Home Blog Page 3285

‘आयआयएफएल मार्केट्स’ ने गाठला 1.2 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा, भारतीय वित्तीय अॅप मध्ये सर्वात अधिक

0
  • वित्तीय वर्ष 18 च्या शेवटी आयआयएफएल मार्केट्स अॅपचे 2 दशलक्ष डाउनलोड्सचे लक्ष
  • आयआयएफएल मार्केट्स अॅपला गुगल अॅप स्टोअरवर 4.4 चे रेटिंग, वित्तीय बाजार प्रकारात सर्वात जास्त
  • आयआयएफएल मार्केट्स अॅप चे महिन्याला 3 लाख कार्यरत वापरकर्ते आहेत आणि आयआयएफएल ब्रोकिंगच्या 30% उत्पन्नात वाटा
  • आयआयएफएल मार्केट्स अॅप आयआयएफएलच्या 40% सक्रीय ग्राहकांची काळजी घेते

 

फोर्च्युन इंडियाच्या 500 टॉप लिस्टेड ब्रोकर्स मध्ये असलेल्या आणि वित्तीय क्षेत्रात विविध प्रकारात कार्यरत असून आयआयएफएल समुहाचा भाग असलेल्या इंडिया इन्फोलाईनने आज असे प्रतिपादन केले की त्यांचे स्टॉक ट्रेडिंग अॅप आयआयएफएल मार्केट्सने 1.2 दशलक्ष डाऊनलोडचा मैलाचा दगड पार केला आहे आणि वित्तीय बाजारासंदर्भातील अॅप्समध्ये सर्वाधिक डाऊनलोड झालेले आणि वापरलेले अॅप ठरले आहे.

20,000 वापरकर्त्यांच्याकडून 4.4. चे रेटिंग सहित भारतीय वित्तीय बाजार क्षेत्रात आयआयएफएल मार्केट्स हे सर्वात जास्त रेटिंग असलेले अॅप आहे. 90% वापरकर्त्यांकडून अॅपला 4 ते 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. वित्तीय बाजार क्षेत्रातील मोबाईल अॅप मध्ये 1 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा सर्वात जलदगतीने गाठण्याचा मानही या अॅपला आहे आणि जगात कोठेही वापरण्यात आलेले हे अॅप आहे.

आयआयएफएल मार्केट्स अॅपचे 3 लाख सक्रीय वापरकर्ते आहेत जे आयआयएफएलच्या 30% ब्रोकिंग उत्पन्नात वाटा उचलतात आणि तर 40% कार्यरत वापरकर्ते यातून लाभ घेत आहेत. वित्तीय वर्ष 2017 मध्ये आयआयएफएल समुहाचे भांडवली बाजार प्रकारातील आणि तत्सम क्षेत्रातील उत्पन्न रु.622 कोटी होते. रांची, अनंतपूर, विशाखापट्टणम, लुधियाना आणि विजयवाडा अशा छोट्या शहरात अॅपच्या वापराचे केंद्रीकरण जास्त होते.

हे अॅप आयआयएफएल समूहाच्या 50 पेक्षा अधिक लोकांच्या अंतर्गत टीमने विकसित आणि व्यवस्थापित केले आहे.

“आमच्या मोबाईल अॅपद्वारा शेअर बाजारात होत असलेला जलद व्यवहार बघता आम्ही आयआयएफएल मार्केट्स अॅप 2 दशलक्ष डाउनलोडचा टप्पा वित्तीय वर्ष 2018 च्या शेवटी गाठेल अशी आमची अपेक्षा करत आहोत.” असे श्री. चैतन्य शहारे, आयआयएफएल मार्केट्स अॅपचे प्रमुख म्हणाले.

आयआयएफएल मार्केट्स हे जगातले असे एकच मार्केट अॅप आहे जे 500 पेक्षा जास्त कंपन्यांबाबतचे संशोधन मोफत उपलब्ध करते.

“अॅंड्रॉइड, विंडोज आणि आयओएस व्यासपीठासाठी आम्ही स्वतंत्र अॅप्स विकसित केली आहेत ज्यामुळे वापरकर्ता वापरत असलेल्या मोबाईल प्रणालीनुसार अॅप सर्वोत्तम कार्यरत करू शकते. जुने आणि नवीन वापरकर्त्यांना हा अनुभव आणि मोबाईल मधून ट्रेडिंग करणे आवडेल याची मला खात्री आहे.”

 

आयआयएफएल मार्केट्स मध्ये हॅंबर्गर स्टाईलचा मेनू आहे आणि स्टेट ऑफ आर्ट डॅशबोर्ड आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना हवी असलेली माहिती एका स्क्रीनवर मिळू शकते. आयआयएफएल मार्केट्स अॅप मध्ये वॉचलिस्ट, प्राईस अॅलर्ट, बाय/सेल स्टॉक्स/म्युच्युअल फंड/, मार्केट बझ, आयआयएफएल व्ह्यू, व्हिडीओज/लाईव्ह टीव्ही, आयआयएफएल आयडीयाज अशी विशेष फीचर्स आहेत.

नेटिव्ह अॅप्लिकेशन असल्याने आयआयएफएल हे इतर अॅप्लिकेशन्सच्या तुलनेत जलद आणि स्थिर आहे. आयआयएफएल मार्केट्स हे एकच अॅप आहे ज्यामध्ये विजेट फंक्शनॅलिटी, फंडामेंटल रिसर्च सुविधा आहे याद्वारे फॉलो-ऑन पब्लिक ऑफर्स साठी एक्झिक्युट ऑर्डर्सचा वापर करता येतो.

 

आयआयएफएल मार्केट्स अॅपद्वारे आमच्या ब्रोकिंग कस्टमर्सला इंस्टंट ट्रेडिंग करता येते आणि गेस्ट युजर्सना विशेष फीचर्सचाही वापर करता येतात. आयआयएफएल मार्केट्स अॅपद्वारे वापरकर्त्यांना भारतीय शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड्स बाबत सर्व आघाडीच्या एएमसीज कडून लाइव्ह अपडेट्स मिळू शकतात.

