पुणे–संभाजी ब्रिगेड शिवाय कोणीही उघड पणे पाठीशी नसताना एकाकी लढत देणाऱ्या भाऊ रंगारी मंडळास आज चाकरी उपोषणाच्या चौथ्या दिवशी भेट देवून खासदार संभाजी राजे यांनी आपण या मंडळाच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले आहेत .तर दुसरीकडे मंडळांच्या विश्वस्तांची याचिका न्यायालयाने मान्य केली असून पुढील 14 दिवसात राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांनी या संदर्भात आपले म्हणणे मांडावे असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी हा वाद कोर्टात गेला आहे या पार्शवभूमीवर खासदार संभाजीराजे भोसले यांनी भाऊ रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भोसले म्हणाले ‘ ‘खरा इतिहास सर्वांसमोर यायला हवा’ भाऊ रंगारी ‘मंडळाकडे शासकीय पुरावे आहेत. त्यामुळे ‘मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान भाऊ रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून जाहीर करावे या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांची याचिका न्यायालयाने मान्य केली असून पुढील 14 दिवसात राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांनी या संदर्भात आपले म्हणणे मांडावे असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.