पुणे, दि. 7 : सासवड रस्त्यावरील महानगरपालीकेच्या हद्दीबाहेरील भेकराईनगर, फुरसुंगी व मंतरवाडी या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस 15 मीटर अंतरापर्यंत असलेली अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत काढण्यात येणार असून नागरिकांनी स्वत:हून या रुंदीमधील अतिक्रमणे काढुन घ्यावीत अन्यथा पुढील 15 दिवसानंतर ती काढून घेण्यात येतील, असे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
राजे उमाजी नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे, दि. 7 : जिल्हा प्रशासनातर्फे राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात,उपायुक्त कविता व्दिवेदी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपायुक्त नीलिमा धायगुडे, उपायुक्त अजित निंबाळकर, उपायुक्त प्रतापराव जाधव, तहसीलदार प्रशांत आवटी, तहसीलदार मनीषा देशपांडे, तहसीलदार ठोंबरे देवदत्त, तहसीलदार मीनल कळसकर, तसेच विभागीय आयुक्त कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी च्या नेत्यांवरील तक्रारी मागे का घेतल्या ?खडसेंचा सवाल
स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे विसर्जन मिरवणुकीतील पोलिसांना मोफत मिनरल वॉटर व चिक्की वाटप
पुणे-स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे विसर्जन मिरवणुकीतील सर्व पोलीस बंधू व भगिनींना मोफत मिनरल वॉटर व चिक्की वाटप स. प. महाविद्यालय बाहेर श्रीपाल सबनीस ( मा. अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन ), अनंतराव गाडगीळ ( आमदार पुणे ),माजी आमदार उल्हास पवार, री. दिलीप सेठ ( प्राचार्य. स. प. महाविद्यालय ), सुनील रुकारी, नरेंद्र व्यवहारे, स्वागत राजे ( सहायक पोलीस आयूक्त ) यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
तीन हजार जणांची पाच दिवसात मोफत वैद्यकीय तपासणी संपन्न
पुणे-रविवार पेठ मधील अंजुमने सैफी दाऊदी बोहरा समाज व खडक पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात व गणेश विसर्जन मिरवणूकीमधील नागरिकांसाठी भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर घेण्यात आले . तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले .
खडक पोलीस ठाण्याच्या बाहेरील शिवाजी रोड येथे या वैद्यकीय शिबिराचे उदघाटन सहाय्यक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्याहस्ते करण्यात आले . या वैद्यकीय शिबिरामध्ये तीन हजार जणांची पाच दिवसात तपासणी केली. या शिबिरासाठी अंजुमने सैफी दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख मुफद्दल भाईसाहब नजमुद्दीन , कुरेश घोडनदीवाला , युसूफ लिमडीवाला ,मुर्तझा मोगरावाला , डॉ. बत्तुल टीनवाला , डॉ. अब्बास फैजी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .
या शिबिरासाठी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी , गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी विशेष सहकार्य केले .पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गणेश देखावे पाहण्यासाठी येत असतात त्यावेळी त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी या वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात येते . अशी माहिती डॉ. अब्बास फैजी यांनी दिली .
‘पुणे फेस्टिव्हल’ च्या ‘ऑल इंडिया मुशायरा’ मध्ये सर्वधर्मसमभावाचे दर्शन, एकात्मतेचा सन्मान !
’पुणे फेस्टिव्हल’ चे अध्यक्ष सुरेश कलमाडी, रमेश बागवे, अभय छाजेड, मुनवर पीरभॉय, डॉ. सतीश देसाई, सुरेश धर्मावत, शाहीद शेख उपस्थित होते.इक्बाल अन्सारी यांनी सूत्रसंचालन केले. वाहिद बियाबानी यांनी आभार मानले.
