Home Blog Page 3292

यूथ आयकॉन मानसी किर्लोस्कर यांचा ‘यंग इंडियन्स’शी (वायआय) संवाद

0

पुणे : किर्लोस्कर सिस्टीम्स लिमिटेड’च्या कार्यकारी संचालक आणि सध्या ‘टोयोटा किर्लोस्कर मोटर्स’मध्ये लेक्सस प्रकल्पावर पूर्ण वेळ काम करत असलेल्या मानसी किर्लोस्कर यांनी नुकताच ‘यंग इंडियन्स (वायआय) स्पीकर सेशन’ या सत्रात युवा पिढीशी संवाद साधला. येथील हॉटेल क्राऊन प्लाझा येथे झालेल्या या सत्रात त्या बीजभाषण वक्त्या म्हणून बोलत होत्या. ‘यंग इंडियन्स’ हा ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’चा (सीआयआय) भाग आहे. मानसी किर्लोस्कर यांनी आपल्या प्रभावी भाषणाने १०० यंग इंडियन्स सदस्यांना मंत्रमुग्ध केले. मानसी आपल्या कामाचा समतोल कसा साधतात, ‘केअरिंग विथ कलर’ हा त्यांचा सामाजिक उपक्रम, चित्रकार, खोल समुद्रातील पाणबुड्या, गिर्यारोहक व अन्य छंदांप्रतीची त्यांची आकांक्षा आणि यातील प्रत्येक कृती व्यवसाय दृष्टीकोनातून त्यांना कशी साह्यभूत ठरते हे ऐकताना श्रोतृवृंद भारावून गेला.

 

मानसी किर्लोस्कर म्हणाल्या, “ मला सर्वांत महत्त्वाचे शिक्षण कलेतून मिळाले आणि त्यानेच मला विचार कसा करावा, हे शिकवले. मी चतुरस्त्र विचार करायला, अपयश स्वीकारायला, खुल्या मनाची आणि करुणाशील बनायला शिकले. स्कुबा डायव्हिंगमुळे मी संकटाच्या काळात शांत आणि सहनशील राहून परिस्थिती योग्य हाताळायला शिकले. गिर्यारोहणाने मला कधीही हार न मानण्यास विशेषतः तुम्ही नवउद्योगाचा भाग असताना प्रयत्न सोडून न देण्याबाबत शिकवले. याच छंदाने मला सांघिक काम आणि जुळवून घेण्यासही शिकवले.”

आपल्या ‘केअरिंग विथ कलर’ या आवडीच्या प्रकल्पाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “मला वयाच्या १४ व्या वर्षापासूनच सामाजिक परिणाम घडवणारा नवउद्योग स्थापन करण्याची इच्छा होती. वयाच्या १५ व्या वर्षी मी सरकारी शाळांत शिकवण्यास सुरवात केली. अखेर यंदा मी माझा स्वतःचा ‘केअरिंग विथ कलर- ए मानसी किर्लोस्कर इनिशिएटिव्ह’ हा सामाजिक परिणाम घडवणारा पुढाकार सुरु केला. गरीब आणि वंचित मुलांच्या भावनात्मक विकासात कला आणि रंगांचा परिणाम दाखवून देणारे संशोधन झाले आहे. हा पुढाकार सरकारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांवर भर देणारा आहे. आपण देत असलेल्या शिक्षणाचा मार्ग बदलणे आणि त्याला अनुभव व शोधाची प्रक्रिया बनवणे, ही या पुढाकारामागील कल्पना आहे. कौशल्याला अभ्यासक्रमापासून विलग करण्यावर आम्ही भर देतो.”

मानसी किर्लोस्करांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तरांचे सत्र झाले. ‘यंग इंडियन्स’चे सदस्य आदित्य काळे आणि ध्रुव आगरवाल यांनी मानसी यांना अनेक रंजक प्रश्न विचारले आणि मानसी यांनीही त्यांची समर्पक उत्तरे दिली.

मानसी या उद्योग महर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांच्या खापर पणती आहेत. भारतातील जुन्या आणि अत्यंत आदरणीय उद्योजक घराण्यांपैकी असलेल्या किर्लोस्करांच्या पाचव्या पिढीतील असलेल्या मानसी आज नव्या पिढीच्या बिझनेस आयकॉन व उभरत्या यूथ आयकॉन म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

मानसी या उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांच्या विशाल उद्योग समूहाच्या एकमेव वारस आहेत. त्या आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करतातच, परंतु त्यांनी स्वतःचेही रिअल इस्टेट व वित्तीय सेवा क्षेत्रातील स्वतंत्र व्यवसाय सुरु करुन उद्योजकतेचे कौशल्य दाखवून दिले आहे.

या संवादसत्राच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या पुण्याच्या प्रसिद्ध कलावंत माधुरी भादुरी होत्या. कला ही उत्तम गुंतवणूक कशी ठरु शकते, यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

“टाइम्स आणि ट्रेन्ड अकॅडमीने पुण्यात 5 सेंटर लाँच केले आणि अर्थ ह्या फॅशन शो चे आयोजन केले

