुण्यात सुरु होत आहे.
​​हा प्रकल्प दिनांक २७ ऑगस्ट पासून कार्यरत होणार आहे, रोटरी क्लबच्या वतीने ‘पुणे रोटरी वॉटर कमिटी’ प्रमुख व जलप्रेमी सतीश खाडे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
गणेशपूजा, आरतीसाठी सार्वजनिक मंडळे आणि घरांमध्ये शेकडो टन फुले, दुर्वा वापरल्या जातात. त्याचे विसर्जन गणेश मुर्ति विसर्जनावेळी केले जाते. पालिकेतर्फे या निर्माल्याचे नदीत विसर्जन होऊन ती प्रदुषित होऊ नये , म्हणून जागोजागी घाटांवर , पुलांवर निर्माल्य कलश उभारले जातात. मात्र, या निर्माल्यातून खत निर्मिती करुन पालिका हद्दीतील बागांमध्ये वापरण्याचा प्रकल्प रोटरीच्या पुढाकाराने ​पुण्यात ​प्रथमच सुरू होत आहे.
या प्रकल्पात निर्मात्याचे श्रेडर द्वारे बारीक तुकडे करुन कंपोस्ट खत केले जाणार आहे. रोटरीने देणगीतून मिळवलेल्या या श्रेडरला पु.ल. देशपांडे उद्यानात पालिका जागा देणार आहे. प्रतिदिन २ टन क्षमता असलेला हा श्रेडर गणेशोत्सव काळात अखंड कार्यरत राहील.
यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड​’​, ​​’​रोटरी क्लब ऑफ युवा​’​, ​’​रोटरी क्लब ऑफ एनआयबीएम’ या ३ रोटरी क्लबनी पुढाकार घेतला आहे. यासाठी नुकतीच पालिकेत ​​घन कचरा व्यवस्थापन विभाग चे उपायुक्त सुरेश जगताप व महापौर मुक्ता टिळक​ या ​पदाधिका​​ऱ्यांसमवेत बैठक होऊन या प्रकल्पाला संमती देण्यात आली​,​असे सतीश खाडे यांनी सांगितले.
​दिनांक २७ तारखेपासून कार्यान्वित ​होणाऱ्या या प्रकल्पाचा नदी स्वच्छ राखण्यासाठी उपयोग होणार आहे.
​—————————–

40 वर्षांनी भेटलेल्या माजी विद्यार्थ्यांची ग्रामीण शाळेला शौचालय, वाचनालयाची भेट!

0
पुणे ः 
40 वर्षांनी भेटलेल्या ‘सेंट व्हिन्सेंट हायस्कूल’च्या 62 माजी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शाळेला 10 लाख रुपये उभे करून त्या निधीतून शौचालय, वाचनालयाची भेट दिली.
‘सेंट व्हिन्सेंट हायस्कूल’च्याच माजी विद्यार्थी असलेल्या प्रशांत चव्हाण यांनी आणि त्यांचे पिता प्रकाशराव चव्हाण यांनी मिरज तालुक्यातील सोनी येथे ‘क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय’ सुरू केले आहे. येथे 1100 विद्यार्थी शिकतात.
सेंट व्हिन्सेंटच्या माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येऊन शैक्षणिक क्षेत्रातील समाजसेवेचा आदर्श घालून दिला. आपल्याच सहाध्यायाच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्याला आवश्यक गोष्टींची जोड दिली.
‘सेंट व्हिन्सेंट स्कूलचे’ माजी विद्यार्थी तनवीर इनामदार यांनी सांगितले की, ‘12 जूनला आम्ही माजी विद्यार्थ्यांनी आवाहन केले आणि 45 दिवसांत 10 लाख रुपये उभे राहिले. त्यातून ‘क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक विद्यालया’त विद्यार्थीनींसाठी शौचालय आणि सर्वांसाठी वाचनालय उभारण्यात आले.’ या विद्यालयाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने ही भेट देण्यात आली असे स्वप्नील पारख, सौरभ वर्मा, प्रशांत ताम्हणकर, योगेश माडीवाले, बिजॉय जोसेफ, रोनाल्ड डिसिल्व्हा, अजय ओक यांनी सांगितले.
सेंट व्हिन्सेंट हे  सर्व माजी विद्यार्थी 10 वीपर्यंत एकत्र शिकत होेते. 40 वर्षांनी माजी विद्यार्थी मेळाव्यात भेटल्यावर त्यांनी हे संस्मरणीय काम केले. पुढील दोन वर्षांत पाटील विद्यालयाला 20 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर तीन वर्षांत 15 लाखांची मदत करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

हास्यकलावंत सुनील ग्रोव्हर यांना सूर्यदत्ता नॅशनल ॲवॉर्ड-२०१७ पुरस्कार

0

पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. (प्रा.) संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सौ. सुषमा चोरडिया यांच्या हस्ते प्रसिद्ध हास्यकलावंत सुनील ग्रोव्हर उर्फ डॉ. मशहूर गुलाटी उर्फ गुथ्थी उर्फ रिंकू भाभी यांचा हिंदी रजतपटावरील मनोरंजन क्षेत्रातील उत्कृष्टतेबद्दल डॉ. गुलाटीज कॉमेडी शो या कार्यक्रमात सूर्यदत्ता नॅशनल वॉर्ड-२०१७ हा पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला.

