पुणे ता.:- आजच्या धावत्या जगात विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळातही तरबेज व्हायला हवे. खेळांमुळे आयुष्यात सकारात्मक बदल होतात ज्यामुळे चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते. संघटितपणे काम करण्याची सवय लागते. तसेच परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमताही खेळाच्या माध्यमातून वाढते. असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
शिक्षक दिनानिमित्त कसबा मतदारसंघातील नूमवी प्रशाला,सेंट हिल्डाज हायस्कूल, गोमतीबेन रघुनाथ बारोट स्कूल या ठिकाणी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.शिवाय कसबा मतदार संघाच्या निधीतून नूतन मराठी प्रशालेला संगणक आणि कबड्डी मॅट देण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. कसबा मतदारसंघातील ९० शाळांमधील ३८०० शिक्षकांना यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ताताई टिळक, अजय खेडेकर,अशोक येनपुरे,हेमंत रासने ,संजय देशमुख,निलेश कदम,प्रमोद कोंडरे,सुलोचना कोंडरे,आरती कोंडरे,सम्राट थोरात ,राजू परदेशी, गायत्री खडके तसेच इतर नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारीही उपस्थित होते.
त्यामुळेच विद्यार्थ्यांसाठी केली जाणारी कामे मदत म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून केली जातात आणि भविष्यातही केली जातील. जीवनामध्ये कधी कोणाला काय दिले यापेक्षा अजून कोणाला काय देता येईल यासाठी प्रयत्न केले. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कसबा मतदार संघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे यांनी केले.