0
पुणे-    व्यावसायिक शिक्षणासाठी देशभरातील प्रमुख अकादमींपैकी टाइम्स आणि ट्रेंड अकादमीने  (टीटीए), कोरेगाव पार्क, कोथरूड, सिंहगड रोड, वाकड व वानवडी  येथे  5 केंद्रे सुरू केले आहेत .कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाच्या मते, भारतातील व्यावहारिक शिक्षणाची सध्याची क्षमता 30 लाख आहे आणि प्रत्येक वर्षासाठी आपल्याला 1 कोटींची आवश्यकता आहे. त्यामुळे 70 लाखांची कमतरता  आहे. भारतात  व्यावसायिक शिक्षणासाठी आव्हान आणि संधी दोन्ही मोठ्या प्रमाणात आहेत.
         TTA ने आपल्या वार्षिक फॅशन शो अर्थ हा आयोजित केला होता .हा  फॅशन शो  म्हणजे एक  भावनांचे केंद्रबिंदू  आहे . अर्थ हा  फॅशन शो , द वेस्टिन, कोरेगांव पार्क-पुणे येथे 26 ऑगस्ट 2017 रोजी आयोजित करण्यात आला  आहे .तसेच  प्रत्येक वर्षी, टाइम्स आणि ट्रेन्ड अॅकॅडमीने एक फॅशन शो सादर केला जातो  ज्यात ग्लॅमरच्या जगात युवा पिढीची  ताकद दाखवण्यात येते . ज्या   लोकांना  फॅशन, शैली, ग्लॅमर आणि समालोचनेची  आवड असते  अशा लोकांसाठी फॅशन फर्स्टासह येतात.
        या वर्षी, अर्थ, फॅशन शोला , जल जीवनातून प्रेरणा मिळाली आहे .  ‘बीऑन द सी ‘ही ह्या फॅशन शोची थिम आहे . समुद्रातून प्रेरणा घेतलेल्या,   टीटीएचे फॅशन शोमध्ये   क्रेप रेशम, साटन, जॉर्जेट्टे, स्कूबा, लाइक्रा साटन इ प्रकारचे कपडे पाहायला मिळतील . मेस्मेरीझिंग मर्मेड, कोरल रीफ, द भ्रम, डार्क ऑफ द सीर, आणि डेथर्स ऑफ पोसीडॉन याचा ह्या शो मध्ये ५ अनुक्रमणाने पाहायला मिळाले .  या फॅशन शोद्वारे प्रेक्षक  पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले.
           कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे मंत्री गिरीश बापट होते. बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी कॉस्टम डिझायनर असलेले चंद्रकांत सोनवणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .टीटीए ने  प्रमुख पाहुण्यांचा  सत्कार केला.
             चंद्रकांत टीटीएमध्ये फॅशन डिझायनिंग, फॅशन स्टाईलिंग आणि फॅशन बिझनेस मॅनेजमेंट कोर्ससाठी मुख्य मार्गदर्शकहि  आहेत. चंद्रकांत यांनी  रामलीला चित्रपटासाठी सुद्धा  पोशाख डिझायनर म्हणून काम केले आहे . ते नियमितपणे टीटीए विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतात आणि टीटीएच्या काही विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देऊ करतात.
          टाइम्स आणि ट्रेंड अकादमीचे संस्थापक आणि अध्यक्ष अमित अग्रवाल म्हणाले, “व्यावसायिक शिक्षणाच्या वाढत्या मागणीमुळे टीटीए आघाडीच्या शैक्षणिक ब्रँडच्या रूपात पुण्यात 5 नवीन केंद्रे लाँच करून आपली पोहोच वाढवण्याचा आम्ही  निर्णय घेतला आहे.  युवक या राष्ट्राचे भवितव्य आहे, आणि आम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात असल्याने, त्यांना कौशल्य प्राप्त करून देणे ही आमची जबाबदारी आहे. टीटीए ही एक प्रमुख व्यावसायिक प्रशिक्षण अकादमी आहे.”” येथे आम्ही तज्ञ आणि उद्योजकांना सांगतो की त्यांना फॅशन डिझायनर्स, इंटेरिअर डिझाइनर, ज्वेलरी डिझाइनर, इव्हेंट मॅनेजर्स, फायनान्स प्रोफेशनल्स, अॅनिमेटर, ग्राफिक्स डिझाईन्स, लाइफ कोच आणि उद्योजक म्हणून पैसे कसे मिळवता येईल .
         टाइम्स आणि ट्रेंड अकादमीचे संचालक रश्मी अग्रवाल म्हणालया , “टाईम्स आणि ट्रेंड  ऍकॅडमी (टीटीए) एक अकादमी आहे जी सर्व विद्यार्थ्यांना आणि इच्छुकांच्या करियरची निर्मिती करण्यासाठी तत्त्वज्ञानाने चालते. अकादमी सर्व विद्यार्थ्यांना सॉफ्ट  स्किल सोबत तांत्रिक कौशल्य निर्माण करण्यासाठी योग्य व्यासपीठ पुरविते. डिझायनर्स आणि व्यावसायिकांकडून सर्जनशीलता आणण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची निर्मिती करण्यासाठी टाईम्स आणि ट्रेन्ड अॅकॅडमी (टीटीए) अधिक प्रयत्न करते. “

डॉ . के .एच . संचेती यांना पुण्यभूषण पुरस्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान

0

पुणे :डॉ . के .एच . संचेती यांना पुण्यभूषण पुरस्कार ‘ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आणि सिक्कीम चे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला . 

सोन्याच्या फाळाने पुण्यभूमी नांगरणारी बालशिवाजी असलेले सन्मानचिन्ह,एक लाख रुपये ,शाल ,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमाला निवड समितीचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकर ,पालकमंत्री गिरीश बापट ,महापौर मुक्ता टिळक  ,देवीसिंग शेखावत ,डॉ शां . ब . मुजुमदार ,प्रतापराव पवार ,चंदू बोर्डे ,सुधीर गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते 
वसंत प्रसादे ,मधुकर ताम्हस्कर ,निरबहादूर गुरुंग ,रामदास मोरे ,अनिल लामखेडे ,श्रीनिवास आचार्य या स्वातंत्र्य सैनिक ,गोवामुक्ती सैनिक आणि सैन्यदलात सेवा करताना जखमी झालेल्या सैनिकांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला . 
डॉ सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले . ‘पुण्यभूषण पुरस्कारापासून प्रेरणा घेऊन सर्वत्र पुरस्कार सुरु झाले ,आता नव्या पिढीने या पुरस्काराची जबाबदारी स्वीकारावी ‘असे मनोगत त्यांनी व्यक्त केले . महापौर मुक्ता टिळक यांनी स्वागत केले . 
‘डॉ संचेती याना पुण्यभूषण पुरस्कार दिल्याने पुरस्काराचे महत्व वाढले आहे . विद्वान व्यक्तींनी दुसऱ्या विद्वान व्यक्तींचा सन्मान पुण्यात करणे ही दुर्मिळ गोष्ट असली तरी पुण्यभूषण फाउंडेशन ने २९ वर्षे हा उपक्रम उत्तमरीत्या चालविला आहे . ज्या गावात आपण कार्यरत असतो ,त्या गावाने दिलेला पुरस्कार महत्वाचा असतो ,डॉ संचेती यांचे कार्यही पुरस्काराच्या तोलामोलाचे आहे . चांगला डॉक्टर असण्याबरोबर ते समाजातील चांगली व्यक्तीही आहेत . इथूनपुढेही त्यांच्या हातून रुग्णसेवा घडो ‘ असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले . 
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले ,’डॉ संचेती यांनी रुग्णसेवेचे चांगले काम हसऱ्या चेहऱ्याने केले ,त्यामुळे रुग्णांना उपचाराआधीच दिलासा मिळत असतो . त्यामुळेच देशभरातून त्यांच्याकडे रुग्ण येतात आणि परदेशातही ते मार्गदर्शन करतात . 
इंडस या पहिल्या भारतीय कृत्रिम सांध्याचा उल्लेख करून डॉ माशेलकर म्हणाले डॉ संचेती ही व्यक्ती नसून एक संस्थाच आहे 
सत्काराला उत्तर देताना डॉ संचेती म्हणाले ,’पुणेकरांनी मला भरपूर प्रेम दिले . घरून मिळालेले कामाचे बाळकडू ,मित्रप्रेम आणि पत्नीची साथ यामुळे मला यश मिळाले . आईच्या धाडसी स्वभावाला समोर ठेवून मी अध्ययन सुरु असतानाच हॉस्पिटल सुरु केले . ज्ञान आणि सेवा ही वैद्यकीय जीवनात महत्वाची असते ,यापुढेही मी उर्वरित आयुष्यात पुणेकरांची आणि रुग्णांची सेवा करणार आहे . 
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले ,’ पुण्यभूषण चे सर्व २९ पुरस्कार सोहळे पाहिलेला मी आहे . आज माझ्या उपस्थितीत डॉ संचेती यांचा गौरव होत आहे ,ही आनंदाची बाब आहे . माणसे जोडणारी ,हाडे जोडणारी आणि मने जोडणारी माणसे आज या व्यासपीठावर एकत्र आली ,याचा आनंद उत्तम मैफलीसारखा आहे ‘
सुरेश धर्मावत (काका ) यांनी आभार मानले . योगेश देशपांडे यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले .

पुणे फेस्टीव्हलमध्ये भरलेल्या “हसरी मैफल”चे नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन

0

पुणे – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आर के लक्ष्मण, शि. द. फडणीस, वसंत सरवटे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक
गाजलेल्या व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या व्यंगचित्र व हास्यचित्रांचे प्रदर्शनातून जुन्या राजकीय घडामोडींना “हस-या
मैफली”ने आज उजाळा दिला. पुणे फेस्टिव्हलमध्ये या दिग्गज व्यंगचित्रकारांच्या हास्य व व्यंगचित्रांची बालगंधर्व
रंगमंदीरच्या कलादालनात भरलेली ही मैफल केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजमंत्री नितीन गडकरी आणि सिक्कीमचे
राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज दीपव्रज्वलन करून रसिकांसाठी खुली करताच व्यंगचित्र व हास्यचित्रांचाही
मनमुराद आनंद घेतला. ही हासरी मैफल पुढील दोन दिवस (सोमवार आणि मंगळवारी) सकाळी ११ ते रात्री ८
वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुली रहाणार आहे. यावेळी पुण्यातील अनेक नामवंत हास्य व व्यंगचित्रकार, आणि
नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. यावेळी पुणे
फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, सासवड माळेगाव शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक रंजन गिरमे,
कोहिनूर ग्रूपचे कृष्णकुमार गोयल उपस्थित होते. साहित्य वेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे यांनी अशा
महाराष्ट्रातील नामवंत व्यंगचित्रकारांची सुमारे १२०० व्यंगचित्र व हास्यचित्रांचे हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
सोमवारी आर. के. लक्ष्मण यांच्या मालगुडी डेज आणि यू सेड इट या मालिकेतील चित्रे बघण्याची संधी मिळणार आहे.
व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सबनीस म्हणाले,
बाळासाहेब मोठे व्यंग व हास्यचित्रकार होतेच. पण पुढे जाऊन त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करून तो कधी सत्तेत तर
कधी विरोधी पक्ष करण्यापर्यंत नेला. ही किमया देशात फक्त त्यांनाच साधता आली कारण ते व्यंगचित्रकार होते.
देशातील राजकीय व्यवस्था दुरूस्त करण्यासाठी, सांस्कृतिक विकृतीवर मात करण्यासाठी व्यंगचित्रकार व हास्य
चित्रकरांनीच आता पुढे येण्याची गरज आहे. या हस-या मैफलीत सुमारे ४०० व्यंगचित्र व हास्यचित्र लावण्यात आलेली
असून ती रोज बदलती रहाणार आहेत.
त्यात राजकारणाबरोबरच समाजकारण आणि सामाजिक समस्यांवरील व्यंग व हास्यचित्रांचा समावेश केला जाणार
आहे. त्यामुळे रसिकांना रोज नविन चित्रे बघून जुन्या आठवणींना उजाळा देतानाच विरंगुळाही अनुभवता येईल. हास-
यामैफलीत आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, वसंत सरवटे, शि. द. फडणीस, मनोहर सप्रे, विकास सबनीस अशा
दिग्गज व्यंग – हास्य चित्रकारांसह नव्या दमाच्या संजय मिस्त्री, प्रभाकर झळके, संजय मोरे, सतीश उपाध्ये, उमेश
पाटोळे, उमेश वाघ व्यंग – हास्य चित्रकांच्या चित्रांचा समावेश आहे.

नगरविकास खात्यासारखे भुक्कड खाते पाहिले नाही. मुख्यमंत्र्यांकडील खात्यावर गडकरींची टिका

0

 