 सुनील ग्रोव्हर हे सध्याच्या अत्यंत कुशल स्टँड-अप कॉमेडियनपैकी आहेत. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात त्यांनी साकारलेल्या गुथ्थी या प्रसिद्ध व्यक्तीरेखेप्रमाणेच डॉ. मशहूर गुलाटी, रिंकू भाभी अशा व्यक्तीरेखा या कार्यक्रमाच्या यश आणि प्रसिद्धीस कारणीभूत ठरल्या. केवळ इतकेच नव्हे, तर सुनील हे एक बहूपैलू अभिनेतेही आहेत. अक्षय कुमारच्या गब्बर चित्रपटात त्यांनी केलेला अभिनय खरोखर प्रशंसनीय ठरला.

 

सुनील ग्रोव्हर यांना पुरस्कार देऊन गौरवण्याच्या प्रसंगी लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन, गायक, अभिनेते व नकलाकार नवीन प्रभाकर उपस्थित होते. नवीन प्रभाकर हे ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज कार्यक्रमाचा भाग आहेत. पेहचान कौन कार्यक्रमातील त्यांच्या व्यक्तीरेखेमुळे ते प्रसिद्ध आहेत. यावेळीही त्यांनी ती व्यक्तीरेखा सादर करुन प्रेक्षकांना रिझवले. नवीन प्रभाकर यांचाही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सौ. सुषमा चोरडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

सुनील ग्रोव्हर प्रेक्षकांसमोर रिंकू भाभी, डॉ. मशहूर गुलाटी व गुथ्थीच्या भूमिकेत अवतरले. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला, त्यांना रंगमंचावर पाचारण केले, त्यांच्यासमवेत खेळ खेळले आणि उपस्थितांपैकी प्रत्येकाला विनोदाने खळखळून हसवले.

 

पुरस्कार स्वीकारताना सुनील ग्रोव्हर म्हणाले, मी नेहमीच माझ्या कामाचा पाठपुरावा केला. त्यातूनच मला समृद्धी आणि यश मिळाले आणि हे सर्व मी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोन यांच्या जोरावर साध्य केले. प्रतिष्ठित सूर्यदत्ता नॅशनल वॉर्ड्स देऊन माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी या समूहाचा आणि माझ्या सहकारी संघाचा अत्यंत आभारी आहे.

 

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सुनील ग्रोव्हर यांच्याखेरीज कोणताही विनोदी कार्यक्रम परिपूर्ण होऊ शकत नाही. ते सध्याच्या काळातील अत्यंत लोकप्रिय व बहूपैलू हास्यकलावंत आणि अभिनेते आहेत.” डॉ. चोरडिया यांनी सुनील ग्रोव्हर व नवीन प्रभाकर या दोघांनाही भविष्यातील त्यांच्या कार्यक्रमांसाठी व चित्रपटांसाठी शुभेच्छा दिल्या.

 

विवीध क्षेत्रांतील दोन हजारांहून अधिक व्यक्ती, ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’मधील २०० हून अधिक विद्यार्थी, कर्मचारीवर्ग यांनी या विनोदी कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद लुटला. सुनील ग्रोव्हर आणि नवीन प्रभाकर यांच्या डॉ. मशहूर गुलाटी कॉमेडी शोसाठी ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट’च्या (एसआयएमसीईएम) विद्यार्थ्यांनी आणि कर्मचारीवर्गाने साह्य केले.

 

‘एसआयएमसीईएम’चे विद्यार्थी इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण केवळ वर्गात आणि पाठ्यपुस्तकांतून घेत नाहीत, तर त्यांच्या कल्याणकारी विकासासाठी, तसेच उद्योगसज्ज व्यावसायिक बनण्यासाठी प्रात्यक्षिक अनुभव घेण्याच्या हेतूने सातत्याने विविध कार्यक्रमांत सहभागी होतात.

