पुणे-रविवार पेठ मधील अंजुमने सैफी दाऊदी बोहरा समाज व खडक पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात व गणेश विसर्जन मिरवणूकीमधील नागरिकांसाठी भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर घेण्यात आले . तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले .
खडक पोलीस ठाण्याच्या बाहेरील शिवाजी रोड येथे या वैद्यकीय शिबिराचे उदघाटन सहाय्यक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्याहस्ते करण्यात आले . या वैद्यकीय शिबिरामध्ये तीन हजार जणांची पाच दिवसात तपासणी केली. या शिबिरासाठी अंजुमने सैफी दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख मुफद्दल भाईसाहब नजमुद्दीन , कुरेश घोडनदीवाला , युसूफ लिमडीवाला ,मुर्तझा मोगरावाला , डॉ. बत्तुल टीनवाला , डॉ. अब्बास फैजी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .
या शिबिरासाठी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी , गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी विशेष सहकार्य केले .पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गणेश देखावे पाहण्यासाठी येत असतात त्यावेळी त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी या वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात येते . अशी माहिती डॉ. अब्बास फैजी यांनी दिली .