पुणे-“शहराचे नियोजन करण्यासाठी २० वर्षे लावणारे नगर विकास खाते हे ‘होपलेस’ असून अशी ‘भुक्कड’ संस्था मी अद्याप पाहिली नाही”, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नगर विकास खात्यावर सडकून टीका केली. दरम्यान, त्यांनी सिंगापूरच्या धर्तीवर नगर विकासाचे नियोजन व्हायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेष म्हणजे राज्याचे नगरविकास खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे.
शहरातील पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणा-या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येणा-या उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, विजय शिवतरे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गडकरी पुढे म्हणाले की, पैसा ही समस्या नाही अधिकारी काम करत नाहीत ही समस्या आहे. डंडा घेऊन मागे लागल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत, अशी मिश्कील टीकाही गडकरी यांनी अधिका-यांच्या कारभारावर केली. तसेच मुळा-मुठा नदीत काम करायला सरकारने एनओसी द्यावी जलमार्ग, ड्राय पोर्ट बांधून वाहतूक सुरू करू त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पुणे सातारा रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम हा काळा डाग आहे. समस्या आहेत त्या सोडवून  6 महिन्यात काम पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. पुण्याची मेट्रो नागपूरपेक्षा चांगली होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले,वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. त्याच्या जोडीला प्रदूषणाची मोठी समस्या पुण्याला भेडसावत आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची देशात 22 टक्यांनी वाढ झाली आहे पुण्यात यापेक्षाही अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याला पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी शिवाय पर्याय नाही, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. गडकरी म्हणाले, देशातील दहा नद्यांचे जलमार्गात रुपांतर करण्यात येत असून लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन केले जाईल. त्या धर्तीवर पुण्यातही मुळा-मुठा जलमार्ग विकसित झाल्यास शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच पुणे, सांगली, कोल्हापूर येथे ड्रायपोर्ट बांधण्यास राज्य शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. पाटस ते बारामती आणि बारामती ते इंदापूर पालखी मार्गाचा डीपीआर तयार झाला असून लवकरच त्या कामास प्रारंभ होईल. नागपूरपेक्षाही चांगली मेट्रो पुण्यात निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शरद पवार म्हणाले, रस्ते हे विकासाचे साधन असते. सुलभ आणि मर्यादित वेळेत दळणवळणाचे साधन उपलब्ध असणे परिसराच्या विकासासाठी आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेंगाळलेल्या अनेक प्रकल्पांना गती मिळाल्याचा आनंद आहे.

पालकमंत्री बापट म्हणाले, पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातील रस्ते विकासांच्या कामासाठी तब्बल 15 हजार 139 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. चांदनी चौक येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाद्वारे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.  नियोजित वेळेत पुलाचे काम पुर्ण  करण्यास प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मेट्रोचे काम सुरु झाल्याने आनंद व्यक्त केला.  जिल्ह्यातील विविध पालखी मार्ग लवकरच पुर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

महसुल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, चांदणी चौकातील पुलामुळे वाहतुकीला सोपेपणा येईल व सौंदर्यात वाढ होईल. सध्या राज्यात 1 लाख 6 हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरु आहेत. रस्त्यांचा सर्व  नागरिकांना  उपयोग होईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी डि.ओ.तावडे यांनी तर आभार राजीव सिंह यांनी मानले.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय मार्गासह पुणे-पौड रस्ता आणि कोथरूड-बावधनकडे जाणाऱ्या रस्त्यांमुळे चांदणी चौकात कायम वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या भागातील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी हा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने हा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ४१९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. चांदणी चौकातून मुंबई, मुळशी, सातारा, कोथरूड, बावधन आणि एनडीएकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीकोनातून या उड्डाणपूलाची रचना करण्यात आली असून पाषाण-बावधन ते कोथरूड मार्गासाठी दोन उपमार्ग बांधण्यात येणार आहेत. नियोजित उड्डाणपूलासाठी तब्बल सत्तावीस हेक्टरची जागा आवश्यक असून त्यापैकी साडेबारा हेक्टर जागेचे संपादन महापालिकेतर्फे केले जाणार आहे. त्यामध्ये खासगी जागा, वनविभाग, महापालिका आणि संरक्षण विभागाच्या जागेचा समावेश आहे.

दृष्टीहीनांचा पुणे फेस्टीव्हलमध्ये डोळस कलाविष्कार…….

0

पुणे – पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच पुणे फेस्टिव्हलच्या कार्यक्रमांचीही धूम सुरू झाली आहे. या
कार्यक्रमांचा दुसरा दिवस गाजवला तो अंध कलाकारांनी डोळसपणे सादर केलेल्या “अपूर्व मेघदूत “ या नाट्यविष्काराने.
महाकवी कालिदासाच्या मेघदूत या संस्कृत काव्यावरील या नाट्यविष्कारात संवाद होते, नृत्ये होती, मोठी स्वगत
होती…..पण कुठेही न बुजता किंवा दडपण न घेता अगदी सराईत व्यवसाय़िक नाटकातील नटांप्रमाणे हलचाली, संवाद
म्हणत सर्वच कलाकारांनी नाट्यरसिकांची मन जिंकली आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम
यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवली.
पुणे फेस्टिव्हमध्ये आज संध्याकाळी बालगंधर्व रंगमंदीरात १९ अंध कलाकारांनी अपूर्व मेघदूत या दोन अंकी नाटकांचा
प्रयोग सादर केला. पहिला अंक संपल्यानंतर या कलाकारांचा गौरव गायत्रीदेवी पटवर्धन यांनी केला तसेच डॉ लागू
यांचाही पुणे फेस्टिव्हलच्या वतीने सत्कार केला. या नाटकाची संहिता आणि मेघदूत काव्यातून नाट्य रूपांतर आणि गीत
गणेश दिघे यांनी लिहिली आहेत, तर दिग्दर्शन स्वागत थोरात यांनी केले आहे. असा मेघदूत काव्यावरील नाटयप्रयोग
करण्याचे आव्हान आर्लिन संस्थेच्या रेश्मा पांढरे आणि वीणा ढोले व त्यांच्या टीमने सर्वप्रथम स्वीकारले. त्यांनी संच उभा
केला आणि नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाचा याच कलाकारांच्या संचाने आज १४ वा प्रयोग सादर करून त्यांनी
१४ विद्यांची देवता असलेल्या श्री गणेशाच्या चरणी कलेची सेवा रूजू केली. या सर्व कलाकारांची संवाद फेक, त्यांचा
रंगमंचावरचा सहज व सराईत वावर, सहकालाकारांना प्रतिसाद देण्याची पद्धती, नृत्यातील लयबद्ध पदन्यास बघून हे
कलाकार दृष्टीहीन नसून कोणी मुरब्बी व्यावसायिक कलाकार काम करत आहेत असे जाणवत होते.
या नाटकातील सर्व म्हणजे १९ कलाकार हे १८ ते ३० वयोगटातील असून काहीजण पदवी, पदव्योत्तर अभ्यासक्रमाचे
शिक्षण घेत आहेत तर काही जण नोकरी करत आहेत. यातील कालिदासाची भूमिका करणारा अव्दैत मराठे सह पाच
कलाकारांना उशिराने अंधत्व आलेले असल्याने त्यांना ब्रेल लिपी येत नाही. त्यानी ऑडिओ कॅसेट ऐकून संवाद पाठ केले
आहेत. या नाटकाची सुरूवातच अव्दैतच्या सुमारे दहा मिनिटांच्या स्वगताने होते. यक्षाची भूमिका करणारा घायले हा
सी. ए.ची फायनल परिक्षा देत असून कॉर्पोरेशन बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर कामही करत आहे तर दामिनीची
भूमिका करणारी तेजस्वीनीला चारच वर्षापूर्वी अंधत्व आले असून ती एम कॉम असून बँकेची परिक्षा देत आहे.
सावी फाउंडेशन हा व्यवसायिक महिलांचा ग्रूप या सर्वांना सहाय्य करण्याची भूमिका गेली तीन वर्षे बजावत आहे. ब्रेल
लिपीत पुस्तके तयार करणे, ऑडिओ कॅसेट तयार करणे, त्यांच्यासाठी सेमिनार आयोजित करणे, बँके किंवा कुठेही
देण्यासाठी या सर्वांची इंटव्ह्यूची तयारी करून घेणे अशी कामे करत आहे. या सर्व दृष्टीहीन कलाकारांना घेऊन नेहमी
गायन, वादनाचे कार्यक्रम सोडून त्यांच्यासाठी संगीत नृत्य नाटिका बसवण्याचे आव्हान त्यांनी पेलले आहे. अपूर्व मेघदूत
या नाटकाच्या प्रयोगाचा उपयोग काही स्वयंसेवी संस्थांनी निधी उभारण्यासाठीही केलेला आहे.