 

डॉ. मशहूर गुलाटी कॉमेडी शो एक्सेल अफेअर्स, डॉ. आलोक मिश्रा व रोहित सिंग यांनी प्रायोजित केला होता. कार्यक्रमाला युद्धात शारीरिक अपंगत्व आलेले सैनिक, हुतात्मा सैनिकांच्या विधवा, अनाथाश्रमांतील विशेष बालके व ममता फाऊंडेशनने आधार दिलेले एचआयव्ही+ रुग्ण विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

कार्यक्रमाला सुमीत ग्रुप, नांदेड सिटी व सिस्का एलईडीचे श्री. कृष्ण कुमार गोयल, श्री. अमित साळुंखे, श्री. सुमीत साळुंखे व श्री. प्रभाकर साळुंखे यांचेही प्रायोजकत्व लाभले.

 

‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’तर्फे भारत व परदेशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना त्यांनी संबंधित क्षेत्रांत व विवीध श्रेणींत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन सन्मान करण्याच्या हेतूने ‘सूर्यदत्ता लाईफटाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड्स’ व ‘सूर्यदत्ता नॅशनल ॲवॉर्ड्स’ हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व्होडाफोनची पुणे महापालिका आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेबरोबर भागीदारी

0

पुणे – शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त
भारतातील एक आघाडीची दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियाने आज व्होडाफोन इको-पाँड्स हा उपक्रम सुरू केला. श्री
गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यास नागरिकांना साह्य करण्यासाठी व्होडाफोनच्या महाराष्ट्र आणि
गोवा परिमंडळाने पुणे महापालिका आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) यांच्याशी भागीदारी केली आहे.
व्होडाफोनने शहरातील आठ व्होडाफोन स्टोअर्समध्ये व्होडाफोन इको-पाँड्स या तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या उभारल्या
आहेत. एक प्रमोटर आणि एक लाइफ गार्डही त्यासोबत असेल. पुणेकरांना कोणत्याही एका व्होडाफोन स्टोअरमध्ये श्री
गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जाता येईल. तेथे त्यांना विसर्जनासाठी साह्यही करण्यात येईल.
जंगली महाराज रस्ता, हिराबाग, वाकडेवाडी, औंध, कर्वे रस्ता, एनआयबीएम रस्ता, कल्याणीनगर आणि खराडी येथील
व्होडाफोन स्टोअर्समध्ये व्होडाफोन इको-पाँड्स तयार केली आहेत. याशिवाय भाविकांना ७३९१०००००० या
क्रमांकावर संपर्क साधूनही व्होडाफोन इको-पाँड्सचा पत्ता जाणून घेता येईल. याव्यतिरिक्त एक मोबाइल विसर्जन व्हॅनही
सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काही निवडक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आणि वृद्धाश्रमांत देखील या
व्हॅनद्वारे विसर्जनासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
व्होडाफोन इको-पाँड्सचे उद्घाटन पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप आणि
सीएसआयआर-एनसीएलच्या कॅटॅलिसिस विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी बी. उंबरकर यांच्या हस्ते आणि
व्होडाफोनच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा यांच्या उपस्थितीत झाले.

या उपक्रमाबाबत बोलताना आशिष चंद्रा म्हणाले, ‘गणेशोत्सव हा पुण्यात साजरा होणारा एक मोठा उत्सव आहे. यंदा
१२५ वे वर्ष असल्याने तर तो अधिकच खास आहे. या उत्सवाचा आम्हीही एक भाग असल्याचे आम्ही मानतो. मात्र,
त्याच जोडीने पर्यावरणावर होणा-या परिणामांबाबतही जागरूक राहणे गरजेचे आहे. जलस्रोत प्रदूषित होऊ नयेत म्हणून
नागरिकांना घरच्या घरी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास प्रोत्साहन देण्यात पुणे महापालिका आणि एनसीएलने
पुढाकार घेतला आहे. या पुढाकाराला साह्य करताना व्होडाफोनला अतिशय आनंद होत असून, नागरिकांना श्री
गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी व्होडाफोन इको-पाँड्सच्या माध्यमातून साह्य करण्यात येणार आहे.
आपल्या जवळच्या व्होडाफोन इको-पाँडमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला
पर्यावरणपूरक निरोप द्यावा, असे आवाहन मी पुणेकरांना करतो.’