 

ग्राहक आपल्या ब्रोकरेज खात्याची माहिती बघू शकतो किंवा इन आणि आउट फीचर्सद्वारे निधी ट्रान्सफर करू शकतो. अॅपद्वारे ग्राहकांना त्यांचे होल्डिंग्ज, नेट पोझिशन आणि मार्जिन यांची डिटेल्ड ऑर्डर बुक आणि ट्रेड बुक यावर नजर ठेवता येते.

आयआयएफएल बाबत

आयआयएफएल होल्डिंग्ज लिमिटेड (NSE: IIFL, BSE: 532636) हा भारतीय वित्तीय सेवा क्षेत्रातील एक आघाडीचा घटक आहे. आयआयएफएल वित्त पुरवठा, मालमत्ता आणि धन व्यवस्थापन, कॅपिटल मार्केट्स आणि वित्तीय उत्पादने वितरण, गुंतवणूक बँकिंग, संस्थात्मक इक्वितीज आणि रियालटी सेवा आशा व्यवसायात विविध उपकंपन्याद्वारे कार्यरत आहे.

मुंबईत मुख्यालय आणि लंडन, न्यूयॉर्क, जिनेव्हा, हॉंगकॉंग, दुबई, सिंगापूर आणि मॉरीशियस येथे भारताबाहेरील कार्यालये असलेल्या आयआयएफएल होल्डिंग्ज चे 31 मार्च, 2017 रोजी एकूण नेटवर्थ रु.4,384 कोटी एवढे आहे. 1995 साली संशोधन संस्था म्हणून चालू झालेल्या आयआयएफएल हा पहिल्या पिढीचा उपक्रम आहे. आज आयआयएफएल हा वित्तीय क्षेत्रात विविध सेवा देणारा समूह असून 4.0 दशलक्ष ग्राहकांना अनेक सेवा विविध व्यवसायांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत आणि आपल्या वाढत्या ग्राहकांच्या संख्येला उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आपल्या जमेच्या बाजूंना बळकटी देत आहे.

सात हजार वीजग्राहकांना शून्य युनिटचे वीजबिल मीटर रिडींग एजंसीविरुद्ध फौजदारी तक्रार

0

पुणे : महावितरणच्या सेंट मेरी उपविभाग अंतर्गत 7709 वीजग्राहकांना ऑगस्ट महिन्याचे शून्य युनिटचे वीजबिल दिल्याप्रकरणी जी नेक्स्ट सोल्यूशन या मीटर रिडींग एजंसीविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशनमध्ये महावितरणकडून फौजदारी तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान, या वीजग्राहकांना ऑगस्टची वीजबिले सप्टेंबरच्या वीजबिलात दुरुस्त करून देण्यात येणार असून त्याचा कोणताही वेगळा आर्थिक भूर्दंड वीजग्राहकांवर पडणार नाही अशी ग्वाही महावितरणकडून देण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, रास्तापेठ विभाग अंतर्गत लुल्लानगर, नेताजीनगर, साळुंखेविहार रोड परिसरातील वीजग्राहकांच्या मीटरचे रिडींग घेण्याचे काम मेसर्स जी नेक्स्ट टेक सोल्यूशन भोसरी, पुणे या एजंसीला देण्यात आलेले आहे. परंतु ऑगस्ट 2017च्या बिलासाठी मीटर रिडींगच्या कामामध्ये या एजंसीने हेतुपुरस्सर चुका केल्याचे दिसून आले. त्यामुळे लुल्लानगर, नेताजीनगर, साळुंखेविहार रोड, समता कॉलनी, कुबेरा पार्क, सिंध हिंद कॉलनी, केदारी नगर, इथोपिया सोसायटी, गंगा सॅटॅलाईट सोसायटी, ग्रीन व्हॅली आदी परिसरातील 7709 वीजग्राहकांनी ऑगस्ट 2017 चे वीजबील शून्य युनिटचे देण्यात आले आहे. यात महावितरणचे एक कोटी 72 लाख रुपयांचा महसूल ठप्प झाला आहे व संबंधीत वीजग्राहकांना सदर चुकीच्या वीजबिलांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणने याची गंभीर दखल घेऊन मेसर्स जी नेक्स्ट टेक सोल्यूशन या मीटर रिडींग एजंसीविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

तसेच मीटर रिडींग एजंसीच्या चुकीमुळे ज्या 7709 वीजग्राहकांनी शून्य युनिट वापराचे वीजबिल देण्यात आले त्यांना माहे सप्टेंबरमध्ये योग्य वीजवापराचे वीजबिल देण्यात येणार आहे. या वीजबिलांच्या दुरुस्तीमध्ये संबंधित वीजग्राहकांवर कोणत्याही प्रकारे वेगळा आर्थिक भुर्दंड पडणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

जॅकी श्रॉफ राऊंड टेबल इंडियाचे नवे ब्रँड अॅम्बेसिडर(व्हिडीओ)