शहरातील विसर्जन मिरवणूक २८ तास ; लष्कर भागातील विसर्जन मिरवणूक सहा तासात संपन्न
पुणे-भवानी पेठेतल्या गोकुळ वस्ताद तालीम तरुण मंडळ, ट्रस्ट या शेवटच्या मंडळाच्या बाप्पाचे आज दुपारी २ वाजून २० मिनिटांनी नटेश्वर घाटावर विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडल्याचे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले. यंदाची विसर्जन मिरवणूक गतवर्षी पेक्षा २५ मिनिट अगोदर मार्गी लागली असली तरी ती तब्बल २८ तास ५ मिनिट चालली. बुधवारी सकाळी आठ वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनाने कालपासून शहरात सुरू असलेल्या विसर्जन सोहळ्याची सांगता झाली तर पुणे लष्कर भागातील विसर्जन मिरवणूक सहा तासात उत्साहाने संपन्न झाली . या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ सायंकाळी साडेसहा वाजता भोपळे चौकात मानाचा पहिला गणपती कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पुढे राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्ते नारळ वाढवून करण्यात आली . यावेळी लष्कर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश मोरे , लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंवर , कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते .
अंनत चतुर्दशीदिनी काल सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी शहरातील महात्मा फुले मंडई येथून पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करून सुरुवात मिरवणुकीला सुरुवात झाली होती. ती आज दुपारी २ वाजून २० मिनिटांनी संपली.
मुख्य विसर्जन मिरवणुकीसाठी चार मुख्य मार्ग होते. यामध्ये लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्ता या मार्गांचा समावेश होता. यांपैकी लक्ष्मी रस्त्यावरून २४१, टिळक रस्त्यावरून १९७, कुमठेकर रस्त्यावरून ४७, केळकर रस्त्यावरून १२७ असे एकूण ६१२ गणेश मंडळे या चारही रस्त्यांवरून मार्गस्थ झाली होती.
या विसर्जन कार्यक्रमासाठी एकूण ८४७ पोलीस अधिकारी, ७८७० पोलीस कर्मचारी तर एसआरपीएफ कंपनी ३ ची तुकडी असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान लष्कर भागातील आकर्षक सजावटीमध्ये आपली मंडळाने आपल्या श्री ची मूर्ती विसर्जन मिरवणूक काढली होती तर सिंहगर्जना पथकाच्या ढोल पथकाने सद्रीकर्ण केले .
या विसर्जन मिरवणुकीत भीमपुरा गल्लीमधील श्री राजेश्वर तरुण मंडळ , कोळसेगल्लीमधील नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळ , ताबूत स्ट्रीटवरील ताबूत स्ट्रीट तरुण मंडळ , राणी लक्ष्मीबाई उद्यानाजवळील शिवमुद्रा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भवानी पेठेमधील श्री. शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट , भोपळे चौकातील श्रीमंत साईनाथ तरुण मंडळ , हिंद तरुण मंडळ , शिंपी आळीमधील नवयुग तरुण मंडळ , गाडीअड्डा येथील शिव तरुण मंडळ ट्रस्ट , कुंभारबावडी बाजारमधील कुंभारबावडी तरुण मंडळ , कुंभारबावडी स्थायिक सेवा सेवा मंडळ ,जाफरींन लेनमधील नवयुग सुवर्णकार तरुण मंडळ , नवा मोदीखानामधील विश्व् तरुण मंडळ , कमलमळामधील शिवशक्ती कमलमळा तरुण मंडळ ,नवा मोदीखानामधील उत्सव संवर्धक खाण्या मारुती देवस्थान मंडळ ट्रस्ट , सर्वात शेवटी शंकरसेठ रोडवरील धोबीघाट मित्र मंडळ ट्रस्ट आदी मंडळ सहभागी झाले होते .
यंदाच्या वर्षी श्री दत्त समाज तरुण मंडळ , श्रीपाद तरुण मंडळ , श्रीकृष्ण तरुण मंडळ , दस्तूर मेहेर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,श्री शिवराम तरुण मंडळ या मंडळांनी जाग्यावर विसर्जन केले . तर जय जवान मंडळाने नवयुग तरुण मंडळाबरोबर आपली विसर्जन मिरवणूक काढली . हिंद तरुण मंडळाने देशभक्तीपर नृत्ये सादर केली . हि नृत्ये बघण्यासाठी गर्दी झाली होती . तर शिवांध ढोलपथकाने सहभागी झाले होते . उत्सव संवर्धक खाण्या मारुती देवस्थान मंडळ ट्रस्ट फुग्यांची सजावट केली होती . कुंभारबावडी स्थायिक सेवा सेवा मंडळाने शंकर महादेव त्रिशूल देखावा , नवयुग सुवर्णकार तरुण मंडळाने आकर्षक फुलांची सजावट , धोबीघाट मित्र मंडळाने बजरंगबली हनुमान हलता देखावा , विश्व् तरुण मंडळाने विठ्ठल रुक्मिणी , संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमाचा देखावा , श्रीकृष्ण तरुण मंडळाने शिवमहल देखावा सादर केला होता .