डॉ. शुभांगी बी. उंबरकर म्हणाल्या, ‘एनसीएलने विकसित केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन प्रक्रियेचा प्रसार
करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वप्रथम मी एनसीएलच्या वतीने व्होडाफोनच्या टीमचे आभार मानते. हा एक
सामाजिक प्रकल्प असून, सीएसआयआर-एनसीएलने पुणे महापालिकेच्या सहकार्याने यावर तीन वर्षे काम केले आहे.
गेल्या वर्षी अनेकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, 25 हजार ते 30 हजार नागरिकांनी त्यांच्या घरी
या प्रकल्पाची अंमलबजावणी केली. मात्र, पुणे शहराची एकूण लोकसंख्या पाहता, ही संख्या आणखी काही पटींनी वाढणे
गरजेचे असून, व्होडाफोनने घेतलेल्या पुढाकारामुळे याला नक्की चालना मिळेल. मातीची गणेशमूर्ती तयार करा किंवा
पीओपीची मूर्ती असेल, तर त्याचे विसर्जन करण्यासाठी सीएसआयआर-एनसीएलने विकसित केलेल्या पर्यावरणपूरक
विसर्जन प्रक्रियेचा वापर करा, असे आवाहन मी या निमित्ताने सर्वांना करते.’
सुरेश जगताप म्हणाले, ‘एनसीएलने विकसित केलेल्या गणेशमूर्ती विसर्जन पद्धतीला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो
आहे. नागरिक आता पर्यावरणाबाबत अधिक जागरूक असून, सकारात्मक परिणाम असलेल्या नव्या पद्धती ते आजमावून
पाहत आहेत. हा नवा उपक्रम सुरू केल्याबद्दल मी व्होडाफोनची प्रशंसा करतो, तसेच पर्यावरणपूरक विसर्जन पद्धतीचा
प्रसार करण्यासाठी मदत करत असल्याबद्दल आभारही मानतो.’

.

परिशिष्ट

व्होडाफोन इको-पाँड्सची यादी(स्टोअर पत्ता)
जे एम रोड शॉप क्र. 7, 8, 9स निर्मला हाइट्स, 562/6, शिवाजीनगर, वीर सावरकर भवनसमोर,काँग्रेस हाउसशेजारी, पुणे – 411005

हिराबाग 42ए, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता, हिराबाग चौक रस्ता, पुणे – 411030
वाकडेवाडी द मेट्रोपॉलिटन, एफपी क्र. 27, जुना पुणे-मुंबई महामार्ग, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे –411005

औंध रॉयल रेसिडन्सी, शॉप क्र. 1, 2, 3, 4, औंध रस्ता, खडकी, पुणे – 411020
कर्वे रस्ता रिजंट्स चेंबर, शॉप क्र. 2, 3 आणि 4, सीटीएस क्र. 33/15बी, गरवारे कॉलेजसमोर, कर्वेरस्ता, पुणे – 411004

एनआयबीएम रस्ता शॉप क्र. 8, सी3 विंग, ब्रह्मा मॅजेस्टिक को-ऑप हौसिंग सोसायटी, एस क्र. 15/2/1,सीटीएस क्र. 755, एनआयबीएम रस्ता, कोंढवा, पुणे – 411048

कल्याणीनगर सीएसटी क्र. 2107, एस क्र. 210, शॉप क्र. 6 आणि 7, एफ मॉल, कल्याणीनगर, पुणे -411004.

खराडी एक्स्पर्टाइझ, शॉप क्र. 6, केयूएल स्पेसेस, एसआर. क्र. 8, रिलायन्स मार्टसमोर, खराडी, पुणे- 411014

५००० ढोलांचा आवाज आता शहराबाहेर …

0

पुणे- ग्रीनीज बुक मध्ये रेकोर्ड करण्याच्या हट्टापायी ५००० ढोल वाजवून  तमाम पुणेकरांचे आता कान बधीर होणार नाहीत .कारण आता .. ढोल महोत्सव ..जो
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाच्यानावाने होणार होता तो आता बालेवाडीत होणार आहे …. या संदर्भात महापौर मुक्ता टिळक पहा आणि ऐका नेमके काय म्हणाल्या …

कसबा गणपतीला सव्वाशे कलाकारांची महाआरती होणार

0

पुणे- शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांतर्गत महापालिकेने २४ तारखेला कसबा गणपती येथे  सव्वाशे कलावंतांच्या महाआरतीचे आयोजन केले आहे … या संदर्भात आणि २४ तारखेला या उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती येथे महापौर मुक्ता टिळक आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली … पहा …व्हिडीओ…

महापौर मुक्ता टिळकांच्या पुढ्यात उभे राहून नगरसेवकांनी केली आरती ….

0

पुणे- महापालिकेच्या मुख्य सभेत शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाच्यानावाने पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप करीत आंदोलन करणाऱ्या शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी चक्क महापौर मुक्ता टिळकांच्या पुढ्यात उभे राहून नगरसेवकांनी गणेश आरती म्हटली … पहा हा व्हिडीओ

अशोक हांडेंना साडेतीन लाखाच्याऐवजी दिले अकरा लाख ? (व्हिडीओ)

0

पुणे- महापालिकेने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मराठी बाणा हा जो कार्यक्रम साडेतीन लाखात होतो त्यासाठी अशोक हांडेंना अकरा लाख रुपये दिल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केला आहे.