0
पुणे:  १९६२ साली स्थापना झालेली राऊंड टेबल इंडिया एक गैर-राजकीय, असांप्रदायिक आणि विना नफा तत्वावर कार्यरत गैर-सरकारी संस्था आहे. १८ ते ४० वयोगटातील तरुण व यशस्वी लोक राऊंड टेबल इंडियाचे सदस्य आहेत. समुदाय सेवा, स्वयं विकास, शिष्यवृत्ती व अंतर-राष्ट्रीय संबंध सुधरवण्याच्या उद्देशाने हे कार्य २० ते २५ सदस्यांच्या ‘टेबल्स’ द्वारे सुरू आहे. राऊंड टेबल इंडिया ही राऊंड टेबल इंटरनॅशनलची सक्रिय सदस्य आहे.
आज राऊंड टेबल इंडियाने बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ यांना त्यांच्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी नियुक्त केले आहे. राऊंड टेबल इंडिया आणि जॅकी श्रॉफ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. ह्यावेळी राऊंड टेबल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष  क्रिस अरविंथ, राऊंड टेबल इंडियाच्या एरिया १५ चे चेअरमन अविनाश अगरवाल, राऊंड टेबल इंडियाच्या पीएसआरटी-१७७ चे चेअरमन टीआर ललित पिट्टी, राऊंड टेबल इंडियाच्या एरिया १५ चे पब्लीसीटी कनविनर दर्शन काबरा व राऊंड टेबल इंडियाच्या नॅशनल सीएसआर टीमचे  विकाश अगरवाल उपस्थित होते.
अभिनेत्री किरण दूबे, आणि प्रसिद्ध उद्योजक सागर चोरडिया, चेतन तुपे, संजय काकडे, सुभाष सणस, राजेंद्र वागस्कर व पीकेसी बोस या विशेष प्रसंगी उपस्थित होते. राऊंड टेबल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष क्रिस अरविंथ यांच्या स्वागत संभाषणानाने ह्या कार्यक्रमाचा आरंभ झाला. त्यांनी  उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि राऊंड टेबल इंडियाच्या कार्यकालाची माहिती दिली.
“राऊंड टेबल इंडिया चे एरिया १५ चे चेयरमन  अविनाश अगरवाल यांनी नव्याने सुरू होनार्या उपक्रमांची माहिती दिली ते म्ङणाले कि, सप्टेंबर मध्ये पुण्यामध्ये ३ नव्या शाळांची पायाभरणी करनार आहोत. शिक्षण ही माझ्यासाठी नेहमीच एक प्रमुख बाब राहीली आहे ज्यामुळे हे कार्य माझ्यासाठी खुप आनंददायी आहे.
राऊंड टेबल इंडिया भारतामध्ये जवळपास ५० वर्षेांपासून कार्यरत असून ३०० चॅप्टर्सच्या ४ हजार सदस्यांसोबत ते ३५ शहरांमध्ये सक्रिय आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये पुण्याजवळ ते ३ नव्या शाळांचा पाया रचणार आहेत.
शिक्षणक्षेत्रात लक्षणीय बदल घडविण्यात राऊंड टेबल इंडिया आतापर्यंत यशस्वी राहिला आहे. अत्तापर्यंत त्यांनी देशभरात ५,३७७ शाळा वर्ग व २,१७२ शाळांची उभारणी केली आहे. 2003 साली सुरू केलेल्या ‘फ्रीडम थ्रू एज्यूकेशन’ ह्या राष्ट्रीय प्रकल्पाद्वारे त्यांनी वंचित मुलांना यशस्वीरीत्या शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.
अत्यंत लोकप्रिय व सुप्रसिद्ध व्यक्ती राऊंड टेबल इंडियाचे ब्रँड अॅम्बेसिडर होऊन गेले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान, एफ १ रेसर नारायण कार्तिकेयन व कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तींनी राऊंड टेबल इंडियाच्या प्रकल्पांना समर्थन देत त्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

एफसी पुणे सिटी संघात ब्राझिलियान स्ट्रायकर डिएगो कार्लोस याचा समावेश

0

पुणे: राजेश वाधवान समूह  यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीगमधील टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने डिएगो कार्लोस याला करारबद्ध करण्यात आले असून त्याच्या समावेशमुळे संघाची ताकद आणखी वाढली आहे. 29वर्षीय डिएगो एफसी पुणे सिटीकडून इंडियन सुपर लीग स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत आहे.

एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि,  डिएगोकडे आक्रमकतेने ताबा मिळविण्याचा हातखंडा आहे. एक आक्रमक मध्यरक्षकशिवाय चेंडूवर उत्तम ताबा मिळविण्याचे कौशल्य त्याच्याकडे असल्यामुळे त्याचा समावेश आमच्या संघासाठी जमेची बाजू ठरणार आहे. मार्सिलीन्हो, जोनातन लुक्का यांच्यासह आणखी एका ब्राझिलीयनचा समावेश संघात झाला आहे.


डिएगो याने आपल्या युवा कारकिर्दीची सुरुवात फ्लामिंगो संघाकडून केली. त्यानंतर तो ब्राझिलियाच्या डुक्यू डी कॅक्सिस व कोरींथियंस अलागोनो या क्लबमध्ये सहभागी झाला. 2011 मध्ये रशिया येथील रशियन राष्ट्रीय लीग स्पर्धेमध्ये निझनी नोवगोरोड संघाकडून खेळताना त्याने 31 सामन्यांमध्ये 10गोल केले. त्यानंतर 2012मध्ये एफसी उफाच्या एफसी लुच एनर्जीया वाल्दीवोस्टोककडून खेळतानाया त्याने 8गोल करून संघाला रशियन प्रिमियर लीगच्या अव्वल श्रेणी विभागात प्रवेश मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली.

यावेळी डिएगो कार्लोस म्हणाला कि, माझ्या फुटबॉल कारकिर्दीतील हे एक नवीन सुरुवात आहे. या लीग स्पर्धेबरोबरच एफसी पुणे सिटी संघाविषयी चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. माझ्या देशातील सहकारी मार्सिलीन्हो, जोनातन लुक्का यांच्यासह संघाकडून खेळण्यास मी उत्सुक आहे आणि चाहत्यांना विजय साजरे करण्यासाठी मी क्लबकडून खेळताना 100 टक्के योगदान देईन, अशी खात्री देतो

देशाच्या प्रगतीसाठी सार्वजनिक वाहतूक आवश्यक – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

0

सीआयआरटीच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न

 

पुणे: देशाच्या प्रगतीसाठी सार्वजनिक वाहतूक अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी सार्वजनिक वाहतूकीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

भोसरी येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट या केंद्रीय संशोधन संस्थेच्या 50 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेफ ॲण्ड सस्टेनेबल  पब्लिक ट्रान्सपोर्ट या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदे दरम्यान ते बोलत होते. यावेळी खा. अमर साबळे, खा. अनिल शिरोळे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे प्रादेशिक परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे, केंद्रीय वाहतूक परिवहन केंद्र भोसरी संचालक कॅप्टन राजेंद्र सणेर पाटील, आंध्रप्रदेश राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम.मलाकोंडया, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय संयुक्त सचिव अभय दामले उपस्थित होते.