शिवमुद्रा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवक सहभागी होऊन संगीताच्या तालावर नृत्यात सहभागी झाले होते . लष्कर भागातील हे एकमेव मंडळ लक्ष्मी रोडमार्गे शहराच्या मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले . त्यानंतर श्रीमंत साईनाथ तरुण मंडळ देखील शहराच्या टिळक रोडवरील मिरवणुकीत सहभागी झाले . हिंद तरुण मंडळामध्ये महिला भगिनी मोठ्या संख्येने यंदाच्या वर्षी देखील सहभागी झाल्या होत्या . तर ताबूत स्ट्रीट तरुण मंडळाच्या मिरवणुकीत दोन बालचमूंनी आकर्षक नृत्ये सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली . बुटी स्ट्रीटवरील वीर शैव लिंगायत गवळी समाजाचा पापा वस्ताद गवळी तालीम आपली विसर्जन मिरवणूक सकाळी काढली . या मिरवणुकीत गवळी समाज बांधव सहभागी झाले होते . तसेच भगवे फेट्यामध्ये महिला सहभागी झाल्या होत्या . मंडळाच्या स्वतःच्या ढोल लेझीम पथकाच्या तालावर झिम्मा फुगडी खेळत होत्या .
पोलीस बंदोबस्त
या विसर्जन मिरवणुकीसाठी १ सहाय्यक पोलीस आयुक्त , ६ पोलिस निरीक्षक , १६ पोलिस अधिकारी , २२५ पोलिस कर्मचारी वर्ग , १५ होमगार्ड , ३० पोलिस मित्र विशेष परिश्रम घेतले . सर्वांच्या सहकार्यामुळे हि विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांनी सांगितले .
विविध सामाजिक संस्थांच्यावतीने स्वागत
पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीच्यावतीने सेंटर स्ट्रीट पोलीस चौकीजवळ स्वागत कक्ष उभारून सर्व मंडळाचे बापूसाहेब गाणला यांनी श्रीफळ आणि पुष्पगुछ देउन स्वागत केले . यावेळी इसाक जाफर , अच्युत निखळ , इमाद सय्यद , रे फर्नाडिस , बलबीरसिंग कलसी , रणजित परदेशी , संदीप भोसले , पोपट गायकवाड , मन्नू कागडा आदी उपस्थित होते . तसेच ऑल इंडिया जमेतुल कुरेशी वर्किंग कमिटीच्यावतीने कुरेशी मस्जिद येथे स्वागत कक्ष उभारून हसन कुरेशी यांनी सर्व मंडळाचे श्रीफळ आणि पुष्पगुछ देउन स्वागत केले . यावेळी सादिक कुरेशी , अब्दुल कुरेशी , आरिफ कुरेशी , अबरार कुरेशी , अब्बास कुरेशी , राजी कुरेशी व युसूफ बागवान आदी मान्यवर उपस्थित होते . इंडियन मुस्लिम फ्रंटच्यावतीने मंडळाचे स्वागत फ्रंटचे अध्यक्ष मुन्नवर कुरेशी यांच्या हस्ते श्रीफळ आणि पुष्पगुछ देउन करण्यात आले .कर्तव्य फाउंडेशनच्यावतीने सर्व मंडळाचे विकास भांबुरे , अशोक देशमुख , निलेश कणसे , अय्युब खान यांनी स्वागत केले .
पुलगेटजवळील डेक्कन टॉवरमागील नवा कालव्यावर भीमज्योत मित्र मंडळाच्यावतीने जीव रक्षक आणि अग्निशमन कर्मचारी बांधवाना अल्पोपहार वाटप मंडळाचे अध्यक्ष नितीन आडसुळे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी विजय वैराट , पिंटू साळवी , विशाल गायकवाड , आनंद शितोळे , आदींनी विशेष परिश्रम घेतले .