कॉंग्रेस -राष्ट्रवादीला गरज खमक्या नेतृत्वाची …

पुणे-मोदी लाटेत शहरत आठ हि जागांवर भाजपचे आमदार निवडून आले आणि महापालिकेत स्पष्ट बहुमत देखील भाजपला मिळाल्यावर आता यापुढे अवसान गेलेल्या पक्षांप्रमाणे गलितगात्र अवस्था प्राप्त करून न घेता चैतन्य निर्माण करण्याची गरज कॉंग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादी मधून व्यक्त होते आहे .
भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील आणि स्थानिक पातळीवरील सत्तेमुळे या पक्षातील अनेकांना बराचसा फरक जाणवतो आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना ज्याप्रमाणे विरोधी पक्षांना वागणूक मिळत असे, तशी वागणूक भाजप सत्तेवर असताना मिळत नाही , याला कारण,’ कधी तरी मिळाले ..अन गटकन ..गिळाले ‘.. अशी भाजपा अवस्था सांगितली जाते आहे. शहरातील एक बडा बिल्डर हैराण झालेला असताना ,कधी काळचा त्याचा प्रतिस्पर्धी असलेला दुसरा बिल्डर भाजपला मदत करूनही समाधानी नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. भाजपला केवळ ..हवेच आहे .. घ्यायचे माहिती आहे… द्यायचे माहिती नाही .. अशी स्पष्ट अवस्था राजकीय वर्तुळातून सांगितली जाते आहे. आणि त्यात स्पष्ट बहुमत .. यामुळे प्रसंगी प्रतिस्पर्ध्याला संपविण्याचे राजकारण देखील करू पाहत असल्याचा आरोप होतो आहे. या परिस्थितीत  प्रत्येक नेत्याची पावले सावध पडत होती . भुजबळांच्या अवस्थे नंतर ….. आता कॉंग्रेसचे नारायण राणे भाजपच्या वाटेवर का आहेत ? याबाबत हि शंका घेतली जाते आहे. सत्तेचा असा वापर भाजप करीत असल्याचा आरोप अनेकवेळा ‘राजकीय सूड ‘या शब्दाने झाला. पण आता नोटबंदी नंतर बरीचसी परिस्थिती निवळली आहे .’ भेळ तिथे खेळ ‘ करणारे खेळ खेळून बसले आहेत . त्यानंतर प्रत्येकाला आपापले स्थैर्य हवे आहे . या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहर अध्यक्ष विनायक निम्हण यांनी राणेंच्या कृतीवर लक्ष ठेवत स्वपक्षाला सोडण्याची तयारी ठेवली असल्याने;  निम्हण हवेच, पण गेलेच तर ,त्यांच्या जागेवर चंद्रकांत मोकाटे यांच्या सारख्या तरुणाईचा शोधही सेनेने सुरु ठेवला आहे.
याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या गोटात जरी अंतर्गत खेचाखेची असली तरी राष्ट्रवादी मात्र सजग होऊ पाहते आहे असे चित्र आहे . माजी महापौर असलेल्या वंदना चव्हाण या खासदार आहेत.पण शहर अध्यक्ष म्हणून कार्यकर्ता आणि त्यांचा समूह सांभाळण्याची त्यांची क्षमता दिसून येत नाही ,केवळ मुठ्भरांच्या हितासाठी त्या झटतात असा त्यांच्यावर नेहमी आरोप होत आला आहे. कात्रजचे स्वर्गीय अजित बाबर यांचे त्यांचे खटके उडाले होते. तसे सध्याही पक्षाच्या डॅशिंग असलेल्या नेत्यांबरोबर त्यांचे फारसे सख्य दिसून येत नाही. त्या त्यांच्या पुरत्याच  व्यवस्थित अशीच त्यांची व्याख्या केली जाते. आणि दुसरीकडे पक्षांतर्गत विरोध असतानाही कॉंग्रेसचे अध्यक्षपद रमेश बागवे कशी प्रत्येक वेळी आक्रमक चाल करीत आहेत याकडे लक्ष वेधले जावू लागले आहे.महापालिकेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चे नगरसेवक भाजपच्या ९८ नगरसेवकांना पुरून उरत आहेत . पण बाहेर शहर पक्ष पातळीवर मात्र याबाबत केवळ कॉंग्रेस च रमेश बागवे यांच्या सारख्या अध्यक्षांमुळे आघाडीवर दिसत आहे.
या सर्व बाबींचा अभ्यास करून खुद्द शरद पवार यांनीच आता राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदावरून चव्हाण यांना सन्मानाने पायउतार करावे अशी मागणी होते आहे.  लढवय्या असलेला आणि कार्यकर्त्यांची ताकद बाळगणारा कोणताही नेता अध्यक्ष करा अशी मागणी होते आहे. पण असा नेता कोण ? असा प्रश्न केला तर केवळ दीपक मानकर यांचेच नाव पुढे येते आहे .
खुद्द याबाबत मानकर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अजिबात चर्चा देखील नाही हे विशेष मानकर यांचे नाव त्यांच्या स्वतःच्या वर्तुळा बाहेरून  पुढे येते आहे. कॉंग्रेसचे रमेश बागवे आणि दीपक मानकर यांच्या जोडगळीनेच तत्कालीन शहराचे नेते सुरेश कलमाडींची ताकद वाढविली होती याकडे लक्ष वेधण्यात येत आहे . कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने या दोघांच्या मदतीने शहरात ताकद वाढविली तर गोगावले-बापट यांच्या भाजपला ते जोरदार टक्कर देतील असे मानले जाते आहे .
प्रत्यक्षात आता शहर भाजप मध्ये मात्र वेगळीच  परिस्थिती आहे.  खेचाखेचीत सुहास कुलकर्णी,उजवल केसकर सारखे हिरे गळून पडले तर विकास मठकरीसारखे  निष्प्रभ ठरले आहेत. संदीप खर्डेकर यांच्या सारखे आंदोलक ही जणू स्वतः पुरतेच एकाकी पडल्याचे चित्र आहे. अशा पक्षातील डॅशिंग कार्यकर्त्यांचा पक्षात असूनही पक्षासाठी उपयोग करवून घेतला जात नाही असे दिसते आहे .खासदार शिरोळे स्वतःत अडकून पडले आहेत तर दुसरे खासदार लढाईत मागे पडत आहेत. एकंदरीत शहर आणि महापालिका भाजपच्या गोटात पायापुरते मर्यादित विचार यामुळे शहर राजकारणावर स्थानिक पकड न रहाता थेट मुंबईतूनच सूत्रे हलवावी लागत आहेत असे सध्याचे चित्र आहे पण तेच जबरदस्त असल्याचाही दावा करण्यात येतो असला तरीही यामुळे पुढील निवडणुकीत पक्षाला शहर पातळीवर मोठी किंमत मोजावी लागेल असे चित्र आहे . या सर्व राजकीय गदारोळात कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेने सारख्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना आतापासूनच शहरातील सर्वोच्च अस्तित्वासाठी  योग्य मोहरे पुढे करून व्यूहरचना करावी लागणार आहे .