श्री गडकरी म्हणाले, सार्वजनिक वाहतूक देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवशक आहे. काळानुरुप वाहतूक व्यवस्थेत योग्य तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना चांगली सेवा देणे गरजेचे आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी नव्याने देशातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात येणार आहे, ही समिती रस्ते सुरक्षित कसे करावेत, अपघात कसे टाळावेत, धोकादायक ठिकाणांबद्दलची माहिती, सूचना व हरकती राज्य शासनासह केंद्राला पाठवणार आहे. यामुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी देशात अनेक ठिकाणी ॲक्सेस कंट्रोल हायवे बनवणे, मुंबई व पुण्यात मिथेनॉल निर्मितीचे पायलट प्रोजेक्ट बनवणे, जास्तीत जास्त इलेक्ट्रिक, राज्य वाहतूक व्यवस्थे अंतरगत असलेल्या बस स्टॉपची उत्तमरित्या सुधारणा, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महामार्गावरील टोलनाक्यांवर न थांबता टोल भरणे, विद्युत दुचाकीची संकल्पनेची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रभावी खर्च, प्रदूषण मुक्त गाड्या वापरण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमा दरम्यान आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचे तंत्रज्ञान व्यवस्थापन व सीआयआरटीने पेटंट केलेल्या वाहतूक विभागासाठी आरएफआईडी आणि व्हिडिओ विश्लेषणचा उपयोग करून ड्रायव्हिंग कौशल्याचे प्रमाणपत्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी, सेंट्रल इन्सटिट्यूट ऑफ रोड ट्रास्पोर्टचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निरजा आपटे यांनी तर आशिष मिश्रा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळातही तरबेज व्हावे – बापट

0

पुणे ता.:- आजच्या धावत्या जगात विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळातही तरबेज व्हायला हवे. खेळांमुळे आयुष्यात सकारात्मक बदल होतात ज्यामुळे चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते. संघटितपणे काम करण्याची सवय लागते. तसेच परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमताही खेळाच्या माध्यमातून वाढते.  असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

शिक्षक दिनानिमित्त कसबा मतदारसंघातील नूमवी प्रशाला,सेंट हिल्डाज हायस्कूल, गोमतीबेन रघुनाथ बारोट स्कूल या ठिकाणी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.शिवाय कसबा मतदार संघाच्या निधीतून नूतन मराठी प्रशालेला संगणक आणि कबड्डी मॅट देण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. कसबा मतदारसंघातील ९० शाळांमधील ३८०० शिक्षकांना यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ताताई टिळक, अजय खेडेकर,अशोक येनपुरे,हेमंत रासने ,संजय देशमुख,निलेश कदम,प्रमोद कोंडरे,सुलोचना कोंडरे,आरती कोंडरे,सम्राट थोरात ,राजू परदेशी, गायत्री खडके तसेच इतर नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारीही उपस्थित होते.

त्यामुळेच विद्यार्थ्यांसाठी केली जाणारी कामे मदत म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून केली जातात आणि भविष्यातही केली जातील. जीवनामध्ये कधी कोणाला काय दिले यापेक्षा अजून कोणाला काय देता येईल यासाठी प्रयत्न केले.  अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कसबा मतदार संघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे यांनी केले.

अश्विनी भावेच्या ग्लॅमरस फोटोची चर्चा

0

नुकतंच अश्विनी भावेने एक फोटोशूट केलं आणि त्यातला एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर
केला आहे. तिच्या या फोटोला प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद देखील मिळत आहे. फोटोमध्ये
ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. असे सौंदर्य जे आजच्या तरुण अभिनेत्रींना हि
लाजवेल. तिने परधान केलेला लाल कलरचा गाऊन हा तिच्या सौंदर्यामुळे अजूनच खुलून येत
आहे. तिच्या या ग्लॅमरस फोटो टाकण्यामागे काय कारण हे अजून कोणालाच माहित नाही पण
तिचा असा फोटो पाहून सर्वच तरुण अभिनेत्रींच्या भुवया उंचावल्या आहेत हे नक्कीच. तिच्या
वयाला लाजवणारे असे अद्वितीय सौंदर्य फोटोला अजूनच सुंदर बनवत आहे. या फोटोला पाहून
अनेक तर्क येत आहेत ते म्हणजे अश्विनीचा नवीन चित्रपट येत आहे का?? कि ती काही नवीन
उपक्रम करणार आहे?? काहीच कळायला मार्ग नाहीये आणि म्हणूनच सर्वच तिच्या पुढच्या
वाटचालीकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्यावरचा पडदा अश्विनीच हटवू शकते म्हणूच आता
आपल्याकडे त्याची वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नाही.

‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

0

प्रेम या एका शब्दातच संपूर्ण जग सामावून गेलेलं आहे. मराठी रुपेरी पडद्यावर आलेल्या अनेक प्रेमकथांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेमकथेवर आधारित काय झालं कळंना हा नवाकोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर अनावरण नुकतेच कलाकार तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत अंधेरीच्या राजाच्या चरणी  दिमाखात संपन्न झाले. यावेळी कलाकारांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

प्रेमाच्या पलीकडे जात एक ठोस विचार या चित्रपटातून मांडण्यात आला आहे जो प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास निर्माते पंकज गुप्ता यांनी याप्रसंगी व्यक्त केला. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन प्रा.लि प्रस्तुत व पंकज गुप्ता निर्मित काय झालं कळंना आपल्या मातीतली प्रेमकथा असून प्रेमाद्वारे सामाजिक संदेश मांडणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत असून या दोघांसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रीकांत कांबळे यांच्या भूमिका आहेत.