पुणे महापालिका यंदा गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष  सांगून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत  आहे. यासाठी महापालिकेकडून पैशांची उधळ पट्टी करण्यात येत आल्याचा आरोप करत शिवसेनेने आज झालेल्या मुख्यसभेत अंदोलन केले. मात्र यावेळी सत्ताधारी भाजपने देखील पुढे येत परस्पर विरोधी घोषणाबाजी केली. त्यामुळे संख्येने कमी असलेल्या शिवसेनेच्या आंदोलनांचा सत्ताधरी भाजपच्या घोषणांच्या आवाज पुढे आवाज दाबला गेला. (हे आंदोलन आपणास  या https://www.facebook.com/MyMarathiNews/पेजवर लाइव्ह केलेले आहे ते पाहता येईल .)
दरम्यान या आंदोलनानंतर मीडियाशी बोलताना नगरसेवक संजय भोसले यांनी पहा आणि ऐका नेमके काय आरोप केलेत . त्यांच्याच शब्दात …..

5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ऊर्जा निळे, जश मोदी, क्रीश शेट्टी, अनिहा डिसुजा, साची दळवी, साक्षी देवकट्टे, सयान झवेरी, नील गोसावी यांचा मानांकीत खेळाडूवर विजय

0

पुणे,: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मिडजेट मुलींच्या गटात ऊर्जा निळे, मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत  उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला तर  जश मोदी, क्रीश शेट्टी, अनिहा डिसुजा, साची दळवी, साक्षी देवकट्टे, सयान झवेरी, नील गोसावी यांनी आपापल्या गटात मानांकीत खेळाडूंवर मात करत आगेकुच केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मिडजेट मुलींच्या गटात उपउपांत्यपुर्व फेरीत धुळ्याच्या ऊर्जा निळेने पुण्याच्या चौथ्या मानांकीत जान्हवी फणसेचा 6/11, 6/11, 11/5, 11/9, 13/11 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला तर पुण्याच्या अव्वल मानांकीत देवयानी कुलकर्णीने पुण्याच्याच बिग मानांकीत निधि भांडारकरचा 11/6, 11/7, 11/4 असा पराभव करत आगेकुच केली.

मिडजेट(10 वर्षाखालील) मुलांच्या गटात दुस-या फेरीत ठाण्याच्या अव्वल मानांकीत हृदय जैनने रायगडच्या सिध्दार्थ गबालाचा 11/4, /11/8, 11/8 असा तर मुंबई उपनगरच्या दुस-या मानांकीत देव हिंगोरणयने पुण्याच्या रेयान डिसुझाचा 11/7, 11/6, 11/9 असा पराभव करत आगेकुच केली.

सबजुनियर (15 वर्षाखालील) मुलांच्या गटात दुस-या फेरीत मुंबई शहरच्या धृव दासने पुण्याच्या नील मुळेचा 11/4, 11/4, 11/8 असा पराभव केला. मुंबई उपनगरच्या बिगर मानांकीत जश मोदीने मुंबई उपनगरच्याच दहाव्या मानांकीत हवीश असराणीचा 13/11, 12/10, 4/11, 11/3 असा पराभव केला तर मुंबई उपनगरच्या बिगर मानांकीत क्रीश शेट्टीने ठाण्याच्या पंधराव्या मानांकीत कौशल देशवंडीकरचा 11/6, 11/9, 10/12, 11/8 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली.

सबजुनियर (15 वर्षाखालील) मुलींच्या गटात दुस-या फेरीत अव्वल मानांकीत मुंबई उपनगरच्या विधी शहाने पुण्याच्या प्रिती साळुंखेचा 11/5, 11/8, 11/4 असा पराभव केला. पुण्याच्या बिगर मानांकीत अनिहा डिसुजाने ठाण्याच्या आठव्या मानांकीत अर्पीता जोशीचा 9/11, 13/11, 11/7, 11/4 असा पराभव केला. ठाण्याच्या बिगर मानांकीत साची दळवीने मुंबई उपनगरच्या चौथ्या मानांकीत शिफा शेखचा 10/12, 11/6, 11/7, 6/11, 12/10 असा तर परभणीच्या बिगर मानांकीत साक्षी देवकट्टेने मुंबई उपनगरच्या पंधराव्या मानांकीत अनन्या चांदेचा 11/9, 11/4, 10/12, 7/11, 11/6 असा पराभव करत आगेकुच केली.

