– उम्मती बैतुल माल आणि इतर संघटनांचा पुढाकार
– आर्थिक सहाय्य, ब्लँकेट आणि औषधांची मदत करणार
पुणे-
आसाम आणि बिहारमधील पूरग्रस्त नागरिकांसाठी कोंढव्यातील बैतुल उलूम मदरसा आणि धार्मिक अभ्यासक मुफ्ती शाकिर यांनी पुढाकार घेतला असून, ‘उम्मती बैतुल माल’ या सामाजिक संघटना स्थापून मदतनिधी आणि सर्वप्रकारची आवश्यक मदत गोळा करण्यास प्रारंभ केला आहे. ‘उमत चॅरिटेबल ट्रस्ट’, ‘महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अॅण्ड प्रोटेक्शन टास्क फोर्स’ आणि ‘राबता फाउंडेशन’ यांचेही या कामी विशेष सहकार्य लाभत आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेतून
मुफ्ती शाकिरयांनी दिली ते म्हणाले,आसाम आणि बिहारला पुराचा प्रचंड तडाखा बसला असून, एकट्या बिहारमध्ये जवळपास एक कोटी नागरिक विस्थापित झाले आहेत. त्यांचे फक्त संसारच उद्ध्वस्त झाले नसून, अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. अनेकांना अन्नपाण्यापासून वंचित रहावे लागत असून, जीवनावश्यक सोयीसुविधांचीही वानवा आहे.
‘पूरग्रस्त नागरिकांसाठी आम्ही ब्लँकेट्स, औषधे आणि रोख स्वरुपात मदतनिधी गोळा करीत आहोत. ही मदत योग्य आणि विश्वासार्ह सरकारी माध्यमातून पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्यासाठी – उम्मत चॅरिटेबल ट्रस्टः मौलाना मुनीर – ७७६७०२७९९७- वक्फ प्रोटेक्शन अॅण्ड लिबरेशन टास्कफोर्सः सलीम मुल्ला – ९१५६६९६४५८- राबता फाउंडेशनः निहाल खान – ९९२३३७२१५३ यांना संपर्क साधावा असेही ते म्हणाले .आर्थिक मदत थेट जमा करण्यासाठी त्यांनी दिलेल्या खात्याची माहिती…
उम्मत एज्युकेशन अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आयसीआयसीआय बँक, कोंढवा शाखा
अकाउंट नंबर (खाते क्रमांक) – ००७४०५००५८३७, आयएफएससी (IFSC) कोडः ICICI०००००७४