काय झालं कळंना चित्रपटाची कथा सुचिता शब्बीर यांची असून पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे यांचे आहेत. चित्रपटाची गीते माधुरी अशिरघडे, वलय मुलगुंद यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, उर्मिला धनगर, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे हे गायक यातील गीते स्वरबद्ध करणार आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. काय झालं कळंना चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.

समाजकल्याण आयुक्तलयासमोर पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन..

0

पुणे –
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीवर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीच डल्ला मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राजकुमार बडोले यांची कन्या श्रुती राजकुमार बडोले यांना परदेशात पीएडीचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. याबरोबरच काही अधिकाऱ्यांनी देखील आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा या शिष्यवृत्तीचा फायदा मिळवून दिला आहे .
अशा अधिकाऱ्यांचे ताबडतोब निलंबन करावे व मंत्री राजकुमार बडोले यांचा राजीनामा घ्यावा ह्या मागणीकरीता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज पुण्यात आंदोलन करण्यात आले व अतिरीक्त आयुक्त सदानंद पाटील यांना निवेदन देण्यात आले
यावेळेस शहराध्यक्ष राकेश कामठे, नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, कुणाल वेडे पाटील मनोज पाचपुते किशोर कांबळे विक्रम निकम शैलेश राजगुरु फहिम शेख शरद दाभाडे मोरेश्वर चांधारे निखिल बटवाल विक्रम जाधव आदि उपस्थित होते.

दंत चिकित्सा व तोंडाचा कॅन्सरचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0

पुणे-

डी डेन्ट केअर या संस्थेच्यावतीने दंत चिकित्सा व तोंडाचा कॅन्सरचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले . या शिबिरामध्ये ७००  जणांनी आपली वैद्यकीय तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला . भवानी पेठमधील दिनशा अपार्टमेंटमधील संस्थेच्या आवारात हे आरोग्य शिबीर संपन्न झाले . या शिबिराचे उदघाटन प्रसिध्द दंत चिकित्सक डॉ. दत्तात्रय दरवडे यांच्याहस्ते करण्यात आले .

या शिबिरात किडलेल्या दातांची तपासणी , दातांच्या संबधित हाडांची तपासणी , तोंडातील दुर्गंधीच्या कारणांची तपासणी , दंतरोपणाविषयी मार्गदर्शन , पडलेल्या दांताविषयी मार्गदर्शन व तबाखुजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या तोंडाच्या कॅन्सरची तपासणी करण्यात आली . या कॅन्सरमध्ये मिसरी , गुटखा , मावा व सिगारेट यापासून कॅन्सर रुग्ण आढळले .

या आरोग्य  शिबीरासाठी प्रसिध्द दंत रोग तज्ञ डॉ. आशिष दरवडे , डॉ . प्रज्ञा दरवडे , डॉ. शमा दरवडे , डॉ. रौनक ओसवाल व डॉ. प्रतिक राऊत या वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले 

एम.सी.ई सोसायटीच्या इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयात ​​ राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

0
पुणे :
एम.सी.ई  सोसायटीच्या इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालय’ आणि ‘महाराष्ट्र

​​

उद्योजक

​ता

विकास केंद्र’ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा आझम कॅम्पस येथे पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून

​५०​

हून अधिक प्राध्यापक कार्यशाळेत सहभागी झाले होते.

प्राध्यापकांसाठी आयोजित या कार्यशाळेचा ‘प्रभावी शिक्षणतंत्र आणि उद्योजक प्रेरणा’ हा विषय होता. या राज्यस्तरीय कार्यशाळेला ‘इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन’, पुणे शाखा यांनी सहकार्य केले होतेे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणमंडऴ प्रादेशिक

​ ​

कार्यालय पुणे चे सचिव डॉ. एम. आर. चितलांगे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले,‘आधुनिक ज्ञान देण्यासाठी इन्स्टिटयुट ऑफफार्मसी डिप्लोमा महाविद्यालयाचा नेहमी पुढाकार असतो.’

या कार्यशाळेत सुरेश उमप (प्रादेशिक

​ ​

अधिकारी़, महाराष्ट्र

उद्योजक

​ता

विकास केंद्र), सचिन इटकर (‘इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन’ चे अध्यक्ष), डॉ.ए.पी.पवार (इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन चे माजी अध्यक्ष), डॉ. एम. जे. पाटिल (

​’​

इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन’ चे सहसचिव) वाय. एच. देवकर (‘महाराष्ट्र

​ ​

उद्योजक

​ता

विकास केंद्र

​’​

चे सचिव), विजय कोल्हे (महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणमंडऴ प्रादेशिक

​ ​

कार्यालय चे सहाय्यक सचिव), डॉ. एम.जे. पाटिल, लतिफ मगदूम (एम.सी.ई सोसायटीचे सचिव़), सहसचिव प्रा. इरफान शेख आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एन.जगताप आदी मान्यवर सहभागी झाले होते.

प्राध्यापकांनी शिक्षणाच्या नविन पद्धती आत्मसाद कराव्यात असे आवाहन या कार्यशाळे

​ ​

दरम्यान करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एन.जगताप यांनी स्वागत केले. सबा शेख यांनी सुत्रसंचालन केले.