कॅडेट(12 वर्षाखालील) मुलांच्या गटात दुस-या फेरीत पुण्याच्या सहाव्या मानंकीत नील मुळेने कोल्हापुरच्या आदर्श पाटीलचा 11/1, 11/2, 11/5 असा पराभव करत आगेकुच केली. मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत ठाण्याच्या आशय यादवचा 11/8, 11/2, 11/5 असा पराभव केला. मुंबई शहरच्या बिगर मानांकीत सयान झवेरीने ठाण्याच्या बाराव्या मानांकीत अभिषेक दांडेकरचा 9/11, 7/11, 11/5, 13/11, 11/4 असा तर ठाण्याच्या बिगर मानांकीत नील गोसावीने ठाण्याच्याच तेराव्या मानांकीत हृदय जैनचा 11/9, 11/3, 11/7 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- मिडजेट(10 वर्षाखालील)  मुली- उपउपांत्यपुर्व फेरी

ऊर्जा निळे(धुळे) वि.वि जान्हवी फणसे(पुणे, 6) 6/11, 6/11, 11/5, 11/9, 13/11

देवयानी कुलकर्णी(पुणे, 1) वि.वि निधि भांडारकर(पुणे) 11/6, 11/7, 11/4

जेनिफर व्हर्गीस(नागपुर,2) वि.वि काव्या भट(रायगड) 11/4, 11/6, 11/1

रिया कोठारी(अकोला, 3) वि.वि मृण्मयी साळवे(धुळे) 11/4, 13/11, 11/4

उर्वी चुरी(मुंबई उपनगर, 4) वि.वि अनन्या फडके(नाशिक) 11/7, 11/8, 11/3

वेदा राजे(नांदेड,5) वि.वि अनुष्का रावत(सोलापुर) 11/7, 11/2, 11/5

 

मिडजेट(10 वर्षाखालील) मुले- दुसरी फेरी

हृदय जैन(ठाणे, 1) वि.वि सिध्दार्थ गबाला(रायगड) 11/4, /11/8, 11/8,

देव हिंगोरणय(मुंबई उपनगर,2) वि.वि रेयान डिसुझा(पुणे) 11/7, 11/6, 11/9

प्रणव घोळकर(पुणे) वि.वि धृव शहा(मुंबई उपनगर) 12/10, 11/4, 11/5

कौस्तूभ गिरगावकर(नांदेड,9) वि.वि सिध्दार्थ बोहरा(पुणे) 13/11, 11/9, 13/11

स्वरूप भाडळकर(पुणे, 8) वि.वि मिहिर सिंग(धुळे) 13/11, 11/6, 8/11, 11/9

धृवील पाटील(धुळे,5) वि.वि आर्चीत पारगावकर(पुणे) 11/8, 11/2, 11/3

निलभ जाधव(परभणी) वि.वि वेदांत पाटील(कोल्हापुर) 6/11, 13/15, 11/8, 11/8, 11/8

दर्श भिडे(पुणे) वि.वि साहिल खारकर(ठाणे) 11/6, 6/11, 12/10, 11/7

पार्थ देशपांडे(पुणे, 6) वि.वि अनिकेत महाजन(धुळे) 11/1, 12/10, 11/3

सबजुनियर (15 वर्षाखालील) मुले- दुसरी फेरी

दिपीत पाटील(ठाणे, 1) वि.वि सम्यक मोटलींग(पुणे) 11/3, 11/3,11/2

धृव दास(मुंबई शहर) वि.वि नील मुळे(पुणे) 11/4, 11/4, 11/8

धृव झवेरी(मुंबई शहर, 9) वि.वि अक्षय पाटणकर(पुणे) 11/6, 6/11, 8/11, 11/5, 11/6

करण कुकरेजा(पुणे, 5) वि.वि राज कोठारी(अकोला) 11/5, 11/8, 11/7

जश मोदी(मुंबई उपनगर) वि.वि हवीश असराणी(मुंबई उपनगर, 10) 13/11, 12/10, 4/11, 11/3

क्रीश शेट्टी(मुंबई उपनगर) वि.वि कौशल देशवंडीकर(ठाणे, 15) 11/6, 11/9, 10/12, 11/8

 

सबजुनियर (15 वर्षाखालील) मुली- दुसरी फेरी

विधी शहा(मुंबई उपनगर,1) वि.वि प्रिती साळुंखे(पुणे) 11/5, 11/8, 11/4

अनिहा डिसुजा(पुणे) वि.वि अर्पीता जोशी(ठाणे,8) 9/11, 13/11, 11/7, 11/4

साची दळवी(ठाणे) वि.वि शिफा शेख(मुंबई उपनगर,4)10/12, 11/6, 11/7, 6/11, 12/10

साक्षी देवकट्टे(परभणी) वि.वि अनन्या चांदे(मुंबई उपनगर, 15) 11/9, 11/4, 10/12, 7/11, 11/6