विसर्जन मिरवणूक रद्द करून त्या खर्चामधून – आदर्श सामाजिक उपक्रम
लष्कर भागातील सैफी लेनमधील श्री शिवराम तरुण मंडळाने आपली विसर्जन मिरवणूक रद्द करून त्या खर्चामधून एक रुग्णास व्हील चेअर , अपंगास तीन चाकी सायकल , दोन रुग्णांना कुबड्या लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांच्याहस्ते देण्यात आल्या . अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष असिफ शेख यांनी दिली . तसेच गणेशोत्सव काळात दहा दिवस अन्नदान आणि महिलांना साड्या वाटप करण्यात आले .
पोलीस मित्र
पूना कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३० युवकांनी विसर्जन मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस मित्र म्हणून काम केले . ट्रायलक चौक , गुडलक चौक , कुरेशी मस्जिद चौक , भोपळे चौक येथे या युवकांनी पोलीस मित्र म्हणून काम केले .
भाऊ रंगारीच्या आरतीला निघालेल्या महापौरांना रोखले कोणी ….( व्हिडीओ)
पुणे-आज पहाटे जेव्हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ टिळक चौकात दाखल झाले तेव्हा या गणपतीच्या आरतीला निघालेल्या महापौर मुक्ता टिळक यांना कोणी, का, रोखले ?महापालिकेचा सत्कार न स्वीकारतच टिळक चौकातून विसर्जन घाटाच्या दिशेने कसे निघून गेले.हे जसेचे तसे दाखविणारा हा व्हिडीओ……
आतापर्यंतच्या पुणे शहराच्या विसर्जन मिरवणुकीच्या परंपरेनुसार लक्ष्मी रस्त्यावरून येणाऱ्या सर्व गणेश मंडळाचा महापालिकेच्या वतीने टिळक चौकातील स्वागत कक्षात सत्कार केला जातो. तसेच मंडळाकडून महापौर आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांना आरतीसाठी निमंत्रित केले जाते. मात्र, यंदा आज पहाटे साडेपाच वाजता टिळक चौकात आल्यानंतर पालिकेच्या स्वागत कक्षासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी रथ थांबविला, त्यांनी महापौर मुक्ता टिळक व स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना आरतीसाठी बोलाविलेही. त्यावर हे दोघेही पदाधिकारी आरतीसाठी निघाले. पण अचानक दोघेही पुन्हा बसले ,आणि मिरवणुकीचा रथ पुढे जाऊ द्या म्हणून इशारा केला ….
पुण्यातील मिरवणुकीला जल्लोषात सकाळी सुरुवात,पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन 4 वाजता..(व्हिडीओ)
पुणे- मानाच्या पाचही गणपतींच्या मिरवणुकीला जल्लोषात सकाळी सुरुवात झाली आहे. पालकमंत्री, महापौरांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरवात झाली आहे. सबसे बडा खिलाडी अशी ओळख असलेले कार्यकर्त्यांच्या आणि अनेक विद्यमान नेत्यांच्या मनी वसलेले माजी खासदार सुरेश कलमाडीही मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन चार वाजता झाले .पुण्यातील रस्त्यांवर सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या . मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची महापौर टिळक व पालकमंत्री बापट यांच्या हस्ते आरतीनंतर आज (मंगळवारी) सकाळी साडेदहा वाजता चांदीच्या पालखीतून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.
ढोल-ताशा पथकांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लक्षवेधी बँड पथक आदींनी ही मिरवणूक मंडईतून प्रस्थान करून नंतर लक्ष्मीरोड मार्गे अल्का चौकात दाखल होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मात्र प्रचंड उत्साहात मिरवणुकीचा जल्लोष पाहिला मिळतो. कसबा गणपतीच्या मिरवणुकीत प्रभात बँड, रमणबाग व कामायनी ही पथके असतील. जनजागृतीसाठी विविध पथके होती.
ढोल-ताशाच्या गजरात वाजत गाजत मोठ्या उत्साहात भक्तिभावाने नटेश्वर घाटातील हौदात चार वाजून एक मिनिटाने कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
दरम्यान शेतक-यांच्या आत्महत्या थांबाव्यात, अशी प्रार्थना आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या चरणी केली.