अनसिस व कमिन्सतर्फे शैक्षणिक संशोधन व नाविन्यतेला चालना

0

या कंपन्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमेन येथे सेंटर ऑफ रिसर्च एण्ड इन्टेलेक्च्युअल

आंत्रप्रेन्युअरशीप उभारणार

पुणे: अनसिस (ANSYS) व कमिन्स इंडिया फाऊंडेशनतर्फे उद्योग-केंद्रित कौशल्य व
संसाधनांना प्रोत्साहन देण्याकरिता सेंटर ऑफ रिसर्च एण्ड इन्टेलेक्च्युअल आंत्रप्रेन्युअरशीप
(सीईआरआयई)च्या माध्यमातून महिला-केंद्रित इंजिनीअरिंग संशोधन व सिम्युलेशनला चालना दिली जात
आहे. सीईआरआयईला कमिन्स व अनसिसचे अर्थसहाय्य लाभले आहे. भारतातील पुण्यामधील कमिन्स कॉलेज
ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमेन (सीसीईडब्‍ल्‍यू) येथील सीईआरआयई ही महिला इंजिनीअर्ससाठी संशोधन व
नाविन्यतेला चालना देणार्‍या भारतातील काही सुविधांपैकी एक आहे.
‘इन्टेलेक्च्युअल आंत्रप्रेन्युअरशीप’ हे शिक्षणाचे तत्त्व व दृष्टिकोन असून ते शैक्षणिक संस्थांकडे ‘नवप्रवर्तक’ व
‘बदलाचे स्रोत’ म्हणून पाहते. सीसीईडब्ल्यूमधील विद्यार्थी आणि शिक्षकवृंदामध्ये संशोधन व नाविन्यतेची
संस्कृती जोपासली जावी, हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे. तसेच, महिला इंजिनीअर्सच्या विकासावर भर देण्यासह या
प्रांतामध्ये इंजिनीअरिंग संशोधन व सिम्युलेशनला चालना देण्यासाठी एक लक्षणीय उत्प्रेरक म्हणून कार्य
करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. शिक्षकांच्या कौशल्यांमध्ये वाढ आणि या क्षेत्रात आवश्यक असणार्‍या तांत्रिक
कौशल्यांचा विकास करत वैविध्यपूर्ण तंत्रज्ञानांच्या जलद विकासाकरिता संबंधित उद्योग व जागतिक योगदान
प्राप्त करणे, अशा कार्यांचा यात समावेश आहे.
‘‘सीईआरआयई उद्योग-शैक्षणिक संस्थांच्या सहयोगाला चालना देण्यासोबतच भारतातील कौशल्य विकास व
प्रतिभांना भेडसावणार्‍या आव्हानांवर लक्ष देईल,’’ असे अनसिसच्या साऊथ एशिया पॅसिफिक व मिडल इस्टचे
कंट्री मॅनेजर, रफिक सोमानी म्हणाले. ‘‘उद्योगकेंद्रीत संसाधनांसह उच्च कौशल्ये असलेल्या महिला
इंजिनीअर्सच्या गटाला सज्ज करण्यात अनसिसला अभिमान वाटतो. आम्ही सीईआरआयई विद्यार्थ्यांकडून
सिम्युलेशनमधील प्रगती आणि नाविन्यता पाहण्यास उत्सुक आहोत.’’
‘‘कामकाजाच्या ठिकाणी महिलांचे सक्षमीकरण करण्यात कमिन्स नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. आमच्या
महिला कर्मचार्‍यांनी संशोधन व तंत्रज्ञानामध्ये उत्तम योगदान दिलेले आम्ही पाहिले आहे. म्हणून, आम्हाला
अनसिससोबत सहयोग जोडताना आनंद होत आहे. आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक
संधी निर्माण करण्यास उत्सुक आहोत. यामुळे उच्च-कौशल्यपूर्ण महिला इंजिनीअर्सचा प्रतिभावान समूह व
उद्योग-केंद्रित संसाधनांची निर्मिती होईल,’’ असे कमिन्स इंडिया एबीओ येथील कार्यकारी संचालक आणि
इंजिनीअरिंग एण्ड चीफ टेक्निकल ऑफिसर, मार्क फिर्थ म्हणाले.

‘‘सीईआरआयई पदवीपूर्व व पदव्युत्तर पातळ्यांवरील संशोधनाला चालना देईल आणि दर्जेदार शिक्षण देणारी व
महिला इंजिनीअर्सची निर्मिती करणारी जागतिक दर्जाची संस्था हा आमच्या कॉलेजचा दृष्टिकोन संपादित
करण्यामध्ये आम्हाला सहाय्य करेल. आम्ही सीईआरआयई उभारण्याकरिता कमिन्स इंडिया फाऊंडेशन व
अनसिसचे आभार मानतो,’’ असे पुणे येथील सीसीइडब्‍ल्‍यूच्या संचालिका डॉ. माधुरी खाम्बेते म्हणाल्या.

‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्सची दुसरी शाखा पुण्यात सुरु

0

पुणे : ‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्सची पुण्यातील दुसरी शाखा 25th August पासून सुरु झाली असून हे नवे रेस्टॉरंट सेनापती बापट रस्त्यावरील द पॅव्हेलियनमध्ये दुसऱ्या मजल्यावर कार्यान्वित झाले आहे. ‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्सचा जगभरातील ६० देशांत विस्तार आहे. प्रत्येक दिवस हा शुक्रवारप्रमाणे विरंगुळ्याचा दिवस मानून आपल्या रेस्टॉरंटमध्ये आवडीचे अमेरिकन खाद्यपदार्थ देण्याच्या ‘टीजीआय फ्रायडेज’च्या प्रसिद्ध परंपरेचा पुणे शहर भाग बनले आहे.

नवे रेस्टॉरंट ‘टीजीआय फ्रायडेज’ या ब्रँडचे पुण्यातील दुसरे, तर भारतातील चौदावे रेस्टॉरंट आहे. कॅज्युअल डायनिंगचा सुखावह अनुभव देणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये डायनिंग व बार विभागात एकाचवेळी १४० हून अधिक ग्राहकांना सामावून घेण्याची क्षमता असून त्यांना सस्मित सेवा देण्यासाठी ५० हून अधिक कर्मचारी सज्ज आहेत. रोज दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत हे रेस्टॉरंट कार्यरत असेल आणि लंच, डिनर व बार सेवा दररोज उपलब्ध असतील.

‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्समध्ये अस्सल अमेरिकन खाद्यपदार्थ आणि उत्कृष्ट पेये चैतन्यमय वातावरणात दिली जातात. शुक्रवार हा प्रत्येक आठवड्यातील अखेरचा दिवस असल्याने त्या दिवशी ग्राहकांचा मूड उल्हसित असतो. ‘टीजीआय फ्रायडेज’मध्ये मात्र आपल्या ग्राहकांना प्रत्येक दिवस शुक्रवारइतकाच उल्हसित वाटेल, याची काळजी घेतली जाते. जगभरात ६० हून अधिक देशांत कार्यरत असलेली ‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्स तेथील जाणकार आणि प्रसिद्ध बारटेंडरसाठीही प्रसिद्ध आहेत. ग्राहकांना अपेक्षेपलिकडे सेवा आणि समाधानकारक अनुभव देण्याच्या निरंतर प्रयत्नांमुळे ही रेस्टॉरंट्स वाढदिवस, ऑफिस गेट-टुगेदर, टीम लाँच आणि अन्य विशेष प्रसंगांसाठी अगदी आदर्श ठिकाणे ठरली आहेत.

यासंदर्भात ‘टीजीआय फ्रायडेज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन जेटली म्हणाले, “भारतातील ‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्सना आपल्या ग्राहकांना हमखास आवडतील असे हाताने बनवलेले ताजे खाद्यपदार्थ व पेये देण्याचा, तसेच आमच्या अमेरिकन बार व ग्रिल परंपरेतून प्रेरणा घेऊन अभिनव खाद्यपदार्थ पुरवण्याचा इतिहास आहे. गेली काही वर्षे आम्ही स्थळ-सुयोग्य आणि ग्राहकांना देवाण-घेवाण करता येतील असे सामाजिक खाद्यपदार्थ विकसित करण्यावर अधिक भर देत आहोत. आमच्या येथील खाद्यपदार्थ हाताने बनवले जातात आणि त्यातून या ब्रँडची अनोखी परंपरा व दर्जाप्रती बांधीलकी दृग्गोचर होते.”

खाद्यपदार्थ आणि पेयांमधील अभिनवतेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘टीजीआय फ्रायडेज’ने नव्या खाद्यपदार्थांची विशाल श्रेणी उपलब्ध करुन दिली आहे. ॲपेटायझर्स, सॅलड्स, सँडविच, पास्ता व एंट्रीज अशा विविध प्रकारांत अमेरिकन खाद्यपदार्थांच्या कलेतील काही उत्कृष्ट पाककृतींचा आनंद लोकांना येथे मिळणार आहे.

यामध्ये मेल्टेड चीजयुक्त कुरकुरीत टोस्टाडा चिकन नाचोज, थाई रेड स्पायसेसमध्ये मुरवलेले फायर ग्रिल्ड श्रिंप अँड चिकन स्क्यूअर्स, चिकन विंग्जचे सहा अनोखे जागतिक प्रकार, मोझरेल्ला चीजचे टॉपिंग्ज असलेले टोस्टेड फ्रेंच ओनियन बाइट्स आदी ॲपिटायझर्सचा समावेश आहे. मुख्य भोजनाआधी रसना उद्दिपित करण्यासाठी हे पदार्थ अगदी आदर्श ठरतात.

मेन कोर्समध्ये चिकन व मत्स्यप्रेमींसाठी मेजवानी ठरतील अशा डिश आहेत. त्यात क्रॅब अँड पर्मेसान क्रस्टेड फिश, परिपूर्ण भाजलेले आणि वर चरचरीत मस्टर्ड सॉस लावलेले लॅटिन स्पाईस्ड हाफ चिकन, रेड हॉट क्रॅब क्रस्टेड चिकन यांचा समावेश आहे. इटालियन पदार्थांची आवड असणाऱ्या व विशेषतः शाकाहारींसाठी हर्ब बटर, ताजी ब्रोकोली, रेड कॅबेज, मश्रुम्स, स्पिनाच, चेरी, बॅसिल व पर्मेसान चीजचे टॉपिंग्ज असलेला ब्रोकोली एपिनार्ड पास्ता आहे. त्याखेरीज पिमेंटो टोमॅटो, चीज सॉस, गोट चीज, पर्मेसान चीज व ताजी पार्स्ले यांचे टॉपिंग्ज असलेला क्लासिक चिकन मीटबॉल पास्ताही आहे. गोचुजांग सॉस, पिकल्ड ओनियन्स, चेडार चीज, सिलँत्रो व रोस्टेड जलापिनोजचे टॉपिंग्ज असलेले रसाळ लाव्हा चिकन सँडविच नावाप्रमाणेच झणझणीत चवीचे आहे. सॅलडमध्ये अनेक आरोग्यदायी आणि चविष्ट प्रकार आहेत. त्यात दोन नवे सीजर सॅलडही सादर करण्यात आले आहेत. एक कॅजन स्पाईस्ड साऊथ वेस्ट श्रिंपसह असून सोबत चीज नाचोज मिळतात, तर दुसरे सॅलड साऊथवेस्ट ग्रिल्ड चिकनसह येते.

 

भारतात ‘टीजीआय फ्रायडेज’चे पहिले रेस्टॉरंट २० वर्षांपूर्वी दिल्लीत सुरु झाले. ‘टीजीआय फ्रायडेज’ हा अमेरिकन कॅज्युअल डायनिंगमधील प्रमुख ब्रँडपैकी मानला जातो. त्यांच्या मेनूमध्ये प्रसिद्ध आणि ट्रेड-सेटर पदार्थांचा समावेश झाला आहे. लोडेड पोटॅटो स्किन्स, एन्ट्री सॅलड्स, पास्ता डिशेस, बर्गर्स व सँडविचेस आणि जॅक डॅनियल्स चिकन, साल्मन आणि खासियत असलेले इम्पोर्टेड पोर्क रिब्ज हे त्यापैकी काही उल्लेखनीय.