 

कॅडेट(12 वर्षाखालील) मुले- दुसरी फेरी

हवीश असराणी(मुंबई उपनगर, 1) वि.वि आशय यादव(ठाणे) 11/8, 11/2, 11/5

सयान झवेरी(मुंबई शहर) वि.वि अभिषेक दांडेकर(ठाणे, 12) 9/11, 7/11, 11/5, 13/11, 11/4

नील गोसावी(ठाणे) वि.वि हृदय जैन(ठाणे, 13) 11/9, 11/3, 11/7

नील मुळे(पुणे,6) वि.वि आदर्श पाटील(कोल्हापुर) 11/1, 11/2, 11/5

पुण्याची प्रतीक्षा मुनोत बनली अमेरिकेतील सी.ए. ; आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करताना सी.पी.ए. परीक्षा उत्तीर्ण

0

पुणे : भारतात सी.ए.होण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय कठीण अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यातून तावूनसुलाखून निघालेले विद्यार्थीच सी.ए.परीक्षा उत्तीर्ण होतात. पुणे येथील प्रतीक्षा शशिकांत मुनोत हिने भारतातील सी.ए.चा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता थेट अमेरिकेची मान्यताप्राप्त सी.ए.परीक्षा उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली आहे. सी.ए.झाल्यानंतर ती सध्या पुण्यात एकाआंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करते. मात्र काही तरी दैदीप्यमान करायच्या जिद्दीतून तिने नोकरीचे वेळापत्रक सांभाळून अहोरात्र कष्ट घेत सी.पी.ए.अभ्यास केला. दुबई येथील केंद्रावर अमेरिकेची सी.पी.ए.(सर्टीफाईड पब्लिक अकाउंटंट, अमेरिका) परीक्षा देऊन ती पहिल्याच प्रयत्नात ८८%गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.

प्रतीक्षा मुनोत ही भारतीय जैन संघटनेचे सक्रीय पदाधिकारी शशिकांत अमृतलाल मुनोत यांची कन्या तर नगरमधीलच प्रसिध्द व्यापारी श्री.वसंतलाल हिरालाल कटारिया (दलाल के.वसंतलाल)यांची नात आहे. तिने दोन वर्षांपूर्वी सी.ए.ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली होती. सध्या ती पुण्यातील Credit Suisse (स्विस इन्व्हेस्टमेंट बँक) या आंतरराष्ट्रीय फर्ममध्ये काम करते. तिने स्वत:च्या बुध्दीकौशल्याच्या व जिद्दीच्या बळावर ही परीक्षा देण्याचे ठरवले. अमेरिकेतील सी.पी.ए.ची परीक्षा भारताबाहेर सात केंद्रांवरच होते. प्रतीक्षाने सर्व सी.पी.ए.चा अभ्यास घरीच करून दुबई येथील केंद्रावर परीक्षा दिली. तिला पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळाले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या भारतातील मोजक्याच विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश झाला आहे.

आपल्या कामगिरीने पुणे तसेच संपूर्ण मुनोत परिवाराचे नाव उज्वल करणार्‍या प्रतीक्षाचे यश पुणेकरांसाठी अभिमानास्पद असेच आहे. या यशाबद्दल तिचे माजी केंद्रीय मंत्री व अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी , श्री.पद्मविभूषण डॉ.के एच संचेती,भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शांतीलालजी मुथा, विद्यमान अध्यक्ष श्री. प्रफुल्ल पारख,कृष्णकुमार गोयल, अॅड.एस के जैन, डॉ.पराग संचेती,विजयकांतजी कोठारी ,विलासजी राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.

महिलांसाठीच्या कायद्यांबाबत व्यापक जनजागृती होणे गरजेचे – विजया रहाटकर

0

पुणे, दि. 22: महिलांसाठी देशात प्रभावी कायदे असून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

अल्पबचत भवन येथे “कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारणे) अधिनियम 2013” च्या अंमलबजावणी संदर्भात शासकीय कार्यालयांअंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त लहूराज माळी, राज्य महिला आयोगाच्या सचिव मंजुषा मोळवणे, सदस्या आशाताई लांडगे, सदस्या विंदा किर्तीकर, विधि सेवा प्राधिकरणचे सचिव प्रदिप अब्दुरकर, चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट श्रीमती कटारे, प्रशिक्षक व वक्त्या ॲड. अर्चना गोंधळेकर, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रशांत शिर्के उपस्थित होते.