महात्मा फुले मंडईजवळ आज विसर्जन मिरवणुकीत पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला आज विसर्जन मिरवणुकीत शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण केला व श्रींचे दर्शन घेतले. श्री गणेशाला वंदन करून त्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या. गोऱ्हे यांच्या हस्ते आज तुळशीबाग परिसरातील गजानन मित्र मंडळाच्या गणपतीची आरती केली. या वेळच्या मिरवणुकीत पुण्यातील छोटा गणेशभक्त ऋतुराज कालेकर बाहुबलीच्या रूपात आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत सहभागी झाला. पारंपरिक वेषभूषा करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलावर्गालाही शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुभेच्छा दिल्या.
विधानपरिषदेतील व काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गो-हे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार सुरेश कलमाडी, माधुरी मिसाळ, शरद रणपिसे, उल्हास पवार, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी महापौर अंकुश काकडे, विश्वजीत कदम, सतीश देसाई, वीरेंद्र किराड आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण करण्याची भाजपची खेळी-कॉंग्रेसचा आरोप (व्हिडीओ)
पुणे- शहर कॉंग्रेस मध्ये फुट पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून होत असून , त्याचाच एक भाग म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशाने भाजपने अशोभनिय फलक लावले, असा आरोप काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी पुण्यात केला. काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण करण्यासाठी भाजपची ही खेळी आहे, असे बागवे यांनी म्हटले आहे. तर आगामी लोकसभेसाठी विश्वजित कदम यांच्या नावाला आमची पसंती असल्याने असे प्रकार होत असल्याचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले . ‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’ असे शीर्षक देऊन विश्वजित कदम यांना सांगलीला जाण्याचा सल्ला देणारे फलक पुण्यात लागले होते. या फलकबाजीच्या विरोधात काँग्रेसने सोमवारी निषेध व्यक्त केला.
आपण शहर अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निवडणुकीसाठी कदम यांच्या सहाय्याने जोरदार मोहीम राबविली आणि निवडणुकीनंतर भाजपचा मुखवटा खेचून काढणारी जोरदार अशी असंख्य आंदोलने केली . विश्वजित कदम हे अनेक आंदोलनात सहभागी झाले . त्यांच्यावर काँग्रेसपक्षाला पूर्णपणे विश्वास आहे’, असेही बागवे म्हणाले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच विश्वजित कदम आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते.
दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पुण्याच्या दौऱ्यावर असताना कदम ,बागवे त्यांच्यासमवेत होते . याच वेळी कदम यांच्याबद्दल ..तुच आहे पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार ‘ अशा शीर्षकाचे फलक लावण्यात आले होते . हे फलक भाजपच्या कारस्थानाचा भाग आहे असा आरोप करीत आज शहर कॉंग्रेस कार्यकारिणी ,नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन कदम यांच्यावर एकमुखी पाठींबा व्यक्त करण्यात आला.पहा हि पत्रकार परिषद …
सुरभी मोरे ठरली यंदाची मिस पुणे फेस्टिव्हल
पुणे – व्यक्तीमत्व, बुद्धीमत्ता, सौंदर्य, सर्वसाधारण ज्ञान आणि जीवनाबद्दलचा दृष्टीकोन अशा सर्वंच बाबींमध्ये आघाडी
घेत सुरभी मोरे हिने यंदाचा मिस पुणे फेस्टिव्हलचा बहुमान मिळवला. फाल्गुनी झेंडे हिने दुसरा तर नेहा जैन हिने
तिसरा क्रमांक मिळवला. मिस पुणे फेस्टीव्हलचे संयोजन सुप्रिया ताम्हणे यांनी केले होते. त्यांनी पुणे फेस्टिव्हलच्या
संयोजन समितीचे सदस्यांनाही ऱॅम्प वॉक करायला लावले.