समाजासाठी काम करताना संवेदनशील रहा गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांचे प्रतिपादन; एमपीजीच्या 12 व्या तुकडीचा पदवीदान समारंभ

0
पुणे : “जो समाजाला संपूर्णरित्या समजून घेतो तोच खरा नेता असतो. त्यामूळे समाजात काम करताना संवेदना जपणे गरजेचे असते. आपण शरिराच्या अवयवांसाठी आभूषणे वापरतो मात्र मनाच्या आभुषणाचे काय! त्यासाठीचे सगळ्यात महत्वाचे आभूषण म्हणजे संवेदना आहेत.” असे उद्गार गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी काढले. 
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या एमपीजी प्रोग्रामच्या 12 व्या तुकडीचा पदवीदान समारंभ सोहळा एमआयटीच्या विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.  
यावेळी राज्यसभेचे खासदार डॉ. नरेंद्र जाधव, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या श्रीमती विद्या चव्हाण, महाराष्ट्र काँग्रसचे प्रवक्ते श्री. राजू वाघमारे, माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त श्री. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्युपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी एसओजीच्या सहयोगी संचालिका प्रा. डॉ. शैलश्री हरिदास, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी डब्लूपीयू चे कुलसचिव (ग्रुप कॅप्टन) डी.पी. आपटे हे उपस्थित होते. 
मृदुला सिन्हा म्हणाल्या, “ राजकारणात येणार्‍या प्रत्येक युवकाला एक नवा समाज अभिप्रेत असतो. मात्र वरिष्ठांकडून जो समाज त्यांच्या समोर ठेवला जातो त्याचे अनुकरण सावधपणे करावे. या क्षेत्रात काम करताना अनेक अडथळे समोर येतात. त्यांचा अत्यंत खंबीरपणे सामना करावा लागतो. सोबतच या क्षेत्रात काम करावयाचे असेल तर पाय जमिनीवर, डोळे आकाशाकडे आणि मनात केवळ समाजाचा विचार ठेवूनच काम करणे अपेक्षित असते. एमआयटीएसओजी सारख्या संस्थेमधून पैसा कमविणारे लोक नाही तर चांगला नागरिक व मनुष्य बाहेर पडतील असा विश्‍वास आहे. ”     
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “ आज संपूर्ण जग भारताकडे अत्यंत आशेने पाहत आहे. कारण भारतीय संस्कृत्तीमध्येच शारिरीक तंदुरुस्ती, मानसिक दक्षता आणि भावनिक पातळीवर भक्कम राहण्याचे गुण आहेत. याच गुणांच्या आधारे आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. ”
           डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “  कोणत्याही क्षेत्रात काम करतांना आपले ध्येय उच्च स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी आपली सकारात्मक मनोवृत्ती अत्यंत आवश्यक असते. सोबतच यशासाठी कोणताही शॉर्ट कट नसतो, त्यामूळे वेळेचे योग्य नियोजन करून आपल्या यशाचा आलेख चढता ठेवावा. ”                
श्री. राजू वाघमारे म्हणाले, “ आजही आपल्या देशात राजकारण म्हणजे पैसा, सत्ता आणि बळाचा वापर असे समीकरण आहे. पण जर तुमचे विचार प्रबळ असतील तर राजकारणासारख्या क्षेत्रातही तुम्ही अत्यंत वेगाने पुढे जाल. एमआयटीएसओजी सारखी संस्था म्हणजे  नवयुवकांना या क्षेेत्रात येण्याचा राजमार्ग आहे. येथून बाहेर पडणारे विद्यार्थी हे उत्कृष्टच असतील आणि अशा लोकांनीच जगावर राज्य केले आहे. ”
विद्या चव्हाण म्हणाल्या, “ आज राजकारण ज्या पातळीवर घसरले आहे ते सुधारण्यासाठी नवयुवकांनी राजकारणात सक्रीय होणे गरजेचे आहे. त्यासाठी एसओजी ही संस्था अत्यंत उपयुक्त आहे. पूर्वीच्या काळात महात्मा गांधीपासून अनेक लोकांनी राजकारणात प्रवेश केला मात्र त्यांच्यासमोर एक ध्येय होते. तसेच ध्येय स्वत: समोर ठेवून विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे. ”  
प्रा. राहुल वि. कराड म्हणाले, “ भारताच्या राजकारणास आणखीन मोठ्या पातळीवर सक्रीय करण्यासाठी गेल्या 12 वर्षांपासून हा कोर्स सुरु केला आहे. आज देशाला अत्यंत चांगले, संवेदनशील आणि भावनाशील नेत्यांची गरज आहे. हाच विचार या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटला पायाभूत ठरला. गेल्या 12 वर्षांपसून त्याच स्वरुपाचे संस्कारी वातावरण या ठिकाणी तयार झाले आहे. ”  
यावेळी मान्यवरांच्या हस्ते 12व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ संपन्न झाला. या बॅचमध्ये उत्तम कमगिरी करीत सुवर्ण पदक मिळविणार्‍या श्रीनिवास शेरे, लाविश जैन, गौरव क़ळमकर व चंद्र हर्ष यांचा विशेष सत्कार केला गेला. यावेळी दिक्षा महाले व नझीम शेख या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
प्रा. डॉ. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. सूत्रसंचालन महेश केळकर यांनी केले. (ग्रुप कॅप्टन) डी.पी. आपटे यांनी आभार मानले. 

महावितरणच्या मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण

0

मुंबई : महावितरण महानिर्मिती कंपनीचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड इमारतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. अरविंद सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने प्रकाशगड इमारतीतील तळमजल्यावरील दर्शनी भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार तैलचित्राचे अनावरण श्री. अरविंद सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी, महापारेषणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव कुमार मित्तल तसेच महावितरणच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. ओमप्रकाश बकोरिया महावितरण आणि महानिर्मितीचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटोओळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करताना श्री. अरविंद सिंह. सोबत तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक सर्वश्री संजीव कुमार, बिपीन श्रीमाळी, राजीव कुमार मित्तल तसेच महावितरणच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. ओमप्रकाश बकोरिया.