कार्यशाळेस उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना श्रीमती रहाटकर म्हणाल्या, महिला आयोग सदैव आपल्या पाठीशी आहे. अन्याय सहन करु नका, गरज भासल्यास कायद्याची मदत घ्या, राज्यात कोणत्याही ठिकाणी महिला पिडीत असतील किंवा त्यांच्यावर अन्याय-अत्याचार होत असेल त्याठिकाणी महिला आयोग त्याच्या मदतीस तत्पर आहे. महिलांमध्ये त्यांच्या हक्कांची व अधिकारांची जनजागृती करण्यास महिला आयोग नेहमीच प्रयत्नशील आहे. महिलांनी आयोगाची कार्यपध्दती व कायदे समजून घेवून आवश्यक तेथे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. आज ‘पुश’ (PUSH- People United Against Sexual Harassment)  या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठांच्या माध्यमांतून एकूण पाच लाख विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आपला देश, आपली प्रशासकीय यंत्रणा व कायदे उत्तमरित्या काम करत आहेत. कार्यक्रमास उपस्थितांनी 9112200200 या दूरध्वनी क्रमांकावर मिस कॉल करुन पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाविषयी दाद कशी मागावी, 2013 च्या कायद्याअंतर्गत न्याय कसा मिळवावा यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आयोगाने दिलेले पोस्टर्स आपल्या कार्यालयात दर्शनीय ठिकाणी लावून आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये या संदर्भातील जनजागृती करावी. प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करावी, समितीवर जिल्हास्तरिय अधिकारी नेमावेत, तालुका स्तरावर नोडल ऑफिसर नेमावा,  जिल्हा स्तरावर प्रत्येक महिन्याला महिला लोकशाही दिन कार्यक्रम घेवून महिलांच्या समस्यांविषयी प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा आढावा घेऊन निराकरण करण्यात यावे, अशा सुचना केल्या.

यावेळी महिलांविषयक कायद्यांबद्दलची माहिती पुस्तिका, भित्तिपत्रिका वितरीत करण्यात आल्या. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, पोलीसांची महिलांसाठी मदतीची भूमिका, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या पोस्टर्सचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रशांत शिर्के यांनी केले. महिला व बालविकास विभागाचे आयुक्त लहुराज माळी, ॲड. आशा लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनिता ओव्हाळ यांनी आभार मानले.  सुत्रसंचालन दिपक म्हस्के यांनी केले. कार्यशाळेस पुणे जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील विविध शासकीय  विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय जलसारक्षता संमेलनात ’नॅशनल वॉटर लिटरसी मिशन’ची मागणी

0
पुणे :नॅशनल वॉटर लिटरसी मिशन’ करण्याची, नदी खोरेनिहाय जलसंसद स्थापन करण्याची, नद्यांवरील अतिक्रमणे-प्रदूषण-शोषण दूर करण्याची मागणी
जलबिरदारी आयोजित ‘राष्ट्रीय जलसाक्षरता’ संमेलनात  करण्यात आली.
‘जलबिरादारी’च्या वतीने समन्वयक नरेंद्र चुघ, संघटक सुनील जोशी, पुणे जिल्हा संघटक विनोद बोधनकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
‘राष्ट्रीय जलसाक्षरता संमेलन’  विजापूर येथे दि. 16 ते 18 ऑगस्टदरम्यान पार पडले.
 कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डॉ. राजेंद्रसिंह आणि 30 राज्यातील 15 हजार जलयोद्धांची उपस्थिती या संमेलनाला होती. देशभरातून 101 जलसाक्षरता यात्रांचा समारोप या संमेलनात झाला.
भीमाशंकर ते पंढरपूर-विजापूर या ‘नमामि चंद्रभागा’ जलसाक्षरता यात्रेचा समारोपही या संमेलनात झाला.
संमेलनातील चर्चेवर आधारित ‘विजापूर घोषणापत्र’ जाहीर करण्यात आले असून, त्यावर सर्व राज्यांच्या विधानसभा, विधान परिषद, नीती आयोग येथे चर्चा व्हावी अशीही मागणी ’जलबिरादारी’च्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्रच्या धर्तीवर प्रत्येक राज्यात जलसाक्षरता केंद्र सुरू करून त्याद्वारे 50 हजार जलयोद्धे, जलसेवक प्रशिक्षित करावे, असेही त्या पत्रकात म्हटले आहे.
या संमेलनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते विनोद बोधनकर (पुणे) यांना ‘जलऋषी’ सन्मान देवून गौरविण्यात आले. बोधनकर यांनी जलसारक्षरता, जलसंधारण क्षेत्रात 30 वर्षे योगदान दिले असून, त्यांचा गौरव मानपत्र देवून करण्यात आला.
’दुष्काळमुक्त आणि पूरमुक्त भारत’ हे ध्येय ठेवून पुढील कृतिकार्यक्रम या संमेलनात ठरविण्यात आल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.