मिस पुणे फेस्टीव्हल स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकाशिवाय ऐश्वर्या पानसरे हिचे हास्य सर्वाधिक मोहक ठरले. सावनी
राजपाठक हिला बेस्ट हेअर, हर्षिता अत्रे बेस्ट टॅलेंट, रेवती सनान्स मिस फोटोजनिक आणि आदिती परांजे मिस फेव्हरीट
ठरली. यंदाच्या २९ व्या पुणे फेस्टिव्हलमधील मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेची अंतिम फेरी आज गणेश कला क्रिडा
रंगमंदिरात झाली. यावेळी पुणे फेस्टीव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मुख्य संयोजनक कृष्णकांत कुदळे, डॉ. सतीश देसाई,
काका धर्मावत मोहन टिल्लू आणि संतोष उणेचा आदी उपस्थित होते. अंतिम फेरीसाठी दहा जणींची निवड करण्यात
आली. मिस पुणे फेस्टिव्हल ठरलेल्या सुरभीला मुकुट सन २०१६ मिसेस महाराष्ट्र ठरलेल्या डॉ. राधिका वाघ यांनी प्रदान
केला. सन २०१६ ची पुणे फेस्टीव्हल अपूर्वा चव्हाण हिने फाल्गुनी तर २०१६ ची रनर अप ठरलेल्या तन्वी खरोटेने मुकुट
नेहाला प्रदान केला.
अंतिम फेरीसाठी तरूणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत टाळ्या कडकडाटात ते प्रत्येकीला प्रोत्साहनही देत होते. पुणे
फेस्टिव्हल दरम्यान झालेल्या रंगारंग कार्यक्रमात गाजलेल्या नव्या गाण्यांवर जीएमआर अकादमीच्या कलाकारांनी
बहारदार नृत्ये आणि अझिझा डान्स ग्रूपच्या मुलींनी बॅले सादर केला.
यासाठी अभिनेता अभ्यंग कुवळेकर, मराठी चित्रपट निर्माता विनय गानू, चित्रपट दिग्दर्शक प्रशांत सोलापूरकर आणि सन
२०१६ची मिसेस महाराष्ट्र डॉ. राधीका वाघ यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. मिस अंतिम फेरीत एकूण चार फे-या
झाल्या. पहिल्या फेरीसाठी महाभारत व पुरातन काळातील डिझायनर लाल साडी, दुस-यासाठी गॉथिक म्हणजे काळे
डिझायनर ड्रेसेस, तिस-यासाठी वसुंधरा या संकल्पनेसाठी गो ग्रीन रंगातील कॉटन व प्युअर सिल्कचा ड्रेस आणि अंतिम
फेरीसाठी इव्हिनिंग गाऊन अशा वेषभूषेच्या संकल्पना होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभिनेता शुभंकर एकबोटे आणि
प्रसाद क्षीरसागर यांनी केले.
या स्पर्धेसाठी एकूण २५० जणींनी प्रवेशिका दिल्या होत्या. त्यातील उपांत्य फेरीसाठी २० जणींची निवड करण्यात आली
आणि त्यातून अंतिम फेरीसाठी १० जणींची निवड करण्यात आली. स्पर्धेसाठी २० मुलींचे डिझायनर ड्रेसेस अनुपम
जोशींच्या धागा बुटिकने दिलेले होते. विजेत्यांना डिवाईन लव्ह आणि एलिगन्स स्पाकडून गिफ्ट व्ह़ॉवचर देण्यात आली.
या सर्व स्पर्धकांची अंतिम फेरीपूर्वी झालेल्या ग्रूमिंग सेशनमध्ये फॅशन फोटोग्राफी, रॅम्पवॉक, प्रश्नोत्तरे अशी सर्व तयारी
प्रसिद्ध कोरिओग्राफर जुई सुहास यानी करून घेतली होती. मुलींचे मेकअप आयएसएएस या संस्थेने केले होते. मिस
फोटोजनिक रेवती सनान्सचा फ्री पोर्ट फोलिओ फोटोग्राफर किशोर वाईकर करून देणार आहेत. या स्पर्धेला प्रेक्षगांनी
मोठी गर्दी केली होती.