–शरद लोणकर, पुणे

लूल्लानगर उड्डाणपूलासाठी खासदार निधीतून एक कोटीची तरतूद – खा. अनिल शिरोळे

0

पुणे-लुल्लानगर चौक कोंढवा खुर्द येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कममधील एच एम ( सी टी सी) प्रवेश ते न्यू कमांड हॉस्पिटल या ठिकाणी अंडरपास बांधण्यासाठी खासदार स्थानिक विकास निधि अंतर्गत १ कोटी रुपयाचा निधी पुणे महानगर पालिकेला उपलब्ध करून दिला असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी दिली आहे. उड्डाणपुलाच्या कामास एकूण ४ कोटी ४८ लाख खर्च येणार असून त्यापैकि सुरवातीचा १ कोटी रुपयाचा निधी महानगर पालिकेने दिला आहे. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर ह्यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उर्वरित रकमची तरतूद ही खासदार व आमदार ह्यांच्या स्थानिक विकास निधीतून उभी करावयाची असल्याने त्यानुसार हा निधी उपलब्ध करून दिल्याचे शिरोळे म्हणाले. त्याचबरोबर ह्या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होऊन तो नागरिकांच्या सेवेत उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा देखील शिरोळे ह्यांनी व्यक्त केली आहे.

ज़ोरदार बारिश और उत्तर भारत में हुए दंगो के बाद भी “ए जेंटलमैन” ने कमाए 4.04 करोड़

जबरदस्त बारिश और उत्तर भारत में हुए हिंसा के बाद भी “ए जेंटलमैन” के पहले दिन का संग्रह; अच्छी समीक्षा और सकारात्मक शब्द फ़िल्म को उछाल देने में कारगर!

सिद्धार्थ मल्होत्रा ​​और जैकलिन फर्नांडीज द्वारा अभिनीत “ए जेंटलमैन-सुंदर, सुशील, रिस्की” ने एक दिन में 4.04 करोड़ की कमाई की| फ़िल्म को भारत में ज़ोरदार बारिश और उत्तर भारत में दंगों की वजह से खामियाजा भुक्तना पड़ा। राज और डीके की फिल्म को मिल रही अच्छी समीक्षा और सकारात्मक शब्द सप्ताहांत तक फ़िल्म में बढ़त पैदा कर सकते है।

भारत के फॉक्स स्टार स्टूडियोज के सीईओ विजय सिंह कहते हैं, “कुछ स्थितियों का अनुमान नहीं लगाया जा सकता है – विशेष रूप से महाराष्ट्र और राजस्थान में हो रही भारी बारिश, साथ में उत्तरी भारत में हिंसा के कारण थिएटर बंद होने की वजह से फ़िल्म की कमाई पर असर पड़ा है। हालांकि, फिल्म के प्रति सकारात्मक शब्द बेहद उत्साहजनक साबित हो रहे है और आज से शुरू होने वाले संग्रह में बढ़ोतरी दिखाई देगी।”

पहले ही दिन कम कमाई करने के बावजूद, फॉक्स स्टार स्टूडियोज़ इन सब ध्यान केंद्रित ना करते हुए जल्द मुनाफा कमाने के लिए तैयार है। फिल्म सेटलाईट, संगीत और डिजिटल मीडिया के पूर्व-रिलीज के माध्यम से 30 करोड़ कमाने में सक्ष्म रही है। फिल्म की सीओपी और पी एंड ए ने  50 करोड़ रुपये निवेश किथे जिसका मतलब है फॉक्स स्टार स्टूडियोज़ को विश्वभर के आधार पर सिर्फ 40 करोड़ बॉक्स ऑफिस करने की ज़रूरत होती है, जो मुनाफा रिपोर्ट करना शुरू कर देगा।

फिल्म ने ME में सकारात्मक शब्दों के साथ अपनी शुरुवात की है और गुरु और शुक्र को 2,50,000 डॉलर का जीबो पंजीकृत किया है। ब्रिटेन और अमरीका में भी फिल्म सकारात्मक शब्द के साथ अपने कदम रखने में कामयाब रही है

अपंग विकासाच्या भरीव निधीसाठी प्रयत्नशील-पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे, दि. 26:  अपंगत्वावर मात करुन आयुष्याची परिक्रमा करण्यासाठी  व अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.

