पुणे : ‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्सची पुण्यातील दुसरी शाखा 25th August पासून सुरु झाली असून हे नवे रेस्टॉरंट सेनापती बापट रस्त्यावरील द पॅव्हेलियनमध्ये दुसऱ्या मजल्यावर कार्यान्वित झाले आहे. ‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्सचा जगभरातील ६० देशांत विस्तार आहे. प्रत्येक दिवस हा शुक्रवारप्रमाणे विरंगुळ्याचा दिवस मानून आपल्या रेस्टॉरंटमध्ये आवडीचे अमेरिकन खाद्यपदार्थ देण्याच्या ‘टीजीआय फ्रायडेज’च्या प्रसिद्ध परंपरेचा पुणे शहर भाग बनले आहे.
नवे रेस्टॉरंट ‘टीजीआय फ्रायडेज’ या ब्रँडचे पुण्यातील दुसरे, तर भारतातील चौदावे रेस्टॉरंट आहे. कॅज्युअल डायनिंगचा सुखावह अनुभव देणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये डायनिंग व बार विभागात एकाचवेळी १४० हून अधिक ग्राहकांना सामावून घेण्याची क्षमता असून त्यांना सस्मित सेवा देण्यासाठी ५० हून अधिक कर्मचारी सज्ज आहेत. रोज दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत हे रेस्टॉरंट कार्यरत असेल आणि लंच, डिनर व बार सेवा दररोज उपलब्ध असतील.
‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्समध्ये अस्सल अमेरिकन खाद्यपदार्थ आणि उत्कृष्ट पेये चैतन्यमय वातावरणात दिली जातात. शुक्रवार हा प्रत्येक आठवड्यातील अखेरचा दिवस असल्याने त्या दिवशी ग्राहकांचा मूड उल्हसित असतो. ‘टीजीआय फ्रायडेज’मध्ये मात्र आपल्या ग्राहकांना प्रत्येक दिवस शुक्रवारइतकाच उल्हसित वाटेल, याची काळजी घेतली जाते. जगभरात ६० हून अधिक देशांत कार्यरत असलेली ‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्स तेथील जाणकार आणि प्रसिद्ध बारटेंडरसाठीही प्रसिद्ध आहेत. ग्राहकांना अपेक्षेपलिकडे सेवा आणि समाधानकारक अनुभव देण्याच्या निरंतर प्रयत्नांमुळे ही रेस्टॉरंट्स वाढदिवस, ऑफिस गेट-टुगेदर, टीम लाँच आणि अन्य विशेष प्रसंगांसाठी अगदी आदर्श ठिकाणे ठरली आहेत.
यासंदर्भात ‘टीजीआय फ्रायडेज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन जेटली म्हणाले, “भारतातील ‘टीजीआय फ्रायडेज’ रेस्टॉरंट्सना आपल्या ग्राहकांना हमखास आवडतील असे हाताने बनवलेले ताजे खाद्यपदार्थ व पेये देण्याचा, तसेच आमच्या अमेरिकन बार व ग्रिल परंपरेतून प्रेरणा घेऊन अभिनव खाद्यपदार्थ पुरवण्याचा इतिहास आहे. गेली काही वर्षे आम्ही स्थळ-सुयोग्य आणि ग्राहकांना देवाण-घेवाण करता येतील असे सामाजिक खाद्यपदार्थ विकसित करण्यावर अधिक भर देत आहोत. आमच्या येथील खाद्यपदार्थ हाताने बनवले जातात आणि त्यातून या ब्रँडची अनोखी परंपरा व दर्जाप्रती बांधीलकी दृग्गोचर होते.”
खाद्यपदार्थ आणि पेयांमधील अभिनवतेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘टीजीआय फ्रायडेज’ने नव्या खाद्यपदार्थांची विशाल श्रेणी उपलब्ध करुन दिली आहे. ॲपेटायझर्स, सॅलड्स, सँडविच, पास्ता व एंट्रीज अशा विविध प्रकारांत अमेरिकन खाद्यपदार्थांच्या कलेतील काही उत्कृष्ट पाककृतींचा आनंद लोकांना येथे मिळणार आहे.
यामध्ये मेल्टेड चीजयुक्त कुरकुरीत टोस्टाडा चिकन नाचोज, थाई रेड स्पायसेसमध्ये मुरवलेले फायर ग्रिल्ड श्रिंप अँड चिकन स्क्यूअर्स, चिकन विंग्जचे सहा अनोखे जागतिक प्रकार, मोझरेल्ला चीजचे टॉपिंग्ज असलेले टोस्टेड फ्रेंच ओनियन बाइट्स आदी ॲपिटायझर्सचा समावेश आहे. मुख्य भोजनाआधी रसना उद्दिपित करण्यासाठी हे पदार्थ अगदी आदर्श ठरतात.
मेन कोर्समध्ये चिकन व मत्स्यप्रेमींसाठी मेजवानी ठरतील अशा डिश आहेत. त्यात क्रॅब अँड पर्मेसान क्रस्टेड फिश, परिपूर्ण भाजलेले आणि वर चरचरीत मस्टर्ड सॉस लावलेले लॅटिन स्पाईस्ड हाफ चिकन, रेड हॉट क्रॅब क्रस्टेड चिकन यांचा समावेश आहे. इटालियन पदार्थांची आवड असणाऱ्या व विशेषतः शाकाहारींसाठी हर्ब बटर, ताजी ब्रोकोली, रेड कॅबेज, मश्रुम्स, स्पिनाच, चेरी, बॅसिल व पर्मेसान चीजचे टॉपिंग्ज असलेला ब्रोकोली एपिनार्ड पास्ता आहे. त्याखेरीज पिमेंटो टोमॅटो, चीज सॉस, गोट चीज, पर्मेसान चीज व ताजी पार्स्ले यांचे टॉपिंग्ज असलेला क्लासिक चिकन मीटबॉल पास्ताही आहे. गोचुजांग सॉस, पिकल्ड ओनियन्स, चेडार चीज, सिलँत्रो व रोस्टेड जलापिनोजचे टॉपिंग्ज असलेले रसाळ लाव्हा चिकन सँडविच नावाप्रमाणेच झणझणीत चवीचे आहे. सॅलडमध्ये अनेक आरोग्यदायी आणि चविष्ट प्रकार आहेत. त्यात दोन नवे सीजर सॅलडही सादर करण्यात आले आहेत. एक कॅजन स्पाईस्ड साऊथ वेस्ट श्रिंपसह असून सोबत चीज नाचोज मिळतात, तर दुसरे सॅलड साऊथवेस्ट ग्रिल्ड चिकनसह येते.
भारतात ‘टीजीआय फ्रायडेज’चे पहिले रेस्टॉरंट २० वर्षांपूर्वी दिल्लीत सुरु झाले. ‘टीजीआय फ्रायडेज’ हा अमेरिकन कॅज्युअल डायनिंगमधील प्रमुख ब्रँडपैकी मानला जातो. त्यांच्या मेनूमध्ये प्रसिद्ध आणि ट्रेड-सेटर पदार्थांचा समावेश झाला आहे. लोडेड पोटॅटो स्किन्स, एन्ट्री सॅलड्स, पास्ता डिशेस, बर्गर्स व सँडविचेस आणि जॅक डॅनियल्स चिकन, साल्मन आणि खासियत असलेले इम्पोर्टेड पोर्क रिब्ज हे त्यापैकी काही उल्लेखनीय.