६०० शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीत पार पडला अर्ली चाइल्डहुड एडुफेस्ट
गणेश विसर्जनाच्या कालावधीत वीजयंत्रणेपासून सतर्क राहा
पुणे, दि. 04 : गणेश विसर्जनाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे व सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या कालावधीत वीजसेवेबाबत काही अडचणी, तक्रारी किंवा अन्य घटनांची माहिती देण्यासाठी नागरिकांनी किंवा गणेश मंडळांच्या सदस्यांनी 24 तास सुरु असणाऱ्या कॉलसेंटरच्या 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा. सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे आदी उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी वीजयंत्रणा किंवा फिडर पिलरवर चढू नये किंवा त्याचा आधार घेऊ नये. तसेच कोणत्याही वीजयंत्रणेला स्पर्श करू नये. कोणी असा प्रयत्न करीत असेल तर त्या व्यक्तीस वीजयंत्रणेपासून सुरक्षीत अंतरावर जाण्यास भाग पाडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे परिमंडलातील गणेश विसर्जनाच्या कालावधीत मोबाईल व्हॅनसह महावितरणचे अभियंता व कर्मचार्यांचे पथक उपलब्ध राहणार आहे. शहरातील महत्वाच्या लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रोड येथे तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहे व मिरवणुक संपेपर्यंत हा नियंत्रण कक्ष सुरु राहणार आहे. गणेश विसर्जनाच्या कालावधीत विद्युत सेवेबाबत काही अडचणी आल्यास किंवा अन्य घटनांची माहिती द्यावयाची असल्यास संबंधित अधिकारी किंवा महावितरणच्या टोल फ्री 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
अय्यप्पा मंदिरात केरळी ओणम सण साजरा
पुणे-रास्ता पेठमधील अय्यप्पा धर्मपरिषदच्यावतीने अय्यप्पा मंदिरात केरळी बांधवानी फुलांची रांगोळी काढून ओणम सण साजरा केला . मंदिरात दहा दिवसापासून विविध प्रकारची आकर्षक अशी फुलांची रांगोळी काढून बळीराजाचे स्वागत केले जाते . अशी माहिती विजयम नायर यांनी दिली .
केरळी बांधव घरोघरी आठ ते दहा प्रकारच्या भाज्या तयार करतात तसेच प्रसाद म्हणून गोड खीर तयार केली जाते . एकमेकांच्या घरोघरी जाऊन केळीच्या पानावर जेवणाचा आस्वाद घेतात . आणि ओणम सणाच्या शुभेच्छा देतात . केरळी बांधव आपले सर्व सण नक्षत्रावर ठरवत असतात . तर राशींवर महिने ठरवितात .
यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन पौदवाल , उपाध्यक्ष सुब्रमण्यम अय्यर , सचिव शशांक नायर , महेश पौदवाल , बी. के. प्रमोद , विजू पौदवाल , राजेश पौदवाल ,जयंती नायर , एम. पी. नायर , सुरेश नायर , सतीश नायर , सुवर्णम नायर , रघु नायर , माधवन नंबियार आदीमान्यवर व केरळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
केरळमध्ये घराघरात ओणम साजरा केला जातो. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या माध्यमातून सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली जाते.
ओनम हा दक्षिण भारतातील महत्त्वाचा उत्सव असून दसऱ्यासारखाच हा सण तिथं साजरा केला जातो. केरळमधील राजा महाबळीच्या शासनकाळापासून इथं हा उत्सव साजरा केला जातो.सर्वशक्तिमान महाबळी भगवान विष्णूचे भक्त होते. भगवान विष्णूचे आभार मानण्यासाठी त्यांनी महायज्ञ केला होता. तेव्हा वामन बनून भगवान विष्णू प्रकट झाले होते.वामन अवतारातील विष्णूनं महाबळीला तीन पाऊल ठेवण्याएवढी जागा मागितली, तेव्हा महाबलींना हसू फुटले होते.वामनाला तीन पावलं जागा दिल्यानंतर महाबळीनं पाताळात जाण्यापूर्वी त्यांच्याकडं एक वर मागितला. वर्षातून एकदा मला माझ्या प्रजेला भेटण्याची परवानगी द्यावी. त्यानुसार त्यांना दहा दिवस पृथ्वीवर राहण्याची परवानगी दिली गेली. हा काळ ‘ओणम‘ म्हणून साजरा केला जातो.
आपला दानशूर राजा भेटायला येणार म्हणून ओणम काळात त्यांचं फुलांनी स्वागत केलं जातं. सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली जाते. ओणम काळात विष्णू पूजनानंतर महिला पारंपरिक नृत्य करतात. या दहा दिवसांच्या काळात मिरवणुका काढल्या जातात, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.अशी माहिती विजयम नायर यांनी दिली .






