अल्पबचत भवन येथे अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), बालकल्याण संस्था पुणे व अनाथ संस्था, पुणे यांच्यावतीने दिव्यांगासाठी व पुणे जिल्हयातील अपंगांच्या विशेष शाळेतील शिक्षक तसेच मतीमंद व बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. बापट बोलत होते. यावेळी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, यशदाचे सह-प्राध्यापक डॉ. डी.टी.देशमुख, प्रसिध्द बासरीवादक पंडित केशवजी गिंडे, सुरेश पाटील, वसंत ठकार, यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. बापट म्हणाले, एकुण लोकसंख्येच्या दहा टक्के इतके विकलांगांचे प्रमाण असून अशा विकलांगांना निर्धारपूर्वक उभे करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपला सहयोग देणे आवश्यक आहे. अपंगत्वावर मात करुन त्यांच्या मानसिकता, शारिरीकता आणि भावना यांचा सारासार विकास होण्यासाठी राज्य शासनाबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था, शाळा, कार्येकर्ते यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. विकलांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व गुणात्मक वाढीसाठी अधिकाधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अंदाजपत्रकीय तरतूदीमध्ये अधिक तरतूद होण्यासाठी आपण निश्चित पाठपुरावा करु असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात अपंग विकास आयुक्त नितीन पाटील यांनी कार्यशाळे मागची भूमिका विषद करताना सांगितले, राज्यात एकुण 700 विकलांगांच्या विशेष शाळा आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी  अशा प्रोत्साहनपर कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. यापूर्वी सोलापूर, औरंगाबाद, लातूर, मुंबई येथे कार्यशाळा भरविण्यात आल्या आहेत. संगीत,नृत्य, ध्यान धारणा, विविध क्रिडा प्रकारांचा या कार्यशाळेत अंतर्भाव केला असल्याने विकलांग विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता वाढविण्यास याचा मोठा फायदा होत आहे.

दोन सत्रात पार पडलेल्या या कार्यशाळेत पहिल्या सत्रात नृत्य, संगीत, ध्यान धारणा यावर आधारित कार्यक्रम पार पडले. यावेळी पंडित केशवजी गिंडे यांचे बासरीवादन झाले. तर दुसऱ्या सत्रात योगाभ्यास, निसर्गोपचार, आहारचिकित्सा, हास्योपचार याविषयी विशेष शाळांतील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्त कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाची पालकमंत्री यांनी पहाणी करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मिनल कातर्णेकर यांनी केले. या कार्यक्रमास अनाम प्रेम परिवाराचे अनिल मोरे, आशुतोष ठाकूर, मनिषा परब, सतीश नगरे तसेच विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

मोदी सरकारच्या राज्यात दलित मुस्लिम असुरक्षित –भीम आर्मीची निदर्शने

0

पुणे-

हरियाणा , आंध्रप्रदेश , गुजरात , बिहार , राजस्थान , तामिळनाडू , उत्तरप्रदेश तसेच महाराष्ट्रसह देशभरात दलितांवर अमानवी हल्ले होत आहेत , पुण्यातील युवक मोहसीन शेख पासून अखलाक आणि जुनेद पर्यंत २३ मुस्लिम युवकांची संपूर्ण देशात गोरक्षण आणि धर्म रक्षणाच्या नावाखाली हत्या झाल्या आहेत . गोमांस बाळगल्याच्या संशयावरून ५३ घटनेत मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आले .

याचाच अर्थ मोदी सरकारच्या राज्यात दलित मुस्लिम सुरक्षित नाहीत .या निषेधार्थ केंद्र सरकारचा भीम आर्मी पुणे शहर शाखेच्या वतीने तीव्र निदर्शने करून निषेध करण्यात आला .पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनाचे नेर्तृत्व भीम आर्मी संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी केले .

देशाचे प्रधानमंत्री अच्छे दिन झाल्याची चर्चा करतात , परंतु देशात दलित मुस्लिम सुरक्षित आहेत का ? याकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे . इथले धर्मवादी लोक धर्मरक्षण व गोरक्षणाच्या आहेत आणि सरकार त्यावर कठोर निर्णय होऊ शकत नाही . ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका असून केंद्र सरकार आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडित नसल्याचा आरोप भीम आर्मी संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी केला आहे .यावेळी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .

त्याचप्रमाणे भीम आर्मी संघटनेचे नेते चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशमध्ये दलित अत्याचारांवर संविधानिक मार्गाने आपला लढा लढत असताना व दलितांवर अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करताना त्यांना नियोजनबध्द व जाणीवपूर्वक अटक केली . त्याचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला .

दलित मुस्लिम समाजाला संरक्षण द्यावे तसेच भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांची सुटका व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली .

यावेळी शहराच्या विविध भागातून कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते . यामध्ये प्रदीप कांबळे , सुनिल बेंगळे , राहुल शिंदे , विवेक सावंत , चंद्रकांत भोसले , पावलंस सावंत , विठ्ठल देवकुळे , राकेश साबळे , दत्ता गरुड , बाळू गायकवाड , श्रीकांत शेंडगे , सदा देवनावर , मामा वाघमारे , विक्की जावळे निखिल गायकवाड , अरिफ तांबोळी , हुसेन भोलावले , शरद अरुण आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

उद्योग आणि व्यवस्थापन शिक्षण जोडताना सरकारची साथ हवी – कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे

0
पुणे :
 
‘व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांना आताच्या उद्योगक्षेत्राशी जोडायचे असेल, तर शैक्षणिक संस्थांच्या प्रयत्नांना सरकारची साथ मिळायला हवी,’ असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
 
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने ‘इंडस्ट्री, इन्स्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट-2017’चे उद्घाटन आज (शनिवार) एरंडवणे कॅम्पस येथे झाले. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
 
यावेळी उद्योजक संजय घोडावत यांना ‘कार्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवार्ड-2017’ देवून गौरविण्यात आले. शेतीपूरक उद्योगातील यशाबद्दल ए. जे. जामगुंडे यांना ‘यशस्वी उद्योजक’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
 
50 यशस्वी उद्योजकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
 
डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, ’आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार भारतातील शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातही बदल होत आहेत. उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा आणि व्यवस्थापनशास्त्र अभ्यासाची सांगड घालणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी फक्त उद्योग, शिक्षण क्षेत्राने पुढाकार घेवून चालणार नाही, सरकारी पुढाकाराची जोडही द्यावी लागेल.’ 
 
टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचे सरव्यवस्थापक जी. बालनारायण म्हणाले, ‘डिजीटल क्रांतीने बदललेल्या विश्वाची दखल अद्यापन करताना द्यायला हवी.’
 
संजय घोडावत यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, ‘यशासाठी सामूहिक प्रयत्न कष्ट, आणि मूल्यांना जपणे महत्त्वाचे ठरते.’ यावेळी व्यासपीठावर डॉ. शरद जोशी, आयएमईडी संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, विनायक भोसले उपस्थित होते.
 
‘बिल्डिंग ब्रिजेस’ या पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे 1500 व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. 

कुटुंबासोबतच समाजहिताचा विचार करा – महापौर सौ. मुक्ता टिळक

0
विश्‍व शांती केंद्र (आळंदी), एमआयटी डब्ल्युपीयू व शारदा ज्ञानपीठ यांच्या वतीने ऋषीतुल्य व्यक्तिमत्वांचा सत्कार संपन्न
पुणे: “महात्मा गांधी म्हणावयाचे की, आपण सर्वच जण आपापल्या कुटुंबासाठी धडपडत असतो. आपल्या प्रत्येक माणसाचे भले व्हावे असे आपणांस वाटते. खरेतर हाच हिताचा विचार समाजासाठी करण्याची गरज आहे.” असे उद्गार पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता टिळक यांनी काढले.
विश्‍व शांती केंद्र (आळंदी), डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी डब्ल्युपीयू व शारदा ज्ञानपीठ यांच्या वतीने 14 ऋषीतुल्य व्यक्तिमत्वांचा सत्कार सोहळा एमआयटीच्या ज्ञानेश्‍वर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड उपस्थित होते.
यावेळी सिंबायोसिस विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, जम्मू- कश्मीर येथे कार्यरत असणारे आयएएस अधिकारी सागर डोईफोडे, एमआयटी डब्ल्युपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, पं. वसंत गाडगीळ, श्रीवर्धन वसंत गाडगीळ हे उपस्थित होते.
योगी ज्ञाननाथजी रानडे महाराज, रामकृष्ण गोविंद देशपांडे, प्राचार्य एच. एम. गणेशराव, प्रति साने गुरुजी प्राचार्य रामचंद्र नारायण पांडे, विज्ञानतपस्वी डॉ. गोविंद स्वरूप, नाट्यकला तपस्वी महर्षि श्रीकांत मोघे, वैद्यकसेवा तपस्वी शरद हरि भिडे, गोसेवा महर्षि पृथ्वीराज चुनीलाल बोथरा, नादब्रह्मतपस्वी प्रभाकर जोग, निर्मलादेवी पुरंदरे, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, वारकरी तपस्वी महादेव सावळा पाटील, योगसाधना तपस्वी अ‍ॅडव्होकेट अनंत शाहूराव कुकडे या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वांचा सत्कार केला गेला. तसेच हास्य व्यंगचित्रकार पुण्यश्‍लोक मंगेश तेंडुलकर यांनाही  मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला.
मुक्ता टिळक म्हणाल्या, “आज आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र याच तरुणाईस आज स्वत:च्या आई-वडिलांकडे पाहण्याइतपतही वेळ नाही. चंगळवादाच्या आहारी जाणार्‍या या पिढीने खरेतर ऋषीतुल्य असणार्‍या या व्यक्तींचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवावयास हवा. जर या स्वरूपाचे कार्यक्रम सर्वत्र राबविले गेले, तर नक्कीच चंगळवादाला आळा बसेल.”
 डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “ज्याप्रमाणे गणेशोत्सवाची परंपरा सुरू झाली, अगदी त्याचप्रमाणे आज ही ऋषीतुल्य व्यक्तीमत्वांच्या सत्काराची परंपरा गेली 42 वर्षे सुरू आहे. एमआयटीच्या प्रांगणात हा कार्यक्रम सुरू केल्यामूळे ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्वांबद्दलचा युवावर्गातील आदर अजूनच वाढेल.”
सागर डोईफोडे म्हणाले, “ आपली संस्कृती ही सगळ्या संस्कृतींची सांगड घालणारी आहे.  कश्मीरमध्ये काम करत असताना देखील आपल्या वेद पुराणाचा संदर्भ लागतो. आज तिथली स्थिती पाहता आपण पुढाकार घेऊन पावले उचलणे आवश्यक आहे. ज्यामूळे सकारात्मक गोष्टी एकात्मतेच्या दृष्टीने आपण पुढे जाणार नाही. आपले त्यांच्याबद्दल असणारे प्रेम, आपुलकी, अत्मियता त्यांच्या पर्यंत पोचणे गरजेचे आहे. ज्यामूळे आपली राष्ट्रीय एकात्मता वाढेल.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “ भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचे आगळे-वेगळे स्वरूप समोर आणणारा हा ऋषीपंचमीचा उत्सव आहे. या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे. भारतीय संस़्कृतीचे दर्शन जर जगाला घडवायचे असेल तर श्रीराम नामासोबतच या स्वरूपाचे उत्सव साजरे होणे गरजेचे आहे.”
      प्रा. राहुल वि. कराड म्हणाले, “ अशा स्वरुपाचा कार्यक्रम खरेतर संपूर्ण देशात होणे गरजेचे आहे. सर्व महापालिकांच्या महपौरांनी पुढाकार घेऊन असे कार्यक्रम त्या-त्या ठिकाणी घडवून आणावेत. जेणे करून तिथल्या ऋषीतुल्यांचे ज्ञान, त्यांची महती तिथल्या तरुणाईला होईल. ”
पं. वसंत गाडगीळ यांनी संस्कृतमध्ये प्रास्ताविकपर भाषण केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी केले. प्राचार्य डॉ. एल.के. क्षीरसागर यांनी आभार मानले.

दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर अर्थवशीर्ष पठण(व्हिडीओ)

0

 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर ॠषिपंचमीनिमित्त आज शनिवारी सकाळी 6.00 वाजता दरवर्षीप्रमाणे महिलांनी सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण केले. यावर्षी 31 हजार महिलांनी आपला सहभाग नोंदवला. गेल्या 29 वर्षांपासून अशा प्रकारे अथर्वशीर्ष पठण करण्यात येत असून यंदाचे हे 30 वे वर्ष आहे.

दगडूशेठच्या रोषणाईचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते…

0

 

पुणे –

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या रोषणाईचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्‍वरी मंडळास भेट देऊन त्यांनी दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरली मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक हेमंत रासने, मंडळाचे अशोक गोडसे, उल्हास भट आदी उपस्थित होते.